Sunday 23 April 2017

जातिनिर्मूलन हे हिंदुत्वापुढचे आव्हान...!

*जातिनिर्मूलन हे हिंदुत्वापुढचे आव्हान...!*

नुकताच गुढीपाडवा झाला! हिंदू नववर्षाचा प्रारंभ! शालिवाहन शकाचा प्रारंभ! यानिमित्तानं हिंदुधर्मीयांचं संघटन व्हावं यासाठी पुण्यात, ठाण्यात, गिरगावात, डोंबिवलीत, कल्याणात हिंदू संस्कृती दिन, हिंदुत्व दिन साजरा झाला. मिरवणुका निघाल्या, जयघोष झाले. देशात 'नरेंद्रशक्ती' अवतरल्याने काहींना जोर आला आहे. उत्तरप्रदेशच्या निवडणुकीतील विजयानंतर तर हिंदुत्वाच्या पुरस्काराच्या बाता मारल्या जाताहेत. पण खऱ्या अर्थानं सर्वसमावेशक असं हिंदुत्व अस्तित्वात येईल का? हा खरा प्रश्न आहे. हिंदू आणि हिंदुत्ववादी मंडळी हिंदुधर्मीयांमधील जातीयता जोवर साफ करीत नाहीत तोपर्यंत त्यांना हिंदू आणि हिंदुत्वाला राष्ट्रीयत्वाचा मुकुट घालता येणार नाही. जातीभेद नष्ट करण्याची क्षमता धर्मनेतृत्वात नाही तशी ती आजी माजी हिंदुत्ववाद्यातही नाही. आपली ही नालायकी झाकण्यासाठीच ते मुस्लिम आणि ख्रिस्त्यांच्या कट्टरतावादाकडे बोट दाखवत असतात. ती मुस्लिमांची कट्टरता मोडून काढण्याचीही जरुरी आहे. परंतु त्यासाठी प्रथम हिंदूंमधील जातीभेद मोडून काढावा लागेल. जातीभेद, देववाद, दैववाद यासारखे शक्तिपात करणारे भेद पोटात साठवून भारताच्या अखंडतेला पोखरणाऱ्या हिरव्या, पांढऱ्या किड्यांना साफ करता येणार नाही. त्यासाठी आपल्या धर्माचा अहंकार आणि त्याचा गैरवापर प्रथम खाक करायला हवाय. याचं भान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक सरसंघचालक डॉ. केशवराव हेडगेवार यांना होत. म्हणूनच त्यांनी संघाचं नाव निश्चित करताना 'हिंदू' शब्द बाजूला ठेवून 'राष्ट्रीय' शब्दाचा स्वीकार केला. या दृष्टिकोनाचामागचा अचूकपणा सांगणाऱ्या प्रसंगाची नोंद गोळवलकर गुरुजींच्या 'विचारधन' ग्रंथात नमूद केली आहे. डॉ.हेडगेवार यांच्या विचाराने संघाची वाटचाल झाली असती तर आजचे हे संघाचे स्वरूप पूर्णपणे वेगळे असते. दुर्दैवाने डॉ.हेडगेवार यांचे निधन लवकर झाले अन संघावर गोळवलकर गुरुजींच्या विचारांची पकड झाली अन संघ राष्ट्रीय न राहता हिंदूंपुरताच राहिला.

मुंबईच्या दादर रेल्वे स्थानकाच्या पूर्वबाजूस 'हिंदू कॉलनी' आहे. तिथे राहणाऱ्या काहींना यातील 'कॉलनी' हा परकीय शब्द खटकला. तो बदलण्यासाठी ते एकत्र जमले होते. त्यावेळी मुंबईत आलेल्या हेडगेवारांना त्यांनी मार्गदर्शनासाठी बोलावलं. तेव्हा आपलं मत देताना डॉ. हेडगेवार म्हणाले, " तुम्ही कॉलनी शब्दांपेक्षा हिंदू शब्द प्रथम बदलला पाहिजे". त्याने तिथे जमलेल्यांपैकी कट्टर हिंदूंना धक्का बसला. त्यांनी 'तुम्ही कट्टर हिंदू असतानाही हिंदू शब्दाला तुमचा विरोध का?' असा प्रश्न डॉ.हेडगेवारांना केला. तेव्हा त्यांनी उत्तर दिलं, "माझा हिंदू शब्दाला विरोध नाही. परंतु विशिष्ट संदर्भात त्याचा उपयोग करण्यास माझा विरोध आहे. हिंदुस्थानात 'हिंदू कॉलनी' कशी असू शकेल? इथे इंग्रज आले आणि विशिष्ट भागात राहिले अन त्याला 'ब्रिटिश कॉलनी' संबोधलं तर आपण समजू शकतो. तसंच इंग्लंडमध्ये वास्तव्य करणाऱ्या हिंदूंनी तिथल्या विशिष्ट भागाला 'हिंदू कॉलनी'नांव देणं मी समजू शकतो. परंतु इंग्लंडमध्ये ब्रिटिश कॉलनी, अमेरिकेत अमेरिकन कॉलनी आणि हिंदुस्थानात हिंदू कॉलनी या कल्पनाच तर्कविसंगत आहेत" अर्थात त्यांचं म्हणणं कुणी ऐकलं नाही. दादरचा तो परिसर आजही 'हिंदू कॉलनी' म्हणूनच ओळखला जातो तथापि त्यांनी आपल्या संघटनेला 'हिंदू' ऐवजी राष्ट्रीय हे का दिलं हे त्यावरुन स्पष्ट होते.

आपल्या देशाचा 'राष्ट्रीय' या शब्दाचा अर्थ स्वाभाविकपणे हिंदू हाच आहे. म्हणून मुद्दाम हिंदू शब्द उपयोजण्याची गरज नाही. असं डॉ.हेडगेवार यांचं म्हणणं होतं. त्यांनी राष्ट्रीयत्वातच हिंदू आणि हिंदुत्व पाहिलं होतं.त्यांची ही भूमिका हिंदू-अहिंदू हा भेद संपवणारी आहे. पण त्यांचं म्हणणं हिंदू कॉलनीवाल्यांप्रमाणेच गोळवलकर गुरुजींनी स्वीकारलं नाही. त्यांनी हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व ही भूमिका मांडली. पुढे संघ स्वयंसेवकांनी हेडगेवारांच्या विचारापेक्षा गोळवलकरांच्या विचारांना प्राधान्य दिलं. आज त्याचाच घोषा दिल्लीतील नेत्यांपासून गल्लीतील कार्यकर्त्यांपर्यंत लावला जातो आहे.

शीख, जैन, बौद्ध हे हिंदू धर्माचाच एक भाग असल्याचे संघाचे नेते नेहमी म्हणत. एकदा शिखांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांना थेट अल्पसंख्यांक आयोगापुढे उभं केलं आणि शीख हा स्वतंत्र धर्म असल्याचं मान्य करायला लावलं. जैन, शीख, बौद्ध हे अल्पसंख्याक आहेत परंतु त्यांना स्वतंत्र ओळख असली तरी या धर्माच्या निर्मितीची मती आणि माती भारताचीच असल्याने त्यांना विशेष अधिकार नाहीत. या पार्श्वभूमीवर हिंदुधर्मीय भारतात बहुसंख्यांक ठरले पाहिजेत. ताज्या जनगणनेनुसार भारतीय लोकसंख्येत ८० टक्के हिंदू आहेत. तथापि हा ८० टक्के हिंदू समाजदेखील अल्पसंख्यांकांचा फाकट पसारा आहे. जाती-जमाती, पोटजाती-उपजाती आणि उच्चनीचतेच्या जातीय कात्रीने हिंदुधर्माच्या चिंधड्या केल्या आहेत. यामुळेच हिंदूंत ब्राह्मण अल्पसंख्यांक आहेत. ब्राह्मणात देवरुखे ब्राह्मण अल्पसंख्यांक तर किरवंत दलित आहेत. हाच प्रकार इतर जातीतही आहे. प्रत्येकाचे देव वेगळे, दैवते वेगळी, रीतिरिवाज वेगळे! फक्त दुसऱ्या जातीच्या , पोटजातीच्या तुच्छ लेखण्याची भावना तेवढी सारखी. कारणपरत्वे या जाती हिंदू म्हणून एकत्र आल्या तरी त्यानं संघटीतपणा नसतो. कारण प्रत्येकजण आपल्या जाती, पोटजातीचा, जमातीचा वेगळेपणा शाबूत ठेवून एकत्र आलेला असतो. जाती भावनेच्या वर्चस्वामुळे हिंदूंत धर्मासाठीचा संघटीतपणा, कडवेपणा दिसत नाही. क्वचितप्रसंगी दिसला तरी तो जुजबी असतो, फसवा असतो. यामुळेच 'हिंदू संघटन' हे महत्त्वाचं उद्दिष्ट असलं तरी ते फार दूर राहिलं आहे. जाती संस्था हाच हिंदू संघटनेतला मुख्य अडसर आहे. हा अडसर असेपर्यंत भारतात हिंदू कधीही बहुसंख्यांक होऊ शकणार नाहीत. हिंदू बहुसंख्यांक होण्यासाठी जाती संस्थेचा नायनाट हाच एकमेव इलाज आहे. परंतु सगळेच पक्ष, संघटना जातीचे हिशेब करून आपले डाव टाकतात, विचारवाद रेटतात. राजकारण खेळतात.हे ढोंगच अल्पसंख्यांकांना चिथावणारे आणि हिंदूंनाही अल्पसंख्यांक करणारे आहे. नव्या वर्षाच्या नव्या संकल्पामध्ये जातीव्यवस्था मोडण्याचा संकल्प का असू नये? हिंदुत्व दिनाच्या निमित्ताने हे व्हायला हवं! नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...!
-हरीश केंची

प्रभंजन साठीचा लेख.

मतलबी राजकारण्यांची पलटणच उभी आहे!

*मतलबी राजकारण्यांची पलटणच उभी आहे*

"कर्मकांडाच्या, पुरोहितशाहीच्या, जन्माधिष्ठित उच्च नीचतेच्या, विषमतेच्या चक्रव्यूहात राष्ट्रीय पुनरुत्थानाच्या नावाने कुणी समाजाला गुंतवू बघत असेल तर त्याचा प्राणपणाने मुकाबला करण्याची तयारी पुरीगामी विचारांवर श्रद्धा ठेवणाऱ्यांना करावीच लागेल. उत्तर पेशवाईचा उल्लेख कुणी केला की काही मंडळींना कळमळायला होतं. रयतेच्या रक्षणाची, उदरनिर्वाहाची जबाबदारी न पाळण्याचा, फुकटखाऊ, भिक्षुक, उनाड बाया यांचे तांडे पोसण्याचा प्रकार करणारे राज्यकर्ते होऊन गेले याची आठवण काढण्याने जर कुणाला दुःख होत असेल तर अशी वेळ समाजावर पुन्हा येऊ नये याची खबरदारी या मंडळींनीच घ्यायला हवी."

