Friday 28 August 2020

गांधी नाम केवलं...!


"काँग्रेसमध्ये दिवसेंदिवस पक्षनिष्ठा दुर्मिळ होत चाललीय. काँग्रेसनं आपले कार्यकर्ते आणि नेते विचारसरणीच्या दृष्टीनं घडवलेलेच नाहीत. आज काँग्रेसची स्थिती  निर्नायकी आहे. त्याला नायकच नाहीये. अशीच स्थिती राहिली तर उद्या काँग्रेसची स्थिती कम्युनिस्ट किंवा शेकापसारखी होईल. काँग्रेसमध्ये पक्षावर नितांत प्रेम करणारे आणि आणि तळमळीनं काम करणारे असंख्य कार्यकर्ते नेते आहेत. याखेरीज करोडो तरुण आपल्याला दिशा दाखवणाऱ्या नेतृत्वाच्या, नायकाच्या प्रतीक्षेत आहेत देशासमोरचे प्रश्न गुंतागुंतीचे आहेत. ते सोडवण्यासाठी व्यक्तिस्तोम न माजवणारा नेता त्याच्याबरोबर निरपेक्षपणे काम करणारे अगणित कार्यकर्ते असलेला पक्ष लोकांना हवा आहे. काँग्रेसच्या मूलभूत विचारांना आधुनिक काळातील विचारांची जोड देऊन आणि केवळ नकारात्मक राजकारण न करता, सतत दिवसरात्र मोदी- शहांना शिव्या देत न बसता, काँग्रेसनं पुढचे पाऊल टाकले पाहिजे. देशातील सर्वात जुना पक्ष सर्वात 'जुनाट' पक्ष बनता कामा नये. जनाधार संपलेल्या आणि शरपंजरी अवस्थेतील काँग्रेसमध्ये संजीवनी आणायची असेल, गतवैभव प्राप्त करायचं असेल तर एखाद्या नव्या दमाच्या, जोमाच्या आणि जनाधार असलेल्या तरुणाकडं नेतृत्व द्यायला हवंय, पण पक्षाच्या सार्वत्रिक ऱ्हासाचं सखोल विश्लेषण करून त्यावर उपाय योजना केली तरच पक्षाचं अस्तित्व राहील. अन्यथा शरपंजरी अवस्थेतच राहायला लागेल!"

-------------------------

काँग्रेसच्या अध्यक्षपदाबाबत असलेली अनिश्चितता आणि पक्षांतर्गत मतभेदांमुळे पक्ष कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला असून काँग्रेस पक्ष कमजोर झाला आहे, त्यामुळे पक्षात अमूलाग्र बदल करण्याची मागणी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी पत्र लिहून केली होती. २०१४ आणि २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. ६ वर्ष उलटून गेली असली तरी काँग्रेस पक्षात कोणत्याही प्रकारचे बदल झालेले नाहीत. त्यामुळं पक्षाला मरगळ आलेली आहे. यासाठी काँग्रेसच्या २३ ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षात आमुलाग्र बदल करण्याची मागणी केली होती. यामध्ये ५ माजी मुख्यमंत्री, काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य, विद्यमान खासदार आणि काही माजी केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश आहे. काही दिवसांपूर्वी पाठवण्यात आलेल्या या पत्रात भाजपची चांगली प्रगती झाल्याचं मान्य करत देशातील तरुण नरेंद्र मोदींकडं आकर्षित झाले आहेत हेसुद्धा मान्य करण्यात आलं होतं. काँग्रेसचा मूळ आधार असलेल्या वर्गानं फिरवलेली पाठ आणि तरुणांचा अविश्वास यामुळं कार्यकर्त्यांमध्ये उत्साह राहिलेला नाही. या पत्रात त्यांनी पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष जो पूर्णपणे सक्रीय असेल आणि लोकांना दिसत राहील अशी मागणी केली. पक्षाचा पुनरुद्धार करण्यासाठी काँग्रेस कार्यकारिणीची निवडणूक, संस्थात्मक नेतृत्व यंत्रणा तातडीनं विकसित करण्याची गरज या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे. या पत्रावर राज्यसभेतील विरोक्षी पक्षनेते गुलाम नबी आझाद, शशी थरुर, कपिल सिब्बल, मनिष तिवारी, महाराष्ट्रातील पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक, मिलिंद देवरा यांच्यासह २३ नेत्यांच्या सह्या आहेत. जेव्हा देशासमोर स्वातंत्र्यानंतरचं सगळ्यात राजकीय, सामाजिक, आर्थिक संकट उभं असताना पक्षाचा ऱ्हास होतोय, अशी खंत या पत्रात या नेत्यांनी व्यक्त केली आहे. या पत्रात पक्षात आमूलाग्र बदलांची मागणी करत सत्तेचं विक्रेंदीकरण, राज्याच्या पातळीवर संघटना मजबूत करणं, स्थानिक पातळीपासून ते काँग्रेस कार्यकारिणीपर्यंत पक्षात सर्व पातळ्यांवर निवडणुका घेऊन यंत्रणा विकसित केली पाहिजे आणि मध्यवर्ती संसदीय मंडळ तयार करण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

सध्या काँग्रेसमध्ये पुनर्रुजीवनाची चर्चा आहे. यासाठी पक्षातील २३ वरिष्ठ नेत्यांनी पुढाकार घेतला असून पक्षांतर्गत निवडणुका योग्य रितीने व्हाव्यात, पक्षाला जमीनीवर काम करणाऱ्या पूर्णवेळ नेत्याची गरज आहे, अशा स्वरूपाच्या भावना या २३ नेत्यांनी व्यक्त केल्या आहेत. तसंच पक्षाला संस्थात्मक नेतृत्वाची गरज आहे. असं म्हणत या नेत्यांनी अप्रत्यक्षपणे गांधी घराणेशाहीला आव्हान ही दिलं आहे. ज्यांनी खरंतर स्वतःच मार्गदर्शक मंडळात जायला हवं, अशी वरिष्ठ मंडळी काँग्रेसला अंतर्बाह्य बदलण्यासाठी मोहीम करतायत, ही पण एखादी राजकीय खेळी असू शकते असं जाणकारांचं म्हणणं आहे. वरिष्ठ नेत्यांनी लिहिलेलं पत्र हा सोनिया गांधी यांचा गेम आहे की, पक्षातील नेत्यांनी मिळून गांधी परिवाराचा गेम करायचं ठरवलंय? हे आजच्या काँग्रेस वर्कींग कमिटीच्या बैठकीत काही वेळातच ठरणार आहे. काँग्रेसची रचना पाहता गांधी परिवारावर टीका करून कोणीही पक्षात टिकू शकलेलं नाही. अशा वेळी केंद्रीय नेतृत्वाच्या चुका दाखवणारं २३ नेत्यांचं पत्र हा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहे. राहुल गांधी यांनी अपेक्षेपेक्षा चांगलं नेतृत्व दिलेलं असलं तरी काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाला त्यांच्या सारखी धरसोड भूमिका परवडणारी नाही. त्याचमुळे संस्थात्मक, पूर्णवेळ, जमीनीवर काम करणारं नेतृत्व अशी मागणी पुढे आली असावी. राहुल गांधी हे मोदींवर ट्वीटर च्या माध्यमातून हल्ला चढवतात, त्याला ऑनलाइन प्रतिसाद ही चांगला मिळतो. मात्र, खाली पक्षाची बांधणीच नसल्याने ही केवळ आभासी लढाई झालेली आहे, आणि अशा परिस्थितीत काँग्रेसला जमीनीवर काम करणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे. अशा कानपिचक्या २३ नेत्यांच्या नथीतून तीर मारत सोनिया गांधी यांनी दिलेल्या असाव्यात असं दिसतंय. राहुल गांधी यांच्याकडे पक्षाची धुरा परत जाणार असेल तर त्यांच्यावर यंदा सामुहीक नेतृत्व करण्याबाबत दबाव टाकण्यात येईल. असं ही एकूण चित्र दिसत आहे. राहुल गांधी यांना पुन्हा अध्यक्ष केलं तर त्यांना तुल्यबळ अशी कार्यकारी समिती अथवा कार्यकारिणीही देण्यात येईल, किंवा कोअर टीम बनवण्यात येईल असा कयास आहे. त्यामुळे काँग्रेसमधल्या घडामोडी या काही पक्षासाठी फार आशादायक नाहीयत. सोनिया गांधी अद्यापही निर्णयप्रक्रीयेच्या केंद्रस्थानी आहेत. राजकीय परिपक्वता या एका गुणामुळे राहुल गांधी यांचं सपशेल नेतृत्व स्वीकारण्यात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना अडचण आहे, या अडचणीवर आजच्या बैठकीत मात करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असं दिसतंय.

प्रत्येकवेळी इतिहासाची पुनरावृत्ती होतेच असं नाही. त्यासाठी राजकीयदृष्ट्या व्यवहारचातुर्य हवंय जे जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्याकडं होतं. त्यांनी पक्षाची आणि सत्तेची सूत्रं हाती येताच आपल्या जुन्या सहकाऱ्यांना दूर सारलं. इंदिराजींनी तर जुन्या खोंडांना जाणीवपूर्वक हटवलं. पण राजीवजी त्याच इंदिराजींच्या सहकाऱ्यांवर विसंबून राहिले, त्यांच्या मृत्यूनंतर त्याच नेत्यांची सोनियाजींना साथ घेतली. या नेत्यांनी अनेकदा सोनियांना अडचणीत आणलं होतं. राहुल गांधींनी पक्षाची सूत्रं हाती घेतल्यानंतर पक्षहिताऐवजी सत्तेसाठी हपापलेल्या राजीवजींच्या काळातील नेत्यांना दूर सारणं गरजेचं होतं आणि आपल्या समवयस्क, तरुण, नव्या दमाच्या ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट, नवीन जिंदाल, मिलिंद देवरा यासारख्या तरुणांना सोबत घ्यायला हवं होतं. पण ते झालं नाही, कदाचित या तरुण नेत्यांच्या सक्षम नेतृत्वक्षमतेची राहुलना भीती वाटली असावी. त्यामुळं त्यांना देशाच्या राजकारणातून दूर करून राज्याच्या राजकारणापुरतच सीमित केलं. त्याचा परिणाम काँग्रेसच्या अधोगतीत झालाय. हे नाकारता येणार नाही. नेतृत्वाकडून असं घडलं असलं तरी, आजही जनाधार नसलेली, कार्यकर्त्यांशी थेट संपर्क नसलेली किंबहुना कार्यकर्त्यांचं पाठबळ नसलेली मणिशंकर अय्यर, चिदंबरम, सॅम पिट्रोडा यासारख्या वाचाळ नेतेमंडळींनी पक्षाला घेरलंय. तेच पक्षाला रसातळाला घेऊन जाताहेत! अशी भावना कार्यकर्त्यांची झालीय. राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष असताना बिहारमध्ये नितीशकुमार, लालूप्रसाद यादव यांच्यासोबत जाऊन भाजपला रोखलं होतं. नंतर काँग्रेसचं नेतृत्व स्वीकारलं तेव्हा त्यांनी गुजरातमध्ये भाजपच्या सरकारला पुरतं घायाळ केलं होतं. ती किमया त्यांनी गुजरातमधल्या नव्या नेतृत्वाला पुढे आणून साधली होती. पुढं त्यांच्याच नेतृत्वाखाली काँग्रेसनं पंजाब, गोवा, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड इथं यश मिळवलं होतं. दरम्यानच्या काळात कर्नाटकात जेडीएससोबतचा प्रयोगही करून पाहिला होता. तो काही काळ यशस्वी झाला होता. त्यांनी नेतृत्व सोडल्यानंतर कर्नाटकमधली काँग्रेस सैरभैर झाली आणि ते राज्य हातातून गेलं. लोकसभा निवडणुकांत त्यांनी नोटबंदी, राफेल अशा मुद्द्यावरून देशभर वादळ निर्माण केलं, पण त्या मोहिमेत पक्षातले बरेचशे ज्येष्ठ नेते अलिप्त होते, त्याचा परिणाम व्हायचा तो झालाच! काँग्रेसमधल्या बड्या नेत्यांची संभ्रमावस्था निश्चितच पक्षाच्या दृष्टीचं चिंतेची बाब आहे आणि हे दिसूनही येतेय. दुसरा एक धोका पक्षात आलेल्या शैथिल्याचाही आहे. संसदेत माहिती अधिकाराचा कायदा, तिहेरी तलाक कायदा आणि ३७० कलम रद्द करण्याचा कायदा असे एकापाठोपाठ एक कायदे संमत होऊनही राज्याराज्यातील काँग्रेसचा एकही नेता रस्त्यावर उतरला नाही कि, त्यांनी या कायदाचा निषेध वा त्याला विरोध करणारा मोर्चा काढलेला नाही. माहिती अधिकारात दुरुस्त्या करून जनतेचं सत्तेला जाब विचारण्याचं हक्क कसं नाकारलं जातंय, त्याची साधी सोप्या भाषेत माहितीही काँग्रेस नेते मतदारांपुढं मांडताना दिसत नाहीत. असा पक्ष वेगानं निष्प्रभ अवस्थेत जात असेल तर त्याला संजीवनी आणण्यासाठी शस्त्रक्रियेची जरूरी आहे. ती शस्त्रक्रिया सोनिया गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली होईल असं वाटत होतं पण तसं घडताना दिसत नाही. राहुल गांधी यांना पक्षात व्यक्तीस्वातंत्र्य, मतस्वातंत्र्य, आधुनिकता, सेक्युलरिझम, समता, न्याय्य अशा वैचारिक मूल्यांशी सतत प्रामाणिक राहणारे नेते हवेत आणि तसं मिशन प्रत्येकानं हाती घ्यायला हवं असं आपल्या अध्यक्षीय भाषणात सोनिया गांधी यांनी अध्यक्षपदाची सूत्र हाती घेताना म्हटलं होतं. प्रत्यक्षात काँग्रेस नेत्यांनी त्यांच्याशी एकप्रकारची गद्दारीच केलीय. हे नेते लोकांपासून दूर राहिलेत. मतदारांशी संवाद ठेवला नाहीये. काँग्रेसच्या विरोधात केलेल्या अपप्रचाराला सडेतोड उत्तर दिलेलं नाहीये. आता त्यापुढं जात काँग्रेसचे काही नेते भाजपच्या बहुसंख्याकवादी राजकारणाकडंही आकृष्ट होऊ लागलेत. 

स्वातंत्र्यानंतर नेहरूंनी जी नवी काँग्रेस जन्मास घातली किंवा इंदिरा गांधींनी परत नव्या दमानं ज्या काँग्रेसची बांधणी केली, त्यात जुन्याचा मोह पूर्णपणे टाळला. लोकांना नेहरू नव्या दमाचे, नव्या विचारांचे व नव्या कार्यशैलीचे नेते वाटायचे ते त्यामुळेच! इंदिरा गांधींनी काँग्रेसमधील प्रस्थापितांना सत्तेतून विस्थापित केल्यामुळेच त्यांची गरिबांच्या बाजूने आणि प्रस्थापितांच्या विरुद्ध लढणारी प्रतिमा जनमानसात रुळली होती. सोनिया गांधी किंवा राहुल गांधीला जुन्याशी मोडते घेता आले नाही. सोनिया गांधींच्या कार्यकाळात काँग्रेसमध्ये इंदिरा व राजीव गांधींचे समकालीन असलेल्यांचीच चलती होती. या सर्वांनी मिळून राहुलला अलगदपणे काँग्रेसमध्ये प्रस्थापित केलं, निदान जनसामान्यांच्या लेखी तरी अशीच प्रतिमा तयार झाली. साहजिकच, लोकदरबारी राहुल गांधी हा प्रस्थापितांचा नेता झाला. स्वत: राहुलनं आपली प्रतिमा प्रस्थापित विरोधी बनवण्याचा कितीही प्रयत्न केला असला तरी पक्षातील प्रस्थापितांच्या गोतावळ्यापुढे तो अगदीच फिका पडला आहे. ज्यांना काँग्रेसचा ऱ्हास  थांबावा असे वाटते त्यांनी या मुद्द्यांवर गांभीर्यानं विचारविनिमय करणं गरजेचं आहे. मात्र, जोवर काँग्रेसअंतर्गत काँग्रेसच्या सार्वत्रिक ऱ्हासाचं सखोल विश्लेषण करण्याची तयारी नसेल, तोवर काँग्रेसचे शुभेच्छुक असलेल्यांनी केलेल्या विचारविनिमयाला अर्थ नसेल.

