Sunday 29 July 2018

पाकिस्तानातील प्रधानमंत्रीपदाची परवड...!

"पाकिस्तानसारख्या ‘लोकशाही’ देशात सार्वत्रिक निवडणुका या एखाद्या महान घटनेपेक्षा कमी नाहीत. १९७० मध्ये पाकमध्ये झालेल्या पहिल्याच निवडणुकीनंतर सरकारमध्ये लष्कराचा हस्तक्षेप, निवडणुकीत गडबड-गोंधळ, अफरातफरी, लष्करी हुकूमशाही आणि ज्या गोष्टी लोकशाहीला पोषक नाहीत, अशा मध्ययुगीन कालखंडातील घडामोडी पाकमध्ये आजही प्रचलित आहेत. पाकिस्तान निर्मितीनंतरच्या ७१ वर्षांपैकी सुरुवातीची ३५ वर्षे पाकिस्तानी जनतेनं राजकीय व्यवस्था म्हणून अनुभवली ती लष्करी आणि हुकूमशाही राजवट! या देशातील लोकशाही व्यवस्था इतकी नामधारी राहिलीय की, आतापर्यंत फक्त दोनच प्रधानमंत्र्यांना आपला कार्यकाळ कसाबसा पूर्ण करता आलाय. ७१ वर्षांच्या प्रदीर्घ या काळात पाकिस्तानात १३ वेळा सरकार स्थापन झाले, ज्यामध्ये १८ जण तब्बल २२ वेळा प्रधानमंत्रीपदी विराजमान झाले. त्यापैकी १७ प्रधानमंत्र्यांचा कार्यकाळ अपूर्ण राहिलाय. पहिल्या दशकात तर ७ प्रधानमंत्री झाले. इथं तीनवेळा लष्करानं राजवट लादली. एका प्रधानमंत्र्याची हत्या केली गेली, तर एकाला फासावर लटकवलं गेलंय. आता लष्कर आणि दहशतवाद्यांच्या पाठींब्यावर सत्तेवर आलेल्या इम्रानखान यांचा कार्यकाळ कसा राहील हे पाहणे औत्सुक्याचे राहील!"
--------------------------------------------------
*पा* किस्तानातील यंदाची सार्वत्रिक निवडणूक ही मागच्या कित्येक निवडणुकांच्या तुलनेत कितीतरी पटीने वेगळी होती कारण, पाकिस्तानमध्ये झालेली माहितीची क्रांती लोकशाही प्रक्रियेमध्ये आपला ठसा निश्चितच उमटविलाय. निवडणूक विश्लेषकानुसार, यंदा समाजमाध्यमांवर सक्रिय असलेले पाकिस्तानी युवकांनी लोकसंख्येच्या बाबतीत सहाव्या क्रमांकावर असणाऱ्या या देशात सरकार स्थापनेमध्ये निर्णायक भूमिका बजावलीय असं दिसतंय. पाकिस्तानात यंदा निवडणुकीपूर्वी मतदान प्रकियेत कित्येक बदल केले गेले होते. निवडणूक आयोगाने एक अभूतपूर्व पाऊल उचलत पहिल्यांदाच मतदान केंद्राच्या आतमध्येही लष्कराला तैनात केलं होतं. तसेच, आणखी एका नव्या बदलांतर्गत पाकिस्तानमध्ये प्रत्येक राजकीय पक्षाला सामान्य जागांमध्ये कमीत कमी पाच टक्के महिलांना उमेदवारी देणे अनिवार्य करण्यात आलं होतं. या सर्वच तरतुदी पाकिस्तानच्या निवडणूक अधिनियम २०१७ अंतर्गत करण्यात आल्या होत्या. सोबतच,  निवडणूक आयोगाने मतदानात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी आणखी एक पाऊल उचललं होतं, ज्या अंतर्गत जर एखाद्या मतदारसंघात महिलांच्या मतदानाचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा कमी असेल, तर तिथे फेरमतदान घेतलं जाईल. पण अशी स्थिती तिथं निर्माणचं झाली नाही. महिलांनी मतदानात हिरीरीनं भाग घेतलाय.

*दहशतवादीही निवडणूक रिंगणात*
पनामा गेट, एवनफिल्ड संपत्ती प्रकरणात दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलेले आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निवडणूक लढवण्यास असमर्थ ठरलेले माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लीम लीग-एन (पीएमएल-एन) पक्ष, माजी क्रिकेटपटू इमरान खान यांचा पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआई) पक्ष आणि माजी राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांचा पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) पक्ष यांच्यादरम्यान तिरंगी लढती झाल्या याव्यतिरिक्त, मुताहिदा मजलिस-ए-अमलच्या बॅनरखाली पाकिस्तानमधील इस्लामी राजकीय पक्ष पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. दहशतवादी नेता हाफिझ सईदचा राजकीय पक्ष-मिली मुस्लीम लीग, ज्याला निवडणूक आयोगाचे नोंदणी प्रमाणपत्रही मिळालेले नव्हते, असा हा पक्षही आणि फारशा चर्चेत नसणारी अल्लाहो अकबर राजकीय संघटना ‘तेहरिक’च्या बॅनरखाली निवडणूकीत उतरले होते. दुसरीकडे अशाच प्रकारची अन्य एक कट्टरवादी राजकीय संघटना ‘तेहरिक-ए-लबायक’, ‘रसूल अल्लाह’ आणि ‘टीएलवाय’देखील निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा राजकीय चेहरा आणि पक्षनोंदणी न झालेल्या मिली मुस्लीम लीगनेही निवडणुकीच्या रिंगणात आपले उमेदवार उतरवले आहेत. या संघटनेचा थेट संबंध दहशतवादी हाफिझ सईदशी आहे. पाकिस्तानात या निवडणुकीसाठी एएटीने एमएमएलच्या २६५ उमेदवारांना उमेदवारी दिलीय. एमएमएलच्या उमेदवारांमध्ये हाफिझ सईदचा मुलगा हाफिझ तलहा सईद आणि जावई खालिद वालिद यांचाही समावेश आहे. एमएमएलचे अशाप्रकारे अधिकृतरित्या नोंदणी न करता निवडणुकीच्या आखाड्यात उतरणे पाकिस्तानच्या निवडणूक आयोग आणि गृहखात्यामधील गैरप्रकारांनाच चव्हाट्यावर आणते. विशेष म्हणजे, यापूर्वी निवडणूक आयोग आणि गृहखात्यानेही सईदच्या या पक्षाच्या नोंदणीस विरोध दर्शविला होता, कारण या पक्षातील सदस्यांचे आणि नेतेमंडळींचे लागेबांदे हे दहशतवाद्यांशी आहेत.

*भारतद्वेष वाढण्याची भीती*
पाकिस्तानच्या जडणघडणीत आणि अस्तित्व टिकवण्याच्या धडपडीत भारतद्वेष हा एक महत्त्वपूर्ण मुद्दा राहिलाय. त्यामुळे पाकिस्तानमध्ये निवडणुकांच्या काळात कुठल्याही राजकीय पक्षाच्या प्रचारात भारतविरोधाचा मुद्दा हा मोठ्या प्रमाणात समोर येतोच. पण, द्विपक्षीय संबंध सुधारण्याची पाकिस्तानी सरकारची इच्छा आणि आवश्यकता भारतद्वेषाच्या मुद्द्याआड येतात. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या राजकीय गरजेनुसारच भारत-पाक संबंधातील चर्चांना काय दिशा मिळते, ते पाहावे लागेल. सद्यस्थितीत पाकिस्तानी सैन्य, तिथल्या दहशतवादी संघटना  आणि चीन हे इमरान खानच्या यशात सहभागी असल्यानं भारतासाठी इमरान खान हा चिंतेचा विषय ठरु शकतो. इमरान खान इस्लामिक दहशतवादी संघटनांप्रती असलेल्या त्यांच्या ‘सॉफ्ट कॉर्नर’मुळे ‘तालिबान खान’ म्हणूनही ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या पक्षाचे सरकार सत्तारुढ झाले असल्यानं तर ते कोणत्या टोकाला जातील, याचा विचार करावा लागेल. आपण हे जाणतोच की, भारतासोबत संबंध सुधारण्याच्या पाकिस्तान मुस्लीम लीग आणि नवाझ शरीफांच्या सर्व प्रयत्नांना अयशस्वी केले गेले. त्यामुळे पाकिस्तानातील नवे सरकार त्यांचे सैन्य आणि चीनच्या दबावात प्रादेशिक शांततेसाठी कशाप्रकारे प्रयत्न करते, ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल. पण, शेजारच्या देशात कुठल्याही पक्षाचे सरकार आले तरी, भारताला मात्र कोणत्याही परिस्थितीत त्याचा सामना करण्यासाठी सज्ज राहावं लागेल. कारण त्यावरच तिथलं राजकारण अवलंबून राहणार आहे.

*प्रधानमंत्रीपदाचा इतिहास*
पाकिस्तानात १९४७ नंतर आजपर्यंतच्या ७१ वर्षाच्या कालखंडात १८ प्रधानमंत्री झाले पण त्यापैकी दोघेच आपला कार्यकाळ कसाबसा पूर्ण करू शकले. तिथं तीन वेळा निवडून आलेल्या लोकनियुक्त सरकारला इथल्या लष्करानं उलथवून टाकलं. एका प्रधानमंत्र्याची हत्या झाली तर एकाला फाशीची शिक्षा दिली गेली. १२ प्रधानमंत्र्यांवर वेगवेगळे आरोप ठेऊन पदच्चूत केलं गेलं. गेल्यावर्षी भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर पदावरून नवाज शरीफ यांना हटवलं गेलं. १९४७ मध्ये पाकिस्तान अस्तित्वात आल्यानंतर पहिले प्रधानमंत्री बनलेले लियाकत अली खान यांची रावळपिंडीत हत्या केली गेली. त्यांनी आपल्या कार्यकाळातली ४ वर्षे पूर्ण केली होती. त्यानंतर प्रधानमंत्री बनलेले खवाजा नजीमुद्दीन यांना फक्त १८ महिन्याच्या कार्यकाळानंतर १९५३ मध्ये गव्हर्नर जनरल मलिक गुलाम मोहम्मद यांनी आदेश दिल्यानं पद सोडावं लागलं. त्यानंतर मोहम्मद अली बोगरा हे प्रधानमंत्री बनले. यावेळी सुद्धा पाकिस्तानचे नवे आणि अखेरचे गव्हर्नर इस्कंदर मिर्जा यांनी १९५५ मध्ये त्यांचं सरकार अकार्यक्षम म्हणत बोगरा यांना पदावरून दूर केलं.

*राष्ट्रपतीपदाच्या निर्मितीनंतरही वाद सुरूच*
१९५५ मध्ये पाकिस्तानात संविधान-राज्यघटना अंमलात आली. यात गव्हर्नरपद रद्द करून इस्कंदर मिर्जा यांना पहिले राष्ट्रपती घोषित करण्यात आलं. त्यानंतर प्रधानमंत्री आणि राष्ट्रपती यांच्यात अधिकारावरून वादाला प्रारंभ झाला. १९५५ मध्ये चौधरी मोहम्मद अली पाकिस्तानचे प्रधानमंत्री बनले. एका वर्षांनंतर सप्टेंबर १९५६ मध्ये त्यांनी राष्ट्रपती मिर्जा यांच्याशी झालेल्या वादानंतर राजीनामा दिला. त्यानंतर १९५६ मध्ये अवामी लीगकडून निवडून आलेल्या शाहिद सुहारावर्दी यांना प्रधानमंत्री निवडण्यात आलं. परंतु त्यांचेही राष्ट्रपतींशी झालेल्या मतभेदांमुळे एका वर्षातच त्यांना हटवलं गेलं. त्यानंतर राष्ट्रपती इस्कंदर मिर्जा यांनी इब्राहिम इस्माईल चुंद्रीगर यांना प्रधानमंत्री बनवलं. परंतु लगेचच दोन महिन्यात चुंद्रीगर यांनी डिसेंबर १९५७ मध्ये राजीनामा दिला. त्यानंतर राष्ट्रपती मिर्जा यांनी पाकिस्तानचे ७ वे प्रधानमंत्री म्हणून फिरोज खान नून यांची नियुक्ती केली.

*पहिली लष्करी राजवट*
देशात सतत बिघडत चाललेली राजकीय परिस्थिती पाहून १९५८ मध्ये जनरल आयुब खान यांच्या सैन्यानं इथलं सरकार उलथवून टाकलं. प्रधानमंत्री पदावरून हटवलं गेलं. तर राष्ट्रपतींना राजीनामा द्यायला भाग पाडलं. त्यानंतर आयुब खान स्वतः राष्ट्रपती बनले अन १९५८ ते १९७१ या दरम्यान तब्बल १३ वर्षांसाठी प्रधानमंत्रीपद रद्द करून टाकलं. दरम्यान १९६९ मध्ये आयुबखान यांनी आपल्या राष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला आपल्याकडं प्रधानमंत्रीपद ठेवलं.लष्करप्रमुख याह्याखान यांना राष्ट्रपती पदावर बसवलं.

*दुसऱ्यांना लष्करी राजवट, प्रधानमंत्र्यांना फाशी*
१९७१ मध्ये भारताशी झालेल्या युद्धात पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला. बांगलादेशच्या निर्मितीनंतर इथली लष्करी राजवट संपुष्टात आली आणि झुल्फिकार अली भुट्टो राष्ट्रपती बनले. या दरम्यान नुरुल अमीन यांना ८ वे प्रधानमंत्री म्हणून घोषित केलं गेलं. पण ते केवळ १३ दिवसच त्या पदावर राहिले. त्यानंतर दोन वर्षांनी १९७३ मध्ये पाकिस्तानची नवी राज्यघटना अस्तित्वात आली आणि यात भुट्टो यांनी आपल्यासाठी प्रधानमंत्रीपद आपल्यासाठी राखलं. १९७७ मध्ये लष्करप्रमुख जनरल झिया-उल-हक यांनी पुन्हा एकदा लष्करी राजवट लागू केली आणि स्वतःला राष्ट्रपती घोषित करून टाकलं. १९७९ मध्ये झिया-उल-हक यांनी भुट्टो यांच्यावर निवडणुकीत भ्रष्टाचार केला, हेराफेरी केली असा आरोप ठेवून झुल्फिकार अली भुट्टो यांना फाशी दिली.

*बेनजीर बनल्या प्रधानमंत्री*
१९७७ ते १९८५ पर्यंत पाकिस्तानात लष्करी राजवट राहिली. या दरम्यान लष्कराने १९८५ मध्ये मोहम्मद खान जुनेजा यांना देशाचे १० वे प्रधानमंत्री बनवलं. परंतु जुनेजांच्या राजकीय हालचाली आणि त्यांची महत्वाकांक्षा पाहून १९८८ मध्ये त्यांच्या सरकारला हटवलं गेलं. ऑगस्ट १९८८ साली झिया-उल-हक यांच्या निधनानं इथली लष्करी राजवट संपुष्टात आली. त्यानंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत झुल्फिकार अली भुट्टो यांची मुलगी बेनजीर भुट्टो यांना प्रधानमंत्रीपद मिळालं. पण त्यांचं सरकार केवळ २० महिनेच टिकलं. १९९० मध्ये राष्ट्रपती गुलाम इसहाक खान यांनी त्यांना प्रधानमंत्रीपदावरून दूर केलं. १९९० मध्ये नवाज शरीफ पाकिस्तानचे १२ वे प्रधानमंत्री बनले. १९९३ पर्यंत त्यांचं सरकार अस्तित्वात होतं. त्यानंतर राष्ट्रपती इसहाक खान यांनी त्यांचं सरकार पाडलं. १९९३ ते १९९९ पर्यंत नवाज शरीफ दोनदा आणि बेनजीर भुट्टो एकदा सत्तेवर राहिले.

*तिसऱ्यांदा लष्करी राजवट*
१९९९ च्या कारगिल युद्धानंतर पाकिस्तानचे तत्कालीन लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी देशात आणीबाणी जाहीर केली आणि नवाज शरीफ यांचं सरकार बरखास्त केलं. ही आणीबाणी तीन वर्षे होती. त्यानंतर २००२ मध्ये देशात पुन्हा सार्वत्रिक निवडणुका झाल्या. त्यावेळी १३ व्या प्रधानमंत्रीच्या रुपात जफरुल्लाह खान जमाली यांनी शपथ घेतली. त्यानंतर २००४ मध्ये चौधरी सुजात हुसेन प्रधानमंत्री बनले. केवळ १ महिना २७ दिवसात पाकिस्तानला शौकत अजीज हे १५ वे राष्ट्रपती म्हणून लाभले. २००८ मध्ये मुशर्रफ यांनी राष्ट्रपतीपद सोडल्यानंतर पाकिस्तानात पाकिस्तान पीपल्स पार्टी-पीपीपी चं सरकार अस्तित्वात आलं. प्रधानमंत्री निवडले गेले युसूफ रझा गिलानी. पांच वर्षांचा नव्हे तर ४ वर्षे म्हणजे २०१२ पर्यंत कार्यकाळ पूर्ण करणारे दुसरे प्रधानमंत्री ठरले. सर्वोच्च न्यायालयाची बेअबदी केल्याप्रकरणी गिलानी यांना प्रधानमंत्रीपदावरून हटवलं गेलं. त्यांच्यानंतर २०१२ मध्ये राजा परवेझ अश्रफ हे १७ वे प्रधानमंत्री निवडले गेले.

*शरीफ यांची सत्तवापसी, भ्रष्टाचाराने गच्छंती*
२०१३ च्या सार्वत्रिक निवडणुकीत शरीफ यांची पार्टी पीएमएल-नवाज याने विजय मिळवला आणि नवाज यांनी प्रधानमंत्री म्हणून चौथ्यांदा सरकार बनवलं. पण २०१७ मध्ये पनामा पेपरगेट मध्ये त्यांचं नांव आलं त्यानंतर त्यांना पद सोडावं लागलं. न्यायालयानं त्यांना दोषी ठरवलं, कारागृहात जेरबंद केलं  आणि त्यांना निवडणूक लढविण्यास बंदी घातली. आता त्यांचे बंधू शाहबाज हे निवडणूक लढविताहेत. त्यांना नवाज शरीफ यांचा वारसदार म्हणून पाहिलं गेलं. पण त्यांना तिथं यश लाभलं नाही. आता पीटीआयचे इम्रान खान पाकिस्तानचे प्रधानमंत्री बनताहेत. त्यांचं ते पद लष्करांच्या आशीर्वादानं लाभलं असल्यानं साहजिकच त्यांना लष्कराच्या तालावर नाचावं लागेल नाहीतर गच्छंती ही ठरलेलीच!

चौकट......
*भारताच्या कुटनीतीचा कस लागणार*
पाकिस्तानातील सत्तेचा रिमोट नेहमी लष्कराकडेच राहिलाय. आता पाकिस्तान लष्कराच्या दृष्टीनं तुलनेनं दुर्बळ, सक्षमता कमी असलेली व्यक्ती त्यांना प्रधानमंत्रीपदी, राष्ट्रपतीपदी हवी आहे. जसा नवाज शरीफ यांनी लष्कराचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला तसा प्रयत्न कुणी केला तर तो लष्कराला अजिबात रुचत नाही ही वस्तुस्थिती आहे. दहशतवादी संघटनांचे प्रतिनिधी निवडणुकीत यश मिळवू शकले नसले तरी त्यांचे महत्व येणाऱ्या काळात वाढू शकेल. त्यामुळं इम्रान खान प्रधानमंत्री झाले तरी खरी सत्ता ही लष्कराचीच राहणार हे उघड आहे. तिथं सत्ता परिवर्तन झालं म्हणून भारताशी मैत्रीपूर्ण संबंध वाढतील या भ्रमात कुणी राहू नये. पाकिस्तानी लष्कराचा भारतविरोध अधिक टोकदार होईल. त्याच बरोबर भारतातील दहशतवादी कारवाया वाढण्याची शक्यता आहे. पाकिस्तानला चीननं जर अधिक मदत केली तर त्याचे परिणाम भारतावर होऊ शकतो. त्यामुळं भारताला सक्षम आणि ठाम भूमिका घेणं गरजेचं आहे.बलुचिस्तानातल्या असंतोषाचा फायदा घ्यायला हवाय. पाकिस्तानची अवस्था तशी दयनीय झालीय. त्यातच अमेरिकेवर टीका करीत चीनशी संबंध वाढविण्याचे संकेत दिले गेलेत, याचा फायदा कसा घ्यायचा यासाठी भारताच्या कुटनीतीचा कस लागणार आहे.