          लोकसभेनंतर झालेल्या सर्व निवडणुकीत केवळ काँग्रेसचाच नव्हे तर सर्व समाजवादी विचारांच्या पक्षांचा दारुण पराभव झाला आहे. विचारसामर्थ्य शक्तिशाली असले तरी व्यक्तिदोषामुळे हा पराजय झाला आहे. आपसातले संघर्ष, ते मिटवण्याच्या नावाखाली चाललेली अटीतटी, दिलजमाईचे प्रदर्शन आणि कुजकी टोमणेबाजी यामधून काँग्रेसवाल्यांना बाजूला काढून पुरोगामी विचारापर्यंत आणण्याचे काम आज व्हायला हवे. सत्ता जिंकण्यासाठी देवाधर्माचा वापर करण्याचा, तो करता यावा म्हणून वेगवेगळ्या संघटना उभारण्याचा, त्यांच्याद्वारा श्रद्धावान भाबड्या जनसामान्यांना खोट्यानाट्या गोष्टी ऐकवून फितवण्याचा, विशिष्ट राजकीय पक्षासाठी त्यांना वापरण्याचा उद्योग या देशात पद्धतशीरपणे केला जातो आहे. जन्मजात उच्च-नीचतेविरुद्ध, विषमतेविरुद्ध, अंधश्रद्धा आणि अन्याय यांच्याविरुद्ध लढणाऱयांना आपसात लढायला लावण्याचा अथवा निष्क्रिय बनवून निरुपयोगी करून टाकण्याचा जोडधंदाही याच मंडळींनी प्रभावीपणे चालवला आहे. याला रोखण्याचे सामर्थ्य फक्त पुरोगामी विचारातच आहे. राजकारणात मतलब सांभाळणे ही बाब आता अनिवार्यच झाली आहे. एखाद्या व्यक्तीने आपल्या मतलबासाठी एका पक्षाला सोडचिठ्ठी देऊन दुसरा घरोबा केला की, ती व्यक्ती उठवळ! पण एकमेकाला संपविणे हेच ध्येयधोरण असलेले दोन पक्ष जेव्हा मतलबासाठी एकत्र येतात तेव्हा? मतलबासाठी पक्षबदल करणाऱ्यात आदर्श म्हणवले जाणारे राजकारणीही आहेत. हे लक्षात घ्यावे लागेल.

काँग्रेसपक्षाला या निवडणुकांतून फार मोठे अपयश आले. पण हे अपयश एकदम काँग्रेसच्या माथ्यावर कोसळलेले नाही. ते गेली दहा-पंधरा वर्षे एक एक पावलाने येतच होते. काँग्रेसने गरिबांशी, दलितांशी, उपेक्षितांशी, अल्पसंख्य समाजघटकांशी, समाजातल्या परिवर्तनाला सदैव निष्ठेने साथ देणाऱ्या मध्यमवर्गीयांशी प्रतारणा केली त्यामुळेच अपयश काँग्रेसला झोम्बु लागले. काँग्रेस धनिकांच्या दावणीला बांधली गेली आणि सदासर्वदा स्वार्थाचा रवंथ करणाऱ्या बैलांनी फक्त आपल्या गोतावळ्यापुरतीच काँग्रेस आहे असे वर्तन करुन काँग्रेसबद्दल जनमानसात अप्रिती वाढविली. काँग्रेस अशीच राहावी असा प्रयत्न करणारे महाभाग आजही आहेत. काँग्रेसला बदलावे लागेल. काँग्रेस पुन्हा लोकांची झाली नाही तर काँग्रेस नक्कीच संपेल. शाहू, फुले, आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या आचार-विचारातच काँग्रेसला पुन्हा सामर्थ्य देण्याची शक्ती आहे. काँग्रेसवाल्यांना या निकालांनी आपण पुरे झोपलो नाही हे दाखवून देण्याची संधी प्राप्त झाली. प्रचारादरम्यान मतलबासाठी चालवलेल्या आरोप प्रत्यारोपांनी आपले कापलेले नाक मिरवत वावरण्याचा उद्योग काँग्रेसवाल्यांनी चालविला होता. आपल्याच हाताने आपला गळा कापून घेण्याचे प्रयोगही केले गेले, अशावेळी आपल्या बगलबच्यांना टाळ्या वाजवायला लावले जात होते याकडे गांभीर्याने पाहिलेच गेले नाही. उत्तरकाळात पेशव्यांच्या नालायकीने मराठी सत्ता ग्रासली हे खरे; पण ह्या नालायक पेशव्यांना त्यांच्या तोडीस तोड नालायकी करणारे मराठे सरदारही आपल्या सर्व दुर्गुणासह पुरेपूर साथ देत होते. हा इतिहास झाकून ठेवता येणार नाही. आज उत्तर पेशवाईतल्या प्रमाणे सत्ताधारी रंगढंग दाखवत असतील तर त्याला कारण नांदेड, लातूर, सांगली, पुणे, सातारा, सोलापूर, नगर, बारामतीचे आपसात लढण्यात दंग असलेले काँग्रेसवालेच आहेत. या सगळ्यांनी लोकहितासाठी लढण्याचे, गोतावळ्यात गुंतून न पडण्याचे आणि सामाजिक समता, सहकार, समृद्धी यासाठी सर्वशक्ती वेचण्याचे ठरवले तर लोकही त्यांना साथ देतील.

पराभवानंतर झालेल्या आत्मचिंतनात 'आपण सगळे सध्याच्या परिस्थितीत जागरूक आणि संघटित राहिल्यास राज्यातील सत्तेत फसगतीने झालेला तात्पुरता बदल दुरुस्त झाल्याशिवाय राहणार नाही'. असे म्हटले गेले. यातल्या 'आपण सगळे' याची व्याप्ती केवढी? 'आपण सगळे' ही भावना घेऊन काँग्रेस खरोखरच उभी राहणार आहे? दिलजमाई पर्व सुरु असताना कळवळून 'निदान भांडणासाठी तरी काँग्रेस शिल्लक ठेवा' असं विलासरावांनी म्हटलं होतं याची आठवण झाली. लोकांना झुळविण्यासाठी देवाधर्माचा उपयोग करण्याचे तंत्र साधलेली मंडळी भावनांचा प्रक्षोभ घडविणारे नाना विषय स्वतः नामानिराळे राहून उपस्थित करणार आहेत. काशी-विश्वेश्वर आणि मथुरेच्या श्रीकृष्णापासून गल्लीतल्या मारुती गणपतीपर्यंत देवांचा वापर करून लोकांच्या भाबड्या श्रद्धांना हात घातला जाईल. नको ते घडविले जाईल. हा देश, समाज आपल्या महत्वाकांक्षेपायी भरडून टाकण्याची टोकाची भूमिका घेतली जाईल. हे तुफान रोखण्यासाठी दिलजमाई व्हायलाच हवी. हातात हात गुंफून दृढ विश्वासाने उभे राहण्यासाठी लोक पुढे यायला हवेत. माणसे जोडली जायला हवीत. महात्मा गांधींनी देशाच्या कानाकोपऱ्यात 'करेंगे या करेंगे' ही जिद्द जागवली तशी जिद्द जागवायला हवी.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी माणूसपण गमावलेल्या माणसात जो आत्मविश्वास, स्वाभिमान जागवला तसा आत्मविश्वास, स्वाभिमान पुन्हा जागवण्यासाठी सर्वंकष प्रयत्न व्हायला हवेत. महात्मा फुले यांनी ज्या त्वेषाने अन्यायाला टकरावर टकरा देऊन समानतेचे वारे समाजात खेळते ठेवले ती तडफ लोकांत निर्माण होईल असे वातावरण जाणीवपूर्वक ठेवण्याचे भान आपण दाखवले पाहिजे. काँग्रेसवाल्यांच्या वृत्तीत बदल घडला तर सत्तेत बदल घडणे कठीण नाही. पुरोगामी विचारात जनआंदोलन उभे करण्याची ताकद आहे. रामकृष्णांना रथात घालून भाजपेयींनी दौड केली. शिवाजी महाराजांना शिवसेनेच्या मावळ्यांनी कडेकोट किल्ल्यात ठेवलंय. आंबेडकरांना दलित दुसऱ्या कुणाच्या हाती लागू देत नाहीत. महात्मा गांधींना आपण कधीच 'हे राम' म्हणायला लावलंय. आता काँग्रेसला आधार केवळ या विचारांचाच आहे.
- हरीश केंची,

प्रक्षोबाची धुरी पेटवा, दडलेल्यांना बाहेर खेचा...!

*प्रक्षोभाची धुरी पेटवा, दडलेल्यांना बाहेर खेचा...!*


इन्ट्रो
"दूरचित्रवाहिन्यांच्या विविध वाहिन्यांवरून गुन्हेगारविषयक कार्यक्रम सादर केले जातात. या साऱ्याच कार्यक्रमातून एखादी दुसरी घटना सोडली तर, व्याभिचाराच्या, वासनाकांडाच्या आणि बलात्काराच्या बातम्यांच प्रामुख्याने आढळून येतात. देशात आणि राज्यात अशा अनैतिक, व्याभिचार, लैंगिक अत्याचाराचे प्रमाण वाढत असताना नांदेड इथल्या केला महिलेवर अत्याचार करुन तिच्या देहाची विटंबना करीत गटारीत तिचा मृतदेह टाकून देण्यात आला. या प्रकाराने उभा मराठवाडा हादरून गेला. यापूर्वी घडलेल्या कोपर्डी वा इतर घटनांपेक्षा अत्यंत भयानक अशी ही घटना आहे. नांदेडच्या जनतेने बंद पुकारुन आपल्या भावना किती तीव्र आहेत हे दाखवून दिलं आहे. अद्याप सरकार मात्र ढिम्म आहे. ते नराधम अद्यापही उजळ माथ्याने फिरताहेत."

मीना नक्का ही गरीब घरातील सुस्वरूप तरुणी, पोटाची खळगी भरण्यासाठी विड्या वळण्याचे काम करीत होती.नांदेडातल्या नल्लागुट्टा चाळ येथे राहणारी ही तरुणी २४ जानेवारी रोजी तयार केलेल्या विड्या कारखान्यात देऊन परतत असताना भरदुपारी दीड वाजता तिचे अपहरण करण्यात आले. तिला मिळालेल्या मजुरीचे पैसे, अंगावरचे दागिने लुटण्यात आले, तिच्यावर पाशवी बलात्कार करण्यात आला. एवढंच करून ते नराधम थांबले नाहीत, तर तिचा खून केला आणि तिला विवस्त्र करून तिचा मृतदेह पक्कीचाळ परिसरातील गटारात फेकून दिला. घरी न परतल्याने तिच्या पतीने शोध घेण्याचा प्रयत्न केला अखेर ती हरविल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली. प्रजासत्ताकदिनी तिचा मृतदेह आढळून आला. लोकांनी संताप व्यक्त केला. प्रक्षोभ उसळला. पोलीस तपास करतील अशी आशा होती पण ती फोल ठरली, अखेर नांदेडमधील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी १२फेब्रुवारीला कडकडीत बंद पुकारला. पण आज अखेर कुणालाच अटक झालेली नाही.

