Saturday 17 May 2014

राष्ट्रधर्म जागवायला हवाय!

राष्ट्रधर्म जागवायला हवाय!
ही परिवर्तनाची पहाट आपलं शतकानुशतकाचं दैन्य, दुःख, गरिबी संपवेल, असं देशातील बहुसंख्य जनतेला वाटणं हे लोकशाहीनं दिलेलं विचार स्वातंत्र्याचं सामर्थ्य आहे. हे सामर्थ्य जपलं, वाढविलं पाहिजे. कारण त्यातच राष्ट्राला एकसंध ठेवणारी, बलशाली करणारी शक्ती आहे. ही शक्ती वाढविण्यासाठी मानवता हाच राष्ट्रधर्म, हा विचार प्रत्येकात रुजायला हवा. कारण, मानवता आहे, तिथे प्रेम आहे, प्रेम आहे तिथे आनंद आहे, आनंद आहे तिथे ज्ञान आहे, ज्ञान आहे तिथे शांती आहे, शांती आहे तिथे विचार आहे, विचार आहे तिथे क्रांती आहे, क्रांती आहे तिथे समाज आहे, समाज आहे तिथे विश्‍वास आहे, विश्‍वास आहे तिथे उत्तरदायित्व आहे, उत्तरदायित्व आहे तिथेच राष्ट्र आहे.
जनतेच्या, जनतेसाठी आणि जनतेद्वारा शासनाच्या तत्त्वांची प्रतिष्ठापना करणारी आपली राज्यघटना टिकवून ठेवायची असेल, तर आपल्या मार्गात असलेल्या दुष्ट प्रवृत्ती कोणत्या, हे ओळखण्यात आणि त्या नाहीशा करण्यात आपण कुचराई करता कामा नये. याच प्रवृत्तींमुळे लोकांना जनतेद्वारा चालविल्या जाणार्‍या शासनापेक्षा जनतेसाठी चालविणारे शासन अधिक आवडू लागते हे उद्गार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत. अठ्ठावन्न वर्षांपूर्वी, देशातील सर्व नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य आणि भ्रातृभाव प्रदान करणार्‍या राज्यघटनेचे त्यांनीच घटना समितीत सारथ्य केले होते.
स्वातंत्र्याच्या साठीत, प्रजासत्ताकाच्या अठ्ठावन्नात देशाची आज ही कांही परिस्थिती झाली आहे, त्याने सार्‍यांनाच व्यथित व्हायला होते आहे. आज देशाची शोकसभा भरल्याचे दृष्य आपण पाहतो आहोत. गेल्या कांही दिवसात कानपूरपासून सोलापूरपर्यंत जे कांही घडले आहे, त्यावरून आपल्या मार्गातील दुष्ट प्रवृत्ती नाहीशा करण्याचे राहोच; केवळ ओळखून काढण्याबाबतही आपण किती सुस्त आहोत, हेच स्पष्ट झाले आहे. यापूर्वी कधी नव्हता एवढ्या प्रमाणात आज आपला समाज जातीयवृत्तीने ग्रस्त झाला आहे; अधिकच विभाजित झाला आहे. देशातील डॉ. आंबेडकरांचे पुतळे विद्रुप करणारे, पूर्वग्रहांनी अंध झालेले लोक आजही आपणांत निघतात. आपल्या राजकीय उद्दिष्टांसाठी किंवा व्यक्तिगत अभिमानापोटी उच्चवर्णियांपैकी अनेकजण द्वेषभावना प्रसृत करतात. त्यांनीच देशातला सुरळीत चाललेला जीवनचक्र बिघडवून टाकला आहे. दलितांबद्दलच्या त्यांच्या मनातील पूर्वग्रह एवढा खोल रुजला आहे आणि उदारमतवादाला असलेली त्यांची मान्यता एवढी वरवरची आहे की, दलितांना समानता नाकारण्यासाठी ते कोणत्याही थराला जातात. समाजावर कुणाचे अधिराज्य आहे, हे त्यांना दाखवून द्यायचे आहे. ज्या हिंदू समाजाने आंबेडकरांना आणि त्यांच्या बांधवांना साध्या माणुसकीचीही वागणूक दिली नाही, त्याचीच नव्हे तर सार्‍या देशाची किती मोलाची सेवा त्यांनी बजावली आहे, हे मानण्याऐवजी ही मंडळी सारी राजकीय व्यवस्थादेखील नष्ट करण्यास सिध्द होतील.
राज्यात दलित आणि बौध्दांवर अत्याचार वाढले आहेत. शासन दरबारी घ्यावी तशी दखल घेतली जात नाही. समाजकंटकांवर कारवाई करण्यास शासन कमी पडते आहे, दलित आणि इतर समाजामध्ये वाढत चाललेली दरी हे गंभीर आहे. शासनाची, समाजातल्या सर्व थरांची ही जबाबदारी आहे. परंतु राजकीय स्तरावरून या दोघांत तेढ सतत असावी, असे वाटत असते. कारण त्याचे पुढारीपणच या बाबीवर अवलंबलेले असते. साहजिकच ही दरी कमी होण्याऐवजी अशाच प्रकारे ती वाढत जाते. जोपर्यंत राज्यघटना आहे, तोपर्यंत आपला देश आंबेडकरांचा ऋणी राहील. त्यांना तर ‘राज्यघटनेचे शिल्पकार’ म्हणून ओळखले जाते. हिंदुत्वालाही त्यांनी दिलेले योगदान कमी लक्षणीय मानता येणार नाही. समाजाने दिलेल्या अवमानाच्या वागणुकीने त्यांच्याप्रमाणे अनेक दलितांना बौध्द धर्म स्वीकारावासा वाटला होता. पण हिंदूंमधील ज्येष्ठ नेत्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ते या धर्मातच राहिले. जर हिंदू धर्मातून दलित वेगळे झाले असते तर आज देशात हिंदूंची संख्या शेकडा ८२ आहे; ती तशी राहिली नसती. दीर्घकाळ आणि जणू न संपणारी पक्षपाताची व अस्पृश्यतेची वागणूक मिळूनही दलित आणि डॉ. आंबेडकरांचे अनुयायीदेखील हिंदूच राहिले. खरे तर त्यांना अजूनही जी द्वेषमूलक वर्तणूक दिली जात आहे, त्यामुळे त्यांनी याच समाजात टिकून राहण्याचे कारण नव्हते. हिंदुत्वाची विचारसरणी प्रसृत करणार्‍यांनी दलितांना सोसाव्या लागणार्‍या हालअपेष्टांबद्दल किंवा उच्चवर्णियांनी शरमेने मान खाली घालावी लागेल अशा जातीय संरचनेतील अनिष्ट कठोरतेने लिहायला हवे, असे मला वाटते. लालकृष्ण आडवाणी यांच्यापासून गोपिनाथ मुंडे, राजनाथ यांनी आपली रथयात्रा हिंदू समाजातील जातीपातीच्या दुष्ट प्रवृत्तींशी लढा देण्यासाठी काढावयास हवी होती. मंदिरापेक्षाही जनतेची सुख-दुःखे अधिक महत्त्वाची आहेत, हे त्यांनी ओळखावयास हवे. भारतीय जनता पक्ष हिंदूंसाठी लढणारा मानला जातो. पण त्याने केव्हाही अस्पृश्यतेविरुध्द मोहीम सुरू केल्याचे ऐकिवात नाही.