हरीश केंची,
९४२२३१०६०९

Thursday 19 July 2018

लोकशाहीचे धिंडवडे!



सार्वत्रिक निवडणुका येत्या २५ जुलैला होताहेत. खरं तर पाकिस्तानसारख्या ‘लोकशाही’ देशात सार्वत्रिक निवडणुका या एखाद्या महान घटनेपेक्षा कमी नाहीत. १९७० मध्ये पाकिस्तानमध्ये झालेल्या पहिल्याच निवडणुकीनंतर सरकारमध्ये लष्कराचा हस्तक्षेप, निवडणुकीत गडबड-गोंधळ, अफरातफरी, लष्करी हुकूमशाही आणि ज्या गोष्टी लोकशाहीला पोषक नाहीत, अशा मध्ययुगीन कालखंडातील घडामोडी पाकिस्तानमध्ये आजही प्रचलित आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या ७१ वर्षांपैकी सुरुवातीची पहिली ३५ वर्षे पाकिस्तानी जनतेने राजकीय व्यवस्था म्हणून अनुभवली ती लष्करी आणि हुकूमशाही राजवट. या देशातील लोकशाही व्यवस्था इतकी नामधारी की, आतापर्यंत फक्त दोन पंतप्रधानांना आपला पाच वर्षांचा कार्यकाळ कसाबसा पूर्ण करता आला. ७१ वर्षांच्या प्रदीर्घ काळात पाकिस्तानमध्ये १३ वेळा सरकार स्थापन झाले, ज्यामध्ये १८ जण तब्बल २२ वेळा पंतप्रधानपदी विराजमान झाले. १६ प्रधानमंत्र्यांचा कार्यकाळ अपूर्ण राहिलाय. पहिल्या दशकात तर तब्बल ७ प्रधानमंत्री झाले. तीनवेळा लष्करानं राजवट लादली गेली. एका प्रधानमंत्र्याची हत्या केली गेली, तर एकाला फासावर लटकवलं गेलंय.

-----------------------------------

*पा* किस्तानमधील यंदाची सार्वत्रिक निवडणूक ही मागच्या कित्येक निवडणुकांच्या तुलनेत कितीतरी पटीने वेगळी आहे. कारण, पाकिस्तानमध्ये झालेली माहितीची क्रांती लोकशाही प्रक्रियेमध्ये आपला ठसा निश्चितच उमटवेल. निवडणूक विश्लेषकांनुसार, यंदा समाजमाध्यमांवर सक्रिय असलेले पाकिस्तानी युवक हे लोकसंख्येच्या बाबतीत सहाव्या क्रमांकावर असणाऱ्या या देशात सरकार स्थापनेमध्ये निर्णायक भूमिका निभावू शकतात. पाकिस्तानमध्ये यंदा निवडणुकीपूर्वी मतदान प्रकियेत कित्येक बदल करण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाने नुकतेच एक अभूतपूर्व पाऊल उचलत पहिल्यांदाच मतदान केंद्राच्या आतमध्येही लष्कराला तैनात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. तसेच, आणखी एका नव्या बदलांतर्गत पाकिस्तानमध्ये प्रत्येक राजकीय पक्षाला सामान्य जागांमध्ये कमीत कमी पाच टक्के महिलांना उमेदवारी देणे अनिवार्य करण्यात आले आहे. या सर्वच तरतुदी पाकिस्तानच्या निवडणूक अधिनियम २०१७ अंतर्गत करण्यात आल्या आहेत. सोबतच, पाकिस्तान निवडणूक आयोगाने मतदानात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी आणखी एक पाऊल उचलले आहे, ज्या अंतर्गत जर एखाद्या मतदारसंघात महिलांच्या मतदानाचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा कमी असेल, तर तिथे फेरमतदान घेतले जाऊ शकते.

*युवा मतदारांची संख्या मोठी*
यंदाच्या पाकिस्तानमध्ये होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करण्यायोग्य १०५० दशलक्ष मतदारांपैकी ४६० दशलक्ष युवा मतदार आहेत.
यापैकी १.७७ कोटी मतदार १८ ते २५ या वयोगटातले आहेत. पाकिस्तान निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील उपलब्ध आकडेवारीनुसार, पाकिस्तानच्या एकूण सहा प्रांतांमध्ये ५९.२ लाख पुरुष आणि ४७.७ लाख महिलांची नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट आहेत. तसेच यंदाच्या निवडणुकीत पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या १.२५ कोटींनी कमी आहे, तर ९१ लाख महिला पहिल्यांदाच मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. पाकिस्तानच्या केंद्रीय सभागृहात एकूण ३४२ सदस्य आहेत. यात २७२ सदस्य प्रत्यक्ष मतदानाद्वारे निवडले जातात. याव्यतिरिक्त पाकिस्तानी संविधानानुसार धार्मिक अल्पसंख्याकांसाठी १० आणि महिलांसाठी ६० जागा आरक्षित आहेत. जे ५ टक्क्यांपेक्षा अधिक मत प्राप्त करणाऱ्या राजकीय पक्षांमधून प्रमाणबद्ध प्रतिनिधीत्वाद्वारे निवडले जातात.

*सत्तेचे प्रमुख दावेदार*
नुकतेच एवनफिल्ड संपत्ती प्रकरणात दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलेले आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे याआधीही निवडणूक लढवण्यास असमर्थ ठरलेले माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लीम लीग-एन (पीएमएल-एन) पक्ष, माजी क्रिकेटपटू इमरान खान यांचा पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआई) पक्ष आणि माजी राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांचा पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) पक्ष यांच्यादरम्यान तिरंगी लढत यंदा रंगणार आहे. याव्यतिरिक्त, मुताहिदा मजलिस-ए-अमलच्या बॅनरखाली पाकिस्तानमधील इस्लामी राजकीय पक्ष पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. दहशतवादी नेता हाफिझ सईदचा राजकीय पक्ष-मिली मुस्लीम लीग, ज्याला निवडणूक आयोगाचे नोंदणी प्रमाणपत्रही मिळालेले नाही, असा हा पक्ष आणि फारशा चर्चेत नसणारी अल्लाहो अकबर राजकीय संघटना ‘तेहरिक’च्या बॅनरखाली निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. दुसरीकडे अशाच प्रकारची अन्य एक कट्टरवादी राजकीय संघटना ‘तेहरिक-ए-लबायक’ किंवा ‘रसूल अल्लाह’ किंवा ‘टीएलवाय’देखील निवडणुकीच्या मैदानात आहे.

*दहशतवादीही निवडणुकीत*
जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा राजकीय चेहरा आणि पक्षनोंदणी न झालेल्या मिली मुस्लीम लीगनेही निवडणुकीच्या रिंगणात आपले उमेदवार उतरवले आहेत. या संघटनेचा थेट संबंध दहशतवादी हाफिझ सईदशी आहे. पाकिस्तानात या निवडणुकीसाठी एएटीने एमएमएलच्या २६५ उमेदवारांना उमेदवारी दिलीय. एमएमएलच्या उमेदवारांमध्ये हाफिझ सईदचा मुलगा हाफिझ तलहा सईद आणि जावई खालिद वालिद यांचाही समावेश आहे. एमएमएलचे अशाप्रकारे अधिकृतरित्या नोंदणी न करता निवडणुकीच्या आखाड्यात उतरणे पाकिस्तानच्या निवडणूक आयोग आणि गृहखात्यामधील गैरप्रकारांनाच चव्हाट्यावर आणते. विशेष म्हणजे, यापूर्वी निवडणूक आयोग आणि गृहखात्यानेही सईदच्या या पक्षाच्या नोंदणीस विरोध दर्शविला होता, कारण या पक्षातील सदस्यांचे आणि नेतेमंडळींचे लागेबांदे हे दहशतवाद्यांशी आहेत.

*निवडणुकीनंतरचे राजकीय चित्र*
 या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १२ हजार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.पाकिस्तानी संसदेत एकूण ३४२ जागा असून सत्तास्थापनेसाठी १७२ जागांची आवश्यकता असते. पण, पाकिस्तानतील राजकीय निरीक्षकांनुसार, यंदा कोणत्याही एका पक्षाला निवडणुकीत बहुमत मिळण्याची शक्यता कमी आहे. अशा परिस्थितीत, इमरान खानच्या नेतृत्वाखालील पीटीआय आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीसारख्या कडव्या प्रतिस्पर्धीला दोन तृतीयांश मतांपेक्षा अधिक मते मिळाली, तर आघाडीचे सरकार पाकिस्तानात सत्तारुढ होऊ शकते. मागील निवडणुकीत नवाझ शरीफांच्या पक्षाला बहुमतापेक्षा केवळ सहा जागा कमी मिळाल्या होत्या आणि शेवटी १९ अपक्षांच्या मदतीवर शरीफांनी सत्ता स्थापन केली होती. त्याचबरोबर जमात-ए-इस्लामी तसेच जमियत-ए-उलेमा-ए-पाकिस्तान (एफ) हे सत्तेच्या समीप पोहोचणाऱ्या पक्षाला साथ देऊ शकतात किंवा आघाडीही करु शकतात. सद्यस्थिती पाहता, इमरान खान त्यांच्यासाठी एक उत्तम पर्याय सिद्ध होऊ शकतात. एएटी (एमएमएलचेच छद्मी रुप) स्वाभाविकपणे जमात-उद-दावा आणि फलाह-ए-इसायायतचे संस्थापक हाफिझ सईदच्या विवादास्पद, कट्टरपंथी आणि भारतविरोधी प्रचार अभियानालाच मदत करेल. कारण, पाकिस्तानात इस्लामचे कट्टरपंथी प्रभुत्व प्रस्थापित करण्याचे भारतविरोधी निरंतर शत्रुत्वाच्या भावनेचे स्वप्नचं त्यांना विकायची आहेत. परंतु, एमएमएल आणि तेहरिक-ए-लाबाइक किंवा रसूल अल्लाह (टीआयएल) या पक्षांचे मागील काही पोटनिवडणुकीतील यश पाहता, ते मतदानातील बऱ्यापैकी जागा जिंकू शकतील. मात्र, जागा जिंकण्यापेक्षा काही मतदारसंघांमधील, खासकरुन पंजाब, केपी आणि एफएटीए निवडणुकीतील मतांची समीकरणंही ते बिघडवू शकतात.

*भारतद्वेष वाढण्याची भीती*
पाकिस्तानच्या जडणघडणीत आणि अस्तित्व टिकवण्याच्या धडपडीत भारतद्वेष हा एक महत्त्वपूर्ण मुद्दा आहेच. त्यामुळे पाकिस्तानमध्ये निवडणुकांच्या काळात कुठल्याही राजकीय पक्षाच्या प्रचारात भारतविरोधाचा मुद्दा हा मोठ्या प्रमाणात समोर येतोच. पण, द्विपक्षीय संबंध सुधारण्याची पाकिस्तानी सरकारची इच्छा आणि आवश्यकता भारतद्वेषाच्या मुद्द्याआड येऊ शकतात. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या राजकीय गरजेनुसारच भारत-पाक संबंधातील चर्चांना काय दिशा मिळते, ते पाहावे लागेल. सद्यस्थितीत पाकिस्तानी सैन्य आणि चीन इमरान खानच्या विजयाची अपेक्षा व्यक्त करत असले, तरी भारतासाठी इमरान खान हा चिंतेचा विषय ठरु शकतो. इमरान खान इस्लामिक दहशतवादी संघटनांप्रती असलेल्या त्यांच्या ‘सॉफ्ट कॉर्नर’मुळे ‘तालिबान खान’ म्हणूनही ओळखले जातात. त्यामुळे जर त्यांच्या पक्षाचे सरकार सत्तारुढ झाले, तर ते कोणत्या टोकाला जातील, याचा विचार करावा लागेल. आपण हे जाणतोच की, भारतासोबत संबंध सुधारण्याच्या पाकिस्तान मुस्लीम लीग आणि नवाझ शरीफांच्या सर्व प्रयत्नांना अयशस्वी केले गेले. त्यामुळे पाकिस्तानातील नवीन येणारे सरकार त्यांचे सैन्य आणि चीनच्या दबावात प्रादेशिक शांततेसाठी कशाप्रकारे प्रयत्न करते, ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल. पण, शेजारच्या देशात कुठल्याही पक्षाचे सरकार आले तरी, भारताला मात्र कोणत्याही परिस्थितीत त्याचा सामना करण्यासाठी सज्ज

*प्रधानमंत्र्यांच्या कार्यकाळाचा इतिहास*
पाकिस्तानात १९४७ नंतर आजपर्यंतच्या ७१ वर्षाच्या कालखंडात १८ प्रधानमंत्री झाले पण त्यापैकी दोघेच पांच वर्षांचा कार्यकाळ कसाबसा पूर्ण करू शकले. तीन वेळा निवडून आलेल्या सरकारला इथल्या लष्करानं उलथवून टाकलं. एका प्रधानमंत्र्याची हत्या झाली तर एकाला फाशीची शिक्षा दिली गेली. १२ प्रधानमंत्र्यांवर वेगवेगळे आरोप ठेऊन पदच्चूत केलं गेलं. गेल्यावर्षी भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर पदावरून हटवलं गेलं. याबरोबरच पाकिस्तानच्या इतिहासातील १७ वे असे प्रधानमंत्री बनले की, ज्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत.

*पहिल्या प्रधानमंत्र्याची हत्या*
१९४७ मध्ये पाकिस्तान अस्तित्वात आल्यानंतर पहिले प्रधानमंत्री बनलेले लियाकत अली खान यांची रावळपिंडीत हत्या केली गेली. त्यांनी आपल्या कार्यकाळातली ४ वर्षे पूर्ण केली होती. त्यानंतर प्रधानमंत्री बनलेले खवाजा नजीमुद्दीन फक्त १८ महिन्यानंतर १९५३ मध्ये गव्हर्नर जनरल मलिक गुलाम मोहम्मद यांच्या आदेशानंतर पद सोडावं लागलं. त्यानंतर मोहम्मद अली बोगरा हे प्रधानमंत्री बनले. यावेळी सुद्धा पाकिस्तानचे नवे आणि अखेरचे गव्हर्नर इस्कंदर मिर्जा यांनी १९५५ मध्ये त्यांचं सरकार अकार्यक्षम म्हणत त्यांना पदावरून दूर केलं.

*राष्ट्रपतीपदाच्या निर्मितीनंतरही वाद सुरूच*
१९५५ मध्ये पाकिस्तानात संविधान-राज्यघटना अंमलात आली. यात गव्हर्नरपद रद्द करून इस्कंदर मिर्जा यांना पहिले राष्ट्रपती घोषित करण्यात आलं. त्यानंतर प्रधानमंत्री आणि राष्ट्रपती यांच्यातील वादाला प्रारंभ झाला. १९५५ मध्ये चौधरी मोहम्मद अली पाकिस्तानचे प्रधानमंत्री बनले. एका वर्षांनंतर सप्टेंबर १९५६ मध्ये त्यांनी राष्ट्रपती मिर्जा यांच्याशी झालेल्या वादानंतर राजीनामा. त्यानंतर १९५६ मध्ये अवामी लीगकडून निवडून आलेल्या शाहिद सुहारावर्दी यांना प्रधानमंत्री निवडण्यात आलं. परंतु राष्ट्रपतींशी झालेल्या मतभेदांमुळे एका वर्षातच त्यांना हटवलं गेलं. त्यानंतर इस्कंदर मिर्जा यांनी इब्राहिम इस्माईल चुंद्रीगर यांना प्रधानमंत्री बनवलं. परंतु दोन महिन्यातच चुंद्रीगर यांनी डिसेंबर १९५७ मध्ये राजीनामा दिला. त्यानंतर मिर्जा यांनी पाकिस्तानचे ७ वे प्रधानमंत्री म्हणून फिरोज खान नून यांची नियुक्ती केली.

 *पहिली लष्करी राजवट*
देशात सतत बिघडत चाललेली राजकीय परिस्थिती पाहून १९५८ मध्ये जनरल आयुब खान यांच्या सैन्यानं इथलं सरकार उलथवून टाकलं. प्रधानमंत्री पदावरून हटवलं गेलं. तर राष्ट्रपतींना राजीनामा द्यायला भाग पाडलं. त्यानंतर आयुब खान स्वतः राष्ट्रपती बनले अन १९५८ ते १९७१ या दरम्यान तब्बल १३ वर्षांसाठी प्रधानमंत्रीपद रद्द करून टाकलं.

*दुसऱ्यांना लष्करी राजवट, प्रधानमंत्र्यांना फाशी*
१९७१ मध्ये भारताशी झालेल्या युद्धात पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला. बांगलादेशच्या निर्मितीनंतर इथली लष्करी राजवट संपुष्टात आली आणि जुल्फिकार अली भुट्टो राष्ट्रपती बनले. या दरम्यान नुरुल अमीन ८ वे प्रधानमंत्री म्हणून घोषित केलं गेलं. पण ते केवळ १३ दिवसच त्या पदावर राहिले. त्यानंतर दोन वर्षांनी १९७३ मध्ये पाकिस्तानची नवी राज्यघटना अस्तित्वात आली. आणि यात भुट्टो यांनी आपल्यासाठी प्रधानमंत्रीपद आपल्यासाठी राखलं. १९७७ मध्ये लष्करप्रमुख जनरल जिया-उल-हक यांनी पुन्हा एकदा लष्करी राजवट लागू केली आणि स्वतःला राष्ट्रपती घोषित करून टाकलं. १९७९ मध्ये जिया-उल-हक यांनी भुट्टो यांच्यावर निवडणुकीत भ्रष्टाचार केला, हेराफेरी केली असा आरोप ठेवून त्यांना फाशी दिली.

*बेनजीर बनल्या प्रधानमंत्री*
१९७७ ते १९८५ पर्यंत पाकिस्तानात लष्करी राजवट राहिली. या दरम्यान लष्कराने १९८५ मध्ये मोहम्मद खान जुनेजा यांना देशाचे १० वे प्रधानमंत्री बनवलं. परंतु जुनेजांच्या राजकीय हालचाली आणि त्यांची महत्वाकांक्षा पाहून मी १९८८ मध्ये त्यांच्या सरकारला हटवलं गेलं. ऑगस्ट १९८८ साली जिया-उल-हक यांच्या निधनानं इथली लष्करी राजवट संपुष्टात आली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत जुल्फिकार अली भुट्टो यांची मुलगी बेनजीर भुट्टो यांना प्रधानमंत्रीपद मिळालं. पण त्यांचं सरकार केवळ २० महिनेच टिकलं. १९९० मध्ये राष्ट्रपती गुलाम इसहाक खान यांनी त्यांना प्रधानमंत्रीपदावरून हटवलं. १९९० मध्ये नवाज शरीफ पाकिस्तानचे १२ वे प्रधानमंत्री बनले. १९९३ पर्यंत त्यांचं सरकार अस्तित्वात होतं. त्यानंतर इसहाक खान यांनी त्यांचं सरकार पाडलं. १९९३ ते १९९९ पर्यंत नवाज शरीफ दोनदा आणि बेनजीर भुट्टो एकदा सत्तेवर राहिले.

