Saturday 24 August 2019

कारण 'राज'कारण...!

"लोकसभा निवडणुकीत भाजपेयींना राज ठाकरेंनी घाम फोडला होता. त्या प्रचाराचं मतांमध्ये रुपांतर झालं नव्हतं. याला काँग्रेसचं पूर्व चारित्र्य कारणीभूत ठरलं होतं. काँग्रेसचं चारित्र्य म्हणजे भाजपचं पुण्यकर्म नव्हे. याची जाण असल्यानं त्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी राजच्या मागं चौकशीचं शुक्लकाष्ठ लावून स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतलाय. राज हे जेव्हा प्रचारात उतरतील, तेव्हा भाजप नेत्यांची भंबेरी उडेल. त्यांना निवडणूक काळात चौकशीत गुंतवून, तुरुंगवास घडवायचा इरादा असेल तर, भाजपला नकारात्मक निकालाला सामोरं जावं लागेल. कारण भारतीय मतदार सुडाच्या राजकारणाला नाकारतो. हा इतिहास आहे"
-----------------------------------------------
अखेर राज ठाकरेंची ‘ एन्फोर्समेंट डिरेक्टोरेट-ईडी'ची तब्बल नऊ तासाहून अधिक काळ चौकशी झाली. तसं हे अपेक्षितच होतं. सीबीआय, इडीचा उपयोग सत्ताधारी मग ते कोणत्याही पक्षाचे असोत, अगदी हेडमास्तरांच्या छडीसारखा आजवर करत आले आहेत, आपल्या विरोधकांना कायदेशीर मार्गानं नमवण्यासाठी काँग्रेसनं आजवर तेच केलं आणि आता भाजपेयींही त्याच मार्गानं चाललेत. काँग्रेस आणि भाजपेयींच्या मार्गात मात्र एक महत्वाचा फरक आहे. काँग्रेसचा हेतू आपल्या विरोधकांना नमवणं, गप्प करणं किंवा स्वत:च्या कच्छपी लावणं इतकाच मर्यादीत होता. भाजपेयींचा हेतू मात्र जरा जास्त आक्रमक आहे. भाजपेयींचा हेतू विरोधकांना नमवणं, स्वतःच्या पक्षात प्रवेश घ्यायला लावणं आणि इतकं करूनही भागलं नाही तर विरोधकांना थेट मुळापासून उखडून टाकण्याचा आहे, हे स्पष्ट दिसतं. त्यात अशा कारवायांमध्ये देशभक्त्तीचा खोटा रंग बेमालूमपणे मिसळल्यामुळं आणि त्याला सोशल मीडियावर जाणून-बुजून प्रसिद्धी दिली जात असल्यानं, त्यांना जनतेचीही 'अंध' साथ मिळतेय, हे खरं आहे.
*ही जणू एकपक्षीय हुकूमशाहीच*
सन २००८ साली झालेल्या 'कोहिनूर मिल'च्या जागेतील व्यवहारात 'मनसे' अध्यक्ष राज ठाकरे आणि उन्मेष जोशी यांच्या व्यवहारात काही अनियमितता आढळली असल्यानं, राज ठाकरेंना 'एन्फोर्समेंट डिरेक्टोरेट-ईडी' कडून चौकशीसाठी पाचारण करण्यात आलं. कोणत्याही यंत्रणाना काही दुवा मिळाला असेल तर आणि त्यांच्याकडे तसा ठोस पुरावा असेल तर, किंवा तशी कुणी कुणाविरुद्ध तक्रार केली असेल तर, अशा यंत्रणा कायद्यानं कुणालाही चौकशीसाठी बोलावू शकतात. राज ठाकरेंनाही त्यांनी काही केलेल्या व्यवहारांबद्दल ईडीला चौकशी करायची असल्यानं, त्यांना हजर राहायला सांगितलं असेल. असं असलं तरी, ईडीच्या माध्यमातून सरकार साधू इच्छित असलेल्या हेतूबद्दल मात्र शंका घ्यायला भरपूर जागा आहे. आपल्या देशात बहुपक्षीय पद्धतीची लोकशाही आहे. गेली ७० वर्ष लोकशाहीचा हा गाडा चाललाय. लोकशाहीत दोन महत्वाचे भाग असतात. एक सत्ताधारी तर दुसरा विरोधीपक्ष! किंबहूना विरोधीपक्षाची भुमिका लोकशाहीत जास्त महत्वाची असते. सत्तेवर कुणीही असो. 'हम करे सो कायदा' ही वृत्ती वाढीला लागते आणि असं करण्यापासून सत्ताधाऱ्यांना रोखण्यासाठी, सत्तेचा तोल सावरून धरण्यासाठी देशात अथवा राज्यात तेवढाच मजबूत विरोधी पक्ष असणं लोकशाहीच्या सुदृढ अस्तित्वासाठी अत्यंत आवश्यक असतं. आज देशात विरोधी पक्षच अस्तित्वात नसल्यानं किंवा आहेत त्यांचं अस्तित्व जाणवत नसल्यानं निर्माण झालेली परिस्थिती सशक्त लोकशाहीसाठी चिंताजनक झालेली आहे. आपल्या देशातून विरोधीपक्ष जवळपास संपलाय किंवा तो सत्ताधारी पक्षात सामील झालेला आहे. जे कोणी स्वतःला विरोधीपक्ष म्हणवून घेत आहेत, ते एक तर गोंधळलेल्या मनस्थितीत आहेत किंवा त्यांनी लढण्याची सर्व हत्यारं म्यान करून टाकल्याचं दिसतं. सक्षम विरोधी पक्षाशिवायची लोकशाही म्हणजे, दुसरं काही नसून लोकशाहीचा बुरखा पांघरलेली एकपक्षीय हुकूमशाहीच असते, हे विचारी माणसाला पटायला हरकत नाही. आपल्या देशाची सध्याची राजकीय वाटचाल देखील त्याच दिशेनं होत आहे की काय, अशी शंका इथं उपस्थित होतेय!
*राज्यातही विरोधीपक्षच शिल्लक राहिला नाही*
महाराष्ट्राचा विचार केला असता, महाराष्ट्रात प्रमुख विरोधीपक्ष म्हणून भूमिका बजावू शकली असती अशी शिवसेना, आज सत्ताधारी पक्षासोबत आहे. स्थानिक पक्षांना फारसं बळ मिळू नये अशी भाजपेयींची राष्ट्रीय नीती आहे. त्यामुळे शिवसेनेच्या पुढच्या दहा-पाच वर्षातल्या राजकीय अस्तित्वाबद्दल ठोसपणे आताच काही सांगता येणं अवघड आहे. महाराष्ट्रातल्या उरलेल्या विरोधी पक्षांपैकी काँग्रेसचं अस्तित्वच संपलेलं आहे आणि त्यासाठी ते स्वतःच कारणीभूत आहेत. जवळच्या नात्यात लग्न केल्यानंतर होणारी संतती फारशी कर्तृत्ववान निपजत नाही, तसाच काहीस काँग्रेसचं झालेलं आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदाचं लग्न सातत्याने गांधी घराण्यात होत आल्यामुळं, त्यांच्याकडे इतर कुणी कर्तृत्ववान नेतृत्व निर्माण होऊ शकलेलं नाही. त्या रितेपणाचं प्रतिबिंब महाराष्ट्र काँग्रेसमध्ये पडलेलं दिसत. राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष हा शरद पवारांचा एक खांबी तंबू, हा खांब कमकुवत झालेला आहे. शिवाय त्या खांबाचा जनाधार जवळपास संपत चाललेला आहे. हे त्यांचे नेते आणि कार्यकर्ते कबूल करणार नाहीत कदाचित, पण ही जमिनीवरची वस्तुस्थिती आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे त्यांच्या स्वतःच्याच कार्यपद्धतीमुळे विझत आलेले पक्ष आहेत. नेतृत्वहीन, शक्तीहीन त्यामुळंचं सत्ताहीन बनलेल्या या पक्षांचं अस्तित्व पार विस्कटलेलं आहे!
*राज्यात मनसेकडं विरोधीपक्षाची धुरा?*
ह्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली विरोधी पक्षाची पोकळी भरून काढण्यासाठी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ हा राज ठाकरे यांचा एकमेव पक्ष शिल्लक राहतो. वंचित आघाडीची आहेच. राज ठाकरे हे करिष्मा असलेले आणि उत्तम वक्तृत्व लाभलेले महाराष्ट्रातले एकमेव नेते आहेत. त्यांच्या पक्षाची स्थापना झाली, त्याचवेळी त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात दमदारपणे एंट्री घेतली होती, पण त्यानंतरच्या पुढच्या काही वर्षात त्यांना मिळालेलं यश टिकवून ठेवता आलेलं नाही; किंबहुना पक्षाची स्थिती दिवसेंदिवस खालावतच गेली ही वस्तुस्थिती नाकारण्यात अर्थ नाही. असं असूनही, स्वतः राज ठाकरे मात्र वैयक्तिक करिष्मा अजूनही टिकवून आहेत आणि याच बळावर ते येत्या काळात महाराष्ट्रात सक्षम विरोधीपक्षाची भूमिका बजावू शकतात अशी शक्यता निर्माण झालेली आहे. त्यात त्यांनी ईव्हीएम ऐवजी बॅलट पेपरवर निवडणूक घ्याव्यात ह्यासाठी आंदोलन छेडण्याची घोषणा केलीय. ह्या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळू शकतो, ह्यात काही वाद नाही. पुन्हा त्यांना सर्व विरोधीपक्षांची साथही मिळालेली आहे. विरोधीपक्षांनाही राज ठाकरेंच्या नेतृत्वामागे जाण्याशिवाय गत्यंतर उरलेलं नाही. फेसबुकवर या घडामोडीची तुलना करताना एकानं लिहिलंय की, *'खचलेल्या पिचलेल्या राज्यातल्या विरोधीपक्षांना एक नवा 'जेपी' मिळालाय!'* अशी मल्लिनाथी त्यानं केलीय. हे ही तेवढंच खरं आहे.
*'टाईमिंग' साधण्यात भाजपेयीं वाकबगार!*
येत्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसेनं सत्ताधाऱ्यांसमोर गंभीर आव्हान उभं करून, राज ठाकरे  विरोधीपक्ष ही भूमिका बजावण्यासाठी सज्ज झाले असतानाच, त्यांची ईडीकडून चौकशी व्हावी हा निश्चितच योगायोग नाहीय. त्यामागं विरोधी पक्षांना उभं राहायला जागाच ठेवायची नाही आणि त्यांना विविध चौकश्यामध्ये गुंतवून ठेवायची राजकीय गणितं नक्की आणि पक्की असलेली दिसताहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना चौकशीच्या फेऱ्यात अडकवून ठेवण्याचं 'टायमिंग' ईडीच्या ढालीखाली सत्ताधारी पक्षानं नेमकं साधलंय हे स्पष्ट आहे. मात्र साळसूदपणे भाजपेयीं ते नाकारताहेत. राज दोषी आढळले असतील तर त्यांची चौकशी व्हायला हवी. त्यांचीच कशाला, तर प्रत्येक दोषी वाटणाऱ्या व्यक्तीची, मग ती कितीही लोकप्रिय असो वा कितीही मोठ्या पदावर असलेली असो, यात काही संशय अथवा कुणाची तक्रार असल्यास कायदेशीर चौकशी व्हायला हवी, अशी कायद्यावर विश्वास असणाऱ्या कुणाही व्यक्तीची भूमिका असते. राज ठाकरे, पी.चिदंबरम यांच्या चौकशीचं नाट्य रंगत असतानाच राज्य सहकारी बँकेच्या ७८ हून अधिक संचालकांवर गुन्हा नोंदविण्याचा भाजपेयींना अपेक्षित आदेश न्यायालयानं दिलाय. या संचालकांपैकी एखादं दुसरा संचालक हा सत्ताधारी पक्षाचा आहे तर इतर सारे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आहेत. २०१४ पूर्वी काँग्रेसच्याच मुख्यमंत्र्यांनी बरखास्त केलेल्या या संचालकांवर कारवाई करण्याचा आदेश २०१९च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर निघावा, हा योगायोग निश्चित नाही!
*भाजप जणू 'वॉशिंग मशीन!'*
राज ठाकरेंची चौकशी करणाऱ्या ईडीच्या आडून सत्ताधारी पक्षाच्या ‘पोपट यंत्रणा’....होय पोपट यंत्रणाच हे नांव तर सर्वोच्च न्यायालयानेच दिलंय! कायदा राबवण्यात, आप-परभाव करत आहेत, असं मात्र खात्रीनं म्हणता येतं. 'कायद्यासमोर सर्वच समान' पण प्रत्यक्षात मात्र तसं दिसत नाही. सत्तेच्या तबेल्यात बांधला गेलेला कायदा सर्वांकडं समान नजरेनं बघतोच असं नाही, किंबहुना सत्ताधाऱ्यांना त्याच कायद्याचं अनधिकृतरित्या संरक्षण लाभलेलं असतं. सध्या भाजप जणू 'वॉशिंग मशीन' झालाय. कोणत्याही भ्रष्टाचाऱ्याला पक्षात घेतलं की, तो झाला स्वच्छ! पदरी पडलं अन पवित्र झालं अशीच स्थिती आहे!
*राज ठाकरे यांचा वापर तसाही अन असाही!*
ईडीनं ठाकरे–जोशी-शिरोडकर यांना चौकशीची नोटीस पाठवली त्याची कार्यवाही फेब्रुवारीत सुरु झाली असं म्हणतात. दरम्यान लोकसभा निवडणुका झाल्या आणि बरोबर विधानसभा तोंडावर असताना ही नोटीस यांना मिळाली, या टायमिंगनं चर्चेला अधिक उधाण आलंय. राज्यातील राजकीय पटल बघितलं तर चौकोनी स्थिती आहे. भाजप-सेना, राष्ट्रवादी-काँग्रेस, लोकसभेला चुणूक दाखवणारी वंचित आघाडी आणि चौथा कोन राज ठाकरे. यातील आघाडीचं बळ कमी झालंय आणि त्यांना आता ‘आधारापेक्षा युतीची मतं छाटणारी धार महत्वाची’ आहे. एकतर वंचितनं लोकसभेत आघाडीच्या उमेदवारांना मेटाकुटीला आणलं यामुळे काही जागा गमवाव्या लागल्या आणि आता वंचित शाबूत राहून लढली तर याचा मोठा फटका आघाडी आणि काही प्रमाणात युतीला देखील बसणार ! म्हणूनच भाजपेयीं आणि पवार यांच्या डावपेचांना सुरुवात झालीय. या डावपेचात राज ठाकरे यांची कृती लक्षणीय राहणार. यातून पवार यांनी राज यांना बळ देणे सुरु केलंय आणि आणखी काही पाऊलं ते पुढे गेले तर पंचाईत होण्याआधी हे ईडी चौकशीचं टायमिंग असेही मानायला हरकत नाही, दुसरं म्हणजे जसं वंचितनं राष्ट्रवादी आणि काँग्रेसला फटका दिला तसा विधानसभेत राज यांच्या माध्यमातून युतीला बसावा म्हणूनही डाव आखले जाताहेत, हा डाव बसून सिक्वेन्स जुळण्याआधीच पत्ते पिसण्याचे मनसुबे भाजपेयींनी रचले आणि म्हणून ही नोटीस असू शकते. राज यांचे ‘मोरल’ डाऊन करण्यापेक्षा त्यांना ‘जर तर च्या’ गणितात गृहीत धरून विद्यमान सत्ताधारी पक्षांविरोधातील नाराज मतांच्या व्यवस्थापनासाठी राज यांचा उपयोग होऊ शकतो. ही नाराजांची हमखास विरोधी मतं राज यांच्या पारड्यात गेली तर काही बिघडणार नाही यासाठी ही खेळी असू शकते. राज यांचे किती उमेदवार उभे राहणार, किती निवडून येणार यापेक्षा विधानसभेत ते डॅमेज करणार का? लोकसभेची व्याप्ती मोठी होती. राज यांच्या आठ-दहा सभांनी काय होणार? त्यावेळी सभांची गर्दी बघता परिणाम होईल असे वाटताना निकाल वेगळेच सांगत होते. यातूनच पुन्हा आता इव्हिएमची मोहीम हाती घेतली गेलीय.आज राज यांचा राज्याच्या राजकीय चौकोनातील ‘चौथा कोन’ महत्वाचा आहे तो यासाठी की, त्यांना बळ कुणी आणि किती द्यावे यावरच आघाडी आणि युतीचे शिरस्थ नेतृत्त्व आपापल्या दृष्टीनं विचार करणार. राज खेळी खेळतील का? यापेक्षा ते कुणासाठी खेळतील हे आगामी महिन्यात कळेल. राज ‘ठाकरे’ आहेत, एवढे ध्यानी घेतले तरी पुढच्या काळात काय होईल याचा अंदाज घेता येतो. ते सद्यस्थितीचा फायदा राजकारणात करून घेतात की त्यांच्या परिस्थितीचा फायदा कोणता पक्ष घेतो. याचे आडाखे बांधणं सुरु आहे. राज यांच्याकडं पक्के गड नाहीत, पक्के सरदार नाहीत आणि यामुळे सैन्यात एकजिनसीपणा-सुसूत्रता नाही. रणनीती आखताना हे आधी लक्षात घेतलं जातं. राज यांची आगामी वाटचाल कशी असेल हे त्यांनी ईडीच्या चौकशीनंतर दिलेल्या प्रतिक्रियेतुन स्पष्ट होतं!
*किणी ते कोहिनूर*
 ईडीनं राज ठाकरे यांची चौकशी केलीय. त्यापूर्वी  कोहिनूर मिल जमीन खरेदीप्रकरणी राज ठाकरे यांच्यासह माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे सुपुत्र आणि कोहिनूर-सीटीएनएल कंपनीचे मालक उन्मेष जोशी आणि राज यांचे मित्र राजन शिरोडकर यांचीही चौकशी करण्यात आलीय. उन्मेष जोशी आणि शिरोडकर यांची पुन्हा उद्या सोमवारी ईडी कार्यालयात चौकशी होणार आहे. राज ठाकरेंसाठी चौकशीचा ससेमिरा ही काही नवी गोष्ट नाही. गेल्या २३ वर्षात ते अनेकदा अशा प्रसंगांना सामोरे गेले आहेत. यातील पहिला प्रसंग १९९६-९७ मधला आहे.
*रमेश किणी प्रकरणी सीबीआय चौकशी*
राज्यात पहिल्यांदा शिवसेना-भाजप युतीचे सरकार आलं होतं तो हा काळ! सत्ता स्थापन होऊन अवघं वर्ष-दीड वर्षही उलटलं नव्हतं. तेव्हा राज शिवसेनेच्या भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष होते आणि पक्षाच्या नेतेपदी त्यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली होती. शिवसेनेचा तरुण आणि तडफदार चेहरा आणि शिवसेनाप्रमुखांचा वारस म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. ते त्यावेळी प्रसिद्धीच्या अत्युच्च शिखरावर होते. आणि त्या काळात ते एका मोठ्या वादात सापडले. राज ठाकरेंवर थेट खुनाचा आरोप झाला. विरोधकांना आयतंच कोलीत मिळालं. त्यावेळी खून झाला होता दादर मधल्या हिंदू कॉलनीत राहणाऱ्या रमेश किणी यांचा. किणी यांनी त्यांचं राहतं घर विकावं यासाठी त्यांच्यावर प्रचंड दबाव टाकला जात होता. पण त्याला किणी तयार नव्हते. एकदा त्यांना ‘सामना’ कार्यालयात बोलावण्यात आलं होतं. त्याकाळी राज हे व्यंगचित्र काढण्यासाठी ‘सामना’त बसत. त्यांचे स्वतःचं असं दालनही होतं. एका सायंकाळी मुंबई-पुण्यात खूप पाऊस कोसळत होता. निरोपानुसार किणी ‘सामना’त आले मात्र तिथून ते घरी परतलेच नाहीत आणि नंतर दुसऱ्या दिवशी थेट त्यांचा मृतदेहच पुण्यातल्या अलका थिएटरमध्ये आढळला. इतका पाऊस कोसळत असताना किणी पुण्यात पोहोचले कसे ? त्यांचा मृत्यू कसा झाला?  त्यांचा मृत्यू नैसर्गिक होता की त्यांचा खून झाला? असे अनेक प्रश्न यानिमित्तानं पुढे आले. त्यातच किणींच्या शवविच्छेदनात जो घोळ ससून रुग्णालयानं घातला त्यानं तर हे प्रकरण खूपच संशयास्पद बनलं. किणी यांच्या पत्नी शीला यांनी या प्रकरणात थेट राज यांच्यावर त्यांच्या पतीच्या खुनाचा आरोप केला. किणींवर घर विकण्यासाठी कसा दबाव होता याची माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांपुढं उघड केली. या प्रकरणात राजचे मित्र असलेले व्यावसायिक शाह पिता-पुत्र म्हणजेच लक्ष्मीचंद शाह आणि सुमन शाह तसेच जिवलग मित्र आशुतोष राणे हे देखील अडकले. त्यावेळी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेले छगन भुजबळ यांनी किणी खुनाचं प्रकरण खूप लावून धरलंं. ठाकरे कुटुंबात, रस्त्यावर ते अगदी विधिमंडळातही या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले. प्रकरण देशभर गाजत होतं. विरोधी पक्षानं आपला दबाव दिवसागणिक वाढवतच नेला होता. प्रसिद्धीमाध्यमांनी तर राजना लक्ष्य केलं होतं. अखेर याचा तपास सीआयडीकडून सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आला. लक्ष्मीचंद शाह-सुमन शाह आणि आशुतोष राणे यांची सीबीआय चौकशी सुरु झाली. पण या प्रकरणाला नाट्यमय वळण तेव्हा मिळालं, जेव्हा स्वतः राज ठाकरे यांना  सीबीआयनं चौकशीसाठी पाचारण केलं. राज्यात सत्ता असतानाही राज यांना या प्रकरणात गोवण्यात येतंय, त्यांना सीबीआय पुढं चौकशीला हजर व्हावं लागणार या घटनांनी त्यावेळी ठाकरे कुटुंबातही खूप कलह झाल्याची चर्चा होत होती. अखेर राज ठाकरे सीबीआय चौकशीला सामोरे गेले. सीबीआयनं या प्रकरणाचा विविध पातळीवर तपास केला आणि काही काळानं ठोस पुराव्याअभावी या प्रकरणातून राज ठाकरे आणि त्यांचे मित्र यांना निर्दोष सोडलं. पण असं म्हणतात की त्यावेळी राजना या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी बाळासाहेबांनी तत्कालीन पंतप्रधानांची भेट घेतली होती, असं सांगितलं जातं. या प्रकरणानं राज ठाकरे राजकारणातून मागे फेकले गेले. तो उद्धव ठाकरे यांच्या राजकीय उदयाचा काळ होता. किणी खून प्रकरणातल्या इत्यंभूत बातम्यांसाठी प्रसारमाध्यमांना रसद पुरवण्याचे कामही ‘मातोश्री’तूनच होत असे अशी त्यावेळी दबक्या आवाजात चर्चा होत असे.
*मराठी अस्मितेच्या आंदोलनात ८५ केसेस*
दुसरा प्रसंग आहे तो २००८ मधला. राज ठाकरे यांनी २००६ मध्ये 'महाराष्ट्र् नवनिर्माण सेना' हा नवा राजकीय पक्ष स्थापन केला. २००७ मध्ये झालेल्या मुंबई आणि अन्य महापालिका निवडणुकांना ते पहिल्यांदा स्वतःच्या ताकदीवर सामोरे गेले. पण मनसेला अपेक्षित यश मिळालं नाही. २२७ नगरसेवक संख्या असलेल्या मुंबई महापालिकेत मनसेचे अवघे ७ आणि ठाणे, पुणे, नाशिकमध्येही किरकोळ संख्येने नगरसेवक निवडून आले होते. मग स्थापनेनंतर अवघ्या २ वर्षात म्हणजे २००८ ला राज ठाकरेंनी प्रांत आणि मराठी भाषेच्या अस्मितेचा मुद्दा आक्रमकपणे हाती घेतला आणि रेल्वे भरती परीक्षा ते  टँक्सी-रिक्षा, फेरीवाला रोजगारात असलेल्या परप्रांतीयांना मनसे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर अक्षरश: तुडवलं. अवघा महाराष्ट्र या मुद्यावरुन पेटला होता. प्रांत-भाषेच्या अस्मितेचा मुद्दा राज ठाकरेंनी हिरावून घेतल्यानं कधी हिंदुत्व तर कधी मराठी अभिमान अशी दुहेरी कास धरणाऱ्या शिवसेनेचीही मोठी कोंडी झाली. त्यांना राजकारणात पुन्हा सूर गवसला. २००९ मध्ये एका फटक्यात मनसेचे १३ आमदार आणि त्यानंतर २०१२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत मुंबईत २७, पुण्यात २८ आणि नाशिकमध्ये पक्षाचा पहिला महापौर बसवण्याइतके घवघवीत यश मनसेला मिळवून दिलं. एकीकडे मिळालेलं हे राजकीय यश, प्रसिद्धीचं वलय ही बाजू असताना मराठी अस्मितेच्या आंदोलनात मानवाधिकार आयोगाचं उल्लंघन तसंच हिंसेसाठी कार्यकर्त्याना चिथावणं यासाठी राज ठाकरेंवर राज्यात आणि राज्याबाहेर जवळपास ८५ हून अधिक केसेस कोर्टात दाखल झाल्या. पण असं म्हणतात की त्यावेळी राज यांच्या मनसेला राजकीय संजीवनी देण्यामागं आघाडी सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची पडद्यामागे महत्वाची भूमिका होती. मनसेच्या आंदोलनाकडे सोयीस्कर कानाडोळा करीत विलासरावांनी ते पेटू दिलं. शिवसेनेच्या हक्काच्या मराठी मतपेटीत फूट पडून आघाडीची सत्ता कायम राखणं हा त्या मागचा उद्देश होता आणि तो साध्य करण्यात विलासराव यशस्वीही ठरले होते. राजना मराठी अस्मितेच्या या मुद्द्यानं राजकारणात सोनेरी दिवसही दाखवले आणि अंगावर ढीगभर केसेसही दिल्या.
*कोहिनुर मिल खरेदी ते ईडी चौकशी*
तिसरा प्रसंग २००३ ते आता २०१९ दरम्यानचा हे प्रकरणही शिवसेनेत असतानाचं आहे. किणी प्रकरणातून नुकतेच बाहेर पडलेले राज तसे राजकारणात चाचपडतच होते. नवी संधी, नव्या आशेच्या किरणांच्या शोधात होते. पुन्हा राजकारणात सक्रिय व्हायचं की व्यंग्यचित्रकारीतेची कास धरायची, की उद्योग धंद्यात नशीब आजमावायचं? एका बाजूला उद्धव ठाकरे यांनी राजकारणात जम बसवला होता, शिवसेनेची सूत्रं उद्धव यांच्याकडे आली होती. राज ठाकरे मात्र द्विधा मनःस्थितीत होते. त्यातच भारतीय विद्यार्थी सेनेतले जवळचे मित्र राजन शिरोडकर आणि उन्मेष जोशी यांच्या मदतीनं बांधकाम व्यवसायात नशीब आजमावायचं राजनी ठरवलं. राज, राजन शिरोडकर, नितीन सरदेसाई आणि अन्य काही मित्रांनी मिळून बांधकाम व्यवसायात ‘मातोश्री इन्फफ्रास्ट्रक्चर माध्यमातून यापूर्वीच मुहूर्तमेढ रोवली होती. राज ठाकरे यांची ‘मातोश्री इन्फ्रास्ट्रक्चर', जोशी यांची ‘कोहिनूर-आयआयएफएल' आणि खासगी बँकांच्या मदतीनं कोहिनूर मिलची सोन्याचा भाव असलेली जागा अगदी क्षुल्लक किमतीत विकत घेतली गेली. ४२१ कोटीला सौदा झाला. सौद्याची रक्कम ऐकून त्यावेळी अनेकांनी तोंडात बोटे घातली होती. भूमीपूजनाच्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे आणि उन्मेष जोशी यांनी इथे होणाऱ्या आलिशान प्रकल्पात १०० गिरणी कामगारांच्या प्रत्येकी एका मुलाला रोजगार दिला जाईल असे आश्वासन दिलं. पण प्रत्यक्षात तसं घडलं का? हे या दोघांनाच ठाऊक. पण हा जमीन व्यवहार पूर्ण होऊन एक वर्षही उलटत नाही तोच राज ठाकरे यांनी आपला हिस्सा काढून घेतला आणि ते या प्रकल्पातून बाहेर पडले. या जमीन व्यवहारासाठी राज आणि त्यांच्या भागीदारांनी पैसे कसे आणि कुठून उभे केले? हा तेव्हाही चर्चेचा विषय बनला होता, ज्या चर्चेची आज ईडी प्रत्यक्षात चौकशी करतेय.
- हरीश केंची
९४२२३१०६०९

