Tuesday 31 October 2017

फसनविस सरकारची तीन वर्षे!

*'फसनविस' सरकारची तीन वर्षे*

*दि*वाळी....! सणासुदीचे दिवस पूर्वीच्या काळी ती मोठ्या उत्साहानं साजरी होई. आज मात्र त्याची चाहुलदेखील नकोशी झालीय. शेतकरी नागवलाय, उद्योग अडचणीत आलेत, व्यापार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळतेय. अशावेळी समाजातील सर्व घटकांना सांभाळणारा, काळजी वाहणारा राज्यकर्ता, *जाणता राजा* कुठे दिसतच नाही. सगळीकडे बेफिकिरी, बेपर्वाई अराजक सदृश्यस्थिती जाणवू लागली आहे. एकीकडे रयतेच्या हातात पैसा येईनासा झालाय तर दुसरीकडे त्याच्या हातातला पैसा हिसकावण्यासाठी सरकार सरसावले आहे. आजवर आस्मानी संकटांना पुरून उरलेली रयत आता सुलतानी संकटाशी झुंजते आहे. राजकीय फटाक्यांच्या दारुकामात  इथल्या रयतेकडं मात्र कुणाचं लक्षच नाही. ती मरणासक्त झालीय, राज्यकर्त्यांकडून तिला सहाय्य मिळावं तिला जगण्याची ताकद मिळावी असं वाटतं पण ती मानसिकता कोणत्याच राजकारणात दिसतच नाही. सगळेच सत्तेच्या वाटमारीत मदमस्त आहेत! शेतकरी, शेतमजूर, उद्योजक, कारखानदार, व्यावसायिक, व्यापारी, कामगार नोकरदार सारेच अस्वस्थ आहेत. हवालदिल झाले आहेत. त्यांना कुणीच वाली राहिलेला नाही. ही अस्वस्थता,उद्विग्नता वाढली तर वैफल्यग्रस्त लोक काय करतील हे सांगता येत नाही अशी भयावह स्थिती निर्माण झालीय

*मांड ठोकल्याचे दिसत नाही*
सध्या सरकारच्या तृतीय वर्षपूर्ती निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुलाखती सर्वच दैनिकात आणि न्यूज चॅनल्सवर प्रसिद्ध होत आहेत. मुलाखती घेणारे अनेकजण असले तरी मुलाखत देणारे मात्र एकच जण! विचारले जाणारे प्रश्न तेच जणू कॉपीपेस्ट ! त्या साऱ्यांची उत्तरे न थकता,न कंटाळता उडवाउडवीची वा थातुरमातूर उत्तरे न देता ज्या तडफदारपणे देवेंद्र फडणवीस यांनी या मुलाखती गेल्या काही दिवसात दिल्या आहेत ते पाहता त्यांच्यातला विरोधीपक्ष अद्याप शिल्लक असल्याचं जाणवतं. अद्यापी आपण शासक आहोत. आपण ठरवू ते व्हायलाच हवं असा आग्रह, असा दबाव वा वेगळ्या भाषेत सांगायचं तर राज्याचा प्रमुख म्हणून असलेली प्रशासकीय दहशत यांच्यात दिसत नाही. अधिकाऱ्यांच्या कुबड्या घेऊनच राज्य शकट हाकला जातोय. त्यामुळं लोकाभिमुख राज्यकारभार होताना दिसत नाही. अधिकाऱ्यांच्या क्लिष्ट आणि अगम्य कारभारातच मराठी माणूस गुरफटलेला आहे. शिवरायांचा आशीर्वादानं राज्यकारभार करायचा असं त्यांनी म्हटलं असलं तरी तसं ते प्रत्यक्षात दिसत नाही. त्यांची पकड प्रशासनावर दिसत नाही. फडणवीसांनी मांड ठोकलीय असं जाणवत नाही.

*भाजपेयी सरकार मातले आहे*
राज्यात सत्ता येऊन तीन वर्षे उलटली. रयतेच्याच नव्हे तर कार्यकर्त्यांच्या पदरातही काही पडलं नाही, जे काही झिरपलं ते सारं 'आयारामां'नी गिळलं. राज्यातल्या सरकारनं आपल्या कार्यकाळातला निम्म्याहून अधिक टप्पा ओलांडलाय, काहीसा उरलाय. शिवरायांच्या शिवशाहीला साडेतीनशेहुन अधिक वर्षे उलटली पण आजही त्या राजवटीची आठवण काढली जातेय. हिंदवी स्वराज्याची स्थापना शिवरायांनी केली ती पहिली शिवशाही. आज राज्यात छत्रपती शिवरायांच्या नावाने महाराष्ट्राचा कारभार चालतो, असं मुख्यमंत्री म्हणतात. मंत्रालयाची पायरी चढल्यावर समोरच छत्रपतींचे भव्य तैलचित्र आहे. महाराजांना मुजरा करूनच प्रत्येक राज्यकर्त्यास आणि नोकरशहास पुढे जावे लागते. छत्रपतींना लवून मुजरे करणाऱ्यांनी छत्रपतींसारखे शुद्ध आचरण ठेवावे असे सामान्य जनतेस-रयतेस वाटते. शिवरायांनी आपल्या सैनिकांवर जे निर्बंध लादले होते ते शेतकरी आणि रयतेची काळजी करणारे, कदर बाळगणारे होते. सैनिकांना त्यांची सक्त ताकीद असे की, 'दाणागोटा वगैरेची व्यवस्था आम्ही पुरेशी केली आहे, मात्र तो जपून वापरीत जा. नाहीतर आहे तोपर्यंत उधळेगिरी कराल आणि मग तुटवडा पडला म्हणजे घोडी उपाशी माराल किंवा *शेतकऱ्यांना* छळाल. मग कुणी कुणब्यांकडे जातील, कोणी दाणे, कोणी भाकर, कोणी गवत, कोणी फाटे, कुणी पाते असे करू लागतील. तर जे कुणबी घर धरून जीव मात्र घेऊन राहिले आहेत तेही जाऊ लागतील. कित्येक उपाशी मरू लागतील. म्हणजे त्यांना असं होईल की, *मोगलांपेक्षा हेच लोक अधिक वाईट! असा तळतळाट होईल*' शिवाजीराजांनी त्यांच्या शिवशाहीत प्रामुख्याने कोणत्या गोष्टी केल्या ते पहा- आपल्या राज्यात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित केली, जमीनदारांचे उच्चाटन करून रयतवारी जारी केली. अष्टप्रधान संस्थापना करून राज्याला स्थैर्य व राज्यकारभाराला व्यवस्थितपणा आणला. न्यायदानाची उत्कृष्ट पद्धत घालून दिली. किल्ल्यांचा कारभार योग्यप्रकारे चालावा म्हणून नियम करून दिले. हिंदूंना आपल्या राज्यात व काही अंशी बाहेरही प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. राज्य शासनाचे सर्व व्यवहार मराठीत चालवेत म्हणून राज्यव्यवहार कोश तयार करविला. थोडक्यात असे की, शिवाजीमहाराजांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले. ते टिकविले आणि वाढविले. 'हे तो श्रींची इच्छा' असं सांगत रयतेचे राज्य म्हणून ते चालविले. ही ती शिवशाही...! आजची काय स्थिती आहे? शिवरायांच्या आशीर्वादानं आम्ही राज्य करू असं म्हणत मतांचा जोगवा मागणारे भाजपेयी सरकार मातले आहे असं वातावरण आहे.

*शिवरायांचा आदर्श कुठेय?*
काँग्रेसने महाराष्ट्रात आणि देशात साठ वर्षे वतनदारी केली. त्यांची वतनदारी जनतेनं उलथवून टाकली. तीन वर्षांपूर्वी देशात आणि अडीच वर्षांपूर्वी महाराष्ट्रात रयतेनं अशीच काँग्रेसची सत्ता उलथवून टाकली ती शिवरायांच्या नावानं! सत्तेवर आलेल्या भाजपेयींनी शिवशाहीचा आणि शिवशाहीतल्या आज्ञापत्रांचा अभ्यास करावा अशाप्रकारच्या अनेक आज्ञापत्रातून 'शिवशाही'च्या कारभाराची दिशा स्पष्ट होते. शिवरायांचे मन उघड होते. शिवरायांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं असं म्हणतात; पण त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे महाराजांनी राष्ट्र निर्माण केलं. रयतेच्या ठायी राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण केली.राजकारणातील आजचे चित्र भयावह आहे. जनतेची काळजी नसलेले राजकारण आणि सत्ताकारण सर्वच स्तरावर सुरू आहे. दिल्लीतील राजकारण्यांनी तर रयतेलाच वेठीला धरले आहे.
'रयतेच्या शेतातील भाजीच्या देठालाही धक्का लागू नये' याची काळजी घेणारी शिवशाही कुठे अन शेतकऱ्यांना संपावर जाण्याची पाळी यावी हे कशाचे द्योतक आहे?

*सत्ता कार्यकर्त्यांपर्यंत झिरपलीच नाही*
आता काय तर म्हणे सरकारच्या कारभाराची प्रसिद्धी करण्यासाठी तब्बल तीनशे कोटी रुपयांची उधळण सोशल मिडियासाठी केली जाणार आहे. ज्या सोशल मीडियानं सत्तेचा मार्ग सुकर केला त्याच तोच सोशल मीडिया आता बुमरेंगसारखं उलटतेय त्यासाठी ही तरतूद केल्याचं म्हंटलं जातंय. सरकारच्या अखत्यारीतील प्रसिद्धी आणि माहिती संचलनालय हाती असताना खासगी संस्थेला हा निधी दिला जाणार आहे. लोककल्याणकारी निर्णयांसाठी तिजोरीतील खडखडाट दाखविला जात असतानाही, स्वतःची टिमकी वाजविण्याची खमखुमी शमविण्यासाठी केली जाणारी ही उधळण कितपत योग्य आहे याचा विचार मुख्यमंत्र्यानी करावा. ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावर ही सत्ता उपभोगताहात त्या कार्यकर्त्यांच्या पदरात काय पडलंय! महामंडळ सोडा ते खूप लांब राहिलं साधं एसईओ केलं गेलेलं नाही. ही सत्ता त्यांच्यापर्यंत झिरपलीच नाही मग आगामी निवडणुकीत काय आणि कसं होईल याचाही विचार केला गेला पाहिजे.

- हरीश केंची, पुणे

Saturday 28 October 2017

एक होते जॉर्ज...!