जे हरामखोर या वासनाकांडात गुंतले आहेत, त्यांना जगणे हराम व्हावे, एव्हढा उग्र संताप खदखदत ठेवण्यासाठी समाज पुढे यायला हवा. स्त्रियांच्या असहायतेचा गैरफायदा उठवणाऱ्याला स्त्रियांच्या धगधगत्या संतापाची तीव्रता अनुभवायला लावणेच योग्य ठरेल. बलात्कार करणाऱ्याचा कुठलाही अवयव कधीच फुरफुरत उठू नये एवढा चोप त्या बलात्काऱ्याला देण्याची संधी समाजाने का घेऊ नये, जे कोणी पोलीसांच्या हातात न सापडता  सोज्वळता मिरवत बसले आहेत त्यांना महिलांनी, समाजाने गुपचूप चढाई करून 'बडवून' काढले तर समस्त महिला वर्गालाच नव्हे, तर भेकडपणे या अशा प्रकरणी आपले सौजन्य सांभाळत बसलेल्या महाभागांनाही आनंद होईल.

बिळात दडलेल्या जनावराला बाहेर काढण्यासाठी मिरचीच्या पेटवून धुरी दिली जाते. जनप्रक्षोभाची धुरी धगधगत ठेऊन बिळात दडलेल्या बलात्काऱ्याना, अत्याचार करणाऱ्याना बाहेर खेचण्यासाठी महिला रणरागिणी बनून रस्त्यावर आल्या तर अशांची पळता भुई थोडी होईल. नांदेड प्रकरणात निकराने धक्का देण्याइतपत ताकद निश्चित आहे पण जनतेची सुरक्षा ज्यांच्या हातात आहे त्यांची मानसिकता काय आहे. देशाला कडक शिस्तीचे धडे देणाऱ्या शंकरराव चव्हाण यांचे हे नांदेड शहर एवढ्या अधोगतीला जावं ही चिंताजनक बाब आहे. ही घटना काळजात दुःखाचा वणवा उठवणारी आहे. मस्तकात आग पेटवणारी आहे.


दिल्ली, मुंबई इथे अशी प्रकरणे घडली की, प्रसिद्धीमाध्यमे अशा बाबी रवंथ करीत बसतात. समाजही थंड संवेदनाहीन बनू लागला आहे. सर्वच ठिकाणी महिलांनी असा संताप दाखवायला हवाय. काही गैर घडलं तर गुपचूप न बसता जाहिरपणे बोबं ठोकून अत्याचाराला अद्दल घडविण्याची हिंमत मुलींनी, महिलांनी दाखवायला हवी. अशा दुर्दैवी अत्याचाराला बळी पडलेल्या मुलीला मनाची उदारता दाखवून आपली म्हणणारे तरुण पुढे यायला हवेत. आईबापांनीही अशा कामात दिलदारपणे मुलांना सर्वप्रकारे प्रोत्साहन द्यायला हवे. गुंड सरकार आणि पोलीस यांची हातमिळवणी असल्यामुळेच असले प्रकार घडतात. महिलांना बरबाद करणाऱ्या विरुद्धही संतापाने खदखदत हजारो लोक रस्त्यावर आले तर पोलीस त्यांच्यावरच लाठी उगारणार मग या महिलेला न्याय देणार कोण? हा नीच प्रकार करणाऱ्याच्या पाठीशी सुप्त असो वा प्रच्छन्न असो, आमचे कोण वाकडे करणार? आम्ही सगळे दडपू शकतो अशी खात्री असल्यानेच हे सारे नराधम बेफाम बनले आहेत.कायद्याच्या रक्षकांना आम्ही आमच्या तालावर नाचवू शकतो, लोकांना धमकावू शकतो, आणि जरूर तर पैसा फेकून आमच्या पापावर पांघरून घालू शकतो असा उन्माद त्यांच्या मस्तकात भिनलाय आणि स्त्रीला अशाप्रकारेच वापरायचे असते असा विकृत विचारही त्यांच्या मस्तकात रुजत असतो. अशा या समाज नासावणाऱ्या, लांच्छनास्पद प्रकाराबाबत सत्ताधारी आणि सत्ताकांक्षी राजकीय पक्ष मात्र मूग गिळून गप्प आहेत. मोठा गाजावाजा  करीत महिलांच्या विकासाचं धोरण, उद्धाराचा वसा घेतलेल्या सत्ताधाऱ्यांना या प्रकारणाचं काही सोयर सुतक दिसत नाही.

समाज दिवसेंदिवस विकृत होतोय काय असं वाटतंय. संवेदनाच साऱ्या संपल्या आहेत असे चित्र आहे. संस्कारी समाज कुठे हरवलाय? अनेक गुन्ह्यात सिनेमांपासून प्रेरणा घेतल्याचं तपासात आढळून येतंय. हिंदी सिनेमासृष्टी जणू समाज विध्वंसक लोकांच्या स्वाधीन झालाय. तस्करांचा, गुंडांचा, लबाडांचा पैसा आणि त्यांना विविधप्रकारे मदत करणाऱ्यानाच दिला जाणारा वाव याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. या चित्रपटातून जे काही दिसते ते समाजात कुठे आहे असा प्रश्न इतके दिवस पडत होता. कोपर्डी, नांदेड इथल्या या घटना, ही वासनाकांडे काही दिवसात धगधगली वा धगधगताहेत ती बघितल्यावर हिंदी चित्रपटांनी समाजमनांना किती विकृत वळण दिलंय हे दिसून येतंय. रस्त्यात जाणाऱ्या अनोळखी मुलीला अडवून तिला पटविण्याची हिंमत या चित्रपटातल्या नायकांनी दिली आणि त्या मुलींना पळवून नेऊन त्याच्यावर बलात्कार करण्याची शक्कल खलनायकांनी दिली. तरुण तरुणींचे अर्धनग्न तांडे कामक्रीडांची आठवण व्हावी अशी झटका झटकी करत नाचताहेत आणि चोळीच्या आंत काय दडलंय हे तपासत आहेत. आपल्या खटिया जवळ सरकावत आहेत. ओले ओले, कोरडे कोरडे किंचाळत आहेत. हे सारे आपण मिटक्या मारत बघत आलो, घरातील टिव्हीपुढे आई, बाप, मुलं ह्या सगळ्यात रंगू लागली, तर घराचा सिनेमा कां नाही होणार? आपल्या मुलीला रस्त्यात गाठून लॉजवर मजा मारायला नेण्याचा प्रकार कां नाही घडणार? गुंड, सरकार आणि पोलीस यांच्याइतकेच आपणही या परिस्थितीला जबाबदार आहोत , हे का दडवायचं?
-हरीश केंची

भाजपची भगवी काँग्रेस झालीय...!

*भाजपची भगवी काँग्रेस झालीय!*


इन्ट्रो......

"महाराष्ट्राच्या राजकारणात आता रंग भरू लागलाय. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत सत्तासुंदरीसाठी सुंदोपसुंदी सुरु झालीय. कधी स्वतंत्र्यरित्या तर कधी सत्ताकांक्षी काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या साथीनं आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडताहेत. यात कोण अधिक भ्रष्टाचारी, कोण अधिक दुराचारी यावर एकमेकांवर चिखलफेक सुरु आहे. या दोघांच्या तुलनेत इतर पक्षाचे अस्तित्वच दिसत नाही. पण मतदार शांतपणे सारे काही न्याहाळतो आहे."

काँग्रेस हा लुटारूंचा पक्ष तर आमचा समाज सुधारकांचा. असा टेंभा भाजप नेहमीच मिरवत आलीय. त्याच स्टाईलीत काँग्रेसमध्ये बेशिस्त, बेजबाबदार, बदमाश भरलेत. आमच्या पक्षात मात्र निष्ठावान, शिस्तप्रिय, सेवाभावी कार्यकर्ते असा दावाही केला जातोय. काँग्रेसमधला गाढवांचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ हा नेहमी रंगणारा खेळ! हे चालायचंच असं लोकांनी मानलं होतं. एकंदरीने काँग्रेसपक्ष, त्यातले वाद,त्यातले गोंधळ, त्यातली गटबाजी, त्यातली घराणेशाही सगळं काही आपल्याला सुपरिचित आहे. पण शिस्तबद्ध, निष्ठावान, सेवाभावी कार्यकर्त्यांचं संघटन असं ज्यांच्याबद्धल गोड गोड स्वप्न रंगवलं जात होतं, त्यांनी आता काँग्रेसला प्रभावी पर्याय देण्याचा चंग बांधला आहे.
राजकीय पक्षाला एक चेहरा असतो, भाजपचा चेहरा हा सच्च्या कार्यकर्त्यांचा पक्ष! भाजपचा आमदार नगरसेवक कधी फुटणार नाही, कार्यकर्ता पदासाठी कधी भांडणार नाही, असा एक नावलौकिक होता. व्यंग्यचित्रकारांनी शेंडीवाला भटजी वा  ढेरपोट्या शेठजी असं भाजपचं प्रतीक ठरवलं होतं. त्यातही पवित्रता आणि सुसंस्कृतता व्यक्त व्हायची. सर्वच क्षेत्रातली भल्यांची मंदी आणि बुऱ्याची तेजी राजकारणात येणारच. एकेकाळी काँग्रेसवाल्यांनी हाताळलेले 'व्यवहारवादी' यशवंत राजकारण आता भाजप मोठ्या ताकदीने हाताळत आहे.

त्यानुसार भारतीय जनता पक्षाकडे सध्या इन्कमिंग जोरात सुरु आहे. कसलाही विचार न करता, विधिनिषेध न बाळगता आपलं साधनसुचितेचं धोरण बाजूला सारून इतर पक्षातल्या सत्ताकांक्षी मंडळींना त्यात गुन्हेगारही आले, त्यांचं स्वागत करण्यासाठी भाजपेयी मुख्यमंत्री सरसावले आहेत. हे असं का घडतंय, कोण घडवतयं हे आपण जर पाहिलं तर एक लक्षात येईल की, भाजपातील वरिष्ठ नेत्यांनी 'पक्षविस्तार' या गोंडस नावाखाली दुकान मांडलंय. त्यांनी ती 'भगव्या काँग्रेस' च्या दिशेने वाटचाल सुरु केलीय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा हे पक्के राजकारणी, त्यांनी त्यांचं गल्ल्यावरचं डोकं इथं वापरलंय. अगदी व्यापारी हिशेबाने पक्षाची वाटचाल सुरु ठेवलीय. आजवर राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर भाजप हा इतर सर्व राजकीय पक्षांच्या तुलनेत तसा अस्पृश्य गणला जात होता. ते संपविण्यासाठी त्यांनी प्रयत्न चालवले आहेत. त्यांनी नगरपालिका, महापालिका स्तरावर जी 'शेठजी भटजी' यांचा पक्ष अशी जी प्रतिमा निर्माण केली गेलीय ती संपविण्याचा चंग बांधलाय. सर्वच पक्षातील सर्व तऱ्हेची मंडळी गोळा केली जाताहेत. त्या दिशेने वाटचाल सुरु ठेवली आहे.