भाजपच्यादृष्टीने दलितांचे-मुस्लिमांचे महत्त्व राजकारणापुरते आहे; सामाजिकदृष्ट्या नव्हे. धोरणे ठरविली जातात ती केवळ सत्तेच्या राजकारणापोटीच. त्यामुळे त्यांचा समझौता शिवसेनेपासून मुस्लिम लीगपर्यंत आणि समाजवाद्यांपासून बहुजन समाज पक्षापर्यंत होऊ शकतो. महात्मा गांधींच्या काळामध्ये जाती पध्दतीचा कलंक नाहीसा व्हावा म्हणून चळवळ झाली होती. आज अशी चळवळ कांही दिसत नाही. जवाहरलाल नेहरूंनी प्रशासकीय पध्दतीने ही पध्दत नाहीशी करण्याचा प्रयत्न केला होता. आपल्या नांवात जातीचा निर्देश येणार नाही अशारितीने तो लिहिण्याचा त्यांचा सर्व अधिकार्‍यांना आदेश होता. त्यामुळे सचिवालयातील नावांच्या पाट्यांवर आडनांवाचा उल्लेख नसे. अर्जाच्या ङ्गॉर्मवरील जातिवाचक उल्लेख असलेला रकाना त्यांनी काढून टाकला होता. आता हे सारे रद्द झाले आहे. जातिनिष्ठा हिरीरीने जोपासली जाऊ लागली आहे.
उत्तरप्रदेश आणि बिहारसारख्या राज्यात तर न्यायपालिकेतही जातीच्या आधारावर विभाजन झालेलं आहे. आता सर्वच राजकीय पक्ष जातीला अधिक महत्त्व देऊ लागले आहेत. कारण, दलित म्हणजे मानव नव्हे, तर ‘व्होट बँक’च आहेत, असे त्यांना वाटते. या प्रवृत्तीविरुध्द निषेध व्यक्त केला की, अस्पृश्यता प्रतिबंधक कायद्याकडे बोट दाखविले जाते. जणू सामाजिक दुष्प्रवृत्ती कायद्याने नष्ट होणार आहे! सामाजिक पातळीवर समानता प्रस्थापित करण्याचा आणि आर्थिक क्षेत्रात असमानता दूर करण्याचा आपण कटाक्ष ठेवला नाही, तर आपली लोकशाही पध्दत नष्ट होईल असा डॉ. आंबेडकरांनी इशारा दिला होता. सामाजिक पातळीबद्दल ते म्हणाले होते की, आपल्या समाजात असमानतेचे वेगवेगळे टप्पे आहेत. याचा अर्थ काहींच्या दृष्टीने पातळी उंचावते, तर काहींच्या दृष्टीने ते खाली जाते. स्वातंत्र्य मिळून साठ वर्षे झाली, तरी ग्रामीण विभागात सामाजिक विषमतेचे वर्चस्व तसेच आहे. शहरी क्षेत्रात जातियतेची बंधने सैल झाली असतील, पण नष्ट झालेली नाहीत. एका सरकारी अहवालातच हे मान्य करण्यात आलं आहे की, अनुसूचित जातीत आणि विशेषतः त्यांच्यातील असुशिक्षितांना, समाजाने आपणास मान्यता द्यावी, अशी तीव्र आकांक्षा असते.
आर्थिक पातळीबद्दल आंबेडकरांनी दिलेला इशारा अचूक ठरला आहे. गेल्या पन्नास वर्षांत देशाचा जो आर्थिक विकास झाला तो एवढ्या विषम पध्दतीने की, प्रादेशिक, धार्मिक आणि लोका-लोकांदरम्यान असमानता वाढलीच आहे. आता उदारीकरणाबद्दल एवढे आकर्षण आहे. समानतेवर आधारलेला समाज प्रस्थापित करण्याच्या उद्दिष्टाबद्दलच्या चर्चेचा आवाजच बंद झाला आहे. समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातील अंतर कमी करण्याचा कार्यक्रम नेहरूंनी आखला होता; तसा सध्याच्या सरकारजवळ कोणताही कार्यक्रम नाही. इतकेच नव्हे, तर केवळ औपचारिकता म्हणूनदेखील कुणी त्याबद्दल बोलत नाही.
सत्ताधार्‍यांच्या लेखी केवळ संपत्तीला महत्त्व आले आहे; ती कशी मिळविली हे कुणी लक्षात घेत नाही. देशातील लक्षावधी लोकांची उपासमार होत असताना मंत्री आणि सरकारी नोकर मात्र मेजवान्या झोडीत असतात. हे पाहिले म्हणजे राज्यघटनेच्या उद्देशिकेत ज्या समाजवादी शासनाचा आवर्जून उल्लेख करण्यात आला आहे, त्याबद्दल कुणी गंभीरतेने विचार करतो आहे का? याबद्दल शंका निर्माण होते. एखादा गुन्हेगार तुरुंगात नसला व बरीच संपत्ती बाळगून असला तर सामाजिकदृष्ट्या कलंकित म्हणून त्याच्याकडे पाहिले जात नाही. आणि धनदांडग्या तस्करांच्या घरच्या विवाह सोहळ्यात मंत्री आणि ज्येष्ठ सरकारी नोकरांनी हजेरी लावलेली असते. ही सारी मंडळी जेव्हा आपल्या आलिशान मोटारीतून घरी जातात तेव्हा, प्रवेशद्वाराजवळच कचराकुंडीपाशी मेजवानीतील उरले-सुरलेले कांही मिळते कां म्हणून डोळे लावून बसलेल्या अनेक गरिबांच्या रांगा त्यांच्या दृष्टीला पडतच असणार.
पददलित वर्ग आता, दुसरे कोणी आपणावर राज्य करावे, या प्रघाताला विटला आहे, असे डॉ. आंबेडकर म्हणाले होते; ते योग्यच होते. आता या वर्गांना सत्ताधारी बनवायचे आहे. पददलित वर्गातील या आत्मसाक्षी वृत्तीचे रूपांतर वर्गसंघर्षात किंवा वर्गयुध्दात होता कामा नये. कारण, त्यामुळे देशाचे तुकडे पडतील आणि ती नक्कीच घोर आपत्ती ठरेल. अब्राहम लिंकननी म्हटल्याप्रमाणे, घरातच अनेक तट पडले तर ते ङ्गार काळ टिकू शकत नाही. या सार्‍या समस्यांवर चर्चा व्हायला हवी. आंबेडकरांबद्दल द्वेषभाव निर्माण करण्याने उच्चवर्णीय दलितांच्यात दुरावा निर्माण करीत आहेत. आपणाला बंधमुक्त करण्यासाठी आणि प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी बाबासाहेब प्राणपणाने लढले, अशी त्यांची दृढ श्रध्दा आहे. हा सूर्य उद्या संहारक झाल्यास, सगळंच कसं उद्ध्वस्त होईल!
विषमतेचा अंत होऊन परिवर्तनाची नवी पहाट होईल!