*एक होते जॉर्ज......!*

'स्वार्थी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा!' असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. फडणविसांना नेमकं कुणावर शरसंधान साधायचं आहे, हे लोकांच्या लक्षांत आलंय. शरद पवारांचं कौतुक करताना आपण केवळ मित्रालाच टोमणे मारतोय असं नाही तर हा टोमणा आपल्याच भाजपेयीं मित्रांना कसा चपखल बसतोय याचाही अनुभव मुख्यमंत्री घेत असावेत. भारतीय जनता पक्षाला राज्यात सत्तेचा सोपान तयार करणारी शिवसेना असो वा केंद्रातील सत्ता भाजपेयींच्या हाती देणारा जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारखा बहुआयामी नेता असो भाजपेयींनी आपल्या मित्रांना नेहमीच स्वार्थ साधल्यानंतर दूर लोटलं आहे. एकाशी संसार करतानाच दुसऱ्याला डोळा घालण्याची 'भाजपेयींवृत्ती' यापूर्वी गोव्यातल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने, हिंदू महासभेने,  पंजाबातील अकाली दलानेच नव्हे तर सगळ्या मित्रांना त्यांनी अशीच वागणूक दिलीय. केंद्रात सत्ताधारी बनविणाऱ्या मित्र जॉर्ज यांना तर इतकं दूर लोटलं आहे की, ते या जगात आहेत की नाहीत एवढ्या विस्मृतीत गेले आहेत. याबाबत आपण गेल्या रविवारच्या अंकात वाचलंच आहे. आजच्या अंकात त्याचा उत्तरार्ध...!
-------------------------------------------
 *निष्ठा बदलत गेल्या*
भाजपेयींना सत्तेवर नेऊन अटलबिहारी वाजपेयींना प्रधानमंत्रीपदावर बसविताना जॉर्ज यांनी आपल्या स्वभावाप्रमाणे भाजपेयींना अंतरबाह्य बदलायला लावलं. जे विषय खास भाजपेयींची आयुध म्हणून ओळखली जात होती ती ३७० वं कलम, हिंदुत्व, समान नागरी कायदा, रामजन्मभूमी सोडून द्यावी लागली. केशरी काँग्रेस व्हायला लावलं. वैचारिक निष्ठा बदलायला लावलं. हे सारं जॉर्ज यांच्या स्वभावानुसारच होतं. ज्या स.का.पाटील वा त्यांचे नेते मोरारजी देसाई यांना जॉर्जसारख्यांनी कडवा विरोध केला, त्यांनाच त्यांच्या धोरणासकट जनता पक्षाच्या प्रयोगात त्यांना स्वीकारावं लागलं. जातीयवादी आणि भांडवलवादी हे देशाचे समान शत्रू आहेत. ते आमच्यापासून समान अंतरावर आहेत, असं जे अनेक साथी वा साम्यवादी म्हणत होते, त्यांनी त्यापूर्वी १९६७ मध्ये आणि त्यानंतर ,१९७८ मध्ये त्यांच्या हातात हात घालून जनसंघाला राज्यघटनेद्वारा स्थापित सत्तेची चव चाखू दिली. त्यावेळच्या जनता पक्षात इतर अनेक पक्ष आपापले अस्तित्व विसर्जित करून सामील झाले होते. मात्र जनसंघाचे सदस्य रा.स्व.संघाचेही सदस्य होते. मधु लिमये आणि जॉर्ज फर्नांडिस यांनी याच मुद्यावर जनता पक्ष फोडला. पुढे दहा वर्षांनंतर पुन्हा त्याच जनसंघीय व द्विसदस्यत्व   पॉलिसीवालीवाल्या लोकांच्या पाठींब्यावर जॉर्ज फर्नांडिस ज्या पक्षात होते, त्या जनता दलाचे सरकार सत्तेत आलं. ज्या जनता पक्षात असताना त्यांनी कोकोकोला, आयबीएम सारख्या कंपन्यांना उद्योगमंत्री या नात्यानं देशाबाहेर घालावलं होतं, त्यासारख्या हजारो कंपन्यांनी त्यानंतर लगेचच देशात धुमाकूळ घातला. त्यांना इथं रुजण्यापाडून ना जनता पक्ष रोखू शकला, ना त्यांची वाढ रोखण्यास जनता दलाला यश आलं. साथी जॉर्ज अणुबॉम्बच्या विरीधात अखंड भाषण करीत असत. 'राजस्थानच्या वाळवंटात बुद्ध हसला नव्हता; तर बुद्धाचा बाईंनी विध्वंस केला' अस ते म्हणत. मात्र त्याच जॉर्जना, दुसरी अणूुचाचणी करणाऱ्या 'भाजप आघाडीच्या सत्तेत सामील असल्यानं सामुदायिक जबाबदारीचं तत्व म्हणून ते पाप वाहावं लागलं. त्यापूर्वी सारं धर्मनिरपेक्षतेचं तत्वज्ञान त्यांनी गंगा-यमुना नदीत फेकून दिलं होतं.

*एकमेव संरक्षणमंत्री*
जॉर्ज फर्नांडिस हे एनडीए या राजकीय आघाडीचे अनेक वर्षे निमंत्रक होते. त्यापूर्वी त्यांनी कितीतरी पक्ष फोडले; स्थापन केले याची गणना नाही. सत्तेवर आल्यानंतर जॉर्ज फर्नांडिस विविध खात्याचे मंत्री राहिले. मात्र त्यांची कारकीर्द  लक्षात राहिली ती संरक्षणमंत्री म्हणून. सियाचिनच्या आघाडीवर १८ वेळा ते गेले. आजपर्यंत कोणताही संरक्षणमंत्री तिथे एवढ्यावेळा गेला नव्हता. त्यांनी या खात्याचं काम सैनिकांच्या लक्षात राहील असं केलं. मात्र विष्णू भागवंतांना अडमिरल पदावरून घालवून देण्याचं त्यांचं कृत्य हे त्यांच्या अनेक विसंगत वर्तनापैकी एक होतं. त्यानंतर तहलकाने त्यांचं बिंग फोडलं. त्यांच्या घरातून चालणारे घोटाळे बाहेर आणले. जॉर्ज यांच्या बाकी कुटुंबाचा थांगपत्ता नाही; मग ज्या जेटली या त्यांच्या कोण? आणि त्या काय म्हणून त्यांच्या घरात राहतात? अशी चर्चा-टीका स्वतःच्या हाताने कपडे धुणाऱ्या व साधं वर्तन असणाऱ्या जॉर्ज यांच्यावर त्यावेळी झाली होती. जॉर्ज त्याकाळात प्रचंड बदनाम झाले. अनेक बदमाशांची आणि बदमाशांच्या समूहाची त्यांना कळत नकळत वकिली करावी लागली. १९६० आणि १९७० च्या दशकात त्यांची जी प्रतिमा होती ती जॉर्ज यांनी स्वतःच छिन्नविच्छिन्न करून टाकली. पुढे एनडीएची सत्ता गेली. त्यांच्या समता पार्टीची सत्ता बिहारात आली. मात्र जॉर्ज यांची उपयुक्तता तोवर संपली असल्याचं त्यांच्याच चेल्याचं म्हणजे शरद यादव आणि नितीशकुमार यांचं मत बनलं. त्यांनी जॉर्जना केराच्या टोपलीतच काय ते टाकायचं बाकी होतं. ज्या मुजफ्फरपूरमधून ते सहा वेळा निवडून आले होते, तिथून त्यांच्या चेल्यांनी साधी लोकसभेची उमेदवारीही दिली नाही. एव्हाना जॉर्जना वार्धक्यानं घेरलं होतं. वय ८० च्या आसपास पोहोचलं होतं. जॉर्जच्या सुंभ जळला होता; मात्र पीळ कायम असल्यानं त्या वृत्तीनं त्यांना त्या वयात अपक्ष म्हणून लोकसभेसाठी अर्ज भरायला लावला. जॉर्ज साहेबांची तेव्हा अनामत रक्कमही राहिली नाही. त्यांना पक्षातूनही बाहेर जावं लागलं. जॉर्जच्या राजकीय नाटकाचे तिन्ही अंक संपले होते.पण ती शोकांतिका तेवढयावरच थांबली नाही. राजकीय जीवनाचे तीन अंक संपले तरी ते बाजूला जायला तयार नव्हते. त्यांनी नितीशकुमार सरकारच्या विरोधात भूमिका घेण्यासाठी, रस्त्यावर उतरण्यासाठी, आरोपांचा भडिमार करण्यासाठी नितीशकुमार यांचे विरोधक आणि पक्षातील मान्यवरांची बैठक दिल्लीत आयोजित केली. नितीशकुमारांनी आपल्या विरोधातलं हे षडयंत्र रोखण्यासाठी जालीम उपाय शोधला. त्यांनी आपल्या दूतामार्फत जॉर्ज यांना बिहारमधून निवडून दिल्या जाणाऱ्या राज्यसभेच्या जागेचे उमेदवार म्हणून नियोजित केलं. ज्या जेटलींचा जॉर्जच्या या पुनर्रप्रतिष्ठापनेला विरोध होता. मात्र तोपर्यंत जॉर्ज आपल्या चेल्याला हो म्हणाले होते. चेल्याला एका दगडात अनेक पक्षी घायाळ करायचे होते. जॉर्जचे नवे हनुमान दिग्विजयसिंग, जेटलीताई, आणि शरद यादव यांना परस्पर शह मिळाला. जॉर्ज सर्वांनाच परम आदरणीय! त्यामुळे ते बिनविरोध निवडून आले.

*असहाय जॉर्ज*
जॉर्ज यांचा आजार बळावलाय.अल्झायमरच्या सहाव्या स्टेजवर आलाय. या आजाराच्या केवळ  सात स्टेज असतात. त्यांना या आजारात भेटायला येणारे शेवटचे राजकीय नेते होते ते नितिन गडकरी! ते जेव्हा भाजपचे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले त्यावेळी. त्याला आज सात वर्षांहून अधिक काळ लोटलाय. तेव्हा जॉर्ज आणि गडकरी हे जॉर्ज यांच्या बंगल्याच्या लॉनवर काही काळ हिंडले फिरले आणि मराठीत गप्पा मारल्या. त्यानंतर आजतागायत कुणी फिरकलेच नाही. या काळात जया जेटली ह्या जॉर्जसोबत होत्या आणि त्या जॉर्ज यांची एखाद्या लहान मुलासारखी देखभाल करीत होत्या. जॉर्ज देखील आपल्या लहानमोठ्या बाबींसाठी त्यांच्यावरच अवलंबून होते. एम्स रुग्णालयातील दोन डॉक्टर्स गेली दहा वर्षांहून अधिक काळ उपचार करीत आहे.

*लैलाने घेता ताबा*
बंगलोरमध्ये जॉर्जच्या आईच्या नांवे एक प्लॉट होता. तो अशासाठी खरेदी केला होता की, निवृत्तीनंतर जॉर्ज यांनी इथं येऊन त्यानं समाजसेवा केंद्र सुरू करावं, अशी तिची इच्छा होती. जॉर्ज यांच्या भावांनी आईची इच्छा म्हणून तिच्या निधनानंतर त्या प्लॉटवरील आपला हक्क सोडला, त्यामुळे तो प्लॉट जॉर्जच्या नावे झाला. तो प्लॉट १६ कोटी रुपयाला विकला गेला, टॅक्स कापल्यानंतर १३ कोटी रुपये जॉर्जच्या खात्यात जमा झाले. जॉर्ज आता करोडपती बनले होते पण त्यांची स्मृती त्यांची साथ सोडायला सुरुवात झाली होती. मग अचानकपणे त्यांच्या पत्नी लैला कबीर या लैला फर्नांडिस बनून भारतात आल्या. त्यावेळी जॉर्ज असहाय बनले होते. हे त्यांचे सारे राजकीय मित्र जाणत होते. जॉर्जच्या घरात भांडण झालं. लैला कबीर यांचे बंधू अल्तमश कबीर सुप्रीम कोर्टात जज होते. त्यानंतर जे घडलं ते पूर्वार्धात लिहलं आहे. जॉर्जचा ताबा घेतल्यानंतर लैला कबीर यांनी जॉर्ज यांना घेऊन रामदेवबाबा यांच्या आश्रमात गेल्या. तिथं जॉर्ज काही दिवस राहिले. त्यावेळी रामदेवबाबा यांनी जॉर्ज आता बोलू शकतील असा विश्वास दिला. मग लैला कबीर यांनी जॉर्जना दिल्लीत परत आणलं आणि आपल्या घरात ठेवलं.

*लोकसंपर्क ठेवलाच नाही*
जॉर्ज यांच्यासाठी हे सारं अनोळखी होतं. ज्या दिल्लीत त्यांनी २५हून अधिक काळ काढला त्या काळात त्यांच्यासोबत असलेले लोक आता नव्हते. त्यांचा बिछाना नव्हता, त्यांची पुस्तकं नव्हती, त्यांचे संख्येसोबती पाळीव प्राणी नव्हते, इथं होत्या त्या लैला ज्यांना जॉर्ज यांनी आपल्या जीवनातून दूर केलं होतं त्या! त्यांच्यावर दहावर्षांहून अधिककाळ उपचार करणारे डॉक्टर्स बदलण्यात आले होते. आज कोण डॉक्टर उपचार करताहेत हे माहीत नाही. जॉर्जना आज कुणी भेटू शकत नाही. त्यांची मानसिक शारीरिक अवस्था काय आणि कशी आहे, ते रडताहेत की हसताहेत? हे त्यांच्या सहकाऱ्यांना वा त्यांच्या कार्यकर्त्यांना समजतच नाही. त्यांना समजतच नाही की काय करावं?

*जॉर्जवर अत्याचार ?*
हे सारं डॉक्टरांच्या सल्ल्याचा विरोधात नाही? जॉर्जवर हा अत्याचार नाही का? हा मानवाधिकाराचं उल्लंघन नाही का? जॉर्जना सोडून २५ वर्षांहून अधिक काळ अलग राहिलेल्या पत्नीचा हा बदला तर नाही? घटस्फोट न देण्याची सजा तर जॉर्जना मिळतेय का? जॉर्ज यांच्या सहकाऱ्यांना का भेटू दिलं जात नाही?