नगरपालिकेच्या निवडणुकीत 'नगराध्यक्ष' थेट लोकांतून निवडून आणणे तर महानगरपालिकेच्या निवडणुकीत चार सदस्यांचा एक प्रभाग या माध्यमातून निवडणूक. हा सारा प्रकार म्हणजे विधानसभा मतदारसंघनिहाय भाजपची स्थिर आणि कायमची अशी मतपेढी निर्माण करणे. याशिवाय नव्याने आलेली आणि सत्तेमुळे भारावलेली अशी वय वर्ष ४० ते ५० या मध्यमवयीन मतदारांच्या दुसऱ्या पिढीसाठी सुरक्षित असे वातावरण तयार करणे. त्याचबरोबर तिसऱ्या पिढीतले म्हणजे ३० ते ४५  या वयोगटातील तरुणांसाठी सत्तेबाबत पोषक अशी स्पर्धा निर्माण करणे. याचबरोबर मोदी आणि शहा यांना पक्ष स्वयंपूर्ण करायचा आहे. पूर्वीचा जनसंघ वा आत्ताचा भारतीय जनता पक्ष ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघांची राजकीय शाखा वा अंग म्हणून ओळखली जातेय. त्यामुळे पक्षाला मतदारांच्या थेट संपर्कासाठी संघ स्वयंसेवकांवर अवलंबून राहावे लागत आहे. पक्षाचं हे परावलंबित्व झुगारुन यापुढे स्वतः ची अशी स्वतंत्र संपर्क प्रणाली उभी करणे, ज्या माध्यमातून मतदारांशी थेट संपर्क राहील आणि पक्ष संघ स्वयंसेवकांवर अवलंबून राहणार नाही अशी दक्षता घेतली जाते आहे. यासाठी त्यांनी ग्रामीण भागावर लक्ष केंद्रीत केले आहे. ग्रामीण भागात सत्तेचा वापर, साम,दाम,दंड,भेद अशी सर्व आयुधे वापरून ग्रामीण नेतृत्वाला बळकटी देण्यासाठी लक्ष घातलंय, सर्वप्रथम जसे जमेल तसे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या मधली सत्तास्थान बळकावणे. आजवर भाजपपासून दूर राहिलेल्या मुस्लिम आणि ख्रिश्चन मतदारांमध्ये भाजपच्या नेतृत्वाबाबत आकर्षण निर्माण व्हावं म्हणून पक्षाला आणि पक्षाची उमेदवारी देताना संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांना दूर ठेवून, त्यांच्यापासून सुरक्षित अंतर राखून वाटचाल करणे. जिथे अरे का का रे करावे लागणार आहे तिथे 'साधनसुचिता' गुंडाळून ठेवून तिथे तशाच प्रकारच्या गुंडाला उमेदवारी देणे, यापूर्वी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी ज्या प्रादेशिक पक्षाशी युती, आघाडी केली आहे, तिथे त्या पक्षाची ताकद ठरविण्याचा अधिकार अबाधित ठेवणे. याचा अर्थ ज्या प्रादेशिक पक्षाची युती करायची त्यांचे गुण अवगुण आपल्यात भिनवायचे प्रसंगी त्या पक्षाप्रमाणेच रूप धारण करून मतदारांसमोर जायचे. आणि पक्षविस्तार करताना सत्तेसाठी म्हणून काँग्रेसच्या वाट्यावर वाटचाल करणे. ही धोरणं ठरलेली दिसतात.

पैशाचा भाजपला आता तोटा नाही, त्यांचे कट्टर घडवलेले कार्यकर्ते अजूनही प्रत्यक्ष पटावर येण्याचा हट्ट न धरता मागे राहूनच कार्य करीत आहेत. खरं तर सत्तानाश घडवण्याचा कटू अनुभव 'जनता प्रयोगा'त एकदा झालाय भाजप तो पुन्हा करणार नाही. स्वतःचं वर्चस्व राखण्यासाठी प्रसंगी 'भगवी काँग्रेस' होण्यासाठी त्यांची चाललेली ही वाटचाल आपण पाहतोच आहोत.

- हरीश केंची

व्यक्तिदोषामुळे काँग्रेसी विचारासामर्थ्य खुंटले!

*व्यक्तिदोषामुळे काँग्रेसी विचारसामर्थ्य खुंटले*

 "काँग्रेसपक्षाला झालेल्या निवडणुकांतून फार मोठे अपयश आले. पण हे अपयश एकदम काँग्रेसच्या माथ्यावर कोसळलेले नाही. ते गेली दहा-पंधरा वर्षे एक एक पावलाने येतच होते. काँग्रेसने गरिबांशी, दलितांशी, उपेक्षितांशी, अल्पसंख्य समाजघटकांशी, समाजातल्या परिवर्तनाला सदैव निष्ठेने साथ देणाऱ्या मध्यमवर्गीयांशी प्रतारणा केली. त्यामुळे अपयश काँग्रेसला झोम्बु लागले, काँग्रेस धनिकांच्या दावणीला बांधली गेली आणि सदासर्वदा स्वार्थाचा रवंथ करणाऱ्या बैलांनी फक्त आपल्या गोतावळ्यापुरतीच आहे असे वर्तन करून काँग्रेसबद्धल जनमानसात अप्रिती वाढविली.काँग्रेस अशीच राहावी असा प्रयत्न करणारे महाभाग आजही आहेत. काँग्रेसला बदलावे लागेल. काँग्रेस पुन्हा लोकांची झाली नाही तर काँग्रेस नक्कीच संपेल."

पुण्याच्या काँग्रेस भवनात गांधीजींचा पुतळा आहे.या भवनात गांधीजी जेव्हा आले होते तेव्हा त्यांनी भवनाबाबत समाधान व्यक्त केले होते. आपला अभिप्राय देताना त्यांनी लिहिले होते, ' यह मकान सच्चे सेवकोंका याने खिदमतगारोंका निवास बने'. महात्मा गांधींचा हा अभिप्राय या पुतळ्याच्या खाली त्यांच्याच हस्ताक्षरात संगमरवरी स्मृतिशलाकेत कोरण्यात आले आहे. महात्मा गांधींच्या या विचारांशी, व्यक्त केलेल्या अपेक्षेशी आजची काँग्रेस कितपत कटिबद्ध आहे? याचं उत्तर अगदी स्पष्ट 'नाही' असंच आहे. हा काँग्रेसी उजाळा, झळाळी दाखवत असताना याच काँग्रेसच्या नावाखाली चाललेला काळाकुट्ट व्यवहार मात्र लोकांना सतावत होता. सारी लाज, लज्जा, शरम आणि सभ्यता काँग्रेसच्या तिरंगी झेंड्याच्या दांड्याला टांगून वाट्टेल ते करणाऱ्या सफेद डाकूंची फलटण आज काँग्रेस पक्षात फोफावली आहे. या सफेद डाकूंमध्ये आणि टोळीयुद्धात असलेल्या संघटित गुन्हेगारांमध्ये तसा फरक फारसा उरलेला नाही.
काँग्रेस पूर्वी अशी नव्हती. पैसा प्रतिष्ठा याचा मोह वाटणारे 'खादीधारी' होते, पण या पैशासाठी, प्रतिष्ठेसाठी दुसऱ्यांच्या प्राणाशी खेळ मांडण्याचा प्रकार काँग्रेसवाले करीत नव्हते. हे प्रकार कधी आले, कुणी आणले? पैसा असेल तर वाट्टेल ते करता येईल, याची ओळख सहकारातून काँग्रेसवाल्याना झाली आणि मग ही सहकारी वारुळे शाबूत ठेवण्यासाठी जिवाच्या कराराने ग्रामीण भागात आपापसात झुंजी दिल्या गेल्या. आजही त्या सुरूच आहेत. पूर्वीच्या नेत्यांनी एक राहा, सत्ता राखा आणि अनंतकाळ ऐश्वर्य उपभोगण्याची आपल्या हातातील हुकुमी साधन सांभाळा, हा त्यांचा उपदेश सहकारी क्षेत्रात काही काळ चालला. पण आपापली वारुळे दक्षपणे सांभाळत. यासाठी सहकाराची, एवढेच कशाला साध्या सभ्यतेची मूल्येसुद्धा राजरोसपणे तुडवत जागोजागचे सहकारसम्राट आपले अस्तित्व दाखवीत आपल्याला हवे तसे काँग्रेस पक्षाला राबवित राहिले. आपापल्या भागात सहकारी संपत्तीमार्फत स्वतःची साम्राज्ये उभी केली. या साम्राज्यात ते म्हणतील तो समाजवाद आणि ते देतील तो न्याय, हा खाक्या सुरु झाला. साखर कारखाने केवळ ऊसाला पिळून काढत नव्हते, तर लोकशाहीमध्ये ज्याला फार मोल आहे तो वैचारिक विरोध करणाऱ्यांना देखील पिळून काढले जात होते. सहकारातून जे काही निर्माण होत होतं, ते आपल्याच बापाचं! ही वृत्ती या सहकारी वारुळाच्या अनभिषिक्त सम्राटात पुरेपूर मुरली होती.

सत्तेचा सर्वंकष फायदा घेऊन लोकांच्या पैशावर आपली साम्राज्ये बळकट बनवीत राहिले. साखर साम्राज्य चालविणाऱ्यांनी, सहकारी बॅंकांवर वेटोळे घालून बसणाऱ्यांनी आपापल्या भागात कित्येकांना मातीत गाडले. संसारातून उठविले आणि देशोधडीला लावले. याचा हिशेब कधी करणार? कोण करणार? निवडणुकात लाखो रुपयांची खैरात करणारे हजारोंनी गुंडांच्या टोळ्या, ट्रक, ट्रॅक्टर, टेम्पो मधून आणून पंचायतीपासून पार्लमेंटपर्यंत निवडणूक लढणारे, वाढविणारे, विरोधकांना साम, दामC, दंड भेद हे सगळे मार्ग वापरून नामोहरम करणारे गारदी काँग्रेसमध्ये नाहीत? मंत्रीमंडळात नव्हते? याची आता सर्वसामान्य कार्यकर्त्यांना होऊ लागलीय.