ही परिवर्तनाची पहाट आपलं शतकानुशतकाचं दैन्य, दुःख, गरिबी संपवेल, असं देशातील बहुसंख्य जनतेला वाटणं हे लोकशाहीनं दिलेलं विचार स्वातंत्र्याचं सामर्थ्य आहे. हे सामर्थ्य जपलं, वाढविलं पाहिजे. कारण त्यातच राष्ट्राला एकसंध ठेवणारी, बलशाली करणारी शक्ती आहे. ही शक्ती वाढविण्यासाठी मानवता हाच राष्ट्रधर्म, हा विचार प्रत्येकात रुजायला हवा. कारण, मानवता आहे, तिथे प्रेम आहे, प्रेम आहे तिथे आनंद आहे, आनंद आहे तिथे ज्ञान आहे, ज्ञान आहे तिथे शांती आहे, शांती आहे तिथे विचार आहे, विचार आहे तिथे क्रांती आहे, क्रांती आहे तिथे समाज आहे, समाज आहे तिथे विश्‍वास आहे, विश्‍वास आहे तिथे उत्तरदायित्व आहे, उत्तरदायित्व आहे तिथेच राष्ट्र आहे..............हरीश केंची

Tuesday 13 May 2014

भलत्याच ठिकाणी धडका देत आहोत!

भलत्याच ठिकाणी धडका देत आहोत!

देशातल्या लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. सध्या प्रचाराचा धुराळा खाली बसला आहे. मतमोजणीनंतर कुणाला, कसे दान पडले आहे, हे कळायला अजून ङ्गारसा कालावधी लागणार नाही. ते जेव्हा कळेल, तेव्हा शिमगा सुरू होईल. मतदानात कुणापुढे मतदारांनी काय वाढून ठेवले आहे, याचा अंदाज करण्याची अपूर्वाई आहे. निवडणुकांमुळे सध्या निर्माण झालेले वातावरण निवळणार की, दिवसेंदिवस अधिक खदखदणार हे सांगणे कठीण आहे. पण सगळ्यांचीच अवस्था पहिलटकरीणीसारखी दिवस भरत आलेल्यांसारखी आहे. सुटका होण्यासाठी सगळे आतुर आहेत. नंतर काय? कधी नव्हता एवढा महाराष्ट्र आज खिळखिळा झालाय. हा महाराष्ट्र एकत्र बांधण्याची, भेदांना साधून अभेद्य बनविण्याची, मराठी ताकद एकवटण्याची ङ्गमहाराष्ट्र आधार हा भारताचाफ ही आश्‍वासकता पुन्हा एकदा जागविण्याची, ममराठा तितुका मेळवावाफ ही समर्थ ललकारी दर्‍या-खोर्‍यात, गांवोगांवी, मनोमनी घुमविण्याची आज आवश्यकता आहे. एकमेकाला समजावूून, सांभाळून, सावरून घेणे जर आम्हाला शक्य नसेल, तर महाराष्ट्र संपला असेच म्हणावे लागेल.
गेल्या कांही वर्षात या मराठी समाजात जे कांही घडलं आहे, त्याचा गंभीरपणे विचार करण्याची जरुरी आहे. हा विचार करण्यासाठी आता आवश्यक असे विवेकी वातावरण इथे सर्वप्रथम निर्माण व्हायला हवे आहे. एकमेकांवर मात करण्याची, झेंडे लावण्याची ईर्षा आता कांही काळ दूर ठेवण्याची जरुरी आहे. निवडणुकीच्या काळात लोकांना आकर्षून घेण्यासाठी एकाहून एक सरस घोषणांचे भुईनळे नेतेमंडळींनी लावले. नोकर्‍या, राहायला स्वस्तात घरे, प्रत्येक घरांत वीज-पाणी,  चकचकीत रस्ते, कमी भाड्यात दर्जेदार प्रवासी सेवा... ऐकून अजीर्ण व्हावं अशा गोष्टी सांगून मतदारांना आपल्याकडे वळविण्याची स्पर्धा सुरू होते आहे. त्याने कुणाचे काय साधले वा साधणार आहे? सत्तेवर कुणीही आले तरी जे देतो म्हणाले ते देणे त्यांना शक्य होणार नाही. निवडणुका आल्यानंतरच लोकांना काय हवे, काय नको याचा एवढा ऊहापोह का केला जातो? सरकार जे करू शकत नाही, ते लोकबळावर करून दाखविण्यासाठी जिथे आपली ताकद आहे, तिथे प्रयत्न करण्याचा प्रयत्न कुठलाही पक्ष का करत नाही? अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचारविरोधी आंदोलन उभारले, ते जनतेच्या हितासाठीच होते ना? माहितीचा अधिकार मिळावा म्हणून आंदोलन उभे झाल्यानंतर कितीजण त्यात सहभागी झाले होते?
श्री.म. माटे नांवाचा एक विलक्षण माणूस महाराष्ट्रात होऊन गेला. त्याने त्याच्या कुवतीनुसार अस्पृश्यता निवारणाचा प्रयत्न पुण्यात केला. ङ्गमहारमाटेफ असे नांव बनवून पुणेकरांनी या जिद्दी, तळमळीच्या विद्वानाची अवहेलना केली. हे माटे ङ्गमास्तरफ म्हणूनही प्रसिद्ध होते. सदैव तरुणांना, मुलांना प्रेरणा, चेतना देणारा हा एक ङ्गज्वलंतफ माणूस होता. ज्वलंत शब्दाला अलिकडे ङ्गारच पेटता अर्थ प्राप्त झालाय. बेङ्गाट-अङ्गाट बोलून भडका उडवण्याचा ज्वलंतपणा माटे मास्तरांमध्ये नव्हता. त्यांनी निखारे पेटविले नाहीत; मुलांच्या मनात विचारांची ज्योत लावली. माटे मास्तरांनी अनेक तरुणांचे जीवन घडविले. मी माटे मास्तरांचा विद्यार्थी आहे, असे अभिमानाने सांगणारी थोर विचारी मंडळी आपल्या लेखनातून त्यांचा आदराने उल्लेख करीत. समाजाला विज्ञानाभिमुख बनविण्याची माटे मास्तरांना तळमळ. त्यापोटी त्यांनी ङ्गविज्ञानबोधफ नांवाचे एक वार्षिकही काढले होते. ङ्गशास्त्रफ या पदवीला पोहोचलेल्या ज्ञानाची खैरात शिकाऊ लोकांत सारखी करीत राहणे हा उद्देश मास्तरांपुढे होता. याचीच कल्पना स्पष्ट करण्यासाठी विज्ञानबोधाची प्रस्तावनाफ नांवाचा एक निबंध साधारणपणे १९३४-३५ साली त्यांनी लिहिला. ङ्गतरुण विद्यार्थ्यांची मने चौकस, चिकित्सक आणि ज्ञानलालस बनविण्याच्या कामी या प्रस्तावनेचा बराच उपयोग होईल, असा माझा अंदाज आहेफ असे म्हणून मास्तरांनी प्राध्यापक मंडळींनी या विषयाला आधुनिकता प्राप्त करून द्यावीफ अशी इच्छा प्रकट केली आहे.