*कोर्टात जाण्याचा मित्रांचा मानस*
जॉर्ज यांचे काही सहकारी या परिस्थितीच्या विरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याच्या विचारात आहेत. पण या निमित्तानं जॉर्जच्या चारित्र्यहननाचा प्रयत्न तर सुरू होणार नाही ना!  आजीवन देशाच्या राजकारणात राहिलेला, देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाचा महत्वाचा भाग बनलेला हा नेता आज इतका असहाय झाला आहे की, त्यांचे जुने काही सहकारी सत्तेच्या ठिकाणी असतानाही जॉर्ज असहाय आणि एकटे झाले आहेत. राजकारणात जॉर्ज यांनी आपला खास असा परिवार जमवलाय, ज्यांनी कालपर्यंत त्यांना साथ दिलीय. तो परिवार आज रडतोय, व्यथित झालाय. जॉर्ज फर्नांडिस यांच्या असहाय जीवनाची ही शोकांतिका आजवर कुणी पाहिली नाही की बघितली नाही. मुलायमसिंह यादव, शरद यादव, नितीशकुमार, ब्रजभूषण तिवारी, यासह शरद पवारांसारखे अनेक मित्र समाजवादी आणि मानवाधिकारावर विश्वास ठेवणारे लोक आज गप्प का आहेत? सरकार लक्ष देत नाही आणि न्यायालयही दाद देत नाही त्यांना ह्या परिस्थितीची जाण राहिलेली नाही. ते दखल घेत नाहीत. ईश्वर, अल्लाह, आणि गॉड यांच्याकडे प्रार्थना की, शत्रुलाही जॉर्जसारखी परिस्थिती दाखवू नको. जॉर्जवर उपचार व्हायला हवेत आणि महत्वाचं म्हणजे जॉर्जना त्यांच्या सहकाऱ्यांची, मित्रांची भेट घालून द्यायला हवीय! आम्हाला विश्वास आहे की असं काही होणार नाही. ते लोकसभेचे, राज्यसभेचे सदस्यही होते, तेव्हा संसद जॉर्जसाठी काही करणार आहे की नाही?

-हरीश केंची, ९४२२३१०६०९

Saturday 14 October 2017

सत्तेच्या वाटमारीत सारेच मदमस्त!

*सत्तेच्या वाटमारीत सारेच मदमस्त!*

"दिवाळी सणात फटाके फोडण्यावर सरकार बंदी आणतेय. मात्र राजकारणातले फटाके वाजताहेत. नांदेडच्या निवडणुकीनं मृतवत होऊ घातलेल्या काँग्रेसच्या कुडीत फुंकर घातली गेलीय. भाजपेयींना अस्मान दाखवून त्यांची मस्ती उतरविलीय. मुंबईत मनसेच्या नगरसेवकांना पळवून शिवसेना सत्ताधारी की सत्ताकांक्षी हे दाखवून दिलंय. या साऱ्या राजकीय फटाक्यांच्या दारुकामात  इथल्या रयतेकडं मात्र कुणाचं लक्षच नाही. ती मरणासक्त झालीय, राज्यकर्त्यांकडून तिला सहाय्य मिळावं तिला जगण्याची ताकद मिळावी असं वाटतं पण ती मानसिकता कोणत्याच राजकारणात दिसतच नाही. सगळेच सत्तेच्या वाटमारीत मदमस्त आहेत! शेतकरी, शेतमजूर, उद्योजक, कारखानदार, व्यावसायिक, व्यापारी, कामगार नोकरदार सारेच अस्वस्थ आहेत. हवालदिल झाले आहेत. त्यांना कुणीच वाली राहिलेला नाही. ही अस्वस्थता,उद्विग्नता वाढली तर वैफल्यग्रस्त लोक काय करतील हे सांगता येत नाही अशी भयावह स्थिती निर्माण झालीय! तेव्हा राजकारण्यांनो, जरा सबुरीनं...!
--------------------------------------------


 *दि*वाळी....! सणासुदीचे दिवस पूर्वीच्या काळी ती मोठ्या उत्साहानं साजरी होई. आज मात्र त्याची चाहुलदेखील नकोशी झालीय. शेतकरी नागवलाय, उद्योग अडचणीत आलेत, व्यापार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळतेय. अशावेळी समाजातील सर्व घटकांना सांभाळणारा, काळजी वाहणारा राज्यकर्ता, *जाणता राजा* कुठे दिसतच नाही. सगळीकडे बेफिकिरी, बेपर्वाई अराजक सदृश्यस्थिती जाणवू लागली आहे. एकीकडे रयतेच्या हातात पैसा येईनासा झालाय तर दुसरीकडे त्याच्या हातातला पैसा हिसकावण्यासाठी सरकार सरसावले आहे. आजवर आस्मानी संकटांना पुरून उरलेली रयत आता सुलतानी संकटाशी झुंजते आहे.

*ही तर 'मोदी'शाही*
शिवरायांच्या आशीर्वादाची भाकणूक करीत भाजपेयी सरकार शिवसेनेच्या मदतीनं सत्तेवर आलं. शिवसेनेचा मुख्यमंत्री होता तेव्हा 'शिवशाही' अवतरली असं म्हणण्यात भाजपेयी अग्रभागी असत. आज मात्र असं म्हणण्याचं ते टाळताहेत. आजचा कारभार हा भाजप-सेनेचा असला तरी तो युतीचा कारभार समजला जात नाही. शिवरायांच्या आशीर्वादानं सरकार आलं असलं तरी ते मोदी-शहांच्या कृपेनं आलंय असंच ही मंडळी समजत असल्याने राज्यात 'मोदीशाही'च सुरू आहे. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण शिवशाहीत जसं घडत होतं तसं सध्या घडत नाही.शेती, शेतकरी आणि रयतेच्या प्रश्नांचा आगडोंब उसळला असतानाही संवेदनाहीन बनलेलं केंद्र आणि राज्य सरकार मात्र ढिम्म आहे. मोदीशाही तर दुर्लक्ष करीत आहे. उत्तरप्रदेशातील शेतकऱ्यांना सहानभूती दाखविणारे मोदी-शहा गप्प का आहेत? दिल्लीतील काँग्रेसी सरकार ज्याप्रमाणे महाराष्ट्राबद्धल आकस बाळगून असायचे अगदी त्याच धर्तीवर भाजपेयींदेखील महाराष्ट्र आणि मराठी माणूस यांच्याबाबत आकस बाळगून वागत असल्याचे दिसते आहे. दिवाळीपूर्वी कर्जमुक्ती देऊ म्हणणारे सरकार आज मूग गिळून गप्प बसले आहे.

*भाजपेयी मातले आहेत*
राज्यात सत्ता येऊन तीन वर्षे उलटली. रयतेच्याच नव्हे तर कार्यकर्त्यांच्या पदरातही काही पडलं नाही, जे काही झिरपलं ते सारं 'आयारामां'नी गिळलं. राज्यातल्या सरकारनं आपल्या कार्यकाळातला निम्म्याहून अधिक टप्पा ओलांडलाय, काहीसा उरलाय. शिवरायांच्या शिवशाहीला साडेतीनशेहुन अधिक वर्षे उलटली पण आजही त्या राजवटीची आठवण काढली जातेय. हिंदवी स्वराज्याची स्थापना शिवरायांनी केली ती पहिली शिवशाही. आज राज्यात छत्रपती शिवरायांच्या नावाने महाराष्ट्राचा कारभार चालतो, असं मुख्यमंत्री म्हणतात. मंत्रालयाची पायरी चढल्यावर समोरच छत्रपतींचे भव्य तैलचित्र आहे. महाराजांना मुजरा करूनच प्रत्येक राज्यकर्त्यास आणि नोकरशहास पुढे जावे लागते. छत्रपतींना लवून मुजरे करणाऱ्यांनी छत्रपतींसारखे शुद्ध आचरण ठेवावे असे सामान्य जनतेस-रयतेस वाटते. शिवरायांनी आपल्या सैनिकांवर जे निर्बंध लादले होते ते शेतकरी आणि रयतेची काळजी करणारे, कदर बाळगणारे होते. सैनिकांना त्यांची सक्त ताकीद असे की, 'दाणागोटा वगैरेची व्यवस्था आम्ही पुरेशी केली आहे, मात्र तो जपून वापरीत जा. नाहीतर आहे तोपर्यंत उधळेगिरी कराल आणि मग तुटवडा पडला म्हणजे घोडी उपाशी माराल किंवा *शेतकऱ्यांना* छळाल. मग कुणी कुणब्यांकडे जातील, कोणी दाणे, कोणी भाकर, कोणी गवत, कोणी फाटे, कुणी पाते असे करू लागतील. तर जे कुणबी घर धरून जीव मात्र घेऊन राहिले आहेत तेही जाऊ लागतील. कित्येक उपाशी मरू लागतील. म्हणजे त्यांना असं होईल की, *मोगलांपेक्षा हेच लोक अधिक वाईट! असा तळतळाट होईल*' शिवाजीराजांनी त्यांच्या शिवशाहीत प्रामुख्याने कोणत्या गोष्टी केल्या ते पहा- आपल्या राज्यात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित केली, जमीनदारांचे उच्चाटन करून रयतवारी जारी केली. अष्टप्रधान संस्थापना करून राज्याला स्थैर्य व राज्यकारभाराला व्यवस्थितपणा आणला. न्यायदानाची उत्कृष्ट पद्धत घालून दिली. किल्ल्यांचा कारभार योग्यप्रकारे चालावा म्हणून नियम करून दिले. हिंदूंना आपल्या राज्यात व काही अंशी बाहेरही प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. राज्य शासनाचे सर्व व्यवहार मराठीत चालवेत म्हणून राज्यव्यवहार कोश तयार करविला. थोडक्यात असे की, शिवाजीमहाराजांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले. ते टिकविले आणि वाढविले. 'हे तो श्रींची इच्छा' असं सांगत रयतेचे राज्य म्हणून ते चालविले. ही ती शिवशाही...! आजची काय स्थिती आहे? शिवरायांच्या आशीर्वादानं आम्ही राज्य करू असं म्हणत मतांचा जोगवा मागणारे भाजपेयी मातले का आहेत?

*नांदेडनं चुणूक दाखवलीय*
राज्यकर्त्यांचे सरदार आणि सुभेदारच व्याभिचारी आणि भ्रष्ट वर्तन करू लागले तर राज्य बदनामीच्या भाराने कोलमडून पडते. राजेशाही, सरंजामशाही संपली असं म्हणतात; पण लोकशाहीत नवीन राजे व सरंजामदार निर्माण झालेच. राज्य ही आपली खासगी मिळकत नसून 'जनतेची अमानत'आहे असे राज्यकर्ते वागू लागले तर जनता राज्य आपले आहे असे मानते. राज्याच्या हितासाठी झटते, पण जनता-रयत कस्पटासमान लेखून 'राज्य ही आमची बापजाद्यांची मिळालेली खासगी दौलत आहे' असं समजून राज्यकर्ते वागू लागले म्हणजे जनता अशा राज्यकर्त्यांना उलथवून टाकते. हा या महाराष्ट्राचा आणि देशाचा इतिहास आहे. याची चुणूक नांदेडच्या महापालिका निवडणुकीत जनतेनं दाखविली आहे.

*रयत सत्ता उलथवून टाकेल*
काँग्रेसने महाराष्ट्रात आणि देशात साठ वर्षे वतनदारी केली. त्यांची वतनदारी जनतेनं उलथवून टाकली. तीन वर्षांपूर्वी देशात आणि अडीच वर्षांपूर्वी महाराष्ट्रात रयतेनं अशीच काँग्रेसची सत्ता उलथवून टाकली ती शिवरायांच्या नावानं! सत्तेवर आलेल्या भाजपेयींनी शिवशाहीचा आणि शिवशाहीतल्या आज्ञापत्रांचा अभ्यास करावा अशाप्रकारच्या अनेक आज्ञापत्रातून 'शिवशाही'च्या कारभाराची दिशा स्पष्ट होते. शिवरायांचे मन उघड होते. शिवरायांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं असं म्हणतात; पण त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे महाराजांनी राष्ट्र निर्माण केलं. रयतेच्या ठायी राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण केली.राजकारणातील आजचे चित्र भयावह आहे. जनतेची काळजी नसलेले राजकारण आणि सत्ताकारण सर्वच स्तरावर सुरू आहे. दिल्लीतील राजकारण्यांनी तर रयतेलाच वेठीला धरले आहे.
'रयतेच्या शेतातील भाजीच्या देठालाही धक्का लागू नये' याची काळजी घेणारी शिवशाही कुठे अन शेतकऱ्यांना संपावर जाण्याची पाळी यावी हे कशाचे द्योतक आहे?

*देशमुखी नव्हे दशमुखी कारभार*
राज्यकारणात मश्गुल असलेल्या भाजपेयींनी शेतकरी नागवला आता उद्योग धंद्यावर संक्रात आणलीय. व्यापारी नव्या कराच्या ओझ्याखाली पिचतो आहे. प्रशासनावर राजकर्त्यांचा अंमल असावा, अंकुश असावा लागतो. इथे मात्र नोकरशाही वरचढ ठरते आहे. मतांचा जोगवा मागताना राणा भीमदेवी थाटात वलग्ना करणारे, घोषणा देणारे, आश्वासनं देणारे राज्यकर्ते प्रशासनासमोर हतबल झाल्याचे चित्र दिसते आहे. मंत्रालयात जी अवस्था आहे तीच इथे अगदी सोलापुरातही! इथली सुभेदारी कुणाची यासाठी दोन देशमुख झगडताहेत. त्यांचा कारभार देशमुखी राहिला नाही तर तो 'दशमुखी' ठरतो आहे. याचा गैरफायदा प्रशासनातले 'शुक्राचार्य' घेताहेत. पण सत्ताधारी सत्ता उपभोगण्यातच मश्गुल आहेत.