अनेक राज्यांमध्ये काँग्रेसची अवस्था ना घर का, ना घाट का अशी झालीय? १९६७ पासून काँग्रेस पक्षाचा सातत्यानं ऱ्हास होतोय, जी प्रक्रिया थांबवणं कुणाही नेत्याला शक्य झालेलं नाही. काँग्रेसची देशाला आवश्यकता आहे की नाही, किंवा काँग्रेस संपायला हवी की नाही हे वादाचे मुद्दे असू शकतात. मात्र, काँग्रेसच्या ऱ्हासातील सातत्य कुणी नाकारू शकत नाही. ज्यांना काँग्रेस संपावी असं वाटतं, त्यांनी फार काही करायची गरज नाही, कारण काँग्रेसचा प्रवास त्याच दिशेनं सुरू झालाय. ज्यांना काँग्रेस संपू नये असं वाटतं त्यांनी मात्र काँग्रेस राज्या-राज्यांत पुन्हा कशी रुजेल याची सविस्तर चर्चा आणि विस्तारीत कृती करण्याची आवश्यकता आहे. याबाबतीत काही ठळक मुद्द्यांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. काँग्रेसमध्ये दिवसेंदिवस पक्षनिष्ठा दुर्मिळ होत चाललीय. आमदारांना भाजप आमिष दाखवत आहे, असे म्हणून उपयोगाचे नाही. काँग्रेसनं आपले कार्यकर्ते आणि नेते विचारसरणीच्या दृष्टीनं घडवलेलेच नाहीत. आज काँग्रेसची स्थिती  निर्नायकी आहे. त्याला नायकच नाहीये. अशीच स्थिती राहिली तर उद्या काँग्रेसची स्थिती कम्युनिस्ट किंवा शेकापसारखी होईल. काँग्रेसची इतकी केविलवाणी अवस्था यापूर्वी कधीच झाली नव्हती. काँग्रेसमध्ये पक्षावर नितांत प्रेम करणारे आणि आणि तळमळीनं काम करणारे असंख्य कार्यकर्ते, नेते आहेत. याखेरीज करोडो तरुण आपल्याला दिशा दाखवणाऱ्या नेतृत्वाच्या, नायकाच्या प्रतीक्षेत आहेत देशासमोरचे प्रश्न गुंतागुंतीचे आहेत. ते सोडवण्यासाठी व्यक्तिस्तोम न माजवणारा नेता त्याच्याबरोबर निरपेक्षपणे काम करणारे अगणित कार्यकर्ते असलेला पक्ष लोकांना हवाय. काँग्रेसच्या मूलभूत विचारांना आधुनिक काळातील विचारांची जोड देऊन आणि केवळ नकारात्मक राजकारण न करता, सतत दिवसरात्र मोदी-शहांना शिव्या देत न बसता, काँग्रेसनं पुढचं पाऊल टाकलं पाहिजे. देशातील सर्वात जुना पक्ष सर्वात 'जुनाट' पक्ष बनता कामा नये. या देशाला काँग्रेस विचारांची गरज आहे. पण सत्तेच्या आधाराविना जनतेसाठी काम करण्याची सवय काँग्रेसनं लावून घेतली, तरच त्याला भवितव्य आहे. जनाधार संपलेल्या आणि शरपंजरी अवस्थेतील काँग्रेसमध्ये संजीवनी आणायची असेल, गतवैभव प्राप्त करायचं असेल तर एखाद्या नव्या दमाच्या, जोमाच्या आणि जनाधार असलेल्या तरुणाकडं नेतृत्व द्यायला हवंय पण तसं होताना दिसत नाही. पक्षाच्या सार्वत्रिक ऱ्हासाचं सखोल विश्लेषण करून त्यावर उपाय योजना केली तरच पक्षाचं अस्तित्व राहील. अन्यथा शरपंजरी अवस्थेतच राहायला लागेल! देशात सर्वत्र पीछेहाट होत असताना, काँग्रेसी नेत्यांचं, नेहरू-गांधीजींची कार्यकर्तृत्वाची टवाळी केली जात असताना मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत नाही. नेहरूंनी रचलेला आधुनिक भारताचा पाया, इंदिरा गांधींनी, राजीव गांधींनी आपल्या ध्येयधोरणांनी, निर्णयांनी देशाला दिलेला आकार या नव्यापिढीपुढे आणला जात नाही. त्यांच्याविरुद्ध केल्या जाणाऱ्या गोबेल्सनीतीला नवी पिढी बळी पडत असताना त्याबाबत मौन पाळलं जातंय. काँग्रेसजनांमध्ये हतोत्साह आहे. त्या नेत्यांचं स्मरण, जागरण होतच नाही. किंबहुना त्यांचं विस्मरणच केलं गेलं. त्या दिव्यत्वाची प्रचिती नव्यापिढीपुढे ठेवण्याची गरज असताना मात्र काँग्रेसी नेतृत्व भलत्याच गोष्टीत रममाण झालेलं दिसतंय. मूल्याधिष्ठित राजकारणाची कास धरण्याऐवजी खोट्या, फसव्या आणि तत्वहीन राजकारणातच गडबडा लोळताना दिसतेय. आपल्याकडं असलेल्या खणखणीत नाण्यासारख्या नेतृत्वाकडे डोळेझाक करीत इतरेजनांसारखे बागडताहेत याचं शल्य जुन्या जाणत्या काँग्रेसी मंडळींना वाटतं आहे. पण त्यांच्या मौलिक सल्ल्याकडं दुर्लक्ष केलं जातंय. पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचा उज्ज्वल कार्यकाळ लोकांसमोर आणण्याची कधी नव्हे इतकी आज गरज निर्माण झालीय! सत्तेच्या, मतांच्या आणि संख्येच्या राजकारणात काँग्रेस पक्ष हा कमकुवत बनलाय हे जरी खरं असलं तरी जनतेच्या मनांत अजूनही एक हळवा कोपरा त्यांच्यासाठी शिल्लक आहे. त्याला पक्ष साद घालताना दिसत नाही. नेहरू-गांधी यांचं राजकारण कसं प्रभावशाली होतं हे त्यांना सांगताच येत नाही. पक्षाला स्वकर्तृत्वाची ओळखच राहिलेली नाही. त्यामुळं त्यांचं वैभवशाली कार्य झाकोळलं गेलंय, त्यात भाजपेयींनी त्यांची बदनामी विद्वेषाच्या माध्यमातून चालविलीय. ती रोखण्याची इच्छाशक्ती दिसत नाही. रणांगणात उतरलेल्या अर्जुनाची जशी अवस्था झाली होती तशी काँग्रेसची झालीय. 'काँग्रेसी इतिहासाची भगवद्गीता' सांगणारा श्रीकृष्ण येण्याची वाट तर ते पाहात नाही ना? अशी स्थिती त्यांची झालीय!
हरीश केंची
९४२२३१०६०९

आर्थिक डावंडोल...!


"राज्य आणि देशाची अर्थव्यवस्था नाजूक बनलीय. कोरोना महासाथ हे एक दैवी संकट असून त्यामुळे जीएसटी संकलनात मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचं कारण गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी परिषदेत सांगितलं. २०२०-२१ या आर्थिक वर्षांत जीएसटी संकलनातील तूट २.३५ लाख कोटी रु. इतकी येईल, असा अंदाजही त्यांनी वर्तवला. या बैठकीत राज्यांनी आपली महसूली तूट भरून काढण्यासाठी बाजारात कर्ज उचलावं असंही सरकारनं सांगितलं आहे. या बैठकीत राज्यांना देण्यात येणाऱ्या जीएसटी वाटपाचा मुद्दा महत्त्वाचा होता. महाराष्ट्राला २२ हजार कोटी रुपये केंद्र सरकारकडून येणं आहे. अजित पवारांनी त्याची मागणी केली. केंद्रानं मात्र पैसे देण्याऐवजी कर्ज घेण्याचा सल्ला दिलाय. हे एकीकडे तर दुसरीकडे प्रधानमंत्र्याच्या, पक्षाच्या आणि सरकारच्या प्रचार प्रसिद्धीसाठी कोट्यवधीची उधळण केली जातेय! अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार गेल्या सहा वर्षात करदात्यांच्या पैशातून ५ हजार ९१० कोटी रुपयाहून अधिक रक्कम खर्च केली गेलीय तर इतर माध्यमातून याहून अधिक खर्च झालाय!

------------------------------------------

*मो* दी सरकारनं चमकदार घोषणांचा पाऊस पाडला. घोषणामधे ते इतके अडकले की घोषणा केल्या म्हणजे त्या अंमलात आल्या अशा समजुतीत ते वावरलं. काळा पैसा काय, परदेशातून गुन्हेगारांना पकडणार काय, नव्या नोटा काय. आणि आता रीझर्व बँकेकडून पैसे आणि बँका एकत्र करणं. या चमकदार घोषणांचा अर्थव्यवस्थेवर परिणाम किती आणि केव्हां होणार याचा विचार झालेला दिसत नाही. शहाण्या माणसानं जरा शंका घेतली की सोशल मिडियातले विद्वान आणि मंत्रीगणंग तुटून पडतात. रीझर्व बँकेतून पैसा घेणं यात काहीच वावगं नाही. तो पैसा योग्य रीतीनं वापरायला हवा.  सरकारचा बराच खर्च अनुत्पादक असतो, जनतेला भावनात्मक सुख देण्यासाठी असतो. सरकारी यंत्रणा हाच एक खर्चावरचा मोठ्ठा भार आहे. जीएसटीवर उत्पादक नाराज आहेत. बँकांचा व्याज दर आणि जीएसटी यात येवढे पैसे जातात की नंतर धंध्यात नफ्याला कमी वाव उरतो अशी उत्पादकांची तक्रार आहे. रीझर्व बँकेकडून मिळालेला पैसा सरकारी तूट भरून काढण्यासाठी आणि बँकांच्या फाटक्या झोळीत घालण्यासाठी वापरला तर अर्थव्यवस्था गती घेणं शक्य नाही. असे साधे प्रश्न विचारले तरी अर्थमंत्री निर्मला सीतारामन भडकतात आणि प्रश्न विचारणारे मूर्ख आहेत, असं म्हणून मोकळ्या होतात. काँग्रेस नालायक आहे, नेहरूना काही कळत नव्हतं, गांधीजीनी देशाचं नुकसान केलं, पाकिस्तान आणि काश्मीरमुळंच भारताचं फार नुकसान होतं, इत्यादी गोष्टी खऱ्या की खोट्या त्यात आपण जाऊ नये. पण त्या सांगूनही आता पाच वर्षं उलटली आहेत.

उत्पादन व्यवस्था, उद्योग आणि शेतीची स्थिती, बँकांची स्थिती, इन्फ्रा स्ट्रक्चरची आबाळ, गुंतवणुकीची टंचाई, बेकारी, आरोग्य आणि शिक्षणाची हेळसांड हे जुनाट, किचकट प्रश्न भारताला भेडसावत आहेत. १९४७ सालीही हे प्रश्न होते आणि आजही ते शिल्लक आहेत. एक मध्यम वर्ग निर्माण झाला आणि सेवा क्षेत्र विकसित झालं ही गेल्या सत्तरेक वर्षातली जमेची बाजू. पण जमेची बाजू आणि खर्चाची बाजू यांचा असमतोल अजूनही शिल्लक आहे. कुठल्याही सरकारला कोरी पाटी मिळत नसते. कुठलंही सरकार एका जुन्या घरात प्रवेश करत असतं, त्या जुन्या घरातच त्याला दिवस काढायचे असतात. छप्पर गळत असतं, प्लंबिंगमधे दुरुस्ती आवश्यक असते, विजेच्या वायरी जुन्या झालेल्या असतात, हवा कोंदट होऊन रोगराई निर्माण होत असते. भारतातलं घर तर कित्येक शतकं जुनं. त्यामुळं त्यातले बिघाड जुने. अशा घरात रहायला येणाऱ्या माणसाला शहाणपणानंच वागावं लागतं. ताबडतोबीनं काय करावं लागेल, सुधारणा कुठं कुठं अग्रक्रमानं कराव्या लागतील याचा विचार सरकारला करावा लागतो. घरात शिरताना कुटुंबातल्या लोकांच्या फॅन्सी मागण्या खुबीनं दूर साराव्या लागतात. ग्रहांची शांती करून, होम हवनं करून, सत्य नारायण घालून, तीर्थ प्रसाद वाटून कुटुंबियांना क्षणभर दिलासा मिळेल खरा, पण त्यातून घराची स्थिती सुधारत नसते! करांचं उत्पन्न कमी होतं याचा अर्थ उत्पादन कमी झालं होतं. उत्पादन कमी झाल्यावर उत्पादक कर कुठून भरणार? उद्योगातली वाढ ०.६ टक्के येवढीच होती शेती तर उणे होती. कर संकलन कमी झाल्यावर त्याला जोडून येणारा परिणामही दिसू लागला, रोजगार निर्मिती थंडावली, अर्थव्यवहार थंडावल्यामुळं बेकारी वाढली. या तीनही गोष्टी एकत्र दिसू लागल्या आणि त्याचा संकलित परिणाम म्हणून देशाचं एकूण उत्पादन ५ टक्क्यावर घसरलं. हे उत्पादन अर्थव्यवहार जेमतेम गाडं चालू ठेवायलाच पुरतं, विकासातली गुंतवणूक थांबते. हे एक गंभीर आर्थिक संकट होतं आहे. या संकटाला कोणी मंदी म्हणतं, कोणी महामंदी म्हणतं तर कोणी हा आंतरराष्ट्रीय मंदीचा अटळ परिणाम आहे असं म्हणतं. तो एका परीनं शब्दांचा खेळ आहे. भारतात अलिकडल्या काळात शब्द आणि घोषणांच्या जोरावरच लोकांना गुंगवलं जात असल्यानं अर्थव्यवस्थेतल्या संकटाचे अर्थ राजकीय पक्षांनी त्यांच्या सोयीनं लावले. परंतू संकट आहे येवढं मात्र खरं.

कुणी विश्वास ठेवेल का की, एका व्यक्तीच्या प्रचारासाठी प्रत्येक मिनिटाला एक लाख रुपये खर्च केला जातोय. ते देखील त्या व्यक्तीच्या खिशातून नव्हे तर, तुमच्या आमच्यासारख्या करदात्यांच्या पैशातून केला जातोय. त्यांच्या व्यक्तिगत प्रचाराबरोबरच निवडणुकीत पक्षाच्या प्रचाराशी जोडले गेले तर तो खर्च वाढत जाऊन दोन लाखांपर्यंत जातोय याला आपण काय म्हणाल? हा सारा प्रकार एक दोन दिवसासाठी मर्यादित नाही तर गत सहा वर्षांचा साठीचा असेल तर आपल्याला प्रश्न पडेल की, एक व्यक्तीच्या प्रचारासाठी इतकी मोठी रक्कम का खर्च केली जातेय? दुसरा प्रश्न हा सारा पैसा दिला जातोय ते लोक कोण आहेत? आणि तिसरा प्रश्न आपल्याला पडेल की, काय पैसा देशातील लोकशाही नोटांच्या थप्पीखाली दाबून राबविली जातेय? आपल्याला पडलेल्या या तिन्ही प्रश्नांची उत्तरं एकेक करून समजून घेऊ या. देशात कार्यपलिका असो, न्यायपालिका असो नाही तर मग विधायिका असो ते चालविण्यासाठी पैसे हे लागतातच. मग ते मुख्य न्यायाधीश असोत, प्रधानमंत्री असोत, सनदी अधिकारी असोत वा पोलीस असोत अगदी संसद चालविण्यासाठी असो ह्या साऱ्या यंत्रणा राबविण्यासाठी पैसे हे लागतातच. यासाठीचा होणारा खर्च पहिला तर लक्षात येईल की, याला प्रति मिनिट २ लाख ६० हजार रुपये लागतात. खर्ची पडणारा हा सारा पैसा हा करदात्यांच्या माध्यमातून आलेला असतो. लोकांच्या कष्टातून जमा केलेला पैसा देश चालविण्यासाठी दिला जातो. याशिवाय लोक जी खरेदीविक्री करतात त्याच्यातूनही पैसा जमा होतो. यात सर्वांचा हिस्सा असतो. पण खर्च करताना ही भागीदारी एका व्यक्तीची झाली तर तुम्ही त्याला काय म्हणाल? जर करदात्यांच्या पैसा योग्य विनियोग कार्यपलिका, न्यायपालिका वा विधायिका प्रशासन चालविण्यासाठी करत नसतील तर त्याबाबत लोकांसमोर या बाबी उघड करण्याची जबाबदारी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्धीमाध्यमांची बनते. याच चौथ्या स्तंभाबाबतची चर्चा आपण करू या.