*तिसऱ्यांदा लष्करी राजवट*
१९९९ च्या कारगिल युद्धानंतर पाकिस्तानचे तत्कालीन लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी देशात आणीबाणी जाहीर केली आणि नवाज यांचं सरकार बरखास्त केलं. ही आणीबाणी तीन वर्षे होती. त्यानंतर २००२ मध्ये देशात पुन्हा सार्वत्रिक निवडणुका झाल्या. त्यावेळी १३ व्या प्रधानमंत्रीच्या रुपात जफरुल्लाह खान जमाली यांनी शपथ घेतली. त्यानंतर २००४ मध्ये चौधरी सुजात हुसेन प्रधानमंत्री बनले. केवळ १ महिना २७ दिवसात पाकिस्तानला शौकत अजीज हे १५ वे राष्ट्रपती म्हणून लाभले. २००८ मध्ये मुशर्रफ यांनी राष्ट्रपतीपद सोडल्यानंतर पाकिस्तानात पाकिस्तान पीपल्स पार्टी-पीपीपी चं सरकार अस्तित्वात आलं. प्रधानमंत्री निवडले गेले युसूफ रझा गिलानी. ४ वर्षे म्हणजे २०१२ पर्यंत कार्यकाळ पूर्ण करणारे दुसरे प्रधानमंत्री ठरले. सर्वोच्च न्यायालयाची बेअबदी केल्याप्रकरणी गिलानी यांना हटवलं गेलं. २०१२ मध्ये राजा परवेझ अश्रफ हे १७ वे प्रधानमंत्री निवडले गेले.

*शरीफ यांची सत्तवापसी, भ्रष्टाचाराने बिदाई*
२०१३ च्या सार्वत्रिक निवडणुकीत शरीफ यांची पार्टी पीएमएल-नवाज याने विजय मिळवला आणि नवाज यांनी प्रधानमंत्री म्हणून चौथ्यांदा सरकार बनवलं. पण २०१७ मध्ये पनामा पेपरगेट मध्ये त्यांचं नांव आलं त्यानंतर त्यांना पद सोडावं लागलं. न्यायालयानं त्यांना दोषी ठरवलं आणि त्यांना निवडणूक लढविण्यास बंदी घातली. आता त्यांचे बंधू शाहबाज हे निवडणूक लढविताहेत.

-हरीश केंची
९४२२३१०६०९

Tuesday 10 July 2018

शरद पवार आणि राज ठाकरे...!

संसदीय कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण झालेल्या आणि महाराष्ट्राच्या राजकीय-सामाजिक-आर्थिक जडणघडणीत चार वेळा मुख्यमंत्री म्हणून मोलाची भूमिका बजावणाऱ्या शरद पवारांची मुलाखत स्वत:ची वेगळी वाट चोखाळणारे नेते राज ठाकरे यांनी घ्यावी तसंच ती मुलाखत टीव्हीवरून घराघरात बघितली जावी, हेच या महामुलाखतीचं वैशिष्टय आहे. त्यामुळं मुलाखत कशी घ्यायला हवी होती, कोणते प्रश्न सुटले, अडचणीचे प्रश्न का डावलले किंवा मुलाखतकाराने नको तितका आदरभाव दाखवला वगैरे बाबी गौण आहेत. त्यामुळं शरद पवारांच्या कर्तुत्वाचा गौरव करणारी ही महामुलाखत होती हे सर्वश्रुत आहे. प्रसंगांचं भान राखून ती खुमासदार शैलीत राज ठाकरे यांनी घेतली, त्याचे कौतुक मोठ्या मनानं पत्रकारांना करावं लागेल. पुन्हा शरद पवार हे काही दोन तासांच्या मुलाखतीतून उलगडणारं व्यक्तिमत्व नक्कीच नाही. आणि राहिला प्रश्न मुलाखतीतली उत्तरं किंवा विचार किती जणांना पटले याचा; तर तो प्रश्न ज्याच्या त्याच्या आवडी-निवडीशी किंवा विचारसरणीशी किंवा जडणघडणीशी निगडीत आहे. थोडक्यात, शरद पवारांच्या मुलाखतीचं विश्लेषण जो तो स्वत:च्या विचारचौकटीत करायला मोकळा आहे. पण पवार हे एका राष्ट्रीय पक्षाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय राजकारणातले सक्रीय मातब्बर नेते आहेत. त्यामुळं त्यांच्या या जाहीर मुलाखतीचं महत्त्व अनन्य साधारण आहे. आणि म्हणूनच ही मुलाखत शरद पवारांच्या भावी राजकीय वाटचालीच्या अनुषंगाने तपासणं गरजेचं आहे. असो!

महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आणि त्यांचा आदर्श महाराष्ट्राला एकत्र आणणारा आहे. त्यांचेच वैचारिक वारसदार शाहु, फुले आणि आंबेडकर यांचा विचार महाराष्ट्राला एकत्रितपणे पुढे घेऊन जाणारा ठरला आहे, अशा शब्दांत शरद पवारांनी महाराष्ट्र राज्याचं वेगळंपण अधोरेखित केलं. छत्रपती शाहू महाराजांनी देशात पहिल्यांदा आरक्षण लागू करून वंचितांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. महात्मा ज्योतिबा फुले यांनी कायम समता आणि समानतेचा पुरस्कार केला. रायगडावरची शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढण्यामागेसुद्धा महात्मा फुलेंचा सत्यशोधनाचा विचार होता. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेने देशाला कायद्याचं राज्य बनवलं. म्हणून शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार महाराष्ट्राला एकत्र ठेवून पुढे नेणारा आहे. आणि शिवाजी महाराज हा त्या विचाराचा आदर्श आहे, असं शरद पवार म्हणाले.

सामाजिक ऐक्य आणि जातीय द्वेष ही चिंतेची बाब असल्याचे सांगून पवारांनी, समाजातल्या वाढत्या विद्वेषाचे खापर सध्याच्या भाजप सरकारवर फोडलं. जातिभेद वाढीला सत्तेतील काही घटकांची फूस आहे, असा आरोप त्यांनी सरकारवर केला. राज्यात जातीआधारित संघटना सक्रिय झाल्या असून, त्याला सत्तेवरील काही घटकांचे प्रोत्साहन मिळत आहे. त्यातून आपले राजकारण यशस्वी होईल, ही भावना वाढीस लागलीय. पण महाराष्ट्र या विद्वेषी विचारांनी नव्हे तर शाहू-फुले-आंबेडकरांच्या मार्गानेच पुढे जाईल, असा विश्वास पवारांनी व्यक्त केला. या मागे त्यांची राजकीय खेळी आहेच. पण त्याहीपेक्षा आपल्या राजकारणाचा पाया धर्मनिरपेक्षतेवर टिकून अहे. भविष्यात ते किंवा त्यांचा पक्ष धर्मनिरपेक्ष पक्षांना सोबत घेऊनच पुढे जाणार, हेसुद्धा पवारांनी या निमित्ताने स्पष्ट केलं.शरद पवार हे कधीही मोदी यांच्यासोबत जाऊ शकतात हा काही काँग्रेसी नेते व काँग्रेसी विचारधारेचे सहप्रवासी कायम पसरवित असलेला समज त्यांनी या विधानातून खोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी सत्ताधारी भाजप विरोधात धर्मनिरपेक्ष पक्ष एकत्र आले पाहिजेत. त्यासाठी गरज पडली तर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली समविचारी धर्मनिरपेक्ष पक्षांची आघाडी करण्यास ते इच्छुक असल्याचे स्पष्ट संकेतही त्यांनी दिले.

चोवीस तास राजकारणाच विचार करणारे शरद पवार कोणतंही व्यक्तव्य किंवा कृती मोघमपणे करत नाहीत. राष्ट्रीय पातळीवर भाजपला काँग्रेस हाच पर्याय ठरू शकतो, हे सांगताना त्यांनी जाणीवपूर्वक राहुल गांधी आणि त्यांच्या नेतृत्वात झालेल्या बदलांचे कौतुक केलेय. तसंच पं. जवाहरलाल नेहरू-इंदिरा गांधींच्या मोठेपणाची साखरपेरणी केली. २०१९ च्या निवडणुकांमध्ये भाजपविरोधात काँग्रेसच्या साथीने लढण्याचा त्यांचा विचार पक्का झालाय, असे दिसतेय. धर्मनिरपेक्ष महाआघाडीत समविचारी पक्षांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेण्याची त्यांची तयारी दिसतेय. त्यादृष्टीनं काँग्रेसचं नेतृत्व पवारांशी जवळीक साधून असल्याचंही कळतंय. त्या समिकरणाचाच भाग म्हणून या मुलाखतीच्या निमित्तानं पवारांनी भाजपला टार्गेट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला. देश चालवणे म्हणजे राज्य चालवणे नव्हे, हे ठणकावून सांगतानाच त्यांनी मोदी सरकारमध्ये टीमवर्कचा अभाव कसा आहे, हे पटवून दिले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचा लौकिक सांगून नरेंद्र मोदींना खूजं ठरवलं. तर गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींना पवारांनी केलेली मदत आणि पंतप्रधान झाल्यावर मोदींनी गुजरातसाठी इतर राज्यांशी केलेला दुजाभाव सांगण्याचीही संधी पवारांनी सोडली नाही. एवढंच नाही तर, पकडण्याचा प्रयत्न करूनही आपली करंगळी मोदींच्या हाती दिली नाही, असं म्हणत त्यांनी भाजप आणि मोदींपासून हात झटकले. भाजपचा खरा चेहरा नरेंद्र मोदीच आहेत. त्यालाच टार्गेट केलं तर भाजप डॅमेज होईल, हे पवारांच्या पुरते ध्यानात आले आहे. त्यामुळंच त्यांनी मोदींची हेडलाईन फडणवीस हिरावून घेणार नाहीत, याची पुरेपूर काळजी या मुलाखतीत घेतलेली दिसून येते. त्यामुळंच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाभोवती मुलाखत फिरणार नाही, याची काळजी घेतली. मुलाखतीचा फोकस राष्ट्रीय राजकारण आणि पवार, असा ठेवला असावा.

अनेकांच्या मते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे किंवा ठाकरे कुटुंबांविषयी शरद पवार विनाकारण खूप चांगले बोलले. पण शेवटी तोच तर पवारांचा मास्टरस्ट्रोक आहे. एकिकडे शिवसेना आणि दुसरीकडे राज ठाकरे यांचा विरोध पवारांना सॉफ्ट करायचा आहे.यात उद्धव ठाकरेंपेक्षाही त्यांना सामान्य शिवसैनिकाच्या मनात एकमेव शत्रू म्हणजे भाजपच राहिल अशी इच्छा दिसते. सध्या राज्याच्या ग्रामीण भागात शेतीचे प्रश्न, शेतकरी कर्जमाफी व नुकसानभरपाईवरून भाजपविरोधी वातावरण तापले आहे. तिथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीला चांगली संधी आहे. पण मुंबई-ठाणे-नाशिक-पुणे या शहरी भागात शिवसेनेला सॉफ्ट केले तर काँग्रेस आघाडीला यश मिळू शकतं, हे ओळखूनच पवारांनी ठाकरेंचे गोडवे गायिले असावेत. पण पुन्हा ठाकरेप्रेम दाखवताना त्यांनी आपण कसे जुनेजाणते आहोत, हेही शिवसैनिकांबरोबरच मनसैनिकांच्याही मनावर त्यांनी बिंबवले!

पवारांच्या मुलाखतीत सगळंच काही राजकीय होतं असं काही नाही. त्यांचा इथून पुढे आर्थिक निकषांवर आरक्षण हवे, हा मुद्दा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला छेद देणारा आहे. मराठा समाजाचे क्रांती मोर्चे पुन्हा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर पवारांचे हे मत अनेकांच्या मनात उकळी फोडणारं आहे. त्यांनी वाईटपणा घेण्याचा जोखीम पत्करलीय, असं वाटतं. पण पवारांचं हे मत काही आजचं नाही. त्यांनी या पूर्वीसुद्धा घटनेच्या चौकटीत राहून दिलेलं आधीचं आरक्षण कायम ठेवून आता आरक्षणाचा विचार आर्थिक निकषांवर व्हावा, असं म्हटलंय. त्यामुळं पवारांच्या आरक्षणाच्या भूमिकेवरून त्यांनी मराठा समाजाच्या पलिकडे जाऊन विचार केला, हा संदेश गेल्याचंही मानणारे आहेत.आता पवारांच्या विधानांचा विपर्यास करणारे काही स्वयंघोषित ओबीसी विचारवंत काही पोस्ट समाजमाध्यमांमधून फिरवत आहेत. पवारांनी अनुसुचित जाती व जमाती वगळून आरक्षण आर्थिक निकषांवर द्यावे, असे म्हणाले म्हणजे ओबीसींच्या आरक्षणाचे काय, असा प्रश्न किंवा संदिग्धता निर्माण करण्याचा प्रयत्न काहीजण जाणीवपूर्वक करत आहेत. मात्र संपूर्ण देशात मंडल आयोगाची अंमलबजावणी होण्यापूर्वीच महाराष्ट्रात ती करणारा हा नेता ओबीसींचेही आरक्षण काढून घ्या, अशी मागणी करण्याचा विचार ठेवतो हे कुणालाही पटणार नाही. अगदी त्यांची विचारसरणी बदलली असे गृहित धरले तरी पवार म्हणजे काही मोहनराव भागवत नव्हे की ऐन निवडणुकीच्या तोंडावरच ओबीसींचे आरक्षण काढून घेण्याचे संकेत जातील असे विधान अवधानानेही करतील. मराठ्यांना मिळणारे आरक्षण हे ओबीसींच्या कोट्यातून दिले जाईल, अशी भिती अनेकांना वाटते आहे, त्यातूनच मराठा आरक्षणाला मोठा विरोध होतो आहे. वास्तविकरित्या मराठा हा काही द्विज असल्याचे धर्मशास्त्र सांगत नाही. अन्यथा वाईच्या ब्राह्मणांनी शिवाजी महारांजाच्या राज्याभिषेकाला विरोध केलाच नसता. किंवा तुकारामाच्या गाथा नदीत बुडवल्याही गेल्या नसत्या. मात्र मराठा हे गेली साठ वर्षे सत्तेच्या केंद्रस्थानी राहिल्याने त्यांच्याबाबत ते सरंजामी असल्याची तीव्र भावना काही समाजांमध्ये आहे. तसेच साहित्य, चित्रपट यांच्याद्वारेही करून दिली गेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार करूनच पवारांच्या त्या विधानाचे अन्वयार्थ काढणे गरजेचे आहे.

तीच बाब त्यांच्या स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसंदर्भात सांगता येईल. आधीचीच सार्वमत घेण्याची भूमिका मांडतांना वेगळ्या विदर्भाची मागणी राजकारण्यांपलिकडे जात नाही, याचा पुनरुच्चार केला. याशिवाय, काँग्रेस की भाजप? आणि नरेंद्र मोदी की राहुल गांधी? यांच्यात राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस मजबूत होईल, हे जसं सांगितलं. तसं अजित पवार की सुप्रिया सुळे? यांच्यावर पवारांचे उत्तर काय असते, हे कळलं असतं. पण मुलाखतकार राज ठाकरे हा कळलाव्या प्रश्न विचारायला विसरले, त्यात शरद पवारांचा काय दोष?, असेही म्हणावे लागेल!

लागली समाधी ज्ञानेशाची....

१९७२ रोजीच्या केलेल्या वैज्ञानिक प्रयोगादवारे ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीमध्ये हे सापडले ..समाधी घेतलेल्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज शरीररूपाने समाधीत असायला हवेत, असा अभ्यासहीन तर्क करणा-या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी ते पहाण्यासाठी समाधीचे खोदकाम करण्याचे ठरवले. ‘खिस्ताब्द १९७२ साली अंधश्रद्धा-निर्मूलनाचे कार्य करणा-या कार्यकर्त्यांना आळंदी येथील ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीबाबत वाटले की ‘जर ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतली असेल, तर आज ते शरीररूपाने खाली असतील का ? जिवंत असतील का ? नसल्यास त्यांची हाडे, हाडांचा सांगाडा तरी त्या ठिकाणी नक्कीच असला पाहिजे. त्या ठिकाणी आपण खोदकाम करून पहायला हवे.’ जिवंत समाधीबद्दल म्हणजे संजीवन समाधीबद्दल सविस्तर माहिती असणे गरजेचे आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन करणा-या कार्यकर्त्यानी जर अगोदर ‘संजीवन समाधी म्हणजे काय’ हे जाणून घेतले असते, तर त्यांना समाधी उकरून काढण्याची आवश्यकता भासली नसती. विज्ञान इतकं प्रगत झालेलं आहे की, वेगवेगळ्या मापकांच्या साहाय्याने ‘आत काय आहे, आहे कि नाही, नसल्यास का नाही आणि ‘आहे’ म्हणतात, तर ते नेमके काय आहे’, हे कळते. वाचकांना ते कळावे, म्हणून या ठिकाणी त्या वेळी घडलेल्या घटनांचा सविस्तर ऊहापोह करीत आहे.

संजीवन समाधी घेतल्यावर शरिरातील पंचमहाभूते ब्रह्मांडातील पंचतत्त्वांशी एकरूप होऊन विरून जात असल्याने त्या ठिकाणी फक्त चैतन्य, ऊर्जा किंवा स्पंदने शिल्लक रहात असतात. तसेच अशी समाधी घेणा-यांना पंचमहाभूतांतून हे सगळे पुन्हा घेऊन शरीर धारण करणे शक्य असते. ‘संजीवन समाधी म्हणजे काय’, हे पातंजलयोगशास्त्रात सांगितलेले आहे. जेव्हा एखादा साधू वा संत संजीवन समाधी घेतो, तेव्हा तो पातंजलयोगशास्त्राप्रमाणे पंचमहाभूतात्मक होतो. आपले शरीर पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या पंचमहाभूतांपासून तयार झालेले आहे. जेव्हा तो साधू वा संत संजीवन समाधीत उतरतो, तेव्हा तो सजग असतो. आपल्या सगळ्यांना दिसणारी शरिराच्या अवयवांतील पंचतत्त्वे त्यास दिसत असतात.
समाधीत बसल्यावर व्यक्ती निर्विकल्प होते, निर्देही होते. याचा अर्थ त्याच्या शरिरातील पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश ही तत्वं बाहेरच्या ब्रह्मांडातील पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश यांत विरून जातात, एकरूप होऊन जातात. ज्यांचे जे घेऊन हे शरीर निर्माण झालेले असते, त्यांचे ते त्यांना परत देऊन साधू-संत निर्देही होतात. त्यामुळे समाधीच्या जागी काहीही शिल्लक रहात नाही. त्या ठिकाणी जर काही शिल्लक रहात असेल, तर ते चैतन्य, ऊर्जा, स्पंदने. याचे आणखी एक वैशिष्ट्य असे आहे की, या साधूसंतांना पंचमहाभूतांतून हे सगळे पुन्हा घेऊन आपले शरीर धारण करता येते. ज्या संतमहंतानी संजीवन समाधी घेतलेली आहे, त्या सगळ्यांना हे सर्व शक्य असते.
समाधीचे खोदकाम करून ‘आत काय आहे’, हे पहाण्यास येणा-या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना वैज्ञानिक दृष्टीने समाधीचे महत्त्व समजावून देऊन त्यांना समाधीची मोडतोड करण्यापासून परावृत्त करण्यास वैज्ञानिक असलेल्या डॉ. शुक्ल यांना म्हणजे मला वारक-यांच्या प्रमुखांनी सांगितले. ‘संजीवन समाधी’ या विषयाचा सखोल अभ्यास, सखोल ज्ञान या कार्यकर्त्यांना असते, तर संजीवन समाधी घेतलेल्या ज्ञानेश्वर महाराजांची समाधी खोदून ‘त्यातून हाडे मिळतात कि ज्ञानेश्वर महाराज जिवंत सापडतात’, हे पहाण्याचा उद्योग त्यांनी केला नसता. त्यांनी कुणा जाणकाराजवळ चौकशी करून माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला नाही वा पातंजलयोगात काय आहे, हेदेखील पडताळून पहाण्याचेसुद्दा त्यांनी कष्ट घेतले नाहीत. (समजल्यावरसुद्धा घेतले असतील, याची खात्री देता येत नाही.)
रात्री ११.३० वाजता अचानक हरिभक्तपरायण व वारक-यांचे अर्ध्वर्यु असलेल्या मामा दांडेकरांचा मला फोन आला. पुण्याहून डॉ. फाटकांचाही फोन आला, ‘‘तू वैज्ञानिक आहेस, तेव्हा तुझी मदत आम्हाला हवी आहे.’’ प्रकार असा होता की, ट्रकमधून दोनअडीचशे माणसे पुण्याहून आळंदीला जाऊन ती ज्ञानेश्वरांची समाधी फोडून पहाणार होती. त्यांना मी वैज्ञानिक दृष्टीकोनातून पटवून द्यावयाचे होते की, संजीवन समाधी म्हणजे नेमके काय घडते आणि काय उरते. मी त्या दोघांना आश्वासन दिले, ‘‘मी माझ्या पद्धतीने त्यांना पटवून देण्याचा अवश्य प्रयत्न करीन.’’ मला खात्री होती की, मी त्यांना पटवून देऊन तोडफोड करण्यापासून परावृत्त करू शकेन, तेदेखील योग्य व चांगल्या प्रकारे. समाधीचे खोदकाम करण्यासाठी येतांना कार्यकर्त्यांनी ते फार आधुनिक असल्याचे दाखवून देण्यासाठी सोबत काही डॉक्टर्स व परदेशातील तीन व्यक्तींना बरोबर आणण्यात येणार होते.