*सत्ताकारणात सारे मश्गुल*
दिवाळी सणात फटाके फोडण्यावर सरकार बंदी आणतेय. मात्र राजकारणातले फटाके वाजताहेत. नांदेडच्या निवडणुकीनं मृतवत होऊ घातलेल्या काँग्रेसच्या कुडीत फुंकर घातली गेलीय. भाजपेयींना अस्मान दाखवून त्यांची मस्ती उतरविलीय. मुंबईत मनसेच्या नगरसेवकांना पळवून शिवसेना सत्ताधारी की सत्ताकांक्षी हे दाखवून दिलंय. या साऱ्या राजकीय फटाक्यांच्या दारुकामात  इथल्या रयतेकडं मात्र कुणाचं लक्षच नाही. ती मरणासक्त झालीय, राज्यकर्त्यांकडून तिला सहाय्य मिळावं तिला जगण्याची ताकद मिळावी असं वाटतं पण ती मानसिकता दिसतच नाही. सगळेच सत्तेच्या वाटमारीत मदमस्त आहेत! शेतकरी, शेतमजूर, उद्योजक, कारखानदार, व्यावसायिक, व्यापारी, कामगार नोकरदार सारेच अस्वस्थ आहेत. हवालदिल झाले आहेत. त्यांना कुणीच वाली राहिलेला नाही. ही अस्वस्थता,उद्विग्नता वाढली तर वैफल्यग्रस्त लोक काय करतील हे सांगता येत नाही अशी भयावह स्थिती निर्माण झालीय!

*चौकट*

*सोलापुरात 'तिरपागडी' कारभार!*
नोटांबंदीची 'अर्थक्रांती', जीएस्टीचा 'रोडरोलर', आर्थिक मंदीचा 'वरवंटा' हे कमी होते म्हणून की काय काँग्रेसी सरकारने लादलेले जुने-पुराने कायदे शोधून, उकरून काढून मोडकळीस आलेल्या उद्योग-व्यवसाय-व्यापारावर 'अर्थपूर्ण' व्यवहारासाठी 'गदा' चालविली जाते आहे. ही स्थिती राज्यात सर्वत्र आहे. सोलापुरात त्याची तीव्रता अधिक दिसतेय.  'देशमुखी' सरकारला न जुमानणारा हा 'तिरपागडी' कारभार इथे 'मार्शल लॉ' आणण्याची स्थिती निर्माण करतोय की काय अशी भीती निर्माण झालीय. इथे उद्योजक आणि कामगार यांच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न का होताना  नाही कायदे-नियम हे लोकांसाठी असतात की कायदे-नियमांसाठी लोक? याचा विचार प्रशासक आणि प्रशासनानं करायला हवा! राज्यातला शेतकरी उध्वस्त झालाय आता व्यापार-उदीम आणि कामगार तरी देशोधडीला लागू नये ही नैतिक आणि वैधानिक जबाबदारी सरकारची आहे. जगभरात सोलापूरचं नांव ज्या उद्योगामुळे ख्यातकीर्त झालं आहे तो उद्योग-व्यापार टिकायला हवा, जतन व्हायला हवा. कुण्या एका 'सोमय्या'ची काकदृष्टी आणि अधिकाऱ्याच्या मनमानी कारभाराचा फटका व्यवसायाला, कामगाराला, सर्वसामान्यांना बसू नये. उद्रेक होण्याआधीच समन्वय साधायला हवा! सोलापुरातली बुद्धिमत्ता आणि युवाशक्ती ही पुण्यामुंबइकडे याआधीच गेली आहे. आता सरकारी जिझियावृत्तीनं जर उद्योग-व्यापार मोडकळीला आला तर कोकणात जसं केवळ वयोवृद्ध नागरिक आणि लहान मुलं राहतात तशीच अवस्था सोलापूरची झाली तर आश्चर्य वाटणार नाही. आजच्या सत्ताधारी भाजपेयींना सोलापूरकरांनी भरभरून दिलंय. तेव्हा त्यांना हायसं वाटेल असा कारभार व्हायला हवा, अन्यथा मराठवाड्याचं प्रवेशद्वार असलेल्या सोलापुरातही नांदेड घडेल....! तेव्हा किरीट सोमय्याजी, तिरपुडेजी जरा समजून घ्या अन समन्वय साधा.आणि सोलापूरकरांचा दुवा घ्या...!


- हरीश केंची,

प्रभंजन साठीचा लेख.

Saturday 7 October 2017

...तर पक्षाचा कळसच कापून नेतील!

"आज आपल्याला निष्ठावंत शिवसैनिकांची वानवा जाणवतेय. पूर्वी शिवसेनेसाठी वाटेल ते बेधडकपणे करण्याची तयारी असलेले शिवसैनिक होते. आता सगळीकडेच सटोडीये निर्माण झाले आहेत. शिवसेनेत 'रावांचे रंक झाले, भिकाऱ्यांचे बाजीराव बनले' असे दत्ताजी साळवी म्हणत असत. ज्यांचे कर्तृत्व, निष्ठा नांव ठेवायला जागा नाही, त्यांच्याबद्धल कुणी वावगा शब्द उच्चारत नाहीत. ज्यांच्याकडून जनहिताच्या काम होत आहेत, त्यांच्या गैरगोष्टीही पोटात घालण्याएवढे उदार लोक असतात; पण ज्यांनी केवळ स्वार्थच बघितला, ज्यांनी सर्वसामान्य माणसांना छळायचं सोडलं नाही, ज्यांनी सतत नेत्यांना अंधारात ठेवलं आणि चमच्यांचेे ताफे बनवून लोकांची खरी भावना नेत्यांपर्यंत पोहोचू दिली नाही, त्यांना सहजपणे वगळण्याची संधी निवडणुकांच्या काळात असते. पण, चांगल्या कार्यकर्त्याला डावलून नको त्याचीच नेमकी निवड कशी झाली? उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी म्हणून जे काही केलं त्यानं कार्यकर्त्यांचा आवाज चिरडण्यासाठी वापरला की काय? आज खरी गरज आहे ती कार्यकर्त्यांना सांभाळण्याची, त्यांचे मनोधैर्य उंचावण्याची, नाही तर यातून शिवसेनेचा कळस कापून नेण्याचा प्रकार होऊ शकतो, उध्दवसाहेब लक्ष द्या पक्षाच्या कळसाकडे...!"
-------------------------------------------


*शि*वसेनेचा दसरा मेळावा हा शिवसैनिकांसाठी दिशादर्शक, मार्गदर्शक आणि पक्षाचं पुढंच राजकारण कसं असेल हे सांगणारं असतं. म्हणूनच लाखो शिवसैनिक या मेळाव्याला आवर्जून उपस्थित असतात. यंदाचा मेळावा हा थोडासा वेगळा म्हणावा लागेल, शिवसेना सत्तेत आहेंही आणि नाहीही! राज्यभर चाललेली महागाईविरोधी आंदोलन, शेतकऱ्यांची कर्जमुक्तीसाठीचं आंदोलन, आमदारांची सतत होणाऱ्या बैठका, वृत्तपत्रातून येणाऱ्या उलटसुलट बातम्या यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार याचं औत्सुक्य साऱ्यांनाच होतं. प्रसिद्धी माध्यमे उद्धव ठाकरे राज्यातल्या सत्तेला दिलेला पाठींबा काढून घेतात की असंच सुरू ठेवतात या निर्णयाकडे याकडं लक्ष ठेऊन होते पण शिवसेनेनं 'वेट अँड वोच' अशी भूमिका घेतल्यानं या मेळाव्याला माध्यमांनी फारसे लक्ष दिलं नाही; याउलट नारायण राणेंच्या पत्रकार परिषदेला मोठी प्रसिद्धी दिली. सध्या शिवसेनेनं सरकारचा पाठींबा काढला तर कोणती व्युहरचना करायची यात भाजपेयी मग्न आहेत तर मध्यावधी निवडणुका झाल्याच तर या निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी तयारी, मोर्चेबांधणी शिवसेनेने सुरू केलीय. नारायण राणे आणि त्यांचा नवा पक्ष एनडीएत सामील झालाय. राणेंना शिवसेनेच्या अंगावर सोडण्याचा विचार करून भाजपेयींनी जर राणेंना मंत्री केलं तर शिवसेनेची भूमिका या साऱ्या पार्श्वभूमीवर निर्णायक ठरणार आहे, आणि त्याच बरोबर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.

*शिवसेनेला संपवणार कोण?*
शिवसेनेनं विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या यशानंतर पक्षप्रमुखाचं खूप कौतुक झालं पण आज ती परिस्थिती राहिलेली नाही. तथाकथित 'केशरी झंझावाता'पुढे शिवसेनेचा प्रभाव टिकणार नाही असं मत राजकीय निरीक्षक प्रसिद्धीमाध्यमातून सध्या मांडताहेत. शिवसेनेवर होणारे टीकेचे वार आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाची होणारी संभावना हे सारं पाहता उद्धव ठाकरे यांनी लिहिलेला २२ मार्च १९९२ च्या दैनिक सामनातील 'शिवसेनेला संपवणार कोण?' या मथळ्याचा लेख आठवला. या लेखात त्यांची वैचारिक मांडणी आणि आवश्यक तेवढी धारदार लेखणी होती. या लेखात उद्धव ठाकरे यांनी जे म्हटलं होतं ते खरं आहे. 'निवडणुकीच्या निकालावर शिवसेनेचे अस्तित्व कधीच अवलंबून नव्हते आणि नाही!' पण मला वाटतं, निवडणुकीत मिळणारं यश आणि संख्या यावरच त्याचं मूल्यमापन होतं. सध्या कोणत्याच निवडणुका नाहीत. दसऱ्याच्या मेळाव्यात पक्षप्रमुख सत्तेतील सहभाग काढून घेण्याची शक्यता असल्याचे म्हटलं जातं आहे. त्यामुळे मध्यावधी निवडणुका होतील असंही म्हटलं जातंय. पण तांत्रिकदृष्टया याची शक्यता कमीच वाटते कारण शिवसेनेनं भाजपला पाठींबा न देताही भाजप सत्ताधारी बनलीय, ही वस्तुस्थिती लक्षात घ्यायला हवीय. आजवरच्या निवडणुका ज्या झाल्यात त्यावेळी पक्षाचा उमेदवार देताना मूळ विचार थोडासा बाजूला ठेवला गेला होता. काही करुन झेंडा लावण्याचा ध्यास घेतल्यामुळे 'सिट नक्की आणणार' असा आव आणणाऱ्यांना तिकिटं वाटली गेली. पैसा खर्चायची ताकद बघितली गेलीच, पण गुंडगिरी करण्याची ताकदही बघितली गेली आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे इमानदार, निष्ठावान, सरळमार्गी कार्यकर्त्यांना डावलून नको त्यांना तिकिटं दिली. लोकांनी त्यांचे तीनतेरा वाजविले. अनेक ठिकाणी उमेदवार हे लादले गेले! ह्या उमेदवारी मिळालेल्या अनेक महाभागांना नागरिकांच्या हितासाठी लढण्याचा ध्यास नव्हता. सिट जिंकण्याचा होता. ही वृत्ती प्रारंभी शिवसेनेत नव्हती; मात्र सत्तेची ऊब घेतल्यानंतर हे सारं अवतरलं.

*शोध घ्यायलाच हवा*
उद्धव ठाकरे यांनी त्या लेखात बंडखोरीच्या संदर्भात जे रूपक दिलं होतं ते खूपच समर्पक होतं. 'श्रीमंतांची जशी काही दुखणी असतात, काही आजार असतात; तसंच इथं झालं आहे, असं मला वाटतं. बंडखोरी हा सत्तेला मिळालेला शाप आहे!' पण बंडखोरी हे लक्षण आहे, दुखणे नाही. ही गोष्ट प्रथम लक्षात घ्यायला हवी. कपाळ दुखतं, पण त्याचं कारण अपचन असू शकत, रक्तदाब असू शकतो वा अन्य काहीही असू शकतं. बंडखोरी हे दुखणं नाही तर लक्षण आहे. लाडबाजी, गटबाजी, पैशाचा प्रभाव, गुंडगिरीचा दबाव या गोष्टी शिवसेनेत एकेकाळी निश्चित नव्हत्या.आज याचा किती प्रभाव आहे याचा शोध उद्धव ठाकरे यांनीच घ्यावा. अगदी स्वतःपासून!