चौकट....
*असं आहे 'कोहिनुर' प्रकरण!*
शिवसेना भवनासमोर असलेल्या कोहिनूर मिलचा लिलाव २००५ मध्ये झाला त्याची सर्वाधिक बोली ४२१ कोटी रुपये. ही मातोश्री इन्फ्रास्ट्रक्चर ने केली होती. या मातोश्री इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये उन्मेष जोशी, राजन शिरोडकर आणि राज ठाकरे भागीदार होते. मात्र प्रत्यक्ष जमिनीवर होत असताना त्यात आयएलएफएस म्हणजेचं इंफ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्स सर्विस कंपनी सामील झाली. त्यांनी या व्यवहारात २२५ कोटी रुपये गुंतवून निम्मी भागीदारी मिळवली. पुढे काही दिवसानंतर या कंपनीनं आपल्या सव्वादोनशे कोटी रुपयांची भागीदारी मातोश्री इन्फ्रास्ट्रक्चरला अवघ्या ९० कोटी रुपयांना विकली. त्यानंतर १२५ मजल्याच्या कोहिनूर स्क्वेअर टॉवर उभारण्यासाठी ५०० कोटी रुपयांचं कर्जही दिलं. पण त्यापूर्वी इथे कमर्शिअल कॉम्प्लेक्स होणार नाही असे लक्षात आल्यानंतर राज ठाकरे या व्यवहारातून बाहेर पडले. या व्यवहारात आयएलएफएस २२५ कोटी रुपयांची गुंतवणूक करणे त्यातून मिळालेली ५० टक्के मालकी १३५ कोटीचा तोटा सहन करून ९० कोटी रुपयांना मातोश्रीला विकणं आणि त्यावर पाचशे कोटी रुपयांचे कर्ज घेणं हा व्यवहार यामध्ये मनी लॉंडरिंग म्हणजे आर्थिक घोटाळा आहे असं सकृतदर्शनी दिसतं. उन्मेष जोशी, राज ठाकरे आणि राजन शिरोडकर यांनी तो केला आहे असं वातावरण मीडियानं तयार केलं. त्यात आयएलएफएस फसवणूक झाली असा समज करून दिला जात आहे मात्र ते अत्यंत चुकीचा आहे. राज ठाकरे यांच्या 'मातोश्री कन्स्ट्रक्शन' कंपनीनं कोहिनूर प्रकल्पात घेतलेली ५० टक्के भागीदारी कोणत्या स्थितीत घेतली आणि ती भागीदारी १३५ कोटी रुपये तोट्यात मातोश्री कन्स्ट्रक्शनला का दिली? त्यानंतर आयएलएफएस ने ५०० कोटी रुपयांचे कर्ज मातोश्री कन्स्ट्रक्शन ला का दिलं? ते वसूल झालं का? या प्रश्नाच्या उत्तरासाठी ही  चौकशी होती. पण या प्रश्नांचं उत्तर देण्याची जबाबदारी राज यांची नाही. कारण ते २००८ मध्येच या प्रकल्पातून बाहेर पडलेत. पाचशे कोटी कर्जाचा व्यवहार २०११ मध्ये झाला असताना त्याची नोंदणी २०१७ मध्ये का केली या सार्‍या प्रश्नांची उत्तरं  जोशी आणि शिरोडकर यांनी दोन दिवस झालेल्या त्यांच्या चौकशीत दिली असतील. इथे या प्रश्नांशी राज यांचा संबंध नाही त्यामुळेच राज यांची चौकशी ही शुद्ध राजकीय असल्याचं जाणवतं! राज ठाकरे सत्तेला देत असलेल्या शहाला काटशह देण्याचा खेळ ईडी मार्फत मांडला गेलाय. कोहिनूर मिलच्या मातोश्री कन्स्ट्रक्शन प्रकरणात राज ठाकरे पूर्ण निर्दोष आहेत.थोडीशी चूक अथवा अनियमितता असली तर ती जोशी-शिरोडकर यांची असावी. हा प्रकल्प अडचणीत आल्यानं तो रखडला, बँकांनी त्याचा ताबा घेतलाय. शिर्के नावाच्या मुंबईतल्या बिल्डरला हा प्रकल्प सोपवलाय.

Saturday 17 August 2019

पुनरागमनायच...!

"लोकसभेतील दारुण पराभवानंतर काँग्रेसपक्ष सैरभैर झाला. पुन्हा सोनियाजींकडं पक्षाची तात्पुरती सूत्रं सोपवली, त्यामागं काँग्रेसच्या संरचनेत जी प्रचंड उलथापालथ सुरू झालीय त्यावर नियंत्रण आणण्यासाठीची ही उपाययोजना दिसते. जी नवी रचना त्या उभी करतील त्यावर पक्ष नव्यानं उभा राहू शकेल असं नेत्यांना वाटतं. इथं चिंतन शिबिरांची परंपरा नाही पण जय-पराजय झाल्यास पक्षनेतृत्वाकडं बोट दाखवलं जातं. यातून नेते स्वत:ची सुटका करून घेतात. श्रेष्ठी मात्र टीकेचे धनी होतात. हा इतिहास आहे. नेहरू, इंदिराजींनी पक्षाची सूत्रं हाती येताच जुन्यांना दूर सारून नव्याची साथ घेतली होती पण सोनियाजी आणि राहुलनं तसं केलंच नाही. कार्यकर्त्यांशी, लोकांशी थेट संपर्क नसलेल्या वाचाळ आणि हुजऱ्यांनाच सोबत ठेवलं, त्याचा परिणाम जो व्हायचा तो झाला. राहुलनं पक्षालाच झटका देत, ज्येष्ठ नेत्यांच्या सुमार कामगिरीवर बोट ठेवत राजीनामा दिला, त्यानं नेते खडबडून जागे झाले. राहुलच्या राजीनामा मागे न घेण्याच्या निर्धारानं तर नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकलीय!"
-------------------------------------------------

*प्र* त्येकवेळी इतिहासाची पुनरावृत्ती होतेच असं नाही. त्यासाठी राजकीयदृष्ट्या व्यवहारचातुर्य हवंय जे जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्याकडं होतं. त्यांनी पक्षाची आणि सत्तेची सूत्रं हाती येताच आपल्या जुन्या सहकाऱ्यांना दूर सारलं. इंदिराजींनी तर जुन्या खोंडांना जाणीवपूर्वक हटवलं. पण राजीवजी त्याच इंदिराजींच्या सहकाऱ्यांवर विसंबून राहिले, त्यांच्या मृत्यूनंतर त्याच नेत्यांची सोनियाजींना साथ घेतली. या नेत्यांनी अनेकदा सोनियांना अडचणीत आणलं होतं. राहुल गांधींनी पक्षाची सूत्रं हाती घेतल्यानंतर पक्षहिताऐवजी सत्तेसाठी हपापलेल्या राजीवजींच्या काळातील नेत्यांना दूर सारणं गरजेचं होतं आणि आपल्या समवयस्क, तरुण, नव्या दमाच्या ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट, नवीन जिंदाल, मिलिंद देवरा यासारख्यांना सोबत घ्यायला हवं होतं. पण ते झालं नाही, कदाचित त्यांच्या नेतृत्वक्षमतेची राहुलना भीती वाटली असावी. त्याचा परिणाम काँग्रेसच्या अधोगतीत झालाय. असं घडलं असलं तरी आजही जनाधार नसलेली, कार्यकर्त्यांशी थेट संपर्क नसलेली किंबहुना कार्यकर्त्यांचं पाठबळ नसलेल्या मणिशंकर अय्यर, चिदंबरम, सॅम पिट्रोडा यासारख्या वाचाळ नेत्यांनी पक्षाला घेरलंय तेच पक्षाला रसातळाला घेऊन जाताहेत! 

*राहुल यांचं यश दिसलं, पण.....!*
राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष असताना बिहारमध्ये नितीशकुमार, लालूप्रसाद यादव यांच्यासोबत जाऊन भाजपला रोखलं होतं. नंतर काँग्रेसचं नेतृत्व स्वीकारलं तेव्हा त्यांनी गुजरातमध्ये भाजपच्या सरकारला पुरतं घायाळ केलं होतं. ती किमया त्यांनी गुजरातमधल्या नव्या नेतृत्वाला पुढे आणून साधली होती. पुढं त्यांच्याच नेतृत्वाखाली काँग्रेसनं पंजाब, गोवा, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड इथं यश मिळवलं होतं. दरम्यानच्या काळात कर्नाटकात जेडीएससोबतचा प्रयोगही करून पाहिला होता. तो काही काळ यशस्वी झाला होता. त्यांनी नेतृत्व सोडल्यानंतर कर्नाटक काँग्रेस सैरभैर झाली आणि ते राज्य हातातून गेलं.  लोकसभा निवडणुकांत त्यांनी नोटबंदी, राफेल अशा मुद्द्यावरून देशभर वादळ निर्माण केलं त्या मोहिमेत बरेच ज्येष्ठ नेते मागं होते. या नेत्यांनी तिकिटं मिळवताना पक्ष नेतृत्वाच्या निर्णयांत अडचणी आणल्या. काही राज्यांमध्ये आघाडी करण्याचे प्रयोग उधळून लावले. आपल्याच नातेवाईकांमध्ये तिकिटं जातील याची खबरदारी घेतली होती. आपल्या नेत्यांचे असे कारनामे राहुलना माहीत असल्यानं त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा तर दिलाच पण आपण राजीनाम्यावर ठाम असल्याचं प्रतिपादन करून ट्विटरवर त्यांनी चार पानी पत्र प्रसिद्ध केलं होतं.
या पत्रात त्यांनी “काँग्रेसला भविष्यात प्रगती करायची असेल तर पक्षाला यापुढे कठोर निर्णय घेण्याची गरज असून २०१९ च्या पराभवाची जबाबदारी काहींनी घेण्याची वेळ आलीय. भारतानं आता लोकशाही संस्थांच्या पुनरुज्जीवनासाठी, त्यांच्या पुनर्उभारणीसाठी सज्ज राहिलं पाहिजे आणि हे साध्य करण्यासाठी पक्ष तयार आहे. यासाठी काँग्रेस पक्षानं स्वत:च्या रचनेत पूर्णपणे बदल केले पाहिजेत. आज भाजप सामान्य लोकांचा आवाज दाबत आहे. आपलं कर्तव्य हे आहे की सामान्य लोकांच्या आवाजासाठी आपण रस्त्यावर आलं पाहिजे. भारत हा कुणा एकाचाच आवाज नाही तर अनेकांचा आहे. या अनेकांच्या आवाजात येणारी समता हेच भारतमातेचं सार आहे,” अशी भूमिका मांडली होती. राहुल यांची या पत्रामागची भावना पाहिल्यास आणि आता ३७० कलम रद्द केल्यानंतर काँग्रेसमधले काही नेते पक्षाच्या भूमिकेला छेद देणारी भूमिका मांडत असल्याचं पाहता, काँग्रेस नेत्यांना एकतर राहुल गांधी यांची पक्ष सोडण्यामागची भूमिका लक्षात आलेली नाही किंवा ते पराभवातून काहीच शिकलेले नाहीत, असं म्हणण्यास वाव आहे. हे नेते भाजपच्या पूर्ण दबावाखाली आल्यासारखं वाटतात. अशा बड्या नेत्यांची संभ्रमावस्था निश्चितच पक्षाच्या दृष्टीने चिंतेची आहे आणि हे दिसूनही येते. त्यामुळे काँग्रेस कार्यकारिणीला आपल्या पक्षातील मतमतांतरांचं गांभीर्य लक्षात आल्यानं त्यांनी निर्णय ढकलला असावा, अशीही एक शक्यता आहे. दुसरा एक धोका पक्षात आलेल्या शैथिल्याचाही आहे. संसदेत माहिती अधिकाराचा कायदा, तिहेरी तलाक कायदा आणि ३७० कलम रद्द करण्याचा कायदा संमत होऊनही राज्याराज्यातील काँग्रेसचा एकही नेता रस्त्यावर उतरला नाही कि, त्यांनी या कायदाचा निषेध वा त्याला विरोध करणारा मोर्चा काढलेला नाही. माहिती अधिकारात दुरुस्त्या करून जनतेचं सत्तेला जाब विचारण्याचं हक्क कसं नाकारलं आहे त्याची साधी सोप्या भाषेत माहितीही काँग्रेस नेते मतदारांपुढे मांडताना दिसत नाहीत. असा पक्ष वेगानं निष्प्रभ अवस्थेत जात असेल तर त्याला संजीवनी आणण्यासाठी शस्त्रक्रियेची जरूरी आहे. ती शस्त्रक्रिया सोनिया गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली होत असेल तर तो एकप्रकारे सूज्ञ निर्णय म्हणावा लागेल. राहुल गांधी यांना पक्षात व्यक्तीस्वातंत्र्य, मतस्वातंत्र्य, आधुनिकता, सेक्युलरिझम, समता, न्याय्य अशा वैचारिक मूल्यांशी सतत प्रामाणिक राहणारे नेते हवेत आणि तसं मिशन प्रत्येकानं हाती घ्यायला हवं असं आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हटलं होतं. प्रत्यक्षात काँग्रेस नेत्यांनी त्यांच्याशी एकप्रकारची गद्दारीच केली. हे नेते लोकांपासून दूर राहिले. मतदारांशी संवाद ठेवला नाही. काँग्रेसच्या विरोधात केलेल्या अप्रचाराला सडेतोड उत्तर दिलं नाही. आता त्यापुढं जात काँग्रेसचे काही नेते भाजपच्या बहुसंख्याकवादी राजकारणाकडंही आकृष्ट होऊ लागलेत. हा धोका काँग्रेस कार्यकारिणीला अध्यक्षीय निवडीत वाटत असेल तर तो खरा आहे.

*नेतृत्वसमस्येवर उपाय सापडला नाही*
देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिलेल्या आणि आजवर प्रचंड जनाधार लाभलेला काँग्रेसपक्ष हा देशात सर्वाधिक जुना पक्ष असूनही त्यांना नेतृत्व करण्यासाठी सध्या  सक्षम असं व्यक्तिमत्व सापडत नाहीये. नुकत्याच झालेल्या काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत तरुणांपासून वयोवृद्ध नेत्यांपर्यंतच्या नावांची अध्यक्षपदासाठी चर्चा झाली. पण पक्षाध्यक्ष व्हायला कुणीही तयार झाला नाही. आपण अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली तरी पक्षाचा लगाम गांधी परिवाराच्या हातातच राहील. याची जाणीव असल्यानंच कुणीही पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारायला कुणी तयार झालं नाही. त्यामुळं नवा पक्षाध्यक्ष नेमण्यासाठी निष्फळ ठरलेल्या काँग्रेस नेत्यांना सोनिया गांधींनाच शरण जावं लागलंय! एकाबाजूला सत्ताधारी भाजपेयीं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा या जोडीनं एकापाठोपाठ एक निर्णयांचा धडाका लावलाय. तर देशातल्या प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या काँग्रेसला मात्र 'नेतृत्व समस्ये'वर अद्याप उपाय सापडलेला नाही. राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर नवा अध्यक्ष निवडण्यासाठी बोलावलेल्या काँग्रेसच्या वर्किंग कमिटीच्या बैठकीत त्यांनी तो मागे घ्यावा यासाठी त्यांना मनधरणी, मिनतवारी करण्यात आली. पण राहुल गांधी यांनी आपला राजीनाम्याचा निर्धार व्यक्त करत स्पष्ट शब्दात इन्कार केला. त्यामुळं पक्षध्यक्ष निवडीचा प्रश्न टांगताच राहीला. परिणामी नव्या पक्षाध्यक्षाची निवड होईपर्यंतच्या काळासाठी 'इंटरीम अध्यक्ष म्हणून सोनिया गांधीं'चीच निवड करण्यात आलीय.

*व्ही.पी.सिंग यांच्यापासून पक्षाला उतरती कळा*
स्वातंत्र्यानंतर काँग्रेस अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी यांनी सर्वाधिक १९ वर्षे पक्षाची धुरा सांभाळलीय. जवाहरलाल नेहरू ११ वर्षे, इंदिरा गांधी ७ वर्षे, राजीव गांधी ६ वर्षे आणि मोतीलाल नेहरू २ वर्षे काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. राहुल गांधींचा कार्यकाळ जवळपास दीड वर्ष चालला. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या दारुण पराभवानंतर राहुलनी काँग्रेस पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पण तब्बल दीड महिना काँग्रेसचे नेते राहुलनं राजीनामा मागं घ्यावं म्हणून विनवणी करत होते. पण ते आपल्या निर्धारापासून जराही विचलित झाले नाहीत. काँग्रेसपक्षाची ही अपरिहार्यता राहिली आहे की, त्यांना नेहमीच गांधी-नेहरू परिवाराचीच आवश्यकता राहिलीय. स्वातंत्र्योत्तर काळात देशात काँग्रेसचं एकहाती सत्ता राहिलीय. जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात काँग्रेससमोर कोणाचाच आव्हान नव्हतं. राजीव गांधींच्या काळापर्यंत पक्ष अत्यंत मजबूत स्थितीत होता. पण राजीवजींच्या मंत्रिमंडळात असलेल्या व्ही.पी.सिंग यांनी पक्षांत फूट पाडल्यापासून पक्षाला उतरती कळाच लागली. त्यानंतर एकापाठोपाठ एक पक्षातले दिग्गज नेते पक्षापासून दूर जाऊ लागले. महाराष्ट्राच्या शरद पवार, पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी, आंध्रप्रदेशचे वायएसआर रेड्डी यासारख्या नेत्यांनी काँग्रेसपक्षाशी फारकत घेत आपापल्या राज्यात नवा पक्ष उभा केला.

*विखुरलेली काँग्रेस सोनियांनी सावरली*
राजीवजींच्या मृत्यूनंतर सोनियाजींनी राजकारणात यायला स्पष्ट इन्कार केला होता. सोनियजींच्या नकारानंतर गांधी-नेहरू परिवाराशिवाय पक्षानं काही काळ वाटचाल केली, पण त्यांचा प्रभाव लोकांवर पडला नाही. त्यामुळं पक्षाचं अस्तित्वच धोक्यात आलं होतं. राजीव गांधींच्या हत्येनंतर सहानुभूतीच्या लाटेवर पक्ष पुन्हा सत्तेवर आला आणि ज्येष्ठ नेते पी.व्ही. नरसिंहराव प्रधानमंत्री बनले. पण बाबरी पतनाच्या काळात ते निष्क्रिय राहिल्याचा त्यांच्यावर आरोप झाला त्यामुळं पक्षात त्यांच्याविरोधात असंतोष निर्माण झाला. १९९६ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अपयश आलं. त्यानंतर सोनिया गांधींना पुन्हा राजकारणात सक्रिय होण्यासाठी आग्रह होऊ लागला. दरम्यान सीताराम केसरी यांना अध्यक्ष बनविण्यात आलं. तर दुसरीकडं काँग्रेसमध्ये फूट पडायला लागली. नारायणदत्त तिवारी, अर्जुनसिंह यासारखे उत्तरप्रदेशातील  दिग्गज नेते पक्षातून बाहेर पडले. त्यांनी 'तिवारी काँग्रेस'ची स्थापना केली. तामिळनाडूतील प्रभावी नेते जी.के.मुपनार यांनी पी.चिदंबरम यांना सोबत घेऊन 'तमिळ मनीला काँग्रेस' आरंभली. मध्यप्रदेशातून माधवराव शिंदे हेही काँग्रेसपासून अलग झाले.
विखरत जाणारी, विस्कटलेली काँग्रेस पुन्हा एकसंघ राखण्यासाठी नेहरू-गांधी परिवारातील कुणा सदस्याचीच गरज असल्यानं पक्षातल्या काही दिग्गज नेते सोनियाजींवर राजकारणात येण्याचं, पक्षाची धुरा सांभाळण्याचं साकडं घालू लागले. ज्या पक्षावर आजवर आपल्या कुटुंबियांची नेतृत्व होतं त्याच पक्षाची होत चाललेली दारुण अवस्था, याशिवाय पक्षातील नेत्यांच्या आग्रहाखातर सोनियांनी पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारलं आणि पक्षांत नवसंजीवनी आणली. त्यानंतर २००४ मध्ये अटलबिहारी वाजपेयींच्या 'शाइनिंग इंडिया' आणि 'फील गुड' यासारख्या प्रभावी प्रचारासमोर सोनियांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवून काँग्रेसप्रणित युपीएला सत्ताधारी बनवलं. त्यानंतर २००९ मध्येही काँग्रेसनं जबरदस्त आणि मजबुतपणे देशाच्या राजकारणात पुनरागमन केलं ते सोनियांच्या प्रभावशाली नेतृत्वाखाली! सोनियाजींच्या निवृत्तीनंतर राहुलशिवाय दुसरा चेहराच पक्षासमोर आला नाही. खरोखर नेहरु-गांधी परिवाराशिवाय इतर कुणाचं नेतृत्व स्वीकारण्याची मानसिकताच पक्षाची, पक्षातल्या नेत्यांची राहिलेली नाही. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराजयानंतर हे स्पष्ट झालं की, काँग्रेसला एका सक्षम नेतृत्वाची गरज आहे. पूर्वीच्या काळात पक्षात असे अनेक नेते होते की, ज्यांचा पक्षाच्या कार्यकर्त्यांबरोबरच लोकांपर्यंत थेट संपर्क होता. अशा नेत्यांचा आपापल्या राज्यातील लोकांवरही जबरदस्त पकड होती. जी निवडणुकांच्या काळात राज्यातील मतं पक्षांकडं वळवीत असत. सध्या अशा नेत्यांचा काँग्रेस पक्षांकडं दुष्काळ जाणवतोय. आज तर काँग्रेसपक्ष जणू गांधीपरिवाराचा 'आश्रित' बनलाय. शिवाय स्वतःला बुद्धिजीवी म्हणवणाऱ्यानी, ज्यांचा तळागाळातल्या कार्यकर्त्यांशी कोणताच संपर्क राहिलेला नाही, अशा तथाकथित नेत्यांनी पक्षाला वेठीला धरलंय! यामुळं काँग्रेसच नेते हे सामान्य जनता आणि कार्यकर्त्यांपासून  दुरावलेत, ते त्यांच्यापासून अलग पडलेत.

*काँग्रेस नेते-कार्यकर्ते सैरभैर झालेत*
सध्याचा काळ हा काँग्रेससाठी अत्यंत कठीण काळ समजायला हवा. एकाबाजूला लोकसभेत झालेल्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारून राहुल गांधींनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. राहुल यांच्या राजीनाम्यानंतर नवा पक्षाध्यक्ष नेमण्याऐवजी छोट्यापासून दिग्गज नेत्यांपर्यंत साऱ्यानी राहुलना राजीनामा मागे घेण्याची गळ घालायला सुरुवात केली. पण ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले. अद्याप देशातील स्वातंत्र्यलढ्यातील अग्रेसर आणि सर्वात जुन्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांबाबत कोणताच निर्णय झालेला नाही. भाजपेयींच्या धडाकेबाज निर्णयासमोर काँग्रेसची अवस्था सुकाणू नसलेल्या जहाजाप्रमाणे हेलकावे खातेय. पक्षाध्यक्ष निवडीत संभ्रमावस्थेत असलेल्या काँग्रेस पक्षाकडून एकापाठोपाठ राज्ये निसटली जाताहेत, दुरावली जाताहेत. खरं तर लोकसभेच्या पराभवानंतर त्याबाबत आत्मचिंतन करून पक्ष सावरण्याऐवजी राजीनामा देण्याचं राहुल गांधीचं पाऊल पक्षाला नुकसानकारक ठरतंय! त्यामुळं काँग्रेस सैरभैर झालीय! पक्षाला सावरण्याची गरज आहे. पक्षाच्या अडचणीत सोनियजींकडं सूत्रं सोपवून पुन्हा सत्ता हाती येईल असं वाटणाऱ्या स्वार्थी नेत्यांनी पुन्हा एकदा जुना खेळ आरंभलाय; पण सध्याच्या राजकीय वातावरणात ते होण्याची शक्यता नाही.