लोकसभेनंतर झालेल्या सर्व निवडणुकीत केवळ काँग्रेसचाच नव्हे तर सर्व समाजवादी विचारांच्या पक्षांचा दारुण पराभव झाला आहे. विचारसामर्थ्य शक्तिशाली असले तरी व्यक्तिदोषामुळे हा पराजय झाला आहे. आपसातले संघर्ष, ते मिटवण्याच्या नावाखाली चाललेली अटीतटी, दिलजमाईचे प्रदर्शन आणि कुजकी टोमणेबाजी यामधून काँग्रेसवाल्यांना बाजूला काढून पुरोगामी विचारापर्यंत आणण्याचे काम आज व्हायला हवे. सत्ता जिंकण्यासाठी देवाधर्माचा वापर करण्याचा, तो करता यावा म्हणून वेगवेगळ्या संघटना उभारण्याचा, त्यांच्याद्वारा श्रद्धावान भाबड्या जनसामान्यांना खोट्यानाट्या गोष्टी ऐकवून फितवण्याचा, विशिष्ट राजकीय पक्षासाठी त्यांना वापरण्याचा उद्योग या देशात पद्धतशीरपणे केला जातो आहे. जन्मजात उच्च-नीचतेविरुद्ध, विषमतेविरुद्ध, अंधश्रद्धा आणि अन्याय यांच्याविरुद्ध लढणाऱयांना आपसात लढायला लावण्याचा अथवा निष्क्रिय बनवून निरुपयोगी करून टाकण्याचा जोडधंदाही याच मंडळींनी प्रभावीपणे चालवला आहे. याला रोखण्याचे सामर्थ्य फक्त पुरोगामी विचारातच आहे. राजकारणात मतलब सांभाळणे ही बाब आता अनिवार्यच झाली आहे. एखाद्या व्यक्तीने आपल्या मतलबासाठी एका पक्षाला सोडचिठ्ठी देऊन दुसरा घरोबा केला की, ती व्यक्ती उठवळ! पण एकमेकाला संपविणे हेच ध्येयधोरण असलेले दोन पक्ष जेव्हा मतलबासाठी एकत्र येतात तेव्हा? मतलबासाठी पक्षबदल करणाऱ्यात आदर्श म्हणवले जाणारे राजकारणीही आहेत. हे लक्षात घ्यावे लागेल.

काँग्रेसपक्षाला या निवडणुकांतून फार मोठे अपयश आले. पण हे अपयश एकदम काँग्रेसच्या माथ्यावर कोसळलेले नाही. ते गेली दहा-पंधरा वर्षे एक एक पावलाने येतच होते. काँग्रेसने गरिबांशी, दलितांशी, उपेक्षितांशी, अल्पसंख्य समाजघटकांशी, समाजातल्या परिवर्तनाला सदैव निष्ठेने साथ देणाऱ्या मध्यमवर्गीयांशी प्रतारणा केली त्यामुळेच अपयश काँग्रेसला झोम्बु लागले. काँग्रेस धनिकांच्या दावणीला बांधली गेली आणि सदासर्वदा स्वार्थाचा रवंथ करणाऱ्या बैलांनी फक्त आपल्या गोतावळ्यापुरतीच काँग्रेस आहे असे वर्तन करुन काँग्रेसबद्दल जनमानसात अप्रिती वाढविली. काँग्रेस अशीच राहावी असा प्रयत्न करणारे महाभाग आजही आहेत. काँग्रेसला बदलावे लागेल. काँग्रेस पुन्हा लोकांची झाली नाही तर काँग्रेस नक्कीच संपेल. शाहू, फुले, आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या आचार-विचारातच काँग्रेसला पुन्हा सामर्थ्य देण्याची शक्ती आहे. काँग्रेसवाल्यांना या निकालांनी आपण पुरे झोपलो नाही हे दाखवून देण्याची संधी प्राप्त झाली. प्रचारादरम्यान मतलबासाठी चालवलेल्या आरोप प्रत्यारोपांनी आपले कापलेले नाक मिरवत वावरण्याचा उद्योग काँग्रेसवाल्यांनी चालविला होता. आपल्याच हाताने आपला गळा कापून घेण्याचे प्रयोगही केले गेले, अशावेळी आपल्या बगलबच्यांना टाळ्या वाजवायला लावले जात होते याकडे गांभीर्याने पाहिलेच गेले नाही. उत्तरकाळात पेशव्यांच्या नालायकीने मराठी सत्ता ग्रासली हे खरे; पण ह्या नालायक पेशव्यांना त्यांच्या तोडीस तोड नालायकी करणारे मराठे सरदारही आपल्या सर्व दुर्गुणासह पुरेपूर साथ देत होते. हा इतिहास झाकून ठेवता येणार नाही. आज उत्तर पेशवाईतल्या प्रमाणे सत्ताधारी रंगढंग दाखवत असतील तर त्याला कारण नांदेड, लातूर, सांगली, पुणे, सातारा, सोलापूर, नगर, बारामतीचे आपसात लढण्यात दंग असलेले काँग्रेसवालेच आहेत. या सगळ्यांनी लोकहितासाठी लढण्याचे, गोतावळ्यात गुंतून न पडण्याचे आणि सामाजिक समता, सहकार, समृद्धी यासाठी सर्वशक्ती वेचण्याचे ठरवले तर लोकही त्यांना साथ देतील.

पराभवानंतर झालेल्या आत्मचिंतनात 'आपण सगळे सध्याच्या परिस्थितीत जागरूक आणि संघटित राहिल्यास राज्यातील सत्तेत फसगतीने झालेला तात्पुरता बदल दुरुस्त झाल्याशिवाय राहणार नाही'. असे म्हटले गेले. यातल्या 'आपण सगळे' याची व्याप्ती केवढी? 'आपण सगळे' ही भावना घेऊन काँग्रेस खरोखरच उभी राहणार आहे? दिलजमाई पर्व सुरु असताना कळवळून 'निदान भांडणासाठी तरी काँग्रेस शिल्लक ठेवा' असं विलासरावांनी म्हटलं होतं याची आठवण झाली. लोकांना झुलविण्यासाठी देवाधर्माचा उपयोग करण्याचे तंत्र साधलेली मंडळी भावनांचा प्रक्षोभ घडविणारे नाना विषय स्वतः नामानिराळे राहून उपस्थित करणार आहेत. काशी-विश्वेश्वर आणि मथुरेच्या श्रीकृष्णापासून गल्लीतल्या मारुती गणपतीपर्यंत देवांचा वापर करून लोकांच्या भाबड्या श्रद्धांना हात घातला जाईल. नको ते घडविले जाईल. हा देश, समाज आपल्या महत्वाकांक्षेपायी भरडून टाकण्याची टोकाची भूमिका घेतली जाईल. हे तुफान रोखण्यासाठी दिलजमाई व्हायलाच हवी. हातात हात गुंफून दृढ विश्वासाने उभे राहण्यासाठी लोक पुढे यायला हवेत. माणसे जोडली जायला हवीत. महात्मा गांधींनी देशाच्या कानाकोपऱ्यात 'करेंगे या करेंगे' ही जिद्द जागवली तशी जिद्द जागवायला हवी.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी माणूसपण गमावलेल्या माणसात जो आत्मविश्वास, स्वाभिमान जागवला तसा आत्मविश्वास, स्वाभिमान पुन्हा जागवण्यासाठी सर्वंकष प्रयत्न व्हायला हवेत. महात्मा फुले यांनी ज्या त्वेषाने अन्यायाला टकरावर टकरा देऊन समानतेचे वारे समाजात खेळते ठेवले ती तडफ लोकांत निर्माण होईल असे वातावरण जाणीवपूर्वक ठेवण्याचे भान आपण दाखवले पाहिजे. काँग्रेसवाल्यांच्या वृत्तीत बदल घडला तर सत्तेत बदल घडणे कठीण नाही. पुरोगामी विचारात जनआंदोलन उभे करण्याची ताकद आहे. रामकृष्णांना रथात घालून भाजपेयींनी दौड केली. शिवाजी महाराजांना शिवसेनेच्या मावळ्यांनी कडेकोट किल्ल्यात ठेवलंय. आंबेडकरांना दलित दुसऱ्या कुणाच्या हाती लागू देत नाहीत. महात्मा गांधींना आपण कधीच 'हे राम' म्हणायला लावलंय. आता काँग्रेसला आधार केवळ या महात्मा फुले यांच्या पुरोगामी विचारांचाच आहे.

- हरीश केंची,

दांभिकाची मांदियाळी!

*मांदियाळी दांभिकाची!*

इन्ट्रो

"वैयक्तिक स्वार्थासाठी डॉ.आंबेडकर आणि महात्माफुलेंचा वापर करण्यासाठी सरसावलेल्या मंडळींनी त्यांचा विचार कधीच गुंडाळून ठेवला आहे. सध्याचा काळ मोठा विचित्र आहे. जे गाडण्यासारखे आहे ते मिरवलं जातं आणि मिरवावं ते दडवलं जातंय. दिवसेंदिवस देवाला मानणाऱ्यांची संख्या, देवादिकांचे स्तोम कमी करण्याऐवजी वाढतंच आहे. आपण एका बाजूला सुधारणेचा आव आणतो आणि दुसऱ्या बाजूला देवाला नवस घालतो, हे ढोंग आहे. अशा ढोंगी व्यक्तींकडून सामाजिक सुधारणा होण्याची सुतराम शक्यता नाही. अशा समाजाला भीमराव आंबेडकर आणि जोतिबा फुले कळले नाहीत आणि त्यांची बहुजन समाजाची चळवळ कळली नाही."