*लोकांनी संघटना वाढवली*
ज्यांना कांहीं साधायचं असतं, अशी माणसं मोठ्या साळसूदपणे कुणाला तरी पुढं करीत असतात. मोगली सत्तेनं मांडीवर खेळणारे अनेक बाळबादशहा पाहिले. त्यांना मांडीवर घेणारे फाजील महत्वाकांक्षी सरदार ना बादशाही बनवू शकले ना बादशहा! शिवसेना आणि तिचं नेतृत्व यांचं बळ लोकमानस हेच आहे. लोकांनी ही संघटना वाढविली. लोकांना बाळासाहेबांना 'जाणता राजा' एवढं मोठं केलं. ते करताना त्यांना पारखून घेतलं. पण लोकांनी त्यांना मानलं. लोकशाहीसाठी हा माणूस लोकनेता व्हावा ही लोकेच्छा होती. लोकशाही समर्थ होण्यासाठी लोकशाहीच्या सध्याच्या स्वरूपावर हल्ला चढवणारा, ठाकून, ठोकून लोकांचा स्वाभिमान, प्रतिकार शक्ती आणि समज वाढवणारा बेधडक नेता हवा असं लोकांनाच वाटत असावं; पण त्याचा अर्थ लोकांना हिटलर हवा आहे असा नक्कीच नव्हता. तसं न मानणाऱ्या मतलबी नेत्यांनी शिवसेनेवर कबजा करुन उद्धव ठाकरेंनाही भ्रामक पातळीवर नेलं. चमत्कार घडविण्याची भाषा, बढाया वाटतील अशा घोषणा आणि वाढवलेलं व्यक्तिस्तोम ही 'प्रबोधनकारां'ची परंपरा निश्चित नव्हे! खुषीकरणाचे सवंग मार्ग वापरून त्यांनी एक मोठं नेतृत्व पुरतं गारद केलं. हे लोक 'शिवसेनेला संपवणार कोण?' या प्रश्नाचं उत्तर कुणाला शोधूच देणार नाहीत. सापडूही देणार नाहीत.

*यशापयशाची छाननी व्हायला हवी*
अत्याचारावर, अन्यायावर वाघाप्रमाणे तुटून पडणाऱ्या निष्ठावान शिवसैनिकांबद्धल त्यांनी म्हटलं होतं वा बाळासाहेबांच्या तोंडी घालण्यात आलेली उद्विग्नतेची भाषा नाकारतंय कोण? पण उद्धव ठाकरे जे बोलत नाहीत त्याचं काय? 'घाव घाली निशाणी' या प्रबोधनकारांच्या वृत्तीनं शिवसेनेच्या आजकालच्या यशापयशाची छाननी व्हायला हवी, ती त्यांनी अलिप्ततेनं करायला हवी. इतरांना न सांगता येणाऱ्या गोष्टी तेच अनुभवू शकतात. प्रतिष्ठा आणि पैसा हे सर्व पापं झाकणारी पांघरूण आहे, असं मानलं जाण्याचं दिवस आता संपलेत. आपल्या जीवावर प्रतिष्ठा आणि पैसा मिळविणारे आपल्याला हवं ते करत नाहीत असं दिसताच हिशेब चुकते केले जात आहेत. 'आता काही खरं नाही', या बोलण्यात काय दडलंय याचा शोध घ्यायला हवाय.

*निष्ठेवर धंदेवाईक दृष्टीनं मात*
फक्त निष्ठेचं बळच हे राजकारण बदलू शकतं. आणि अशी निष्ठा शिवसेनेनं जागविली होती. या निष्ठेवर धंदेवाईक दृष्टीनं कधी मात केली याचाही शोध घ्यायला हवा. भ्रष्टाचार वरून खाली पाझरतो. सर्वसामान्यांचे प्रतिनिधी जेव्हा डोळ्यांत भरण्याएवढ्या ऐश्वर्याचे धनी झाले तेव्हा निष्ठेची वाट जाणणारी पावलं विसावली. मोटारींच्या पावलांना वाटेचं सोयरसुतक नसतं.... हे जाणलं पाहिजे. आज आपल्याला निष्ठावंत शिवसैनिकांची वानवा जाणवतेय. पूर्वी शिवसेनेसाठी वाटेल ते करण्याची तयारी असलेले शिवसैनिक होते. आता सगळीकडेच सटोडीये झाले आहेत. शिवसेनेत 'रावांचे रंक झाले, भिकाऱ्यांचे बाजीराव बनले' असे दत्ताजी साळवी म्हणत असत. ज्यांचे कर्तृत्व, निष्ठा नांव ठेवायला जागा नाही, त्यांच्याबद्धल कुणी वावगा शब्द उच्चारत नाहीत. ज्यांच्याकडून जनहिताच्या काम होत आहेत, त्यांच्या गैरगोष्टीही पोटात घालण्याएवढे उदार लोक असतात; पण ज्यांनी केवळ स्वार्थच बघितला, ज्यांनी सर्वसामान्य माणसांना छळायचं सोडलं नाही, ज्यांनी सतत नेत्यांना अंधारात ठेवलं आणि चमच्याचे ताफे बनवून लोकांची खरी भावना नेत्यांपर्यंत पोहोचू दिली नाही, त्यांना सहजपणे वगळण्याची संधी निवडणुकांच्या काळात असते. पण, चांगल्या कार्यकर्त्याला डावलून नको त्याचीच नेमकी निवड कशी झाली? उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी म्हणून जे काही केलं त्यानं कार्यकर्त्यांचा आवाज चिरडण्यासाठी वापरला की काय? आज खरी गरज आहे ती कार्यकर्त्यांना सांभाळण्याची, त्यांचे मनोधैर्य उंचावण्याची नाही तर यातून शिवसेनेचा कळस कापून नेण्याचा प्रकार होऊ शकतो, उध्दवसाहेब लक्ष द्या पक्षाच्या कळसाकडे...!


चौकट
---------
*ठणठणीत रुपय्यावाले जमा झाले*
सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये लोकसेवेच व्रत आजही कायम आहे. मात्र नेत्यांचा कल अर्थपूर्ण कामांकडेच झुकलेला आहे. विधायक कामांसाठी सत्तेची वा राजकारणाची गरजच नसते. बाळासाहेबांना हे नक्की ठावूक होतं म्हणून त्यांनी सुरुवातीच्या काळात राजकारणापासून दूर राहण्याचा निर्धार केला होता. 'राजकारण हे गजकर्णासारखं असतं ते जेवढं खाजवू तेवढं वाढतं' असं ते जाहीरपणे म्हणत. पण शिवसेनेच्या लोकप्रियतेच्या लाटेवर जी अनेक मंडळी वाहून आली त्यांना मतपेट्या दिसू लागल्या. त्यांनी मग लोकसेवेसाठी महापालिका हातात असण्याची गरज असल्याची जाणीव झाली. त्यावेळी राजकारणात न जाता नगरसेवा करण्यासाठी ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण असं म्हणत महापालिका ताब्यात घेतली. पुढं राज्यकारणाचा प्रारंभ झाला. ठाकरे घराण्यातील चौथ्या पिढीनं तर १०० टक्के राजकारणाची घोषणाच करून टाकली. त्यामुळे राजकारणातले सारे गैरप्रकार इथंही शिरले. निष्ठावन्त दुरावले अन 'ठणठणीत रुपय्या'वाले जमा झाले, त्यांनीच आज विळखा घातलाय.
...............................................
- हरीश केंची,
९४२२३१०६०९

Thursday 5 October 2017

विस्मृतीत गेलेले जॉर्ज फर्नांडिस!

*विस्मृतीत गेलेले जॉर्ज फर्नांडिस...!*

"भारतीय राजकारणात अनेक शोकांतिका पाहायला मिळतात. त्यामुळेच त्याला शक्यतांचा खेळ-गेम ऑफ पोसीबीलिटीज असं म्हटलं जातं असावं. यापूर्वी अनेक समाजवादी त्यांच्या भोंगळपणामुळे कसे करुण रसास पात्र ठरले, हे दिसलं आहे, त्यात सर्वात जास्त वरकड म्हणता येईल असं परस्परविरोधी वर्तन जॉर्ज फर्नांडिस यांच्याकडून झालं आहे. सध्या ते राजकारणात नाहीत. खरं तर पंधरा वर्षांपूर्वी जॉर्जसाहेबांची राजकारणातून 'एक्झिट' झाली होती. परंतु तेव्हांची राजकीय स्थिती वेगळी होती. ज्या राजकीय नेत्यांनी म्हणजे शरद यादव, नितीशकुमार यांनी त्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव केला त्याच शरद यादव आणि नितीशकुमार यांना जॉर्जना राज्यसभेवर निवडून आणावं लागलं होतं. तेव्हा जॉर्ज भाजपेयींची सत्ता असताना देखील जोमात होते. जॉर्जसारख्या एका सच्च्या कार्यकर्त्याला तेव्हा वाटत होतं; काँग्रेसविरोधी स्पेस आपणच वापरत आहोत. पण त्यांना आजवर कळलं नाही की, आपलं सारं राजकारणच नव्हे तर आयुष्यही सतत कुणी ना कुणी वापरलेलं आहे!"
-------------------------------

*अ*टल बिहारी वाजपेयींच्या सरकारात एक वजनदार मंत्री आणि एनडीएचे निमंत्रक राहिलेले लढाऊ कामगारनेते, कुशल राजकारणी आणि धुरंधर समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस आज एक असहाय, गलितगात्र अवस्थेत लाचार जीवन कंठताहेत. राजकारणात नेहमी उगवत्या सूर्याला नमस्कार घातला जातो. भाजपेयींना सत्तेपर्यंत पोहोचविणाऱ्या त्या मार्गदर्शक व्यक्तीला आज सारेच विसरले आहेत. आणीबाणीच्या काळात एक 'फायर ब्रँड' नेता म्हणून लोकांसमोर आलेला हा नेता आज स्मृतिआड गेलेला जाणवतोय, एक 'गुमनाम जिंदगी' जगतो आहे.
२०१० जून महिन्यातील घटना. जॉर्ज यांच्या घराचा दरवाजा बंद होता आणि दरवाजाबाहेर जया जेटली, मायकेल आणि रिचर्ड फर्नांडिस उभे होते. जॉर्ज यांचे केअर टेकर के.डी. सिंह यांनी त्यांना घरात येण्यापासून रोखले होते. जया यांचं म्हणणं होतं की, त्या आपलं पुस्तकं, पेंटिंग व इतर साहित्य घेण्यासाठी आलेय. जया जेटली यांनी प्रथमच अशाप्रकारे रोखण्यात आलं होतं. २००९ मध्ये लोकसभा निवडणूकीत पराभव झाल्यानंतर जॉर्ज यांची आर्थिक स्थिती खूपच खालावली होती. त्यांना दिल्लीत राहण्यासाठी घरच नव्हतं. याचवेळी जॉर्ज अल्जाइमर या व्याधीनं त्रस्त झाले होते. त्यांच्या काही मित्रांनी त्यांच्यासाठी भाड्याच्या घराचा शोध सुरू केला होता. मात्र तीन महिन्यानंतर राजकीय घडामोडी झाल्या अन त्यांची राज्यसभेवर निवड झाली. आणि त्यांचा घराचा शोध थांबला.

*जॉर्ज यांचं प्रेम*
४ ऑगस्ट २००९राजी अलजाईमर पीडित जॉर्ज राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ घेत होते तेव्हा त्यांच्याशेजारी एक महिला उभी होती. त्या होत्या लैला कबीर! जवळपास २५ वर्षांनंतर लैला जॉर्ज यांच्या जीवनात परतल्या होत्या. या त्याच लैला होत्या कुण्या काळी जिच्यावर जॉर्ज यांनी वेड्यासारखं प्रेम केलं होतं.
१९७१ मध्ये दिल्ली ते कलकत्ता या विमान प्रवासात जॉर्ज यांची लैला यांच्याशी प्रथम भेट झाली. हा आणखी एक योगायोग होता की, दोघेही त्यावेळी सुरू असलेल्या बांगला देशात चाललेल्या युद्धाच्या वातावरणातून परतत होते. दिल्लीत पोहोचल्यानंतर जॉर्ज यांनी लैलाला तिच्या घरापर्यंत सोडण्याची तयारी दाखविली पण ती तिने नाकारली. पण 'पहलीही नजरमें प्यार हो गया' अशी दोघांची अवस्था झाली. त्यानंतर दिल्लीत ते अनेकदा एकमेकांना भेटले. एका महिन्यातच जॉर्जने लैलाला लग्नाची मागणी घातली. लिफ्ट नाकारणाऱ्या लैलानं जॉर्जना नकार देऊ शकली नाही. २२ जुलै १९७१ रोजी दोघांचा विवाह झाला. या दोघांना कालांतरानं एक मुलगा झाला त्याचं नाव शॉन फर्नांडिस!