चौकट.....!
*सोनियाजींवरचा चित्रपट आलाच नाही!*
सोनियाजींचं प्रभावशाली व्यक्तिमत्व सिनेमाच्या पडद्यावर आणण्यासाठी लंडनमधील सिनेनिर्माता जगमोहन मुंदडा यांनी 'सोनिया गांधी' नावाच्या चित्रपटाची तयारी केली. या चित्रपटात सोनियाजींचे जीवनचरित्र मांडलं जाणार होतं. मात्र तो चित्रपट वादात सापडला. कुण्या नसीम खान ह्यांनी नेहरू-गांधी परिवाराशी जवळीक असल्याचा दावा करत मुंबईच्या सेशन कोर्टात चित्रपट निर्मितीला विरोध दर्शविणारा अर्ज दाखल केला. त्यात त्यांनी म्हटलं होतं की, 'भारतीय राजकारण्यांचं चित्रपटात अयोग्य चित्रण करण्याची फॅशनच आलीय. सोनियाजींबाबत असंच होण्याची धास्ती मला वाटते. देशासाठी अपरिमित त्याग करणाऱ्या सोनियाजींचा राजकीय पराभव करण्यासाठी उत्सुक असलेल्या विरोधकांना अशी फिल्म म्हणजे एक कोलीतच मिळेल.' चित्रपटाच्या चित्रीकरणाला न्यायालयातून मनाई आल्यानं पुढं काही घडलंच नाही! मुंदडा यांनी सोनियाजींच्या भूमिकेसाठी 'मोनिका बलुची' या इटालियन अभिनेत्रीची निवड केली होती. मुंदडा यांना सोनियांनी भारतासारख्या खंडप्राय देशाचं 'प्रधानमंत्रीपद नाकारण्याचं धाडस' दाखविण्याच्या त्यांच्या कृतीनं प्रभावित केलं होतं. त्यांनी पत्रकार रशीद किडवाई लिखित 'सोनिया अ बायोग्राफी' या पुस्तकावरून फिल्म बनविण्याचं जाहीर केलं होतं. पण तो सेटवर जाऊच शकला नाही!
सोनियाजींच्या भूमिकेसाठी कार्ला गुगिनो, ऐश्वर्या रॉय, प्रीती झिंटा, आणि इटालियन अभिनेत्री मोनिका बलुची या अभिनेत्रींचा विचार झाला. मोनिका बलुची ह्या सोनियांच्या भूमिकेला न्याय देऊ शकतील असं वाटल्यानं मुंदडा यांनी तिच्याशी स्क्रिप्टविषयी चर्चाही केली. सोनियाजींचं चित्रण राजकारणी व्यक्तीऐवजी, पतिप्रेमासाठी भारतात येणाऱ्या आणि पतीच्या मृत्यूनंतर भारतातच ठामपणे उभं राहून समाजजीवनात भाग घेणाऱ्या धैर्यवान महिला, असं करण्यात येणार होतं. या चित्रपटाची सुरुवात २००४ मध्ये सोनियाजींनी भारताचं प्रधानमंत्रीपद नाकारल्याच्या त्या ऐतिहासिक क्षणापासून होणार होती. त्यानंतर केंब्रिज इथं शिकताना राजीवजींनी सोनियांना 'पेपर नॅपकिन'वर पहिला प्रेमसंदेश कसा पाठवला, अशा अनेक घटना चित्रपटातून उलगडणार होत्या. प्रधानमंत्र्यांचा मुलगा असूनही सोनियांना स्कुटरवरून इंडिया गेटजवळ आईस्क्रीम खायला घेऊन जाणारे राजीवजी यात दिसणार होते. अशा विविध प्रसंगाचं चित्रण त्यात होतं, त्यासाठी शेकडो कोटी रुपयांचं बजेट होतं. याचं चित्रण इटली, ब्रिटन आणि भारतात होणार होतं.
कुटुंबातील तिघांचा धक्कादायक मृत्यू सोनियाजींना पाहावा लागला होता. दीर संजय गांधी विमान अपघातात गेले तर इंदिराजी, राजीवजी यांची निर्घृण हत्या झाली. कौटुंबिक धक्क्यातून धैर्यानं बाहेर पडून, भाजप आघाडीचा पराभव करण्याचं यश प्राप्त करणाऱ्या आणि चालून आलेलं प्रधानमंत्रीपद नाकारण्याची हिंमत दाखविणाऱ्या सोनिया गांधी या चित्रपटात दिसणार होत्या. त्याचबरोबर राजीवबरोबरचे कॉलेजमधले दिवस, इंदिराजींची पहिली भेट हे प्रसंग त्या स्क्रिप्टमध्ये लिहलेलं होतं. इंदिराजी आणि राजीवजी यांच्या हत्येनंतर सोनियांना राजकारणात का यावं लागलं, हे सर्व घटनाचक्र चित्रपटातून समोर येणार होतं.
सोनिया गांधी यांची भूमिका करायला बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री तयार झाल्या होत्या. पण शेवटी मोनिका बलुची याच अभिनेत्रीची निवड करण्यात आली. त्यावेळी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत निर्माते मुंदडा यांनी सांगितलं होतं, की 'या चित्रपटाविषयी माझी मोनिकाशी प्रदीर्घ चर्चा झालीय. तिलाही या चित्रपटात काम करण्याचा जबरदस्त उत्साह आहे.' यातील इतर महत्वाच्या भूमिका म्हणजे इंदिराजी आणि राजीवजी. इंदिराजींची भूमिका अभिनेत्री पेरिझाद झोराबियन या साकारणार होत्या तर राजीवच्या भूमिकेत संजय सूरी. संजय गांधींची भूमिका झायेद खान याशिवाय अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेसाठी अभिषेक यांची निवड करण्यात आली होती. अमिताभ बच्चन यांच्या निवासस्थानी राजीव आणि सोनिया यांची एंगेजमेंट झाली होती; ते ही या चित्रपटात दाखविण्यात येणार होतं. स्टारकास्ट निश्चित होण्यापूर्वीच मुंदडा यांनी सोनियाजींचं इटलीमधलं जन्म घर आणि राजीवजींची हत्या श्रीपेरूम्बदूर शहरात ज्या ठिकाणी झाली, त्या ठिकाणी जाऊन शुटिंगची तयारीही केली होती.
सोनियाजींची भूमिका करणाऱ्या मोनिकाचा जन्मही १९६८ मध्ये इटलीत झालेला. कायद्याची सल्लागार म्हणून करिअर सुरु करणाऱ्या मोनिकानं मॉडेलिंग व्यवसायात प्रवेश केला. १९८८ पर्यंत मोनिका प्रसिद्ध मॉडेल झाली आणि नंतर अभिनयाच्या क्षेत्रातही उतरली. पण सोनियाजींचा चित्रपट करण्याची तिची इच्छा काही पूर्ण झाली नाही.

-हरीश केंची
९४२२३१०६०९


पाकिस्तान -PAKISTAN : एक अर्थ नुरलेलं नांव


एकदा अहमदाबादच्या वाटेवर असताना प्रवासात श्रीमती अनुराधा गोरे यांनी लिहीलेलं 'ओळख सियाचेनची' हे पुस्तक वाचत होतो. भारत-पाकिस्तानात वाढलेला तणाव, काश्मिरातली परिस्थिती या सर्व अस्वस्थतेच्या पार्श्वभुमीवर हे पुस्तक वाचण्याला आपोआप एक अर्थ प्राप्त झाला होता. काश्मिर, सियाचेन या भारताच्या पाकिस्तान आणि चीन या देशांना भिडलेल्या संवेदनशील सीमावर्ती भागाची अत्यंत सुंदर माहीती या पुस्तकांत श्रीमती गोरे यांनी दिली आहे..हे पुस्तक वाचल्यावर भारत-पाक या दोन जुळ्या भावंडांमधे चाललेलं भांडण नेमकं का आणि कशासाठी व त्याचा लाभ चीन नांवाचा बोका कसा उठवतो आहे याचं थोडंसं का होईना पण आकलन होतं..

याच पुस्तकात मला 'पाकिस्तान' या शब्दाचा अर्थ सापडला आणि पाकिस्तान 'काश्मिर'साठी का येवढा आटापिटा करतंय ते लक्षात आल्यासारखं वाटलं..सन १९३० साली  अलाहाबाद येथे भरवलेल्या मुस्लीम लीगच्या अधिवेशनात मुस्लीमांसाठी स्वतंत्र राज्याची मागणी इक्बाल ('सारे जहाॅं से अच्छा हिंदोस्तां...' या गीताचे कवी आणि पूर्वाश्रमीचे हिन्दू) यांनी जोरदारपणे मांडली आणि त्या मागणीला मुसलमानांचा भरघोस पाठींबा मिळाला. ही मागणी पुढे रेटताना चौधरी रहमान अली यांनी पंजाब, अफगाणीया, काश्मीर, सिंध आणि बलुचीस्तान ही राज्ये मुस्लीमांना देऊन त्याचे स्वतंत्र फेडरेशन असावे असा आग्रह धरला..ह्याच पाच राज्यांचा पुढे पाकिस्तान नांवाचा देश जन्माला आला..

P-unjab, A-fgania, K-ashmir, S-indh and Baluchi'STAN' या चार राज्यांच्या आद्याक्षरांवरून '*PAKSTAN*' हा शब्द तयार झाला आहे..('पाक' म्हणजे पवित्र हा अर्थ या देशाला योगायोगाने प्राप्त झाला आहे. एरवी या देशाचा आणि पवित्रतेचा जराही संबंध नाही, कधीही नव्हता..!!) या नविन देशाचे नांव "*पाकस्तान*" असे असले तरी इंग्रजी नांवातला 'I' उच्चाराच्या सोयीसाठी घुसवलेला आहे. (इथे पाकिस्तानच्या 'आय' घालण्यावरून कोटी करायचा मोह मी मोठ्या मुश्कीलीने आवरलाय.)

पाकिस्तानचं नांव वरील चार राज्यांच्या आद्याक्षरांवरून जरी बेतलेले असले तरी पांचवं राज्य 'बलुचीस्तान'ची मात्र शेवटची अक्षरे त्यात आहेत..नांवं किती बोलकी असतात बघा, पाकिस्तानने बलुचीस्तानाला नेहमी सावत्र वागणूक दिली आहे..रेल्वेच्या मालगाडीचा सर्वात शेवटचा गार्डचा उघडा डब्बा कम केबीन असते ना, तशी..!! एरवीही मालगाडी जोरात धावत असताना तो शेवटी बसलेला गार्ड असतो, त्याला कसलीच सुविधा नसते..एका चार दीशांनी उघड्या केबिनीत उन-पाऊस-वारा-थंडी सहन तरत गाडीबरोबर गुमान जायचं, ना खाण्या-पिण्याची सोय ना निसर्गाच्या हाकेला ओ द्यायची..! बलुचि'स्तान'चं काहीसं तसं झालंय. मला तर वाटतं गाडी पुढे निघून जाणार आणि हा शेवटचा डब्बा गाडीपासून सुटणार बहुदा..!!

आणि बांगला देश (पूर्वीचा पूर्व पाकिस्तान) हा पाकिस्तानने कधीच आपला मानला नव्हता आणि त्यामुळे त्याला नांवातही स्थान दिलं गेलं नाही..केवळ धर्म एक म्हणून पूर्व पाकिस्तान पाकिस्तानाशी जोडला गेला येवढंच..! देश कधीही धर्माने जोडला जात नाही, जोडला जातो तो भाषा-संस्कृती-वेष यामुळे..बांगला देशाचं 'बागला' भाषा आणि संस्कृतीवरील अनावर प्रेम त्या देशाच्या 'धर्मा'पेक्षा सरस ठरलं आणि त्या अनावर उर्मीने बांगला देशाला  प्रसंगी असंख्य जीवाचे मोल देऊन पाकिस्तानपासून फारकत घेण्यास भाग पाडलं..

जगभराचा राजकीय इतिहास पाहीला असता 'धर्मा'ने जोडण्यापेक्षा तोडण्याचंच काम अधिक केल्याचं लक्षात येतं..आता पाकिस्तानला धर्माच्याच मुद्द्यावर काश्मीर हवं आहे.  काश्मीरला पाकिस्तानच्या नांवातही त्यांनी स्थान दिलं आहे आणि जो पर्यंत संपूर्ण काश्मीर त्यांना मिळत नाही तोवर त्यांच्या PA'K'ISTAN या नांवाला अर्थ मिळणार नाही असा शेख महंमदी विचार पाकी करतायत.

पाकिस्तानातून बलुचीस्तान  फुटणार, सिंधचीही गॅरंटी उरलेली नाही आणि काश्मीर तर कधीच मिळणार नाही उलट 'पीओके'ही भरताशी संलग्न होईल या परिस्थितीत PAKISTAN हे नांवही उरणार नाही असा निष्कर्ष काढला तर चुकीचे ठरू नये.

Note-
(Afgania हा भाग पाकिस्तान -अफगाणीस्तान बाॅर्डरवरचा खैबर खिंडीच्या आसपासचा भाग-प्राॅव्हीन्स-आहे. या भागाला आंतरराष्ट्रीय स्तरावर Federally Administered Tribal Areas {FATA} म्हणून ओळखतात. एरवीच्या बोलण्यात या प्रदेशाती ओळख 'खैबर पख्तुनख्वा' अशी आहे. पाकिस्तान आर्मीही या भागातील पठाणांच्या नादाला फारशी लागत नाही)

कश्मीर, जुनागढ आणि ३७०

दक्षिण आशिया खंडात नुकताच भारत आणि पाकिस्तान या दोन नवीन राष्ट्रांचा उदय झाला होता. त्यावेळी काही स्वतंत्र संस्थानं होती. त्यांना या दोनपैकी कोणत्याही एका देशात सामील करून घेतलं जात होतं. पश्चिम भारतात सौराष्ट्रच्या किनारपट्टीला लागून जुनागढ संस्थान होतं. या संस्थानातली ८०% जनता हिंदू होती. मात्र, तिथले संस्थानिक एक मुस्लीम नवाब होते. त्यांचं नाव होतं नवाब महाबत खान (तिसरे).
या संस्थानात अंतर्गत चढाओढ सुरू होती. मे १९४७ रोजी सिंध मुस्लीम लीगचे नेते शाहनवाज भुत्तो यांची या संस्थानाच्या दिवाणपदी म्हणजे प्रशासकीय राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. ते मोहम्मद अली जिना यांचे निकटवर्तीय होते. जिना यांच्या सल्ल्यानुसार शाहनवाज भुत्तो यांनी हे संस्थान भारत किंवा पाकिस्तानात विलीन करण्याचा निर्णय १६ ऑगस्ट १९४७ पर्यंत घेतलाच नाही. मात्र, स्वातंत्र्याची घोषणा होताच जुनागढने पाकिस्तानात विलीन होण्याची इच्छा व्यक्त केली होती. पाकिस्तानने जवळपास महिनाभर त्याला उत्तरच दिलं नव्हतं.१३ सप्टेंबर रोजी पाकिस्तानने टेलिग्राम पाठवून जुनागढ पाकिस्तानात सामील करत असल्याची घोषणा केली. ही भारत सरकार आणि तत्कालीन काठीयावाड सरकार दोघांसाठीही नामुष्कीची बाब होती. जिना जुनागढचा एखाद्या प्याद्याप्रमाणे वापर करत होते आणि या प्याद्याच्या मदतीने 'राणी'ला शह देण्याची त्यांची योजना होती. ही राणी होती 'काश्मीर'. कोणत्या देशात विलीन व्हायचं, याचा निर्णय घेण्याचा अधिकार जुनागढच्या संस्थानिकांना नाही तर तिथल्या जनतेला आहे, असंच भारत म्हणणार, याची जिना यांना खात्री होती. त्यामुळे काश्मीरच्या मुद्द्यावरही भारताला हेच तत्व वापरायला सांगून भारताची कोंडी करण्याचा जिना यांचा डाव होता. राजमोहन गांधी यांनी लिहिलेल्या 'Patel : A Life' या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या चरित्रात त्यांनी ही माहिती दिली आहे.
पाकिस्तानचा हा डाव उधळून लावण्याची जबाबदारी आता भारताचे सर्वोच्च नेते म्हणजे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या खांद्यावर होती.
*काश्मीरचं कोडं*
२२ ऑक्टोबर १९४७ रोजी पाकिस्तानातून २०० ते ३०० ट्रक काश्मीरमध्ये घुसले. या ट्रकमध्ये पाकिस्तानातल्या तत्कालीन फ्रंटियर प्रॉव्हिन्समधले (सध्याचा खैबर पख्तुनख्वा) ग्रामस्थ होते. त्यांची संख्या जवळपास ५००० होती. ते सर्व लोक अफ्रिदी, वझीर, मेहसूद, स्वाती जमातीचे होते. त्यांना पाकिस्तानने 'स्वातंत्र्यसेनानी' म्हटलं. त्यांचं नेतृत्व रजेवर असलेले पाकिस्तानी लष्कराचे जवान करत होते. त्यांचा हेतू स्पष्ट होता. काश्मीरवर ताबा मिळवून तो पाकिस्तानात विलीन करायचा. तोपर्यंत काश्मीरने कोणत्या देशात विलीन व्हायचं, याचा निर्णय घेतलेला नव्हता. इतर जवळपास सर्वच संस्थानांनी भारत किंवा पाकिस्तान यापैकी एका देशाची निवड केली होती. जम्मू-काश्मीरने मात्र, अजून निर्णय घेतलेला नव्हता. १२ ऑगस्ट १९४७ रोजी जम्मू-काश्मीरचे महाराजा हरीसिंह यांनी भारत आणि पाकिस्तानसोबत 'stand still agreement' म्हणजेच 'जैसे-थे करार' केला होता. याचा अर्थ असा होता की जम्मू-काश्मीर कुठल्याही देशात विलीन न होता स्वतंत्र राहील. हा करार होऊनही पाकिस्तानने तो पाळला नाही आणि जम्मू-काश्मीरवर हल्ला चढवला. 'The Story of the Integration of the Indian State' या पुस्तकात व्ही. पी. मेनन यांनी जम्मू-काश्मीरबाबत पाकिस्तानच्या आक्रमणाविषयी सविस्तर माहिती दिली आहे. (पृष्ठ २७२) पाकिस्तानातल्या आदिवासी टोळ्या काश्मीरचा एकएक भाग ताब्यात घेत होत्या. २४ ऑक्टोबर रोजी ते श्रीनगरपर्यंत येऊन ठेपले. त्यांनी श्रीनगर जवळ असलेल्या माहुरा जलविद्युत प्रकल्प ताब्यात घेतला आणि तो बंद केला. संपूर्ण श्रीनगर अंधारात बुडालं. पुढच्या दोन दिवसांमध्ये श्रीनगरवर ताबा मिळवून श्रीनगरमधल्या मशिदीत ईद साजरी करू, अशी वल्गना ते करू लागले.
या आदिवासी टोळ्यांचा सामना करण्यात महाराजा हरीसिंह कमी पडले. स्वतंत्र राहणं तर सोडाचं आता तर राज्य गमावण्याची वेळ त्यांच्यावर आली होती.
*हतबल हरिसिंग यांची मदतीची याचना*
हतबल झालेल्या महाराजा हरीसिंह यांनी भारताकडे मदतीची याचना केली. विलीनीकरणाचा करार
एव्हाना दिल्लीत खलबतं सुरू झाली होती. लॉर्ड माउंटबॅटन यांच्या नेतृत्वाखाली २५ ऑक्टोबर रोजी संरक्षण मंत्रालयाची बैठक बोलावण्यात आली. काश्मीरमधल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गृहसचिव व्ही. पी. मेनन यांनी श्रीनगरला जावं आणि तिथली माहिती भारत सरकारला द्यावी, असं ठरलं होतं. मेनन यांना श्रीनगरमध्ये दाखल होताच परिस्थिती किती गंभीर आहे, याची कल्पना आली. माहुरा जलविद्युत प्रकल्पापर्यंत आलेल्या पाकिस्तानच्या आदिवासी टोळ्या एक-दोन दिवसात श्रीनगर शहरात हल्ला करतील, अशी परिस्थिती होती.
काश्मीरला वाचवण्यासाठी महाराजा हरीसिंह यांच्याकडे आता केवळ एकच पर्याय होता आणि तो म्हणजे भारताकडून मदत मागायची. भारतीय लष्करच आता काश्मीरला पाकिस्तानच्या घशात जाण्यापासून रोखू शकत होतं. असं असलं तरी काश्मीर अजूनही स्वतंत्रच होतं. अशा स्वतंत्र राज्यात लष्कर पाठवायला माउंटबॅटन तयार नव्हते. 'The Story of the Integration of the Indian State' या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे व्ही. पी. मेनन यांना पुन्हा एकदा जम्मूला पाठवण्यात आलं. ते थेट महाराजा हरीसिंह यांच्या महालात गेले. मात्र, तिथे त्यांना कसलीच हालचाल दिसली नाही.
महालातल्या वस्तू अस्ताव्यस्त पसरल्या होत्या. मेनन यांनी महाराजांविषयी विचारलं. तेव्हा श्रीनगरहून आल्यावर महाराज झोपले असल्याचं त्यांना कळलं. त्यांनी हरीसिंह यांना उठवलं आणि सुरक्षा परिषदेत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती त्यांना दिली. तिथेच महाराजा हरीसिंह यांनी विलिनीकरणाच्या करारावर स्वाक्षरी केली. महाराजा हरीसिंह यांनी मेनन यांना सांगितलं की त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना काही सूचना केल्या होत्या. त्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितलं होतं की मेनन परत आले तर याचा अर्थ भारत मदत करायला तयार आहे. अशावेळी त्यांना छान झोपू द्या. मात्र, मेनन परतले नाही तर याचा अर्थ सगळं संपलं. तसं झालं तर झोपेतच गोळी झाडून आपल्याला ठार करा (पृष्ठ २७५) मात्र, गोळी झाडण्याची वेळच आली नाही. भारताने मदतीसाठी होकार दिला होता.

*करारावर स्वाक्षरीला हरीसिंह यांचा विलंब*
काश्मीरमधली परिस्थिती गुंतागुंतीची असल्यामुळे करारावर स्वाक्षरी करायला महाराजा हरीसिंह यांना वेळ लागला, असं मेनन यांनी लिहिलं आहे. काश्मीर राज्य चार प्रदेशांमध्ये विभागलं होतं. उत्तरेकडचा गिलगिट, दक्षिणेकडचा जम्मू, पश्चिमेकडे लडाख आणि मध्यभागी होतं काश्मीर खोरं. जम्मू हिंदूबहुल भाग होता तर लडाखमध्ये बौद्ध लोकसंख्या जास्त होती. मात्र, गिलगिट आणि काश्मीर खोऱ्यात मुस्लीम मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे हे राज्य मुस्लीमबहुल म्हणून ओळखलं गेलं. मात्र, राजा हिंदू असल्यामुळे संस्थानात सर्व वरिष्ठ पदांवर हिंदू व्यक्ती होत्या. त्यामुळे मुस्लिमांच्या मनात दुरावल्याची भावना होती. या दुखावलेल्या मुस्लिमांची महत्त्वाकांक्षा आणि त्यांचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न केला शेख अब्दुल्ला यांनी. त्यांनी 'ऑल जम्मू अँड काश्मीर मुस्लीम कॉन्फरन्स' या पक्षाची स्थापना केली. पक्ष अधिक धर्मनिरपेक्ष वाटावा यासाठी त्यांनी १९३९ साली पक्षाच्या नावातून मुस्लीम शब्द वगळला आणि पक्षाला नवं नाव दिलं 'नॅशनल कॉन्फरन्स'.
*श्यामाप्रसाद यांनी आंदोलनं केली*
कलम ३७० चा विरोध करताना जीव देणारे श्यामाप्रसाद मुखर्जी
शेख यांनी महाराजा हरीसिंह यांच्याविरोधात अनेक आंदोलनं पुकारली. १९४६ मध्ये त्यांनी 'काश्मीर छोडो' चळवळही सुरू केली. या चळवळीमुळे त्यांना दीर्घकाळ तुरुंगवासात घालवावा लागला. मात्र, तोपर्यंत ते बरेच लोकप्रिय झाले होते. ('The Story of the Integration of the Indian State' Page No 270) काश्मीरला विशेष दर्जा देण्यास डॉ. आंबेडकरांचा विरोध होता. डॉ. पी. जी. ज्योतिकर त्यांच्या 'Visionary Dr. Babasaheb Ambedkar' या पुस्तकात लिहितात : "काश्मीरला विशेष दर्जा देण्याची मागणी शेख अब्दुल्ला यांनी केली होती. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला आणि शेख अब्दुल्ला यांना म्हणाले 'तुमचं म्हणणं आहे की भारताने तुमचं रक्षण करावं, रस्ते बांधावे, लोकांना धान्य द्यावं. मात्र, भारताला काहीच अधिकार राहणार नाही. हेच तुम्हाला म्हणायचं आहे का?' अशी मागणी मी कधीच मान्य करू शकत नाही." डॉ. आंबेडकरांच्या भूमिकेमुळे नाराज झालेले शेख अब्दुल्ला नेहरूंकडे गेले. त्यावेळी नेहरू परदेशात जाणार होते. त्यामुळे नेहरूंनी गोपाळस्वामी अय्यंगार यांना कलम ३७० चा मसुदा तयार करायला सांगितलं. अय्यंगार बिनखात्याचे मंत्री होते. ते तत्कालीन संविधान सभेचे सदस्य होते. तसंच काश्मीरचे माजी दिवाणही होते. (पृष्ठ  १५६-५७)
जनसंघाचे माजी अध्यक्ष बलराज मधोक यांनी त्यांच्या आत्मचरित्रात 'विभाजित काश्मीर आणि राष्ट्रवादी आंबेडकर' नावाने एक संपूर्ण प्रकरण लिहिलं आहे. या पुस्तकात ते लिहितात, "ते (आंबेडकर) इतर कुठल्याही नेत्यापेक्षा अधिक राष्ट्रवादी होते आणि इतर बुद्धिजिवींपेक्षा जास्त सुशिक्षित होते, असं मला वाटतं. "
*संसदेत नेहरूंनी निवेदन केलं*
काश्मीरला विशेष दर्जा
विलीनीकरणाच्या करारावर स्वाक्षरी घेऊन मेनन दिल्ली विमानतळावर पोचले तेव्हा तिथे त्यांच्या स्वागताला स्वतः सरदार वल्लभभाई पटेल गेले होते. विमानतळावरून दोघेही थेट संरक्षण परिषदेच्या बैठकीला गेले. तिथे बराच खल झाला आणि अखेर जम्मू-काश्मीर विलीनीकरणाच्या नियम आणि अटी मंजूर करण्यात आल्या. त्यानंतर लगेच काश्मीरमध्ये सैन्य पाठवण्यात आलं. शिवाय, परिस्थिती नियंत्रणात येताच सार्वमत घेण्याचा निर्णयही झाला होता.
२१ नोव्हेंबरला पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संसदेत काश्मीरसंबंधी सविस्तर निवेदन सादर केलं आणि काश्मीरच्या जनतेनेच आपलं भवितव्य ठरवावं, यासाठी संयुक्त राष्ट्र किंवा अशाच एखाद्या त्रयस्थ संस्थेमार्फेत काश्मीरमध्ये जनमत चाचणी घेणार असल्याचंही जाहीर केलं. मात्र, सार्वमत घेण्याआधी भारताने काश्मीरमधून आपलं सैन्य माघारी बोलवावं, अशी मागणी पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अली खान यांनी केली. नेहरूंनी स्पष्टपणे नकार दिला. ('The Story of the Integration of the Indian State' पृष्ठ २७९) विलिनीकरण करारानुसार विशेष राज्याचा दर्जा असलेलं जम्मू-काश्मीर भारताचा भाग राहणार होता.
काश्मिरी घरांमध्ये भारतीय सैन्यानं आग लावण्यामागचं सत्य - फॅक्ट चेक
संरक्षण, परराष्ट्र व्यवहार आणि कम्युनिकेशन वगळता इतर सर्व अधिकार काश्मीरला देण्यात आले होते. विलीनीकरण कराराचा पुढचा टप्पा होता काश्मीरमध्ये राष्ट्रपतींच्या आदेशाने कलम ३५-अ लागू करणं. १९५४ साली काश्मिरात कलम ३५-अ लागू झालं. विलीनीकरण करारामुळे जम्मू-काश्मीरमध्ये कायदा लागू करण्यास किंवा राज्याच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्यास भारताला मर्यादा होत्या.
*गोपालस्वामी अय्यंगार यांना पटेलांची मुकसंमती*
पटेलांनी अधिक विशेषाधिकार दिले
'Patel : A Life' या पुस्तकात राजमोहन गांधी लिहितात की जवाहरलाल नेहरू परदेशात असताना भारताच्या संविधान सभेत ऑक्टोबर १९४९ ला काश्मीरविषयी चर्चा झाली. त्यात सरदार पटेलांनी त्यांचं मत रेटलं नाही. संविधान सभेतल्या काही सदस्यांचा विरोध होता. मात्र, हंगामी पंतप्रधान म्हणून काम बघत असलेले सरदार पटेल यांनी काश्मीरला विशेष दर्जा देण्याची मागणी मान्य केली. इतकंच नाही तर परदेशात जाण्यापूर्वी पंडित नेहरूंनी ज्या सवलती दिल्या होत्या त्यापेक्षा अधिक सवलती पटेलांनी दिल्या. शेख अब्दुल्ला यांना कारभार चालवण्यासाठी अधिक मोकळा हात हवा होता. आझाद आणि गोपाळस्वामी यांनी त्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे सरदार पटेल यांनी त्यांच्या मागण्या मान्य केल्या. आझाद, अब्दुल्ला आणि गोपाळस्वामी नेहरूंच्याच संकल्पनेवर चालत होते. त्यामुळे नेहरू यांच्या अनुपस्थितीत त्यांना विरोध करू नये, अशी भूमिका पटेलांनी घेतली. (पृष्ठ ५२३) अशोका विश्वविद्यालयात इतिहासाचे प्राध्यापक असलेले श्रीनाथ राघवन सांगतात, 'एकट्या नेहरूंनीच काश्मीरच्या प्रश्नावर निर्णय घेतला', ही धारणा चुकीची आहे.
आपल्या लेखात श्रीनाथ लिहितात, "काश्मीर मुद्द्यावर मतभेद असूनही नेहरू आणि पटेल एकत्र काम करत होते. काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम ३७० चं उदाहरण आहे. गोपाळस्वामी अय्यंगार, शेख अब्दुल्ला आणि इतरांनी या प्रस्तावावर अनेक महिने काम केलं. त्या वाटाघाटी क्लिष्ट होत्या. सरदार पटेल यांची परवानगी न घेता नेहरू यांनी जवळपास कुठलाच निर्णय घेतला नाही. या विषयावर सरदार पटेल यांच्या घरी १५-१६ मे रोजी एक बैठक झाली. पंडित नेहरूही त्या बैठकीला उपस्थित होते.