चौथा स्तंभ म्हणजेच जो मीडिया आहे जो लोकांचे प्रश्न, भावभावना जगासमोर मांडत असतो. सरकारनं घेतलेल्या निर्णयांची वस्तुस्थिती काय, जनतेवर त्याचा परिणाम काय होईल, देशाच्या शहरी आणि ग्रामीण भागाबरोबरच दुर्गम भागातही काय परिणाम होऊ शकेल हे जोखून ते लोकांसमोर मांडण्याची जबाबदारी आहे. देशातील उद्योजक असो, कर्मचारी, विद्यार्थी, शिक्षक, कष्टकरी जो कोणत्याही क्षेत्राशी निगडीत असो, नाहीतर आत्महत्या करणारा शेतकरी असो शेतमजूर असो नाहीतर वाढत जाणाऱ्या बेकार कामगारांचा असो असे सारे संवेदनशील विषय मांडतो ज्याचा परिणाम, दबाव हा सत्ताधाऱ्यांवर पडतो. अशा मीडियाच्या कामाबाबत लोक मीडियाचा सन्मान करतात, त्याचा अभिमान बाळगतात. त्यांना असं वाटत असतं की, त्यांचे प्रश्न, त्यांचे मुद्दे मीडियानं मांडले तर सरकारवर त्याचा दबाव येईल! पण सध्या हे घडत नाही त्यांचा उलटा खेळ सुरू झालाय. गेल्या सहा वर्षांत सरकारनं सत्तेवर येताच पहिलं हे काम केलं की, आमच्यासाठी काम करायला सुरुवात करा, फक्त आम्हाला दाखवा, आमची धोरणंच दाखवा. आम्ही केलेल्या घोषणाबाजीला अखेरचं सत्य माना, देशात फिरून सत्य जाणण्याची गरज नाही, लोकांशी संवाद साधण्याची गरज नाही. त्यांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती, स्वयंसेवी संस्था वा विरोधीपक्ष यांना दाखविण्याची गरज नाही. तुम्ही जर असं काही दाखवलं तर जाहिरातींच्या माध्यमातून जी पैश्याची देवाण-घेवाण होतेय ती संपवली जाईल. करदात्यांच्या पैशातून मीडिया चालत नाही. मीडियाचा ग्राहक जनता असते. जनता ते बघते त्यानंतर जाहिरातदार आपल्या मालाची जाहिरात करतात त्यासाठी मीडियाला पैसा मिळतो ते पाहून लोकांना कळतं की, कोणत्या वस्तू चांगल्या आहेत वा वाईट. देशात अचानकपणे स्थिती बदलतेय.सरकारच ग्राहक बनलंय. जाहिरातदारही सरकार झालाय आणि मालकही बनलाय. यारूपात सरकारच मीडियाला पैसे देऊ लागलंय आणि मीडिया चालवू लागलंय. मग तुम्ही काय करू शकणार आहात? या चौथ्या स्तंभाकडून मांडले जाणारे प्रश्न, दाखवल्या जाणाऱ्या बातम्या या खरंच लोकांशी निगडित असतात का? सरकारची भाटगिरी केली जातेय? विरोधीपक्ष आणि विरोधी पक्षातले नेते दाखविण्याचा स्थितीत नसतात. त्यांना वाटतं की, जर केलेल्या आंदोलनाची प्रसिद्धीच होत नसेल वा त्यांना दाखवलं जात नसेल तर लोकांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरायचं तरी कशासाठी? अशी मानसिकता विरोधीपक्षांची आणि त्यांच्या नेत्यांची झालीय. आज याबाबत काही लिहिणार नाही. इथं हे महत्वाचं आहे की, कशाप्रकारे मीडिया सरकारच्या कह्यात गेलाय, जेव्हा सरकारच्या इशाऱ्यावर मीडिया चालायला लागला मग हळूहळू लोकांशी निगडित प्रश्न मांडणं मीडियानं सोडून दिलं. हळूहळू त्यात नाटकीयता आणायला सुरुवात केलीय. त्यांना जेव्हा लक्षात आलं की हे सरकार अपयशी ठरतंय. सरकार योग्य मुद्द्याना हाती घेत नाही. सरकारच्या घोषणा पोकळ ठरताहेत. मग त्यांनी अशा बाबींना नाटकीय स्वरूपात सादर केलं जाऊ लागलं. लोकांचे सारे प्रश्न, समस्या यांना दूर सारलं जाऊ लागलं. सध्याच्या स्थितीत सुशांतचा विषय निर्माण झालाय. इथं एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. ५ ऑगस्टला रामजन्मभूमी मंदिराचं भूमिपूजन झालं. ह्या भूमिपूजनाचा समारंभ दूरचित्रवाणी वाहिन्यांवरचं थेट प्रक्षेपण १६ कोटी लोकांनी पाहिलं. १६ कोटी घरातून नाही तर १६ कोटी व्यक्तींनी ते पाहिलं. भाजपेयींना निवडणुकीत मतं मिळाली होती २३ कोटी. सुशांत राजपूतचं प्रकरण उदभवल्यानंतर आठवड्याचा आढावा घेतला तर लक्षांत आलं की सुशांतचं प्रकरण १८ कोटी लोकांनी पाहिलंय. सुशांतसारखं प्रकरण मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याला मागे टाकणारा ठरला.

चौकट
आता हे पाहू या की, मीडियाला आपल्या हातात कसं घेतलं जातं ते पाहू या. २०१४ च्या मे महिन्यात सरकार अस्तित्वात आलं. नरेंद्र मोदी २६ मे रोजी प्रधानमंत्री बनले. त्यानंतर जून २०१४ पासून प्रचार- प्रसारचा कालखंड सुरू झाला. यांचे तीन हिस्से आहेत. पहिलं सरळसरळ सरकारनं आपल्या अर्थसंकल्पात किती रक्कमेची यासाठी तरतूद केलीय. दुसरं वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून सरकारनं किती पैसा प्रचारासाठी लावलाय. तिसरा हिस्सा निवडणुकीचा! विविध राज्याच्या विधानसभा निवडणुका आणि २०१९ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणूका ज्यात देशाच्या इतिहासात पहिल्यांदा सर्वाधिक पैसा खर्चिला गेला. जर समजून घ्या. जून २०१४ ते मार्च २०१५ या आर्थिक वर्षात ९३५ कोटी ५४ लाख रुपये प्रचारासाठी दिले गेले, त्यात दूरचित्रवाणीवरील न्यूज चॅनल्ससाठी ४४८ कोटी ९७ लाख रुपये होते. प्रिंट माध्यमासाठी ४२४ कोटी ८५ लाख रुपये होतं मग इतर आऊट डोअर प्रचारासाठी वापरला गेला. तो त्यानंतर हळूहळू कसा वाढत गेला ते पहा. एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ दरम्यान ९३५ कोटी रुपयात वाढ होऊन ती १,१७१ कोटी होते. एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ दरम्यान त्यात पुन्हा वाढ होऊन १ हजार २६३ कोटी रुपये होते. एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ मध्ये पहिल्यांदा ती कमी होते. त्यावेळी सारं लक्ष उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीकडं होतं. तो सारा निधी त्यासाठी वळतं करण्यात आला होता. त्याकाळात एक हजार कोटी रुपये खर्च होतात. पण २०१९ मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होत्या त्यामुळं एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ दरम्यान १ हजार ५८५ कोटी ४६ लाख रुपये खर्च होतात. या सर्व पांच वर्षांची गोळाबेरीज केली तर आपल्यासमोर येईल ५ हजार ९१० कोटी रुपये! ही रक्कम सरकारच्या माध्यमातून अर्थसंकल्पातल्या प्रचारासाठी केलेल्या तरतुदीनुसार आहे.त्या संदर्भातली विगतवार माहिती अधिकाराच्या कक्षेत काहीही विचारता येत नाही.२०१४ मध्ये सरकार अस्तित्वात आल्यापासून डिसेंबर २०१९ पर्यंत एकूण दिवस होतात २ हजार ३९ दिवस होतात. जेव्हा आपण २ हजार ३९ दिवसात खर्ची पडलेले ५ हजार ९१० कोटी रुपये विभागून पाहिले तर दिसून येईल की, प्रतिदिन ३ कोटी १८ लाख ७८ हजार ३७१ रुपये. हा प्रतिदिन प्रचारासाठीचा खर्च आहे. गेल्या सहा वर्षातला! या दररोज खर्च होणाऱ्या ३ कोटी १८ लाखाला दिवसाच्या २४ तासात विभागला तर प्रतितासाला १३ लाख २८ हजार रुपये प्रचारावर खर्च केले गेले, त्याला मिनिटात विभागलं तर २२ हजार १३७ रुपये खर्च केले गेले जात होते. ही सारी रक्कम सरकारच्या तिजोरीतून निव्वळ प्रचासाठीची तरतूद आहे इथं हे लक्षांत घेतलं पाहिजे. याशिवाय वेगवेगळ्या योजनांतून निवडणुकांचा प्रचार होतो. त्यातही केवळ एकाच व्यक्तीची छबी असते, ती प्रधानमंत्र्याची! मग ती जाहिरात डिजिटल इंडिया ची असो नाहीतर स्वच्छ भारत अभियानाची असो. कोणत्याही स्वरूपात असो मग ते देशात शौचालय बनविण्याचं असो नाहीतर देशाला डिजिटल स्वरूप देण्याचा असो. वा बांधकाम खात्याकडून रस्ते, पूल तयार करणं असो, त्यावर केवळ प्रधानमंत्र्याचा फोटो आवश्यक मानला गेला. अशा जाहिरातींवर दरमहा एकूण खर्च झालाय ५० लाख रुपये झालाय! त्याचा खर्च वाढत जाऊन ६ हजार ५०० कोटी रुपये पाच वर्षात खर्च केले गेले तर ज्या योजना तयार केला त्याचा खर्च होता १६ हजार ५०० कोटी रुपये! जर पुढं जाऊन पाहू या २०१४ते २०१९ नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांचा खर्च जो लोकसभा निवडणुकीपूर्वीचा आहे तो खूपच वाढलाय. 

हरीश केंची
९४२२३१०६०९

Monday 24 August 2020

फेसबुकचा असली चेहरा!

भारतातल्या निवडणुकांमध्ये केंब्रिज एनालिटीका ने फेसबुककडून व्यक्तिगत माहिती चोरली होती. या साऱ्या प्रकरणात जितकी केंब्रिज एनालिटीका जबाबदार आहे तेवढंच फेसबुक देखील आहे! मार्च २०१८ मध्ये फेसबुकला मोठा झटका बसला, जेव्हा ही बाब समोर आली की, 'केंब्रिज एनालिटीका' नामक एका संस्थेनं बेकायदेशीररित्या ८.७ कोटी फेसबुक वापरणाऱ्यांची व्यक्तिगत-खासगी माहिती मिळवली होती. या संस्थेची मालकी ब्रिटनची एक कंपनी 'स्ट्रॅटेजीक कम्युनिकेशन लॅबोरेटरीज' यांच्याकडं आहे. ज्याचं नेतृत्व अलेक्झांडर निक्स नामक व्यक्ती करते. २४ नोव्हेंबर २०१८ च्या ब्रिटनमधील वृत्तपत्र 'गार्डियन'नं ही बातमी प्रसिध्द करताच ब्रिटनच्या संसदेनं आपल्या विशेषाधिकाराचा वापर करीत फेसबुकचे काही दस्तऐवज जप्त केले. ब्रिटन संसदेला असं यासाठी करावं लागलं होतं की, मार्क जुकरबर्ग सतत संसदेनं विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देण्याचं टाळत होते. 'गार्डियन'नं यात असा दावा केला होता की, या दस्तऐवजांमध्ये फेसबुकच्या 'व्यक्तिगत माहिती' संदर्भातील आपल्या धोरणांबाबत काही महत्वाची कागदपत्रे आहेत.


‘न्यूजक्लिक’चे प्रमुख प्रबीर पुरकायस्थ हे 'डिजिटल एकाधिकार'ला विरोध करत आले आहेत.. ते म्हणतात की, ‘फेसबुककडून मिळालेल्या माहितीचा दुरुपयोग राजनीतिक निर्णयांना प्रभावित करण्यासाठी किंवा कैंब्रिज एनालिटिका करु शकते तर, हेच काम फेसबुक स्वतः अत्यंत चांगल्या पद्धतीनं करु शकेल. यातील सारी माहिती आणि पेजेस चांगल्याप्रकारे पोहचवू शकते. खरंतर केंब्रिज एनालिटिकानं प्रभावित झालेल्या भारतीय फेसबुकधारकांची संख्या तशी कमी आहे. तरीही भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोप होताहेत. दोघांनीही एकमेकांवर केंब्रिज एनालिटिकाची सहयोगी कंपनी स्ट्रॅटेजीक कम्युनिकेशन लॅबरोटारीज प्रायव्हेट लिमिटेड यांची सेवा घेतल्याचा आरोप केलाय. या कंपनीच्या चार संचालकांपैकी दोन ब्रिटनचे तर दोन भारतीय होते. यापैकी अमरीशकुमार त्यागी आसनी अवनिशकुमार राय हे भारतीय संचालक आहेत. यांचीच एक सहयोगी कंपनी आहे, 'ओवलेनो बिझनेस इंटेलिजन्स' यांचे मुख्यसंचालक त्यागी आहेत. हे त्यागी जनता दल युनायटेडचे नेते के.सी.त्यागी यांचे चिरंजीव आहेत. जनता दल युनायटेड केंद्रातील भाजपेयीं सरकारमध्ये सत्तासाथीदार आहेत. बिहारमध्येही यांच्याच युतीचं सरकार आहे. त्यांचे दुसरे साथीदार हिमांशू शर्मा आहेत जे मोदींच्या 'मिशन २७२' आणि मिसकॉल अभियानाशी संबंधित आहेत. त्यागी आणि राय यांच्याशी संबंधित इतर काही कंपन्याही आहेत. याबाबत प्रसिद्धीमाध्यमांनी फारशी चर्चा केलेली नाही. त्याबाबतची माहिती आम्ही इथं देतोय. या कंपन्यांमध्ये 'स्टील्थ ऐनोलिटिक्स अँड बिजनेस सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड, रूटियर ऑपरेशन्स कन्सलटिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि स्पॅन हाऊस कस्टमर सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्या आहेत. यांच्याशी संबंधित लोकांमध्ये अंकुर दहिया, अद्वैत विक्रमसिंह, आणि मदेला गिरीकुमार आहेत. हे सारे लखनौच्या भारतीय प्रबंधन संस्थान लखनऊ इथे शिकलेले आहेत. ही सारी मंडळी आणि त्यांच्याशी निगडित असलेल्या कंपन्या यांची सर्व माहिती खाली दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
https://www.tofler.in/visualization?cin=U93000DL2007PTC169445
https://www.tofler.in/amrish-kumar-tyagi/director/01270318
https://www.tofler.in/avneesh-kumar-rai/director/02964979
https://www.tofler.in/stealth-analytics-and-business-solutions-private-l...
https://www.tofler.in/ankur-dahiya/director/07797248
https://www.linkedin.com/in/ankur-dahiya-104891102/
https://www.linkedin.com/in/girikumarmaddela/
https://www.tofler.in/routier-operations-consulting-private-limited/comp...
https://www.tofler.in/visualization?cin=U93000DL2007PTC169445
केंब्रिज एनालिटिकाच्या म्हणण्यानुसार त्यांनी २०१० मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीत जेडीयु आणि भाजपेयींसोबत काम केलं आहे. पण आता त्यांची वेबसाईट काम करत नाही. त्या वेबसाईटवर दावा करण्यात आला होता की, "आमच्या क्लायंटनं तिथं मोठं यश मिळवलं होतं. केंब्रिज एनालिटिकाने जितक्या जागा मिळवण्यासाठी लक्ष्य ठेवलं होतं त्यापैकी ९० टक्के यश मिळवलं आहे!" २७ मार्च २०१८ ला 'दि प्रिंट' ला दिलेल्या मुलाखतीत राय यांनी म्हटलं होतं, की १९८४ पासून आजवर त्यांनी अनेक राजकीय पक्षांशी सल्लागार म्हणून काम केलेलं आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री आणि नोएडाचे खासदार महेश शर्मा यांच्यासोबत काम केलं होतं. त्याचवेळी त्यागी यांनी राजकीय पक्षांसाठी माहिती गोळा करण्याचं, सर्व्हे करण्याचं कामदेखील केलं होतं. दोघांनी राज्यस्तरावर प्रत्येक कुटुंबांशी संबंधित माहिती संकलित करून त्याचा डेटाबेस तयार केला होता. ज्यात लोकांच्या जाती-जमाती आणि त्यांची राजकीयदृष्ट्या विचारसरणी याबाबत माहिती संकलित केली होती. त्याचा वापर निवडणुकीला उभं राहणारे उमेदवार, इच्छुक करत होते. राय यांच्या म्हणण्यानुसार केंब्रिज एनालिटिकानं भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी राजस्थान आणि मध्यप्रदेश मधील विधानसभा निवडणुकीत मिळणाऱ्या यशाबाबत चाचपणी केली होती. त्यांचा आरोप आहे की, निक्सनं अधिकाधिक पैसे मिळवण्यासाठी आपल्या क्लायंटना 'डबलक्रॉस' देखील केलं होतं.

हे सारं प्रकरण उघडकीस आणणारे ख्रितोफर विली यांनी ब्रिटनच्या संसदीय समितीसमोर मार्चमध्ये दिलेल्या जबाबानंतर दुसऱ्या दिवशी सांगितलं की, या कंपनीनं भारतातल्या लाखो गावांशी संबंधित माहिती संकलित केलीय. त्यांनी सांगितलं की, ही कंपनी २००३ पासून भारतात काम करतेय. उत्तरप्रदेश, बिहार, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम, झारखंड, मध्यप्रदेश आणि राजस्थान इथं झालेल्या विधानसभा निवडणुकीत आणि २००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतही सक्रिय होते. 'द वायर'च्या एका बातमीनुसार अवनिश रे यांनी विलीनं दिलेली माहिती नाकारलीय. केंब्रिज एनालिटिकाचा दावा आहे की, त्यांनी २०१० च्या बिहार विधानसभा निवडणुकीत जेडीयु आणि भाजपसोबत काम केलंय. केंब्रिज एनालिटिकाच्या लोकांनी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांशी चर्चा केली होती. पण या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी असं काही घडलं नसल्याचं म्हटलंय. ३० मार्च २०१८ काँग्रेसचा डेटा विश्लेषण करणाऱ्या प्रवीण चक्रवर्ती यांची एक मुलाखत प्रसिद्ध झालीय त्यात त्यांनी सोशल मीडियावर व्यक्तिगत आणि सार्वजनिक माहिती वेगवेगळी करून पाहिल्याचं सांगितलं. त्यांनी स्पष्ट केलं की, ट्विटर जर कुणी काही टाकलं तर ते सार्वजनिक होतं. फेसबुकवर आपल्या काही मित्रांसाठी पोस्ट टाकली असेल तर ती मी वापरत नाही. म्हणजे त्यातला फरक आपण समजून घेतला पाहिजे. सार्वजनिक माहितीला छेदून व्यक्तिगत माहितीचा वापर त्यांच्या संमतीशिवाय करणं हे खासगी जीवनावर केलेलं हनन आहे. पुढं ते म्हणतात, फेसबुकनं विश्वासघात केलाय. ज्या विश्वासावर लोक असप्लि माहिती नोंदतात त्याचा गैरवापर करणं हे त्यांच्या मूलभूत हक्कावर केलेलं आक्रमण आहे. हीच मूळ समस्या आहे. हे प्रकरण जेवढं केंब्रिज एनालिटिकाशी संबंधित आहे तेवढंच ते फेसबुकशीही संबंधित आहे. साध्या सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर केंब्रिज एनालिटिका नीरव मोदी आहे तर फेसबुक पंजाब नॅशनल बँक आहे. यात दोघेही तेवढेच दोषी आहेत. असं सांगितलं जातं की, चक्रवर्ती यांनी जी काही तुलना केलीय ती फारशी योग्य नाही. फेसबुक आणि ट्विटरवर ज्या पोस्ट केल्या जातात त्या सगळ्याच सार्वजनिक आहेत. फक्त व्यक्तिगत संदेश आणि खातं उघडताना दिली जाणारी माहिती सोडून.