माटे मास्तरांना मी कधी बघितलेले नाही. पण पु.ग. सहस्त्रबुद्धे यांच्यासारखे अनेक विचारवंत नेहमी माटे मास्तरांचा आपल्या लेखनातून उल्लेख करीत. मला प्रश्‍न पडतो की, स्वातंत्र्य आले, प्रजासत्ताक राष्ट्र निर्माण झाले, भाषावार प्रांतरचना झाली, तशी राज्ये अस्तित्वात आली. पण खरोखरच स्वतंत्र राष्ट्रातल्या माणसांच्या सर्व क्षेत्रातल्या कर्तृत्वाला जी उभारी येते, ती उभारी या राष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला अजून यावी तशी ती आली नाही! आम्ही खूप प्रगती केलीय. आमचे अनेक बांधव आज परराष्ट्रात मोठ्या जबाबदार्‍या पार पाडण्याएवढे समर्थ आहेत. ही गोष्ट खरी आहे. पण, आमचा माणूूस पोट भरण्यासाठी कांही कमविण्याच्या अवस्थेतही नाही, याचा लाजीरवाणा कबुलीजबाब आमच्या नेतेमंडळींना आज पासष्ठ वर्षांनंतरही द्यावा लागतो आहे.
बिहार-ओरिसा-मणिपूर-तामीळनाडू यांचे सोडा; बुद्धिवादी, पुरोगामी महाराष्ट्रालाही, प्रगत औद्योगिक राज्य म्हणवणार्‍या महाराष्ट्रालाही अजून आपल्या माणसांच्या पोटापाण्याची, कामधंद्याची, शिक्षण, आरोग्य, निवासाची व्यवस्था करणे का शक्य होत नाही?फ ङ्गतुम्ही मला सत्ता द्या, मी तुम्हाला सुख देईनफ अशी वचने निवडणुकीत कां दिली जातात? मंत्र म्हणून गोष्टी घडविण्याची सिद्धी प्राप्त झाली असेल, त्यालाच हे करता येईल. असा अवतारी सत्तासाईबाबा कुणी आहे वा होईल असे मानणारे मानोत. मी भाबडी श्रद्धा ठेवणारा नाही. विकासासाठी ज्या तर्‍हेची मनोशक्ती जागृत व्हायला हवी, तशी ती जागृत करण्याचा प्रयत्न कुणीही केलेला नाही. भाबड्या श्रद्धा जागविण्याचे आणि नको त्या तर्‍हेने भावना भडकविण्याचेच प्रयत्न झाले आहेत. महाराष्ट्राला असमर्थ ठेवण्याचाच जणू मराठी राजकारण्यांनी वसा घेतलेला दिसतो आहे.
विज्ञानबोधाच्या प्रस्तावनेत माट्यांनी म्हटलं आहे, पूर्वीपेक्षा आता मुलांना शास्त्रीय प्रमेये जास्त माहिती झालेले असतात. यात कांहीच शंका नाही. (माट्यांचे हे म्हणणे १९३५ च्या सुमाराचे आहे. आता त्याला ८० वर्षे झालीत. पण तरीही माट्यांचे हे म्हणणे सार्‍या मराठी माणसांनी मनन करण्यासारखे आहे.) पण प्रत्यक्ष शास्त्रांचे अध्ययन हे जसे महत्त्वाचे; तसेच शास्त्राविषयीची माहिती करून ठेवणे हे ङ्गार महत्त्वाचे आहे. प्रत्यक्ष एखादे शास्त्र आले तर ठीकच आहे. पण, निदान शास्त्रे म्हणजे काय? त्यांचे इतिहास, त्यांची व धर्माची चाललेली झुंज, त्यांनी मनुष्याच्या जीवितावर केलेले संस्कार, प्रत्येक शास्त्राची प्रमुख प्रमेये, त्या सर्वांच्या परस्पर निष्कर्षावरून निघणारी अनुमाने आदि प्रकार आपल्या अभ्यासावयाच्या प्रमुख पुस्तकांतच आले पाहिजेत. हे जर झाले तर शास्त्रप्रवणता ही दिवसानुदिवस वाढत जाईल. माणसांच्या मनाचा कल भावनाप्रधान वाङ्मयाकडे ङ्गार असतो. या मूळच्या कलाला तसलेच खाद्यपदार्थ सारखे मिळत राहिले तर तोच अधिक जोपासतो. भावनासुद्धा चालेल, पण मूळ उभारी शास्त्रीय सिद्धांतांच्या आधारावरच असावयास हवी.
शास्त्रे म्हणजे कांही केवळ पदार्थ विज्ञान व रसायन नव्हेत, समाजशास्त्र आहे. सुप्रजाजनशास्त्र आहे. लोकसंख्याशास्त्र आहे. नीतिशास्त्र आहे. यातील सिद्धांतांच्या अवलोकनाने माणसांच्या भावनेलासुद्धा खरे वळण मिळेल. कुठे राग यावा व कुठे स्ङ्गुंदावे हे सुद्धा कळावयास हवे. वरीलसारख्या शास्त्राच्या ज्ञानाने एखाद्याचे मन संस्कारयुक्त झालेले असेल, तर सभोवतालची परिस्थिती पाहून त्याला राग किंवा हुंदका येऊ नये. तो जर का त्याला आला आणि जर का तो कर्तबगार असेल तर एकंदरीने पाहता त्याच्या  कर्तबगारीने माणसाचे नुकसानच होईल. अन्यायाची चीड येणे हे ङ्गार चांगले आहे; पण ज्याला आपण अन्याय समजतो, तो खरोखरीचा अन्याय आहे, हे ठरवावयास बुद्धीला माहितीरूप ज्ञानाचे पुष्कळच संस्कार झालेले असावयास हवेत. कळवळा येणे हेही ङ्गार चांगले आहे. पण औदार्याचे वा दातृत्वाचे स्ङ्गुरण यावयास परिस्थिती विशेष कोणता हे ज्ञानाने म्हणजेच शास्त्रीय अभ्यासाने ठरवावयास हवे आणि म्हणून आपली बुद्धी या अभ्यासाने संस्कारयुक्त झालेली असावयास हवी.
अर्थशास्त्र व लोकसंख्याशास्त्र यांच्या अभ्यासाने कित्येक मतभ्रम नाहीसे होतात. व आपण कुठेतरीच वाईट वाटून घेत असतो, हे मनावर ठसते. ङ्गार काय सांगावे, आपल्या सामाजिक व राजकीय चळवळीच्या दिशा, गती आणि भवितव्य ही या शास्त्रज्ञांना संस्कारांनी जरपूत झालेली नसतील तर आपली ङ्गसगत होईल आणि आपण भलत्याच ठिकाणी धडका देत बसलो होतो हे दिसून येईल.फ आज आमचे मान्यवर नेते आणि त्यांचे अनुयायी अशा भलत्याच ठिकाणी धडका देत बसले आहेत. महाराष्ट्राची ङ्गार मोठी शक्ती नको त्या गोष्टीत निष्कारण वाया जाते आहे. कॉंग्रेसने देशाचे आणि तुमचे-आमचे सगळ्यांचेच वाटोळे केले आहे, हे गळे काढणारेदेखील महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय चळवळीला योग्य दिशा, योग्य गती देण्याऐवजी कधी एकमेकांना आणि कधी एकत्र मिळून नको त्या गोष्टीलाच धडका देत आहेत.......... हरीश केंची

Thursday 8 May 2014

शिमगा, शिवी आणि ओवी!

शिमगा, शिवी आणि ओवी!