अय्यंगार यांनी नेहरू आणि शेख यांच्यात झालेल्या प्रस्तावाचा मसुदा सरदार पटेलांसमोर सादर केला तेव्हा त्यांनी विचारलं की तुम्ही यासंदर्भात जवाहरलालजींना आपली स्वीकृती द्याल का? तुमची सहमती मिळाल्यानंतरच ते शेख अब्दुल्ला यांना पत्र लिहितील. अब्दुल्ला यांनी राज्यघटनेतले मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्त्वं काश्मीरमध्ये लागू करू नये आणि काश्मीरच्या संविधान सभेला ते ठरवू द्यावे, यावर जोर दिला होता. यावर सरदार पटेल नाराज झाले. मात्र, तरीही त्यांनी गोपाळस्वामी यांना आपला होकार कळवला. त्यावेळी नेहरू परदेशात होते. ते परतले तेव्हा सरदार पटेलांनी त्यांना एक पत्र लिहिलं, त्यात ते म्हणतात, "खूप चर्चा केल्यानंतर मी केवळ पक्षाला (काँग्रेसला) समजावू शकलो." श्रीनाथ यांनी या प्रसंगाचा उल्लेख केला आणि म्हणूनच कलम ३७० चे जनक सरदार पटेल असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
'Patel : A Life' या पुस्तकात राजमोहन गांधी पुढे लिहितात 'काश्मीरसंदर्भात भारताने घेतलेले अनेक निर्णय सरदार वल्लभभाई पटेलांना मान्य नव्हते.' 'सार्वमत, हा मुद्दा संयुक्त राष्ट्रांकडे नेणे, काश्मीरचा मोठा भूभाग पाकिस्तानच्या हातात जाईल अशा पद्धतीने शस्त्रसंधी करणे आणि महाराजा हरीसिंह यांचं काश्मीर सोडणं - या गोष्टी त्यांना आवडल्या नव्हत्या.' 'ते वेळोवेळी सल्ले देत होते. टीकाही करत होते. मात्र, त्यांनी कधीही काश्मीर मुद्द्यावर उपाय सांगितला नाही. त्यांनी  १९५० च्या ऑक्टोबर महिन्यात जयप्रकाशजींना म्हटलं होतं की 'काश्मीरचा मुद्दा न सुटणारा आहे.'' 'जयप्रकाशजी म्हणाले होते की त्यांच्या निधनानंतर त्यांचे अनुयायीही हे सांगू शकले नाही की त्यांनी स्वतः यावर कसा तोडगा काढला असता आणि हे खरं आहे.' (पृष्ठ ५२४) काश्मीरला विशेष दर्जा कधी मिळाला?
*शस्त्रसंधीनं पाकव्याप्त कश्मीरची निर्मिती*
काश्मीरचा मुद्दा भारताने १९४८ मध्ये संयुक्त राष्ट्राकडे नेला. संयुक्त राष्ट्राने मध्यस्थी करून शस्त्रसंधी लागू केली. त्यामुळे दोन्ही देशांना त्यावेळेस असणाऱ्या ताब्यातील प्रदेश मिळाला.
महाराजा हरिसिंह यांनी आपले पुत्र करणसिंह यांच्याहाती सत्ता दिली. शेख अब्दुल्ला आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटना समितीमध्ये स्थान मिळवले. १९५० साली भारतीय राज्यघटना अंमलात आली आणि कलम ३७० अन्वये जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा मिळाला.
घटना समितीमधल्या चर्चांमध्ये काही सदस्यांनी या कलमाला विरोध केला होता. तेव्हा भारत सरकारने काश्मीरी लोकांना काही आश्वासनं दिली आत असं गोपालस्वामी अयंगार म्हणाले.
ते म्हणाले होते, "कोणत्या देशात राहायचं किंवा स्वतंत्र राहायचं याचा निर्णय तुम्हीच घेऊ शकता असं आपण काश्मीरी लोकांना आश्वासन दिलं आहे." त्यांचं मत जाणून घेणं आणि जनमत घेण्यासाठी आपण बांधील आहोत. पारदर्शक पद्धतीने जनमत घेतलं जावं यासाठी तिथं शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
अर्थात जम्मू आणि काश्मीरमध्ये जनमत चाचणी झाली नाही. यामागे भारत आणि पाकिस्तानची स्वतःची अशी कारणं आहेत. जम्मू काश्मीर घटना समितीने भारताशी संबंध स्पष्ट करण्यासाठी चर्चा केली आणि १९५२ साली दिल्ली करार केला. या करारानुसार जम्मू आणि काश्मीर राज्याचा स्वतंत्र झेंडा असेल मात्र तो झेंडा भारताच्या राष्ट्रध्वजाला स्पर्धा करणारा होणार नाही असे निश्चित झाले.
*तर वेगळी परिस्थिती असती*
सरदार पटेल भारताचे पहिले पंतप्रधान असते, तर काश्मीरचा एक तुकडा आज पाकिस्तानामध्ये नसता, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागे काढले होते. आज गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, काश्मीरचा प्रश्न वल्लभभाईंनी हाताळलाच नव्हता. थोडक्यात तो नेहरूंनी हाताळला आणि म्हणूनच सगळा बट्ट्याबोळ झाला, असे त्यांना सुचवायचे आहे. काश्मीरच्या महाराजांनी भारतात की पाकिस्तानात सामील व्हायचे, याबद्दल चालढकल चालवली होती. त्यावेळी नेहरूंना काश्मीरला भेट देणे गरजेचे वाटले. नेहरूंऐवजी गांधींनी जावे असे माऊंटबॅटन यांचे मत होते. गांधींची भेट नेहरूंच्या भेटीपेक्षा कमी संकटाची ठरेल, असे पटेलांचे मत होते. यावरून स्पष्ट होते की, पटेल या प्रश्नात संपूर्णपणे रस घेत होते आणि ते त्यात गुंतलेही होते. काश्मीर प्रश्नाबाबत माझे व तुमचे धोरणात्मक मतभेद नाहीत, परंतु अनेक लोकांना असे वाटते की याबाबत आपल्यात मतभेद आहेत, असे सरदार पटेल यांनी नेहरूंना लिहिलेल्या पत्रात स्पष्टपणे म्हटलेले आहे. पटेल यांचे राजकीय सचिव व्ही शंकर यांचे 'माय रेमिनिसेन्सेस ऑफ सरदार पटेल' हे पुस्तक आहे. त्यात शंकर यांनी म्हटले आहे की, जम्मू आणि काश्मीरचे काय करायचे, कुठे जायचे याचा निर्णय राजेंनी करायचा आहे. त्यांना जर वाटत असेल की राज्याचे हितसंबंध पाकिस्तानात सामील होण्यामुळे जपले जातील, तर त्यांच्या मार्गात मी येणार नाही. 'इफ काश्मीर डिसाईड्स टु जॉईन दि अदर डोमिनियन हि वुड एक्सेप्ट  द फॅक्ट' असे पटेलांनी भारताचे पहिले संरक्षणमंत्री बलदेव सिंग यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. 'गांधी-पटेल अ लाइफ' या राजमोहन गांधींच्या पुस्तकात हा उल्लेख आहे. ऑगस्ट १९५० मध्ये पटेल जयप्रकाश नारायण यांना म्हणाले की, काश्मीर हा प्रश्न सुटण्यासारखा नाही. सरदार पटेल सेंटेनरी volume-1 मध्येच हा संदर्भ आहे. थोडक्यात, पटेलांचा काश्मीरशी काहीही संबंध नव्हता, हे अमित शहा यांचे विधान खोटे आहे. पटेल असते तर काश्मीरबाबत काही वेगळे घडले असते आणि नेहरूंनीच सर्व वाटोळे केले, असे जेे मोदी-शहांना सुचवायचे आहे, त्यातही तथ्य नाही. ते ऐतिहासिक असत्य आहे.
*३७० वे कलम आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर*
१९५१ साली जेव्हा डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला तेव्हा त्याची त्यांनी विविध कारणे दिली. त्यातील *३७० वे कलम व पंडित नेहरू यांची निर्णय घेण्याची पध्दती* हेही एक महत्वाचे कारण होते. *काश्मीर संदर्भात* नेहरू सरकारकडून वेळोवेळी जी *ध्येयधोरणे* ठरविण्यात वा आखण्यात येत होती ती *पडद्यामागे.* या धोरणांबाबत इतर मंत्र्यांना कधीच विश्वासात घेतले जात नव्हते. आणि हेही त्यांच्या राजीनाम्याचे एक कारण होते.
      *काश्मीर समस्येशी* निगडीत असलेल्या संविधानातील ३७० व्या कलमाबाबत स्वातंत्र्यापासून ते आजपर्यंत सतत वादविवाद होताना व मतमतांतरे व्यक्त होताना दिसून येतात. भारतातील दहशतवाद व अलगतावादास काश्मीरला विशेष दर्जा देणारे *३७० वे कलम जबाबदार* धरले जाते. तर दुसरीकडे हे काश्मीरी जनतेसाठी मात्र त्यांच्या *अस्मितेचे प्रतीक* ठरले आहे. हे कलम अधूनमधून रद्द करावे व काश्मीरचा विशेष दर्जा काढून घ्यावा असा विचार किंवा मागणी होताना दिसते. परंतु याबाबतही *राजकारण* होतानाच दिसून येते.
      या कलमानुसार काश्मीरला भारतातील इतर घटकराज्यांमध्ये विशेष असा खास दर्जा देण्यात आला. काश्मीरला स्वायत्तता दिली गेली. जेव्हा *काश्मीरचा राजा हरिसिंग* भारतीय संघराज्यामध्ये विलीन होण्यास तयार झाले तेव्हा पंडित नेहरूंनी तेथील *नॅशनल काॅन्फरन्सचा नेता तथा त्यांचा खास मित्र शेख अब्दुल्ला* यांचे हितसंबंध किंवा हितसंवर्धन राखण्यासाठी व पक्षाचे धोरण म्हणून जनतेलाही आश्वासन दिले होते की, काश्मीरच्या अंतिम विलीनीकरणाच्यावेळी जनतेचे सार्वमत घेऊनच निर्णय घेऊ. त्यामुळे ३७० वे कलम अस्थायी स्वरूपात निर्माण केले गेले.
      वास्तविक यावेळी कसलीही (किंवा कोणतीच) अट न स्वीकारता सरळ काश्मीर भारतात विलीन करून घेता आले असते, परंतु *नेहरूंनी स्वतःचे व आपल्या मित्राचे हित जोपासण्यासाठीच हे सर्व केलेले दिसते.*
      काश्मीरला वेगळा दर्जा देणारे हे ३७० वे कलम रद्द करावे किंवा घटना समितीत ते मांडूच नये यासाठी *विरोध* करणारी घटना समितीत *एकमेव व्यक्ती* होती ती म्हणजे *डाॅ.बाबासाहेब आंबेडकर* हे होय. डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी या कलमाला *खंबीरपणे विरोध* केला. कारण या कलमातील तरतुदी भारतीय संघराज्याच्या संरचनेस अंतर्विरोध असणाऱ्या होत्या. या कलमानुसार काश्मीरबाबत भारत सरकारला केवळ परराष्ट्र धोरण, संरक्षण आणि दळणवळण याच बाबतीत कायदे करण्याचा किंवा ध्येयधोरणे ठरविण्याचा अधिकार असणार होता. काश्मीरच्या इतर बाबतीत कोणताही निर्णय घ्यायचा असल्यास काश्मीरच्या विधानसभेची संंमती आवश्यक असेल आणि *३७० व्या कलमानुसार भारतीय संविधानातील कोणतीही तरतूद काश्मीरसाठी लागू असणार नाही.* अशा विविध तरतूदी ३७० व्या कलमात होत्या.
      भारतीय संघराज्याच्या संरचनेस आणि संविधानास हे ३७० वे कलम सुसंगत आहे का? देशाच्या सार्वभौम सत्तेशी त्याच देशात दुसरी समांतर सार्वभौम सत्ता असू शकते का? एकाच संघराज्यात दोन घटकराज्यांना कमी अधिक अधिकार व दर्जा देणे न्यायोचित आहे का? याचा कोणीही विचार केलेला दिसत नाही. *तो फक्त डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनीच केला.* डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना हे कलम संघराज्य आणि संविधानास अंतर्विरोधी वाटत होते. म्हणूनच त्यांनी या कलमाला अगदी ठामपणे विरोध केला. त्यांनी प्रधानमंत्री पंडित नेहरू यांचा मित्र व मुस्लीम नॅशनल काॅन्फरन्सचा नेता शेख अब्दुल्ला याला स्पष्ट सुनावले होते की, 'तुम्हाला भारत सरकारकडून फक्त वेगळ्या सोयीसुविधा हव्यात. भारत सरकारने तुमच्या सीमेचे संरक्षण करावे, रस्ते बांधावेत, अन्नधान्याचा पुरवठा करावा अशी तुमची मागणी आहे. परंतु भारत सरकारला तुमच्या राज्यात *मर्यादित* ठेवावे,असा तुमचा आग्रह आहे. भारतीय नागरिकाला काश्मीरमध्ये *मालमत्तेचा अधिकार नसावा* अशा तरतुदीला मान्यता देणे *भारताच्या हिताचा घात करणे ठरेल. अशा तरतुदीला मी मुळीच मान्यता देणार नाही.'* असे म्हणून शेख अब्दुल्लांना डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीतच झिडकावले. तेव्हा शेख अब्दुल्ला प्रधानमंत्री पंडित नेहरूंकडे गेले. नेहरूंनी त्यांना *गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल* यांच्याकडे जाण्यास सांगितले. कारण नेहरूंना माहीत होते की, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व सरदार पटेल या दोघांचे सध्या चांगले संबंध आहेत. सरदार पटेलांनी जर डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना सांगितले तर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे नक्कीच ऐकतील. परंतु सरदार पटेल यांना याची जाणीव होती की, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर *'सत्य व तत्वांशी कधीच तडजोड करत नाहीत,* आणि हा तर *देशाच्या एकात्मतेचा व सार्वभौमत्वाचा प्रश्न* आहे. तेव्हा *डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे कदापि मान्य करणार नाहीत.* याची सरदार पटेलांना पक्की जाणीव असल्यामुळे ते या विषयाच्या संदर्भात डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांकडे गेलेच नाहीत
*काश्मीरवर चर्चा हवी होती!*
ऐतिहासिक संदर्भ असलेल्या आणि दूरगामी परिणाम होणार असलेल्या निर्णयावर सर्वसमावेशक आणि लोकशाही पद्धतीने चर्चा होणं आवश्यक होतं. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील समन्वयाने हा निर्णय व्हायला हवा होता. केंद्रीय तसंच राज्य विधिमंडळात विधेयक मांडून सम्यक चर्चा घडायली हवी होती. या विधेयकाच्या सगळ्या बाजू अभ्यासता येतील यासाठी सदस्यांना पुरेसा वेळ द्यायला हवा होता. लोकप्रतिनिधींना त्यावर लोकांची मतं जाणून घेण्याची संधी मिळायला हवी होती. नागरिकांना या निर्णयाचे पडसाद काय होऊ शकतात हे समजायला हवं होतं. त्यानंतरच या विधेयकावर चर्चा होऊन अंतिम निर्णय घ्यायला हवा होता.
मात्र राज्यसभेत काश्मीरसंदर्भात प्रत्येक नियम धाब्यावर बसवण्यात आला. कलम ३७० मध्ये कोणत्याही स्वरुपाचा बदल हा राज्य विधिमंडळाच्या मंजुरीनंतरच होऊ शकतो या मूलभूत नियमाला बगल देण्यात आली.
 '...तर एक दिवस काश्मिरात मुस्लीमच अल्पसंख्याक बनतील'! हे विधेयक काश्मीरच्या विधिमंडळात मांडण्यात यायला हवं होतं. काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट असल्याने विधिमंडळाचं काम स्थगित झालं आहे. सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यपाल, राष्ट्रपती राजवट असताना विधिमंडळाचं कामकाज आयोजित करण्यासंदर्भात कार्यवाही करू शकतात. परंतु आमदार हे लोकांनी निवडून दिलेले असतात, राज्यपाल लोकनियुक्त नसतो. राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपतींतर्फे केली जाते. काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक हे बिगरकाश्मीरी आहेत. जम्मू काश्मीरमधील स्थानिकांच्या इच्छाशक्तीचे ते प्रतिनिधित्व करू शकत नाहीत. असं पाकिस्तानचं म्हणणं आहे!
*काश्मीरमधील एक दृश्य*
जम्मू काश्मीरसंदर्भात केंद्र सरकारने सदस्यांना विधेयकासंदर्भात कोणतीही कल्पना अथवा माहिती दिली नाही. संसदेसमोर चर्चेसाठी ते मांडण्यातही आलं नाही. राज्यसभेत त्रोटक अशा चर्चेनंतर विधेयकाला मंजुरी देण्यात आली. लोकांनी निवडून आलेल्या प्रतिनिधींचं सभागृहाने म्हणजेच लोकसभेने विधेयकाला आधी मंजुरी द्यायला हवी होती. त्यानंतर विधेयक राज्यसभेकडे मंजुरीसाठी पाठवायला हवं होतं. या मुद्यावरही तत्वांना छेद देण्यात आला.
हे विधेयक मांडण्यासाठी गृहमंत्र्यांनी केलेल्या युक्तिवादावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी संस्थानं भारतात विलीन झाली. कलम ३७० हे त्या प्रक्रियेचा भाग नव्हतं. मात्र हे अचूक नाही. कारण ३७० कलमानुसार, संरक्षण-परराष्ट्र धोरण आणि दळणवळण यांच्याव्यतिरिक्त विलीनीकरणासंदर्भात निर्णय राज्य सरकारच्या अखत्यारीत राहतात. विलीनीकरणासंदर्भातील या तरतुदी काढून टाकण्यात आल्या तर?
कलम ३७० राज्यघटनेतून काढून टाकण्यात आलेलं नाही असा युक्तीवाद आता काही जण करतील, तर काही जण राज्यघटनेतली ही तरतूद विलीनिकरणाच्या करारानुसार करण्यात आली होती आणि तिच काढून टाकण्यात आल्याचा जोरदार युक्तीवाद करतील, असं असेल तर हे राज्यघटना आणि विलिनीकरणाच्या कराराचं उल्लंघन आहे.
*काश्मीरमध्ये तैनात सैनिक*
प्रसारमाध्यमांमध्ये काम करणाऱ्या अँकर्सनी हे मुद्दे बाजूला सारताना हे विधेयक ७० वर्षांपासून काश्मीरमधील अडचणींवर उतारा ठरू शकतं. काश्मीर खोऱ्यात सातत्याने टेरर अलर्ट असतो तसंच अर्थव्यवस्था बळकट करण्यादृष्टीने कलम ३७० हटवण्यात आलं असं सांगण्यात येत आहे. पण ही नुसतीच ७० वर्षांची चर्चा आहे, ते हटवल्यामुळे काय परिणाम होतील याची चर्चा व्हायला हवी. काश्मीर खोऱ्याला अंतर्गत आणि सीमेपल्याडहून असलेला धोका लक्षात घेता, सुरक्षेच्यादृष्टीने विचार केला तर सरकारची भूमिका योग्य वाटू शकते. मात्र गुप्तचर यंत्रणांच्या अहवाल तसंच अलर्टची मला कल्पना नाही. यासंदर्भात अधिकृतरीत्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. केंद्रशासित प्रदेश केंद्र सरकारच्या थेट अखत्यारित येतं. जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित झाल्याने याठिकाणी केंद्र सरकारचं नियंत्रण असेल. सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात येईल.
मात्र इतिहासाकडे नजर टाकली तर राष्ट्रपती राजवट किंवा राज्यपालांचं शासन याला न्याय देऊ शकत नाही. तटस्थ पद्धतीच्या सरकारमुळे काश्मीर खोऱ्यात आणि जम्मूतल्या मुस्लिमबहुल भागात असंतोष वाढत जाईल. याप्रदेशात होऊ नये पण कट्टरतावादाला खतपाणी मिळू शकतं.
काश्मीरमधील उद्योग आणि व्यवसायांचा विकास, अर्थव्यवस्थेला याआधीच फटका बसला आहे. कॉर्पोरेट उद्योगसमूह शांततामय राज्यांमध्येही गुंतवणूक करण्यास उत्सुक नाहीत. सुरक्षेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील काश्मीरची गोष्टच वेगळी आहे.
*पूर्वीच्या सरकारांची मवाळ भूमिका*
आधीच्या सरकारांनी कलम ३७० चं हटवण्याचा विचार करताना उचललेली पाऊलं आताच्या सरकारच्या तुलनेत खूपच मवाळ स्वरुपाची होती. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या संबंधावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं होतं. नव्वदीच्या दशकात कट्टरतावाद्यांचं बंड झालं होतं. त्याची धग ओसरण्याकरता १५ वर्ष गेली होती. आपल्या लष्करानं काश्मीर खोऱ्यात सुरक्षेची काळजी घेतीलही. मात्र आपल्या लष्कराच्या किती तुकड़्यांनी काश्मीरप्रती ऊर्जा, संसाधनं आणि वेळ खर्च करायचा?
इतिहासाकडे पाहिलं तर २००० ते २०१० हा कालावधी काश्मीरमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी आशावादी होता. असंतुष्ट गटाशी चर्चा, राज्य सरकारला आणखी अधिकार, प्रशासनात सुधारणेसाठी पुढाकार, सुरक्षाव्यवस्थेचं आधुनिकीकरण यावर भर देण्यात आला. जेणेकरून सर्वसामान्य माणसांच्या दैनंदिन जीवनावरची बंधनं कमी होतील.
देशभरातून काश्मीरसंदर्भातील या निर्णयाला वाढता पाठिंबा मिळतो आहे. तथ्यांश, मूलभूत गोष्टींऐवजी प्रचारभानाला आपण भुललो आहोत. ज्यांना या निर्णयाचा सर्वाधिक फटका बसणार आहे त्यांचा विचारच आपण केलेला नाही. आपण सोयीस्करपणे लोकशाही मूल्यांना तिलांजली दिली आहे हे दुर्देवी आहे. जम्मू काश्मीरपुरतं असल्याने असा विचार झाला का? नक्कीच नाही

उद्धवनीती !