भारत सरकारनं २३ मार्च२०१८ ला केंब्रिज एनालिटिका आणि २८ मार्च २०१८ ला फेसबुकला कारणे दाखवा नोरीस बजावली आहे. सरकारनं फेसबुकला विचारलंय, सुरक्षेसाठी फेसबुक तात्काळ कोणती व्यवस्था करीत आहे. कसरत भारतातल्या लोकांशी संबंधित माहितीचा वापर निवडणुकांवर परिणाम करण्यासाठी होऊ शकणार नाही. सरकारनं फेसबुककडून हेही विचारलंय की, भरतातल्या लोकांची व्यक्तिगत माहिती लीक झालीय का? फेसबुक आणि त्यांच्याशी संबंधित इतर दुसऱ्या कंपन्यांनी ह्या माहितीचा दुरुपयोग निवडणुकीवर परिणाम करण्याचा प्रयत्न झालाय का? आणि डेटा सुरक्षा करण्यासाठी कोणत्या उपाय योजना केल्या आहेत? केंब्रिज एनालिटिकानं असा दावा केलाय की, भारतातल्या लोकांशी संबंधित फेसबुकवरून अशी कोणतीही माहिती बेकायदेशीररित्या काहीही मिळवलेली नाही. पण ही माहिती जनमत सर्व्हेक्षण आणि शोधाद्वारे मिळाली आहे. २६ जुलै २०१८ रोजी केंद्रीय सूचना आणि प्रसारण, दळणवळण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी संसदेत सांगितलं की, फेसबुक वापरणाऱ्या भारतीयांशी संबंधित व्यक्तिगत माहिती केंब्रिज एनालिटिकाकडून संभावित दुरूपयोग प्रकरणाची चौकशी सीबीआयला सोपविण्यात आलीय. दरम्यान कॅलिफोर्निया इथल्या फेसबुक मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशी चिंता व्यक्त केलीय की, फेसबुकवरील माहितीची सुरक्षितता संदर्भात उपाययोजना करण्यासाठी जो काही मोठा खर्च करावा लागणार आहे, त्यानं पुढच्या अनेक वर्षातला नफा कमी होणार आहे.

Friday 21 August 2020

राजकीय अरण्यरुदन....!

"सुशांत राजपूतच्या प्रकरणात सीबीआय चौकशीच्या निमित्तानं शिवसेनेच्या मुसक्या आवळण्याची प्रक्रिया सुरू झालीय. शरद पवार, त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं अशी काही दुहेरी चाल खेळलीय की ज्याच्यामुळं शिवसेनेपुढं अडचणी निर्माण होतील, शिवाय त्यांच्या अस्तित्वाचाही प्रश्न निर्माण होईल. गुदमरून टाकणाऱ्या या परिस्थितीत शिवसेना सत्तात्याग करून रस्त्यावर उतरून शहीद होणार का? जर सीबीआयच्या तपासात आदित्यचं नांव आलं तर मग आजवर मौन धारण केलेल्या काँग्रेसची भूमिका काय असेल? कारण शिवसेनेबरोबर जाणं हे त्यांच्यासाठी मुळातच अडचणीचंच होतं. आताशी राज्यातलं त्यांचं स्थान हळूहळू कमी होत चाललंय. पवारांनी त्यांनाही अडचणीत आणलंय. शरद पवारांना भाजपेयींबरोबर जायचं नाहीये. भाजपलाही हे सरकार पाडायचं नाहीये, पण चालवायचं मात्र आहे. भाजपेयीं अशा संभ्रमावस्थेत आहेत. इकडं कधीही न मिळालेल्या बिहारची सत्ता त्यांना हवीय; तशीच ती महाराष्ट्राचीही हवीय ! त्यासाठी सुशांतच्या सीबीआय चौकशीचा डाव टाकण्यात आलाय. सीबीआय वा ईडीसारख्या तपास यंत्रणेचा केंद्रानं आजवर कसा केलाय याचा इतिहास ताजा आहे."

---------------------------------------------------------

*दे* शात घडणाऱ्या गुन्ह्याचा तपास केव्हा होईल, कसा होईल, कोण करेल, त्याचा निकाल कोण लावेल हे सारं सत्ताधाऱ्यांच्या हातात असतं. सत्ताच ठरवते की, तपास कोण केव्हा करेल, तपासाची दिशा कोणती असेल, यात दोषी कोण असतील, जो तपास सुरू झालाय त्यातून कुणाला कसं वाचवलं जाईल, कुणाला कसं गुंतवलं जाईल, हे सारं काही सत्ताधारीच निश्चित करतात. घडलेला गुन्हा राजकारणावर प्रभाव करणारा असो वा राजकारणातून गुन्ह्यावर दबाव टाकणारा असो. जो गुन्हा राजकारणातून घडलेला असेल तर मग लक्षांत येतं की, सत्तेपुढं कोणतीही ताकद काहीही करू शकत नाही. हे सारं सांगण्याची गरज अशासाठी पडलीय की, सुशांत राजपूत प्रकरणाचा संपूर्ण तपास हा आता सीबीआयकडं सोपविण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं घेतलाय. तसं पाहिलं तर याचा तपास हा सीबीआयकडं ५ ऑगस्टलाच सोपवला होता. पण त्यावर गुन्हा महाराष्ट्रात घडलेला असल्यानं मुंबई पोलीस याचा तपास करतील अशी भूमिका मुंबई पोलिसांनी घेतली तर बिहार पोलिसांनी पाटण्यात तक्रार-एफआरआय दाखल झाली असल्यानं आम्ही तपास करणार. दरम्यान सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीनं सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. त्यामुळं हे प्रकरण 'हाय प्रोफाईल' बनलं. आता संपूर्ण तपास सीबीआय करणार यावर शिक्कामोर्तब झालंय. जेव्हा एखाद्या गुन्ह्याचा तपास सीबीआयकडं सोपविला जातो तेव्हा त्याचा अर्थ स्पष्ट होतो की, ह्या प्रकरणात राजकीयदृष्ट्या काही घडलंय किंवा याचा सारा परिणाम राजकारणावर होणार आहे. सीबीआयकडं तपास जाण्यापूर्वी तपासाची सारी सूत्रं ही मुंबई पोलिसांकडं होती. सुशांतचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा तपास वेगळ्याच दिशेनं चालला होता. म्हटलं गेलं की, या तपासावर राजकीय दबाव होता. बिहार पोलीस सक्रिय झाले तेही राजकीय दबावानंतर. दोन्ही राज्याची तपासाबाबतची अवस्था पाहून केंद्र सरकारनं बिहार सरकारच्या मागणीला लगेचच चार तासात सीबीआय चौकशीला मान्यता दिली. यात राजकीय हेतू दिसून आला. केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांना बिहारच्या आगामी विधानसभा निवडणुका जिंकायच्या आहेत. हे जसं आहे तसंच महाराष्ट्रातल्या शिवसेना सरकारच्या मुसक्या आवळायच्या आहेत. सीबीआय तपासाच्या निमित्तानं इतिहासाची काही पानं उलटवून पाहिली तर लक्षात येतं की, जेव्हा कधी इथं तपास सीबीआयकडं जातो तेव्हा त्यावर राजकारण सक्रिय होतं. त्याचा दबावही येतो. सत्ताधारी राजकारण्यांकडून आपल्या नफा-नुकसानीचा हिशेब करीत त्याकडं पाहिलं जातं. सीबीआय ही एक प्रीमियम तपास यंत्रणा आहे. सीबीआयकडं तपासासाठी सोपवलेल्या अनेक प्रकरणाची एक भली मोठी यादी आहे; ज्याचा कधी तपासच फारसा लागलेला नाही. तशी यादी मुंबई पोलिसांची आहे अन बिहार पोलिसांचीही आहे. सीबीआय तर राजकीय प्रभावाखालीच काम करते हे आजवर अनेकदा आढळून आलंय. आताच्या सत्ताधाऱ्यांच्या कार्यकाळात तर ती अधिक मोठ्याप्रमाणात आलेली दिसून येते. हे कुणीही मान्य करील.

*गोगाईंच्या मते सीबीआयला स्वायत्तता द्यावी*
प्रारंभीच स्पष्ट करायला हवं की, सुशांत प्रकरणातील तपासाची दिशा ही सुशांतची आत्महत्या आहे की हत्या या दिशेनं सुरू झालीय. यात कोण सहभागी आहे. हत्या लपविण्यासाठी आत्महत्येचं रूप दिलं गेलंय का? प्रकरण दाबलं जावं यासाठी कुणी प्रयत्नशील होतं काय? शिवाय एफआयआर दाखल न करता मुंबई पोलीस कशाच्या आधारे तपास करीत होती. दरम्यान 'नेपोटीझम'ची चर्चा सुरू झाली. तपासासाठी मुंबईत आलेल्या बिहार पोलिसांना रोखलं गेलं. ५० दिवसात मुंबई पोलिसांनी अनेकांचे जबाब नोंदविले. ते काय होतं, नाटक तर नव्हतं ना! असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. आता हे सारं सीबीआय पाहिल. ज्या कुटुंबावर हा प्रसंग गुदरलाय त्यांचं, 'तपास योग्य दिशेनं व्हावा' असं म्हणणं काहीच गैर नाही. पण ज्या देशात तपास यंत्रणेवरच राजकीय दबाव टाकण्यासाठी सत्ताधारी सज्ज असतील तर तपास हा अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचत नाही असं आजवर दिसून आलं आहे. हा आजवरचा इतिहास आहे. येस बँकेच्या आर्थिक अफरातफरी प्रकरणात वाधवान बंधूंवर आरोपपत्र दाखल करण्यात एकदिवस उशीर लावल्यानं त्यांना जामीन मिळालाय. हे कसं घडलं? असं घडत तेंव्हा त्यात राजकीय हस्तक्षेप नाही असं कसं म्हणता येईल. असो. सीबीआयबाबत १४ ऑगस्ट २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायाधीश रंजन गोगाई जे आता राज्यसभेचे सदस्य बनले आहेत. त्यांचं दिल्लीतील विज्ञानभवनात स्व. डी.पी.कोहली स्मृती व्याख्यानमालेत त्यांचं व्याख्यान झालं होतं. त्यावेळी अनेक सीबीआय अधिकारी यावेळी उपस्थित होते. त्यांच्यासमोर त्यांनी आपल्या भाषणात एका गोष्टीचा प्रामुख्यानं उल्लेख केला होता. ते म्हणाले होते "ज्या गुन्ह्याचा तपासामध्ये राजकीय दबाव असल्याची शक्यता असते अशा संवेदनशील प्रकरणाचा तपास सीबीआय योग्यप्रकारे, सक्षमपणे करत नाही." त्यांच्याच शब्दात "cbi had not able to meet thy standerd of judicial secyutini number of high profail politicaly and sensetive cases!" याशिवाय त्यांनी म्हटलं होतं की, सीबीआयला देखील सीआयजी सारखी स्वायत्तता द्यायला हवीय. तेव्हाच ती सक्षमपणे काम करील. राजकीय दबावाखाली येणार नाही. आता गोगाई हे खासदार बनले आहेत. त्यांच्या या नेमणुकीनं न्यायालयाला देखील राजकीय दबावाखाली कसं आणलं गेलंय हे दिसून येतं. हे नाकारता येणार नाही. असो.

*महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघेल*
आता सुशांत प्रकरणाची सीबीआय चौकशीनं कोण कोण प्रभावित होताहेत हे पाहू या. सर्वप्रथम महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघणारंय असं दिसून येतंय. सीबीआयच्या माध्यमातून इथं असलेल्या महाआघाडी सरकारला धक्का देण्याची स्थिती निर्माण केली जाईल. यासाठी केंद्र सरकार यात उडी घेईल असं दिसतंय. या सरकारमध्ये असलेल्या वेगवेगळ्या विचारांच्या पक्षांची नेतेमंडळी काय विचार करताहेत हे महत्वाचं आहे. सत्ता डगमगते आहे काय वा या डगमगण्याच्या स्थितीत शिवसेनेला नमवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे की काय? आगामी काळात शिवसेनेला संपवण्यासाठीचे प्रयत्न तर केले जाणार नाहीत ना! अशी शंका येतेय. तशी परिस्थिती निर्माण झालीय वा ती केली गेलीय. इथं हे महत्वाचं आहे की, राज्यात विरोधात असलेल्या भाजपेयीं नेत्यांनी आपल्या पिलावळींच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांच्याबाबत संशयाचं वातावरण तयार केलं. शिवसेनेच्या मंत्र्याकडं बोट दाखवलं गेलं. सत्तेतल्या काही लोकांकडूनच केंद्राला आणि प्रसिद्धीमाध्यमांना बातम्या पुरवल्या जात होत्या असं सांगण्यात येतंय. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा तीन पक्षाचं सरकार आहे. असं असताना पार्थ पवार प्रकरण घडलं. त्याबाबत शरद पवार यांनी खडसावलं पण सत्तेत उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांनी मौन पाळलंय. 'पहाटेच्या शपथविधी'च्या पार्श्वभूमीवर हे त्यांचं मौन प्रकर्षानं जाणवलं. त्यामुळं शिवसेना इथं एकटी पडलीय. शिवसेनेच्या मंत्र्याबद्धल जे वातावरण भाजपेयींनी निर्माण केलंय त्यानं शिवसेना संकटात सापडलीय. आगामी काळात हे संकट अधिक गडद होण्याची स्थिती केंद्राकडून निर्माण केली जाईल. इथं राज्याचं राजकारण लक्षांत घ्यायला हवंय. तीन पक्षाचं सरकार असलं तरी त्याचं नेतृत्व शिवसेना करतेय आणि शिवसेना ही एक हिंदुत्ववादी पक्ष आहे. विरोधात भाजप आहे तो देखील हिंदुत्ववादी पक्ष आहे. राज्यात दलित आणि मुस्लिमांची संख्या लक्षणीय आहे. आंबेडकरी विचारांच्या जनतेनं मराठवाडा असो विदर्भ असो वा मुंबई इथं त्यांना अस्वस्थ वाटायला लागलंय. सत्ताधाऱ्यांचा त्यांच्याशी संपर्क राहिलेला नाही. त्यांनी सर्वत्र आंदोलनं उभी केली आहेत. त्यांना हे सरकार आपलं वाटत नाही. ही परिस्थिती शरद पवार चांगल्याप्रकारे जाणतात.

*सीबीआय सत्ताधाऱ्यांच्या पिंजऱ्यातील पोपट*
दुसरा महत्वाचा मुद्दा हा आहे की, कोरोनाचा महामारीत देशभरातली आर्थिक स्थिती नाजूक बनलीय. तशीच ती महाराष्ट्रातही झालीय. जशी गुंतवणूक व्हायला हवी होती तेवढी झालेली नाही. सेना-भाजप संबंध ताणले गेले आहेत. नरेंद्र मोदी-अमित शहा यांना महाराष्ट्राची सत्ता गेल्याची सल आहे. २०१४ च्या निवडणुकीत या दोघांनी शिवसेनेवर तोंडसुख घेतलेलं होतं; थेट 'वसुली पार्टी' म्हणून संभावना केली होती. शिवसेनेनं सत्तेत अपमानास्पदरित्या सहभागी असतानाही विरोधी पक्षाची भूमिका वठवली होती. ती आता सत्तेत आली आहे. सत्तेला विरोधी पक्षाच्या स्वरुपात राबवता येत नाही. शिवसेनेला ती राबवता आलेली नाही. आता सुशांत राजपूत प्रकरणाच्या माध्यमातून शिवसेनेच्या कारभाराचं मुल्यमापन करायला सुरुवात होईल. शिवसेनेची कोंडी केली जाईल. मुसक्या आवळण्याची स्थिती निर्माण केली जाईल. अशावेळी शिवसेनेला सत्तात्याग करावा लागेल नाही तर भाजपेयींपुढं शरणागती पत्करावी लागेल. हे मी का सांगतोय की, सीबीआयकडं गेलेलं प्रकरण राजकीय दबावाखाली असलं तर ते सत्तेच्या सोयीनं त्याचा तपास करतात. सीबीआयकडं यापूर्वी सोपवलेल्या अगदी बोफोर्सपासून टू जी प्रकरणापर्यंत कशाचाही पूर्णतपास लागलेला नाही. गुगलवर हे तुम्हाला शोधता येईल. राजकीय प्रभावामुळं बोफोर्सचा तपास किती दिवस कसा चाललाय होता हे समजून येईल. टू जी स्केममध्ये तर कुणालाच सजा झाली नाही. न्यायालयानं अनेकदा मागितला असतानाही पुरावाच दिला नाही. याच टू जी स्केमनं देशात सत्ताबदल घडवून आणला होता. हे विसरता येत नाही. सीबीआयकडं जी काही प्रकरण यापूर्वी आली त्यातली ही काही... बी.एस.येडीयुरप्पा ज्यांच्यावर जमीनघोटाळा, खाणघोटाळा, न्यायाधीशांना, वकिलांना, भाजपेयीं नेत्यांना जी लाच दिली त्याच्या नोंदी असलेली डायरी सांपडली होती. पण २०१४ ला देशात भाजपेयींचं सरकार आलं. सीबीआयनं अनेक वर्षाचा तपास थांबवून इथं कोणताच भ्रष्टाचार झाला नाही असं जाहीर केलं. ज्या डायरीत नोंद होती तेही रद्दबातल ठरवलं. आजमितीला येडीयुरप्पा कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत. बेल्लारीतील खाणसम्राट रेड्डीबंधू आठवत असतील. खाण घोटाळ्यात १६ हजार ५०० कोटींचा घोटाळा झाला होता. त्यांचीही केस गुंडाळून टाकली. हेमंत विश्वास शर्मा यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप होता. ते काँग्रेसमध्ये होते. आसामात पाटबंधारे आणि पाणीपुरवठा विभागात जो घोटाळा त्यांनी केला होता त्याची पुस्तिका भाजपनं काढली होती. त्यांना अमेरिकन कंपनीनं लाच दिली होती त्याबाबत परदेशात गुन्हा दाखल झाला होता. ते भाजपेयीं बनले, प्रकरण बंद झालं. शिवराज चौहान यांचा व्यापक घोटाळा सर्वश्रुत आहे. त्यात एका पत्रकाराची हत्याही झाली पण त्यात सीबीआयनं त्यांना क्लिनचिट दिली, आज तेही मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. मुकुल राय, नारदा-शारदा कोट्यवधीचा घोटाळा केस त्याचा तपास ईडी करीत होती. राय भाजपत आले. प्रकरण गुलदस्त्यात गेलं. रमेश पोखरियाल निशंख हे आता केंद्रीय शिक्षणमंत्री आहेत. त्यांना तर मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडावी लागली होती. जमीन घोटाळा, हायड्रो प्रोजेक्ट् घोटाळा, असे अनेक घोटाळे झाल्यानं त्यांना हटवलं गेलं होतं. आज त्याच्या तपासाचं काय झालं याबाबत सीबीआय अधिकारी मौन पाळून आहेत. आपले नारायण राणे यांची ईडी, सीबीआय चौकशी सुरू होती. ते भाजपवासी होताच सारं काही गुंडाळलं. त्यांनीच आदित्य ठाकरेंचं नांव घेतलं आणि सीबीआयच्या चौकशीची मागणी केली. सीबीआयकडं प्रलंबित असलेल्या शेकडो केसेसपैकी ह्या काही आहेत.