सोनोपंत हांडेकर, साखरे महाराज, म.शं. गोडबोले अशा माऊलीच्या अभ्यासकांनाही ही शिवी गवसली नाही. त्यांनी त्याचा थातूरमातूर अर्थ केला, असे धोंडांचे म्हणणे आहे. शिव्या देणार्‍यांना ‘तुझ्या आईला’ या शब्दापासून सुरू होणार्‍या शिव्या कशा झटपट तोंडातून निघतात, हे सांगायला नको. ‘तुझ्या आईला’ ही सुरुवात आणि तीन शब्दाचा शेवट या आठ अक्षरात निरनिराळी जनावरे पतीखेरीज दुसरा पुरुष अथवा जे सुचेल, वाटेल ते घालून शिव्यांची ङ्गैरी झाडली जाते. धोंड याला ‘कुमार क्रोध क्षोभण’ मंत्र म्हणतात. कुमार म्हणजे पुत्र आणि बीजाक्षरे म्हणजे ‘तुझ्या आईला’ या शब्दापासून सुरू होणार्‍या शिव्या! असे धोंडांचे विवेचन आहे. ते प्रत्यक्षात वाचल्याशिवाय शिव्या आणि त्याचा दर्जा याचे ज्ञान प्राप्त होणार नाही. अशिष्ट भाषा न वापरता शिष्ट मंडळी एखाद्याचा कसा आणि किती उध्दार करतात हे ह्या शिमग्याच्या मुहूर्तावर समजून घ्यायला काय हरकत आहे?
होळी रे होळी पुरणाची पोळी|
साहेबाच्या वर बंदुकाची गोळी|
साहेब मेला संध्याकाळी...
यासारखी आणि
होळीच्या गवर्‍या पाच पाच
चल् गं पोरी नाच नाच...
अशी कवनं होळीच्या दिवशी घुमायची, गळ्यात ढुमकं बांधून जाम धांगडधिंगा व्हायचा. आता काळाच्या ओघात हे वातावरण ङ्गारसं दिसत नाही. गाण्याच्या भेंड्या जशा लावल्या जातात, तशा शिव्याच्या भेंड्या लावल्या जात होत्या. आज ती परिस्थिती राहिलेली नाही. होळीच्या काळात शिव्यादेखील ‘बुरा न मानो होली है’ असं म्हणत म्हटल्या जातात. शिवी आणि ओवी या दोघांत एका अक्षराचाच ङ्गरक आहे. ओवी संतांची. म्हणजे, सज्जनांची अन् शिवी दुर्जनांची, असा सर्वसाधारण समज आहे.
माऊली म्हणजे ज्ञानेश्‍वर महाराज! अमृताशी पैजा जिंकणारी स्पर्धा करेल अशी शब्दकळा त्यांना अवगत होती. ज्ञानेश्‍वरांच्या या शब्दकळेत शिव्या होत्या कां? याचा तपासमात्र घेतला गेलाय. या माऊलीने कुणाला दुखावण्याचा प्रश्‍नच नव्हता. पण ज्ञानेश्‍वरांनीही विषयलंपटांना आपल्या शैलीतून शिव्या दिल्या आहेत, असं कांही विद्वानांनी शोधून काढलंय. रा.चिं. ढेरे यांनी ‘शिवी आणि समाजेतिहास’ या त्यांच्या लेखात अगदी शिवीच्या उगमापासूनचा इतिहास सांगितलाय. मराठीतल्या अनेक शिलालेखांत गाढवांचा उपयोग करून शिव्या दिल्याचे दिसते. याला ‘गधेगाळ’ असं नांव असून, हे गधेगाळ शब्द आणि शिल्प दोन्ही रूपात शिलालेखातून साकारल्याचेही दिसते. आई बहिणींचा आणि गाढवांचा संबंध शब्दरूपात आणि चित्ररूपात व्यक्त करण्याची ही परंपरा केवळ प्राकृत नाही, सुसंस्कृतही आहे. वसईतल्या एका शिलालेखात गाढवाबरोबरच घोड्यांचाही वापर करण्यात आला आहे. रा.चिं. ढेरे यांनी आपल्या लेखात ज्ञानदेवांनी ‘खर’ या दृष्टांताच्या परिच्छेदात जे सांगितलंय त्यातला कांही भाग असा आहे. शिमग्याच्या काळात उगाच अटक मटक ङ्गास्टङ्गूड वळणाच्या शिव्या खूप ऐकायला मिळतात. पण माऊलींची शैली ती माऊलींची शैली. ज्ञानदेवांचा ‘खर’ दृष्टांत आपल्यापुढे ठेवताना ढेरे म्हणतात- ‘साच आणि मवाळ; तसेच मितले आणि रसाळ’ असे अमृतकल्लोळासारखे शब्द त्यांच्या मुखातून स्रवत होते ते ज्ञानदेव, ऋतुजा आणि मधुरता यांचा प्रकर्ष ज्यांच्या वाणीत झाला आहे ते ज्ञानदेव, आपल्या रसनेला शिव्यांचा स्पर्श होऊ देणार नाहीत असे आपणास वाटणे साहजिक अन् स्वाभाविक आहे. विशेषतः सात्त्विक संतापही ज्यांनी कधी जवळ केला नाही, खळांची खळाळता सांडावी याचसाठी ज्यांनी करुणेची शिंपण केली, ते कुणाला शिव्या देतील अशी कल्पनाही करवत नाही. परंतु, आपल्या या अपेक्षेला ज्ञानदेवांच्या मृदु-मधूर वाणीनेही एक सौम्यसा धक्का एकदा दिलेला आहे. तेराव्या अध्यायात अज्ञान विवरणप्रसंगी विषयासक्तीचे वर्णन करताना ज्ञानदेवांनी म्हटले आहे-
खरी टेंको नेंदी उडे|
लातौनी ङ्गोडे नाकाडे|
तर्‍हा जैसा न काढे| माघौता खरु॥
तैसा जो विषयांलागि|
उडी घाली जळतिये आगी|
व्यसनाचि आंगि| लेणी मिरवी॥
(गाढवीण गाढवाला स्पर्श करू न देता, उसळून मागील लाथेने त्याचे नाकाड ङ्गोडते. तरीही, ज्याप्रमाणे गाढव मागे सरत नाही, त्याप्रमाणे विषयासक्त पुरुष जळत्या आगीसारख्या स्त्री देहाचा उपभोग घेण्यासाठी झेपावतो आणि त्या भोगातून प्राप्त होणारी संकटे ही शरीरावरील अलंकारासारखी मिरवितो.)...
हा दृष्टांत म्हणजे ज्ञानदेवांनी विषयालंपटांना दिलेली एक तिखट शिवीच आहे. ‘लोकसाहित्याचा शोध आणि समीक्षा’ या रा.चिं. ढेरे यांच्या पुस्तकातला हा ‘शिव आणि समाजेतिहास’ हा लेख त्यासाठी महत्त्वाचा वाटतो. शिव्या देण्यासाठी त्या याव्या लागतात आणि त्या नुसत्या याव्या लागत नाही, तर त्या कळाव्याही लागतात. त्याशिवाय त्यात ठसका आणि झटका येत नाही. मोठमोठ्या विद्वानांनासुध्दा शिवी कळत नाही. ज्ञानदेवांसारखे शब्दप्रभु जेव्हा शिवी देतात वा कुणी दिलेली शिवी सांगतात, तेव्हा तर, ज्ञानेश्‍वरीची वर्षानुवर्षे पारायणे करणारे, ज्ञानेश्‍वरीवर प्रवचन ठोकणारे आणि समीक्षक म्हणून सदासर्वदा कांहीतरी खरडणारे सुध्दा साङ्ग चकतात. त्यांना त्या शिवीतले सुध्दा कळत नाही.