सकाळी लवकर ठराविक माणसे बरोबर घेऊन आम्ही आळंदीला पोहोचलो. इतरांना कुणाला याची काहीच कल्पना येऊ दिली नव्हती.
मी सोबत तीन मीटर्स घेतले होते. त्यातला एक होता ‘गायगर-म्यूलर स्किंटीलेशन काऊंटर’. एक्सरे, अल्फा, गॅमा, बिटा इत्यादी नावांची जी किरणं किंवा ऊर्जा असते, ते एखाद्या ठिकाणी आहेत कि नाहीत ते त्या मीटरवर दाखवले जाते. तो ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीपासून सहा फूट अंतरावर ठेवला. दुस-या मीटरला ‘थर्मिस्टर बोलोमीटर’ म्हणतात.
त्याने अल्ट्राव्हायोलेट, इन्फ्रारेड किरणं आहेत कि नाही, हे पहाता येते. तोही मीटर समाधीजवळ ठेवला.
तिसरा होता ‘फ्रिक्वेन्सी मीटर रडार’. (रेडिओ, दूरदर्शन यांच्याकरिता हे वापरले जाते.) हा मीटरही त्याठिकाणी ठेवला.
ठरल्याप्रमाणे ट्रक भरून दोन-अडीचशे माणसे आळंदी देवस्थानाजवळ घोषणा करीत आली. सगळी आळंदी ‘हा काय प्रकार आहे’, हे पहाण्यासाठी जमा झाली. अंधश्रद्धा-निर्मूलनाच्या कार्यकर्त्यांबरोबर काही डॉक्टर्स व बाहेरच्या देशातील तीन इंग्लिश माणसे आली होती. त्यामागचे कारण आम्हाला नंतर कळले. ते असे, ‘आम्ही फार आधुनिक आहोत. आम्ही काय करतो, हे प्रत्यक्षच पहा’, हे त्यांना दाखवून द्यायचे होते.

समाधीच्या ठिकाणी तीन वेगवेगळी मीटर्स (गायगर-म्यूलर स्किंटीलेशन काऊंटर’, थर्मिस्टर बोलोमीटर व फ्रिक्वेन्सी मीटर रडार) लावून नंतर समाधीवर तीन वेगवेगळ्या धातूंची आवरणे घालून पाहिल्यावर प्रत्येक आवरणाच्या वेळी मीटरच्या रीडिंगमध्ये फरक आढळतो व आवरण काढल्यावर ठरावीकच (समाधीच्या आतील स्पंदनांचे) रीडिंग आढळते.

आम्ही अंधश्रद्धा-निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांच्या जमावाला दाराजवळ थोपवले आणि शांतपणे त्यांना सांगितले, ‘‘तुम्हाला जे करावयाचे आहे, ते अवश्य करा. आम्ही तुम्हाला अडवणार तर नाहीच, उलट कुदळ फावडे घेऊन तुम्हाला तुमच्या कामात मदत करणार आहोत.’’ त्यांच्यातील डॉक्टरांकडे मी, मामा दांडेकर व डॉ. फाटक गेलो आणि त्यांना विनंती करून सांगितले, ‘‘या समाधीबद्दल आम्ही सांगतो त्या पद्धतीने अगोदर प्रयोग करून पहा. समाधीवर झाकण्यासाठी मी जस्ताचे, पितळेचे व लोखंडाचे अशी तीन प्रकारची वेष्टणे आणली आहेत. आम्ही या ठिकाणी तीन मीटर्स ठेवलेली आहेत. लोखंड, पितळ आणि जस्त यांचे वेष्टण एकेक करून समाधीवर ठेवून प्रत्येक मीटरवर काय दिसते, ते पहावयाचे आहे. तुम्ही पहाल, त्या वेळी आम्ही येथे थांबणार नाही. बाहेर थांबू. त्यांच्यातील दहाबारा प्रमुख मंडळी पुढे आली. त्यांना आम्ही गाभा-यात नेले आणि त्यांना माहिती देऊन आम्ही गाभा-या बाहेर निघून गेलो. आमच्यापैकी कोणीही तेथे थांबले नाही. त्यांनी आम्ही सांगितल्याप्रमाणे प्रयोग करून पाहिला.

लोखंड, पितळ आणि जस्त यांचे वेष्टण एकेक करून समाधीवर टाकले की, जो काटा काही प्रमाणात वर यायचा, तोच वेष्टण काढल्यावर एकच ठराविक रीडींग दाखवायचा. आम्ही तर आत नव्हतो. आम्ही काटा हलवण्याचा प्रश्नच येत नव्हता. त्यांच्यापैकी कुणी मीटरला हातदेखील लावत नव्हते. मग काटा रीडींग का दाखवत होता ? आतील रीडिंग दाखविणारे चैतन्य, स्फुरण, स्पंदने कोठून आली ? आवरण घातल्यावर रीडिंग बंद का होते ? वेष्टण काढल्यावर रीडिंग का दाखवते? त्यांना तीनही प्रकारची वेष्टणे घालून पहावयाला सांगितले होते. त्या प्रत्येक वेष्टणाच्या वेळी रीडिंगमध्ये वेगवेगळा फरक का येत होता ? यात कसलीही हातचलाखी नव्हती अथवा जादूटोणा नव्हता हे त्यांच्या लक्षात आले. ज्याप्रमाणे क्ष किरण दिसत नसले, तरी त्यांच्यामुळे शरिराच्या आतील भागातील छायाचित्र (फोटो) काढता येत असल्याने त्यांचे अस्तित्व कळते, तसे संजीवन समाधीतील चैतन्य, ऊर्जा व स्पंदने दिसत नसली, तरी त्यांचे अस्तित्व वैज्ञानिक प्रयोगाद्वारे सिद्ध होते. शास्त्रज्ञांच्या शास्त्रीय परिभाषेतील हे प्रयोग त्यांना करून दाखवल्यावर आणि ‘संजीवन समाधी म्हणजे काय’ हे जेव्हा त्यांना समजावून सांगितले, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, या ठिकाणी निश्चितपणे चैतन्य आहे, ऊर्जा आहे, स्पंदने आहेत. म्हणूनच त्यांचा आलेख मीटर्सवर जाणवतो. वेगवेगळ्या धातूंची वेष्टणे घातल्यावर त्या चैैतन्यलहरींना अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे प्रत्येक आवरणाच्या गुणधर्मानुसार निरनिराळ्या प्रकारची रिडींग्ज् मीटरवर दिसतात. शास्त्रीय उपकरणांच्या साहाय्याने त्यांच्या लक्षात आले की, चैतन्य दिसत नसले, तरी त्याचे अस्तित्व असते. अल्फा, गामा, बीटा, रडार, क्ष किरण इत्यादी दिसत नसले, तरी त्यांंचे अस्तित्व आपण नाकारत नाही. त्यांच्यामुळे होणारे परिणाम आपण दृश्य स्वरूपात पहातो. क्ष किरणांमुळे शरिराच्या आतील फोटो काढला जातो, हे दृश्य झाले. पण मग क्ष किरण दिसले नाही; म्हणून त्यास नाकारावे याला अर्थच नाही. वैज्ञानिक दृष्टीकोनाने सर्व संभ्रम दूर झाल्यानंतर ही सगळी मंडळी दर सहा महिन्यांनी न चुकता समाधीच्या दर्शनासाठी आळंदीस येऊ लागली. तीन परदेशी माणसांपैकी एकाने तर स्वतला आळंदीला वाहून घेतले आहे. ही खिस्ताब्द १९७२ सालातील घटना आहे.
‘जेव्हा विज्ञानाचा उपयोग काय’, असा प्रश्न विचारला जातो, तेव्हा ‘विज्ञानाचा सदुपयोग असाही होऊ शकतो’, हे छातीठोकपणे सांगता येते. सर्वसामान्य माणसाला सहजपणे आणि सुलभपणे पटवून देण्यासाठी हा एक सोपा आणि सरळ मार्ग आहे. आळंदीप्रमाणे पंढरपूर, गाणगापूर आणि देहू हीसुद्दा चैतन्यमय अन् जागृत ठिकाणे आहेत.’

इस्लाम आणि राज्यघटना...!

 न्यायालयाने तिहेरी तलाक रद्दबादल केल्यानंतर उमटलेल्या प्रतिक्रियांवरून निकालाचे तसेच आपल्या सामाजिक जाणिवांचेही खुजेपण दिसून येते. ते समजून घ्यायला हवे. याचे कारण मर्यादाच जर आपण समजून घेऊ शकलो नाही तर त्यावर मात करण्याची गरज निर्माण होत नाही आणि समाजाचे मागील पानांवरून पुढे असेच सुरू राहते. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, इस्लाम आणि घटनाधिष्ठित समाजरचनेचे वास्तव समजून घेताना त्याचे दोन भाग करावे लागतील. पहिल्या भागात इस्लाम, लोकशाही आणि आपली सामाजिक रचना यांचा अंतर्भाव असेल तर दुसऱ्या भागात हिंदू आणि अन्य अल्पसंख्याकांच्या अनुषंगाने सामाजिक मांडणीचा आढावा घ्यावा लागेल.

तलाकसंबंधातील सर्वोच्च न्यायालयाचा ताजा निकाल हा एका अगदी मर्यादित मुद्दय़ापुरता सीमित होता. तो म्हणजे जागच्या जागी विवाहबंधन संपुष्टात आणणाऱ्या, मुसलमान महिलांसाठी अत्यंत अन्यायकारक असणाऱ्या तोंडी तलाक या प्रथेस भारतीय राज्यघटनेची मान्यता आहे किंवा काय. सर्वोच्च न्यायालयाच्या पाचसदस्यीय घटनापीठाने यावर निकाल देताना ही तिहेरी तलाक परंपरा महिलांसाठी अन्यायकारक आहे हे मान्य केले. त्यामुळे सर्व नागरिकांना घटनेने दिलेल्या समानतेच्या अधिकाराचा भंग होतो म्हणून तो रद्दबादल व्हायला हवा हा न्यायालयाचा युक्तिवाद. तो ३ विरुद्ध २ अशा मताधिक्याने निर्णायक ठरला. विवाहबंधन संपवण्यासाठी केवळ तीन वेळा तलाक या शब्दाचा उच्चार करण्याच्या प्रथेवर गदा आली. परंतु त्याखेरीज तलाकच्या दोन प्रथा प्रचलित आहेत. तलाक हसन आणि तलाक एहसान. या प्रथांत पती-पत्नींना किमान ९० दिवस वेगळे राहून एकमेकांना विवाहबंधनातून मुक्त करता येते. ही प्रथाही इस्लाम धर्मीयांसाठी आणि तिहेरी तलाक उच्चारण प्रथेप्रमाणे ती धर्माधिष्ठितच आहे. परंतु तिच्या वैधतेला आव्हान देण्याचा कोणताही प्रयत्न सर्वोच्च न्यायालयासमोर ना अर्जदारांनी केला ना सरकारने. याचा अर्थ न्यायालय आणि सरकार या दोघांनीही मुसलमानांसाठी स्वतंत्र वैयक्तिक धर्म कायदा सुरू ठेवण्यास एक प्रकारे मान्यताच दिली. सरन्यायाधीश केहर यांनी तर तसे विधानच केले. घटनाधिष्ठित समाज निर्माण करण्याच्या आपल्या संभाव्य प्रयत्नांना येथूनच धोका सुरू होतो. एकदा का स्वतंत्र धर्माधिष्ठित कायद्याचे अस्तित्व मान्य केले की घटना दुय्यम ठरू लागते. आता ते होणार आहे. तसेच दुसरा मुद्दा सरकारी प्रतिक्रियेचा. सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निकालाच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र कायदा वा नियम रचना निर्माण करण्याची सूचना सरन्यायाधीश केहर यांच्याकडून केली गेली. ती सरन्यायाधीशांकडून आल्याने सुरुवातीला तर असाच समज झाला की तलाकप्रक्रियेस सहा महिन्यांची स्थगिती असेल आणि या काळात सरकारला त्या संदर्भातील नियमांची आखणी करावी लागेल. वास्तव तसे नाही. सरन्यायाधीश याबाबत अल्पमतात गेल्याने हा निर्णय होऊ शकला नाही. वास्तविक त्यानंतर सरकारने स्वत:हून ही संधी साधत तलाकबाबतचे नियम आम्ही तयार करू अशी भूमिका घ्यायला हवी होती. पण तसे न करता सरकारच आता म्हणते सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अंतिम आहे, नियमावलीची गरजच नाही.

हे अराजकास निमंत्रण देणारे आहे. याचे कारण सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला असला तरी त्याची अंमलबजावणी करणार तरी कशी? कारण ती करावयास नियमच नाहीत आणि सर्वोच्च न्यायालयाकडे अंमलबजावणीसाठीची अशी यंत्रणाच नाही. त्यामुळे समजा उद्या एखाद्या मुसलमान पुरुषाने तोंडी तलाकच्या मार्गानेच आपल्या पत्नीस काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला तर त्यास रोखणार कोण? आणि कसे? कारण ते रोखण्यासाठी काही नियमच नाहीत. तसेच धर्माधिष्ठित वैयक्तिक कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्दबादल ठरवलेला नाही. सरकारने तशी मागणीही केलेली नाही. अशा परिस्थितीत महिलांवरील अन्याय दूर होणार तरी कसा? वास्तविक सरकार या अन्याय दूर करण्याच्या मुद्दय़ावर प्रामाणिक असते तर याच वेळी सर्वोच्च न्यायालयात किमान विवाहासाठी तरी सर्व धर्मीयांना समान कायदा लागू करण्याची मागणी केली गेली असती. ते झालेले नाही. परिणामी त्यातून निर्माण झालेला विरोधाभास असा की मुसलमान व्यक्तींस इस्लामच्या आधारे निकाह लावण्याची अनुमती आहे परंतु तोंडी तलाकची नाही. मात्र तो याच धर्माच्या आधारे पत्नीस अजूनही अन्य दोन मार्गानी तलाक देऊ शकतो. म्हणजेच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा या प्रश्नावरील अंतिम तोडगा नाही. ही तोडग्याची सुरुवात आहे, असे फार फार तर म्हणता येईल. तेव्हा या सगळ्या आजारांत खरा तोडगा काढायचा असेल तर तो एकाच मार्गाने निघू शकतो.

सुधारणा हा तो मार्ग. काँग्रेसच्या मुसलमानानुयायी राजकारणामुळे इस्लाम धर्मीयांची प्रतिमा ही मागास, प्रतिगामी अशी झाली आहे. काँग्रेसच्या या सोयीच्या राजकारणाचा सोयीस्कर उपयोग नेमका भाजपने केला आणि राजकारणास अल्पसंख्य विरोधी बहुसंख्य असे स्वरूप दिले. यामुळे एक समाज म्हणून आपले नुकसान झालेच. पण त्याहीपेक्षा मुसलमान अधिकाधिक मागास होत गेले. वास्तवात इतिहास तसा नाही. निदान भारतीय मुसलमानांचा इतिहास तरी दाखवला जातो तितका मागास नाही. सर सय्यद यांनी १८७५ साली मुहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज या संस्थेची स्थापना केली. त्यानंतर जवळपास पाच दशकांनी बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचा जन्म झाला. सर सय्यद यांनी स्थापन केलेली संस्था म्हणजेच अलिगढ मुस्लीम युनिव्हर्सटिी. त्याआधी ११ वर्षे म्हणजे १८६४ साली त्यांनी मुसलमानांसाठी विज्ञानाभ्यास संस्थेची स्थापना केली होती. हा लिखित इतिहास आहे. याचा अर्थ मुसलमानांत विज्ञान विचाराचा प्रसार व्हावा ही त्या समाजाच्या नेत्यांचीच इच्छा होती. परंतु पुढे तेव्हाच्या सत्ताधारी ब्रिटिशांच्या फोडा आणि झोडा नीतीमुळे हेच सर सय्यद हे इस्लामी राष्ट्रवादाचे पितामह बनले. ती पाकिस्तानच्या निर्मितीची सुरुवात. वैयक्तिक आयुष्यात हे सर सय्यद आणि पुढे पाकिस्तानचे जनक महंमद अली जिना हे दोघेही सुधारणावादीच होते. आपल्याकडे ज्याप्रमाणे विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी इंग्रजी भाषेचे वर्णन वाघिणीचे दूध असे करून समस्त नेटिव्हास ते प्राशन करून सशक्त बनण्याचा सल्ला दिला, त्याचप्रमाणे सर सय्यद यांनीही तमाम मुसलमानांस इंग्रजांच्या पाश्चात्त्य वैचारिक जीवनशैलीचे अनुकरण करण्याची सलाह दिली. कट्टरपंथीय इस्लाममुळे मुसलमानांचेच नुकसान होईल, असेच त्यांचे सांगणे असे. तथापि स्वातंत्र्यलढा आणि नंतर राष्ट्रनिर्मितीच्या राजकारणात ते सर्वच मागे पडले आणि सर सय्यद आणि नंतर जीना हे अधिकाधिक कडवे होत गेले. परिणामस्वरूप मुसलमान हे हिंदूविरोधी रंगवले गेले आणि हिंदूही त्यावर विश्वास ठेवत गेले. तसा विश्वास ठेवला जावा असेच प्रयत्न हिंदू नेत्यांनी केले.