*शिवसेनेशी 'बार्गेनिंग' करायला सुरूवात होईल*
सुशांतचं प्रकरण हे राजकीय दबावाखाली सीबीआयच्या माध्यमातून आणलं जाईल. त्यातून शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न सुरू होईल. शिवसेनेशी 'बार्गेनिंग' करायला सुरूवात होईल. जोपर्यंत शिवसेनेचं राज्यात अस्तित्व राहील तोपर्यंत शरद पवार आणि भाजपेयीं या दोघांनाही त्यांची मोठी अडचण असेल. शिवसेनेचं सरकार पाडणं शरद पवारांना सहजशक्य आहे. पण त्यांनी तसं केलं तर मात्र शिवसेना आणखीन मजबूत होईल. म्हणून पवार कधी शिवसेनेचं सरकार पडू देणार नाहीत. राष्ट्रवादीची दुहेरी राजकारणाची खेळी सध्या सुरू आहे. एक पार्थ पवार, अजित पवारांच्या भूमिकेतून, दुसरी तर शरद पवार हे खेळताहेत. ते मुंबई पोलिसांवर विश्वास व्यक्त करतानाच सीबीआयचंही स्वागत करताहेत. राजकीय लाभ कुठं, कसा आहे हे ते चांगलंच जाणतात. भाजपबरोबर जाण्याचा २०१४ मध्ये अनुभव आहेच. त्यावेळी शिवसेनेनं धाकट्या भावाची भूमिका स्वीकारली, त्यामुळं फडणवीस मुख्यमंत्री राहिले. २०१९ ला ही परिस्थिती बदलली, शिवसेनेला भीती होती की भाजपेयीं सत्तेच्या ताकदीनं आपल्याला संपवतील. शिवसेनेची ती भूमिका पक्षाला मजबूत करण्यासाठी होती. ते सध्या सुरू झालंय. पक्ष विस्तारतोय. शिवसेना आपला हिंदुत्ववादी बाणा असल्याचं सांगतानाच भाजप कशी हिंदुत्वावरून भरकटलीय हे दाखवण्याचा प्रयत्न करतेय. इकडं पवारांना आपल्या पक्षाची वाढ करायची असेल तर शिवसेनेची वाट त्यांना अडवावी लागेल. आता सीबीआय चौकशीच्या निमित्तानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेपासून अलग होतील असा कयास केला जातोय. तसं जरी झालं तरी मात्र सरकार कोसळणार नाही. भाजपच्या पाठींब्यावर मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरेंच राहतील पण त्यांना भाजपेयींच्या तंत्रानं वागावं, चालावं लागेल. हे पवारांसाठीही अनुकूल ठरणारं आहे. मतदारांमध्ये असा संदेश जाईल की, शिवसेना झुकली, नतमस्तक झाली. तसं घडलं तर राजकारण भाजपेयींना अनुकूल होईल. पण शिवसेना अशाप्रकारच्या सत्तेसाठी तयार होईल का? एकूण वातावरण पाहता शिवसेना विरोधीपक्ष म्हणून रस्त्यावर येऊन आंदोलन करू शकणार नाही कारण तेच सत्ताधारी आहेत. जर सत्तेवर शिवसेना नसती तर केंद्र सरकार शिवसेना आणि ठाकरे परिवाराच्या विरोधात गेले नसते. राणेही विरोधात गेले नसते, पार्थ पवारनंही अशी भूमिका घेतली नसती. पण आज शिवसेनेची सत्ता आहे, त्यांचंच सरकार आहे. कुण्याकाळी रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या शिवसेनेनं, बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेनं केवळ राज्यातच नव्हे तर देशात दखल घ्यावी असं राजकारण उभं केलं होतं. आपला दबाव निर्माण केला होता. त्या दबावाला घरघर लागायला प्रारंभ तर झालेला नाही ना? हा योगायोग नाही, ही घडवून आणलेली प्रक्रिया आहे. ज्यात काही लोकांना मुद्दामहून लक्ष्य बनवलं गेलंय. आता शिवसेना काय करते हे महत्वाचं आहे. महाराष्ट्र भाजपेयींच्या, नरेंद्र मोदींच्या दृष्टीनं महत्वाचं राज्य आहे. तिथं त्यांना आपल्या नियंत्रणात असलेली सत्ता हवीय. चीनमधून बाहेर पडणाऱ्या व इतर विदेशी उद्योजकाची गुंतवणूकीसाठीची पहिली पसंती महाराष्ट्र हीच आहे. पण केंद्र सरकारच राज्यातल्या सत्तेच्या विरोधात मतप्रदर्शन करत असेल तर गुंतवणूकदार इथं येणार तरी कसे? नरेंद्र मोदींना घसरत्या आर्थिक स्थितीला सावरण्यासाठी विदेशी गुंतवणूक हवी आहे. ती झाली नाही तर केंद्र सरकारवर नामुष्की ओढवेल. त्यामुळं मोदींना महाराष्ट्रातलं सरकार आपल्या प्रभावाखालचं हवंय. सुशांतचं प्रकरण केंद्रासाठी ऑक्सिजनचं काम करतंय. आजवर सत्ताधाऱ्यांनी आपल्या स्वार्थासाठी ईडी, सीबीआय यासारख्या तपास यंत्रणांचा वापर राजकीय लाभासाठी केलाय हे लपून राहिलेलं नाही.

*प्रकरणाला राजकीय वळण हे दुर्भाग्यपूर्ण!*
अखेर चित्रपट अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणी आता सीबीआय चौकशी करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येताच अवघ्या काही तासांच्या खलबतांनंतर महाराष्ट्र सरकारनं सीबीआयच्या चौकशीला सर्वतोपरी सहाय्य करणार असल्याचं जाहीर करून महाराष्ट्र, बिहार आणि केंद्र सरकार या तिघांमध्ये अधिक कटुता येऊ नये याची काळजी घेतलीय. दरम्यान गेले महिनाभर विविध वृत्त वाहिन्यांवरून मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा वा त्यांच्या विरुद्ध संशय निर्माण करण्याचं काम नित्य नेमानं केलं जात होतं; त्यांच्या कानशिलात सणसणीत लगावून दिलीय. मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेनं चालू होता परंतु दोन राज्यांमधील आरोप प्रत्यारोपांमुळंच हा तपास देशातील त्रयस्थ चौकशी यंत्रणेकडं सोपवण्याचा निर्णय घ्यावा लागतोय असं स्पष्ट प्रतिपादन न्यायमुर्ती ऋषिकेश रॉय यांनी आपल्या ३५ पानी निकाल पत्रात केलं आहे. निकालपत्राचं आणखी वैशिष्ट्य म्हणजे या निकालपत्रात कुणाही राजकीय नेत्याविरुद्ध संशयाची सुई दर्शविलेली नाही. खटल्याच्या सुनावणीच्यावेळी एकाही ज्येष्ठ वकिलानं कोणाचंही नाव घेतलेलं नव्हतं असं असतानाही आता निकालपत्र जाहीर झाल्यावर काही नेते राजकीय भुई बडव बडव बडवत आहेत. आता सीबीआय चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांनी गप्प बसणंच अधिक चांगलं! जून महिन्याच्या १४ तारखेला तरुण आणि उमदा अभिनेता मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या घरातच हा दुर्दैवी प्रकार घडला होता. संपूर्ण चित्रपटसृष्टी सुशांतच्या मृत्यूनं हादरली होती. परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे मुंबई पोलिसांनी हा मृत्यू आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त केला होता. जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत तरी पोलिसांच्या या संशयावर कोणीही संशय व्यक्त केला नव्हता. वडीलांसकट त्याच्या कुणाही नातेवाईकांनी यात काही काळेबेरं आहे असं वाटलं नाही. तरीही मुंबई पोलिसांनी सुशांतच्या जवळच्या सुमारे २०-२५ जणांची चौकशी सुरू केली होती. सुशांतच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन तीन दिवसातच त्याच्या वैयक्तिक जीवनाविषयी आणि चित्रपट करकीर्दीविषयी उलटसुलट बातम्या येऊ लागल्या. त्याच्या बँक खात्यातल्या कोट्यवधी रुपयांना अचानक पाय फुटले, सुशांत मानसिक आजारानं ग्रासला होता, इतकंच नव्हे तर तो काळी जादू करणाऱ्या मंत्रिकाची भेट घेत होता असंही प्रकाशात आलं.
याकालावधीत सुशांतच्या वडिलांनी काहीच हालचाल केलेली नव्हती ते शांतपणे आपल्या मुलाचं निधन सहन करत होते परंतु अचानक २५ जुलै रोजी सुशांतच्या वडिलांनी बिहार पोलिसांकडं सुशांतच्या मृत्यूप्रकरणी एफआरआय नोंदवला आणि मगच राजकीय नाट्य सुरू झालं. खरंतर या दुर्दैवी प्रकरणाला राजकीय वळण देणं हे खरोखरच दुर्भाग्यपूर्ण होतं आणि आहेही!

*सीबीआयला शांतपणे तपास करू द्या*
मुंबई पोलिसांवर एक आक्षेप घेतला जात आहे की त्यांनी एफआरआय नोंदवला नाही. यावर वकिलांची मतमतांतरं असतील परंतु माझ्या माहितीप्रमाणे जर एफआरआय नोंदवला असता तर कुणालातरी अटक करावी लागली असती आणि तपास सुरू असताना अटक करणं पोलिसांच्या अंगाशी आलं असतं आणि मीडियानं धुळवड साजरी केली असती. दुसरं महत्वाचं म्हणजे सुशांतच्या वडिलांनी पोलिसांना एक पत्र लिहून दिलं आहे की सुशांतच्या पश्चात मीच त्याचा वारसदार आहे. कुणाला काही व्यवहार करायचे असतील, तर त्यांनी माझ्याशीच थेट संपर्क साधावा. इतरांशी केलेला व्यवहार मला बंधनकारक राहणार नाही. आता बोला या पत्राच्या खाली वडिलांची स्वाक्षरीही आहे. आता श्रीयुत सिंग सांगत आहेत की माझ्या मुलाचा मृत्यू नेमका कशामुळं झाला हे समजलं पाहिजे. मग मुंबई पोलीस काही वेगळं करत होते का? सर्वोच्च न्यायालयाला तसं काही दिसलं असतं तर त्यांनी मुंबई पोलिसांना फटकारलंच असतं. परंतु निकालपत्रात तर असं काहीच नाही. निकालपत्राचा उर्वरित भाग तांत्रिक मुद्यांनी आणि पूर्वीच्या खटल्याच्या संदर्भांनी व्यापलेला आहे. दरम्यान ज्या पोलीसठाण्याच्या हद्दीत हा गुन्हा घडला तिथल्या पोलिसांनी काहीसा ढिसाळपणा दाखवल्यानंच हे प्रकरण हाताबाहेर गेल्याची कुजबुज आहे. हा ढिसाळपणा ही वरिष्ठ पातळीवर झाल्याचं समजतं. झालं गेलं गंगेला मिळालं, आता सीबीआयला निवांतपणे चौकशी करू द्या. थोडा संयम सर्वांनीच दाखवला पाहिजे विशेषतः सर्व राजकीय पक्षांनी "condemnation before investigation is the highiest form of ignorance" हे सर्वांनीच लक्षात ठेवलेलं बरं सीबीआयनी चौकशी केलेल्या प्रकरणाचं काय होतं हे वेळोवेळी दिसून आलं आहेच! दूरचित्रवाणी वाहिन्यांनी देखील याबाबत चोबडेपणा करण्याची गरज नाही. आता कुणासाठी समांतर तपास चालवलाय? सततची मागणी लावून धरल्यानंतर आता चौकशी सुरू झालीय. वाहिन्यांनाचा सीबीआयवर तरी विश्वास आहे ना!
हरीश केंची
९४२२३१०६०९
-

Sunday 9 August 2020

शापित चाणक्य...!


आपल्या स्पष्टवक्तेपणाबद्धल प्रसिद्ध असलेल्या ज्येष्ठ मराठी साहित्यिका श्रीमती दुर्गाबाई भागवत यांनी नरसिंहरावांना पत्र लिहून 'आपण निस्वार्थ बुद्धीनं आणि सचोटीनं केलेलं कार्य पाहता आपण पुन्हा प्रधानमंत्री व्हावं...!' अशी इच्छा व्यक्त केली होती. नरसिंहरावांनी आपल्या राजकीय जीवनात कधीही गटबाजी केली नाही की, कुणालाही आपल्या कळपात आणलं नाही. किंबहुना असा कळप त्यांनी आपल्या कार्यकाळात केलाच नाही. प्रधानमंत्रीपदाच्या कार्यकाळात सर्व महान कार्य त्यांनी एकाकीपणे केलं. सदैव रामाची उपासना करणाऱ्या दिल्लीत 'मरणांति वैराणी' ही त्यांची शिकवण तत्कालीन राज्यकर्ते विसरले. नरसिंहराव हे असे पहिले प्रधानमंत्री आहेत की ज्यांना मृत्यनंतर दिल्लीत दोन फूट जागाही मिळू नये म्हणून काँग्रेसच्या नेत्यांकडून प्रयत्न झाले. याशिवाय संसद भवनात आणि पक्षाच्या कार्यालयातही त्यांच्या तसबिरीसाठी जागा उपलब्ध करून दिली नाही. त्यांचा जन्मदिवस वा पुण्यतिथी पक्षाच्या पातळीवर कधीही साजरी केली जात नाही. यंदाचं वर्ष हे त्यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे; पण त्याबाबत पक्षांत काही उपक्रम नाहीत की, काही कार्यक्रम. रावांनी कुणाच्याही खिशाला हात न लावता केलेली देशाची प्रगती आपण विसरलो. खरोखरच आपण इतके कृतघ्न आहोत का? असं असलं तरी त्यांनी देशासाठी घेतलेले निर्णय पाहून इतिहासकार त्यांची 'शापित चाणक्य' म्हणूनच नोंद करतील हे मात्र निश्चित..!"