"राजकारणात कधी, कोणता, कसा आणि काय निर्णय घ्यायचा याचं व्यवधान राजकीय नेत्याला असायला हवं तरच पक्ष, त्याचे नेते, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांना आपल्या नेतृत्वाशी जखडून ठेवता येतं. त्यात तेच यशस्वी होतात. स्व. बाळासाहेबांनंतर शिवसेनेचं काय होणार असं विचारणाऱ्यांना उद्धव ठाकरे यांनी आपल्या बुद्धी आणि व्यवहारचातुर्यानं परस्पर उत्तर देऊन टाकलंय. ती त्यांची 'उद्धवनीती'! शिवसेनेला यश देऊन गेलीय!"
----------------------------------------------
आज शिवसेना राज्यात अगदी योग्य मार्गावर यशस्वी घौडदौड करत आहे. लोकसभा निवडणुकीपुर्वी अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. शिवसेना भाजप यांची युती होणार की नाही ? शिवसेना स्वबळावर लढणार की युती करून ? जर युती केली तर शिवसेनेवर टिका होईल वगैरे वगैरे. पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अतिशय चाणक्यनितीने राजकारण केले. त्यांनी हवेचा प्रवाह ओळखला होता. देशातील सर्व मोठमोठे पक्ष नेस्तनाबूत होण्याच्या परिस्थितीत गेले. समोरून ५२ पक्षांची आघाडी असताना सुद्धा एकाही पक्षाला म्हणावं तसं यश मिळालं नाही. भाजपच्या लाटेत विरोधी पक्षांची इतर राज्यात पुरती दाणादाण उडत असताना देखील महाराष्ट्र भाजपमध्ये लोकसभा निवडणुकीपुर्वी नक्कीच चिंतेचं वातावरण होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अगोदरच जाहीर केले होते की ते इथुन पुढे कुणाच्याही दारात युतीसाठी कटोरा घेऊन जाणार नाहीत. त्यांनी तो शब्द अगदी तंतोतंत पाळला आणि युतीसाठी भाजपच्या राज्यातील नेत्यांपासुन ते भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यापर्यंत सर्व नेत्यांना मातोश्री वारी करायला भाग पाडले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे युती करण्यासाठी तयार झाले पण त्यांनी शिवसेनेने उचलुन धरलेले सर्व मुद्दे आणि सर्व मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन भाजपकडुन घेतले आणि मगच युती केली. यामध्ये नाणार प्रकल्प रद्द करणे , शेतकऱ्यांना प्रत्येक जिल्ह्यात पिकविमा केंद्र उघडून देणे , मुंबई महापालिकेचा मुंबईकरांसाठी ५०० चौ फुटाखालील घरांच्या करमाफीची मागणी मान्य करणे आणि गेल्यावेळपेक्षा लोकसभेत एक जागा वाढवून घेणे या सर्व अटी मान्य करायला भाजपला भाग पाडले आणि मगच युती केली.
आज सर्व पक्षांतील नेते पक्ष सोडून भाजप मध्ये प्रवेश करत असताना आजच्या घडीला पक्ष टिकवणे आणि वाढवणे ही काळाची गरज ओळखून आणि भाजप सेनेच्या वादाचा फायदा कॉँग्रेस राष्ट्रवादीला होऊ नये यासाठी शिवसेनेने युती केली. आणि महत्वाचं म्हणजे शिवसेनेने युती केल्यानंतर भाजपचे खासदारकीचे सर्व उमेदवार ज्यांना स्वबळावर विजयाची शाश्वती नव्हती त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. त्यांना माहीत होतं की शिवसेना वेगळी लढली तर आपले निवडुन येणे खुप अवघड जाईल. अशा रीतीने उद्धव ठाकरे यांनी अतिशय योग्य आणि यशस्वीरीत्या युतीचा प्रश्न सोडवला.
युती केल्यानंतर संपुर्ण २३ मतदारसंघ पिंजून काढले आणि शिवसेनेने १८ खासदार निवडून आणुन एनडीएमधील भाजपचा सर्वात मोठा मित्र पक्ष बनुण स्वताची ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली.
आजच्या राजकारणात काही ठिकाणी यशस्वी तडजोड करण्याची गरज होती आणि त्यात जो यशस्वी झाला त्यांचाच पक्ष आज यशस्वी झाला हे लोकसभा निवडणुकीत दिसुन आलेच.
सत्ता आल्यानंतर देखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शांत बसले नाहीत. ज्या ज्या ठिकाणी गरज आहे तिथे आपली संघटना रस्त्यावर उतरवुन त्यांनी जनतेची मनं जिंकायचे कार्य चालू ठेवले आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत पिकविमा कंपन्यांविरोधात निघालेला मोर्चा हे त्याचेच एक उदाहरण. तो मोर्चा निघाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासूनच पिकविमा कंपन्या भानावर आल्या आणि शेतकऱ्यांना रखडलेला पिकविमा मिळण्यास सुरुवात झाली.
शिवसेनेने सत्तेत असुनही असे आंदोलन करून प्रश्न सोडवण्याचा हा मार्ग अवलंबल्याने विरोधकांचा स्पेस देखील शिवसेनेनेच भरून काढला आहे. विरोधक अजुनही लोकसभेच्या पराभवातुन आणि पक्षाच्या गळतीच्या डोकेदुखीतुन बाहेर पडले नाहीत. म्हणुन शिवसेनाच रस्त्यावर उतरून विरोधकांचं देखील काम स्वत: करून सरकारला निर्णय घेतल्यास भाग पाडत आहे.
आज महाराष्ट्रात विरोधकांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. ६० वर्ष देशावर राज्य करणाऱ्या कॉँग्रेसचा आज राज्यात एक खासदार निवडून आला आहे. राष्ट्रवादीचे चेमतेम ४-५ खासदार निवडून आले आहेत. मनसेची तर एवढी बिकट अवस्था होती की लोकसभा निवडणुकीत ते मैदानात देखील उतरू शकले नाहीत आणि महाआघासाठी सभा घेण्याची वेळ आली आणि एवढं होऊनही महाआघाडीला महाराष्ट्रात यश मिळाले नाही. अशा वेळी सध्याची परिस्थिती बघुन उद्धव ठाकरे यांनी यशस्वीपणे राजकारण खेळुन स्वताचा पक्ष टिकवुन ठेवला आणि यशस्वी विजय देखील प्राप्त केला.
आता विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. अशातच शिवसेनेकडुन युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची जन आशिर्वाद यात्रा महाराष्ट्रात सुरु झाली आहे. आदित्य ठाकरेंच्या जन आशिर्वाद यात्रेला मिळणारा उत्तुंग प्रतिसाद बघुन भाजप नेत्यांची देखील चिंता वाढली आहे. समोरून येणाऱ्या अडचणींना लगेचच मार्गी लावणे आणि जनतेची मनं जिंकणे हे काम आदित्य ठाकरे एवढ्या कमी वयात अगदी यशस्वीपणे पार पाडत आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील शिवसेना भाव खाऊन जाणार आणि यशस्वी विजय मिळवणार हे नक्की आहे.
आजपर्यंत कित्येक पक्षांची सत्ता आली आणि गेली. गेल्या ६० वर्षात शिवसेना १९९५ ते १९९९ चा काळ सोडला तर सतत विरोधी पक्षात असुनही पक्ष फुटला नाही ना पक्षाला उतरती कळा लागली नाही. २०१४ विधानसभेत तर मोदीलाटेवर अख्खा देश स्वार झालेला असतानाही शिवसेना स्वबळावर निवडणूक लढली आणि २००९ पेक्षा २१ आमदार जास्त निवडुन आणले आणि भाजपला महाराष्ट्रात कडवी झुंज दिली व भाजपला एकहाती सत्तेपासून वंचित ठेवले.
आजची परिस्थिती पाहता शिवसेनेची घौडदौड अतिशय योग्य मार्गावर चालु आहे. विरोधकांनी आणि भाजपवाल्यांनी कुणीही काहीही टिका केली तरी शिवसेनेचं हे यशस्वी आणि मुरब्बी राजकारण प्रत्येकाला मान्य करावेच लागेल.
बाकी प्रत्येक पक्षाच्या लाटेचा एक काळ असतो जो की त्या काळात त्या पक्षाला सर्वकाही देऊन जातो. शिवसेना याच काळाच्या वेट अँड वॉच मध्ये आहे. आणि तो काळही शिवसेनेला दुर नाही असेच सध्याचे चित्र आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अतिशय संयमी शांत आणि चाणाक्ष हुशारीने जे राजकारण केलं आहे त्या राजकारणाला आज “उद्धवनिती” हा नविन शब्दप्रयोग चालू झाला आहे.

कमलेचा जवाहर ……… !

 *क* मला म्हणजे दिल्लीच्या मध्यम वर्गीय काश्मिरी पंडितांच्या कुटुंबातील  जवाहरमल कौल यांची सर्वात धाकटी मुलगी,  कमला म्हणजे  काश्मिरी सौंदर्याचे अस्सल प्रतिक ! पृकृती अतिशय नाजूक. अलाहाबादच्या नेहरू म्हणजे पूर्वीच्या कौल घराण्यातील  मोतीलाल नेहरू यांचे सर्वात थोरले अपत्य म्हणजे जवाहरलाल ! यांचा विवाह दिल्लीतल्या हक्सर हवेलीत ८ फेब्रुवारी १९१६ रोजी संपन्न झाला . त्यावेळी कमला १७ वर्षाच्या तर जवाहरलाल २६ वर्षाचे होते !  

विलायतेत वकिलीचे  शिक्षण घेवून जवाहरलाल १९१२ साली भारतात परतले होते आणि अलाहाबाद च्या न्यायलयात वकिली चालू केली होती. बालपण अलाहाबादच्या त्रिवेणी संगमच्या सानिध्यात व्यतीत झालेले होते . संस्कृत पंडित असणाऱ्या घराण्याच्या समृद्ध वारशा सोबत पाश्चात्य देशात  शिक्षण घेतल्यामुळे जवाहरलाल यांच्या युरोपियन संस्कृतीचा देखील प्रभाव होता. 

सनातनी काश्मिरी  ब्राह्मण कुटुंबात वाढलेल्या कमलेने आधुनिक विचाराच्या  जवाहर सोबत आपल्या आयुष्याची अनेक स्वप्ने रंगवली होती.  जवाहर बरोबर त्या पवित्र होमाभोवती  सात फेरे घेतले आणि भारताच्या जनतेचे सुखी संसाराचे स्वप्न साकारण्याच्या ध्येयासाठी प्रेरित झालेल्या राजकुमाराला एका प्रचंड मोठ्या प्रेरणा स्रोताची गाठ बांधली गेली !

हिंदी आणि संस्कृत भाषेत निपुण असणाऱ्या कमलेस इंग्रजी अजिबात येत नव्हते ,पण प्रेमाच्या भाषेने तिने सर्वांना आपलेसे केले. दोघांचा संसार सुरु झाला आणि  १९ नोव्हेंबर १९१७ रोजी या संसारवेलीवर प्रियदर्शनी अर्थात इंदिरा नावाचे सुंदर फुल फुलले ! पतीचा सहवास आणि संसार सुख म्हणजे काय तो एवढाच कालखंड. जवाहरने त्याच वर्षी स्वतःला कॉंग्रेस च्या कार्यात झोकून दिले. गांधीच्या संपर्कात आल्यावर जवाहरलाल यांनी खादी वापरायला सुरुवात केली . त्यांच्याबरोबर कमलेने देखील खादी घालायचे ठरवले. मध्यम वर्गीय कुटुंबातील मुलगी,  गडगंज संपती असणाऱ्या कुटुंबात काय काय आशा घेवून आली होती.  मात्र जवाहरच्या संसारात खादीची जाडीभरडी साडी तिला अत्यंत समाधान द्यायची. ती अतिशय आनंदी होती ,परंतु हळूहळू कामाचा व्याप वाढला ,देशभर दौरे ,सभा, आंदोलने ,सत्याग्रह यात कधी कधी महिना महिना दोघांची भेट देखील व्हायची नाही. त्यांनी एकमेकांसाठी दिलेला अवधी पहायचा म्हटला तर १९१६ ते १९१९ ही तीन वर्ष  , १९२४-२५ ही दोन वर्ष  आणि १९२९ चे दहा बारा महिने ,म्हणजे अवघा ६ ते ७ वर्षाचा आहे. देशकार्य करताना कमला मात्र उपेक्षितच राहिली याची खंत नेहरूंच्या मनाला लागली ती कायमची! 

'डिस्कवरी ऑफ इंडिया ' अर्थात भारताचा शोध हा ग्रंथ नेहरूंनी १९४४ साली लिहिला . त्यावेळी कमला यांना जावून १० वर्ष झाली होती. कमलेवर अन्याय झाला असे त्यांना वाटे. खूप कांही साठले होते. मन  मोकळे कुठे करणार आणि कोणासमोर ? म्हणून नेहरू 'डिस्कवरी ऑफ इंडिया ' या ग्रंथात  आपल्या प्रिय पत्नी बद्दल मनात साठलेल्या भावनांना अभिव्यक्त करतात. या ग्रंथातील ' आमचा विवाह आणि नंतर ' या प्रकरणात जवाहरलाल नेहरू कमलेबद्दल लिहितात " ती मला खूप आवडे तरी ही  मी तिला विसरून जात असे. सहचारिणी म्हणून माझ्या जीवनात वावरण्याचा तिचा हक्क  मी कैक रीतीने बजावू दिला नाही. कारण त्यावेळी मी भारल्यासारखा झालो होतो. जे कार्य मी हाती घेतले, त्या कार्याशी मी  एकरूप झालो होतो ,इतर सारे विसरून गेलो होतो. मी माझ्या स्वप्नसृष्टीत गुंग होतो. माझ्या भोवतालच्या माणसांकडे स्वप्नमय छाया म्हणून मी पाहत होतो. ज्या कार्याने मला भारले  होते त्या कार्याने माझे मनही व्यापले होते. माझी सारी उत्साह शक्ती त्या कार्याला मी दिली होती आणि इतरत्र द्यायला शिल्लकच काही उरत नसे. इतके असूनही मी तिला विसरणे का शक्य होते? मी पुन्हा पुन्हा तिच्याकडे येत असे. तारू  बंदरात यावे त्याप्रमाणे मी तिच्याजवळ आश्रयार्थ येत असे. मी कित्येक दिवस दूर राहिलो तरी तिचा नुसता विचारही माझ्या मनाला गारवा देई . कधी घरी जाता येईल याची उत्सुकतेने वाट पाहत असे. मला सुख समाधान,मला सामर्थ्य द्यायला कमला नसती तर खरोखर मी काय केले असते ? शरीराची आणि मनाची रिती झालेली माझी बॅंटरी पुन्हा भरून द्यायला कमला नसती तर ? तिच्यामुळेच मी माझी विद्युत शक्ती पुन्हा पुन्हा मिळवून घेत असे "

नेहरूंना वयाच्या ३२ व्या वर्षापासून  तारुण्यातील ९ वर्षाचा कालावधी  बंदिवासात व्यतीत केला आहे. यात कमला यांच्या त्याग खरोखरच महान आहे. अगदी सुरवातीच्या काळातील  कमला नेहरूंचे वर्णन करताना नेहरू  म्हणतात " ती आमच्याकडे आली एक साधी सरळ मुलगी. आजच्या सुशिक्षित मुली मध्ये मनोविश्लेषणशास्त्रातले गंड असतात,असे म्हणतात. पण तसा काहींसा प्रकार नव्हता. तिच्या चेहऱ्यावरील अल्लडपणा अगदी आहे तसाच होता. वय वाढेल तसे तिच्या डोळ्यात गंभीरपणा आणि तेज मात्र निर्माण झाले. नवीन मुलीत संयमीपणा नसतो असे म्हणतात ,पण कमला तशी नव्हती ,तिने आधुनिकता सहज स्वीकारली. कारण ती खरी भारतकन्या होती. ती अतिसंवेदनशील ,स्वाभिमानी तसीच पोक्त आणि तेवढीच अल्लड, तेवढीच शहाणी आणि मला तेवढीच वेडीही भासत असे. ती मनाने खूप निर्मळ होती. प्रामाणिक पणाचा जेवढा ठसा कमलाने माझ्या मनावर उमटवला  तेवढा क्वचितच कोणी उमटवला असेल"

कारावासाचा पहिला कालावधी संपल्यावर १९२४ च्या नोव्हेंबर महिन्यात कमला आणि जवाहरलाल यांना पुत्ररत्न झाले मात्र  अवघ्या आठवड्यात ते गेले ! कमला यामुळे खचल्या ,तशातच आजारपण सुरु झाले आणि  शेवटी क्षयरोग असल्याचे समजले. त्यावेळी वडील मोतीलाल सतत आजारी असायचे  आणि त्यांच्या  स्वतःसमोर  देशाची जवाबदारी ,इंदिरा गांधी त्यावेळी मसुरी मध्ये वसतिगृहात शिकत होती. जवाहरलालजींच्या आई स्वरूपराणी यांनी पुणे ,मुंबई इथे जावून कमलाजींवर उपचार सुरु केले पण फरक काहींच पडत नव्हता. कधी बरे वाटत असे कधी आजार बळावत असे. असे दोन तीन वर्ष उलटली. आजार हळू हळू वाढत होता .  नेहरू १९२८ मध्ये  ब्रुसेल्स इथल्या जागतिक साम्राज्यवाद विरोधी परिषदेत कॉंग्रेस चे प्रतिनिधी म्हणून गेले होते. भारतात परतल्यावर देखील पुढची दोन वर्ष अशीच नेहरू अहवाल ,कलकत्ता कॉंग्रेस ,पूर्ण स्वातंत्र्याची मागणी ,रवि नदीच्या किनाऱ्यावरील पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव , २६ जानेवारी १९३० चा पहिला स्वातंत्र्य दिन, अटक आणि कारावास यात कसे निघून गेले समजलेच नाही !

याच काळात कमला नेहरू यांना उपचारासाठी उत्तरखंड प्रदेशातील भोवाली येथे नेण्यात आले आणि तिथून तज्ञांच्या सल्ल्यानुसार युरोपात उपचार घ्यायचे ठरले . त्यांच्यासोबत  आई  स्वरूपराणी, इंदिरा होत्या . नेहरू त्यावेळी अल्मोराच्या कारागृहात होते. नेहरू सदगदित होवून  लिहितात ' कमला कशाची तरी वाट पाहते आहे ,कांही अपेक्षा करत आहे , याकडे मी कधी लक्षच दिले नाही. कॉंग्रेस चे काम आणि तुरुंगवास माझ्यासाठी नित्याचा होता. कधी  मी दूर असायचो, कधी आजारपणामुळे ती दूर असायची ! रवींद्रनाथांच्या नाटकातील चित्रा प्रमाणे कमलाही जणू मला म्हणत असेल " मी चित्रा आहे. जिची पूजा करावी अशी एखादी मी देवता नाही. दिव्यावर होरपळलेल्या पतंगाची कीव वाटूनही शेवटी त्याला सहज झटकून टाकतात तशी उपेक्षणीय कीटक देखील नाही. संकटाच्या  आणि साहसाच्या मार्गात स्वतःच्या शेजारी जर मला उभे राहण्याची कृपा केली, तुमच्या जीवनातील थोर आणि महान कर्तव्यात मलाही भाग घेण्याची परवानगी दिली तर माझे खरे स्वरूप तुम्हाला समजून येईल " परंतु कमला अशा प्रकारे प्रत्यक्ष शब्दांनी माझ्याजवळ कधी बोलली नाही. पुढे हळूहळू तिच्या डोळ्यातला संदेश मी वाचला'

कमला नेहरूंची प्रकृती तशी खूप नाजूक होती . पण मनाने त्या  खूप कणखर होत्या ! सविनय कायदेभंगाच्या चळवळीत सासरे मोतीलाल आणि पती  जवाहर कारावासात असताना कॉग्रेस ची धुरा त्यांनी सांभाळली. एकवेळ तर  इंग्रजांच्या काठ्या देखील खाव्या लागल्या आणि  एक वर्ष कारावास  देखील भोगला ,तेंव्हा जवाहरलाला त्यांच्या क्षमतेचा पहिल्यांदा अनुभव आला . त्यावेळी नेहरू नैनीच्या तुरुंगात होते . त्यांना हे समजले तेंव्हा खूप आनंद वाटला . नेहरू लिहितात ' संपूर्ण शरीरभर आनंदाच्या लहरी  उमटत होत्या , अभिमाने डोळ्यात आनंदाश्रू एवढे होते कि एकमेकात बोलायला शब्द देखील  फुटेना ' मोतीलाल नेहरू आणि जवाहरलाल कारावासात असतना कमला यांनी केलेली कामगिरी  पतीचा उर अभिमानाने भरून जावा अशीच होती!
मोतीलाल नेहरूंचे निधन फेब्रुवारी १९३१ मध्ये झाले आणि कमला यांच्यावर घराची सर्वच जवाबदारी पडली. प्रकृतीची हेळसांड सुरु झाली आणि आजार पुन्हा गंभीर रूप धारण करू लागला. फेब्रुवारी १९३४ मध्ये कलकत्ता कोर्टाच्या वारंट अन्वये जेंव्हा जवाहरलाल यांना पकडण्यासाठी पोलिस घरी आले ,तेंव्हाचा प्रसंग नेहरूंनी खूप भावूक रित्या मांडला आहे, " मला अटक करायला पोलिस आल्यावर माझे कपडे गोळा  करायला कमला वरती गेली ,निरोप घ्यायचा म्हणून मी तिच्या पाठोपाठ गेलो. एकदम  तिने मला मिठी मारली आणि तिला घेरी आली, ती पडली .तिच्या बाबतीत  पूर्वी असे कधी झाले नव्हते. एखादी नित्याची बाब समजून  तुरुंगाच्या यात्रेकडे आनंदाने बघायला आम्ही शिकलो होतो ,त्याचा गाजावाजा देखील करत नसू . परंतु आज असे का झाले ? आपली हि नित्याची सर्वसाधारण भेट ,शेवटचीच भेट आहे असे भविष्य तिला दिसले होते कि काय ? 

कमला यांना  उपचारासाठी जर्मनीत घेवून गेल्यावर जवळपास चार महिन्यांनी ४ सप्टेंबर १९३५ ला नेहरूंची अल्मोरा कारागृहातून सुटका झाली आणि ते  सप्टेंबर च्या ९ तारखेस ते बेडेनवेलर येथे पोचले . यावेळी नेहरूंनी केलेले कमलेच्या भेटीचे वर्णन खूप भावनोत्कट  आहे ' मी कमलाला भेटलो ,तिला पहिले . तिच्या मुखावर तेच चिरपरिचित असे दुर्दम्य स्मित होते . ती फारच खंगली होती ,दुख विव्हल असल्यामुळे ती फार बोलू शकली नव्हती. कदाचित माझ्या येण्याचा परिणाम म्हणून की काय ,दुसऱ्या दिवशी तिला जरा बरे वाटले आणि थोडे दिवस खरेच जरा बरे गेले. परंतु धोका होताच,आणि हळू हळू परंतु निश्चितपणे जीवनाचा झरा सुकत जात होता. तिच्या मृत्यूचा विचार माझ्या मनाला पटणे अशक्य होते ,म्हणून तिची प्रकृती सुधरत आहे ,अशी कल्पना मी करत असे'  नेहरू यावेळी खूप भावूक झाले होते आणि ते स्वाभाविकही होते . जीवनाकडे आशेने पाहताना , दिलासा हवा असतो ! त्यावेळी  कमला यांना नेहरूंनी पर्ल बक ची 'गुड अर्थ ' ही कादंबरी वाचून दाखवली आणि नियमित काही पुस्तकातील उतारे ,कविता ते वाचून दाखवत असत. त्या  अखेरच्या दिवसात कमला यांचाच विचार नेहरूंच्या मनात असे. डोळ्यासमोर सतत आठवणी यायच्या, नेहरूंचे हे आत्मनिवेदन त्यांच्या जीवनातील कमला नेहरू यांच्या अतुलनीय  त्यागाची अभिव्यक्ती आहे!  आपण कमलेला कांही देवू शकलो नाही ,याची खंत त्यांच्या मनात कायम राहिली , तीच त्यांनी शब्दरूपात खूप भावूक होवून व्यक्त केली आहे. नेहरूंनी लिहिले आहे ' तिने मला जे दिले ते मी घेतले होते ,परंतु त्या आरंभीच्या वर्षात तिला मी काय दिले होते ,कोणता मोबदला दिला होता ? खरोखरच याबाबतीत मी अपराधी आहे '

कमलाजी  मृत्यू शय्येवर असताना भूतकाळातील घटनेचा सारा  चित्रपट त्यांच्या डोळ्यासमोर झरझर येत असे. प्रत्येक वेळी कमला त्यांच्यासमोर उभ्या  असल्याचा भास त्यांना होई .आनंदात घालवलेले शेवटचे क्षण म्हणजे १९२९ च्या सुरवातीस तत्कालीन सिलोन म्हणजे आताच्या श्रीलंकेत घालवलेले कांही दिवस  ! एका आनंदाच्या क्षणी ते कमला यांना म्हणाले "  जीवनात अनेक अडचणी येवून देखील आपण सुखी आहोत हे खरे". नेहरू लिहितात ' कधी कधी आमचीही भांडणे व्हायची ,आम्ही एकमेकांवर रागावत असू तरीही प्रेमाची स्वयंभू ज्योत आम्ही कधी विझू दिली नाही. जीवनात दोघांच्याही समोर नवीन नवीन साहसाचे प्रसंग येत, आणि त्यातून एकमेकांचे नवीनच एखादे रूप पाहण्याची संधी मिळून एकमेकांस समजून घेण्याची नवीन अंतर्दृष्टी आम्हास लाभत असे ' पत्नीशी झालेला प्रत्यक्ष संवाद आणि हृदय संवाद नेहरूंनी खूप मनमोकळेपणाने मांडला आहे.

बेडेनवेलर येथील उपचारानंतर १९३६ च्या जानेवारीच्या शेवटी कमला नेहरू यांना  लॉसेल येथील हॉस्पिटल मध्ये दाखल  करण्यात आले, इथे मात्र त्यांची प्रकृती खूपच बिघडली आणि  तिथेच २८ फेब्रुवारी ला कमला नेहरू यांचे निधन झाले . नेहरू लिहितात 'फेब्रुवारीची २८ तारीख ,दिवस उजाडताच कमला गेली. सोबत असणारे कांही स्नेही आणि आम्ही नातेवाईक यांनी मिळून लॉसेल मधील स्मशान भूमीत  तिला नेले. एका  क्षणात त्या सुंदर शरीराची ,त्या सदैव हसऱ्या चेहऱ्याची चिमुटभर राख बनली. इतके चैतन्य ,इतका उत्साह ,इतके तेज सारे निघून गेले व राहिलेल्या नश्वराचा अवशेष एका लहानशा कुंभात मावला'

लॉसेल हून रोम मार्गे कैरो हून नेहरूंचा परतीचा प्रवास सुरु झाला आणि मनात सतत 'कमला नाही' आता कमला नाही या विचारांनी थैमान माजवले ,या विचाराचे  खूप उत्कट वर्णन नेहरूंनी केले आहे  ' कैरो सोडल्यावर तासचे तास त्या ओसाड वाळवंटातून  जात असता माझ्या मनाला आता कमला नाही , यापुढे  आपण एकटेच ,या भयंकर विचाराची एकदम मगरमिठी बसली व सारे शून्य ,उदास वाटू लागले. मी घरी एकटा परत जात होतो. पण आता माझे घर ते कुठे राहिले होते ? पूर्वीचे का आत्ता ते घर होते ? माझ्या शेजारच्या करंडीत रक्षाकुंभ होता ,तेवढेच काय ते कमलाचे शिल्लक राहिले , आणि आमच्या दोघांची अशा स्वप्ने मरून त्यांचीही राखच राहिली. ' यापुढे कमला नाही ' 'यापुढे कमला नाही' हेच शब्द मन पुन्हा पुन्हा म्हणत होते.

कैरोमध्ये पोचल्यावर लंडन मधील प्रकाशकांना त्यांनी  तार केली , आणि त्यांचे  आत्मचरित्र त्यांनी कमला नेहरूंना अर्पण केले
' To Kamla..... who is no more'..........

नेहरू शेवटी लिहितात ' अलाहाबादला पोचलो आणि कमलेच्या रक्षेचा तो अमोल असा करंडक घेवून धावत्या गंगेच्या प्रवाहात शिरलो आणि ती रक्षा त्या पवित्र गंगा माईच्या स्वाधीन केली. आमच्या  कितीतरी पूर्वजांचे अवशेष तिने आतापर्यंत सागराकडे नेले असतील आणि इथून पुढेही आणखी कितीतरी जणांची अखेरची यात्रा तिच्या प्रवाहाच्या कडेखांद्यावरून  होईल' ( 'Allahabad ,where we carried the precious urn to the swift flowing Ganges and poured the ashes into the bosom of that noble river. How many of our forebears she had carried thus to the sea,how many of those who fallow us will take that last journey in the embrace of her water' - Discovery of India, page no.39 )

गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या " चित्रा " नाटकातील  चित्रांगदेचे पराक्रमी अर्जुनावर प्रेम बसते परंतु १२ वर्षाच्या वनवासात त्याने ब्रह्मचर्य आचरणाचे वृत्त स्वीकारलेले असते ,तरच त्यास कुरुक्षेत्रावरील युद्धासाठी  इंद्राकडून दिव्य अस्त्र प्राप्त होणार असते. पुढील कथानक वेगळे आहे मात्र नेहरूंनी कमलेच्या मनातील भाव चित्रांगदा हिच्या मनातील भावनेशी तुलना करून  प्रकट केले आहेत ! जवाहर आणि कमला यांचा १९१६ साली सुरु झालेला हा प्रवास, ६ ते ७ वर्षाच्या सहजीवनाचा कालावधी सोडला तर, अवघ्या १८ वर्षाच्या कालवधीत कमला यांच्या वयाच्या केवळ  ३४ व्या वर्षी संपला. जो प्रामुख्याने देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भोगलेल्या   कारावासात , समाजकार्यात, आंदोलनात आणि जनजागृतीत व्यतीत झाला होता.
कमलेचा जवाहर हा असाच आहे , तिच्या त्यागाच्या ज्योती तून प्रेरणा घेवून भारतातील जनतेच्या अंधकारमय जीवनाला प्रकाशमान करू पाहणारा !  कदाचित कमला जाताना जवाहरला तिच्या वाटणीचे सारे चैतन्य आणि  उत्साह देवून गेली असावी .

'असरदार पटेल...!