या राजकारणाच्या बाजारू वेदीवर बळी जात राहिला तो मुसलमान महिलांचा. कारण पुढच्या काळात या समाजात धर्माधिष्ठित राजकारणामुळे ना फुले दाम्पत्य तयार झाले ना राजा राममोहन रॉय. सर्व काही धर्माशी येऊन अडू लागल्यामुळे या समाजापुरती सुधारणावादी चळवळ जोमच धरू शकली नाही. हमीद दलवाई यांच्यासारख्याचा एखाददुसरा काय तो अपवाद. नागरिकांच्या विचारशक्तीस आवाहन करून त्यांच्यातील बौद्धिक जाणिवा चेतवण्यापेक्षा भुक्कड कारणांनी भावना चेतवून खोऱ्याने मते खेचण्यालाच सर्व राजकीय पक्षांनी प्राधान्य दिल्यामुळे मुसलमानांत धर्मसुधारणांचे वारे घोंघावलेच नाहीत. या संदर्भात आवर्जून लक्षात घ्यायलाच हवी अशी बाब म्हणजे तोंडी तलाकविरोधात पहिल्यांदा आवाज उठवला तो धर्माने मुसलमान असणाऱ्या हमीद दलवाई यांनीच. १९६६ साली मुंबईत निघालेल्या मोर्चात अवघ्या सहा महिला सहभागी झाल्या. त्यात सर्व मुसलमान होत्या. त्यानंतर पन्नास वर्षांनी तोंडी तलाकविरोधात उभ्या राहिल्या त्या पाच मुसलमान महिलाच. याचा अर्थ त्या समाजात सुधारणावादी नाहीतच, असे नाही. हिंदूंच्या तुलनेत मुसलमानांतील ही सुधारणावादी भावना क्षीण आहे हे खरेच. परंतु ८५ टक्के हिंदूंच्या तुलनेत १४.१५ टक्के मुसलमान हे प्रमाणही तितकेच अशक्त आहे हेही खरे.

अशा वेळी या वास्तवाकडे दुर्लक्ष करीत समान नागरी कायद्याची केवळ आवई उठवली जाते हे आपण लक्षात घ्यायला हवे. याबाबत सरकार खरोखरच गंभीर असते तर सर्व धर्मीयांसाठी विवाहविषयक एकाच कायद्याचा पर्याय सर्वोच्च न्यायालयात दिला गेला असता. तसे काहीही भरीव करण्याची इच्छा आपल्याकडे कोणत्याही राजकीय पक्षाची नाही. म्हणून समान नागरी कायदा वा धर्मापेक्षा घटनाच महत्त्वाची हा विचार आपल्याकडे प्रत्यक्षात येऊ शकत नाही हे वास्तव आहे.
मुस्लिम धर्मात तलाकचे तीन प्रकार आहेत. १) तलाक ए बिद्दत २) तलाक ए सुन्नत ३) तलाक ए मुबारत.

*तलाक ए बिद्दत*
हा तलाक प्रकार कुराणामध्ये व धर्मशास्त्रात मान्य नसलेला तलाक प्रकार.
खलिफा उमरच्या काळात अशा या तलाकला प्रारंभ झाला. त्याकाळी स्त्रियांची संख्या वाढली होती तरी देखील पुरुष सीरिया वा इतर ठिकाणाहून निकाह लावून स्त्रियांना आणत, त्यामुळे स्त्रियांनी खलीपा उमर यांच्याकडे जाऊन आम्हाला या निकाह बंधनातून मुक्त करा तलाक घेऊन द्या अशी मागणी केली होती. त्यावेळी उमर यांनी हा तलाक ए  बिद्दतचा प्रकार अंमलात आणला.बिद्दत याचा अर्थ वाईट. तलाक ए बिद्दत देताना एकाच दमात तीनवेळा तलाक, तलाक, तलाक असं उच्चारून दिलेला हा तलाक. याशिवाय व्हॉट्सअप, टेलिफोन वरूनही असा तलाक दिला जातो न्यायालयानं अशा तलाक पद्धतीवर बंदी घातलीय, सरकारने कायद्याचा मसुदादेखील याच तलाक पद्धतीवर तयार केला आहे. तलाकच्या तीन प्रकारांपैकी बिद्दत प्रकार वाईट समजला जातो.
*तलाक ए सुन्नत* ---
या तलाक पद्धतीत एकूण तीन उपप्रकार आहेत आणि हे तिन्ही तलाक प्रकार कुराण धर्मशास्त्रास मान्य आहेत.
अ) तलाक ए हसन - यात 'तलाक' हा शब्द उच्चारून एक महिनाभर थांबणं. यात पती आणि पत्नी या दोघांकडून त्याबाबतचा पुनर्विचार, तडजोडी, समन्वय होईल यासाठीचा प्रयत्न करायचा.
तो प्रयत्न अयशस्वी झाला तर,  दुसऱ्यांदा दुसऱ्या महिन्यांत 'तलाक' हा शब्द उच्चारून पती पत्नीने कोणताही संबंध न ठेवता पुन्हा समेट घडविण्याचा, गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करायचा तरीही शक्य झालं नाही तर तिसऱ्या महिन्यात तिसऱ्यांदा 'तलाक' शब्द उच्चारायचा, त्यानंतर त्यांचा तलाक धर्मशास्त्रानुसार मान्य होतो.
ब)तलाक ए अहसन - 'तलाक' हा शब्द एकदाच उच्चारायचा त्यानंतर तीन महिने शांत राहायचे त्यानंतर त्यांचा तलाक धर्मशास्त्रानुसार मान्य केला जातो.
क) तलाक ए खुला - पत्नीला पतीसोबत नांदायचे नसेल तर ती पतीला विनंती करते की मला तलाक द्या. मग त्याच्या संमतीने तो तिला तलाक देऊ शकतो. पत्नीला, स्त्रीला तलाक द्यायचा अधिकार कुराणात धर्मशास्त्रात दिलेला नाही. तो फक्त पुरुषालाच दिलेला असल्याने तो तिला तलाक देऊन मुक्त करतो, पतीला जर मान्य नसेल तर ती पत्नीची विनंती नाकारू शकतो.
*तलाक ए मुबारत*- याचा मूळ उच्चार मुबारक असा आहे. यात दोघांच्या संमतीने, सहमतीने, इच्छेने तलाक होतो.

*हलाला* -  पती पत्नी यांच्यात तलाक मान्य झाला आणि काही दिवसानंतर जर पुन्हा त्यांना एकत्र यायचे असेल, पतिपत्नी म्हणून राहायचे असेल तर पत्नीला दुसऱ्या पुरुषाबरोबर लग्न शादी करावी लागते. त्याच्याशी शरीरसंबंध ठेवावा लागतो त्यानंतर तिच्या दुसऱ्या नवऱ्यानं तिला तलाक द्यायचा. तो तलाक झाल्यानंतर ती पुन्हा पहिल्या नवऱ्याशी लग्न निकाह करू शकते याला हलाला म्हणतात.

केवळ बिद्दतचाच नव्हे तर तलाकचे सारे प्रकार रद्द करून न्यायालयातूनच तलाक व्हायला हवेत. तलाकचे हे सारे प्रकार म्हणजे एकप्रकारची जात पंचायतच आहे. असं मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमशुद्दीन तांबोळी यांनी सांगितलं.

प्रबोधनकार ठाकरे...!

 १७ सप्टेंबर, प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांची जयंती. सत्यशोधक आंदोलनातले एक समाज सुधारक, प्रभावी लेखक, पत्रकार, संपादक, प्रकाशक, घणाघाती वक्ते, धर्मसुधारक, इतिहास संशोधक, नाटककार, सिनेमा पटकथा संवाद लेखक, अभिनेते, संगीततज्ज्ञ, चळवळे शिक्षक, भाषासुधारक, लघुउद्योजक, फोटोग्राफर, टायपिस्ट, चित्रकार, लघुलिपिकार असे बहुरंगी, बहुढंगी, बहुआयामी व्यक्तिमत्व! त्यांच्या समाजसुधारणेच्या अनेक घटना आहेत. त्यापैकी एक सार्वजनिक नवरात्रौत्सव! दलित समाजाच्या तरुणांचा गणपती पूजनाचा हक्क डावलला गेला होता, अन्यायाविरुद्ध तुटून पडणाऱ्या स्वभावामुळे ते मूर्ती फोडण्यासाठी सज्ज झाले. अखेर दलिताला पूजेचा हक्क मिळाला. पण सनातन्यांनी गणेशोत्सवच बंद केला. यांच्या या निर्णयाविरोधात त्यांनी मग सार्वजनिक नवरात्रौत्सव सुरू केला. जो आज महाराष्ट्रभर सर्वत्र सुरू आहे!

संपूर्ण महाराष्ट्राच्या चळवळीतील पंचकांपैकी एक, संयुक्त महाराष्ट्राचा एक शिल्पकार; 'मराठा तितुका मेळवावा । महाराष्ट्र धर्म वाढवावा ।' हे ब्रीद आमरण उराशी बाळगणारा हा फटकळ लेखणी-वाणीचा, पण निर्मळ करणीचा मर्द मराठा; अंतिम क्षणापर्यंत 'ऊठ मराठ्या ऊठ' असं प्रबोधन करणारा हा सव्यासाची पत्रकार! 'शिवसेने'चा साक्षेपी प्रेरणादाता!

प्रबोधनकारांना सारे दादासाहेब ठाकरे असे संबोधित असत. दादांनी आमरण मराठी तरुणांच्या व्यथांना, त्यांच्यावरील अन्यायांना वाचा फोडली. त्यांना कठोर परिस्थितीशी झुंजण्यासाठी धीर दिला, हिंमत दिली आणि

*वाघिणीचे दूध प्याला*
*वाघ-बच्चे फांकडे*
*भ्रात तुम्हां कां पडे?*

ही जाणीव देऊन त्यांची अस्मिता जागविली! गुणशाली लेखक असो, कलाकार असो, नट असो, गायक असो, गुण-लुब्ध दादांनी तरुणांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली नाही, असं कधी घडलं नाही. ते सदैव नव्या पिढीबरोबर टवटवीत वाटचाल करू शकले याचे कारण ते स्वतः अखेरपर्यंत वृत्तीनं ताजे-टवटवीत नि तरुण होते. एका विख्यात शायराने केलेलं वर्णन दादासाहेब ठाकरे  ह्यांना तंतोतंत लागू पडते -

*थकली तनू ही जर्जरा,*
*'वार्धक्य कापूर हा जरी!*
*तरि यौवनाची आगही,*
*याच्या वसे नित्य अंतरी!*

आणि ही गोष्ट सोपी नाही, 'वृद्धत्वी निज यौवणास जपणे' भल्याभल्यांना जमत नाही! प्रबोधनकार अखेरपावेतो रसरशीत तरुण होते. सकाळी उठल्यावर ते स्वतःच्या हाताने गुळगुळीत दाढी करून मगच दिनचर्येला प्रारंभ करायचे. ओशाळी बावळी चर्या त्यांना खपत नसे! अखेरपर्यंत अनेकविध विषयांवरील त्यांची अनुभव, ज्ञानसंपन्न 'अप-टू डेट रनिंग कॉमेंट्री' ते येणाऱ्या- जाणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांना उत्साहाने ऐकवीत! सर्व वृत्तपत्रे वाचीत आपल्या 'जीवन गाथे'ची प्रूफ त्यांनीच तपासली होती. त्यानंतर दृष्टी फार अधू झाली तरी ते हताश झाले नाहीत. कारण रेडिओ वरील बातम्या आणि भाषणं लक्षपूर्वक ऐकण्याचा त्यांचा परिपाठ होता. त्यांच्या ८८ व्या वाढदिवसाला त्यांना उचलून व्यासपीठावर नेण्याची व्यवस्था कार्यकर्त्यांनी केली होती. पण त्यांना ती मंजूर नव्हती. ते स्वतःच्या पायांनीच व्यासपीठावर आरूढ झाले.

शिवसेनेच्या एका 'बेकार तरुणांचा मोर्चा'ला ४-५ हजार लोकच होते, तेव्हा ते तरुण कार्यकर्त्यांवर कडाडले, "इतकेच काय?... अरे, मुंबईत किमान तीस-चाळीस हजार बेकार आहेत! ....कंबर कसून काम करा." अखेर पावेतो बारीक सारीक गोष्टीत त्यांचे बारीक लक्ष आणि परखड मार्गदर्शन! तरुणांना रुचणारा तडफदारपणा त्यांच्यात होता अन मिळमिळीत मुर्दाडपणाचा त्यांना अतिशय तितकार्स वाटे!

असे तारुण्य वृद्ध देहात असले तरी तरुण मनाला आकर्षित करतेच करते. मनाने केव्हाच मरून गेलेले गलितगात्र म्हातारे आपण ठायी ठायी पाहतो अथवा म्हातारपणी विशोभित पोरखेळ करणारे महाभागही अनेक असतात! पण प्रबोधनकारांसारखा चिरतरुण वृद्ध विरळाच! महाराष्ट्रातील हजारो 'एकसष्टी' बहाद्दर वृद्धांनी पेन्शनकडे डोळे लावून भकास जिणे जगण्यापेक्षा हा 'प्रबोधन'कर्ता आदर्श डोळ्यापुढे ठेवावा. महाराष्ट्राला आज जशी तानाजींची जरुरी आहे तशीच दादांसारख्या 'शेलारमामा'ची देखील! वार्धक्याकडे विटलेल्या विफलतावादी नजरेनं पाहण्यापेक्षा 'वार्धक्य म्हणजे परिपक्व तारुण्य' या निरोगी दृष्टीनं वृद्धांनी स्वतःच्या जीवनाकडे पाहायला हवे. असे वार्धक्य निराशेच्या अंधारात 'हरी हरी' म्हणत घटका-पळे मोजत बसत नाही, तर जनता-हरीच्या चरणी समर्पित होऊन धन्य होते. दादांचा हा विचार आजही अनेकांना प्रेरित करतो.

काही काही अंत्ययात्राही खूप बोलक्या असतात. दिवंगत व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर अखेरचा लखलखीत प्रकाशझोत टाकणाऱ्या अचूक भाष्याप्रमाणे असतात! अगदी अलीकडच्या काळातील आपण पाहिलेली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जशी निर्वाणयात्रा होती तशीच प्रबोधनकारांची होती. प्रबोधनकारांच्या चिरतरुण व्यक्तिमत्वाने मराठी तरुण मन किती भारावली होती याची साक्ष पटवणारी! एरव्ही ८९ वर्षाच्या वृद्धाच्या अंत्ययात्रेत पन्नाशी ओलांडलेल्या वृद्ध माणसांचीच संख्या अधिक असणे साहजिक.  कारण नव्या पिढीला त्यांचे कर्तृत्व कितीसे ठाऊक असणार? 'दर वीस वर्षाला एक पिढी बदलते' हे सर्वमान्य तत्व गृहीत धरले, तर तत्कालीन विशीतला तरुण दादांपासून किमान तीन पिढ्या दूर असला पाहिजे होता! पण असे झाले नाही. ५० हजाराहून अधिक माणसं असलेल्या या अंत्ययात्रेत ९० टक्के तरुण होते विशीपासून चाळिशी पर्यंतची! असा हा तरुणांना आपल्या वाणीने, विचाराने आपल्याकडे खेचणारे दादासाहेब होते!

- हरीश केंची ९४२२३१०६०९

ऐसा बालगंधर्व होणे नाही...!