गेल्या आठवड्यात महात्मा जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती होती. त्यांच्या स्मृतिस्थळावर त्यांच्या भक्तांची वर्दळ होती. ज्या मूर्तीभंजन विचाराचा ध्यास या दोघांनी घेतला त्याच विचाराला हरताळ फासला जात होता. त्यांच्या मूळ विचारांपासून दूर गेलेल्यांना त्या विचारांची निदान आठवण व्हावी असा या स्मृतिदिनामागचा हेतू पण त्याचाच विसर पडलेला जाणवला. सामाजिक विषमता, धर्माधता यांच्या विरोधात रान पटविण्यासाठी सिद्ध व्हायला हवंय अशी सध्याची स्थिती असताना त्यांच्या विचारांचे पाईक असणाऱ्यांना मात्र निद्रिस्तावस्थेत आहेत. सामाजिक समतेची लढाई ही नेहमीच समाजाची मानसिक उंची वाढविणारी ठरलीय. या समतेच्या लढाईत अस्पृश्यतेची खांडोळी झाली, वर्णाभिमान धुडकावला गेला. जातीयतेला चाप बसला, स्त्रिया स्वयंसिद्ध झाल्या, परंतु हे परिवर्तन हिंदुधर्माचा शक्तिपात करणाऱ्या जातीसंस्थेचा नायनाट करणारे ठरले नाही. कारण जातीअंताची लढाई ही स्वार्थसाधकांच्या हातात गेल्याने ती जाती अहंकाराची झाली. विशेष म्हणजे ही लढाई सामाजिक समतेचा आग्रह धरणाऱ्या छत्रपती शिवाजी, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची नावे घेत लढली जाते, ही हरामखोरी आहे. ती नेत्यांप्रमाणे अनुयायांनी आत्मसात केली आहे. त्या सोंगाढोंगावर तुटून पडण्याचं काम करायला हवंय. भारतीय घटनेने जातीयता नष्ट करण्याचा आग्रह धरलेला आहे. परंतु शासकांनी आणि राजकारण्यांनी त्याउलट व्यवहार टीकेसाठी त्यांनी जाती संघटनांचा आधार घेतला आहे. सत्ता मिळविण्यासाठी आणि टिकविण्यासाठी सोशल इंजिनिअरिंगच्या नावाखाली जाती अहंकार माजविला जातो आहे. असत्य, अन्याय, भ्रष्टाचार, अपमार यांच्याविरोधासाठीच नव्हे, सत्याच्या आग्रहासाठी आणि हक्काच्या, मानाच्या पानासाठीही महाराष्ट्रातली माणसं एकत्र येऊ शकत नाहीत. इतकी जाती, प्रदेश, पक्ष अहंकारात तुटलेली, फुटलेली आहेत. या स्वार्थी तुटीफुटीवर प्रकाश टाकावा आणि अवघा समाज एकवटावा या अपेक्षेने कार्य फुले आणि आंबेडकर यांना माणणाऱ्यांकडून व्हायला हवंय. जातीयतेचा नायनाट करण्यासाठी महाराष्ट्रातल्या अनेक समाज सुधारकांनी आपल्या आयुष्याची राख केली. स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्यांनी ती विभूती मानली. पुरोगाम्यांकडे सामाजिक समतेचं चांगलं बियाणं होतं पण ते त्यांनी आपसातल्या भांडणात रुजण्यापूर्वीच सडवलं म्हणूनच जातीयवादी पक्ष-संघटनांचे निवडुंग महाराष्ट्रात फोफावलं. आत्मनाशी आणि कार्यनाशी यात फरक करणाऱ्यांची गरज नाही जातीचा अहंकार आणि अस्मिता हुंडारत हुंदडणारे सगळेच मनुवादी आहेत. स्वार्थासाठी त्यांना मनुनं केलेली जातीय मांडणी हवीच असते. ब्राह्मणांचा बडेजाव, मराठापणाचा माज, बहुजनांची बनेल बलुतेदारी, आणि दलितत्वाची दळभद्री दडपणं या साऱ्याची निर्मिती मनुवादाच्या आधारात आहे. ज्यांना हा आधार नको त्यांना पांचवा वर्ण आहे. चारही वर्णांना धिक्कारणारा, गुणवंतांना योग्यवेळी संधी आणि गरजवंताला योग्यवेळी सहाय्य हेच लोकशाहीचं अर्थात स्वराज्याचं आद्य आणि अंतिम कर्तव्य आहे असं मानणारा पाचवा वर्ण आहे.

सत्य तोच धर्म करावा कायम।
मानावा आराम। सर्वाठायी।
मानवांचा धर्म, सत्य हीच नीती।
बाकीची कुनीती। जोती म्हणे।।
यासारख्या अखंडातून महात्मा फुलेंचे हे विचारवैभव लिखित स्वरूपात उपलब्ध आहे. महात्मा फुलेंची जयंती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती या निमित्तानं त्यांचे विचार स्वीकारणं, रुजवणं, वाढवणं आणि मानव्याला जे अनिष्ट ते नष्ट करण्यासाठी त्याचा वापर करणं हाच फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांचा सार्थ गौरव आहे. याची जाणीव खरं तर व्हायला हवी होती, महात्मा फुले यांच्या निवासस्थानी समताभूमीवर आणि आंबेडकरांच्या स्मारक परिसरात जमलेली गर्दी ही दांभिकपणा स्पष्ट करणारीच जाणवत होती. वैयक्तिक स्वार्थासाठी महात्माफुलेंचा वापर करण्या सरसावल्या मंडळींनी त्यांचा विचार कधीच गुंडाळून ठेवला आहे. सध्याचा काळ मोठा विचित्र आहे. जे गाडण्यासारखे आहे ते मिरवलं जातं आणि मिरवावं ते दडवलं जातंय. दिवसेंदिवस देवाला मानणाऱ्यांची संख्या, देवादिकांचे स्तोम कमी करण्याऐवजी वाढतंच आहे. आपण एका बाजूला सुधारणेचा आव आणतो आणि दुसऱ्या बाजूला देवाला नवस घालतो, हे ढोंग आहे. अशा ढोंगी व्यक्तींकडून सामाजिक सुधारणा होण्याची सुतराम शक्यता नाही. अशा समाजाला जोतिबा फुले कळले नाहीत आणि त्यांची बहुजन समाजाची चळवळ कळली नाही. कारण 'बहुजन' या शब्दाचा अर्थच आपल्याला कळला नाही. काहींनी 'बहुजन' म्हणजे मराठा असा सोयीस्कर अर्थ लावून फुले आणि आंबेडकरांचा आणि त्यांच्या चळवळींचा आपल्या सोयीसाठी, स्वार्थासाठी राजकारणात तरून जाण्यासाठी वापर करून घेतलाय. त्यांना राजकारणाची, आपल्या जातीची, स्वार्थाची चिंता आहे. जोतिबांच्या आणि भीमरावांच्या विचारांचे त्यांना सोयर सुतक नाही. वास्तविक फुले-आंबेडकरांचा विचार केवळ तळाच्या माणसांनाच नव्हे तर, राष्ट्राला समर्थ बनवणारा आहे. भारतातील अनेक सामाजिक विकासाची बीजेही फुले-आंबेडकरांच्या सामाजिक क्रान्तीत आहेत. स्त्री शिक्षण, अस्पृश्यता निवारण, आरोग्यविषयक सेवाकार्य, सामाजिक-आर्थिक समानता, श्रममूल्यांचा पुरस्कार यासारखे अनेक उत्क्रांतीकारक विषय फुले-आंबेडकर यांच्या विचारात सामावलेले आहेत. आजही सामाजिक सुधारणांचे निर्णय सरकार घेते, तेव्हा त्यावेळी होणाऱ्या चर्चेचं दुसरं टोक हे फुले-आंबेडकर विचारांपर्यंत असतं. त्यांचे विचार पेलवण्याचं आणि समाजाच्या, सत्ताधीशांच्या गळी उतरवण्याचं सामर्थ्य केवळ छत्रपती शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलं. जोतीराव फुले यांच्या निधनानंतर क्षीण झालेली सत्यशोधक समाजाची चळवळ शाहू महाराजांनी समर्थ केली. परंतु अतिरेकी शिवराळपणामुळे ही चळवळ ब्राह्मण्याकडून ब्राह्मणांकडे सरकली आणि ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादात फसली.

या मोडीत निघालेल्या चळवळीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःला जोतीराव फुले यांचे अनुयायी मानल्यामुळे जीवनदानाबरोबरच व्यापकता मिळाली. आज या चळवळीची आणि फुले-आंबेडकरांच्या विचारांची, खुद्द जोतिरावांनी ज्यांच्या उद्धारासाठी सपत्निक शेणधोंड्याचा मार खाल्ला. त्या बहुजनांनी तरी काय पत्रास ठेवली? ते सांगायची आवश्यकता नाही. आज महाराष्ट्रात जे घडते आहे ते पाहिले तरी याची जाणीव साऱ्यांनाच होईल. फुले-आंबेडकरांच्या विचारांनी अनेकजण घडले. ते स्वतः समाजसुधारकच नव्हते तर त्यांच्या कृतिशील विचारांनी असंख्य सुधारक घडवले. फुले यांच्या विचारांनी सयाजीराव गायकवाड, राजर्षी शाहू महाराज, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे महाराज यांच्यासारख्या अनेकांची सामाजिक परिवर्तनाच्या ऐतिहासीक कार्याची प्रेरणा जोतिबा फुलेंचे विचार हीच होती. या साऱ्यांनी फुले यांच्या विचाराचे ऋण जाहीरपणे मानले होते. शुद्रातिशूद्र माणसाच्या उन्नतीचा, त्यांच्या सन्मानाचा विचार फुले-आंबेडकरांनी सांगितला त्यासाठी समाजाला धर्मकर्मकांडात घोळवून फसवणाऱ्या पोटभरुवृत्तीचा त्यांनी तडाखेबंद समाचार घेतला. सामाजिक समानतेबरोबरच स्त्रीशिक्षणाचा पुरस्कारही केला. फुले यांनी तर हा विचार कृतीत आणण्यासाठी या व्यापात आपल्या कुटुंबियांनाही गुंतविले. सावित्रीबाईंनी जोतिबांच्या विचाराला कृतीत आणण्याचं काम अगदी मनापासून केलं. जीवघेणे हल्ले सोसले. पण हटल्या नाहीत. फुले यांच्या निधनानंतर इतकी वर्षे लोटली, पण तरीही सामाजिक परिवर्तनाच्या कार्यात त्यांच्याच विचार आपले सर्वश्रेष्ठत्व टिकवून आहे. हा फुले-आंबेडकर यांच्या समर्थ विचारांचा गौरव असला तरी, सामाजिकदृष्ट्या ते लांच्छन आहे. कारण फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा आधार वाटू नये, अशी सामाजिक स्थिती अजून निर्माण झालेली नाही. किंबहुना यांच्याच विचारांची आवश्यकता तीव्रपणे जाणवत आहे. दलित वस्त्या बळकट झाल्यात. मोठ्या प्रमाणात स्त्रिया सुशिक्षित होऊ लागल्या, कमावत्या झाल्या तरी, बहुतांश संसारात त्यांचं स्थान दुय्यम आहे. स्त्री अजूनही उपभोगाची वस्तू आहे, अशीच भावना समाजात आहे. देवळं वाढलीत, त्या पुढच्या रांगाही वाढल्या आहेत. लांबल्या आहेत. अफरातफर व्हावी इतका गल्ला देवळात जमू लागलाय. हे सारं चित्र पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्रात दिसत आहे. तरीदेखील फुले-आंबेडकर यांचं नांव घेऊन राजकारण करणाऱ्यांची संख्या कमी नाही. फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्यांनीही आपली वागणूक बदलली आहे. फुले-आंबेडकर नावाचा डिमडिम वाजवत आपला स्वार्थ साधण्यातच ते धन्यता मानू लागले आहेत. सदासर्वदा त्यांचेच नांव घेऊन, त्यांच्याच विचाराला हरताळ फासणाऱ्या त्यांच्या अनुयायांनी फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा पराभव केला आहे. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांनी वाईट म्हणून ज्या ज्या गोष्टी सांगितल्या, त्या गाडण्याऐवजी त्या डोक्यावर घेऊन मिरवण्यातच ते धन्यता मानत आहेत. हे सारं बदलण्यासाठी त्यांचे विचारच समर्थ आहेत. यासाठी हवी केवळ जिद्द आणि इच्छा...!