तुम्हाला गंमत वाटेल, पण ज्ञानेश्‍वरीत एक महान शिवी असल्याचं म.वा. धोंड यांनी शोधून काढलंय. ही महान शिवी स्पष्ट करून सांगण्यासाठी त्यांनी एक लेखच लिहिलाय. ‘ज्ञानेश्‍वरीतील लौकिकसृष्टी’ या पुस्तकात या लेखाचा समावेश आहे. ज्ञानदेवांची महान शिवी सांगताना त्यांनी ज्ञानदेवांच्या कांही लहान शिव्यांचे दाखलेही ‘ज्ञानेश्‍वरी’मधून शोधून काढलेत. त्यात रा.चिं. ढेरे यांनी शोधलेला खर दृष्टांत नाही. पण राजा धृतराष्ट्राला ज्ञानदेवांनी म्हैस म्हटलंय; ही एक शिवीच असं धोंड म्हणतात. असूर चुकूनही खरं बोलणार नाहीत. हे सांगताना ‘ज्ञानदेवांनी त्यांच्या तोंडाला चक्क गांड म्हटले आहे,’ असं धोंड म्हणतात. आणि मग ज्ञानदेव तो अशिष्ट शब्द न उच्चारता नागरूपात तसं सांगतात, असा खुलासाही करतात. धर्मकृत्य हे इहपरलोकी हितकारक असले तरी त्याचा डांगोरा पिटल्याने ते सत्कृत अहितकारी ठरते, हे स्पष्ट करताना त्या डांगोर्‍याला ज्ञानदेव स्वतःच्या जननीस चव्हाट्यावर नागवे करण्याची उपमा देतात...
‘जैसी आपुली जननी|
नग्न दाविलेया जनी’
ही गोष्टही धोंड नोंदवतात आणि मग या सर्वाहून भारी म्हणजे महान शिवी कोणती, याकडे वळतात.
तेवि कुमारू क्रोधू भरे|
तैसेयां मंत्राचि बीजाक्षरे
तिथे निमित्यें ही अपारे| भीनलेया॥
परिधाता ही पाया पडता|
नूढी गतायु पांडुसूता|
तैसा नुपजे उपजविता क्रोधोर्मि तो॥ (१२०/८)
या दोन ओव्यात ही महान शिवी दडलीय. सोनोपंत हांडेकर, साखरे महाराज, म.शं. गोडबोले अशा माऊलीच्या अभ्यासकांनाही ही शिवी गवसली नाही. त्यांनी त्याचा थातूरमातूर अर्थ केला, असे धोंडांचे म्हणणे आहे. शिव्या देणार्‍यांना ‘तुझ्या आईला’ या शब्दापासून सुरू होणार्‍या शिव्या कशा झटपट तोंडातून निघतात, हे सांगायला नको. ‘तुझ्या आईला’ ही सुरुवात आणि तीन शब्दाचा शेवट या आठ अक्षरात निरनिराळी जनावरे पतीखेरीज दुसरा पुरुष अथवा जे सुचेल, वाटेल ते घालून शिव्यांची ङ्गैरी झाडली जाते. धोंड याला ‘कुमार क्रोध क्षोभण’ मंत्र म्हणतात. कुमार म्हणजे पुत्र आणि बीजाक्षरे म्हणजे ‘तुझ्या आईला’ या शब्दापासून सुरू होणार्‍या शिव्या! असे धोंडांचे विवेचन आहे. ते प्रत्यक्षात वाचल्याशिवाय शिव्या आणि त्याचा दर्जा याचे ज्ञान प्राप्त होणार नाही. अशिष्ट भाषा न वापरता शिष्ट मंडळी एखाद्याचा कसा आणि किती उध्दार करतात हे ह्या शिमग्याच्या मुहूर्तावर समजून घ्यायला काय हरकत आहे?
नारायण राणे-उध्दव ठाकरे यांचे शब्दबाण, ठाकरे आणि ठाकरेंसह समस्त शिवसेनेवर नेत्यांवर शिंपडलेला शेणखळा, मुलायम-अमरसिंह यांनी सोनियाजींच्या आड उभ्या झालेल्या समस्त शिखंडींवर चालवलेले शरसंधान आणि ‘बारा’ या आकड्याचे बार भरून बारामतीकर वीर मराठ्यावर समस्त इटालियन बटालियनने चढवलेले हल्ले हा सगळा पोरखेळ आहे. अस्सल शिव्या कशा द्यायच्या याचं शास्त्र आणि शस्त्र या किरकोळ मंडळींना पेलणार नाही. महात्मा ङ्गुले, विष्णुशास्त्री चिपळूणकर, टिळक, आगरकर, अच्युतराव कोल्हटकर, भालाकार भोपटकर, दिनकरराव जवळकर, प्रबोधनकार ठाकरे आदि खानदानी घराणी या क्षेत्रात मराठदेशी होऊन गेले आहेत. प्रत्येक गोष्ट संस्कृती परंपरेच्या अभ्यासासाठीच असते, असे भासवणार्‍या चमनगोट्यांना स्मरून सांगतो. शिवीगाळीसारखा निंद्य सामाजिक आचारही सांस्कृतिक परंपरेचा वेध घेण्यासाठी कसा अभ्यासनीय आहे हे यावरून लक्षात यावे म्हणून हे लिहितोय. ..................... हरीश केंची

लोकशाही... संसदीय की अध्यक्षीय

लोकशाही... संसदीय की अध्यक्षीय 
घटना कोणत्याही प्रकारची असली तरी तिचं यश हे राबवणार्‍यांवर अवलंबून असतं. त्यांची राज्य पध्दतीवरील निष्ठा आणि जनतेचं कल्याण करण्याची वृत्ती, यावर सर्व ठरतं. राजेशाही हा हुकूमशाहीचाच प्रकार आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे लोकांना हवंहवंसं वाटणारं राज्य होतं. गुजरातमध्ये बडोद्याला सयाजीराव गायकवाडांची राजवट जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणारी होती. आजही अनेक राजांची नांवं इतिहासात आदराने नोंदली गेली आहेत. नेतृत्व जर भ्रष्ट असेल तर कितीही उत्तम राज्यव्यवस्था असली, तरी तिची वाटच लागणार. भारतातल्या सर्व मतदारांना आणि लोकशाहीलाही आता ही सवय झालीय. आता भारतात यापुढे होणार्‍या प्रत्येक निवडणुकीत कुणालाही बहुमत मिळणार नाही. देशातल्या मतदारांचे एकूण रंगढंग पाहता असं दिसतंय की, यापुढे देशात राजकीय पेचप्रसंगही उभा राहील. देशात आज अनेक राज्यांत विविध पक्ष सत्तेवर आहेत. आज मूल्याधिष्ठित राजकारणाऐवजी व्यक्तिनिष्ठ राजकारणाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे लोकशाही संसदीय असावी की अध्यक्षीय याबाबत चर्चा व्हायला हवीय.