मी स्वत: ऐकलेली विलक्षण घटना!
 "त्या दिवशी नेमका मी पुण्यात होतो. दुपारची जेवणवेळ. मी नारायण गेटाजवळच्या माझ्या घरून पान खाण्यासाठी बाहेर आलो होतो. गेटजवळच्या पानाच्या दुकानाकडे वळणार इतक्यात माझ्या अगदी समोर चार-सहा फुटांच्या अंतरावर एक प्रेतयात्रा येताना दिसली. मी त्वरेने मागे धावलो. रस्त्याच्या कडेला उभे राहून बघू लागलो, तो त्या प्रेतयात्रेत मोजकीच माणसे सामील झालेली! चौघांनी प्रेताची ताटी खांद्यावर घेतलेली, एकजण पुढे विस्तव धरलेला आणि बाकीची शेलकीच माणसे भरधाव वेगात जात असलेली. ती जवळजवळ सर्वच माणसे परिचित चेहर्‍यांची. पुण्याच्या नाट्यक्षेत्रात प्रत्यही दिसत असलेली. नाट्यक्षेत्रातील सभा-संमेलनात माझे नेहमी जाणे-येणे असायचे. त्यावेळी तेथे दिसणारी प्रमुख माणसे त्या प्रेतयात्रेत दिसली. मी तशा स्थितीतही शेवटून जाणाऱ्या एका परिचितांना हळूच विचारून घेतले.
‘कोण?’
न थांबता त्यांनी कुजबुजत्या स्वरात सांगितले.. ‘अहो… गंधर्व… बालगंधर्व…’
बालगंधर्वाची प्रेतयात्रा अणि ती अवघ्या इतक्या थोड्या माणसांच्या उपस्थितीत!
बालगंधर्व…सौभद्र…स्वयंवर…मृच्छकटिक…एकच प्याला…जोहार मायबाप जोहार…अन्नदाते मायबाप हो..
हे सारे क्षणात डोळ्यांपुढे उभे राहिले. पान खाण्याची इच्छा पार मावळून गेली.
ओंकारेश्वराच्या समोरील नदीच्या किनाऱ्यावरल्या बंदिस्त आवारात प्रेत खाली ठेवण्यात आले. कुणीतरी त्वरेने पुढे झाले. लाकडे रचण्यात आली. प्रेत नदीच्या पाण्यात भिजवून आणले. प्रेताचा गोरापान चेहरा तशा अचेतन अवस्थेतही देखणा दिसत होत. प्रेत ठेवल्यावर सरणाच्या फटी सगळीकडून बंद करण्यात आल्या. मडके धरून आणणार्‍याने अग्नीचे चार निखारे सरणावर टाकले. दुसर्‍या बाजूने रॉकेल ओतण्यात आले. कुणीतरी काडी ओढून ती सरणावर टाकली. आग भडकली. पाहता पाहता आगीच्या ज्वाळा गगनाला भिडल्या. आतून तडतड असे आवाज येऊ लागले. पाहता पाहता जळून गेलेली धगधगती लाकडे चोहीकडून राखेच्या स्वरूपात खाली गळून पडू लागली. एक भलामोठा आवाज झाला. त्यावर कुणीतरी उदासपणे म्हणाले, ‘संपलं! चला आता.’
घरी आलो. चार वाजून गेले होते…बालगंधर्वांची प्रेतयात्रा अशा घाईगडबडीने व पुण्यासारख्या त्यांच्या कर्मभूमीत गाजावाजा न करता गुपचूपपणे का उरकून घेण्यात आली?
त्याचे कारण दुसरेतिसरे काही नसून स्वत: बालगंधर्व नारायणराव राजहंस यांचा लहरीपणा आणि त्यातून उद्भवलेले त्यांचे दुर्दैव हेच आहे!"
गोहरबाईसारख्या एका रूपवती नटीशी त्यांनी आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात विवाह केला व तिच्या पायावर तन-मन-धन सर्वस्व वाहून टाकले. तिच्यासाठी नारायणरावांनी मुसलमान धर्म स्वीकारला. मुंबईला माहीम भागातील तिच्या वसतिस्थानात नारायणराव राजीखुषीने राहायला गेले. गोहरबाईने महाराष्ट्राच्या या लाडक्या गंधर्वाला जवळ केले त्यावेळी वास्तविक पाहता या गंधर्वाची सारी पिसे गळून गेलेली होती. त्याची गंधर्व नाटक मंडळी कधीच भूतकाळात जमा झाली होती. सारी नटमंडळी त्याला सोडून आपापल्या वाटेने उडून गेली होती. उरला होता तो एक म्हातारा-पिसे गळालेला राजहंस!
कुणीही केली नसती अशी सेवा या गोहरबाई नावाच्या वेश्येने केली. त्याचे लुळेपण तिने भक्तिभावाने जोपासले. कसल्याही सुखाची अपेक्षा न करता! कारण एकच… त्याच्या गळ्यावरील तिचे भक्तियुक्त प्रेम. जे प्रेम राधेने कृष्णावर केले… अहिल्येने रामावर केले… ते प्रेम गोहरने या सुरेल राजहंसावर केले. त्याला त्याच्या अखेरच्या लुळ्यापांगळ्या अवस्थेत सांभाळले. मायेची पाखर दिली आणि स्वत: ही मुसलमान साध्वी अगोदर
अहेवपणाचे लेणे कपाळावर मिरवत दिक्कालापलीकडे निघून गेली. उरला तो आणखीनच
विदीर्ण झालेला राजहंस. त्यावेळी त्याच्या रसिकजनांनी व भगतगणांनी त्याच्याकडे पाठ फिरवली होती. त्याने गोहरबाईसारख्या एका मुसलमान बाईचा घरोबा स्वीकारला. त्यासंबंधी टीकेची हत्यारे त्याच्यावर परजीत पुण्याचे सर्व नाटकी सज्जन त्याला विसरून जाण्याच्या तयारीत होते.
असा हा एकेकाळचा नटसम्राट बालगंधर्व…
मुसलमान झालेला. आपल्या पूर्वीच्या साऱ्या प्रेमिकांना
अव्हेरून त्याने आपण होऊन माहीमचा रस्ता धरलेला होता. अर्थांतर तर झालेच होते, धर्मांतरही झाले! त्यानंतर पहिले काही दिवस, अंगात त्राण होते तोपर्यंत गावोगावच्या जुन्या भगतगणांना बोलावून त्यांच्याकडून सत्कार करवून घ्यायचे, थैल्या घ्यायच्या. एका हाताने घ्यायच्या व दुसऱ्या हाताने देणेकऱ्याच्या स्वाधीन करायच्या असलेही उद्योग या राजहंसाने केले.
एक प्रसंग आहे. सोलापूरचा. याच सोलापूरने पूर्वी बालगंधर्वांना भरभरून लोकप्रियता दिली.
पैशांच्या राशी त्यांच्या पावलावर ओतल्या. मेकॉनकी थिएटर म्हणजे बालगंधर्वांचे जणू माहेर! तिथं नाटक करताना जणू इंद्रपुरीत नाटक करतो असे वाटते असं बालगंधर्व नेहमीच म्हणायचे. पण आयुष्याच्या शेवटच्या प्रहरी जुन्या गिरणीच्या पाठीमागे बांधलेल्या तमाशाच्या थिएटरात या राजहंसाला कबुतराच्या खुराड्यात राहिल्याप्रमाणे रहावे लागले.
नाटके लावता येत नव्हती. पण सोलापूरचे वेडे भक्त रुंजी घालायला तयारच होते. एका भोळ्याभाबड्या बाईने पुढाकार घेऊन गंधर्वाला थैली देण्याचा घाट घातला. तिच्या एकटीच्या पायपिटीने हजार अकराशेची रास जमा झाली. त्याच तमाशाच्या थिएटरात थैली अर्पण करण्याचा समारंभ झाला. राजहंसाला दोन माणसांनी उचलून रंगमंचावरील खुर्चीत आणून बसवले. भाषणे झाली. उजवीकडच्या विंगेत एक परिचित चेहऱ्याचा व्यापारी आशाळभूत मुद्रेने चुळबूळ करीत उभा दिसला. थैली अर्पण करण्यात आली… तो चुळबुळ्या व्यापारी चक्क रंगमंचावर येऊन थैली घेऊन गेला…!
गंधर्वाचे भाषण सुरू झाले. ‘अन्नदाते! मायबाप हो! तुम्हीच मला मोठे केलेत. तुम्हीच मला जगवा… तुमच्या उष्ट्याचा मी महार.’
असे अनेक थैली समारंभ सोलापूरपासून जळगाव भुसावळपर्यंत. चौकोनी कोडी असतात त्याप्रमाणे उभी आडवी तिरपी कशीही बेरीज केली तरी उत्तर येईल शून्य! गंधर्वांना मिळालेल्या अनेक थैल्यांची बेरीज होती शून्य! जमेला होते ते एक गोहरबाईचे नितांत प्रेम. तिने आपल्या ‘गळ्याचा’ व्यवसाय सोडून पतीची वार्धक्यातली सेवा करण्याचा पतिव्रताधर्म स्वीकारला.
परंतु बिचारीचे नशीब खोटे! ती तरी त्याला काय करणार? बालगंधर्वाभोवती त्यांच्या चलतीच्या काळात रुंजी घालणारे कपोतपक्षी त्याच्याजवळून उडून गेले व साऱ्या महाराष्ट्रात गोहरबाईने गंधर्वाचा सत्यानाश केला अशी हाकाटी करीत राहिले.
वास्तविक पाहता, सत्यानाश तिने करून घेतला होता तो स्वत:च्या कलाजीवनाचा मृच्छकटिकातल्या वसंतसेनेची तिने केलेली एक भूमिका होती. ‘माडीवरी चल ग सये’ हे गाणे ती अशा ढंगात म्हणायची की त्याचे वर्णन करणे मुष्किल आहे.
ज्या काळात मराठी रंगभूमीवर अद्यापही पुरुष नट स्त्रीभूमिका करायचे व त्यांचे ‘कसेही’ दिसणे प्रेक्षक गोड करून घ्यायचे त्या काळात मराठी रंगभूमीवर गोहर नावाच्या गोड गळ्याच्या व भावपूर्ण डोळ्यांच्या एका जातिवंत नटीने गाननृत्यही करून एक आगळा साक्षात्कार घडविला होता तो काळ दृष्टीसमोर आणा म्हणजे माझ्या म्हणण्याची सत्यता पटेल. त्या काळात ज्योत्स्ना भोळे अद्याप चमकायच्या होत्या. हिराबाई बडोदेकर एखाद्या नाटकात काम करायच्या. परंतु हिराबाई म्हणजे केवळ श्रुतिमाधुर्य. त्यांचे गाणे ऐकावे ते डोळे मिटून!
हिराबाईंच्या गानमाधुर्याबद्दल आणि त्यांच्या सालस स्वभावाबद्दल संपूर्णपणे आदर बाळगून असे बिनदिक्कत म्हणावेसे वाटते की हिराबाई या गायिका आहेत, नटी नाहीत. मराठी रंगभूमीवरील पहिली अभिनयकुशल आणि नृत्यगानकुशल अशी स्त्री म्हणजे गोहरच होय!
जातिधर्माच्या अभिमानापलीकडे न जाणाऱ्या आपल्या मध्यमवर्गीय नाट्यसमीक्षकांनी आजपर्यंत गोहरला न्याय दिलाच नाही असे खेदाने म्हणावे लागते. नारायणराव राजहंसानी तिच्यातले नाट्यगुण जाणले होते आणि त्यामुळेच ते तिच्याशी एकरूप झाले.
दोन जातिवंत कलावंतांचे हे त्यांच्या जीवनाच्या उत्तर काळातले मीलन गंधर्वांच्या हिंदू चाहत्यांना रुचणारे नव्हते. पृथ्वीच्या पोटातून निघणारे सुवर्ण किंवा लोह हे केवळ आपल्याच उपभोगासाठी आहे असे मानून त्याचे कोडकौतुक करणार्‍या मानवजातीप्रमाणेच गंधर्व हे फक्त आमचेच आहेत, आमच्यासाठी आहेत असा भ्रामक समज त्यांच्या अवतीभवती वावरणाऱ्या हिंदू रसिकांनी करून घेतला होता. पृथ्वीच्या गर्भात लोहभस्म आणि सुवर्णभस्म जे दडलेले असते त्यामुळे जमिनीचा कस वाढत असतो व पृथ्वीच्या अंतर्भागात होणारे प्रचंड उत्पात त्यामुळे टळत असतात.
सोने किंवा लोखंड हे माणसांसाठी निर्माण करून दिलेले पदार्थ नाहीत. माणसाने आपली बुद्धी वापरून ते स्वत:च्या वैभवासाठी व उन्नतीसाठी वापरले ही गोष्ट वेगळी! त्याचप्रमाणे नारायणराव बालगंधर्व यांचे दैवी गायन हे काही फक्त चार हिंदू रसिकांपुरतेच नव्हते. त्यांच्या आवाजात जी आर्तता होती ती साऱ्या मानवजातीकरता होती. परधर्मातील गोहर उगीच नाही त्या आर्ततेवर भुलून स्वत:चे सर्वस्व राजहंसाच्या पायावर वाहायला तयार झाली!
तिचे व बालगंधर्वांचे मीलन हिंदू रसिकांना न रुचल्याने त्यांच्यावर जी हीन पातळीवरील टीका व निंदानालस्ती झाली त्यामुळे ती गोहर नावाची ‘अस्मानी परी’ मनोमन कष्टी असे. ती कुरूप होती, हिडीस होती, चेटकीण होती असे नाना प्रकारचे आरोप तिच्यावर गंधर्वांचे संगतीत काही काळ राहिल्याचे भूषण मिरविणारे अद्याप करीत असतात. गंधर्वांच्या नाट्यकंपनीत पोट फुटेपर्यंत खाल्लेली पंचपक्वान्ने अद्यापही या तथाकथित गंधर्वभक्ताच्या अंगावर उठून बाहेर येत आहेत. गंधर्व कंपनीत म्हणे, ‘काळी साळ’ नावाचा सुवासिक तांदूळ आणि शुभ्र लोणकढे तूप खायला मिळायचे! ती काळी साळी आणि तुपाची लोणकढी आता चेहऱ्यावर येऊन बसली आहे व रात्री-अपरात्री अश्‍वत्थाम्यासारखी भ्रमंती करायला लावीत आहे. गोहरला चेटकीण म्हणणारे हे महाभाग कदाचित गोहरच्या तारुण्यात तिचा उपभोग घ्यायलाही गेले असतील व नकार घेऊन परत आले असतील, कुणी सांगावे? कारण बालगंधर्वांची नि तिची प्रेमभेट होण्यापूर्वी ती जर विजापूरची कलावंतीणच होती!
ते काहीही असो. मात्र राहून राहून एका गोष्टीची रुखरुख वाटते ती म्हणजे गोहरच्या आणि गंधर्वांच्या शरीरसंबंधातून एखादा अंकुर निर्माण झाला असता तर तो गायनाची पताका
दिगंत घेऊन जाणारा झाला असता! दोन अस्सल कलावंतांच्या मीलनातून परमेश्वराने का नाही तिसरा जीव निर्माण केला?
या रुखरुखीबरोबर पुण्याच्या जहांगीर नर्सिंग होममध्ये अखेरचे क्षण मोजीत पडलेला गंधर्वांचा म्लान चेहरा समोर येत आहे. गंधर्व अत्यवस्थ… अशी सिंगल बातमी ‘सकाळ’च्या कोपऱ्यात आली होती ती वाचून मी आणि माझा एक मित्र  दुपारचे जहांगीर नर्सिंग होममध्ये गेलो होतो. एका खोलीत स्वच्छ पांढऱ्या चादरीवर अर्ध्या चड्डीतला गंधर्वांचा गोरापान कमनीय देह पडला होता. जवळपास कुणीही नव्हते. फक्त एक बगळ्याच्या रंगाच्या पोषाखातली परिचारिका डोळ्यांतली कबुतरे उडवीत उभी होती. त्या क्षणी मनात आलेली कल्पना अद्याप विसरू शकणार नाही. परी गेली नि परिचारिका उरली. ही ती कल्पना!
आणि प्रारंभी वर्णन केलेली ती सहा माणसांची भेसूर स्मशानयात्रा आठवली की आजही अंगावर शहारे येतात.
आयुष्यभर ज्याने कला, नाट्य वैभव, मित्रपरिवार याशिवाय दुसरे काही नाही केले त्याच्या अंत्ययात्रेला एखादाही श्रीमंत उल्लू रसिक नव्हता! गंधर्वांशी आज मैत्री सांगणारा एखादाही मित्र नव्हता.
होते ते एका हौशी नाट्यसंस्थेचे पदाधिकारी आणि एक कलंदर!
कलाकाराची अंत्ययात्रा अशीच असायची असा विधिलिखित संकेतच असतो की काय कुणास ठाऊक! मानवजातीला तृप्त करणाऱ्याला मात्र अखेरीस ‘प्यासा’ रहावे लागते.
एक शापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा यांचे हाल आणि दैना आम्ही पाहिली. गंधर्वांचे भाग्य थोर! त्याच्यावर पुस्तके लिहिली जात आहेत.
पण अप्सरेचा मानवी अवतार तिच्या अखेरच्या श्‍वासाबरोबरच संपला...

राजसंन्यासी...गडकरी!

विमानातुन प्रवास करणाऱ्या त्या दोन सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणांना संभाजीराजे यांची तथाकथित ब्राह्मणी इतिहासकारांनी पसरविली अपकीर्तिच ज्ञात होती. त्यांच्या या लेखनानं शंभूराजे यांची  डागाळली गेलेली प्रतिमा. तीच प्रतिमा समाजापुढे नेहमी राहिल्यानं तरुणांना तेच खरं वाटत होत. दादोजी कोंडदेव, राम गणेश गडकरी त्यांच्या नाटकातील विकृत चित्रण, रायगडावरील कुत्र्याचं स्मारक याबाबत प्रसिद्धीमाध्यमातून उठलेलं वादळ याची त्यांना माहिती होती साहजिकच चर्चेचा सूर तिकडे वळाला..

*'राजसंन्यासा'ची चर्चा*
चर्चेच्या ओघात त्यांनी राजसंन्यास नाटक आणि राम गणेश गडकरी यांच्याबद्धल काही प्रश्न विचारले. पुण्यातील संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा का हटवला गेला? रायगडावरील कुत्र्याची समाधी का तोडली गेली? प्रसिद्धीमाध्यमाच्या उलटसुलट बातम्या याचा संदर्भ त्यांनी दिला. यावरून त्यांना या घटना माहीत होत्या पण त्या मागचा इतिहास काय हे माहीत नव्हतं. ही झालेली संभाजीराजांची बदनामी हे ज्या मराठी नाटकात केली गेली ती म्हणजे गडकरीचं नाटक 'राजसंन्यास' हे होय!

*'राजसंन्यासा'त शंभूराजांची बदनामी*
राम गणेश गडकरी यांनी 'राजसंन्यास' नाटकात संभाजीराजे यांची यथेच्छ बदनामी केली. त्यांनी आपल्या ३२वर्षाच्या आयुष्यात एकच प्याला, पुण्यप्रभाव, प्रेमसंन्यास, भावबंधन, राजसंन्यास, वेड्यांचा बाजार अशी पाचेक नाटकं लिहिली. विविध प्रकारचं लेखन याशिवाय गोविंदाग्रज या नावानं काव्य लेखन तर बालकराम नावानं विनोदी लेखन केलंय. त्यांचं लेखन सामर्थ्य जबरदस्त होत. वाचकाला ते वाचनात खिळवून ठेवायचे. याच त्यांच्या लेखनशैलीतून त्यांनी 'राजसंन्यास' हे नाटक लिहीलंय. हे त्यांचं पांच अंकी नाटक, पण ते पूर्णरित्या लिहिलेलं नाही. या पांच अंकी नाटकाचे पहिल्या अंकाचे दोन प्रवेश पूर्ण, तिसरा प्रवेश अर्धवट, दुसरा अंक लिहिलेला नाही, तिसऱ्या अंकातल्या पहिल्या प्रवेशाचे एकच गाणे लिहिलेलं आहे, चौथा अंक नाही मात्र पांचव्या अंकातले पाचही प्रवेश लिहिलेलं आहे. १९१७ मध्ये हे नाटक अपूर्ण सोडून त्यांनी भावबंधन लिहायला घेतलं. त्यावेळी ते क्षयरोगानं आजारी होते. पण तशाही अवस्थेत त्यांनी भावबंधन नाटक लिहून पूर्ण केलं. त्यानंतर त्यांचं निधन झालं. गडकरींच्या निधनानंतर १९२०मध्ये हे नाटक रंगभूमीवर आलं. त्यानंतर १९२२ मध्ये अपूर्ण राजसंन्यास नाटक पुस्तक रूपाने प्रसिद्ध झालं.

*ब्राह्मणी इतिहासकारांचा कट*
खरं तर हे असं अपूर्ण राहिलेलं राजसंन्यास हे नाटक पुस्तकरूपाने प्रसिद्ध करण्याचं काही कारण नव्हतं. पण या नाटकाच्या माध्यमातून संभाजीराजांची यथेच्छ बदनामी करण्यात आली असल्यानेच त्यांच्या मृत्यूनंतर ते प्रसिद्ध केलं गेलं! या नाटकाची सुरुवातच सौंदर्याच्या मोहनबाधेने धुंद झालेल्या तुळसेला संभाजीराजे रायगडावर आणतात. या प्रसंगाने झालीय. संभाजीराजांचा रंगेलपणा, त्यामुळे शिवाजीमहाराजांशी झालेला मनभेद आणि शिवरायांच्या पश्चात या साऱ्यांबद्धल झालेली उपरती, या विषयावर बेतलेले हे नाटक आहे! हे नाटक गडकऱ्यांनी पूर्ण लिहिलेलं असावं, परंतु संभाजीराजांच्या केलेल्या बदनामीमुळे काही आक्रीत घडलंच तर जो काही प्रश्न होईल त्या भीतीनं पुस्तक प्रकाशित करणाऱ्यानं ते संपूर्णपणे छापलं नसावं, अशी शंका घेण्यास भरपूर वाव आहे. खरं तर गडकरी नाटकाचा शेवट आधी लिहीत असं म्हटलं जातं असे. हे जर खरं असेल तर लेखन पूर्ण झाल्याशिवाय कुणी पुस्तकाची अर्पणपत्रिका लिहीत नाही. 'राजसंन्यास' पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीत अर्पण पत्रिका आहे आहे पुढच्या काही आवृत्तीत नाटकाच्या प्रयोगाची छायाचित्रेही आहेत. प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात जे आहे ते अत्यंत संतापकारक आहे. संभाजीराजांची बदनामी करण्यासाठी काही ब्राह्मणी इतिहासकारांनी रचलेला कट होता हे इतिहासाचार्य बा.सी.बेंद्रे आणि डॉ.कमल गोखले यांनी पुराव्यासह सिद्ध केलं आहे. यावरून गडकरी हे संभाजीराजे यांची बदनामी करणाऱ्यांच्या गटात सामील झाले होते, वा त्यांना त्यासाठी वापरण्यात आलं होतं. याची साक्षच राजसंन्यास नाटकातून मिळते.

*शिवाजीराजांचीही टवाळी*
या नाटकात शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा त्यांचं उपमर्द करण्याचाही प्रयत्न झालाय. त्यासाठी गडकऱ्यांनी देहू दप्तरी आणि कारकून जिवाजीपंत कलमदाने या पात्राची रचना केलीय. देहू शिवरायभक्त आहे तर शिवरायांची टवाळी, बदनामी करणारा जिवाजीपंत आहे.गडकऱ्यांनी नाटकाच्या अखेरच्या भागात संभाजीराजांच्याच तोंडून 'संभाजी हा म्हणजे हा केवळ छाकटा रंडीबाज!' हे वाक्य वदवून घेतलंय.

*टिंगल, टवाळी, अवहेलना*
गडकऱ्यांनी या नाटकात "हा संभाजी छत्रपती या किताबतीला नालायक आहे. छत्रपतींनी बांधलेल्या राष्ट्रतीर्थाची-श्रीगंगासागराची व्यभिचाराने मोरी केली. वैराग्याच्या वेगाने फडफडणाऱ्या भगव्या झेंड्याला दारुबाजाचे तोंड पुसण्याचा रुमाल केला. महालक्ष्मीच्या वैभवाचा जरीपटका फाडून त्याची रांडेची काचोळी केली." यासारखी वाक्ये संभाजीराजांच्या तोंडी घालून त्यांनी न केलेल्या अपराधाची कबुलीही द्यायला लावलीय. या नाटकातील कारकून जिवाजीपंत कलमदाने आपल्या अंगभूत कारस्थानी प्रवृत्ती दाखवताना म्हणतो, "वारुळातील दोन जिभांची पिवळी नागीण चावली तर एकाच पिढीचा घात होतो. परंतु, कारकुनी कानावरची दोन जिभांची काळी नागीण- म्हणजे लिहिण्यासाठी त्याकाळी वापरली जाणारी लेखणी...टाक डसली, तर ती सात पिढ्याचा सत्यानाश करते!" अशाच लेखणीच्या माध्यमातून गडकऱ्यांनी संभाजीराजांची यथेच्छ टिंगल टवाळी अवहेलना केलीय. त्यांना रंडीबाज, दारुबाज, स्वराज्यद्रोही ठरवलंय.