-हरीश केंची

Saturday 22 April 2017

सुष्टांचा राजकारणात सहभाग हवा

*सुष्टांचा राजकारणात सहभाग हवा!*

इन्ट्रो.......
"शहाणी सुशिक्षित मंडळी राजकारणापासून लांब जाण्याचा प्रयत्न करताना दिसतात. ते असे का वागतात? याचाही त्यांनी विचार करावा. सज्जन माणसे दूर गेल्यानेच दुर्जन माणसांचा संचार राजकारणात होऊ लागला आहे. सभा समारंभात, खासगी बैठकीत किंवा अगदी सहज गप्पा मारतानाही राजकारणात वाईट माणसं कशी आहेत. याच रसभरीत वर्णन करुन त्यापासून आपण कसे लांब आहोत याची शेखी मिरवण्यातच ते धन्यता मानतात. वास्तविक, दुर्जनांना राजकारणातून दूर ठेवायचं असेल तर सज्जनांचा, सुशिक्षितांचा शहाण्या माणसांचा वावर राजकारणात वाढायला हवा. राजकारणातले शिंतोडे आपल्या अंगावर उडतील म्हणून त्यापासून दूर राहणं हे खरं तर स्वतःशी आणि राष्ट्राशीही प्रतारणा करण्यासारखे आहे. राजकारणाची गटारगंगा स्वच्छ करण्यासाठी आपण उतरणार असू, तर या गटारगंगेतील शिंतोडे आपल्या अंगावर उडणारच आहेत, याची जाणीव असायला हवी. शिंतोडे उडताहेत म्हणून लांब पळून जाणं हा पळपुटेपणा आहे. शहाणी, सुशिक्षित, सज्जन माणसं पापभिरू असतात. त्यांच्यासमोर आपण एखादा बागुलबुवा उभा केला , तर ते शांतपणे मान वळवून दुसरीकडे निघून जातील. अशी धारणा राजकारणातल्या दुर्जनांची असते म्हणूनच राजकारणातल्या दुर्जनांचा हा कावा ओळखून हिंमतीने आणि निर्धाराने राष्ट्रीय राजकारणात उतरणं हे कर्तव्य ठरतं."
*राजकारणावर चर्चाच!*
भारतातल्या कोट्यवधी माणसांचे दैनंदिन जीवनही सर्वंकष राजकारणाशी निगडित झाले आहे. कारण असे एकही क्षेत्र नाही की, ज्यांच्याशी राज्यकर्त्या शासनाशी संबंध नाही. पण तरीही अष्टौप्रहर पोटापाण्याच्या विवंचनेत असलेल्या सामान्य रयतेला 'राजकारण कसे असते, वा कसे असावे?' ह्या परिसंवादाशी फारसे कर्तव्य नाही. त्यात रस घ्यायला फुरसतही नाही. सामान्य माणूस काकुळतीने इतकंच म्हणेल, की....'बाप हो, राजकारण करा, बेरजेचे करा अथवा वजाबाकीचे करा, त्रैराशिकाचे करा अथवा पंचराशिकाचे करा पण करा म्हणजे झाले!' परंतु सामान्यजनांप्रमाणे राजकारणाची अथवा कोणत्या 'कारणा'ची उपेक्षा करुन बुद्धिमंतांचे- इंटेलेक्च्युअल्सचे कसे चालेल? अतिशहाणपणामुळे त्यांचा स्वतःचा राजकारणाचा बैल रिकामा राहिला तरी त्यांना स्वतःला क्रियाशील राजकारण फारसे जमले नाही; तरी राजकारण चर्चा हा त्यांचा खास प्रांत आहे. प्रत्यक्ष राजकारण आणि राज्यकारण करणाऱ्या मंडळींना 'गाईडलाईन्स' पुराविणाऱ्या यथार्थदीपिका उजळणे हे त्यांचे 'मिशन' आणि कधीकधी कमिशनही आहे. कोणत्यातरी शिवबाचे गागाभट्ट वा रामदास होण्याची अथवा कोण्या चंद्रगुप्तांचे आर्य चाणक्य बनण्याची तमन्ना त्यांच्या दिलाच्या दिवाणखान्यात थैमान घालीत असते. त्या बुद्धिमंतांतील एक पोटवर्ग आहे आम्हा पत्रकारांचा. आम्हास कामाच्या निमित्ताने जीवनातील सर्व विषयात रस घ्यावाच लागतो. विशेषत: राजकारणात!  राज्यकर्त्यांची आणि राजकारणाची संगत नको रे बाबा असे आम्हास म्हणताच येत नाही. शासनकर्त्यांना ऐकविणे आणि त्यांचे ऐकणे, त्यांच्या मुलाखती घेणे, त्यांच्याशी प्रश्नोत्तरी करणे हा आमच्या व्यवसायाचाच एक भाग!

*गरजेचे राजकारण*
राजकारण गरजेचे असते हे राजकारण्यांचे म्हणणे फार महत्वाचे असते, हे सहज लक्षात येईल. राजकारणात कधी कृष्णशिष्टाई, तडजोड, तर कधी कुरुक्षेत्रावरील झोडाझोडी, कधी समझौता, कधी निव्वळ दमबाजीने बाजी मारणे! असे राजकारणाचे स्वरुप गरजेनुसार म्हणजेच देशकाल परिस्थितीप्रमाणे पालटत राहते. 'गरजेचे राजकारण' हे एकदा मान्य केले म्हणजे ते सदैव बेरजेचेच असेल, असं सांगवत नाही. ते जेवढे बेरजेचे तेवढेच वजाबाकीचे; जेवढे गुणाकाराचे तेवढेच भागाकाराचे! राजकारण किंबहुना कोणतेही काम, कार्य एकंदरीत बेरजेने, लोकमान्य टिळकांच्या शब्दात सांगायचे झाल्यास 'लोकसंग्रहा'ने साध्य होते हे खरे; पण कधी कधी वजाबाकीनेही कार्यभाग उत्तमपणे साधतो. बारा भिन्नभिन्न वाटांनी जाणाऱ्या बारभाईंच्या बेरजेपेक्षा, सुसूत्रता साधणारी वजाबाकी कधीकधी वाजवी वाटते, वाजवी ठरते! 'राखावी बहुतांशी अंतरे' हा समर्थ संदेश बहुश: फलदायी असला तरी बहुतांना विशिष्ट अंतरावर ठेवणे देखील राजकारणात काहीवेळा क्रमप्राप्त ठरते. समर्थ रामदासांनी राखावी बहुतांशी अंतरे या आशयाचा उपदेश अनेकदा जेला असला तरी, 'दासबोधा'तील 'राजकारण' नामक निरुपण नामक समासात ह्याच उपदेशाला पुस्ती जोडली आहे.
'जो बहुतांचे सोसेना।
त्यास बहुत लोक मिळेना।।'
एवढं सांगून ते थांबले नाहीत तर, 'अवघेचि सोसिता उरेना।
महत्व आपुले।।'
अशी जोडही दिली आहे. पुष्कळांना आपलेसे करावे हे सांगतानाच
'हिरवटाशी दूरी धरावे।
युद्ध कार्यास ढकलावे।
नष्टासी नष्ट योजावे। राजकारणामध्ये।।'
असा इशाराही त्यांनी दिला आहे.

*राजकारणाचे चक्रव्यूह*
सारांश, जीवनाप्रमाणेच राजकारणाचे ध्येय निश्चित ठरविता येईल; पण त्या ध्येयाच्या गरजेनुसार उपाय योजावे लागतील. वेगवेगळ्याप्रकारे गणित मांडावे लागेल. पुष्कळदा बेरजेचे, गुणाकाराचे पण वेळप्रसंगी वजाबाकीचे आणि भागाकाराचे देखील! राजकारण धुरंधर इंदिरा गांधीची कारकीर्द डोळ्यासमोर आणली तरी हे सहजच पटेल की, ज्यांनी बेरजेप्रमाणेच वजाबाकीचे पाठही अनेकदा गिरवले आहेत. छत्रपती शिवरायांच्या चरित्रात निरपवाद बेरीज आणि निरपवाद वजाबाकी आढळत नाही. कधी शरणागती तर कधी रणनीती, कधी माघत्तर तर कधी पुढाकार, कधी तह कधी तलवार, कधी संधी कधी विग्रह, कधी बेरजेचं सामर्थ्य तर कधी वजाबाकीचं चातुर्य अशी विविधपरींची वळणे घेत  त्यांच्या राजनीतीचा अश्व प्रगतीपथावरून ध्येय मंदिराकडे गेला! राजकारणाची ही क्षणाक्षणाला बदलणारी वळणे...वळणेच ती! तेव्हा ती वक्रीच असणार. राजकारणाची मुशाफिरी सरळसोट धोपट मार्गाने सहसा होतच नाही. राजकारण म्हणजे एक वक्री शनी! त्याच्या साडेसातीच्या फेऱ्याला तोंड देणे फार मुष्कीलच. पण त्याचा तोंडवळा नुसता न्याहाळणेच सोपे नाही. राजकारणाचे गणित कळायला आणि यशस्वीपणे सोडवायला विशिष्ट पिंड प्रकृतीची गरज असते. तत्वज्ञ, साहित्यिक, कलावंत ह्यांच्या पिंडप्रकृतीला सहसा ते मानवत नाही. म्हणूनच या वर्गातील शहाणी माणसं राजकारणाच्या चक्रव्यूहात अडकत नाहीत. इतकंच काय त्यावर भाष्य करणंच टाळतात. लोकशाहीच्या दृष्टीने आणि राष्ट्राच्याही दृष्टीने हे कितपत योग्य आहे. याचा विचार शहाणी मंडळी कधी करणार?