---------------------------------------------------

*आ* युष्यात त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण पदांची जबाबदारी स्वीकारल्यानं नरसिंहरावांजवळ ज्ञानाचं, अनुभवाचं विपुल भांडार होतं. कुशल परराष्ट्रमंत्री म्हणून त्यांचा जगात नावलौकिक होता. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अगणित पैलू होते. दृढनिश्चयी आणि जिद्दी स्वभाव यामुळं पाच वर्षे पूर्ण करेनच याची त्यांना शाश्वती होती. त्यांनी कधीही गटबाजी केली नाही की कोणाला आपल्या कळपात आणलं नाही. सर्व कार्य एकाकीपणे केलं. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे. त्याचा अर्थ, 'विद्या मनुष्याचं मोठं रूप, लपवलेलं धन, भोगविलास, यश, सुख देणारी, गुरूंचे गुरु, विदेशगमनात नातलगांसारखी मदत करणारी, मोठे भाग्य आहे. विद्या राजदरबारात सन्मानली जाते...!' सुसंस्कृत, विद्वान, दार्शनिक, अनेक भाषांवरील प्रभुत्व, याचमुळे नरसिंहरावांना संकटाचा अक्राळविक्राळ चक्रव्यूह भेदून देशाला अग्रेसर करण्यात यश आलं. हीच विद्या त्यांच्या यशस्वितेचं गमक ठरलीय. अलीकडे राजनेत्यांमध्ये अशी विद्वत्ता पाहण्यास सहसा मिळत नसल्याचं अनेक राज्यकर्ते मान्य करतात. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९९१ मध्ये भारतासमोर अशी खडतर आव्हानं होती, तशी आतापर्यंत कोणत्याही प्रधानमंत्र्यासमोर नव्हती. एकाबाजूला रक्तरंजित दहशतवाद, सीमेवर अशांती, परदेशी चलनाच्या संकटांचं महाभयंकर रूप, सोनं गहाण टाकून दैनंदिन गरजा भागविण्याची किमया....थोडक्यात सर्व बाजूंनी सत्तेच्या खुर्चीला काटेरी आवरण होतं. हे चक्रव्यूह भेदून बाहेर येण्याचं सामर्थ्य अवतारी ईश्वरास वा महापुरुषालाच शक्य असतं. सत्तेपासून जवळपास संन्यास घेतलेल्या शांत, संयमी, संताचे गुण असलेल्या मौनीबाबा-नरसिंहरावांना सत्तेच्या स्पर्धेत नसतानाही ही जबाबदारी घ्यावी लागली. अनेकांना नरसिंहरावांना मिळालेल्या पदानं झालेलं दुःख, वेदना पचविता आलं नाही. मग या असंतुष्टांनी देशहिताची पर्वा न करता त्यांनी जणू काही विरोधाचं राजकारण सुरू केलं. पण प्रधानमंत्रीपद स्वीकारल्यानंतर लगेचच तेरा दिवसातच कर्जाचा हप्ता देऊन देशाची अब्रू वाचण्याची किमया करायची होती. चाकोरी सोडून आर्थिक सुधारणा व्यापार आणि व्यवसायाचं निजीकरण आणि भूमंडलीकरण याकडं तातडीनं लक्ष देण्याची गरज होती; ते त्यांनी पार पाडलं. 'सर्व सोंगे आणता येतात पण पैशाचं नाही!' संपूर्ण दिवस खर्च करून प्रशासनिक अनुभव, जगातील आर्थिक उलढालीची साद्यांत माहिती असलेल्या परंतु राजकारणात नसलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांची अर्थमंत्री म्हणून रावांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता निवड केली. जवळपास १९९२ चा अर्थसंकल्प तयार होईपर्यंत बहुतेक वेळ अर्थमंत्र्यांशी चर्चा करण्यात जाऊ लागला. अर्थमंत्रालयासाठी इतका वेळ देणारे नरसिंहराव हे पहिलेच पंतप्रधान असावेत. नरसिंहरावांजवळ विशाल दूरदृष्टी आणि पारदर्शकता होती म्हणून त्यांचे प्रत्येक पाऊल सामान्यांना न समजणार्‍या नवीन चाकोरीतून टाकलं गेलं. परराष्ट्रनीतीच्या परिवर्तनासाठी शस्त्र म्हणून उपयोग होईल असं नवीन आर्थिक धोरण तयार करण्यात आलं. परिस्थितीच्या गांभीर्याची कल्पना नसल्यामुळं मंत्रिमंडळातील अनेकांनी त्याला विरोध केला. प्रधानमंत्र्याना त्यांची कीव आली. या विरोधामागे देशप्रेम नसून दुसऱ्या नेत्यावरील निष्ठा होती. विरोध करणारी ही माणसं नरसिंहरावांनी उमेदवारीची तिकिटं दिलेली नव्हती. अशांनी अर्थमंत्र्यांबद्धल नाराजी व्यक्त केली. तेव्हा 'मला सरकार चालवायचं आहे पद नाही...!' असं स्पष्ट म्हणत, त्यांनी स्वीकारलेल्या धोरणामुळं ते कधी कुणाच्याही दबावाखाली आले नाहीत. काही विद्वान खासदारांनी प्रधानमंत्र्याची भेट घेऊन अर्थमंत्र्यांचा राजीनामाही मागितला. रावांनी कपाळावर हात मारला. त्यांनीच अर्थमंत्र्याच्या कारभारात कधी ढवळाढवळ केली नव्हती. काही वेळेला त्यांची मतं प्रधानमंत्र्याना पटत नव्हती; पण चालत्या गाड्याला खीळ नको म्हणून ते बोलत नसत. त्यामुळं त्या विरोध करणाऱ्या खासदारांना भीक घातली नाही!

*रावांनी तत्त्व न सोडता परराष्ट्रनीतीत बदल केले*
अमेरिका, चीन, जपान, युरोपीय देश औद्योगिक व्यापार क्षेत्रात अग्रेसर होत असताना भारताचे त्यांचे म्हणावेत असं सलोख्याचे संबंध अविकसितच राहीले; कारण भारताचे रशियाशी असलेले जिव्हाळ्याचे मैत्रीचे संबंध! त्याचवेळी रशियाचे अस्तित्व संपुष्टात आल्यानं अमेरिका एकमेव शक्तिशाली राष्ट्र होते. भारताचं तत्त्व न सोडता परराष्ट्रनीतीत बदल करण्याची आवश्यकता होती. आजच्या प्रगतिशील युगात परराष्ट्रनीतीत व्यापार आणि उद्योग यांना प्राधान्य असतं याची कल्पना रावांना होती. काही अंशी दबाव येण्याची शक्यता गृहीत धरून रशियाला नाराज न करता अमेरिकेशी; तसेच इतर देशांशी मैत्रीचे संबंध वृद्धिंगत करण्याचे प्रयत्न झाले. नरसिंहरावांच्या धुरंधर व्यक्तिमत्त्वामुळं, चाणक्य नीतिमुळं केवळ दोन वर्षातच देशाचा चेहरा 'वैधव्य जाऊन नव्या नवरीसारखा लोभस' झाला. जगानं हा बदल पाहून तोंडात बोटं घातली. त्यानंतर त्यांचा कल भारताकडे वळू लागला हे सर्वात महत्त्वाचं होतं ते अमेरिकेचे अध्यक्ष क्लिंटन यांनी केलेल्या कौतुकाला! ही जादूची कांडी पाहण्यासाठी ते उत्सुक झाले. मार्च १९९४ ला प्रधानमंत्र्याना लिहिलेल्या पत्रामध्ये राव यांचं खूप मोठं कौतुक करण्यात आलं. एवढेच नव्हे तर न्यूयॉर्कची वर्तमानपत्रं भारताबद्धल चांगलं लिहू लागली होती. पण आपल्या प्रधानमंत्र्याचं कौतुक करण्यासाठी भारतीयांजवळ वेळ नसावा. हे करत असताना देशांतर्गत परिस्थितीचा विसर पडणं अशक्य होतं. त्यांनी पंजाब, काश्मीरमधील दहशतवाद संपुष्टात आणून तिथं लोकप्रतिनिधींची सरकार आणण्याचं स्वप्नातही खरं वाटणार नाही असं धाडस केलं. कृषी, औद्योगिक उत्पादनात योग्य धोरणांमुळं भरपूर वाढ झाली. त्रिपुरासारख्या सीमेवरील मागासलेल्या भागात आधुनिक तंत्रज्ञानाचं शिक्षण देणारं इंजिनिअरिंग कॉलेज सुरू केलं. नरसिंहराव स्वतः शेतकरी असल्यामुळं शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांना माहीत होत्या. सर्वांना व्यवसाय बदलण्याचं स्वातंत्र्य आहे मग शेतकऱ्याला ते का नसावं? हे मत त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवलं होतं. आजच्या आधुनिक युगात त्याला जोड धंदा कसा देता येईल, या दृष्टीनं शेती असणाऱ्या काही खासदारांशी चर्चा करून त्यांना योजना आखण्याबाबत सुचवलं. शेतकऱ्यांच्या आत्महत्या टाळण्यासाठी ही योजना प्रशंसनीय ठरली असती. गरिबांसाठी ग्रामीण भागात उपयुक्त मजबूत पण स्वस्त घरं कशी बनवता येतील याचा त्यांनी ध्यास घेतला होता. देशातील आणि परदेशातील या क्षेत्रातील लोकांना मॉडेल्स तयार करण्यास सांगून रखरखत्या उन्हात तीन-चार तास खर्च त्यांनी पाहणी केली. विजेची वाढती गरज लक्षात घेऊन अपारंपारिक ऊर्जाशिवाय पर्याय नाही हे त्यांनी वैज्ञानिकांना पटवून दिलं आणि ही कमीत कमी खर्चात कशी तयार होईल यासाठी प्रयत्न करायला सांगितलं. देशातील आणि परदेशातील ऊर्जा तयार करणाऱ्या संस्थांना अनेकदा त्यांनी भेटीही दिल्या. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर संस्कृतचे विद्वान डॉ. मधुकर आष्टीकर यांना 'वेदांतील गैरपारंपरिक ऊर्जेचे स्रोत' याचा अभ्यास करून शोधनिबंध तयार करण्यास सांगितलं. हा निबंध टाटा कन्सल्टन्सीनं प्रसिद्धही केला. पण रावांनंतर सत्तेवर आलेल्यांनी मात्र त्याकडं दुर्लक्ष झाल्याचं दिसतं!

*विकासाचा जगन्नाथाचा रथ एकट्यानेच ओढला*
नरसिंहरावांना बाबरी मशीद ढाचा पाडल्याबद्धल सारासार विचार न करता दोषी ठरविण्यात आल्याचं दिसतं. १६ जुलै ते ३ डिसेंबर १९९२ पर्यंत सतत हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजातील, सर्व क्षेत्रातील व्यक्तींशी त्यांनी संवाद साधला होता. दोन्ही समाजातील आपल्या मागणीवर ठाम राहील्यामुळं पर्याय निघाला नाही; म्हणून मग शेवटी मुख्यमंत्र्यांची, सर्व पक्षश्रेष्ठींची, महत्त्वाच्या व्यक्तींची एक बैठक बोलावून जवळपास बारा तास चर्चा रावांनी केली. त्यातूनही काहीच निष्पन्न झालं नसल्यामुळं शेवटी त्याची जबाबदारी सर्वांच्या सल्ल्यानं उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवून टाकली होती. त्यांनी त्याबाबत आश्वासनही दिलं. मशीद पडल्यानंतर अशी टीका झाली तसा एकही पर्याय आतापर्यंत कोणी सुचवलेला नव्हता. एका पत्रकारानं तर बैठकीत स्पष्ट सांगितलं होतं की, हा प्रश्न सोडविण्याची कुणाचीच इच्छा नाही तर त्याचा राजकीय ईश्श्यू करण्याचा प्रयत्न काहींचा आहे. नरसिंहराव यांच्या मृत्यूनंतर एका पत्रकारानं लिहिलंय की, 'चीनच्या प्रधानमंत्र्यांनी १९६२ मध्ये विश्वासघात केला तेव्हा पंडित नेहरूंनी जबाबदार धरण्यात आलं नव्हतं. मग उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी विश्‍वासघात केला तर नरसिंहराव जबाबदार कसे काय?' जुलै १९९३ मध्ये लोकसभेत चर्चेसाठी आलेला अविश्वास प्रस्ताव विरोधी पक्ष मंजूर होऊ देणार नाही याची त्यांना खात्री होती. कारण त्यांचं आणि विरोधी पक्षातील नेत्यांशी असलेले संबंध! त्यामुळं सरकार मजबूत बनलं होतं. भारताची प्रगती पाहून, इथलं स्थायी सरकार पाहून भारतात गुंतवणुकीसाठी आलेले परदेशी पाहुणे 'गेटवे ऑफ इंडिया' पर्यंत येऊन पोहोचले होते. सरकार पडले असते तर ते पाहुणे तसेच परत गेले असते आणि आणखी दोन-तीन वर्ष त्यांनी भारताकडं ढुंकूनही पाहिलं नसतं. एवढा विचार करण्याची क्षमता काही काँग्रेस सदस्यांमध्ये नसल्यामुळे अति उत्साहानं त्यांनी झारखंड मुक्ती मोर्चाच्या सदस्यांना आपल्याकडं ओढून आणलं. याचा फायदा सत्तेवरील सर्वांना झाला पण त्रास मात्र अनेक वर्ष नरसिंहरावांनी एकट्यानेच कोर्टकचेऱ्या सहन करीत केला. नरसिंहरावांना वेळेची किंमत फार होती. देशात कुठेही जा, दुसरा दिवस सकाळपासून मिळावा म्हणून ते मुक्कामासाठी रात्रीच दिल्लीला येत. दिवस वाया जातो म्हणून त्यांच्या निवासस्थानी कोणताही सण साजरा करत नव्हते. नरसिंहरावांचे वैभव, नेतृत्व, कार्य आणि सर्वत्र होणारा उदोउदो हे त्यांच्या अनेक सहकार्‍यांना बघवलं नाही. पदाचा, देशाचा विचार न करता नरसिंहराव आता नको या एकाच ध्येयाने त्यांना पछाडले होते. त्यामुळे सुधारणांचा, प्रशासनाचा, विकासाचा जगन्नाथाचा रथ रावांना एकट्यालाच ओढावा लागत होता. जगानं गौरवलेल्या आर्थिक सुधारणांचं भांडवल १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत हेतुपुरस्सर न केल्यामुळं संसदेत काँग्रेसपक्षाची सदस्य संख्या घटली. तरीही सरकार बनण्याची शक्यता असूनही केवळ पुन्हा नरसिंहराव नको म्हणून त्यांनी कमी सदस्य असलेल्या इतर पक्षाला सरकार बनविण्यासाठी पाठिंबा देण्याचं ठरवलं .या पापाचे धनी झाल्यामुळं जवळपास सात-आठ वर्ष काँग्रेसपक्ष सत्तेवर नव्हता म्हणजे 'जो दुसऱ्यासाठी खड्डा खणतो तोच त्यात पडतो!' असं म्हणतात, हे खरं आहे.

*टीका पचवून आपलं पद त्यांनी टिकवलं*
१९९१ ते १९९६ या काळात पंतप्रधान नरसिंहराव हे कमीत कमी बोलण्याबाबत प्रसिद्ध होते. जेव्हा पाच वाक्य बोलायची गरज असेल तेव्हा केवळ एक वाक्य बोलायचं असं त्यांचं संवाद कौशल्य होतं. निर्णय घेण्याबाबतही ते असेच मितभाषी होते. इंदिरा गांधी पक्षातल्या लहानसहान घटनांत लक्ष घालत असत पण नरसिंहराव पंतप्रधान म्हणून लक्ष घालण्याची गरज नसेल तर लक्ष घालावं अन्यथा घालता कामा नये अशा मतांचे ते होते. पंतप्रधान असताना त्यांनी भारताची अर्थव्यवस्था पूर्ण बदलून टाकली. ४५ वर्षांचा नियंत्रित अर्थव्यवस्थेचा अनुभव काही चांगला नव्हता. भारताला १९९० साली आपलं सोनं गहाण टाकून परकीय चलनाची गरज भागवावी लागली होती. त्यामुळं राव यांनी ही अर्थव्यवस्था बदलून मुक्त अर्थव्यवस्था आणण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मनमोहनसिंग यांना अर्थमंत्री करून त्यांना पूर्ण राजकीय संरक्षण दिलं. २५ जुलै १९९१ रोजी त्यांनी सादर केलेल्या केन्द्रीय अर्थसंकल्पात बदललेल्या अर्थव्यवस्थेचं दर्शन घडलं. याच दिवशी नरसिंहराव यांच्या चरित्रावर प्रकाश टाकणारं त्यांचं नवं चरित्र प्रकाशित झालं. त्यापूर्वीच नरसिंहराव यांनी आत्मचरित्र प्रसिद्ध करून आपल्या आयुष्यावर बराच प्रकाश टाकला आहे. त्याचा मराठी अनुवाद 'इनसायडर' या नावानं प्रसिद्ध झालेला आहे. असं असलं तरीही राव पंतप्रधान झाल्यानंतरच्या आणि त्या आसपासच्या काही घटनांच्या संदर्भात रावांनी घेतलेल्या काही निर्णयावर म्हणावा तेवढा प्रकाश पडलेला नाही. नरसिंहराव पंतप्रधान असताना बाबरी मशीद पाडण्यात आली. याबाबत अनेक प्रवाद आहेत. मशीद पाडण्यात नरसिंहराव यांचीच फूस होती असंही काही लोक सांगतात तर काही लोक रावांना याबाबत फसवण्यात आलं असं म्हणतात. यावर या चरित्रात प्रकाश टाकण्यात आलाय. लेखक विनय सीतापती यांनी नरसिंहराव यांच्या घरातला त्यांचा पत्रव्यवहार आणि काही नोंदी यांचा आधार घेऊन हे पुस्तक लिहिलंय. नरसिंहराव यांनी हिंदुत्ववादी संघटनांशी बाबरी मशीद पाडण्याबाबत हातमिळवणी केली होती असा आरोप रावांच्यावर त्यांच्याच पक्षातून करण्यात आला होता. पण या लेखकाला तसं त्यांच्या निवासस्थानातल्या कागदपत्रात काही सापडलं नाही. रावांनी त्यासाठी के केलं ते वर आलेलं आहे. बाबरीनंतर रावांवर चिखलफेक करून त्यांना पंतप्रधानपदावरून हटवावं अशी कारस्थानं पक्षातच सुरू होती पण नरसिंहराव त्यांना पुरून उरले आणि त्यांनी आपलं पद टिकवलं.