"घटनेतील कलम ३७० आणि ३५अ रद्द करण्याचा निर्णय संसदेच्या दोन्ही सभागृहात घेतला गेलाय. त्याआधी देशात सत्तांतर झाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्यकर्तृत्वाची उजळणी सुरू झालीय. त्यासाठी जवाहरलाल नेहरूंची साक्ष काढली जाते! कश्मीरचा प्रश्न जेव्हा जेव्हा निघतो तेव्हा तेव्हा पटेलांचं स्मरण केलं जातं. नेहरू आणि पटेल यांच्याशी असलेले परस्पर संबंध, महात्मा गांधी-नेहरु-पटेल यांच्यातील नातं, शिवाय कधीकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी लादणाऱ्या पटेल यांच्याबद्धल संघ आणि भाजपेयीं दाखवत असलेलं ममत्व!  देशाची फाळणी होतानाच्या घडामोडीत पटेल-नेहरूंची भूमिका या साऱ्या घडामोडींचा परामर्ष घेणारा हा लेख!"
-----------------------------------------------
*भा* रताच्या स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षानं सरदार वल्लभभाई पटेल यांचं स्मारक गुजरातेत उभं राहिलंय. त्यांनी देशाच्या अखंडतेचं हे महान कार्य केलंय, त्याचं मूल्यमापन स्वातंत्र्योत्तर काळात खऱ्या अर्थानं झालंच नाही. किंबहुना त्यांचा गुणगौरव होण्याऐवजी अवहेलनाच झाली असंच म्हणावं लाभेल! बॅरिस्टर जीना यांनी भारताचे दोन तुकडे करण्यासाठी टाकलेला कुटील डाव! चर्चिल यांनी भारत, पाकिस्तान या दोन राष्ट्राबरोबरच भारतातल्या विविध संस्थानिकांचं आणखी एक तिसरं राष्ट्र 'राजविस्तान' निर्माण करण्यासाठी टाकलेला डाव! सरदार पटेल यांनी हे त्यांचे सारे डाव, मनसुबे कसे उधळून लावले, संस्थानिक आणि त्यांची संस्थानं कशी बरखास्त केली हे जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. यापूर्वी आपल्याला एवढंच माहिती होतं की पटेलांनी कश्मीर, जुनागढ आणि हैदराबाद या संस्थांच्या विरोधात झगडा दिला. स्वातंत्र्यापूर्वी देश दोन भागात विखुरला गेला होता, एक भाग इंग्रजांच्या ताब्यात होता तो आपोआप केंद्र सरकारच्या ताब्यात आला होता तर दुसरा भाग हा विविध राजेरजवाडे आणि संस्थानिकांनी व्यापलेला होता. हे सारे राजेरजवाडे, संस्थानिक देशाशी जोडले गेले नाहीत तर देशाचं महत्त्व राहणार नाही हे जाणून हे सारे संस्थानिक आणि त्यांचे संस्थानं बरखास्त करण्याची जबाबदारी वल्लभभाई पटेल यांच्याकडे सोपविण्यात आली होती. कश्मीर, जुनागढ, हैदराबाद या संस्थानिकांनी भारतात विलीन होण्यासाठी आढेवेढे घेतले हे सारं आपण जाणतो, पण इतर राजे-रजवाडे संस्थानिक हे कशा प्रकारे भारतात विलीन झाले हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं ठरणारं आहे!

*ब्रिटिशांनी राजेशाही सुरूच ठेवली होती*
१९४५ च्या दरम्यान दुसरं महायुद्ध संपुष्टात आलं होतं, तोपर्यंत भारतासह अनेक आशियाई देशातून ब्रिटिशांना बाहेर पडावं लागण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. सध्या आपलयाकडं भारताची जी भूमी, जो भूभाग आहे, तो ३२ लाख चौरस मीटर असा विस्तीर्ण देश आणि भिंतीवर टांगलेल्या नकाशात जो भारताचा आकार आपण पाहतो तो प्रत्यक्षात आणला, साकारला  'द पोलिटिकल बॉस : सरदार पटेल यांनी!  भारताचा हा भू भाग ब्रिटिशांनी आपल्याकडून हिसकावून घेतला होता आणि आपल्या देशातील संपत्ती उध्वस्त करून टाकली होती.  हा सगळा इतिहास आपल्याला माहित आहे. स्वातंत्र्यापूर्वी भारतात अनेक संस्थानिक आणि ब्रिटिश शासन अशा प्रकारे मिश्र सत्ता लागू होती. बहुसंख्य भागात ब्रिटिशांची सत्ता होती तर इतर परिसरात राजे-राजवाडे, संस्थानिक त्यांची सत्ता होती अशा संस्थानिकांची संख्या देशभरात जवळपास ५६५ होती आणि त्यांचा विस्तार १४.२५ लाख चौरस किलोमीटर एवढा होता. त्यावेळी संपूर्ण देश हा ४२ लाख चौरस मीटरचा होता. या संस्थानांमध्ये राहणाऱ्यांची लोकसंख्या होती जवळपास ८ कोटी तर संपूर्ण भारताच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास २५ टक्के एवढी होती. या संस्थानिकांनी ब्रिटिशांचे वर्चस्व, ताबेदारी स्वीकारली होती. त्यामुळे त्यांची ती राजेशाही, संस्थानं ब्रिटिशांनी तशीच सुरू ठेवली होती.

*स्वातंत्र्यात मोडता घालण्याचा प्रयत्न*
भारताला स्वातंत्र्य द्यायचं असेल तर, अशा लहान लहान संस्थानिकांना स्वातंत्र्य देऊन चालणार नाही. हे इंग्रज जाणून होते. भारताला कशाप्रकारे स्वातंत्र्य दिलं जावं याबाबत चर्चा करण्यासाठी ब्रिटिश सरकारने त्यांचं एक शिष्टमंडळ १९४५ साली भारतात पाठवले होतं. त्याचं नाव होतं 'द युनायटेड किंगडम कॅबिनेट मिशन'. २२मे १९४५ रोजी या कॅबिनेट मिशननं सर्व संस्थानिकांना बोलावून स्वातंत्र्यानंतर तुम्ही कशा प्रकारे राहणार याचं स्पष्टीकरण मागवलं होतं. त्याचबरोबर त्यांना समजावून सांगण्यात आलं होतं की,  आपल्या म्हणजेच ब्रिटिशांच्या आणि संस्थानिकांच्या संबंधांमध्ये परस्पर संबंध कसे होते ते पुढंही तसेच राहतील! इंग्रजांच्या या भूमिकेनं स्पष्ट झालं की, भारताला स्वातंत्र्य देण्यात मोडता कसा निर्माण होईल हे इंग्रजाकडून पाहिलं गेलं. म्हणजेच नवा खेळ ब्रिटिशांनी मांडला होता.

*पटेलांकडे विलीनीकरणाची जबाबदारी*
त्यावेळी दिल्लीत जमलेल्या भारतीय राजकीय नेत्यांना याचीही माहिती होती की, हे सर्व राजेरजवाडे आणि संस्थानिक यांचे प्रश्न सोडवणं तेवढं सोपे नाही. २ सप्टेंबर १९४६ ला भारतात तात्पुरत्या सरकारची रचना करण्यात आली होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात सत्ता राबवणं, त्याचं नियंत्रण करणं, संचालन करणं यात थोडीशी सरलता प्राप्त होईल अशी त्या सरकार स्थापण्यामागची भूमिका होती. या नवनिर्मित तात्पुरत्या सरकारात गृह, माहिती आणि प्रसारण ही खाती सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे सोपविण्यात आली होती. स्वातंत्र्यापूर्वी म्हणजेच जून १९४७ मध्ये हे नक्की करण्यात आलं होतं कि, भारतात असलेल्या ५६५ संस्थानिकांसाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण करण्यात यावं आणि त्याची जबाबदारीदेखील वल्लभभाई पटेल यांच्याकडे सोपवावी. पण तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांना स्वतःलाच त्या संस्थानिकांचे संचालन वा खात्याची जबाबदारी स्वीकारावी असे वाटत होतं. पण मंत्रिमंडळाच्या सामूहिक निर्णयानुसार ही जबाबदारी सरदार पटेल यांच्याकडे सोपविण्यात आली. पटेल ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी सक्षम होते, त्यांनी तशी तयारी दाखविली. पटेलांच्या या निर्णयानं त्यावेळी व्हॉईसरॉय असलेल्या लॉर्ड माउंटबॅटन यांना हायसं वाटलं होतं.

*पटेलांचं संस्थानिकांना समजावणीचं पत्र*
संस्थासनिकांच्या विलीनीकरणाची जबाबदारी मिळताच सरदार वल्लभभाई पटेल यांनी सर्व संस्थानिकांना एक सविस्तर पत्र लिहिलं. त्यात त्यांनी म्हटलं, *"आपण सर्वजण शेवटी या भारतभूमीचे पुत्र आहोत. आपण सर्वजण वेगवेगळ्या पद्धतीने राहिलो, संस्थानिक म्हणून वावरलो तर देशाच्या अखंडतेच्या दृष्टीनं ते धोक्याचं आहे. किंबहुना एकमेकांच्या विरोधात राहिलो, लढलो म्हणूनच परदेशी लोकांचं साधलं. इंग्रजांनी इथं येऊन आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केलं, आताच्या स्थितीत आपण पुन्हा अलग राहिलो आणि एकत्र आलो नाही तर आपला विकास होणार नाही. आपण पुढं जाणार नाही. आता आपण इतिहासाच्या एका वळणावर अशा ठिकाणी येऊन उभे आहोत, की इथं आपल्याला नक्की करायचं काय? आणि कशा रीतीने देशाचं वैभव राखलं जाईल? याचा विचार करावा लागणार आहे. मला आशा आहे की, तुम्ही सारेजण भारताची जोडले जाणार आहात. आणि राष्ट्रनिर्माणाच्या या महत्त्वाच्या कामात साथ देणार आहात!"* याबरोबरच सरदार पटेल यांनी त्यांना अशी खात्री दिली होती की *"तुमचा देशात योग्य असा सन्मान राखला जाईल आणि तुमचे तनखे देखील पूर्ववत चालू राहतील. त्यामुळे स्वतंत्र राहून काही करण्याच्या भानगडीत आपण पडू नये!"* सरदार पटेलांच्या या पत्रांनं अनेक संस्थानिकांवर सकारात्मक असा परिणाम झाला. ज्यांना भारतात यायचं नव्हतं वा येण्यामध्ये रस नव्हता अशा संस्थानिक, राजा-राजवाड्यांमध्ये परस्पर मैत्री तरी होती वा वैमनस्य तरी होतं. यासाठी छोटे छोटे संस्थानिक मोठा निर्णय काय होईल यासाठी वाट पाहत बसले होते. पण काही संस्थानिकांनी पाकिस्तानशी जोडले जाण्याचा वा पाकिस्तानात विलीन होण्याचा प्रयत्न चालवलेला होता. स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतर हा इतिहास आपल्याला समजतो आहे की सरदार पटेलांनी ५६२ संस्थानिकांना भारतात विलीन केलं आणि देशाची सीमा अखंड ठेवली. परंतु या संस्थानिकांशी कशाप्रकारे त्यांनी काम करून घेतलं, त्यातले किस्से हे जाणून घेण्यासारखे आहेत.

*कश्मीर, हैदराबाद आणि जुनागढ यांचा नकार*
सरदार पटेल यांच्याकडे विलीनीकरणासाठी साम-दाम-दंड-भेद असे चारही मार्ग  होते. जमेल तोवर त्यांनी समजावणीचा मार्ग स्वीकारला होता. जी संस्थाने समजावणीच्या सुरात सूर मिसळत होते त्यांचे सरदारांनी स्वागत केलं. पण तीन राज्यांनी हटवादी भूमिका घेतली होती, हैदराबाद, कश्मीर आणि जुनागढ यांनी भारतात सामील होण्यास नकार दिला. त्यामुळं पटेल आणि देशासमोर एक अवघड समस्या उभी राहिली. अखेर पटेलांच्या राजनीतिनंतर त्यांना भारतात समाविष्ट व्हावंच लागलं. आज अगदी मुक्तपणे देशात आपण फिरू शकतो याचं श्रेय सरदार पटेल यांना द्यावेच लागेल. यासाठी तरी त्यांची आठवण ठेवावी लागेल!

*भारताच्या एकत्रीकरणाचे हे दोन साथीदार!*
सरदार पटेल यांच्याकडे ही जबाबदारी आल्यानंतर देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा या कामगिरीसाठी त्यांना नव्या साथीदारांची गरज होती. त्यावेळी मोरारजी देसाई यांनी एक नाव सुचवलं ते होतं विद्याशंकर यांचं! वल्लभभाईंनी जवळपास दीड-दोन तास या विद्याशंकरांची मुलाखत घेतली. उलट-सुलट चर्चा करून आपल्याला सहाय्यक म्हणून नेमलं. ते आधीपासूनच व्हॉईसरॉय यांच्या टीम मध्ये कार्यरत होते. दुसरी व्यक्ती होती वापल पांगुनी मेनन! म्हणजेच व्ही.पी मेनन. या अधिकाऱ्यांकडे संस्थानिकांना सामील करून घेणाऱ्या खात्याचे सचिव म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली या सगळ्या एकीकरणाच्या कार्यवाहीचे मेनन हे वरिष्ठ एक अधिकारी होते, साक्षीदार होते. त्यानंतर मेनन यांनी या आपली एकीकरणाची समग्र प्रक्रिया कशी झाली, याबाबतचे एक पुस्तक लिहिले आहे, 'द इंटिग्रेशन स्टोरी ऑफ इंडियन स्टेट्स' असं या पुस्तकाचं नाव आहे. त्यानंतर शंकर यांनी सरदार पटेल यांच्या पत्रव्यवहाराबाबतचेही महत्त्वपूर्ण पुस्तक प्रकाशित केले आहे

*जीना यांचा कुटील डाव पटेलांनी हाणून पाडला*
तेलंगणाच्या निर्मितीनंतर हैदराबादवर ज्याप्रकारे तेलंगणा आणि आंध्र प्रदेश यांचा ताबा सहा महिन्यांसाठी ठेवण्यात आला, तशाचप्रकारे स्वातंत्र्यानंतर कलकत्त्यावर पहिल्या सहा महिन्यात भारत आणि पाकिस्ताननं संयुक्तरीत्या कब्जा ठेवावा अशी मागणी बॅरिस्टर महंमद जीना यांनी केली होती. ही मागणी घेऊन व्ही.पी. मेनन यांना व्हॉइसरॉय यांनी सरदार पटेल यांच्याकडं पाठवलं होतं. पण सरदारांनी तेवढ्याच तडफेने जबाब दिला की, 'सहा महिनेच पण काय सहा तास देखील ताबा मिळणार नाही!' याशिवाय यापूर्वीच्या एका संयुक्त बैठकीत जीना यांनी एक अशी कल्पना मांडली होती की, *'पूर्व आणि पश्चिम या दिशेला पसरलेल्या पाकिस्तानला जोडण्यासाठी भारतातून जाणारा अंदाजे दीड हजार किलोमीटर लांबीचा रस्ता बनविण्यासाठी जमिनीचा एक पट्टा हवा होता. तो पट्टा पाकिस्तानला देण्यात यावा, पाकिस्तान त्यावर रस्ता बनवेल म्हणजे पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानामध्ये आवक-जावक सहजरीत्या होऊ शकेल या रस्त्याची मालकी देखील पाकिस्तानची समजली गेली पाहिजे!'* सरदार पटेलांनी जीनांचा हा कुटील डाव ओळखला आणि त्यांनी त्यावेळेला हा प्रस्ताव म्हणजे केवळ मूर्खपणा आहे. असं म्हणून फेटाळला होता. सरदार पटेल देशाच्या अखंडतेचा, एकतेचा अर्थ चांगल्याप्रकारे जाणत होते, समजत होते. देशाच्या अखंडतेत एक भेग पडावी. पाकिस्तानाप्रमाणेच भारताचेही दोन तुकडे पडावेत अशी  जीना यांची ती मनीषा होती, असा जो जीनांचा कयास होता तो सरदार पटेलांनी हाणून पाडला! शिवाय क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी तो फेटाळूनही लावला!

*चर्चिल यांचा तिसऱ्या राष्ट्राचाही प्रस्ताव होता*
देशात त्यावेळी ५६५ संस्थानिक होते त्यातील ५६२ संस्थानिकांनी भारतात विलीनीकरणासाठी सहमती दिली होती. राहिलेले तिघे कश्मीर, जुनागढ आणि हैदराबाद यांना सरदारांनी आपल्या पद्धतीने नाक दाबून भारतात येण्यास भाग पाडलं! सरदारांचा म्हणणं असं होतं की स्वातंत्र्यानंतर हे संस्थानिक भारतात विलीन झाले नाही तर तिथली प्रजा त्यांच्याविरोधात विद्रोह करील आणि सत्ता उलथवून टाकील. त्यामुळं पटेल निश्चिन्त होते. कोणताही संस्थानिक भारताची जोडला जाणार नाही याची चिंता सरदारांना वाटत नव्हती. पटेलांनी व्यक्त केल्याप्रमाणे परिस्थितीही तशीच निर्माण झाली. सरदार पटेल दररोज रात्री साडेनऊ ते दहा दरम्यान मेनन यांच्याशी फोनवरून संवाद साधत, दिवसभरात संस्थानिकांच्या विलिनीकरणाचं काम कुठवर आलं? त्याचं काय झालं? त्यांचं म्हणणं काय आहे हे जाणून घेत आणि त्यानंतरच ते झोपायला जात. हे सारे संस्थानिकांची संस्थानं भारतात विलीन करण्यासाठी जवळपास चाळीस दिवसाचा अवधी लागला. म्हणजेच जुलै, ऑगस्ट १९४७ पर्यंत सारे भारताशी जोडले गेले, त्यांचे विलीनीकरण झालं. याच वेळी ब्रिटिश पंतप्रधान चर्चिल यांनी असाही प्रस्ताव भारतासमोर मांडला होता की *भारत आणि पाकिस्तान याशिवाय या सर्व संस्थानिकांचे, राज्यांचे मिळून एक स्वतंत्र असे 'राजवीस्थान' निर्माण करून भारताचे तीन तुकडे करावेत* असा तो पर्याय संस्थानिकांना खुश करण्यासाठी दिला होता.

*पटेलांची जर्मनीचा निर्माता 'बिस्मार्क' यांच्याशी तुलना*
सरदार पटेलांची तुलना जर्मन प्रधानमंत्री ओटो वान बिस्मार्क यांच्याशी केली जाते. कारण त्यांनी १८४८ मध्ये विविध ३८ राज्ये एकत्रित करत जर्मन नावाचं राष्ट्र निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. १८१५ मध्ये जन्मलेल्या बिस्मार्क यांनी प्रशिया या नावाच्या देशाला जर्मनी हे नाव प्रदान केलं. राजा विल्यम प्रथम यांना १८६२ मध्ये प्रधानमंत्री बनवलं गेलं, त्या पदावर १८९० पर्यंत ते राहिले. त्यांच्या या सत्ताकाळात जर्मन भाषा बोलणाऱ्या छोट्या छोट्या राजांना एकत्र करून जर्मनी देश बनवला आणि हा देश आधुनिक प्रवाहात एक महत्त्वाची भूमिका बजावू लागला. त्यामुळे आधुनिक जर्मनीच्या निर्माण करणाऱ्यामध्ये यांची गणना होते. सरदार पटेल यांनी अशाच प्रकारे देशांतर्गत विविध संस्थानिकांना एकत्रित केलं. बिस्मार्क यांनी एकत्रित केलेल्या संस्थानांची संख्या केवळ ३८ होती तर सरदार पटेल यांनी त्याच्या पंधरा पट म्हणजे तब्बल ५६५ संस्थानिकांना भारताशी जोडून एक महत्त्वाची जबाबदारी पार पाडली!

*सरदार पटेल एक 'द पॉलिटिकल बॉस!'*
व्ही.पी.मेनन यांनी आपल्या पुस्तकात  लिहिलं आहे की, संस्थानिकांना सहजपणे भारताशी जोडलं जाणं, त्यातलं एक महत्वाचं कारण हे होतं की वल्लभभाईंचा या सर्व राजरजवाडेंशी, संस्थानिकांची असलेलं सुंदर नातं आणि त्यांच्याकडून काम करून घेण्याची त्यांची पद्धत! वयाच्या ७२व्या वर्षात आणि तब्येत साथ देत नसतानाही वल्लभभाई यांनी संस्थानिकांच्या या आडमुठ्या भूमिकेला तेवढ्याच तडफेनं, समर्थपणे आणि ताकतीनं उत्तर दिलं. ते करताना त्यांच्या प्रतिष्ठेला कुठं धक्का लागणार नाही, याची त्यांनी काळजी घेतली होती. त्यांनी प्रत्येक संस्थानिकांना योग्य असा सन्मान दिला, त्यांना योग्य तनखे दिले आणि योग्य असा सौदाही त्यांच्याशी केला होता! त्यांच्या या कामगिरीची दखल घेत *अमेरिकेच्या जगविख्यात आणि प्रतिष्ठित अशा टाईम नावाच्या मासिकांनं २७ जानेवारी १९४७ ला सरदार पटेल यांच्यावर एक कव्हर स्टोरी प्रकाशित केली होती त्यांनी कोणकोणत्या प्रसंगाला कसे सामोरे गेले आणि आपली तब्येत साथ देत नसतानाही भारताची सेवा कशी केली त्याचा हा वृत्तांत *पॉलिटिकल बॉस: द सरदार* या मथळ्यांखाली प्रसिद्ध केला होता. आज गुजरातच्या नर्मदा नदीच्या तीरावर जगातलं आश्चर्य म्हणावं असा एक पुतळा चार वर्षांत साकारला गेलाय. राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात ज्यांचं कार्य आभाळाएवढं आहे अशा सरदार वल्लभभाई पटेल याचा आकाशात झेंपावणारा पुतळा उभारण्यात आलाय. राष्ट्रनिर्मितीच्या कामात देशभर विखुरलेल्या पण अखंड भारताच्या निर्माणात अडचणीच्या ठरलेल्या संस्थानिकांना एकत्र आणण्याची महत्वाची कामगिरी वल्लभभाई पटेल यांनी केली. खऱ्या अर्थानं ते एक पोलिटिकल बॉस होते!.

*नेहरु-पटेल-संघ आणि काश्मीर!*

१७व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात भाजपेयीं सरकारनं कश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट आणखी सहा महिन्यांनी वाढवलीय. त्याबाबतचं विधेयक संसदेत चर्चेला आणलं तेव्हा गृहमंत्री अमित शहा, पूनम महाजन याशिवाय काश्मीरमधील उधमपुरचे खासदार आणि मंत्री जितेंद्र सिंग यांची जोरदार भाषणं झाली. काँग्रेसचे मनीष तिवारी, एमआयएमचे ओवेसी आणि नॅशनल कॉन्फरन्सचे खासदार मसुदी यांनी याला विरोध करत आपली मतं मांडली. काश्मीरचा खरा प्रश्न काय आहे आणि त्याच्या मुळाशी जाऊन प्रयत्न करावेत असा आजवर झाला नाही अशा निष्कर्षाप्रत सरकार आलेलं दिसलं. मात्र या निमित्तानं काश्मीरप्रश्नाला नेहरु, काँग्रेस पक्ष कसा जबाबदार होता यावर टीका करण्यात आली तर, सरदार पटेल प्रधानमंत्री बनले असते तर काश्मीरची ही अवस्था निर्माण झालीच नसती असं नेहमीच्या शैलीत शहांनी सांगितलं. पण त्याकाळी नेहरु-पटेल-संघ आणि काश्मीर यांचा परस्पर संबंध कसा आणि काय होता हे खरं तर सत्ताधाऱ्यांनी लक्षांत घ्यायला हवंय.

*विपरीत प्रतिमा बिंबविण्याचा प्रयत्न*
देशापुढील मूलभूत प्रश्न सोडविण्यापासून दूर गेल्यानं भावनात्मक मुद्द्यांना महत्त्व देण्याचा काळ आता सुरू झालाय. खरी माहिती दडवून, खोटी, विपरीत, विपर्यास्त आणि विसंगत माहिती लोकांच्या डोक्यात आणि मनात ठासून भरण्याचे हे दिवस! देशात भाजपेयींची सत्ता आल्यापासून वल्लभभाई पटेल यांचा उदो उदो आणि पंडित नेहरू यांची निंदानालस्ती केली जातेय. त्यांच्यातील संबंधाबाबत अनेक उलटसुलट गोष्टी सांगितल्या जाताहेत. पटेलांची उभी केलेली उंच प्रतिमा न्याहाळतानाच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा धांडोळा घेण्याची नैतिक जबाबदारी देखील आपली आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा, त्यांच्या धोरणांचा, निर्णयांचा तसंच त्यांच्या इतरांशी असलेल्या संबंधाबाबत विपरीत प्रसार-प्रचार व गॉसिप करण्याचा अधिकार कुणालाही असू शकत नाही. महात्मा गांधीजींच्या हत्येपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत सरदार पटेलांचं मत सकारात्मक होतं पण त्यानंतर मात्र अत्यंत प्रतिकूल बनलं. थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याचा निर्णय त्यांनी गृहमंत्री म्हणून घेतला. स्वातंत्र्योत्तर काळात सरदार पटेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पंडित नेहरू यांच्यातील परस्पर संबंध कसे होते हे पाहिलं तर लक्षात येईल की, आज पटेल संघ स्थानावर प्रातःस्मरणीय असतीलही पण त्यावेळी ते कट्टर शत्रू होते!

*प्रारंभी संघाचे सहानुभूतीदार नंतर विरोधक*
देशात सत्तेवर आलेल्या भाजपेयींनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या स्वयंसेवकांनी पंडित जवाहरलाल नेहरूंची बदनामी करण्याचा जणू विडाच उचललाय. ही गोबेल्सनीती एकाबाजूला सुरू असतानाच सरदार पटेल यांची तोंड फुटेपर्यंत स्तुती करताना ते थकत नाहीत. त्याबद्धल सर्वप्रथम पाहू यात. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर म्हणजे महात्मा गांधी यांची हत्या होण्यापूर्वी १९४८ मध्ये सरदार पटेल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत म्हटलं होतं, की *" तुम्ही तुमच्याकडे असलेल्या लाठी-काठीनं कोणत्याही संघटनेला दाबून टाकू शकत नाही, लाठी-काठी तर चोर, डाकू वापरत असतात. ते दुष्कर्म करण्यासाठी त्यागोष्टी उपयोगात आणत असतात. मात्र संघ तर देशभक्ती करणारी संघटना आहे!"* या सरदार पटेलांच्या मतप्रदर्शनानंतर ३० जानेवारी १९४८ ला नथुराम गोडसेनं गांधीजींची हत्या केली त्यानंतर सरदार पटेलांच्या संघाबाबतच्या असलेल्या भूमिकेत, त्याबाबतच्या त्यांच्या विचारांमध्ये आमूलाग्र असा बदल झाला. हे इथं नमूद करायला हवंय!

*सरदार पटेल यांचं नेहरूंना संघाबाबत पत्र*
सरदार पटेलांनी २७ फेब्रुवारी १९४८ ला पंडित नेहरूंना एक पत्र लिहिलं त्यात ते म्हणतात, *" गांधीजींच्या हत्येत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहभाग दिसून येत नाही. मात्र हे काम हिंदू महासभेच्या कट्टरपंथी कार्यकर्त्यांनी केलेलं आढळतं आहे. हे कट्टरपंथी सावरकरांच्या नेतृत्वाखाली काम करतात. या कट्टरपंथीयांनीच हत्येचं षडयंत्र रचलेलं आहे. हे लोक गांधीजींच्या विचारधारेला आणि गांधीजींना सतत विरोध करत. या कट्टरपंथीशिवाय इतर हिंदू महासभा आणि संघाच्या स्वयंसेवकांवर हत्येबाबत संशय घेता येईल अशी परिस्थिती नाही"* नेहरूंच्या या पत्रव्यवहारातून पटेलांची संघाबाबतची भूमिका, हिंदू महासभाबाबतचं मतं व्यक्त होतं.