१९६७ मध्ये नऊ राज्यांत कॉंग्रेस हरली, तेव्हा या आघाडीच्या राजकारणाला प्रारंभ झाला. संयुक्त विधायक दल इत्यादि स्वरूपात आघाडी सरकारं अस्तित्वात आली. परंतु आघाडी सरकारांचं बस्तान ना कधी राज्यात बसलं, ना केंद्रात. प्रत्येकवेळी घटक पक्षांमध्ये मतभेद होऊन सगळी सरकारं कोसळली. याला गेल्या कांही वर्षात अपवादही सिध्द झालाय. राज्यातलं आघाडी सरकार कोसळलं आणि कोणीही सरकार बनवू शकत नसेल तर राष्ट्रपती राजवट जारी करता येते. राज्यपालांमार्ङ्गत कारभार सुरू होतो. परिस्थिती स्थिरस्थावर झाली की, निवडणुका घेता येतात. असं वारंवार घडलं तरी राज्याची सूत्रं राज्यपाल सांभाळू शकतात. देशातील अनेक राज्यांमध्ये आजवर अनेकदा राष्ट्रपती राजवट आली आहे. परंतु, केंद्र सरकारबाबत अशी काही सोय नाही. राज्य घटनानिर्मिती झाली त्यावेळी घटनाकारांना वाटलं असेल की, ब्रिटिश पध्दतीच्या संसदीय लोकशाहीची पाळंमुळं खोलवर रूजतील, चांगल्या प्रथा निर्माण होतील आणि पंतप्रधान व मंत्रिमंडळ असलेली संसदीय लोकशाही वाढीस लागेल.
ब्रिटनची घटना अलिखित आहे. आजवरच्या वर्षानुवर्षाच्या अनुभवातून त्यांची आजची राज्यपध्दती विकसित झालीय. काळाच्या ओघात त्यात आणखीही बदल होतील. या पध्दतीचा मूलाधार आहे, संसदेत कोणत्यातरी एका पक्षाचं पूर्ण बहुमत. आतापर्यंत ब्रिटनमध्ये हुजूर, मजूर किंवा उदारमतवादी पक्षांचीच सरकारं आली आहेत. जगात अनेक मतमतांतरं असलेले लोक असतात. आपापल्या तत्त्वज्ञानानुसार ते पक्ष-पंथ काढतात. रचनात्मक तत्त्वज्ञानापासून गोंधळवादावर विश्वास असलेल्यांपर्यंत अनेक गट जगभर पसरले आहेत. त्यांना प्रत्येकाला वाटतं की, सत्तासुकाणू आपल्या हाती असावं. त्या अनुषंगानं त्यांचे पक्ष बनतात. विश्‍व शांततावादीपक्ष, पर्यावरणाची काळजी घेणार पक्ष, मुक्त जीवनाचा पुरस्कार करणारा पक्ष, आदि राज्यशकटाच्या दोन चाकासारख्या असलेल्या दोन पक्षांवर आधारित ब्रिटिश लोकशाहीसुध्दा या नवनव्या विचारांमुळे डळमळू लागली आहे. राजकारणात अनेक तत्त्वं येतात. तेव्हा त्यांना दोनच पक्षांत सामावणं कठिण असतं. उदा.- मजूरपक्षाचे काही लोक आणि हुुजूरपक्षाचे कांही लोक पर्यावरणवाद न मानण्याच्या मुद्द्यावर एकत्र येऊ शकतात. त्यामुळे विविध पक्षोपपक्षांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. नवनवे पक्ष निर्माण होताहेत. इंग्लंडमध्ये हुजूरपक्ष आणि उदारमतवादी पक्ष यांच्या तत्त्वज्ञानातला थोडाथोडा भाग घेऊन लिबरल डेमोक्रॅट पक्ष उदयाला आला आहे. लोकशाहीत दोनच पक्ष आमने-सामने खडे असतील तर बहुमत कुणाला, हे ठरवणं सोपं जातं. परंतु तीन किंवा अधिक पक्ष असले की, कुणालाही स्पष्ट बहुमत मिळणं अशक्य होतं. एखादा पक्ष ङ्गारच मजबूत असेपर्यंत बहुमताचा प्रश्‍न येत नाही. भारतात अनेक पक्ष असूनसुध्दा कॉंग्रेसने सतत बहुमत मिळवून संसदीय लोकशाही पध्दतीने सरकार बनवलं, हा अपवाद आहे. सतत पंचेचाळीस वर्षं एकच पक्ष अशा पध्दतीत सत्तेवर राहणं हे कॉंग्रेसनं करून दाखवलं. पण आता याच चमत्काराला ओहोटी लागली आहे. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना यावर मत व्यक्त करताना एका मुलाखतीत म्हटलं होतं की, ‘ब्रिटनची राज्यपध्दती त्यांच्यासाठी योग्य आहे. कारण तिथे दोनच पक्ष आहेत; परंतु आपल्याकडे अनेकपक्ष असल्याने ती पध्दत आपल्याला उपयुक्त नाही.’ त्यांचा रोख कॉंग्रेसच्या राजकीय परिस्थितीवर होता. नरसिंह राव सरकार रोखे घोटाळा, साखर घोटाळा, खासदार खरेदी अशा अनेक गडबडीमुळे राव यांना न्यायालयीन आरोपी म्हणून उभं रहावं लागलं होतं. त्यानंतरही आलेल्या कॉंग्रेस आघाडी सरकारच्या कारभाराच्या दिशेने होतं. अटलजींनी राज्यातील निवडणुकांबाबतही म्हटलंय, वेगवेगळ्या राज्यात अनेक पक्ष सत्तेवर आल्याने देशात आता एकाच पक्षाचं राज्य राहील याची शक्यता नाही. राज्यात विविध पक्ष सत्तेवर आले तर ठीक, पण लोकसभेचे काय ? केंद्र सरकारचं काय ? ५४० जागा असलेल्या लोकसभेत चार मोठे आणि कांही लहान पक्ष आले तर एकाच पक्षाच्या स्पष्ट बहुमताची शक्यता नाही. त्यातून सध्याची संसदीय पध्दत अशक्य होईल. इंग्लंडमध्येही तसंच होतंय. कॅनडा, ऑस्ट्रेलिया या देशामध्ये दोनच प्रमुख पक्ष असल्याने अजून तरी ब्रिटिश पध्दतीची लोकशाही तिथे राबविली जात आहे. आपल्याकडे मात्र एकाच पक्षाच्या बहुमताची शक्यता नाही आणि आघाडीचं सरकार टिकविण्याचीही शक्यता नाही. कारण अटलजींनी हा अनुभव घेतलाय. तेरा दिवसांचे पंतप्रधान पद, त्यानंतर तेरा महिन्यांचे पंतप्रधान पद त्यांच्याकडून आल्यानंतर त्यांनी त्यांचंच म्हणणं खोटं ठरवित पांच वर्षांची टर्म पुरी केलीय. आज मनमोहनसिंग सरकार प्राप्तपरिस्थितीत आपली टर्म पूर्ण करतील. एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढविल्यानंतर सत्तेसाठी एकत्र येणं अनेकांना क्रमप्राप्त झालं आहे. निवडणुकानंतर कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही तर आघाडी सरकार येणं प्रत्येकवेळा सोपं असेल, असं नाही. कारण, अनेक पक्ष परस्परांच्या वार्‍यालाही उभे राहात नाहीत. लोकसभाध्यक्ष सोमनाथ चटर्जी यांच्यासह अनेकांना यासंदर्भात चिंता वाटते. सर्वांनाच धास्ती आहे. अशा राजकीय रोगावरचा इलाजही आपल्याकडे नाही. गलिच्छ राजकारणाने कळस गाठला आहे. जर पुन्हा एकाच पक्षाला बहुमत मिळाले नाही तर... या परिस्थितीत ब्रिटिश पध्दतीच्या संसदीय लोकशाहीचा त्याग करावा काय? सध्याच्या पद्धतीमध्ये लोकसभेत बहुमत असलेल्या पक्षाचा नेता पंतप्रधान होतो आणि सर्व सत्ता त्याच्याच हाती असते. राष्ट्रपती आणि सरसेनापती असले तरी ते नामधारी पद आहे. ब्रिटनमध्ये ते राणीचं स्थान आहे. आणि तिथेही संसद पंतप्रधानांमार्ङ्गत राज्य करते. आपल्याकडे प्रौढ मताधिकारातून लोकप्रतिनिधी निवडून येतात. केंद्रसरकार लोकांनी निवडून दिलेलंच असलं पाहिजे आणि ते स्थिर असणंही जरुरीचं आहे.