 *आणीबाणी ते भूमिगत*
२५ जून १९७५ ला देशात आणीबाणी लागू झाली. तेव्हा जॉर्ज आणि लैला ओरिसाच्या गोपाळपूर इथं सुट्टी साठी गेले होते. तेव्हापासून जॉर्ज भूमिगत झाले. जवळ जवळ २२ महिने जॉर्ज आणि लैला यांच्याशी संपर्क राहिला नाही. दरम्यान लैला आपल्या मुलाला घेऊन अमेरिकेला निघून गेल्या. आणीबाणी संपल्यावर जॉर्जने लैलाचा शोध घेऊन अमेरिकेत संपर्क साधला आणि भारतात परतण्याची विनंती केली. पण काही गोष्टींमुळे त्या परतल्या नाहीत.
*आणखी एक नवं नातं*
कालौघात जॉर्ज आणि जया जेटली यांचं नातं राजकीय वर्तुळात बहरत होतं. दोघांमधलं नातं हे केवळ राजकीय सहकारीच नाही तर त्याहून अधिक काही तरी होतं. याची चर्चा लैलापर्यंत गेली तिनं तिथून जॉर्जला घटस्फोटाची कागदपत्र पाठविली, जॉर्जने मात्र त्याचं उत्तर दोन सोन्याच्या बांगडया पाठवून दिलं.

*नाटकीय मिलन*
लैला यांची जॉर्जच्या जीवनात परतणं देखील तेवढीच मजेशीर गोष्ट आहे. २००७ ची ही घटना आहे, दीर्घ कालावधीनंतर अचानकपणे मुलगा शॉन याची गाठ पडली. तो खूप भावनिक क्षण होता. दोघात जे काही घडलं ते खूपच कौटुंबिक होतं. याचा परिणाम असा झाला की, तब्बल २३ वर्षांनंतर जॉर्जने प्रथमच लैलाशी फोनवर बोलणं झालं. शॉनला आपल्या वडिलांच्या आजाराबाबत इथं आल्यानंतर कळलं. लैलाचं म्हणणं असं झालं की, जॉर्जला कधी नव्हे इतकी आता त्यांची गरज आहे याची जाणीव झालीय. त्यामुळे लैला जॉर्जच्या जीवनात दुसऱ्यांदा परतली.

*जॉर्ज जीवनातील टर्निंग पॉईंट*
२ जानेवारी २०१० च्या दुपारी दोन वाजता लैला जॉर्जच्या घरी पोहोचते. तिच्यासोबत मुलगा शॉन आणि सूनही होती. लैला घरातल्या एका खोलीत जॉर्जसोबत स्वतःला बंद करून घेतलं. ती जेव्हा त्या खोलीतून जॉर्जसह बाहेर पडते तेव्हा जॉर्जच्या अंगठ्यावर शाई लागलेली दिसत होती. त्यानं सारेच आश्चर्यचकित होतात. याप्रमाणे जॉर्जची पॉवर ऑफ ऑटर्नि जी नोव्हेंबर २००९ मध्ये जया जेटलींचा नावे होती ती आता लैलाच्या नावे झालेली होती. हे सारं होतं जॉर्जच्या १३ कोटी रुपयांच्या संपत्तीचं!

*जयाची कोर्टात धाव*
जया जेटली गप्प बसणाऱ्या नव्हत्या त्यांनी २०१० मध्ये लैलाच्या विरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. त्यात म्हटलं होतं की जयाला जॉर्ज यांना भेटू दिलं जात नाही. ज्या जॉर्जसोबत त्या तब्बल ३०वर्षे राहिल्या होत्या. २०१२ एप्रिल महिन्यात याचा निकाल दिल्ली हायकोर्टानं दिला जो जया यांच्या विरोधात होता. जया मग या निकालाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात गेल्या. न्या. पी. सदाशिव बेंचने हायकोर्टाचा निर्णय बदलला. त्यानंतर त्या दोघी एकत्र जॉर्ज यांच्या सोबत दिसल्या त्या जॉर्ज यांच्या ८० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने. त्यानंतर जॉर्ज पुन्हा एकदा अज्ञातवासात गेले, कदाचित यालाच राजकारण म्हणतात!


*जिथून प्रारंभ तिथंच शेवट*
राजकारण कधी कुणाचा कायमचा मित्र वा शत्रू असत नाही असं म्हणतात. जॉर्जच्या बाबतीत हे खरं ठरतं. ज्या नितीशकुमार यांना बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर बसविण्यासाठी जॉर्जनं आपली शेवटची खेळी खेळली, त्याच नितीशकुमारांनी जॉर्जच्या राजकारणातील अखेरचे दिवस मोजायला लावले. मुंबईत सुरू झालेलं जॉर्जचं राजकारण खऱ्या अर्थानं बिहारात बहरलं आणि तिथंच अस्तगत झालं. एवढंच नाही तर ज्या जॉर्जला मुजफ्फरपूरवासियांनी सहा वेळा निवडून दिलं तेही आज त्यांना विसरले आहेत.

*राजकारणातला हिरो*
भारतीय राजकारणात अनेक आश्चर्य घडून गेले आहेत. म्हणजे पराकोटीची प्रतिकूल परिस्थिती असताना अनेकांनी आपलं कर्तृत्व दाखवून दिलं आहे. अशा अनेकांपैकी जॉर्ज फर्नांडिस हे ही एक नाव आहे. कर्नाटकात जन्मलेला, मुंबईत वाढलेला, आणि बिहारमधून सहा-सात वेळा निवडून येण्याचं कर्तृत्व असलेला नेता! असं कर्तृत्व आजचा मनसे फॅक्टर कुणाला गाजवू देईल का? पण तरीही जॉर्ज यांनी ते शक्य करुन दाखवलं होतं हे इथं लक्षात घ्यायला हवं. १९६७ मध्ये जॉर्ज फर्नांडिस यांनी मुंबईचे कथित सम्राट स. का. पाटील यांचा केलेला पराभव इतर कोणत्याही नेत्यांच्या पराभवापेक्षा कितीतरी मोठा होता आणि आहे. त्यानंतर जॉर्ज हे भारतीय राजकारणातील अनेकांचे हीरो बनले. काँग्रेसविरोधी आवाज बनले. ते कधीही काँग्रेसच्या कच्छपी लागले नाहीत, ही त्यांची ओळख असेलही. मात्र त्यापलीकडे जाऊन त्यांच्या काँग्रेसविरोधात काही वैचारिक, नैतिक आणि मुख्य म्हणजे सत्तेचं राजकारण संपून उरणारं काही समाजहित दिसतं का? तर या सर्वच प्रश्नांचं उत्तर अर्थातच नाही असंच आहे. जॉर्ज साहेबांच्या आज दिसणाऱ्या राजकीय विफलतेची बीजं तशी खूप जुनी आहेत. त्यांचं शेवटचं ढोंग समजून घ्यायचं, तर पहिली छोटी-छोटी ढोंगं समजून घेऊनच पुढं जावं लागेल.

*स.का.पाटील यांचा पराभव*
भारतीय राजकारणात साठ वर्षांपूर्वी नुकतंच कुठं काँग्रेसविरोधी तत्वज्ञान जन्माला आलं होतं. म्हणजे त्या विरोधाचं सूत्र असं की, काँग्रेस पक्षाला सर्व पातळ्यांवर विरोध करायचा. तो विरोध करताना आपल्याबरोबर कोण आहे, याची शहानिशा करायची नाही. पर्वाही करायची नाही. डॉ. राम मनोहर लोहियांचा समाजवादी पक्ष १९६० च्या दशकात उत्तर भारतात काँग्रेसला अनेक ठिकाणी धडका मारीत होता. त्याच पक्षाच्या पुढाकाराने अनेक समाजवादी साथी आणि जनसंघीय एकत्र आले. जॉर्ज अशांचा एक शिलेदार! हे साहेब मुंबईतून लोकसभेसाठी उभे राहिले. त्यांच्या विरोधात उमेदवार होते, स. का. पाटील. ते मुंबई काँग्रेसचे महत्वाचे पुढारी. मुंबईतल्या थैलीशहांच्या 'बॅगा' काँग्रेस पक्षासाठी खुल्या करण्याचं काम याच पाटील महोदयांकडे होतं. त्यांची ताकद मोठी. पक्षातही त्यांचा शब्द अखेरचा असायचा! त्यांचा पराभव ही त्यावेळी अशक्य कोटीतली वाटणारी गोष्ट! मात्र जॉर्जनी भिंती-भिंतीवर घोषणा लिहिली, 'होय, तुम्ही स.का. पाटील यांचा पराभव करू शकता' ही वाक्यरचना होकारार्थी होती. मात्र त्यात खच्चून नकार भरलेला होता. त्याशिवाय यांची पंधरा-वीस वर्षांची कारकीर्द अशी की, त्यांच्या विरोधात बरीच सत्ताविरोधी भावना समाजात साचलेली. जॉर्ज एक निमित्त ठरलं. ते विजयी झाले. मुंबईच्या फुटपाथवर वाढलेला आणि मुख्य म्हणजे सामान्यांच्या हिताची भाषा बोलणारा माणूस निवडून देताना मुंबईकरांनी कधी आपला हात आखडता घेतला नव्हता. पण ज्या कारणासाठी जॉर्जला निवडून दिलं होतं, ते कारण जॉर्जनी लक्षात ठेवलं का? म्हणजे ज्या स.का.पाटील, मोरारजी देसाई यांच्या भांडवली वर्तनाला त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा विरोध होता. तोच मुद्दा त्यांनीं नेटानं लढला का? समाजवादी अर्थव्यवस्था राहू देत; आधी संमिश्र अर्थव्यवस्था कठोरपणे राबविण्यासाठी तरी एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून सरकारवर अंकुश ठेवला का? अर्थात नाही! त्यांच्या वैचारिक पंडितांचं आणि ते तत्वज्ञानी हाडामासी भिनवून घेतलेल्या जॉर्ज यांचा एकच ध्यास होता...तो म्हणजे काँग्रेसचा नाश! तो नाश करताच नकळत देशाच्याही मूळ ढाच्याचं काही नुकसान झालं, तरी त्यांना पर्वा नव्हती.

*रेल्वेचे पुढारी*
१९७१ च्या बांगलादेश युद्धानंतर इंदिरा गांधींचा लोकसभेत पुन्हा एकदा मोठा विजय झाला. 'गरिबी हटाव'चा नारा हा त्यावेळचाच! इंदिराजींचा तो विजय त्यांच्या सर्व विरोधकांच्या जिव्हारी लागला. ते चवताळले. असं चवताळणं पहिल्यांदा विवेकाचा बळी घेतं. त्यावेळी संपूर्ण कामगार चळवळीवर साम्यवादी वा समाजवादी साथीचं वर्चस्व होतं. जॉर्ज रेल्वे कामगारांचे पुढारी. त्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला. 'रेल्वेचा चक्का कसा जाम होतो', हे १९७४ च्या त्या संपाने दाखवून दिला. या संपातूनच पुढे बिहार आणि इतर राज्यात अनेक आंदोलने पेटली. अर्थात, या संपामागचं खरं ईप्सित कामगारांना न्याय देणं हे होतं, की राजकीय डाव साधणं, हे त्यावेळी स्पष्ट झालं नव्हतं. मात्र उद्देश स्पष्ट होता. त्यांचं राजकारण त्यातून साध्य झालं. शक्य तेवढं अराजकही त्यांनी माजवलं. 'दुसरे गांधी' असं ज्यांना म्हटलं जातं, त्या जयप्रकाश नारायण यांनी तर पोलीस आणि लष्कराला बंड करायला सांगितलं. आपली सत्ता राहावी यासाठीच इंदिरा गांधींनी आणीबाणी आणली. मात्र त्यासाठीची कारणं जॉर्जसारख्या विरोधकांनी तयार करून ठेवली होती. इथून पुढे जॉर्जसाहेबांच्या वैचारिक पतनाने, शोकांतिकेने वेध घेतला.