*गृहमंत्री असताना अधिकार रोखले गेले*
सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपदावर रावांच्या नावाला दुजोरा दिला होता पण ते फार अल्पकाळ या पदावर राहतील आणि नंतर आपणच पंतप्रधान होऊ अशी सोनिया गांधी यांची कल्पना होती पण नरसिंहराव यांनी त्यांची ही कल्पना फोल ठरवली त्यामुळे सोनिया गांधी त्यांना हाकलायला टपलेल्याच होत्या. या निमित्तानं सोनिया गांधी यांनी लिहिलेली काही पत्रे रावांच्या निवासस्थानी आहेत. इंदिरा गांधी यांची हत्या झाली तेव्हा नरसिंहराव हे गृहमंत्री होते. या घटनेनंतर झालेल्या शीख विरोधी दंगलीत त्यांची गृहमंत्री म्हणून भूमिका काय होती असा प्रश्‍न अनेकदा उपस्थित होत असतो. या संबंधात या प्रस्तावित पुस्तकात मोठी निर्णायक माहिती दिसून येते. इंदिरा गांधी यांची हत्या सकाळी ११ वाजता झाली आणि त्यात त्यांचं प्राणोत्क्रमण झालं पण तशी अधिकृत घोषणा सायंकाळी करण्यात आली. दुसऱ्या दिवशी दिल्लीत कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शीखांची हत्या करण्यास सुरूवात केली. नरसिंहराव गृहमंत्री म्हणून या हिंसाचाराला पायबंद घालतील अशी भीती राजीव गांधी यांच्या सल्लागारांना वाटत होती. म्हणून त्यांच्या एका सल्लागारानं दिल्लीतल्या वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना फोन करून यापुढं त्यांनी गृहमंत्र्यांचे आदेश न घेता थेट पंतप्रधान कार्यालयाकडून आदेश घ्यावेत असं फर्मावलं. त्यामुळं दिल्लीतल्या जळितकांडाला आटोक्यात आणण्याबाबत नरसिंहराव यांना काहीही करता आलं नाही. नरसिंहराव हे देशातले गांधी नेहरू घराण्याबाहेरचे गुलझारीलाल नंदा, लालबहाद्दूर शास्त्री यानंतरचे पहिलेच कार्यकाळ पूर्ण करणारे कॉंग्रेसी पंतप्रधान होते. त्यामुळे ते कसा कारभार करतात यावर अनेकांच्या नजरा होत्या. कारण समाजाच्या एका वर्गात का होईना पण या देशावर या घराण्याचाच कुणीही वारसदारच राज्य करू शकतो आणि अन्य कुणात ती क्षमता असूच शकत नाही असा विश्‍वास होता. नरसिंहराव यांना मात्र राजीव गांधी आणि त्यातल्या त्यात सोनिया गांधी यांच्या क्षमतांची चांगलीच माहिती होती. राजीव गांधी यांनी पंतप्रधान व्हायला नको असं त्यांचं मत होतं आणि सोनिया गांधी यांच्या पंतप्रधानपदाला तर ते स्वत:च आडवे आले होते. सोनिया गांधी यांनी अनेक प्रकारांनी प्रयत्न केला पण नरसिंहराव यांंनी त्यांची ही महत्त्वाकांक्षा पुरी होऊ दिली नाही. शेवटी सोनिया गांधी यांंनी रावांच्या विरोधात पक्षातल्याच अर्जुनसिंग आणि एन डी तिवारी यांंना उभं केलं पण त्यांना याही मार्गानं पंतप्रधान होता आलं नाही. गजपती यांच्या या पुस्तकात नरसिंहराव आणि सोनिया गांधी या दोघांच्या संबंधावर चांगलाच प्रकाश टाकलाय. २००४ साली सोनिया गांधी यांनी चालून आलेलं पंतप्रधानपद नाकारलं आणि फार मोठा त्याग केला असं कॉंग्रेसचे नेते भासवतात पण प्रत्यक्षात सोनिया गांधी या पदाला हपापलेल्या होत्या असं या पुस्तकात दाखवूून देण्यात आले आहे.

*देशाच्या राजकारणाला व विकासाला नवी दिशा*
भारतीय अर्थव्यवस्थेची गाडी रुळावरून पूर्णपणे घसरली आहे हे तोपर्यंत सर्व देशाला समजलं होतं. इराकनं कुवेतवर केलेल्या चढाईमुळं आखाती युद्धाला सुरुवात झाली होती. त्यामुळं तेलाचे दरही गगनाला भिडले होते.
एनआरआय मंडळींनी भारतातील गुंतवणुकीचा हात आखडता घेतला आणि त्यामुळं भारतातील डॉलर्सची गंगाजळी लक्षणीयरित्या घटली. या लोकांनी भारतीय बँकांमधले ऑक्टोबर १९९० पासून डॉलर्स काढून घ्यायला सुरुवात केली. केवळ तीन महिन्यात त्यांनी २० कोटी डॉलर्स माघारी नेले. १९९१ च्या एप्रिल ते जून या महिन्यात ९५ कोटी डॉलर्स काढून घेण्यात आले. भारतानं अल्पमुदतीची कर्जं भरपूर घेतल्यामुळेही अर्थव्यवस्थेवर ताण आला होता. या सर्व पार्श्वभूमीवर नरसिंहराव पंतप्रधान झाले होते. २० जून रोजी त्यांच्याकडं कॅबिनेट सेक्रेटरी नरेश चंद्रा आठ पानांची एक नोट घेऊन आले. येणाऱ्या पंतप्रधानांनी आणि काही मंत्रालयांनी विशेषतः अर्थ मंत्रालयानं कोणती पावलं तातडीनं उचलायला हवीत याची कल्पना देणारी ती नोट होती. ही नोट वाचताच नरसिंहराव यांनी नरेश यांना विचारलं, "खरंच देशाची आर्थिक स्थिती इतकी वाईट आहे का?" त्यावर चंद्रा यांनी, "नाही… याहूनही वाईट आहे", असं उत्तर दिलं. त्यानंतर चंद्रा यांनी चंद्रशेखर सरकारनं केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली आणि कोणत्याही स्थितीत देशावर दिवाळखोरीची स्थिती येणार नाही यासाठी आपण प्रयत्न करण्याची गरज असल्याचं नरसिंहराव यांना सांगितलं. जून १९९१ मध्ये, राजकारणातून जवळपास निवृत्त झालेल्या नरसिंहराव या नेत्याच्या गळ्यात पंतप्रधानपदाची माळ पडली. हे जितकं अनपेक्षित होतं तितकंच किंबहुना त्याहून अधिक अनपेक्षित होतं, सक्रिय राजकारणाशी सुतराम संबंध नसलेल्या मनमोहनसिंग यांच्याकडे अर्थमंत्रीपद जाणं! आणि त्यापेक्षा जास्त अनपेक्षित होतं, नरसिंहराव-मनमोहन सिंग या जोडीनं देशाच्या अर्थव्यवस्थेला कलाटणी देणारं धोरण आखून त्याची धडाकेबाज पद्धतीनं अंमलबजावणी सुरू करणं! त्या वेळी हे दोघं मध्यावधी निवडणुकीनंतर सत्तेवर आलेल्या अल्पमतातील काँग्रेस सरकारचे प्रतिनिधी होते, राजीव गांधींच्या हत्येनंतर सोनियांनी राजकारणापासून दूर राहायचं ठरवलं होतं, अखिल भारतीय स्तरावर काँग्रेस पक्षाला बांधून ठेवू शकेल असा नेता नव्हता, भाजपनं राम मंदिराचं आंदोलन चांगलंच पेटवलं होतं, पंजाब तुटतोय की काय असं वाटावं इतका धुमसत होता आणि तेलाच्या राजकारणातून उद्‌भवलेल्या आखाती युद्धाची राख पुरती विझलेली नव्हती. अशा आव्हानात्मक नव्हे तर स्फोटक परिस्थितीत, राजकीय ‘मास बेस’ नसलेले नरसिंहराव आणि राजकारणातच नसलेले मनमोहनसिंग यांनी देशाच्या राजकारणाला आणि विकासाला नवी दिशा देण्याचं धोरण आखावं हे धाडस नव्हे तर चमत्कारच म्हटला पाहिजे!

*मनमोहनसिंग यांची अर्थमंत्री म्हणून निवड*
आता देशासमोर असलेला आर्थिक पेच सोडवण्यासाठी एखाद्या विशेष अर्थतज्ज्ञाची नेमणूक करण्याची गरज असल्याचं नरसिंहराव यांच्या लक्षात आलं होतं. त्यांनी तातडीनं अर्थमंत्रीपदासाठी उमेदवार व्यक्तीचा शोध घ्यायला सुरुवात केली. आता राजकारणाबाहेरच्या व्यक्तीलाच या पदावर नेमलं पाहिजे हे सुद्धा त्यांनी जाणलं होतं. त्यांच्यासमोर दोन नावं आली… त्यात एक होतं डॉ. आय.जी पटेल आणि दुसरं होतं मनमोहनसिंह यांचं. नरसिंहराव यांनी डॉ. मनमोहनसिंग यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आणि डॉ. सिंग यांच्यापर्यंत ही माहिती पोहचवून त्यांना राजी करण्याचं काम पी. सी. अलेक्झांडर यांच्यावर सोपवलं. अलेक्झांडर हे इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या कार्यकाळात पंतप्रधानांचे मुख्य सचिव होते. ही घटना अलेक्झांडर यांनी आपल्या 'थ्रू द कॉरिडॉर्स ऑफ पॉवर' या आत्मचरित्रात लिहून ठेवलीय. अलेक्झांडर यांनी २० तारखेलाच मनमोहनसिंग यांच्या घरी फोन केला. पण डॉ. सिंग युरोप दौऱ्यावरून रात्री उशिरा पोहोचतील असं त्यांच्या कुकनं अलेक्झांडर यांना सांगितलं. त्यानंतर २१ तारखेला पहाटे ५ वाजताच त्यांनी सिंग यांच्या घरी फोन केला. तेव्हा डॉ. सिंग झोपल्याचं आणि त्यांना डिस्टर्ब करू नये असं सांगण्यात आल्याचं खानसाम्यानं सांगितलं. तेव्हा अलेक्झांडर यांनी आपलं नाव वारंवार सांगून काही प्रभाव पडतोय का याची चाचपणी केली. मात्र समोरच्या कर्तव्यपरायण व्यक्तीवर काहीच प्रभाव पडला नाही. शेवटी त्यांनी फारच आग्रह केल्यावर डॉ. सिंग यांना उठवण्यात आलं. अलेक्झांडर यांनी सिंग यांना एक अत्यंत तातडीचं काम असून मी काही मिनिटांत भेटायला येतोय असं सांगितलं. थोड्या वेळातच अलेक्झांडर त्यांच्या घरी पोहोचले होते तोपर्यंत जेट लॅगमुळे त्रस्त झालेले डॉ. सिंग पुन्हा झोपी गेलेले होते. त्यांना पुन्हा उठवण्यात आलं आणि अखेर अलेक्झांडर यांनी अर्थमंत्री म्हणून तुमच्या नावाला नरसिंहरावांनी पसंती दिल्याचं सांगितलं. त्यावर डॉ. सिंग यांनी यावर तुमचं मत काय आहे असा प्रश्न अलेक्झांडर यांना विचारला. त्यावर माझं जर यापेक्षा वेगळं मत असतं तर अशा अवेळी मी तुमच्याकडे आलो नसतो असं उत्तर अलेक्झांडर यांनी दिलं. मोजक्या वाक्यांच्या चर्चेनंतर डॉ. सिंग यांनी ही जबाबदारी स्विकारण्यासाठी होकार दिला. तुमच्यामागे पंतप्रधान उभे राहतील असा विश्वास अलेक्झांडर यांनी व्यक्त केला आणि सिंग यांनी पंतप्रधानांना धन्यवादाचा संदेश माझ्यातर्फे द्या अशी विनंती त्यांना केली.

*रुपयाचं अवमुल्यन आणि सोनं गहाण ठेवलं*
नरसिंहराव यांचं सरकार सत्तेत येताच एरव्हीच्या स्थितीत नव्या सरकारांना मिळतो तसा मधुचंद्राचा काळ या सरकारला मिळणार नव्हता. पहिल्या दिवसापासून अर्थव्यवस्थेचं रुतलेलं चाक बाहेर काढून त्याला गती देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करायचं होतं. तसं या जोडगोळीनं केलंही. डॉ. सिंग हे राजकारणाबाहेरचे असल्यामुळे त्यांनी पदावरती आल्यापासूनच कामाचा धडाका लावत देशाच्या अर्थव्यवस्थेचं चित्र न लपवता सर्वांसमोर मांडायला सुरुवात केली. माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी 'टू द ब्रिंक अँड बॅक' या पुस्तकात या घडामोडीचे वर्णन केलंय. निवडणुकीच्या काळात काँग्रेस पक्षानं वर्तमानपत्र छपाईचा कागद, केरोसिन, मीठ, डिझेल, सायकल-दुचाकी, बल्ब, सुती साड्या-धोतरं, स्टोव्ह, पोस्टकार्ड, खाद्यतेलं अशा दहा वस्तुंच्या किंमती पहिल्या १०० दिवसांत स्थिर करून १० जुलै १९९० च्या दरांपर्यंत मागे नेऊ असं आश्वासन दिलं होतं. मात्र २५ जून रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सिंग यांनी आपल्याकडं कोणतीही जादूची छडी नसल्याचं सांगितलं. तसंच हे आश्वासन पूर्ण करण्यासाठी कोणतीही तयार यंत्रणा नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. वक्तव्यावरुन काँग्रेस पक्षातच मोठा गोंधळ उडाला. आधीच नाजूक स्थिती असलेल्या सरकारमधील काही खासदारांनी पंतप्रधानांकडं नाराजी व्यक्त केली. पण हे प्रकरण लवकरच शांत झालं. यानंतर डॉ. सिंग, पंतप्रधान नरसिंहराव, रिझर्व्ह बँक यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. १ जुलै रोजी डॉलर, येन, पौंड, येन, मार्क, फ्रँक यांच्या तुलनेत रुपयाची किंमत ७ टक्क्यांनी कमी करण्यात आली. त्यानंतर ३ जुलै रोजी ११ टक्क्यांनी कमी करण्यात आली. आयात करत असलेल्या वस्तूंचं बिल देण्यासाठी सरकारला परकीय चलनाची मोठी गरज होती. त्याआधीच्या चंद्रशेखर सरकारनं १६ मे रोजी २९ मेट्रिक टन सोनं युनायटेड बँक ऑफ स्वित्झर्लंडकडं सोपवलं होतं. नरसिंहराव यांच्या सरकारनं ४, ७, ११, १८ जुलै अशा चार दिवसांमध्ये ४६.९१ टन सोनं बँक ऑफ इंग्लंडकडं सोपवण्याचा निर्णय घेतला यामुळं १६ मे रोजी २० कोटी डॉलर्स आणि पुढच्या चार खेपांमध्ये ४० कोटी डॉलर्स उपलब्ध झाले. अर्थातच संसदेत या निर्णयावर जबरदस्त टीका करण्यात आली. संसदेतील सर्वांच्या प्रश्नांना मनमोहनसिंग यांनी शांतपणे उत्तरं दिली. सुरक्षेच्या कारणास्तव या निर्णयाचा गाजावाजा न करता तो अंमलात आणण्याची गरज होती आणि यापुढं सोनं परदेशात ठेवण्याची गरज नसेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. यानंतर उद्योग धोरणातही अनेक बदल करण्यात आले.
*निवृत्तीच्या मानसिकतेतून प्रधानमंत्रीपदाकडे*
२८ जून १९२१ रोजी करीमनगर येथे जन्मलेले नरसिंहराव शेतकरी आणि वकील असूनही त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि काही महत्त्वाची मंत्रिपदं भूषवली. १९७१-७३ या काळात ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. १९८२ आणि १९८३ ही दोन वर्षे भारतासाठी आणि परराष्ट्र धोरणासाठी महत्त्वाची ठरली. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर सातव्या परिषदेचं आयोजन करण्याची जबाबदारी अलिप्त राष्ट्रांनी भारताला सोपवली. अलिप्त राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचं अध्यक्षपद नरसिंहराव यांनी भूषवलं. पॅलेस्टीनी मुक्ती संघटना बरखास्त करण्यासाठी पश्चिम आशियातील देशांना भेटी दिलेल्या विशेष अलिप्त चळवळीचं नेतृत्व राव यांनी केलं. नरसिंहराव इंदिरा गांधी यांचे सल्लागार होते. त्यांच्या मंत्रिमंडळात राव यांनी गृह, परराष्ट्र आणि संरक्षण ही खाती सांभाळली होती हेही खरं. इंदिरा गांधी यांची हत्या झाली तेव्हा नरसिंहराव हे गृहमंत्री होते. पण त्यांच्याकडे कोणीही इंदिरा गांधींचा वारस म्हणून पहात नव्हतं आणि निवृत्त व्हायच्या मनस्थितीत असल्यानं ते लोकसभा निवडणुकीला उभेही नव्हते. म्हणजे त्यांच्यासाठी आधी पक्षाध्यक्ष होण्याची आणि पक्ष सत्तेवर येत असेल तर पंतप्रधान होण्याची ऑफर अनपेक्षित होती. त्यांनी ती स्वीकारली. त्यामुळं पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नरसिंहराव यांनी १९९१मध्ये शरद पवारांचा पत्ता कट केला. नरसिंहराव सत्तेवर येण्यापूर्वी केंद्रात राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग, चंद्रशेखर यांची सरकारं अल्पकाळच सत्तेवर राहिली. नरसिंहराव सरकार सत्तेत आल्यावर एक महिन्याच्या आत कोटा-परमिट राज बरखास्त करण्यात आलं. मक्तेदारी निर्बंध सैल केलं गेलं. त्याकाळी कच्च्या मालाचे कोटे मिळवून कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असे.