*संघानं देशात विद्वेषाचं वातावरण निर्माण केलं*
जसा जसा काळ गेला तस तसा सरदारांच्या लक्षांत आलं की, गांधीजींच्या हत्येत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जरी थेट हात नसला तरी, त्यांनी देशभरात जे हिंदू-मुस्लिम विरोधातलं आणि सांप्रदायिक विद्वेषाचं वातावरण निर्माण केलं आहे. त्यातूनच गांधीजींची ही हत्या झालीय असं त्यांचं मत बनलं. त्यानंतर गृहमंत्री म्हणून *सरदार पटेलांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली. दीड वर्षाच्या कालावधीनंतर ती उठविण्यात आली असली तरी संघ आणि हिंदू महासभा यांना राजकीय घडामोडीत सहभाग घेता येणार नाही, असं स्पष्टपणे नमूद केलं आणि बंधनं टाकली.*

*सरकारला आणि भारताच्या अस्तित्वालाच धोका*
१८ जुलै १९४८ रोजी सरदार पटेलांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना पत्र लिहिलं, *"गांधीजींच्या हत्येबाबतचा खटला हा अद्याप न्यायालयात सुरू आहे. त्यामुळं संघ आणि हिंदू महासभा यांच्याबाबत आताच मी काही सांगणार नाही, कोणतंही मतप्रदर्शन करणार नाही. परंतु आमच्याकडे प्राप्त झालेल्या रिपोर्ट्सनुसार, महात्मा गांधीजींच्या हत्येची जी काही घटना घडली आहे ती या दोन्ही संघटनांनी चालवलेल्या विद्वेषमुलक हालचालींनी आणि निर्माण केलेल्या विपरीत परिस्थितीमुळेच! खासकरून संघाच्या करणीचा हा परिणाम आहे. देशात असं काही वातावरण निर्माण करण्यात आलं की, अशा प्रकारची म्हणजेच गांधीजींच्या हत्येसारखी भयानक घटना घडावी. माझ्या मनांत शंका नाही की, हिंदू महासभेचा कट्टरपंथी गट गांधीजींच्या हत्येच्या कटात सामील होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चालवलेल्या हालचालींनी, प्रचारांनी भारत सरकार आणि देशाच्या अस्तित्वाला देखील धोका निर्माण झालाय!"* श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याशी झालेला पत्रव्यवहार हा संघाबाबतचा पटेलांचा दृष्टिकोन स्पष्ट करणारा आहे.

*गांधीजींबाबत विखारी प्रचार केला होता*
निवडणुकीच्या काळात रामजन्मभूमीच्या नावानं उठता बसता भजन करणारे भाजपेयीं आजकाल स्वार्थासाठी गांधी-गांधी असं जप करत असतात. गांधीजींचं नाव घेताहेत. पण प्रत्यक्षात त्यांची पैतृक संस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं मात्र गांधीविरोधी जी भूमिका घेतली आणि गांधीजींबाबत जो विखारी प्रचार केला, त्यामुळं ती एक विषारी संघटना बनली आहे. असं म्हटलं जातं! गांधीजींची हत्या झाली तेव्हा संघानं मिठाई वाटली होती, असं त्यावेळी निष्पन्न झालं होतं. डॉ. केशवराव हेडगेवार यांच्यानंतर माधवराव गोळवलकर हे सरसंघचालक होते. १९४० ते १९७३ पर्यंत त्यांनी संघाचं नेतृत्व केलं होतं. ११ सप्टेंबर १९४८ रोजी सरदारांनी त्यांना एक पत्र लिहिलं होतं.

*सरसंघचालक गुरुजींना सरदार पटेलांचं पत्र*
*"भाईश्री गोळवलकर,*
*११ ऑगस्ट रोजी तुम्ही पाठवलेलं पत्र मिळालं, जवाहरलालजींनीही तुमचं पत्र माझ्याकडं पाठवलंय. तुम्ही आरएसएसबाबतची माझी असलेली मतं जाणता. लोकांनाही माझी ही मतं माहिती आहेत. मला आशा होती की, तुमचे लोकही या माझ्या मताचा स्वीकार करतील. पण मला असं वाटतंय की, माझ्या या भूमिकेचा आरएसएसवर कोणताच परिणाम झालेला दिसत नाही. त्यांच्या कार्यक्रमातही कोणत्याही प्रकारचं परिवर्तन झालेलं नाही. याबाबत माझ्या मनात कोणताही संदेह नाही की, संघानं स्वातंत्र्यानंतर निर्माण झालेल्या देशांतर्गत परिस्थितीत हिंदू धर्माची सेवा केलीय. अशा भागात जिथं लोकांना मदतीची गरज होती. याशिवाय अशाप्रकारच्या संघटनेची जिथं गरज होती की, तिथं संघाच्या तरुणांनी महिलांचं आणि लहान मुलांचं रक्षण केलंय, मदत केलीय. मीच काय पण कोणीही समजूतदार माणसं याबाबत शंका घेणार नाही. प्रश्न त्यावेळी निर्माण झाला जेव्हा बदला घेण्याच्या भावनेनं मुसलमानांवर हल्ले केले गेले. हिंदूंना संघटित करणं आणि त्यांना मदत करणं ही गोष्ट अलाहिदा पण प्राप्त परिस्थितीत हिंदूंना जो त्रास झाला त्याचा बदला निर्दोष मुस्लिम महिला आणि मुलांवर घेतला जाणं ही वेगळी गोष्ट आहे!"* या पत्रावरून सरदार पटेलांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत बदललेली भूमिका स्पष्ट होते.

*भावी पिढी आपल्याला माफ करणार नाही*
सरदार वल्लभभाई पटेल आणि जवाहरलाल नेहरू यांच्यात मतभेद होते पण त्याचा अर्थ असा नाही की, ते एकमेकांच्या विरोधात होते. मतभेद कुणामध्ये नसतात? दोन सख्या भावाभावात किंवा मित्रांमध्ये देखील असतात. एकाच पक्षातील दोन नेत्यांमध्ये मतभेद असणं हे सशक्त लोकशाहीचं सौंदर्य म्हणायला हवं, ते जिवंत लोकशाहीचं लक्षण म्हटलं पाहिजे. आजकाल असं चित्र रंगविण्यात येतंय की, सरदार पटेल हे नेहरूंच्या विरोधात होते. इतिहासाला अशाप्रकारे तोडूनमोडून विपरितपणे भविष्य बदलण्याचा, भावी पिढीसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला तर भावी पिढीच काय वर्तमान देखील आपल्याला कधीच माफ करणार नाही! हे मात्र निश्चित!

*नेहरूंकडून पटेल यांची वाखाणणी*
जून १९४६ मध्ये जवाहरलाल नेहरू हे कारागृहात असलेल्या शेख अब्दुल्ला यांना भेटून न्यायालयात त्यांची केस लढविण्यासाठी निघाले होते. परंतु तत्कालीन काश्मीरचे प्रधानमंत्री रामचंद्र काक यांनी नेहरु यांना ते श्रीनगर पोहोचण्यापूर्वीच त्यांची धरपकड केली होती. त्यावेळी याबाबत कुणीतरी सरदार पटेल यांना विचारलं, "सरदारसाहेब, काक यांचं काय? त्यांनी नेहरूंना अटक केलीय!" त्यावर सरदार पटेलांनी संताप व्यक्त केला, ते म्हणाले, "काक तो हमेशा खाकमें मिल जायेगा!" यावरून सरदारांच्या नेहरूंबाबतची भूमिका आणि त्यांची मानसिकता स्पष्ट होते. भगतसिंगांना फाशी दिल्यानंतर कराची इथे संपन्न झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे अध्यक्षपद सरदार पटेलांनी भूषविलं होतं, त्या अधिवेशनात नेहरूंनी आपल्या भाषणातून सरदार पटेल यांची जाहीरपणे वाखाणणी केली होती, गौरव केला होता. याविषयी नेहरूंनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलं आहे की या *"अधिवेशनात अध्यक्षस्थानी असलेले सरदार वल्लभभाई पटेल हे हिंदुस्थानात लोकप्रिय असलेले एक जबरदस्त, भारदस्त असे व्यक्तिमत्व होते त्यांनी गुजरात मध्ये झालेल्या बारडोली सत्याग्रहाच्या वेळी शेतकऱ्यांचे यशस्वी नेतृत्व करून सुकिर्ती, ख्याती प्राप्त केली होती"* यावरून नेहरू आणि पटेल यांचे परस्पर संबंध लक्षांत येईल.

*पटेल हे गांधीजींचे पट्टशिष्यच नव्हे तर भक्तही*
१८३० मध्ये गोलमेज परिषद भरली असताना ग्लोन वॉल्टन नामक एका इंग्रज पत्रकारानं  *'द ट्रेजडी ऑफ गांधी'* या आपल्या पुस्तकात लिहिलं आहे की 'मुलतान नावाच्या एका जहाजात जे भारतीय नेते बसले होते, त्यांच्यात एक चर्चा सुरू होती. ती त्यांची सारी चर्चा ही गांधीजींच्या विरोधात होती. त्यांना हे माहीत होतं की गांधीजी विरुद्ध काँग्रेसची वर्किंग कमिटीतील अनेकजण आहे आणि त्यांनी एक षडयंत्र रचलं आहे. त्यांना हेही माहीत होतं की, ती वेळ येताच  काँग्रेस वर्किंग कमिटीतील काही मंडळी गांधीजींना काँग्रेसमधून उखडून फेकून देतील, याशिवाय काँग्रेस वर्किंग कमिटी ही गांधींबरोबरच त्यांच्या जवळच्या लोकांना देखील काढून टाकील!' या बातमीने त्यावेळी खळबळ उडाली होती. नेहरूंनी या अशा बातम्यांना 'हवेत केलेला गोळीबार' असं म्हणत फेटाळून लावलं हे षडयंत्र रचणारे कोण आहे त्याचा हेतू काय आहे? असा सवालही केला होता. त्याचवेळी असं सांगण्यात आलं होतं की काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्यांमध्ये मी आणि सभापती सरदार वल्लभभाई पटेल हे दोघे अत्यंत तापट स्वभावाचे आहेत यावरून या षडयंत्र रचणाऱ्यांमध्ये आमचंही नाव घेतले जाईल! खरं तर सरदार वल्लभभाई पटेल हे गांधीजींचे पट्टशिष्यच नव्हे तर भक्त म्हणूनही ओळखले जातात. त्यांच्याशिवाय दुसरा कोणी असा त्यांचा भक्त वा शिष्य असेल असं मला वाटत नाही. ते स्वतः कडक शिस्तीचे आणि मजबूत विचाराने काम करणारे होते, त्यांचं राजकारणच नव्हे तर जीवन देखील मूल्याधिष्ठित होते. पण गांधीजींचा विचार, त्यांचा आदर्श, त्यांची नीती, त्यांचे व्यक्तिमत्त्व याच्याविषयी पटेलांना खूपच आदर, श्रद्धा आणि भक्ती होती. पण मी असा दावा करत नाही की, गांधीजींना मी त्यांच्या आदर्शासह स्वीकारलेलं आहे. पण त्यांच्या अत्यंत जवळ राहण्याचं भाग्य मला प्राप्त झालेलं आहे. त्यांच्याविरुद्ध षडयंत्र निर्माण करण्याचा विचार देखील माझ्या मनात येऊ शकत नाही. असं असेल तर, तो माझा पराभव असेल आणि गांधीजींच्या संस्कारांचाही पराभव असेल!

*जागतिक घडामोडीतील वास्तव गांधीजींनी ओळखले*
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि देशाच्या स्वातंत्र्य निर्मितीत सरदार पटेल आणि नेहरू यांची भूमिका आणि कार्यकर्तृत्व एकसमान होतं. दोघे एकमेकांचे प्रतिस्पर्धी नव्हते तर ते एकमेकांना पूरक असेच होते. नेहरू हे गांधींचे आदर्श विचार राबविणारे होते तसेच, जागतिक घडामोडीबाबत राष्ट्रीय दृष्टिकोन असलेले जे काही लोक होते त्यात नेहरूंचा समावेश होता. तर सरदार पटेल हे काँग्रेस पक्षाची संघटना आणि देशांतर्गत व्यवस्था चालविणारे कर्मयोगी होते. पंडित जवाहरलाल नेहरू यांना आपला वारसदार नेमताना महात्मा गांधींनी अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेतला होता. गांधीजींनी सरदार पटेलांना वारसदार म्हणून नाकारण्याचं प्रमुख कारण होतं ते म्हणजे पटेलांचं वय झालेलं होतं. त्यांना देशाची जबाबदारी झेपणारी नव्हती. दुसरं महत्त्वाचं कारण असं होतं की दुसऱ्या महायुद्धानंतर कठीण बनलेल्या वैश्विक परिस्थितीत भारतात स्वतःचं वेगळं असं स्थान निर्माण करायचं होतं. त्यासाठी जागतिक दृष्टिकोन असल्याची जी गरज होती, ती नेहरूंकडे होती. इंग्रजांनी जेव्हा देशात कारभार करण्यासाठी जे कामचलाऊ सरकार बनवलं त्यात सरदार पटेल यांच्याकडं गृह खातं सोपविण्यात आलं होतं, आणि नेहरू यांच्याकडं विदेशमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळं सरदार पटेल आणि पंडित नेहरू यांची एकमेकांशी तुलना करताच येणार नाही कारण दोघांनी त्यावेळी आपापली भूमिका यशस्वीपणे, मजबुतपणे पार पाडली होती. या घटनांना दुसरीही बाजू आहे तीही समजावून घेतली पाहिजे.

*नेहरूंमुळेच काश्मीर भारतात*
सरदार पटेलांची राजकीय उंची वाढवण्याच्या नादात, पं. नेहरुंचं खच्चीकरण करण्याचे उद्योग सध्या भाजपेयींकडून सुरू आहेत. परंतु नेहरुंच्या तुलनेत सरदार पटेल यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीला मर्यादा होत्या. पटेलांबरोबरच नेहरूही उभे असल्यामुळं आणि नेहरूंच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची मोहिनी सर्वच भारतीयांवर असल्यामुळं त्यांचं खच्चीकरण केल्याशिवाय पटेलांचं उदात्तीकरण शक्य नाही, याची जाणीव असल्यामुळंच की काय नेहरूंना बदनाम करण्याचं आणि त्यांचं व्यक्तिमत्व सरदार पटेलांच्या तुलनेत खुजं असल्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न समान पातळीवर सातत्यानं सुरू आहेत. नेहरूंच्याऐवजी पटेल स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले असते तर देशाचं कल्याण झाले असतं इथपासून ते नथुराम गोडसेनं गांधीजींऐवजी नेहरूंना टार्गेट करावयास हवं होतं, इथपर्यंत पटेलांच्या हिंदुत्ववादी अनुयायांची मजल गेलीय. पण स्वातंत्र्य संग्रामाच्या, विशेषतः १९४६-४७ या शेवटच्या टप्प्यातील घटनांचा मागोवा घेतला तर पटेलांच्या उदात्तीकरणाचं नि नेहरूंच्या खच्चीकरणाचा प्रयत्न वस्तुदर्शी पुराव्यावर आधारित नसून पटेलांविषयीच्या विशिष्ट पूर्वग्रहातून होत असल्याचं स्पष्ट होतं. कारण नेहरूंच्या तुलनेत सरदार पटेलांच्या काही मर्यादा होत्या, हे सरदार पटेलांच्या हिंदुत्ववादी अनुयायांनी विचारात घेतलेलं नाही. सरदार पटेल एक राजकीय मुत्सद्दी आणि नेते म्हणून कुठे कमी पडत होते हे कळू शकेल.

*गुरुदासपूर जिल्ह्याचं विभाजन केलं गेलं*
या संदर्भात लॉर्ड माऊंटबॅटन यांचं एक निरीक्षण विचारात घेण्यासारखं आहे. कॅबिनेट मिशनची योजना जेव्हा प्रथम मुस्लिम लीगकडून आणि नंतर काँग्रेसकडून फेटाळली गेली, तेव्हाच फाळणी अपरिहार्य झाली होती. त्यामुळं त्यापुढच्या राजकारणाच्या दृष्टीनं काँग्रेस पक्षांतर्गत जी व्यवस्था निर्माण करण्यात आली होती त्यात संस्थानांचं खातं नेहरूंकडं सोपविण्यात आलं होतं. पण पुढं जुलै ४६ मध्ये जेव्हा अंतरिम सरकार स्थापन करण्यात आलं त्यावेळेस नेहरू पंतप्रधान, लियाकत अली अर्थमंत्री आणि सरदार पटेल गृहमंत्री, असं खातेवाटप झालं होतं. गृहमंत्री म्हणून संस्थानांचा विषय साहजिकच सरदार पटेलांच्या अखत्यारित आला होता. या घटनेवरील लॉर्ड माऊंटबॅटन यांची प्रतिक्रिया अतिशय बोलकी आहे. संस्थानिकांच्या बाबतीत माऊंटबॅटन यांना हवं असलेले अनेक निर्णय नेहरूंच्या गळी उतरविणं त्यांना शक्य झालं नव्हतं. त्यामानानं सरदार पटेलांना आपले निर्णय मान्य करण्यास लावणं सोपं होतं. म्हणून संस्थानांचं खातं सरदार पटेलांकडं सोपविण्यात आल्याचं कळलं, तेव्हा त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. माऊंटबॅटन यांनी असं म्हटलं आहे की, I am glad to say that Nehru had not been put in charge of the new States Dept. (Mission with Mountbatten, London 1951). याच काळात घडलेल्या एका घटनेवरून नेहरू काश्मीरबाबत किती दूरचा विचार करत होते, याची कल्पना येऊ शकेल. फाळणीपूर्वी भारतातून काश्मीरला जाणारे दोन मार्ग होते. एक लाहोर, रावळपिंडी आणि मुरी मार्गे मुझफ्फराबाद, श्रीनगर इथं जाणारा. तर दुसरा सियालकोट, जम्मू आणि बनिहाल खिंडी मार्गे काश्मिरात जाणारा. फाळणीनंतर हे दोन्ही मार्ग भारताला कायमचे बंद होणार होते, कारण लाहोर आणि सियालकोट ही शहरं पाकिस्तानात जाणार हे निश्चित होतं. गुरुदासपुर जिल्ह्यातून जाणारा एक कच्चा रस्ताही होता. परंतु गुरुदासपुर जिल्हा जर पाकिस्तानला देण्यात आला असता, तर काश्मीरशी भारताचा संबंध राहिलाच नसता आणि काश्मीरच्या मदतीला लष्कर पाठविणं भारताला शक्य झालं नसतं. पाकिस्तानी नेत्यांना याची जाणीव होती. म्हणूनच गुरुदासपुर जिल्हा पाकिस्तानात यावा याविषयी पाकिस्तानी नेते आग्रही होते, असे H. V. Hudson यांच्या Great Devide : Britain India, Pakistan, या ग्रंथातील उल्लेखावरून दिसून येतं. याबाबतीत परिस्थितीजन्य पुराव्यावरून असं दिसून येतं की सर्व कसब पणाला लावून नेहरूंनी माऊंटबॅटनवर प्रभाव टाकला नि भारत-पाकिस्तानमधील सीमेची आखणी करताना रावी नदीच्या काठाला आधार धरून गुरुदासपुर जिल्ह्याची फाळणी करण्यात आली. हा रस्ता भारताच्या कब्जात राहणं किती महत्त्वाचं होतं हे काही दिवसातच स्पष्ट झालं.

*इथं दिसते नेहरूंची दूरदृष्टी!*
भारत-पाकिस्तानमधील सीमारेषा निश्चित करण्याची जबाबदारी सर सिरील रेडक्लिफच्या The Boundry Commission कडं सोपविण्यात आली होती. सर रेडक्लिफ यांनी याबाबतचा आपला अहवाल व्हॉइसरॉय माऊंटबॅटन यांना १३ ऑगस्टला दुपारी सादर केला. १४ ऑगस्टला पाकिस्तानच्या उद्घाटनाला माऊंटबॅटन यांना जायचं होतं. त्या घाईगर्दीत ते होते. १५ ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्यदिन होता. साहजिकच Boundry Commission चा रिपोर्ट सर्व संबंधित पक्षांना १६ ऑगस्ट रोजी संध्याकाळी दाखविण्यात आला. तेव्हाच गुरुदासपुर जिल्ह्याची ‌फाळणी होऊन तेथून काश्मीरला जाणारा रस्ता भारताच्या हद्दीत गेल्याचं पाकिस्तानी नेत्यांना कळलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. नेहरूंची मुत्सद्देगिरी आणि दूरदृष्टी दिसते ती इथे!

*वास्तवाची जाणीव ठेऊनच मूल्यमापन करावं*
१५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर संस्थानांचा प्रश्न निकालात काढणं हा महत्त्वाचा आणि अग्रक्रमाचा विषय होता. पण बहुसंख्य संस्थानिकांनी कुरबुर न करता सामिलीकरणाच्या दस्तऐवजांवर सह्या केल्या. त्रावणकोर, जुनागढ, हैदराबाद, काश्मीर, जोधपूर अशा काही संस्थानांचा अपवाद करावा लागेल. त्यापैकी काश्मीर वगळता इतर साऱ्यांनी शेवटी नांग्या टाकल्याच. हैदराबादच्या बाबतीतही पोलिस अॅक्शन घेऊन का होईना पण तो प्रश्नही निकालात काढण्यात आला प्रत्यक्षात ही लष्करी कारवाई होती. हा हा सगळा इतिहास, व्ही. पी. मेनन यांच्या The Story of The Integration of The Indian State या ग्रंथात तपशिलानं आलाय. या सर्व कारवाईत सरदार पटेल यांचं योगदान अतिशय मोलाचं होतं. पण ते नसतं किंवा त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली नसती तर ही संस्थानं भारतात कधीच विलीन झाली नसती, असं म्हणत नेहरूंना बदनाम करणं म्हणजे लोकशाही शासनव्यवस्थेतील मंत्रिमंडळाच्या सामुदायिक जबाबदारी विषयीची अनभिज्ञता दाखवणं होय. तरीही पटेलांच्या राजकीय मुत्सद्देगिरीच्या मर्यादा आणि नेहरूंच्या दूरदृष्टीचा एक पुरावा मात्र इथे द्यावासा वाटतो. काश्मीरमधील परिस्थिती बिघडत चालली होती. काश्मीरचे राजे महाराज हरीसिंग यांना परिस्थितीची जाणीव तरीही होत नव्हती. किंवा ते त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत होते. अशा परिस्थितीत नेहरूंनी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना दि. २७ सप्टेंबर १९४७ रोजी म्हणजेच कश्मीरवर पाकिस्तानचं आक्रमण होण्याच्या तीन आठवडे अगोदर एक पत्र लिहून पाकिस्तानच्या आक्रमणाची कल्पना दिली होती. या पत्रात नेहरूंनी लिहिलं होतं 'मला मिळालेल्या माहितीवरून काश्मीरमधील परिस्थिती दिवसेंदिवस धोकादायक होत चालली आहे. पंजाबमधील आणि वायव्य सरहद्द प्रांतातील मुस्लिम लीग मोठ्या संख्येनं आक्रमण करण्याच्या तयारीत आहेत. या प्रकरणी तुम्ही परिस्थितीला योग्य वळण लावण्याच्या दृष्टीनं काही तातडीची कार्यवाही कराल अशी मी आशा करतो.' (Kashmir Behind the Vale, pg. 104) नेहरूंचं पत्र बरंच दीर्घ आहे. पण त्यात वरील दोन मुद्दे सर्वात महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे पाकिस्तान काश्मीरवर आक्रमण करण्याच्या विचारात आहे आणि दुसरं म्हणजे या धोकादायक परिस्थिती योग्य रीतीनं हाताळण्यासाठी तुम्ही कार्यवाही करावी. याच पत्रात नेहरूंनी कारवाईसंदर्भात सरदार पटेलांना दोन सूचना केल्या होत्या. एक म्हणजे महाराज हरीसिंग यांच्यावर दबाव टाकून शेख अब्दुल्ला यांची त्यांच्या कैदेतून मुक्तता करणं ‌आणि दुसरी म्हणजे तसाच दबाव टाकून महाराज हरीसिंगांना सामिलनाम्याच्या दस्तऐवजावर सही करण्यास भाग पाडणं. सरदार पटेलांनी यापैकी पहिली सूचना स्वीकारून शेख अब्दुल्लांची कैदेतून मुक्तता करून घेतली. मात्र दुसऱ्या सूचनेबाबत त्यांनी काहीच हालचाल केली नाही. यामागं त्यांची अशी एक मनोभूमिका होती. त्यांना असं वाटत होतं की, भारताची फाळणी धार्मिक सिद्धांतानुसार झालीय. तेव्हा नव्वद टक्क्यांहून अधिक लोकसंख्या मुस्लिमांची असलेलं कश्मीर पाकिस्तानात विलीन होणं, हीच नैसर्गिक परिणती होऊ शकते. परंतु नेहरू हे त्या पलीकडे जाऊन या विषयाकडं पाहत होते. फाळणी कुठल्याही सिद्धांताप्रमाणे झालेली असो पण कश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सचे नेते शेख अब्दुल्ला म्हणजेच पर्यायानं काश्मिरी जनता भारतात विलीन होण्यास तयार असताना आपण त्यांच्या निर्णयाचा आणि भावनेचा आदर केला पाहिजे. शिवाय मुस्लिम बहुसंख्य असलेल्या या संस्थानातील जनता फार मोठ्या प्रमाणात भारतात विलीन होण्याचा निर्णय घेते, हा नेहरूंना भारतातील सर्वसमावेशक उदारमतवादी सेक्युलर राजकीय व्यवस्थेचा विजय वाटत होता. नेहरूंची ही भूमिका सरदार पटेलांना कधीच उमगली नाही. ती तशी उमगली असती तर पटेलांनी महाराज हरीसिंगांना सामिलनाम्याच्या करारावर सही करण्यास भाग पाडले असते. तसे झाले असतं तर आज कश्मीरचा प्रश्न अस्तित्वात राहिलाच नसता. सरदार पटेलांची हीच मर्यादा होती. सरदार पटेलांचे उदात्तीकरण कुणाला करायचे असेल तर त्यांनी ते अवश्य करावं. पण ते करताना वरील वास्तवाची जाण ठेवावी,

चौकट:१...
*पटेल हे माझे थोरले बंधू : नेहरू*
महात्मा गांधी यांच्यासोबत त्यांच्या आश्रमात राहणारे हरीभाई उपाध्याय हे पंडित नेहरू आणि सरदार पटेल या दोघांच्याही निकटवर्ती होते त्यांनी पटेल आणि नेहरूंच्या परस्पर संबंधाबाबत आपल्या *'सरदार पटेल अँड कॉन्ट्रास्ट नेहरू'* या पुस्तकात लिहिलं आहे की, 'पंडित नेहरू आणि सरदार पटेल यांचे विचार स्वतंत्र होते, वेगळे होते. दोघांची कार्यशैली भिन्न होती, कामाची पद्धत देखील वेगळी होती. कामचलाऊ सरकारमध्ये सरदार पटेलांनी पंडित नेहरूंना आपले नेते मानायला सुरुवात केली होती. नेतृत्व मान्य केलं होतं. तर दुसर्‍या बाजूला नेहरू देखील सरदार पटेल यांचा आदर करीत होते, सन्मान करीत होते. या दोघांमध्ये मतभेद आणि गैरसमज आहेत असं लोकांना वाटत होतं. काही लोकांना त्यांच्यातील मतभेद, गैरसमज वाढावेत असं वाटत होतं. परंतु सरदार यांनी कधीच अशा गोष्टीना थारा दिला नाही. प्रसिद्ध होणाऱ्या अशाप्रकारच्या बातम्यांना महत्त्व दिलं नव्हतं. दोघांची राजकारणाबाबत आपली विशिष्ट अशी मतं होती, त्यानुसारच ते दोघे काम करीत असल्यानं तिसऱ्या कोणी त्यांच्या पद्धतीबद्दल आलोचना करायला लागला तर दोघेही त्याच्यावर रागवत, फैलावर घेत. दोघे एकमेकांसाठी ढाल म्हणून त्याकाळी काम करत होते. एकमेकांना सांभाळून घेत होते. जेव्हा सरदार मृत्युशय्येवर होते तेव्हा त्यांनी आपल्या एका जवळच्या मित्राला बोलावून सांगितलं होतं की 'नेहरूंवर लक्ष असू दे, त्यांना जपा!' एकदा नेहरूंना एक विशेष व्यक्ती म्हणाली की सरदार पटेलांनी तुमच्याविषयी कडक भाषेत टीकाटिप्पणी केली. तेव्हा नेहरूंनी त्या माणसाला बजावलं की, काही झालं ते तर मला माझ्या थोरल्या भावासारखे आहेत आणि माझ्यावर टीका करण्याचा, बोलण्याचा त्यांचा अधिकार आहे खरंतर ते आपल्या सगळ्यांचे कस्टोडीयन आहेत..!'