*निष्ठा बदलत गेल्या*
ज्या स.का.पाटील वा त्यांचे नेते मोरारजी देसाई यांना जॉर्जसारख्यांनी कडवा विरोध केला, त्यांनाच त्यांच्या धोरणासकट जनता पक्षाच्या प्रयोगात त्यांना स्वीकारावं लागलं. जातीयवादी आणि भांडवलवादी हे देशाचे समान शत्रू आहेत. ते आमच्यापासून समान अंतरावर आहेत, असं जे अनेक साथी वा साम्यवादी म्हणत होते, त्यांनी त्यापूर्वी १९६७ मध्ये आणि त्यानंतर ,१९७८ मध्ये त्यांच्या हातात हात घालून जनसंघाला राज्यघटनेद्वारा स्थापित सत्तेची चव चाखू दिली. त्यावेळच्या जनता पक्षात इतर अनेक पक्ष आपापले अस्तित्व विसर्जित करून सामील झाले होते. मात्र जनसंघाचे सदस्य रा.स्व.संघाचेही सदस्य होते. मधु लिमये आणि जॉर्ज फर्नांडिस यांनी याच मुद्यावर जनता पक्ष फोडला. पुढे दहा वर्षांनंतर पुन्हा त्याच जनसंघीय व द्विसदस्यत्व   पॉलिसीवालीवाल्या लोकांच्या पाठींब्यावर जॉर्ज फर्नांडिस ज्या पक्षात होते, त्या जनता दलाचे सरकार सत्तेत आलं. ज्या जनता पक्षात असताना त्यांनी कोकोकोला, आयबीएम सारख्या कंपन्यांना उद्योगमंत्री या नात्यानं देशाबाहेर घालावलं होतं, त्यासारख्या हजारो कंपन्यांनी त्यानंतर लगेचच देशात धुमाकूळ घातला. त्यांना इथं रुजण्यापाडून ना जनता पक्ष रोखू शकला, ना त्यांची वाढ रोखण्यास जनता दलाला यश आलं. साथी जॉर्ज अणुबॉम्बच्या विरीधात अखंड भाषण करीत असत. 'राजस्थानच्या वाळवंटात बुद्ध हसला नव्हता; तर बुद्धाचा बाईंनी विध्वंस केला' अस ते म्हणत. मात्र त्याच जॉर्जना, दुसरी अणूुचाचणी करणाऱ्या 'भाजप आघाडीच्या सत्तेत सामील असल्यानं सामुदायिक जबाबदारीचं तत्व म्हणून ते पाप वाहावं लागलं. त्यापूर्वी सारं धर्मनिरपेक्षतेचं तत्वज्ञान त्यांनी गंगा-यमुना नदीत फेकून दिलं होतं.


*एकमेव संरक्षणमंत्री*
जॉर्ज फर्नांडिस हे एनडीए या राजकीय आघाडीचे अनेक वर्षे निमंत्रक होते. त्यापूर्वी त्यांनी कितीतरी पक्ष फोडले; स्थापन केले याची गणना नाही. सत्तेवर आल्यानंतर जॉर्ज फर्नांडिस विविध खात्याचे मंत्री राहिले. मात्र त्यांची कारकीर्द  लक्षात राहिली ती संरक्षणमंत्री म्हणून. सियाचिनच्या आघाडीवर १८ वेळा ते गेले. आजपर्यंत कोणताही संरक्षणमंत्री तिथे एवढ्यावेळा गेला नव्हता. त्यांनी या खात्याचं काम सैनिकांच्या लक्षात राहील असं केलं. मात्र विष्णू भागवंतांना अडमिरल पदावरून घालवून देण्याचं त्यांचं कृत्य हे त्यांच्या अनेक विसंगत वर्तनापैकी एक होतं. त्यानंतर तहलकाने त्यांचं बिंग फोडलं. त्यांच्या घरातून चालणारे घोटाळे बाहेर आणले. जॉर्ज यांच्या बाकी कुटुंबाचा थांगपत्ता नाही; मग ज्या जेटली या त्यांच्या कोण? आणि त्या काय म्हणून त्यांच्या घरात राहतात? अशी चर्चा-टीका स्वतःच्या हाताने कपडे धुणाऱ्या व साधं वर्तन असणाऱ्या जॉर्ज यांच्यावर त्यावेळी झाली होती. जॉर्ज त्याकाळात प्रचंड बदनाम झाले. अनेक बदमाशांची आणि बदमाशांच्या समूहाची त्यांना कळत नकळत वकिली करावी लागली. १९६० आणि १९७० च्या दशकात त्यांची जी प्रतिमा होती ती जॉर्ज यांनी स्वतःच छिन्नविच्छिन्न करून टाकली. पुढे एनडीएची सत्ता गेली. त्यांच्या समता पार्टीची सत्ता बिहारात आली. मात्र जॉर्ज यांची उपयुक्तता तोवर संपली असल्याचं त्यांच्याच चेल्याचं म्हणजे शरद यादव आणि नितीशकुमार यांचं मत बनलं. त्यांनी जॉर्जना केराच्या टोपलीतच काय ते टाकायचं बाकी होतं. ज्या मुजफ्फरपूरमधून ते सहा वेळा निवडून आले होते, तिथून त्यांच्या चेल्यांनी साधी लोकसभेची उमेदवारीही दिली नाही. एव्हाना जॉर्जना वार्धक्यानं घेरलं होतं. वय ८० च्या आसपास पोहोचलं होतं. जॉर्जच्या सुंभ जळला होता; मात्र पीळ कायम असल्यानं त्या वृत्तीनं त्यांना त्या वयात अपक्ष म्हणून लोकसभेसाठी अर्ज भरायला लावला. जॉर्ज साहेबांची तेव्हा अनामत रक्कमही राहिली नाही. त्यांना पक्षातूनही बाहेर जावं लागलं. जॉर्जच्या राजकीय नाटकाचे तिन्ही अंक संपले होते.पण ती शोकांतिका तेवढयावरच थांबली नाही. राजकीय जीवनाचे तीन अंक संपले तरी ते बाजूला जायला तयार नव्हते. त्यांनी नितीशकुमार सरकारच्या विरोधात भूमिका घेण्यासाठी, रस्त्यावर उतरण्यासाठी, आरोपांचा भडिमार करण्यासाठी नितीशकुमार यांचे विरोधक आणि पक्षातील मान्यवरांची बैठक दिल्लीत आयोजित केली. नितीशकुमारांनी आपल्या विरोधातलं हे षडयंत्र रोखण्यासाठी जालीम उपाय शोधला. त्यांनी आपल्या दूतामार्फत जॉर्ज यांना बिहारमधून निवडून दिल्या जाणाऱ्या राज्यसभेच्या जागेचे उमेदवार म्हणून नियोजित केलं. ज्या जेटलींचा जॉर्जच्या या पुनर्रप्रतिष्ठापनेला विरोध होता. मात्र तोपर्यंत जॉर्ज आपल्या चेल्याला हो म्हणाले होते. चेल्याला एका दगडात अनेक पक्षी घायाळ करायचे होते. जॉर्जचे नवे हनुमान दिग्विजयसिंग, जेटलीताई, आणि शरद यादव यांना परस्पर शह मिळाला. जॉर्ज सर्वांनाच परम आदरणीय! त्यामुळे ते बिनविरोध निवडून आले.

*जॉर्जना सगळ्यांनीच वापरलं*
भारतीय राजकारणात अनेक शोकांतिका पाहायला मिळतात. त्यामुळेच त्याला शक्यतांचा खेळ-गेम ऑफ पोसीबीलिटीज असं म्हटलं जातं असावं. यापूर्वी अनेक समाजवादी त्यांच्या भोंगळपणामुळे कसे करुण रसास पात्र ठरले, हे दिसलं आहे, त्यात सर्वात जास्त वरकड म्हणता येईल असं परस्परविरोधी वर्तन जॉर्ज फर्नांडिस यांच्याकडून झालं आहे. सध्या ते राजकारणात नाहीत. खरं तर पंधरा वर्षांपूर्वी जॉर्जसाहेबांची राजकारणातून 'एक्झिट' झाली होती. परंतु तेव्हांची राजकीय स्थिती वेगळी होती. ज्या राजकीय नेत्यांनी म्हणजे शरद यादव, नितीशकुमार यांनी त्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव केला त्याच शरद यादव आणि नितीशकुमार यांना जॉर्जना राज्यसभेवर निवडून आणावं लागलं होतं. तेव्हा जॉर्ज भाजपेयींची सत्ता असताना देखील जोमात होते. जॉर्जसारख्या एका सच्च्या कार्यकर्त्याला तेव्हा वाटत होतं; काँग्रेसविरोधी स्पेस आपणच वापरत आहोत. पण त्यांना आजवर कळलं नाही की, आपलं सारं राजकारणच नव्हे तर आयुष्यही सतत कुणी ना कुणी वापरलेलं आहे.

*इतिहासाची पुनरावृत्ती*
जे राजकारण नितीशकुमार यांनी आपल्या गुरुबरोबर केले दुर्दैवाने तशीच अवस्था नियतीनं त्यांच्यावर आणलीय. लालूंच्या विरोधात जाऊन जॉर्ज, शरद यादव, नितीश कुमारांनी समता पार्टी काढली अन भाजपेयींशी सत्तेसाठी संधान साधलं होतं. इतिहासाची पुनरावृत्ती म्हणतात ती ही अशी आज जॉर्जच्या चेल्याला लालूंशी घटस्फोट घेऊन भाजपेयींच्या पदराला लटकावे लागले आहे. असो.... आज जॉर्ज गलितगात्र बनले आहेत, त्यांना स्मृतिभ्रम झालाय. विकलांग अवस्थेत ते आहेत नाहीतर जॉर्जना जे ओळखतात त्यांना खात्री वाटली असते की ते आपल्या शोकांतिकेतही पाचव्या अंकाचे आराखडे मांडले असते. आणि आपली उपद्रवमूल्ये दाखवून दिले असते.

हरीश केंची, मो.८७८८२११६८९


पाकिस्तानात तक्षशिला, चाणक्याची उपेक्षा


*पाकिस्तानात तक्षशिला, चाणक्याची उपेक्षा!*

"भारतीय राजकारणात राज्यकारभारासाठीच नव्हे तर राष्ट्रधर्माच्या आचरणासाठीही चाणक्याच्या मार्गदर्शक तत्वांचा नेहमीच अवलंब केला जातो, त्याचा उल्लेख आपण नेहमीच वाचत आलो आहोत. चाणक्याचे तत्वज्ञान आणि त्यांचे जगविख्यात कौटिल्यीयशास्त्र, या साऱ्या ज्ञानाची पाळमुळ जिथं रुजली त्या तक्षशिला विद्यापीठाची अवस्था आज अत्यंत दयनीय झालीय. भग्नावस्थेतील या विद्यापीठाकडं दुर्लक्ष केलं गेलंय आजही त्याची दखल घेतली जात नाही, याचं कारण ते आहे पाकिस्तानात ! चाणक्यांना पाकिस्ताननं अस्पृश्य मानलंय, पाकिस्तानची निर्मिती होण्यापूर्वी या भारतीय उपखंडातील तक्षशिला विद्यापीठ, मोहोंजोदडो, हडप्पा, सिंधू संस्कृती ही मानचिन्हे पाकिस्तानात गेली. पण ही सारी हिंदूंची भारतीयांची मानचिन्हे आहेत म्हणून त्यांची सतत उपेक्षा पाकिस्तानात केली जातेय. तक्षशिला विद्यापीठाच्या भग्नावशेषांतल्या वास्तु युनेस्को जतन करतेय. ही समाधानाची बाब असली तरी, युनेस्कोच्या त्या समितीवर भारताचा प्रतिनिधी असणं गरजेचं झालं आहे"
--------------------------------------------
या जगविख्यात 'तक्षशिला विद्यापीठा'ची जी दूरवस्था झालीय याबाबत पाकिस्तानातल्या काही विद्वानांनी खंत व्यक्त केलीय. तिथले ज्येष्ठ पत्रकार सैफ ताहीर यांनी रावळपिंडीपासून केवळ ३५ किलोमीटर दूर असलेल्या तक्षशिला विद्यापीठाच्या भग्नावशेषांचे विस्तृत चित्र तिथल्या ख्यातनाम दैनिक 'डॉन' मध्ये एका विस्तृत लेखाद्वारे मांडलेय. त्याचे शीर्षक होतं, "व्हाय इज ग्रेट फिलॉसॉफर कौटिल्य नॉट पार्ट ऑफ पाकिस्तान हिस्टोरीकल कॉन्सीयसनेस?" साध्या सरळ भाषेत सांगायचं म्हटलं तर 'पाकिस्तानातील इतिहासकार कौटिल्यासारख्या प्रखर तत्वज्ञानीची उपेक्षा का करताहेत?'

*तक्षशिलाची दखलच नाही*
सैफ ताहीर यांनी पाकिस्तान सरकार, इतिहासकार, शिक्षणतज्ज्ञ आणि तिथल्या संवेदनशील नागरिकांना सवाल केला आहे की, तक्षशिला सारख्या प्राचीन विद्यापीठाचे अवशेष फाळणीनंतर पाकिस्तानात आढळून आले. त्यात मोठ्याप्रमाणात हिंदू, बौद्ध धर्म आणि संस्कृतीच्या अस्तित्वाचा, ताकदीचा प्रभाव दिसत होता. या विद्यापीठातून वेगवेगळ्या विषयातील जगविख्यात विद्वान निर्माण झाले होते. ते सारे प्रामुख्यानं हिंदू, वा बौद्ध होते. याच कारणानं पाकिस्तानला तक्षशिला विद्यापीठ, आणि तिथल्या विद्वानांचा, त्यांच्या पुरातत्व वास्तूंचा अभ्यास वा नोंदी इतिहासात करणं पसंत नसावं.