ब्रिटिश पध्दतीच्या संसदीय लोकशाहीला पर्याय म्हणजे अमेरिकन धर्तीची अध्यक्षीय लोकशाही. अमेरिका, ङ्ग्रान्स, जर्मनी आदि देशांत ही पध्दत यशस्वीरित्या कार्यरत आहे. आपल्याकडे भरमसाठ पक्ष निर्माण होत असतात. अनेकपक्षांचे तुकडे पडतात. नेत्याच्या नांवावरून हे गट ओळखले जातात. राजकीय स्वातंत्र्याचा हा तोटा म्हणा हवा तर, पण त्याला पायबंद घालता येत नाही. म्हणूनच आजच्या परिस्थितीत पर्याय म्हणजे अध्यक्षीय पध्दत. अमेरिकेत अध्यक्षीय पध्दत असली, तरी तिथेही ब्रिटनसारखेच दोन पक्ष आहेत. डेमोक्रेट आणि रिपब्लिकन. आपल्याकडे अनेक पक्ष असल्याने अध्यक्षीय पध्दतीला ङ्गे्रंच, इटालियन किंवा जर्मन पध्दतीची जोड द्यावी लागेल. आपल्याकडे एकमत अधिक मिळविणाराही निवडून येऊ शकतो. त्यामुळे पक्षाला मिळालेली मतं आणि जागा यांचा काही ताळमेळ नसतो. केवळ ३५ टक्के मतं मिळविणार्‍या पक्षाला सत्तर टक्के जागा मिळाल्याचं उदाहरण आहे. अलीकडेच महापालिका निवडणुकांतूनही हे कांही प्रमाणात सिध्द झालंय. वाटेल तेवढे पक्ष आणि मतांची टक्केवारी व जागा यातला विसंवाद दूर करण्यासाठी मतांच्या प्रमाणात प्रतिनिधीत्व ही पध्दत योग्य ठरेल. ज्या पक्षाला जेवढी मतं मिळतील, त्या प्रमाणात लोकसभेतील जागा त्या पक्षाच्या वाट्याला येतील. त्यामुळे एखादा छोटा पक्ष मोठ्या पक्षाच्या साठमारीत नामशेष होतो. तसं न घडता त्या पक्षालादेखील एखादं-दोन जागा पदरात पाडता येतील. अध्यक्षाच्या हाती सत्ता असलेली लोकशाही आणण्यासाठी सध्याची ब्रिटिश धर्तीची पध्दत पूर्णपणे रद्द करावी लागेल. अध्यक्षीय पध्दतीत राष्ट्रप्रमुखाची निवडणूक सबंध देशभरात मतदान घेऊन होते. संसदेत मात्र विविध पक्षांचे निवडून आलेले प्रतिनिधी बसवतात आणि अध्यक्ष त्यावर लक्ष ठेवतात. अनेक पक्षांमुळे आघाडीची सरकारं बनतात-पडतात. अशावेळी अध्यक्ष कारभार पाहतात. अध्यक्षांनी बेदरकारपणा दाखवला तर सर्वोच्च न्यायालय त्याची दखल घेतं. आपल्याकडे खरी सत्ता पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या हाती असते. राष्ट्रपती नामधारी राष्ट्रप्रमुख. पंतप्रधान व मंत्रिमंडळ नसेल तर राष्ट्रपती राज्य चालवू शकत नाहीत. चरणसिंग, चंद्रशेखर, देवेगौडा, गुजराल आणि वाजपेयी यांच्याकाळात अल्पमतातील सरकारं होती. तरीही नांवापुरते का होईना पण ते पंतप्रधान होते. त्यांना काळजीवाहू पंतप्रधान ठेवून राष्ट्रपतींनी निवडणुका घेतल्या. असं केव्हातरी घडतं. राष्ट्रपतींनी असं पाऊल उचलण्याची तरतूद घटनेत नसली, तरी त्याला विरोधही नाही. अडचणीतून पार होण्याचा तो एक मार्ग. पण आता बहुमत नसण्याचा पेचप्रसंग सारखाच उद्भवू लागला तर त्यासाठी कायमी उपाय शोधावा लागेल.
अध्यक्षीय पध्दत आणि प्रमाणात प्रतिनिधीत्व अशी सुधारणा करण्यासाठी घटना बदलावी लागेल. त्यासाठी नवी घटनासमिती किंवा खासदारांच्या दोन तृतियांश बहुमताची आवश्यकता आहे. अर्थात, घटनेत तशी तरतूद नाही. तीही सर्वानुमते करावी लागेल. असा घटनाबदल आणि अध्यक्षीय पध्दती शक्य आहे का ? ते शक्य झालं आणि अध्यक्षीय लोकशाही अवतरली तरी देशाची सर्व सत्ता सांभाळू शकणारा अध्यक्ष सतत मिळू शकेल कां ? सर्वंकष सत्तेची चटक लागलेला एखादा नेता घटना गुंडाळून स्वत:च सरमुखत्यार बनला तर?घटना कोणत्याही प्रकारची असली तरी तिचं यश हे राबवणार्‍यांवर अवलंबून असतं. त्यांची राज्य पध्दतीवरील निष्ठा आणि जनतेचं कल्याण करण्याची वृत्ती, यावर सर्व ठरतं. राजेशाही हा हुकूमशाहीचाच प्रकार आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे लोकांना हवंहवंसं वाटणारं राज्य होतं. गुजरातमध्ये बडोद्याला सयाजीराव गायकवाडांची राजवट जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणारी होती. आजही अनेक राजांची नांवं इतिहासात आदराने नोंदली गेली आहेत. नेतृत्व जर भ्रष्ट असेल तर कितीही उत्तम राज्यव्यवस्था असली, तरी तिची वाटच लागणार.अध्यक्षीय पध्दतही नीट राबवता आली नाही तर अंदाधुंदी किंवा शेवटी लष्करशाही असं अनेक देशांत घडलंय. ज्यांना संसदीय किंवा अध्यक्षीय लोकशाही पचली नाही, त्यांचं असं झालं. आपल्या लोकशाहीचं रक्षण ही आपल्याच हातातली गोष्ट आहे. .................. हरीष केंची

अखेर राज 'लवंड'ले.....!

"परिस्थिती माणसाला शहाणं बनवतं, पण कधी कधी  आपली बुद्धी, शहाणपण, विचार, आचार आणि स्वाभिमान गहाण टाकायलाही भाग पाडतं. अशीच अ...