चौकट:२....
*पटेलांना नेहरूंबाबत आकस नव्हता*
सरदार पटेलांना नेहरूंप्रती कोणताही आकस व त्याबाबतची कटुता नव्हती. नॅशनल बुक ट्रस्टने सरदार पटेल यांनी लिहिलेल्या पत्रांचं संकलन करून एक पुस्तक प्रसिध्द केलंय. सरदार पटेलांचं एक पत्र पंडित जियालाल कौल जलाटी (असिस्टंट जनरल जम्मू काश्मीर, १९ जून१९४६) यांना उद्देशून लिहिलंय, *"राजकीय आंदोलनांना धार्मिक-जातीय प्रश्नांपासून दूर राखायला हवंय. मी मानतो की, नेहरू स्वतः शांतीचा संदेश घेऊन  व्यक्तिगतरीत्या काही समजुती घडविण्यासाठी काश्मीरला येताहेत. नेहरू हे हिंदूतर आहेतच पण स्वतः काश्मिरी पंडितही आहेत. ते एक कडवे देशभक्त आहेत, आधुनिक भारताचे महान नेते आहेत. असं असलं तरी ते एक माणूस आहेत त्यांच्याकडूनही काही चूक होऊ शकते. माणुसकीच्या दृष्टीनेही नेहरू उच्च कोटीचे आहेत. त्यांनी आजवर जी कामं केली, निर्णय घेतले त्यात देशासाठीची उत्कृष्ट समर्पण भावनाच दिसून येते. आपण आशा करू या की, काश्मीरचा तोडगा लवकर निघेल. आपण कुणाच्याहीप्रती कटुता ठेऊ नये."*  नेहरूंनी ८ ऑक्टोबर १९४७ रोजी सरदार पटेलांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केलं की, *"मला वाटतं की, काश्मीर समस्या सोडविण्यासाठी कोणतीही कसर आपण ठेवलेली नाही. काश्मीर प्रश्न सोडविण्याबाबत जे धोरण, जी नीती अवलंबिली आहे, त्याबाबत आपल्यात मतभेद असतील पण त्याची मला काही माहिती नाही. असं असलं तरी अनेक जणांना असं वाटतं की आपल्यात मतभेद आहेत. त्यामुळे आपल्यातील संबंध आणि आजूबाजूच्या लोकांच्या सदभावना यात दुर्दैवानं याला धक्का लागलाय. मला या गोष्टीचंही खूप दुःख झालं आहे."*
दुर्दैवाने स्वातंत्र्य लढ्यातील महानायकांना समोरासमोर भिडवून आपण खरंतर त्यांच्या समर्थकांचे गट निर्माण करतोय आणि त्याबरोबरच या दोन महानायकांचं कार्यकर्तृत्व कलंकित करतो आहोत. त्यांच्या त्यागावर शिंतोडे उडवीत आहोत.याची जाणीवच राहिली नाही.त्याबाबतचे ऐतिहासिक संदर्भ देतानाही इतिहासकार आणि राजकीय विश्लेषक आपापल्या बुद्धीनं, इराद्यानं आणि राजकीय हेतूनं अर्थ लावताहेत. भाजप आणि काँग्रेसचे नेतेमंडळी आपापल्या बौद्धिक उंचीप्रमाणे ग्रंथालये, जुने दस्तऐवज यांचा धांडोळा घेतील.

चौकट: ३.....
*सरदार प्रधानमंत्री असते तर काश्मीर पाकिस्तानात असता*
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा सरदार पटेल यांना प्रकाशात आणण्याचं काम सुरू केलंय. पटेलांची काश्मीरबद्दलची भूमिका ते आग्रहाने मांडत आहेत. पण जुनेजाणते वरिष्ठ पत्रकार स्व.कुलदीप नय्यर यांनी त्यांच्या आत्मचरित्रात  सरदार पटेल यांच्या संदर्भात काही खुलासे केलेले आहेत. त्यात प्रामुख्याने सरदार पटेल हे काश्मीरला पाकिस्तानाला देण्याच्या बाजूनं होते. असं स्पष्टपणे म्हटलं आहे. नय्यर हे स्वातंत्र्यलढ्यापासून स्वातंत्र्योत्तर काळापर्यंत पत्रकार म्हणून कार्यरत होते. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मोहम्मद अली जीना, यांचा कार्यकाळ त्यांनी अत्यंत जवळून पाहिलाय.  कुलदीप नय्यर यांनी लिहिलं आहे की, तत्कालीन व्हाईसरॉय माउंटबॅटन यांच्याशी त्यांच्या एका मुलाखती दरम्यान त्यांनी स्पष्ट केलं होतं की, सरदार पटेल काश्मीर पाकला देण्यासंदर्भात राजी होते. माऊंटबॅटन पुढे म्हणतात की, पाकिस्ताननं काश्मीरमध्ये सतत सैन्य पाठवून तिथली परिस्थिती बिघडवली. नेहरू हे काश्मीरमधील ब्राह्मण होते काश्मीरशी नेहरू यांचं संवेदनशील असं नातं होतं. त्यामुळे ते काश्मीरला पाकिस्तानला देण्याच्या मनःस्थितीत नव्हते. लॉर्ड माउंटबॅटन यांचं म्हणणं होतं की, जर पाकिस्ताननं थोडासा धीर धरला असता, तर त्यांना सहजपणे कश्मीर मिळाला असता. पण पाकिस्ताननं ज्याप्रकारे वारंवार काश्मीरमध्ये लष्कर पाठवून तिथलं वातावरण बिघडवलं आणि कश्मीरचे राजा हरिसिंग यांना भारताकडे शरण यायला भाग पाडलं त्यामुळं पाकिस्तानकडं कश्मीर सोपवला गेला नाही! नय्यर पुढे लिहितात की, त्यांनी १९७१ साली काश्मीरचे तत्कालीन नेते शेख अब्दुल्ला यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की, सरदार पटेल यांनी त्यांना म्हणजे शेख अब्दुल्ला यांना स्पष्ट केलं होतं की, काश्मीर हा मुस्लिम बहुल भाग असल्यानं त्याचं नातं पाकिस्तानशी जोडले जायला हवं! जेव्हा कश्मीरचा राजा हरिसिंग यांनी भारताकडे मदत मागण्यासाठी संपर्क साधला तेव्हाही पटेल यांनी त्यांना सांगितलं की, आम्ही कश्मीरबाबत आपल्याशी फारसे संबंध ठेवू इच्छित नाही. पण प्रधानमंत्री नेहरू हे कश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याच्या  तयारीत होते. पण माउंटबॅटन यांच्या सांगण्यावरून वल्लभभाई पटेल यांनी काश्मीरचं भारतात  विलीनीकरण करण्यापर्यंत वाट पाहिली.

चौकट:४...
*तर सरदार प्रधानमंत्री बनले असते..*
चला, आम्ही तुम्हाला स्वातंत्र्यपूर्वी घडलेली एक गोष्ट सांगत आहोत. ही गोष्ट अशी आहे की, पुराणातली, इतिहासातली काही पानं काही लोकांनी दाबून टाकलीत. हे आपण जाणतो. जशी महाभारतात अर्जुनाहून अधिक क्षमतेच्या एकलव्याची कहाणी दाबून टाकले जाते, अगदी तशीच गोष्ट स्वातंत्र्य मिळायचा काळातही घडलीय. आपल्या लक्षात आलं असेलच, आम्ही गोष्ट सांगतोय ते देशाचे महानायक, लोहपुरुष, सरदार वल्लभभाई पटेल यांची! ज्यांनी देशप्रेम आणि व्यक्तिगत स्वार्थ यात कधीच तडजोड केली नाही. सर्वप्रथम देश नंतर इतर सर्व! पण त्या काळात असे काही नेते होते की, ज्यांनी आपल्या स्वार्थासाठी कुठल्याही थराला जायचं ठरवलेलं होतं. प्रसंगी व्यक्तिगत प्रतिष्ठा श्रेष्ठ मानली होती.

स्वातंत्र्य मिळण्याच्या जवळपास चार वर्ष आधी इंग्रजांनी काँग्रेसला अंतरिम सरकार बनविण्यासाठी आमंत्रित केलं. यावेळी काँग्रेस पार्टीसमोर म्हटलं तर महात्मा गांधींच्यासमोर एक मोठे आव्हान उभं राहीलं. संकट उभं राहिलं! त्याचवेळी काँग्रेसपक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडायचं ठरलं होतं, तेव्हा देशातल्या अनेक राज्यांतील कमिटीच्या सदस्यांनी सरदार पटेल यांचं नाव निवडलं होतं. त्यावेळी असं निश्चित केलं होतं की, जो पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष होईल, तोच पुढच्या काळात देशाचे नेतृत्व करील. तोच देशाचा पहिला प्रधानमंत्री होईल. याविषयी काँग्रेसच्या वर्किंग कमिटी मध्ये पण चर्चा झाली, पण नंतर सारं बदलत गेलं; ते का, कसं आणि केव्हा ते आपण पाहू या! मौलाना अबुल कलाम आझाद यांनी गांधीजींना याबाबत सांगितलं की देशातल्या अधिकतम राज्यांनी अध्यक्ष म्हणून सरदार पटेल यांना निवडलं आहे सरदार पटेल यांनी राष्ट्रीय अध्यक्ष व्हावं असं अनेकांनी इच्छा व्यक्त केली आहे. तेव्हा गांधीजी काही काळ शांत बसून राहिले. त्याच्या बाजूलाच नेहरू बसले होते त्यांनी ही गोष्ट ऐकली आणि आपल्याला काही माहीतच नाही अशा पद्धतीने तेही गप्प राहिले. तेव्हा गांधीजींनी काँग्रेसच्या वर्किंग कमिटीत असा प्रस्ताव ठेवला आणि म्हटले की, वर्किंग कमिटीच्या सदस्यांनी अध्यक्ष निवडीबाबत एक साध्या कागदावर आपलं मत नोंदवावं. एका बाजूला नेहरू आणि दुसऱ्या बाजूला पटेल बसले होते. सर्व नेत्यांनी एकापाठोपाठ एक आपले मत साध्या कागदावर लिहून दिलं, *जवळपास सगळ्यांनी पटेल यांचं नांव सुचवलं होतं. तेव्हा सरदार पटेल गांधींजवळ आले आणि त्यांनी कोरा कागद गांधीजींच्या समोर ठेवला आणि गांधीजींना त्या कागदावर लिहायला सांगितलं. क्षणभर विचार करून गांधीजींनी त्या कागदावर नेहरूचं नाव लिहिलं! त्यानंतर पटेल यांनी तो कागद गांधीजींच्या निर्णयाचा सन्मान करायचा म्हणून नेहरू यांच्या नावाला आपली सहमती दिली. आणि इतिहास बदलला गेला! नेहरू काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले. पाठोपाठ देशाचे पहिले प्रधानमंत्रीही बनले.* काही इतिहासकारांच्या मते  नेहरूंनी या घडामोडीपूर्वीच गांधीजींजवळ आपलं मन मोकळं केलं होतं आणि त्यांचं म्हणणं होतं की, आपल्याला फक्त प्रधानमंत्रीपदच हवंय. जर आपल्याला प्रधानमंत्रीपद मिळालं नाही तर आपण सत्तेत सहभागी होणार नाही. काही इतिहासकारांच्या मते, गांधीजींची पहिली पसंत नेहरू हेच होते. गांधीजींनी आपल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्यांनी नेहरूंना अशासाठी निवडलं होतं की, त्यांची आंतरराष्ट्रीय संबंध आणि परराष्ट्रनीती पर चांगली जाण होती. शिवाय त्यांना हे ही माहिती होतं की पटेल हे आपलं म्हणणं कधीच टाळणार नाहीत. त्यामुळेच गांधीजींनी द्रोणाचार्यांप्रमाणेच सरदार पटेल यांचा अंगठा कापुन घेतला! पटेल यांचा स्वभाव, विचार, काम करण्याची पद्धत यामुळंच देशातल्या सर्व काँग्रेस कमिटी सदस्यांनी आणि वर्किंग कमिटीनं आपला पहिला पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडे पाहिलं होतं. पण नेहरूंच्या हट्टापायी देशाचं चित्र बदललं आणि सत्तेवर आल्यावर हळूहळू इतिहासाच्या पानांवरूनही पटेल यांचं नांव आणि त्यांनी केलेल्या कामांना दफन करण्यासाठी त्यांचे सहकारी सरसावले होते. पण आज देशातील लोक असं म्हणताना दिसताहेत की जर सरदार पटेल देशाचे पहिले प्रधानमंत्री बनले असते ते तर देशाचा चित्र अत्यंत वेगळं असतं!

- *हरीश केंची*
९४२२३१०६०९

*असे होते वल्लभभाई पटेल...!*
पटेल वल्लभभाई जव्हेरभाई असं त्यांचं संपूर्ण नांव. त्यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १८७५ तर मृत्यू १५ डिसेंबर १९५०.
भारतीय स्वातंत्र्य-आंदोलनातील एक ज्येष्ठ नेते आणि स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान. जन्म लेवा पाटीदार शेतकरी कुटुंबात करमसद (खेडा जिल्हा) इथं. त्यांच्या आईचं नाव लाडबाई. विद्यार्थिदशेतच त्यांनी विद्यार्थ्यांची संघटना उभी करून एका कठोर शिक्षकाविरुद्ध तीन दिवसांचा यशस्वी संप घडवून आणला. प्राथमिक शिक्षण करमसद इथं घेऊन पुढलं शिक्षण त्यांनी पेटलाड, बडोदा आणि नडियाद इथं घेतलं. विद्यार्थिदशेतच १८९१ मध्ये जव्हेरबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. १८९७ साली नडियादहून ते मॅट्रिक उत्तीर्ण झाले. घरच्या गरिबीमुळं त्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेता आलं नाही. ते त्यावेळची वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झाले. वकिलीत पैसे मिळवून बॅरिस्टर होण्याची त्यांना जबरदस्त महत्त्वाकांक्षा होती. ते मुख्यतः फौजदारी खटले गोध्रा इथं चालवीत. वकिलीत त्यांना पैसा आणि प्रतिष्ठा दोन्हींचा लाभ झाला. त्यांनी इंग्लंडला जाण्याकरिता १० हजार रु. जमविलं आणि पारपत्रही काढलं; परंतु आद्याक्षरातील सारखेपणाचा फायदा घेऊन त्यांचे वडीलबंधू विठ्ठलभाई बॅरिस्टर होण्यासाठी १९०५ मध्ये इंग्लंडला गेले. वल्लभभाईनी त्यांना संमती तर दिलीच; पण आपले पैसे व कपडेही दिले आणि त्यांचा प्रपंचही चालविला. वल्लभभाईच्या पत्नी १९०९ साली वारल्या. त्यानंतर  ते बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला गेले. या परीक्षेत त्यांचा पहिला क्रमांक आला आणि ५० पौडांचं पारितोषिक त्यांना मिळालं १९१३ साली ते परत आले आणि अहमदाबादला त्यांनी वकिली सुरू केली. प्रारंभी ते लोकमान्य टिळकांच्या जहाल पक्षात सामील झाले. त्यांचे प्रारंभीचं जीवन काहीसं विलासी आणि चैनीचं होतं. क्लब, पत्ते खेळणं यांत ते उरलेला वेळ घालवीत. महात्मा गांधी अहमदाबादला येईपर्यंत त्यांची ही दिनचर्या होती; पण १९१७ मध्ये गांधीजींच्या सहवासात ते पूर्णतः बदलले. महात्मा गांधी गुजरात सभेचे अध्यक्ष व वल्लभभाई चिटणीस झाले. त्यांनी १९१७-१८ सालच्या खेडा सत्याग्रहात हिरिरीनं भाग घेतला आणि तो यशस्वी करून दाखविला. अहमदाबाद नगरपालिकेत ते याच वर्षी निवडून आले. १९२४-२८ दरम्यान ते नगरपालिकेचे अध्यक्ष झाले. त्यांनी अनेक सुधारणा करून अहमदाबाद शहर स्वच्छ आणि सुंदर केलं. त्यांनी केलेल्या सुधारणांत जलनित्सारण व्यवस्था आणि पाणीपुरवठा योजना या दोन महत्त्वाच्या होत. त्यावेळी गुजरातमध्ये वेठबिगार पद्धत होती. त्यांनी प्रयत्न करून ती पद्धत बरीच मर्यादित केली.  गांधींजींच्या असहकार चळवळीत वल्लभभाई आघाडीवर होते. त्यांनी सुखासीन राहणीमानाचा त्याग केला आणि लगेचच वकिलीही सोडली. या सुमारास दहा लाखांचा निधी गोळा करून गुजरात विद्यापीठाची १९२० मध्ये स्थापना केली. १९२१ साली ते गुजरात प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि त्यानंतर लगेचच अहमदाबाद इथं झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचे ते स्वागताध्यक्ष बनले. १९२३ सालच्या नागपूर झेंडा सत्याग्रहाचं नेतृत्व त्यांच्याकडे होतं. त्यांनी तो सत्याग्रह यशस्वी केला. याच सालच्या बोरसद सत्याग्रहातही ते यशस्वी झाले. १९२७ साली ते नगरपालिकेचे अध्यक्ष असताना गुजरातमध्ये जलप्रलय़ झाला. पूरग्रस्तांना मदत करण्याच्या कामी त्यांनी केलेली कामगिरी अविस्मरणीय आहे. १९२८ च्या फेब्रुवारीत बार्डोलीला करबंदीची चळवळ जोरात सुरू झाली. त्या लढ्याची संपूर्ण योजना वल्लभभाईंची होती. फेब्रुवारी ते ऑक्टोबर १९२८ पर्यंत हा लढा सुरू होता. त्यात त्यांनी घवघवीत यश मिळविलं. त्यांचं नाव सर्व भारतभर दुमदुमू लागलं आणि याचवेळी 'सरदार' ही उपाधी त्यांना प्राप्त झाली. १९३० साली मिठाच्या सत्याग्रहात त्यांनी भाषणबंदीचा हुकूम मोडला आणि रास गावी भाषण केलं. त्यामुळे त्यांना शिक्षा आणि तुरुंगवास भोगावा लागला. यानंतर त्यांना ३ महिने, ९ महिने अशा आणखी शिक्षा झाल्या. सरदारांचं कर्तृत्व आणि काँग्रेसमधील कार्य यांचा विचार करून त्यांना कराची इथं १९३१ साली झालेल्या बैठकीत काँग्रेसचं अध्यक्ष करण्यात आलं. गांधींजींबरोबरच त्यांनाही १९३२ मध्ये अटक झाली आणि येरवड्याला स्थानबद्ध करण्यात आलं. त्यानंतर त्यांना जुलै १९३४ मध्ये सोडण्यात आलं. पुढं बिहारच्या भूकंपाच्यावेळी काँग्रेसचं विधिमंडळ प्रवेशविषयक धोरण बदललं. त्यासाली पार्लमेंटरी बोर्ड स्थापन झालं आणि सरदार त्याच्या उपसमितीचे अध्यक्ष झाले. १९३६ साली पुन्हा त्यांना प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणूक मंडळाचे अध्यक्ष केलं गेलं. सरदारांची ती कामगिरी अत्यंत मोलाची होती. १९३८ च्या हरिपूर काँग्रेसचे ते स्वागताध्यक्ष आणि सुभाषबाबू अध्यक्ष होते. त्याच साली राजकोटच्या महाराजांबरोबर संस्थानी प्रजेकडून त्यांनी तडजोड केली; पण महाराजांनी ती तडजोड अमान्य केली. सरदारांनी मग कायदेभंग सुरू केला. त्याच कारणानं गांधींजींना ३ ते ७ मार्च १९३९ दरम्यान उपवास करावा लागला. १९४० च्या नोव्हेंबरमध्ये वैयक्तिक सत्याग्रहात त्यांना स्थानबद्द करण्यात आलं. ८ ऑगस्ट १९४२ रोजी ‘छोडो भारत’ चा ठराव संमत होण्यापूर्वीच सरदारांनी गुजरात पेटवला होता. ९ ऑगस्टला त्यांना अहमदनगरच्या किल्ल्यात इतर काँग्रेसच्या नेत्यांसोबत अटकेत ठेवलं. तिथून १५ जून १९४५ रोजी त्यांची सुटका झाली.

सुटकेनंतर सिमला परिषद, कॅबिनेट मिशन वगैरेंत त्यांनी भाग घेतला. त्यांच्या मध्यस्थीनं मुंबईच्या नाविक बंडाला (१९४६) आळा घातला गेला. २ सप्टेंबर १९४६ रोजी हंगामी मंत्रिमंडळात गृहमंत्री म्हणून ते सहभागी झाले. घटनापरिषदेचे ते सभासद होतेच. त्यांनी सुरुवातीस कम्युनिस्टांची बंडे निपटून काढली; पण सरदारांचं सर्वांत मोठं, महत्त्वाचं आणि राष्ट्रीय ऐक्याचं काम म्हणजे संस्थानांच्या विलीनीकरणाचं काम होय. त्यांनी हैदराबाद, जुनागढ आणि कश्मीर सोडून इतर ५६२ संस्थानं भारतात विलीन केली. पुढं त्यांनी हैदराबाद संस्थानही, पोलीस कारवाई करून खालसा केलं. या विलीनीकरणाच्या कार्यात त्यांना व्ही. पी. मेनन यांचे बहुमोल साहाय्य लाभलं. प्रसिद्ध सोरटी सोमनाथ मंदिराच्या पुनरुज्जीवनासाठी आणि व्यवस्थेसाठी त्यांनी एक विश्वस्त निधी उभा केला. अस्पृश्यांना त्या देवळात प्रवेश आणि पूजा करण्याचा हक्क विश्वस्त पत्रकात वल्लभभाईंनी नमूद केला; तसंच सर्व धर्माच्या व्यक्तींना खुल्या प्रवेशाची तरतुदही त्यात नमूद केली. ही त्यांची इच्छा पुढे १९५१ मध्ये पुरी झाली. महात्मा गांधीजींचा ३० जानेवरी १९४८ रोजी खून झाला. आपण गृहमंत्री असताना ही घटना घडावी, यामुळे ते अत्यंत उद्विग्न झाले. यानंतर काही दिवसांनी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांची प्रकृती हळूहळू खालावत गेली. ३१ ऑक्टेबर १९४८ रोजी मुंबईत त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी रत्नजडित सोन्याचा अशोकस्तंभ आणि चांदीची मोठी प्रतिमा त्यांना अर्पण करण्यात आली. त्यांना नागपूर, प्रयाग, उस्मानिया यांसारख्या अनेक विद्यापीठांनी सन्माननीय डॉक्टरेट पदवी दिली, त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त १९५० साली अहमदाबाद शहरातर्फे त्यांना पंधरा लाख रुपयांची थैली अर्पण केली. त्यानंतर सरदारांची प्रकृती अधिक क्षीण झाली. हवा पालटण्यासाठी ते १५ डिसेंबरला मुंबईस आले. तिथंच त्यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्यांच्या मुलाचे नाव डाह्याभाई आणि मुलीचे मणिबेन. नेहरूंनी त्या दोघांनाही राज्यसभेचं सदस्यत्व बहाल केलं.

भारतीय स्वातंत्र्यालढ्यात आणि त्यानंतरच्या स्वातंत्र्योत्तर भारतात वल्लभभाईंना मानाचं स्थान आहे. एकात्म भारताचे ते खरे शिल्पकार असून काँग्रेसच्या पक्ष संघटनात्मक कार्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. भारताचा पोलादी पुरुष म्हणून त्यांची जगभर ख्याती होती. ते धार्मिक व परंपरागत विचारसरणीचे होते आणि वृत्तीने अत्यंत कणखर होते. स्वतःला एक सामान्य शेतकरी आणि काँग्रेसचा एक नम्र सैनिक म्हणत. शेतकऱ्यांत स्वाभिमान निर्माण झाला, यातच आपण कृतार्थ झालो असं ते मानीत. साधी राहणी, उच्च विचारसरणी आणि तत्काळ कृती यांवर त्यांचा भर असे. जवाहरलाल नेहरूंचा समाजवादी आदर्शवाद त्यांना मान्य नव्हता. ते पूर्णतः वास्तववादी होते. त्यांचं आणि नेहरूंचं अनेक तात्त्विक मतभेद होते; पण महात्मा गांधीजीं च्या दुव्यामुळे ते एकत्र काम करीत. शिवाय दोघांना व्यक्तिगत मतभेदांपेक्षा देशाचं कल्याण आणि भवितव्य श्रेष्ठ वाटे. देशाच्या फाळणीमागील द्विराष्ट्रवाद त्यांना अमान्य होता. मुसलमानांनी भारतीयांमध्ये एकरूप व्हावं, असं त्यांना वाटे. पण तत्कालीन परिस्थितीच्या दबावाखाली आणि गांधींमुळे त्यांनी ती योजना नेहरूंबरोबर मान्य केली. स्वतःच्या इच्छेप्रमाणे सर्व गोष्टी घडवून आणणारी चाणाक्ष बुद्धी, कठोर शिस्त आणि परिस्थितीचं विलक्षण आकलन हे राजकारणी मुत्सद्याला आवश्यक असणारे गुण त्यांच्यात होते. कोणत्याही प्रश्नाकडे ते फलप्रमाण्यवादी दृष्टिकोनातून पाहत. म्हणूनच त्यांना श्रद्धाजली वाहताना लंडनच्या द टाइम्सनं त्यांचा गौरव 'बिस्मार्कपेक्षा श्रेष्ठ राजकारणपटू' म्हणून केला आहे.

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...