*१८ मठाचं शिक्षण संकुल*
२हजार७०० वर्षांपूर्वी केवळ भारतातच नव्हे तर जगभरातल्या ज्या विद्यापीठाचा लौकिक होता , जिथं प्रवेश मिळणं मग ती विद्यार्थी म्हणून असो वा शिक्षक म्हणून असो ती एक प्रकारची सिद्धी समजली जात होती. अशा तक्षशिला विद्यापीठ संकुलाचे जे कांहीं अवशेष शिल्लक आहेत त्याची 'झलक' युनेस्कोने संवर्धित अवशेष पाकिस्तान आणि जगासमोर मांडली आहे.तक्षशिला विद्यापीठ जिथं होतं वा तिचे अवशेष आज जिथं आढळतात ते आणि त्याचा परिसर हा ' मोहरा मोराडू' या नावानं ओळखला जातो. तक्षशिला विद्यापीठ हे १८ मठाचं एक मोठं शैक्षणिक संकुल होतं. जेलियन, धर्मराजिका, सकर्प, पीपलान, अशा प्रकारची नावं या मठाची होती. तक्षशिलामध्ये वेद, ज्योतिष, अवकाश विज्ञान, तत्वज्ञान, अर्थशास्त्र, राजनीती, वाणिज्य, हिसाब, युद्धकला, अगम-निगम, संगीत, नृत्य, चित्रकला, वैद्यकीय, सर्जरी, अशाप्रकारचे ६८ विषय शिकवले जात. १६ वर्षांहून अधिक वयाचे १० हजार ५०० विद्यार्थी इथे वास्तव्य करून शिक्षण घेत होते. आपल्याकडे गुरुकुल शिक्षणपद्धती जी आहे ती इथूनच आलीय. केवळ भारतातीलच नव्हे तर बेबीलॉन, ग्रीस, सीरिया, अरेबिया, फोनसिया, आणि चीन या देशातून इथे शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यामध्ये मोठी स्पर्धा होत असे.

*राज्यकारभाराचा अभ्यास*
अर्थशास्त्रातील सिद्धांताचा सर्जक आणि कुशाग्रबुद्धीचा मालक, राजनितिज्ञ, सल्लागार, 'कौटिल्य,-चाणक्य', संस्कृत भाषेतील व्याकरण, शब्दांचे अर्थ आणि त्याच्या शब्दकोशाची निर्मिती करणारा 'पाणिनी', वैद्यकीय ज्ञानापासून भौतिक ज्ञानाचा प्रणेता 'जीवाक', आयुर्वेदाचा प्रखर ज्ञाता 'चरक', त्याचबरोबर पंचकर्मातील गोष्टींचा निर्माता 'विष्णूवर्मा' यासारख्या वेगवेगळ्या विषयातील अत्यंत बुद्धिमान असा शिक्षकगण इथं कार्यरत होता. देशविदेशातील राजकुमार तक्षशिलामध्ये अभ्यास करून,  शिक्षण घेऊन आपलं राज्य कारभार सांभाळत वा राजकीय सल्लागार म्हणून ते काम करीत.

*अलेक्झांडरला मोह*
अलेक्झांडर जेव्हा पंजाबात आला होता, तेव्हा गुणग्राहक असलेल्या त्याने आपली राजकीय इच्छा आणि सत्तेची जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या देशाचा बहुमुखी विकास करण्यासाठी तक्षशिलातील निवडक विद्यार्थ्याना ग्रीसला परतताना आपल्याबरोबर घेऊन गेला होता.

*खंडहर बनले विद्यापीठ*
तत्कालीन भारताच्या उत्तर-पश्चिमेला तक्षशिला विद्यापीठ होतं. त्यामुळे त्यावर चढाई करणाऱ्यांना ते सोपं जातं असे. त्यामुळेच पर्शियन, शक, कुशाण, आणि शेवटी हुण-ज्यांनी रोमन साम्राज्याचा विध्वंस केला होता. अशा साऱ्यांनी हे विद्याज्ञानाचं हे तीर्थस्थळ उध्वस्त केलं होतं. चीनचा प्रवासी हुएन त्संग याने सहाव्या शतकात तक्षशिलाच्या या स्थानाचं वर्णन केलंय त्यात तो म्हणतो की, हे विद्यापीठाची अवस्था एक खंडहरासारखी झालीय. महाभारताची विस्तृत कथा ही तक्षशिलाच्या अभ्यासक्रमात होती. बौद्धांच्या जातककथेतही तक्षशिलाची महती वर्णिली आहे. तत्कालीन गांधार- कंदाहार आणि तक्षशिला यांचा विकास हा एकमेकांना पूरक असाच होता.

*वैश्विक विद्वान*
कौटिल्याचा उल्लेख 'सर्वोपरी वैश्विक विद्वान' असा उल्लेख सैफ ताहीर यांनी केला आहे. इटलीचे प्रख्यात तत्वज्ञानी मेडीआवेली यांच्या 'प्रिन्स' या ग्रंथात आणि चाणक्यच्या अर्थशास्त्रात ज्या गोष्टी मांडल्या आहेत हे पाहता हे दोन्ही जागतिक स्तरावरील महनीय ग्रंथ आहेत. असं अमेरिकेचे राजनीतिज्ञ हेन्री किसिंजर यांनी जाहीररीत्या म्हटलं आहे. चंद्रगुप्त मौर्य यांच्या साम्राज्याचा व्याप, यश कीर्ती आणि समृद्धी या साऱ्या मागे चाणक्याची बुद्धिमत्ता स्पष्ट दिसते. त्याच्याच सल्ल्यानुसार राज्यकारभार चालत असे. मौर्य साम्राज्य त्याकाळी संपूर्ण भारतीय उपखंडात पसरलेलं होतं. भौगोलिक दृष्ट्या ते मोगल साम्राज्यापेक्षा मोठं होतं. भारतीय इतिहासात मौर्य आणि त्याच्या वंशजांनी दीडशे वर्षांहून अधिक काळ चाणक्याच्या सिद्धांताला अनुसरून सत्ता राबविली. हा एक विक्रमच म्हणायला हवा. चाणक्य हे तक्षशिलाचे विद्यार्थी होते आणि पुढे ते इथले प्राचार्यही बनले.

*सर्वांगीण अभ्यासक्रम*
चाणक्याच्या ग्रंथात, 'अर्थशास्त्रा'त शासकाचं कर्तव्य, निर्णयशक्तीची क्षमता, साम-दाम दंड-भेदाची कुटनीती, युद्धकला, वाटाघाटीची कला, नगरशासन, वाणिज्य, कायदा, कृषी, आरोग्य, शिक्षण, सांस्कृतिक क्षेत्रासाठीचे, त्याचबरोबर सामाजिक चालीरीती, रूढी, परंपरा याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं आहे. या त्यांच्या सर्व विषयांची धोरणं आणि नीती यांच्या केंद्रस्थानी नागरिकांचा उत्कर्ष, विकास, आणि देशाची सुरक्षा हेच राहिलेलं आहे.

*पुरातत्व खातेही अनभिज्ञ*
'अर्थशास्त्र' या ग्रंथात मौर्य साम्राज्यातील विशाल संख्यने असलेल्या संख्याबाबत आणि त्याच्या अस्तित्वाबाबत चाणक्य म्हणतात, "केवळ संख्या हीच महत्वाची नसते शिस्त आणि योग्य नेतृत्व नसेल तर उलट संख्याबळ हे ओझंच ठरतं.
चाणक्य यांच्यासारखे महाज्ञानी, विद्वान आणि तक्षशिला सारख्या महान विद्यापीठाबाबत पाकिस्तान सरकार जशी उपेक्षा करते आहे तशीच उपेक्षा इथले इतिहासकार, इथले पुरातत्व विभाग हेही करताहेत. पाकिस्तान पुरातत्व विभागाच्या वेबसाईटवर याची साधी दखल घेतली गेलेली नाही मग विस्तृत माहिती तर लांबच! याची खंत या लेखात सैफ ताहीर यांनी व्यक्त केलीय. शासन आणि तज्ञांच्या पातळीवर असे असेल तर तिथल्या सामान्य नागरिकांना काय कळणार? ते याबाबत अजाण आहेत.  तिथल्या 'पाकिस्तान हिंदू कौन्सिल' या संस्थेचे आधारस्तंभ असलेले डॉ. रमेशकुमार वाकवाणी यांनी तक्षशिला विद्यापीठाची पुन्हा नव्याने निर्मिती करावी अशी मागणी पाकिस्तान सरकारकडे केलीय. ते शक्य नसेल तर इथल्या एखाद्या विद्यापीठाला 'तक्षशिला' चे नाव द्यावं असे सुचविले आहे. पण पाकिस्तानातील विद्वान, बुद्धिजीवी, इतिहासकार, शिक्षणतज्ज्ञ यापैकी कुणीही याला पाठींबा दर्शविला नाही.पाकिस्तानच्या कोणत्याच अभ्यासक्रमात ना तक्षशिला आहे ना चाणक्य!

*तक्षशिला : मोहरा मुराडू*
तक्षशिला विद्यापीठ जिथं होतं ते 'मोहरा मुराडू' हे निसर्गरम्य गाव आहे. चहूबाजूला हिरवंगार डोंगर, निसर्गाचं वरदान असलेल्या या गावात भग्नावस्थेतील काही इमारती आहेत. हे गाव हेरिटेज गाव म्हणून ओळखलं जातं, तक्षशिला विद्यापीठाच्या इथल्या काही मठावर, बौद्ध स्तुपावर 'युनेस्को'नं संरक्षित म्हणून लेबल लावले आहेत. तालिबान प्रभावित कट्टरपंथीयांनी अफगणिस्तानमधील बौद्ध गुफा जशा बॉम्बने उध्वस्त केल्या होत्या त्याप्रमाणेच या तक्षशिलाच्या अवशेषांना भय आहे. जिथे सरकारला आणि पाकिस्तानी जनतेला या गोष्टी जाणून घेण्यात रस नाही मग त्याचे संरक्षण करण्याची बुद्धी त्यांना कुठून येणार?

*पाकिस्तानी खूपच कमनशिबी*
सैफ ताहीर यांनी अत्यंत निर्भिडपणे लिहिलंय की, चाणक्याना पाकिस्ताननं अगदी अस्पृश्य मानलंय. याचं कारण असं ही असू शकेल की, चाणक्यची मनोभूमिका ब्राह्मणवादी आणि हिंदू संस्कृतीचं प्रतिनिधित्व करीत होतं. 'द इनसेस सागा' या ग्रंथात पाकिस्तानी इतिहासकार ऐताज अहेसान अत्यंत कष्टी होऊन लिहतात की, पाकिस्तान सरकार आणि लोक हे स्वतंत्र ओळखीची आणि मानचिन्हाची सतत उपेक्षा करीत आले आहेत. हे पाकिस्तानसाठी खूपच कमनशिबी म्हणावं लागेल. खोटा प्रचार आणि मनघडत दंतकथांना इतिहास म्हणून खपवून आपल्याच हाती आपणच बेड्या घालून घेतल्या आहेत. आता जे आपण पाकिस्तानात पाहतो आहोत ते पाकिस्तान निर्माण करणाऱ्यांच्या स्वप्नातील पाकिस्तान नाही. पाकिस्तानातल्या सगळ्या समस्यांचं मूळ हे त्यांची उभी केलेली खोटी प्रतिमाच आहे.'

*भारत सरकारनं लक्ष द्यावं*
पाकिस्तानची जगभरातील प्रतिमा बदलून उज्ज्वल करायची असेल तर त्याच्या भूमीवर एका जमान्यात विस्तारलेल्या बिगर मुस्लिम इतिहासाला स्वीकारायला हवाय. चाणक्य सारखा विद्वान पाकिस्तानच्या भूमीवर होता. हे इथल्या नव्या पिढीला ज्ञात करून द्यायला हवीय. नवनिर्माणाची प्रक्रिया सुरू करायला काय हरकत आहे? असं त्या लेखात सैफ ताहीर यांनी म्हटलंय. ते त्यात म्हणतात, हडप्पा, मोहोन्जोदडो, तक्षशिला, सिंधू संस्कृती अशांचे अवशेष पाकिस्तानात आहेत. ज्यात भारत, हिंदू संस्कृती, हिंदुधर्मातील दुर्लभ स्थापत्यकार, सिद्धी, कर्तृत्व दिसून येतंय. हे सारे अवशेष पाकिस्तानात आहेत. त्याची उपेक्षाच नव्हे ते संरक्षणाबाबतचाही धोका आहे..... आपल्या वर्तमान भाजप सरकारनं भारतासाठीचा हा अमूल्य आणि दुर्लभ ठेवा सन्मानपूर्वक राखण्यासाठी युनेस्कोच्या या प्रकल्पावर भारताचा प्रतिनिधी ठेऊन करता येईल.

-हरीश केंची

'राजा'ज्ञा : भ्रम आणि संभ्रम....!

"अपेक्षेप्रमाणे राज ठाकरे यांनी भाजप वा महायुतीला पाठिंब्याचा ब्रही न काढता 'कणखर नेतृत्वासाठी मोदींना बिनशर्त पाठिंबा....