*दादोजींचा पुतळा हलविला*
नव्या दमाच्या बहुजन समाजातील तरुण इतिहासाचे अभ्यासक या साऱ्या कपोलकल्पित इतिहासाची चिकित्सा करू लागले तेव्हा या प्राकृत इतिहासातील खोटेपणा प्रकर्षाने जाणवू लागला. या इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू लागला त्याची सुरुवात २००४ साली शिवाजी महाराज आणि जिजाऊ यांच्या चरित्र्याची विटंबना करणाऱ्या जेम्स लेनच्या वादग्रस्त पुस्तकापासून प्रारंभ झाला. त्यानंतर पुणे महापालिकेनं उभारलेल्या दादोजी कोंडदेव पुतळ्याचे प्रकरण उदभवले. दरम्यान राज्यसरकार खेळातील प्रशिक्षकाला दिला जाणारा 'दादोजी कोंडदेव पुरस्कार' रद्द केला. दादोजी हे शिवाजी राजांचे गुरू नाहीत तर ते नोकर होते असा अहवाल इतिहासकारांनी त्यावेळी दिला. त्यामुळे सरकारनं तो निर्णय घेतला. या वातावरणात लालमहालात उभारलेले शिवराय, जिजाऊ यांच्या समूह शिल्पात दादोजींना घुसविण्यात आलं होतं ते खटकू लागलं. त्या समूहशिल्पातील दादोजींचा पुतळा हलवावा अशी मागणी पुढे आली. महापालिकेत चर्चा झाली झाली अन दादोजींचा पुतळा हलविला.

*गडकऱ्यांचा पुतळा हटवला*
त्यानंतर रायगडावरील कुत्र्याच्या स्मारकाचा प्रश्न निर्माण झाला . हे कुत्र्याचं काल्पनिक पात्र याच नाटकात गडकऱ्यांनी रंगवलं आहे. राम गणेश गडकरी यांनी ज्या राजसंन्यास नाटकातून संभाजीराजे यांची बदनामी केली त्या गडकऱ्यांचा पुतळा लक्ष्य ठरला. हा गडकरींचा पुतळा ज्या ठिकाणी बसविला गेला होता ते ठिकाण होतं संभाजी उद्यान! वास्तविक ज्या संभाजीराजांची बदनामी गडकऱ्यांनी केली त्यांचाच पुतळा संभाजीराजांच्या स्मारकात बसविला. हा केवळ खोडसाळपणाच! त्यामुळेच शंभुभक्तांनी हा संभाजी राजाचं नाव असलेल्या स्मारक-उद्यानात त्यांचीच बदनामी करणाऱ्याचा पुतळा हटवला....
!

गडपती...संभाजीराजे...!


संभाजी राजा हा निव्वळ बदफैली, विलासी, रंगेल आणि नशेबाज होता......!"
पुणे दिल्ली असा विमान प्रवास सुरु होता. माझ्या पुढच्या सीटवर बसलेल्या दोघा तरुणांचा हा संवाद कानावर पडला, मी मागे वळून रागानेच त्यांच्याकडे पाहिलं, पण मी रागानं त्यांच्याकडं का पाहतोय हे त्यांना समजेना! मी जागेवरून ऊठलो आणि त्यांच्याजवळ गेला त्यांच्याशेजारी बसलेल्या परप्रांतीय व्यक्तीला माझ्याजागेवर बसण्याची विनंती केली आणि त्याच्या जागेवर जाऊन बसलो. त्या दोघांची विचारपूस केली दोघेही मराठी होते, सॉफ्टवेअर इंजिनिअर होते, कामासाठी ते दिल्लीला निघाले होते. विमानतळ गाठण्याचा वेळात येरवड्याजवळ शंभूराजांची पुरंदरहुन तुळापूरकडे निघालेल्या पालखीमुळे वाहतूक कोंडी झाली होती, त्यामुळे त्यांना विमानतळावर यायला थोडा उशीर झाला होता. त्यासाठी त्यांची ही बडबड सुरू होती. मी शांतपणे आस्थेनं त्यांची चौकशी केली, शंभू राजांबद्दल त्यांना काय माहिती होती? त्यांच्याबद्धल काही वाचलंय का? त्यांना संभाजी राजांची कितपत माहिती होती हे सारं जाणून घेतल्यानंतर त्यांचं अज्ञान दिसून आलं, त्या बिचाऱ्यांचं काय चुकलं? त्यांना तेच शिकवलं गेलंय, सिनेमा, नाटकातून, प्रसिद्धी माध्यमातून हेच चुकीचं चित्र संभाजीराजांचं रंगविण्यात आलेलं आहे. मी त्यांना संभाजीराजांच्या कार्यकर्तृत्वाची थोडीशी झलक ऐकविली ते स्तब्ध झाले. त्यांना हे सारं नवीन होतं. त्यांनी त्या प्रवासात राजांची अधिक माहिती मिळावी म्हणून त्रोटक पण परिणामकारक असं चरित्र ऐकवलं आणि नव्यानं संशोधन करून राजांसंदर्भात केलेलं लेखन वाचण्यासंदर्भात पुस्तकांची नावं सांगितली. अज्ञानातून अनाहूतपणे राजांविषयी केलेल्या शेरेबाजीबद्धल माफी मागितली आणि ही पुस्तकं आणून नक्की वाचू असा विश्वासही त्यांनी दिला. मला बरं वाटलं, दोघांचं मतपरिवर्तन करू शकलो! पण प्रवासाच्या अखेरपर्यंत त्यांच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची भावना दिसत होती.

*अस्सल पुरावे जाळले गेले*
मी त्यांना सांगत होतो, "शिवपुत्र धर्मवीर संभाजीराजे ! संभाजी महाराजांबद्दल अस्सल पुराव्याअभावी परकियांनी बरेच विकृत लिखाण केलंय.  संभाजीराजांच्या वधानंतर झुल्फीकारखानाने रायगडचा पाडाव केला व तेथील सर्व दप्‍तरखाना व कागदपत्रे जाळून नष्ट करून टाकली त्यामुळे सर्व पुरावेच नष्ट झाले. विकृत व चुकीच्या लिखाणामुळे समाजात शंभूराजांबद्दल बरेज गैरसमज निर्माण झाले. आज ही चुकीच्या इतिहासामुळे आपण अजूनही एकात्म होऊ शकलो नाही; परंतु औरंगजेबाच्या दरबारातील खाफीखान याने संभाजीराजांबद्दल केलेले वर्णन जेव्हा उजेडात आले त्यानंतर मात्र आमचे डोळे उघडले. खाफीखानाने संभाजीराजांचे वर्णन `सत्तेची नशा चढलेला राजा' असे केले; पण ग्रँड डफ याने या वाक्याचा `ध' चा `मा' केला व `दारूची नशा चढलेला राजा' असे केल्याने `संभाजी म्हणजे रंगेल' राजा असा चुकीचा इतिहास आम्हाला शिकावा लागला.

*औरंगजेबाला २७ वर्षे झुंजवलं*
धर्मवीर संभाजीराजे ! महाराष्ट्राचा तेजस्वी आणि प्रेरणादायी इतिहास दुर्दैवाने गोर्‍या कातडीच्या इंग्रजांनी कलंकित करण्याचा प्रयत्‍न केला आणि त्यामुळे समाजाची बराच काळपर्यंत दिशाभूल झाली होती. श्री छत्रपती संभाजी महाराज हे अत्यंत तेजस्वी आणि महापराक्रमी प्रजापालक होते. औरंगजेबाला २७ वर्षे उत्तर हिंदुस्थानापासून दूर ठेवणारे संभाजीराजे संभाजीराजांनी जी अलौकिक कामे त्यांच्या अल्पायुष्यात केली, त्याचा दूरगामी परिणाम संपूर्ण हिंदुस्थानावर झाला. त्यामुळे त्यांच्याविषयी प्रत्येक हिंदु बांधवाने कृतज्ञ राहिले पाहिजे. त्यांनी औरंगजेबाच्या आठ लाख सैन्याला न डगमगता तोंड दिले आणि कित्येक मोगल सरदारांना लढाईत पराभूत करून त्यांना पळता भूई थोडी केली. त्यामुळे औरंगजेब दीर्घकाळ महाराष्ट्रात लढत राहिला आणि संपूर्ण उत्तर हिंदुस्थान त्याच्या दडपणापासून मुक्‍त राहिला. ही संभाजीराजांची सगळयात मोठी कामगिरी म्हणावी लागेल. त्यांनी औरंगजेबाबरोबर तह केला असता, त्याचे मांडलिकत्व स्वीकारले असते, तर तो दोन-तीन वर्षांत पुन्हा उत्तरेत गेला असता; परंतु संभाजीराजांच्या संघर्षामुळे २७ वर्षे औरंगजेब दक्षिणेत अडकून राहिला आणि त्यामुळे उत्तरेत बुंदेलखंड, पंजाब आणि राजस्थान या ठिकाणी हिंदूंच्या नवीन सत्ता उदयाला येऊन हिंदु समाजाला सुरक्षितता लाभली.

*फितुरीने महाराजांचा घात केला*
संभाजीराजांच्या सामर्थ्याची पोर्तुगिजांना भीती संभाजीराजांनी गोव्यावर आक्रमण करून धर्मवेड्या पोर्तुगिजांना नमवले. त्यांच्याशी तह करून त्यांना बांधून टाकले. गोव्यातील पोर्तुगिजांच्या धर्मप्रसाराला संभाजीराजांनी पायबंद घातला, त्यामुळे गोवा प्रदेशातील हिंदूंचे रक्षण झाले, हे विसरणे अशक्य आहे. पोर्तुगीज संभाजीराजांना प्रचंड भीत असत. त्यांनी इंग्रजांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे, ``सध्याच्या परिस्थितीत संभाजी महाराज हेच सर्वशक्‍तीमान आहेत, असा आमचा अनुभव आहे !'' शत्रूचे हे प्रमाणपत्र महाराजांच्या सामर्थ्याविषयी कल्पना देणारे आहे. संभाजीराजांचा जाज्वल्य धर्माभिमान ! संभाजीराजांच्या बलीदानाचा इतिहास लोकांना नीट माहीत नाही. १ फेब्रुवारी १६८९ या दिवशी सख्खा मेहुणा गणोजी शिर्के याच्या फितुरीमुळे संगमेश्वर या ठिकाणी संभाजीराजे काही वतनदारांची गाऱ्हाणी ऐकत असतांना पकडले गेले. आमचा पराभव करण्याची ताकद आज जगातील कोणत्याही शक्‍तीला नाही. आमचा पराभव आमच्यातील गद्दार फितूर मंडळींमुळेच झाला, या फितुरीमुळे शेवटी सिंहाचा छावा शत्रूच्या हाती गवसला. जंग जंग पछाडूनसुद्धा सतत ९ वर्षे सात लाख सेनेच्या हाती जो सापडला नाही, बादशहाला ज्याने कधी स्वस्थता लाभू दिली नाही, असा पराक्रमी योद्धा स्वकियांच्या बेईमानीमुळे मोगलांच्या जाळयात अडकला.

*गवताला भाले फुटले*
संभाजीराजांच्या बलीदानानंतर महाराष्ट्रात क्रांती घडली संभाजीराजांच्या या बलीदानामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आणि पापी औरंग्याबरोबर मराठ्यांचा निर्णायक संघर्ष सुरू झाला. `गवताला भाले फुटले आणि घराघरांचे किल्ले झाले, घराघरातील माता-भगिनी आपल्या मर्दाला राजाच्या हत्येचा सूड घ्यायला सांगू लागल्या', असे त्या काळाचे सार्थ वर्णन आहे. संभाजी महाराजांच्या बलीदानामुळे मराठ्यांचा स्वाभिमान पुन्हा जागा झाला, ही तीनशे वर्षांपूर्वीच्या राष्ट्रजीवनातील अतिशय महत्त्वाची बाब ठरली. यामुळे इतिहासाला कलाटणी मिळाली. जनतेच्या पाठिंब्यामुळे मराठ्यांचे सैन्य वाढत गेले आणि सैन्याची संख्या दोन लाखांपर्यंत पोहोचली. जागोजागी मोगलांना प्रखर विरोध सुरू झाला आणि अखेर महाराष्ट्रातच २७ वर्षांच्या निष्फळ युद्धानंतर औरंगजेबाचा अंत झाला आणि मोगलांच्या सत्तेला उतरती कळा लागून हिंदूंच्या शक्‍तीशाली साम्राज्याचा उदय झाला. २७ वर्षे औरंगजेबाच्या पाशवी आक्रमणाविरुद्ध मराठ्यांनी केलेल्या संघर्षात हंबीरराव, संताजी, धनाजी असे अनेक युद्धनेते होते; परंतु या लढ्याला कलाटणी मिळाली ती संभाजीराजांच्या बलीदानातून झालेल्या जागृतीमुळेच. " श्री शिवरायांच्या अकाली मृत्यूनंतर नऊ वर्षे संभाजीराजांनी औरंगजेबाच्या टोळधाडीपासून हिंदवी स्वराज्याचे संरक्षण आणि संवर्धन केले. फितुरीमुळे शत्रूच्या तावडीत सापडलेल्या राजांनी मृत्यू स्वीकारला; परंतु स्वधर्म आणि स्वाभिमान सोडला नाही ! त्यांच्या बलीदानामुळे मराठे पेटले आणि मोगल हटले ! हा महाराष्ट्राच्या विजयाचा ज्वलंत इतिहास आहे."

*शंभुराजांवर इतका राग का?*
त्या दिवशी बोलता बोलता शिवाजी महाराजांचा विषय निघाला आणि त्यांच्यापैकी एक तरुण म्हणाला की , ' शिवाजीने जितके केले , ते सगळे संभाजीने फुकट घालवले. आज हि भरपूर जणांना इतकीच माहिती आहे की , संभाजी महाराज म्हणजे विलासी आणि गाण्या-बजावण्यात मश्गुल राहणारे होते. आणि त्यांना जेव्हा औरंगजेबाने पकडले तेव्हा त्यांचा अमानुष छळ केला.' बस्स आणखी काही माहिती नाही. मी त्यांना म्हणालो, "पण कुणी हा विचार करतो का की , ज्या शिवाजी महाराजांना औरंगजेबाने पकडल्यावर फक्त कैद करून ठेवले , तिकडे संभाजी महाराजांचे इतके हाल करायचे कारण काय ? असे काय घडले होते , की औरंगजेब इतका दुखावला होता ? महाराजांनी औरंगजेबाची सुरत दोन वेळा लुटली, ह्यामुळे औरंगजेबाने केला नसेल इतका राग आजही काही गुजराती माणसे महाराजांचा करतात. त्याच्या मामाची म्हणजे शाहिस्तेखानाची बोटे कापली. पण त्याचा बदला म्हणून देखील औरंगजेब महाराजांचे बोट वाकडे करू शकला नाही , मग नेमके संभाजी महाराजांनी असे काय केले होते की , त्यांच्याबद्दल औरंगजेबाच्या मनात इतका राग होता?" ते दोघे निरुत्तर होते

*हजरजबाबी शंभूराजे*
'काही गोष्टी आपण विसरतो त्या म्हणजे महाराजांचे बालपण हे जिजाऊंच्या देखरेखी खाली गेले तर संभाजी महाराजांची आई , सईबाई ह्या संभाजीच्या लहानपणीच वारल्या होत्या. जिजाऊ होत्या तो काळ संभाजी महाराजांच्या आयुष्यातला चांगला कालावधी आहे. पण तरी शिवाजी महाराजांना जेव्हढा जिजाऊंचा सहवास लाभला तेव्हढा संभाजीमहाराजांना लाभला नाही. शिवाय वेळ प्रसंगी आई जेवढी कठोर होवू शकते तेवढी आजी होत नाही , हे उदाहरण आपण आपल्या घरात देखील बघू शकतो. शिवाजी महाराज हे सरदार पुत्र होते तर संभाजी महाराज हे युवराज होते , त्यामुळे त्यांच्या वृत्तीत फरक हा असणारच. दिसायला ते राजबिंडे होते. उंची ६ फुट ३ इंच होती. धाडसी आणि हजरजबाबी होते. त्यांच्या हजरजबाबी आणि रोखठोक बोलण्यामुळेच त्यांना स्वराज्यात देखील बरेच शत्रू निर्माण झाले होते. त्यांच्या हजरजबाबीपणाचा एक किस्सा म्हणजे जेव्हा शिवाजी महाराजांनी मिर्झाराजे जयसिंग सोबत तह केला तेव्हा , तहाची पूर्तता होत नाही तोवर मिर्झाराज्यांनी शंभूबाळाला वज्रगडावर ओलीस ठेवले होते. तहाची पूर्तता झाल्यावर जेव्हा शंभूराजे परत निघाले तेव्हा दिलेलखानाने त्यांना एक हत्ती भेट म्हणून दिला आणि विचारले कि , ' इतका मोठा हत्ती तुम्ही दक्खनला कसा काय घेवून जाणार ?' तेव्हा शंभूराजे म्हणाले की , 'हत्ती तर आम्ही कसा ही घेऊन जाऊ , पण आमच्या आबासाहेबांनी जे किल्ले दिले आहेत ते परत कसे नेता येतील ह्याचा आम्ही विचार करतो आहोत.' दिलेलखान तर सोडा पण हे असले फटके संभाजी महाराजांनी वेळोवेळी औरंजेबाला सुद्धा लगावलेले आहेत.

*अकबराला शंभूराजांचा आसरा*
औरंगजेबाचा चौथा मुलगा अकबर ह्याने जेव्हा औरंगजेबा विरुद्ध बंड केले तेव्हा त्याला संभाजी महाराजांनी आसरा दिला होता. आणि त्या दरम्यान त्यांनी अकबराची बहिण झीनत हिला एक पत्र लिहिले होते, जे औरंगजेबाच्या माणसांच्या हाती लागले आणि ते भर दरबारात औरंगजेबाला वाचून दाखवले गेले होते. ते पत्र असे होते, ' तुमचे बंधू शहजादे अकबर यांनी हिंदुस्तान सोडण्यापूर्वी आम्हाला तुमच्या बद्दल सांगितलं. तुम्ही त्यांना पत्र पाठवलं होतं. त्याचा जबाब त्यांनी तुम्हाला परत पाठवला नव्हता. तो निरोप त्यांनी जाताना आमच्याकडे देवून ठेवला आहे तो असा : बादशहा सलामत हे नुसते मुसलमानांचे बादशहा नाहीत . हिंदुस्तान रयत वेगवेगळ्या धर्माची आहे . त्या साऱ्यांचेच हजरत बादशहा आहेत . जी गोष्ट मनात ठेवून ते या दक्खनच्या पठारावर आले ती आता साध्य झाली आहे . त्यात समाधान मानून त्यांनी आता हिंदुस्तानांत परत कूच करावं . एकदा त्यांच्या तावडीतून आम्ही आणि आमचे तीर्थरूप सुखरूप सुटून आलो आहोत . पण बादशहा अशीच आपली जिद्द चालवणार असतील तर आमच्या पकडीतून मात्र ते सुटून परत हिंदुस्तानात जाणार नाहीत . त्यांची तशीच इच्छा असेल तर त्यांनी आपल्या कबरीसाठी या दक्खनमध्ये लवकरच जागा शोधलेली बरी .’ [संदर्भ:शहेनशहा , ना.स.इनामदार]

*घरातील बेबनावाचा फटका*
युवराज असून देखील दुर्दैवाने त्यांना योग्य तो मानमरातब मिळाला नाही. घरातील बेबनावांमुळे शिवाजी महाराजांनी त्यांना स्वतःसोबत कर्नाटकच्या मोहिमेवर न घेता , श्रीरंगपुरला सुभेदार म्हणून धाडले. श्रीरंगपुर संभाजी महाराजांची सासुरवाडी होती. कर्नाटकच्या मोहिमेवरून परतत असताना महाराजांच्या स्वागतासाठी संभाजी महाराज श्रीरंगपुरच्या वेशीवर उभे होते पण शिवाजी महाराज पन्हाळा , सातारा , महाबळेश्वर मार्गे रायगडावर परतले. सगळ्या प्रजे समोर संभाजी महाराजांचा केव्हढा मोठा अपमान झाला असेल? मानसिंगाच्या पाठीमागे उभं केल्यावर ज्या राजाला अपमानित वाटलं आणि भर दरबारात महाराजांचा आवाज चढला. बापाचा स्वाभिमान जवळून पाहिलेल्या त्यांच्या मुलाने असा अपमान झाल्यावर बंड केले नसते तरच नवल.