*सज्जनांचा वावर हवा*
शहाणी सुशिक्षित मंडळी राजकारणापासून लांब जाण्याचा प्रयत्न करताना दिसतात. ते असे का वागतात? याचाही त्यांनी विचार करावा. सज्जन माणसे दूर गेल्यानेच दुर्जन माणसांचा संचार राजकारणात होऊ लागला आहे. सभा समारंभात, खासगी बैठकीत किंवा अगदी सहज गप्पा मारतानाही राजकारणात वाईट माणसं कशी आहेत. याच रसभरीत वर्णन करुन त्यापासून आपण कसे लांब आहोत याची शेखी मिरवण्यातच ते धन्यता मानतात. वास्तविक, दुर्जनांना राजकारणातून दूर ठेवायचं असेल तर सज्जनांचा, सुशिक्षितांचा शहाण्या माणसांचा वावर राजकारणात वाढायला हवा. राजकारणातले शिंतोडे आपल्या अंगावर उडतील म्हणून त्यापासून दूर राहणं हे खरं तर स्वतःशी आणि राष्ट्राशीही प्रतारणा करण्यासारखे आहे. राजकारणाची गटारगंगा स्वच्छ करण्यासाठी आपण उतरणार असू, तर या गटारगंगेतील शिंतोडे आपल्या अंगावर उडणारच आहेत, याची जाणीव असायला हवी. शिंतोडे उडताहेत म्हणून लांब पळून जाणं हा पळपुटेपणा आहे. शहाणी, सुशिक्षित, सज्जन माणसं पापभिरू असतात. त्यांच्यासमोर आपण एखादा बागुलबुवा उभा केला, तर ते शांतपणे मान वळवून दुसरीकडे निघून जातील. अशी धारणा राजकारणातल्या दुर्जनांची असते म्हणूनच राजकारणातल्या दुर्जनांचा हा कावा ओळखून हिंमतीने आणि निर्धाराने राष्ट्रीय राजकारणात उतरणं हे कर्तव्य ठरतं.
*विधिनिषेध राहिलेला नाही*
राजकीय नेत्यांच्या चारित्र्याचा प्रश्न नेहमीच दबक्या आवाजात चर्चिला जातो दिल्लीतल्या राजकारण्यांपासून गल्लीतल्या पुढाऱ्यापर्यंत सगळ्यांच्याच चारित्र्याची उठाठेव सुरु असते. सध्या काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते एन.डी.तिवारी यांच्या भाजप प्रवेशाने राजकीय चारित्र्याची पुन्हा चर्चा झाली. त्यांनी आपल्या अनौरस पुत्राला नाकारणं, डीएनए टेस्टचं आव्हान, तिवारींची शरणागती, त्यानंतर पुत्राचा आणि पत्नीचा स्वीकार या सगळ्या घटना तेव्हा पुन्हा उजळल्या गेल्या. अशा चारित्र्यहीन माणसाची पार्टी विथ डिफरन्स असलेल्या भाजपला गरज का लागावी? सत्तेसाठी काहीही केले जाते आहे, कुणालाही स्वीकारले जाते, याचा कोणताही विधिनिषेध राहिलेला नाही.

*राजकीय चारित्र्याची चर्चा*
देशात आणि राज्यात संमिश्र सरकारे आली आणि सत्तेसाठी म्हणून सर्वच पक्षांना आपली धेय्य धोरणं गुंडाळून ठेवावी लागली आहेत. सत्ताधारी पक्षाला सत्तासाथीदार असलेल्या इतर पक्षांना सांभाळीत, कसरत करीत कारभार करावा लागल्याने त्यांना कोणत्याच पक्षावर, त्याच्या ध्येयधोरणावर टीका करता येत नाही. त्यामुळे लोकांसमोर जाताना कशा पद्धतीनं जावं ही एक समस्यांचं साऱ्या पक्षांसमोर होती. यावर तोडगा म्हणून आपली सत्ता आली तर हा आमचा 'सत्तासाईबाबा' असं सांगून आपल्या नेत्यांच्या छब्या लोकांसमोर धरल्या जाऊ लागल्या. मग विरोधी पक्षाकडे त्या सत्तासाईबाबाच्या विरोधात चारित्र्यहनन करण्या व्यतिरिक्त कोणताच पर्याय उरला नाही. चारित्र्यावर चिखलफेक ही नित्याचीच बाब झाली. वास्तविक चारित्र्य आणि भ्रष्टाचार या दोनही बाबी व्यक्तीकडून सार्वजनिकतेकडे जात असतात. चारित्र्य ही काही पेहरावासारखी किंवा प्रसाधनासारखी बाहेरून स्वीकारण्याची अथवा वापरायची चीज नव्हे. चारित्र्य हे माणसाच्या व्यक्तिमत्वाचा भाग असतो म्हणून तो त्याच्या जीवनाचाही भाग असतो. माणसाच्या नीती-अनिताच्या कल्पना या साऱ्यातून माणसाचं चारित्र्य आकार घेत असतं. केवळ स्त्री पुरुष संबंधापुरती चारित्र्याची कल्पना अथवा व्याख्या सीमित असत नाही. आणि असूही नये. त्या साऱ्याला पुन्हा समाजाने ठरवलेल्या निकषांची परिमाणं आहेत. आणि ते निकष त्या समाजात वावरणाऱ्याला, त्या समाजाचा घटक असलेल्यांना मान्य असावे लागतात आणि सहसा ते सर्व असतातही.

*शील आणि चारित्र्य*
दोन व्यक्तिमधले विवाहबाह्य संबंध हा व्यक्तिगत चारित्र्यहीनतेचा भाग झाला. पण त्यासाठी सत्तास्थानाचा अथवा अधिकाराचा गैरवापर करणे,  हा सार्वजनिक चारित्र्यहीनतेला प्रवृत्त करतो. तीच गोष्ट सार्वजनिक पैशाची उधळपट्टी करण्याबाबत. जी वस्तू माझी नाही, मी ती वापरू नये. जी दुसऱ्याची आहे, ती त्याच्या परवानगीनेच वापरायची, एवढी साधी सभ्यता ज्यांच्यापाशी नसेल तर तो माणूस सर्वत्र आपला हक्कच प्रस्थापिक करू पाहतो आणि हळूहळू सार्वजनिक जीवनात सुद्धा! त्याचा साऱ्या समाजावर अनिष्ट परिणाम घडत असतो. अढीतल्या आंब्याप्रमाणे हळूहळू समाज नासायला लागतो. चारित्र्यहीनतेकडे, भ्रष्टतेकडे वळू लागतो. या संदर्भात ज्येष्ठ विचारवंत नरहर कुरुंदकर यांच्या 'वाटा तुझ्या माझ्या' या पुस्तकातील एक विचार आठवतो. ते म्हणतात, " वैयक्तिक जीवनातील शील आणि चारित्र्य ही एक फार मोठी जबाबदारी आहे. समाजवादी संघटनेचा कार्यकर्ता जर विद्यार्थी असेल तर तो इतरांपेक्षा अधिक नियमित असला पाहिजे. शालेय अभ्यासात अधिक चोख असला पाहिजे.त्याचे स्वतःचे जीवनमान आणि वैयक्तिक खर्च उधळपट्टी नसलेला तसाच जबाबदारीचा असला पाहिजे. असा कार्यकर्ता समाजावर एक नैतिक दडपण असतो. म्हणजेच चारित्र्यसंपन्न व्यक्तीचा इतरांवर प्रभाव पडतो अथवा सार्वजनिक चारित्र्य चोख असण्यासाठी व्यक्तिगत चारित्र्य स्वच्छ असणं आवश्यक आहे." आज समाजावर असं दडपण आणू शकणाऱ्या व्यक्ती आपल्या भोवतालच्या समाजातून आपल्याला शोधाव्या लागतील, कारण शील आणि चारित्र्य याबाबतच्या जबाबदारीची उणीवच कमी अधिक होऊ लागली आहे. इतरांपेक्षा अधिक नियमित, अधिक चोख असण्याची प्रवृत्ती सार्वजनिक जीवनातून कमी कमी होऊ लागली आहे. याउलट याचं जसं पचलं तसं माझंही पचेल, तो करतो, हा करतो, ते करतात मग मी का नको? अशी एक निर्ढावलेली प्रवृत्ती सार्वजनिक जीवनात प्रतीत होत आहे आणि ही प्रवृत्ती त्यांचं पचलं मधला तो आणि माझंही पचेल मधला मी या दोन व्यक्तीकडूनच सार्वजनिक जीवनात उलटली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी व्यक्तिगत चारित्र्याच्या शुद्धतेची चाड असणं अत्यंत आवश्यक आहे. व्यक्तिगत चारित्र्याची चाड जो समाज बाळगील, सार्वजनिक चारित्र्याच्या शुद्धतेची जोपासना जो समाज करील, त्या समाजाला भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाची गरजच भासणार नाही. मध्यंतरी राज्यात सार्वजनिक चारित्र्याबाबत आणि भ्रष्टाचार याबाबत आंदोलन झाली. अण्णा हजारे यांच्यासारखी चारित्र्यवान मंडळी या आंदोलनाच्या अग्रभागी होती. पण ही आंदोलने काही दिवसांनी थंडावली. कारण या आंदोलनात जे सहभागी झाले होत गेले, त्यांच्याबद्दल शंका उपस्थित केली गेली. पूर्वी श्रद्धेची जी ठिकाणं होती, टी आता धूसर बनली आहेत. राजकारणात चारित्र्यवान माणसे अभावानेच आढळू लागली आहेत.आणि भ्रष्टाचारांचा सुळसुळाट झालाय. चारित्र्यवान नेत्यांची संख्या हळूहळू रोडावी लागली आहे, आता तर ती नष्ट होते की काय अशी शंका येऊ लागलीय. त्यातच पुरोगामी आणि प्रतिगामी विचारसरणीची सरमिसळ झालीय, यात सर्व राजकीय पक्ष अडकले. विविध वैचारिक अधिष्ठान असलेली राजकीय नेते मंडळी एकाच पातळीवर आल्याने लोकांसमोर नेतृत्वाबद्धल साशंकता निर्माण झाली आणि या साशंकतेतून नेतृत्वावरचा विश्वास उडाला. धेय्य धोरणे, वैचारिक बैठक, तत्व, निष्ठा, आचार विचार हे सारं साफ बुडाले, उरली फक्त खुर्चीची लालसा, महत्वाकांक्षा, त्यासाठी वाट्टेल टी तडजोड, लांगुलचालन, खोट्याचं खरं आणि खऱ्याचं खोटं करण्याची प्रवृत्ती, सार्वजनिक जीवनातला हा व्याभिचार थांबायला हवा. असं झालं तर चारित्र्यहीनता आपोआपच जाईल. देशाच्या दृष्टीने ते एक आशादायक चित्र असेल, त्याच प्रतीक्षेत तुम्ही, आम्ही, आपण सारेच राहायला काय हरकत आहे? 'नॉट द फेल्युअर बट लो एम इज क्राईम' यानुसार सकारात्मक दृष्टिकोन बाळगायला हवाय. भ्रष्ट नेत्यांना भाजपेयींची गळा भेट सत्तेसाठी गळा घोटणारा ठरला तर आश्चर्य वाटायला नको.
- हरीश केंची

'इंडिया शायनिंग' ते 'मोदी की गॅरंटी...!'

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...