*चौकट*
*सारे पराक्रमी अल्पायुषी*
मराठेशाहीचे दुर्दैव हे कि संभाजी महाराज (वय वर्ष ३२) , विश्वासराव पेशवा (वय वर्ष १६) माधवराव पेशवा (वय वर्ष २७) हे मराठ्यांचे पराक्रमी फारच अल्पायुषी होते. वयाच्या ३२व्या वर्षी औरंगजेबा समोर गुडघे न टेकता मातृभूमीसाठी मरणाला बहाद्दुरीने मिठी मारणाऱ्या राजाबद्धल जेव्हा , ''शिवाजीने जितके केले, ते सगळे शंभूराजांनी वाया घालविले....... '' असं बोलून अक्कल पाजळतो तेव्हा साहजिकच चीड येते.

*महापराक्रमी शंभूराजे*
जगातील पहिले बुलेट प्रुफ जॅकेट युद्ध भूमीवरील गरज लक्षात घेऊन फक्त एका महिन्यात तयार करणारा, जगातील पहिला तरंगता तोफखाना तयार करणारा जंजिरा जिंकण्यासाठी उसळत्या सागरात आठशे मीटरचा सेतू बांधणारा, आदिलशाही, कुतुबशाहीची एकजूट करणारा आणि त्याचवेळी सिद्धी, पोर्तुगीज व इंग्रजांना त्यांच्या बिळात कोंडून ठेवणारा, त्याच वेळी मोघलांचा कर्दनकाळ ठरलेला, दुष्काळ ग्रस्त गावांना कायमस्वरूपी पाणी मिळावे म्हणून डोंगर पोखरून जल नियोजनकरणारा उत्तरप्रदेशापासून दूर तामिळनाडू कर्नाटक आणि राजस्थान प्रांतातील लोकांनाही स्वराज्यासाठी एकत्र करणारा,इतर धर्मांचा मान सन्मान राखणारा, धर्मांतरावर कायदेशीर बंदी घालणारा, बाल मजुरी व वेठबिगारी विरुद्धकायदा करणारा, शिवप्रभूंची इच्छा पूर्ण करण्यासाठी राज्याभिषेक झाल्यावर पंधराव्या दिवशीच दूर मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूरवर छापा घालणारा, स्वराज्याला आर्थिक संपन्न ठेवणारा, देहू ते पंढरपूर आषाढीवारीला संरक्षण व अर्थ पुरवठा करणारा, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शेतीसाठी पीक कर्ज योजना राबविणारा, सैनिकांच्या उत्पन्नाला इतर मार्गाने हातभार लागावा म्हणून चरईची सवलत कायम ठेवणारा, आपले आरमार सुसज्ज करण्यासाठी परदेशातुन तंत्रज्ञान व प्रशिक्षित लोकांचे सहकार्य घेणारा, स्वतःचे आधुनिक बारुदखाने तयार करून स्वदेशीचा महामंत्र देणारा खरा संभाजी....

*आरमारांची उभारणी*
पहिला तरंगता तोफखाना संभाजी राज्यांनीच बनवला.
“ज्याचे समुद्रावर अधिपत्य असेल तोच या भारताचे स्वातंत्र्य अबाधित राखू शकेल“, हे शिवाजी महाराजांचे विचार होते.आणि याच विचारांचे पालन करीत संभाजी महाराजांनी महाड, जैतापूर, कल्याण, राजापूर या ४ नवीन ठिकाणी आरमाराची केंद्रे उभी केली.जहाज बांधणीचे काम सुरु केले.पाण्यावरचा पहिला तरंगता तोफखाना संभाजी राज्यांनीच बनवला.

*रुद्रासारखे वर्तावे*
छत्रपति शिवाजी महाराज, संभाजी राजांना म्हणतात, “त्या रुद्र-शंकरास देवदेवतांच्या कल्याणासाठी विष पचविणे पडले. त्याचा कंठ काळानिळा पडला. पण देवदेवतांचे गळे सलामत राहिले. या श्रींच्या राज्यासाठी, या मावळ माणसांच्यासाठी तुम्हा-आम्हासहीअसे विष पचवावे लागेल. रुद्राने ते एकदा केल. तुम्हां-आम्हाला ते प्रसंग पडला तर कैकवेळा करावे लागेल. पंडित शिकवण देतात, ‘राजा हा विष्णूचा अंश आहे’. पण त्यांना ठाव नसते की राजा हा प्रथम शंकराचा अंश असतो आणि मग असलाच तर विष्णूचा. आम्ही त्यासाठीच ‘शिवलिंग’ पुजतो.
शंभुराजे, रुद्राने रुद्रासारखेच राहावे...रुद्रासारखेच वर्तावे...!.”संदर्भ - छावा (शिवाजी सावंत )

*शिवाजीराजांनीच छंद जोपासला*
छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ हा थोडा दगदगीचा होता. वयाच्या सातव्या वर्षीच शिवाजीराजांवर मराठ्यांचा संसार उभारण्याची आणि सांभाळण्याची जबाबदारी येऊन पडली. ती शेवटपर्यंत कमी झाली नाही. कदाचित यामुळे महाराजांना स्वतःतील साहित्यिक व्यक्त करायला अवधी मिळाला नसावा. खरं तर शिवाजी महाराजही नामवंत कवी होते. त्यांचे फारसी आणि मराठीतील काव्य परदेशातील काही ठिकाणी असल्याचं इतिहास संशोधक सांगतात. त्यापूर्वी महाराष्ट्रापासून तंजावरपर्यंत साहित्य, कला, सांस्कृतिक बाबींना मराठा राजांनी सतत राजाश्रय दिला आहे. स्वतः शहाजीराजे लोककलेला उत्तेजन द्यायचे. या साऱ्या पार्श्वभूमीवर शिवाजी महाराजांनी २६ जानेवारी १६७१ मध्ये शंभूराजांना स्वतंत्र राज्यकारभार सोपवितानाच विविध भाषापंडित त्यांच्या दिमतीला ठेवले होते. शंभूराजांची रसिकता आणि साहित्यछंद ज्ञात होता त्यांचा तो छंद जोपासला जावा यासाठी त्यांनी सतत प्रोत्साहन दिलं होतं.

*आग्र्यातील वास्तव्याचा प्रभाव*
संभाजीराजे आग्ऱ्यास गेले होते तेव्हा ते नऊ वर्षाचे होते. त्यांना संस्कृत, फारसी, हिंदी, मराठी, अशा अनेक भाषा ज्ञात होत्या. शंभूराजे आग्रा, मथुरा, वाराणसी, अलाहाबाद अशा गंगा यमुनेच्या परिसरात सुमारे दोन वर्षे वावरत होते. त्याचवेळी त्यांना कनौजी ब्राह्मण असलेल्या कवी कलश हे हरहुन्नरी ब्रजभाषी कवी भेटले. शंभुराजे बुद्धिमान होतेच, त्यांनी विविध भाषा, साहित्याबरोबरच लोकसंगीताचा छंद जोपासला. त्यातूनच त्या कोवळ्या वयात शंभुराजांना मथुरेच्या, वृंदावनाच्या, गोपालांच्या, गवळणींच्या, भक्तांच्या सहवासातून श्रीकृष्ण-राधा भक्तीगीते पाठ झाली असावीत.

*राजांनी शंभूराजांचे दिवस घातले*
अंगावर शहारा येतो..केवढी कठीण साधना..औरंग्याचा पोलादी पिंजरा तोडुन महाराज राजगडावर परतले तेंव्हा नऊ वर्षाच्या कोवळ्या शंभुराजांना त्यांनी उत्तरेतच ठेवले..आणि शत्रुला हुल देण्यासाठी अफवा उठवली शंभुराजे गेले..एवढ्यावरच थांबले नाहीत तर राजगडावर त्या लेकराचे दिवस सुधा घातले..काय झालं असेल एका पित्याच्या काळजाचं जेंव्हा जिवंत असलेल्या आपल्या गोजीरवाण्या बाळाच्या पिंडाला कावळा शिवताना महाराज बघत असतील..जणु महाराजांना आधीच कळले होते..या माझ्या रुद्रप्रतापी शंभुराजाच्या नशीबात त्याच्या बलीदानानंतर हे कुठलेच विधी नाहीत..ही राज्यसाधना..हा त्याग..हा महायोग..काय लिहावे पुढे...!

धन्य ते शिवराय...!

 मराठी माणसानं एकदा तरी रायगड चढायलाच हवा. रायगड ही महाराष्ट्राची शान आहे. मराठ्यांची ती ताठ मान आहे. मराठ्यांचा राजा या रायगडावर छत्रपती झाला. शिवरायांनी रायगडावर राज्याभिषेक का करून घेतला याबद्धल असं म्हणतात की, मानवी रक्त न सांडलेल्या भूमीवर आपला राज्याभिषेक व्हावा अशी महाराजांची इच्छा होती. ती राज्याभिषेकासाठी निवडली. कन्नड कवी लिंगप्पा याने इ.स. १७७० मध्ये लिहिलेल्या 'केळदिनृपविजयम' मध्ये 'भूतलात आश्चर्यकारक म्हणून गणली जाणारी रायरी' असं रायगडाचं वर्णन केलंय.

*राजधानी रायगड*
रायगड तुटलेल्या कड्यांमुळे सह्याद्रीच्या रांगांपासून अलग वाटतो. पण जणू सह्याद्रीच्या रांगा रायगडाला वेढून उभ्या आहेत. असंही वाटतं. स्वराज्याचं तोरण जिथं शिवरायांनी व बांधलं तो तोरणा रायगडाच्या पूर्वेस वीस मैलावर असून रायगडाहून हजार फूट अधिक उंच आहे. या तोरण्यावरून रायगडचं फारच सुंदर, स्पष्ट दर्शन होतो. पुणे, मुंबई, सातारा रायगडपासून सारख्या अंतरावर आहेत. शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोऱ्यांचा पाडाव करून हा रायरी किल्ला ताब्यात घेतला. आणि त्याला रायगड नाव देऊन स्वराज्याची राजधानी बनवलं.

*मोठेपणाची जाणीवच नाही*
छत्रपती महाराष्ट्रात झाले हे महाराष्ट्राचं भाग्य आणि छत्रपतींचे दुर्भाग्य! असं अनेकदा वाटतं. छत्रपतींच्या मोठेपणाची अजूनही आम्हाला पुरती जाणीव झालेली नाही. छत्रपतींचे मोठेपण आम्ही नीट अभ्यासलेही नाही. बाबासाहेब पुरंदरे, रणजित देसाई यांनी लिहलेल्या छत्रपतींच्या कादंबऱ्या आहेत. पण एक राष्ट्रपुरुष म्हणून ज्या तऱ्हेनं छत्रपती सादर व्हायला हवेत तसे अजूनही सादर झालेलं नाहीत. दत्तो वामन पोतदार आणि त्याही आधी त्र्यं. शं. शेजवळकर महाराजांचं चरित्र लिहिणार होते. दुर्दैवानं ते लिहिण्याआधीच पोतदार, शेजवळकर गेले. शेजवळकर यांनी त्यांच्या संकल्पित शिवचरित्राची प्रस्तावना लिहिली आहे. आणि ती प्रस्तावना त्यांनी केलेल्या आराखड्यासह आणि जमलेल्या साधनांसह 'मराठा मंदिर'ने ते प्रसिद्ध केलीय. १९६४ साली छापलेल्या या ६४० पानांच्या ग्रंथाची किंमत फक्त ३० रुपये आहे. आणि या ग्रंथात जे आहे त्याचे मोल अफाट आहे. शिवाजी महाराजांचे मोठेपण शेजवळकर निश्चितपणे सिद्ध करू शकले असते.

*मेहेंदळे यांचं शिवचरित्र*
प्रत्येक प्रसंग, प्रत्येक नोंद, प्रत्येक दंतकथा याचा अभ्यास करून शुद्ध सत्य पारखून घेऊन शिवाजी साकारण्याचा शेजवळकरांचा प्रयत्न होता. गजानन भास्कर मेहंदळे यांनी असाच महत्वाकांक्षी आणि महत्वाचा प्रयत्न चालवलाय. 'श्री राजा शिवछत्रपती' या ग्रंथाचा खंड-१, भाग-१, त्यांनी स्वतःच प्रसिद्ध केलाय. त्याची पानं आहेत १०८० आणि फक्त अफझलखान वधापर्यंतच  शिवचरित्राचा मागोवा त्यात आहे. चरित्र म्हणजे कथा,कादंबरी नव्हे. याची जाणीव ठेवून हा प्रयत्न मेहंदळे यांनी केलाय आणि स्तुतिस्तोत्राचे स्वरूप या ग्रंथाला येऊ नये याची दक्षता ते घेत आहेत. पण त्यांचे हे चरित्र पुरे होईल याची खात्री नाही. जेम्स लेन प्रकरण उदभवलं त्याचा परिणाम त्यांच्यावर झाला. या आघाताच्यावेळी त्यांनी लिहिलेल्या दुसऱ्या खंडाची पाने त्यांनी फाडून टाकली होती आणि आता आपण शिवचरित्र लिहिणार नाही, असं त्यांनी त्रासून, चिडून म्हटलं होतं. 'केवलं सुसंगती म्हणजे सत्य नव्हे' अशी खात्री झाल्यानं विश्वसनीय साधनांतून जास्तीत जास्त तपशील वेचून काढून शिवचरित्र लिहायचे व्रत मेहंदळे चालवत आहेत. पहिल्या खंडाचं लेखन त्यांनी पुरे केले आहे. दोन खंड लिहायचे आहेत. पहिल्या खंडातला अर्धाभाग छापलाय. त्यासाठी मेहंदळे यांनी जीवाचा जसा आटापिटा केलाय हे एकदा या खंडाच्या प्रस्तावनेत वाचलं तर लक्षात येईल.

*देशी विदेशी भाषेत शिवचरित्र हवे*
महाराजांचे भव्यदिव्य स्मारक करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करायला सरकार तयार आहे. उद्यान, पुतळा, संग्रहालय अगदी समुद्रातही पुतळा अशा कल्पनाभोवतीच स्मारक फिरते आहे. छत्रपतींचे विश्वसनीय समग्र चरित्र, त्यांचे मोठेपण सिद्ध करणारे, विविध पैलूंवर प्रकाश पाडणारे ग्रंथ निव्वळ मराठी भाषेत नव्हेत, अन्य भारतीय आणि मुख्य आंतरराष्ट्रीय भाषेत करण्याची आमची कुवतच दिसत नाही. साहित्य संमेलनावर एक कोटी रुपये खर्च करायला आम्ही तयार! मात्र छत्रपती शिवरायांमुळे आम्ही हिंदू म्हणून शिल्लक राहिलो त्यांचे चरित्र निघावं म्हणून कुणी 'महाकोश' उभारायला मात्र तयार नाही. शिवरायांचे गडकोटकिल्ले आज भग्नावस्थेत आहेत तिकडं कुणाचं लक्ष देत नाही.

*आमच्याकडं दानतच नाही*
मुंबईचा विमानतळ आता महाराजांच्या नावानं पावन झालाय. पण या विमानतळावरून  येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना महाराजांचं मोठेपण सांगणारी छोटी छोटी विविध भाषेतली  तोंडओळख पत्रके काढायचं कुणाला सुचणार नाही. आपल्या माणसाला मोठं करायची आमची दानतच नाही. आणि मोठ्या माणसाचं मोठेपण ओळखण्याची आमची कुवत नाही. असं म्हणायचं का? शिवाजी महाराज कसे होते, याचा अनेकांगाने शोध घेता येतो, ते सांगणारं एक कवन आहे, ते असे
गेला भोक्ता गडांचा हयगजपतीचा
आणि त्या भूपतींचा।
शुरांचा सज्जनांचा ऋषीजनमुनींचा
आणि त्या देवतांचा।
भक्तांचा पंडितांचा चतुर सुमतीचा
साबड्या भाविकांचा।
नाना विद्याकवींचा कुशल जगतीचा
बोलक्या नेमकांचा।
या प्रत्येक गोष्टीचा विस्तार केला तर एक ग्रंथ ' शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व साकार करणारा ' होईल की नाही!

*रामदासांचा शब्द जाळ*
शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा निर्धार केला त्याआधी देशस्थिती काय होती, याच विदारक चित्र रामदासांनी उभं केलंय. काव्यात शब्दाची मर्यादा सांभाळीत केलेल्या वर्णनानेसुद्धा मन कासावीस व्हावं एवढा अनाचार, अत्याचार त्याकाळी माजल्याचं वर्णनातून स्पष्ट होतं. कल्पांत या एकाच शब्दाने समर्थांनी ती दारुण परिस्थिती दर्शविलीय.
किती येक मृत्यासि ते योग्य जाले
किती येक देश त्यागूनि गेले।
किती येक ग्रामेचि ती वोस झाली
पिके सर्व धान्येचि नाना बुडाली।
किती येक धाडीवरी धाडी येती
तया सैनिकाचेनि संहार होती।
किती येक ते घ्राणकर्पेचि घेती
किती उत्तमा त्या स्त्रिया भ्रष्टविती।
शब्दाशब्दातून नुसता दुःखाचा जाळ भरलाय.

*विदेशीचं परिस्थितीचं चित्रण*
इंग्रजांच्या 'ईस्ट इंडिया कंपनी'च्या पीटर मुंड नांवाचा इंग्रजी नोकराने आपल्या रोजनिशीत लिहिलेल्या नोंदीची माहिती अशी आहे. हा पीटर मुंड लिहितो, 'एक दिवस फुरसत मिळाल्याने मी हवा खायला बाहेर पडलो, तेव्हा शहराच्या एकाबाजूला कित्येक मिनार उभारलेले दिसले. त्यांच्या भोवती अनेक लोकांची मुंडकी चुन्यात बसवलेली होती.' मानूची यानेही प्रवासात रस्त्याच्या कडेला अनेक ताजी मुंडकी पडलेली दिसल्याचा, झाडांना प्रेते टांगलेली असल्याचा  आणि रस्त्यावर मुंडक्यांचे मिनार बघितल्याचे लिहून ठेवले आहे. अशाप्रकारे मारण्यात आलेल्यांना चोर, वाटमारे म्हटलं जायचं. पण मोगलांनी ज्यांची घरदार लुटली, गावं उठविली, असे हे दुर्दैवी  भारतीय-हिंदू असायचे. मोगलांच्या या क्रूर जुलमी सत्तेला शिवरायांनीच टक्कर दिली. शिवरायांनीच हिंदू आणि हिंदुस्थान शिल्लक ठेवले.

अखेर राज 'लवंड'ले.....!

"परिस्थिती माणसाला शहाणं बनवतं, पण कधी कधी  आपली बुद्धी, शहाणपण, विचार, आचार आणि स्वाभिमान गहाण टाकायलाही भाग पाडतं. अशीच अ...