*मुक्त उदारमतवादी अर्थव्यवस्था अंमलात आणली*
पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी अंमलात आणलेल्या मिश्र भांडवली अर्थव्यवस्थेमुळं जागतिक क्षेत्रात भारताची आर्थिक कोंडी झाली होती. राजकीय अस्थैर्य, आखातातलं युद्ध आणि डोक्‍यावरचं कर्जाचं असह्य ओझं… आठवडाभर पुरेल इतकं विदेशी चलनही तेव्हा आपल्याकडं नव्हतं. निर्यात आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आयातीत, औद्योगिक विकासातही अडथळे निर्माण झाले होते. अशा स्थितीत जागतिकीकरणाच्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी त्या मिश्र भांडवली अर्थव्यवस्थेला तिलांजली देत, मुक्त उदारमतवादी अर्थव्यवस्था अंमलात आणायचं धाडस पी.व्ही.नरसिंहराव यांनी ९० च्या दशकात केंद्राची सत्तासूत्रं हाती घेताच केलं. त्या वेळी राव सरकारकडं बहुमत नव्हतं. राष्ट्रपतींचा आणि मंत्रिमंडळाचा विरोध असूनही, अधिकृतपणे घोषणा न करता, त्यांनी २५ टक्‍क्‍यांनी रुपयाचं अवमूल्यन करण्याचा धाडसी निर्णय घेतला. डॉ. मनमोहन सिंग हे त्यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री होते. या नव्या अर्थव्यवस्थेच्या अंमलबजावणीमुळं देशाच्या आर्थिक विकासाचा दरही गेल्या २५ वर्षात वाढला. भारताची वाटचाल जागतिक आर्थिक महासत्तेच्या दिशेनं सुरू झाली. १९९१ च्या आर्थिक सुधारणांचे शिल्पकार डॉ. मनमोहनसिंग यांना नरसिंहराव यांचा पाठिंबा होता. उदारीकरणाचं राजकारण सांभाळण्याचं कर्तृत्व त्यांचंच. तेव्हा राव यांनाही त्याचं श्रेय दिलं पाहिजे. या जोडगोळीनं १९९१ ते १९९६ या पाच वर्षांच्या कालावधीत देशाला नव्या मार्गावर नेलं आणि त्यानंतर पुढच्या २० वर्षांच्या काळात देशाचा चेहरामोहरा बदलून गेला. परंतु उदारीकरणाचे लाभ तळागाळापर्यंत पोचू न शकल्यानं १९९६ च्या सार्वत्रिक निवडणुकांत काँग्रेसचा धुव्वा उडाला. बाबरी मशिदीचं संरक्षण  करण्यात आलेलं अपयश हे दुसरं कारण. मात्र नरसिंहराव यांनी लोकसभेत बहुमत नसतानाही, शिवाय गांधी घराण्याचे नसूनही पाच वर्षे पूर्ण काळ सरकार चालवलं. नरसिंहराव यांनीच अणुबाँबच्या चाचण्यांची सर्व तयारीही करून घेतली होती. पण, त्यांना अण्वस्त्रांच्या चाचण्या घेणं शक्य झालं नाही. १९९६ ला कॉंग्रेसची सत्ता गेल्यावर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारनं पोखरणच्या वाळवंटात अणुबाँबच्या भूमिगत यशस्वी चाचण्या घेतल्या आणि देश अण्वस्त्रसज्ज झाला. या घटनेचं श्रेयही वाजपेयी यांनी नरसिंहराव यांना दिलं होतं. स्वतःकडं श्रेय येण्यापेक्षाही देशहित त्यांनी महत्त्वाचं मानलं आणि म्हणूनच अणुस्फोटाची सगळी तयारी करून त्यांनी भरलं ताट वाजपेयींच्या पुढ्यात ठेवलं. पंतप्रधानपद सोडताना ‘सामान तयार आहे, तुम्ही धमाका करा’ हा निरोप त्यांनी वाजपेयींना दिला. २००४ च्या निवडणुकीत मनमोहनसिंग हे संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारचे पंतप्रधान म्हणून नियुक्त झाले. सिंग यांनी १९९१ मध्ये पी.व्ही.नरसिंहराव यांच्या आग्रहामुळे राजकारणात प्रवेश केला आणि ते अर्थमंत्री झाले. देशातील आर्थिक सुधारणांचे धुरीणत्व त्यांनी पार पाडलं. राव यांना सत्तेत परतणं साधलं नाही पण त्यांच्या शिष्यानं ते साधून दाखविलं आहे. १९९० च्या दशकात जेव्हा श्रीमती मायावती उत्तर प्रदेशच्या पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्या तेव्हा नरसिंहराव यांनी उद्गार काढले होते की, ‘हा लोकशाहीतील चमत्कार आहे. एक स्त्री आणि तीसुद्धा दलित समाजातील स्त्री उत्तरप्रदेश सारख्या देशातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या राज्याची मुख्यमंत्री होऊ शकते हे सर्व लोकशाही शासनव्यवस्थेतच शक्य आहे.’

*त्यांच्या दिल्लीतील अंत्यसंस्काराला विरोध*
त्यांच्या कारकिर्दीत अयोध्येतली वादग्रस्त वास्तू पाडली गेली. सरकारवरच्या अविश्‍वास ठरावाच्यावेळी झारखंड मुक्ती मोर्चाच्या खासदारांना सरकारच्या बाजूनं मतदान करायसाठी दिल्या गेलेल्या लाचेचं प्रकरणही गाजलं. नरसिंहराव आणि केंद्र सरकारची बदनामी झाली. पण राव सत्तेवर येण्यापूर्वी किमान दशकभराचा काळ त्या त्यावेळच्या पंतप्रधानांना देखील आर्थिक उदारीकरण स्वीकारण्यावाचून गत्यंतर नसल्याची जाणीव झाली होती. इंदिरा गांधी, राजीव गांधी, व्ही. पी. सिंग, चंद्रशेखर यापैकी कोणीच त्याला अपवाद नव्हते. मात्र, हे धाडस फक्त रावांनी दाखवलं. लखुभाई पाठक फसवणुक प्रकरणी न्यायालयानं आरोप निश्चित केल्यानंतर रावांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी सीताराम केसरी यांची अध्यक्षपदी निवडणुक झाली. तसेच जानेवारी, इ.स. १९९७मध्ये रावांना काँग्रेस संसदीय पक्ष्याच्या नेतेपदाचाही राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर ते काँग्रेस पक्षाच्या नेतृत्त्वापासून अलग पडले. १९९८च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पक्षानं उमेदवारी नाकारली. त्यानंतर ते सक्रीय राजकारणातून निवृत्त झाले. २३ डिसेंबर २००४ रोजी त्यांचा दिल्लीत मृत्यू झाला. पण, दिल्लीत त्यांचे अंत्यसंस्कार होऊ दिलं नाही. ते हैदराबादमध्ये झालं. त्यांच्या नातेवाइकांनी अन्य पंतप्रधानांप्रमाणे त्यांचं समाधिस्थळ राजघाटावर उभारायची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. पण, काँग्रेसच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीत या समाधिस्थळाला परवानगी दिली गेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र ही परवानगी तातडीनं दिली. मात्र १९९१च्या आर्थिक सुधारणांना रावच जबाबदार आहेत, त्याविषयी प्रत्येक भारतीयानं कृतज्ञता बाळगण्याची आवश्यकता आहे.

*राव-मनमोहनसिंग यांची अर्थव्यवस्थेला कलाटणी*
जून १९९१ मध्ये, राजकारणातून जवळपास निवृत्त झालेल्या नरसिंहराव या नेत्याच्या गळ्यात पंतप्रधानपदाची माळ पडली. हे जितके अनपेक्षित होतं तितकंच किंबहुना त्याहून अधिक अनपेक्षित होतं, सक्रिय राजकारणाशी सुतराम संबंध नसलेल्या मनमोहन सिंग यांच्याकडं अर्थमंत्रिपद जाणं! आणि त्यापेक्षा जास्त अनपेक्षित होतं, नरसिंहराव-मनमोहनसिंग या जोडीनं देशाच्या अर्थव्यवस्थेला कलाटणी देणारं धोरण आखून त्याची धडाकेबाज पद्धतीनं अंलबजावणी सुरू करणं त्यावेळी हे दोघे मध्यावधी निवडणुकीनंतर सत्तेवर आलेल्या अल्पमतातील काँग्रेस सरकारचे प्रतिनिधी होते, राजीव गांधींच्या हत्येनंतर सोनियांनी राजकारणापासून दूर राहायचे ठरवले होतं, अखिल भारतीय स्तरावर काँग्रेस पक्षाला बांधून ठेवू शकेल असा नेता नव्हता, भाजपनं राम मंदिराचं आंदोलन चांगलंच पेटवलं होतं, पंजाब तुटतोय की काय असं वाटावं इतका धुमसत होता आणि तेलाच्या राजकारणातून उद्‌भवलेल्या आखाती युद्धाची राख पुरती विझलेली नव्हती. अशा आव्हानात्मक नव्हे तर स्फोटक परिस्थितीत, राजकीय ‘मास बेस’ नसलेले नरसिंहराव आणि राजकारणातच नसलेले मनमोहन सिंग यांनी देशाच्या राजकारणाला आणि विकासाला नवी दिशा देण्याचं धोरण आखावं हे धाडस नव्हे तर चमत्कारच म्हटला पाहिजे! या संदर्भात एकच मुद्दा पुन्हा पुन्हा मांडला गेलाय, तो म्हणजे त्या वेळची परिस्थितीच अशी होती की, त्यांच्यासमोर दुसरा पर्याय नव्हता. पण काही तत्कालीन तडजोडी करत वर्ष-दोन वर्षं घालवणं या दोघांना अगदीच अशक्य नव्हतं, असं काही अर्थतज्ज्ञ बोलून दाखवतात आणि स्वत: नरसिंहरावांनी पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यावर तसं सूचक विधान केलंही होतं. म्हणजे उदारीकरणाचं पर्व सुरू करणं यात आर्थिक अपरिहार्यतेचा भाग मोठा होता, तसाच राजकीय इच्छाशक्तीचा वाटाही मोठा होता हेच नरसिंहरावांना त्यातून ध्वनित करायचं होतं. या पार्श्वभूमिवरील मनोभूमिकेतून ते भाषण आता वाचलं तर आर्थिक उदारीकरण आपत्ती ठरले की इष्टापत्ती हे ठरवता येईलच असं नाही किंवा उदारीकरणाचे फायदे-तोटे काय झाले हे सांगता येईलच असं नाही. कारण हे ठरवता येणं आणि सांगता येणं ज्याच्या-त्याच्या अभ्यासावर नाही तर दृष्टिकोनावर अवलंबून आहे. पण गेल्या २० वर्षांतील भारताच्या आर्थिक वाटचालीची दिशा तीन वेगवेगळ्या आघाड्यांची सरकारं आणि पाच वेगवेगळे पंतप्रधान यांच्या काळात इतकी सुसंगत का राहिली, या प्रश्नाचा वेध घेण्याची ऊर्मी निर्माण करील आणि भारताच्या विद्यमान पंतप्रधानांचा दृष्टिकोन नेमका कसा आहे आणि ते कितपत सबल वा दुर्बल आहेत याचा बऱ्यापैकी अंदाज बांधता येईल.

*नेहरूंची ढाल आणि मनमोहन सिंगांचा मुखवटा*
तिरुपतीमधील अधिवेशन १४ एप्रिल १९९२ रोजी सुरू झालं. पहिल्या दिवशी नरसिंहराव मंचावर शांतपणे बसून होते आणि अर्थमंत्री मनमोहनसिंग यांनाच स्पष्टीकरण करण्यासाठी पुढे पाठवलं. "अज्ञाताविषयी नेहमीच भीतीची भावना असते. आम्ही काँग्रेस पक्षाच्या तत्त्वज्ञानापासून फारकत घेत आहोत, अशी भावना उपस्थितांमध्ये होती," असं मनमोहनसिंग त्यावेळची आठवण सांगताना म्हणतात. अर्थव्यवस्थेतील बदलांचं समर्थन करण्यासाठी त्यांनी जवाहरलाल नेहरुंचं नावही वापरलं. थंडीपासून बचाव करण्यासाठी आखूड चादर वापरणाऱ्या माणसाचं रूपक त्यांनी भारताच्या वित्तीय अवस्थेचं स्पष्टीकरण करताना वापरलं. डोक्यावर पांघरूण असेल तर पाय मोकळे राहतात आणि पाय झाकले तर डोकं उघडं पडतं. अशा वेळी, पांघरुणाची लांबी वाढवावी लागते. आम्हीही अशीच तफावत भरून काढण्यासाठी फक्त खाजगी क्षेत्राची मदत घेत आहोत, असं सिंग भाषणात म्हणाले. अधिवेशनाच्या शेवटी मंजूर झालेल्या पक्षाच्या ठरावांमध्ये पंतप्रधानांच्या उदारीकरणाच्या धोरणांचं समर्थन करण्यात आलं. राजीव गांधींना जे शक्य झालं नाही ते नरसिंहराव यांनी करून दाखवलं. त्यांनी स्वत:च्या पक्षाला आर्थिक सुधारणांचं महत्त्व पटवून दिलं होतं. प्रत्यक्षात या ठरावातील बहुतांश भाग जवाहरलाल नेहरू यांच्या राजकीय-सामाजिक विचारांचं निराळं अर्थनिर्णयन करणारा आहे." काँग्रेस पक्षासमोर सुधारणांचं समर्थन करताना राव यांनी नेहरुंचा ढाल म्हणून वापर केला आणि मनमोहन सिंग यांचा मुखवटा म्हणून वापर केला. उदारीकरण विश्वासार्ह वाटण्यासाठी जी. व्ही. रामकृष्ण व मनमोहन सिंग यांच्यासारख्या स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्ती निर्णयकर्त्यांमध्ये असणं आवश्यक होतं. त्यांनी काही वेळा पंतप्रधानांच्या आदेशांचा भंग केला, तरीही नरसिंह राव यांनी त्यांना पाठिंबा दिला. मनमोहन सिंग यांनी रुपयाच्या अवमूल्यनाच्या बाबतीत आणि रामकृष्ण यांनी दलालांच्या संपाच्या संदर्भात राव यांच्या आदेशापासून फारकत घेणारी कृती केली. कदाचित या प्रसंगांमध्ये राव यांनाच आपल्या आदेशांकडे दुर्लक्ष व्हावं असं वाटत असेल, अशीही शक्यता आहे; पण याची खातरजमा करण्याचा काही मार्ग नाही. व्ही. आर. मेहता यांना दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू नेमण्यात आल्यावर राव त्यांना म्हणाले होते, "काही वेळा तुम्हाला माझ्याकडून काही संदेश मिळतील. त्याकडे लक्ष देऊ नका... तुम्हाला योग्य वाटतं ते तुम्ही करा. पण माझ्यासमोर कोणीतरी बसलेलं असल्याने मला असे दूरध्वनी करावे लागू शकतात." मेहता यांच्या मुलाने ही आठवण सांगितली.

*बाबरी विध्वंस, खासगी बँका, व घोटाळ्याचा आरोप*
बाबरी मशिदीच्या विध्वंसासारख्या घटनेनंतर इतर एखाद्या सर्वसामान्य राजकारण्यासाठी सुधारणांची जोखीम पत्करणं अशक्य बनलं असतं. पण राव सर्वसामान्य राजकारणी नव्हते. धर्मनिरपेक्षतेवरच्या या प्रतीकात्मक हल्ल्यानंतरच्या सामूहिक संतापाचा अंदाज घेऊन राव यांनी विरोधकांमध्ये पडलेल्या दुहीचा उपयोग केला. नॅशनल फ्रंट आणि डाव्यांनी भाजपचा इतका धसका घेतला, की त्यांचा मुख्य शत्रू आर्थिक सुधारणांऐवजी धार्मिक कट्टरतावाद हा बनला. "धर्मनिरपेक्ष राजकारणाला प्राधान्य देऊन भाजपच्या आणखी विस्ताराला पायबंद घालणं, हे मुख्य काम बनलं. संसदेत बहुमताचीही वानवा असलेल्या काँग्रेस सरकारच्या आर्थिक सुधारणांना नंतर अडथळा आला नाही, त्यामागे राष्ट्रीय राजकारणातील बदललेलं प्राधान्यक्रम हे एक कारण होतं", असं राज्यशास्त्रज्ञ झोया हसन लिहितात. राव यांनी तत्काळ परिस्थितीचा फायदा उठवला. माकपचे एक ज्येष्ठ सदस्य सांगतात : "मी पंतप्रधानांशी जेव्हा उदारीकरणाच्या धोरणाविषयी बोलायचो, तेव्हा ते बाबरी मशीद आणि धर्मनिरपेक्षतेविषयी बोलणं काढायचे." बाबरी मशीद विध्वंसानंतर महिन्याभरानंच, जानेवारी १९९३ मध्ये रिझर्व बँकेनं सरकारची संमती आणि संकेत मिळाल्यावर खाजगी बँकांसाठी परवाने जाहीर केले. एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि अॅक्सिस बँक यांच्यासह दहा नव्या बँका सुरू झाल्या. इंदिरा गांधींनी १९६९ साली बँकांचं राष्ट्रीयीकरण केल्यानंतरचा हा पहिलाच अशा प्रकारचा निर्णय होता. समाजवादी गतकाळापासूनची ही प्रतीकात्मक फारकत म्हणजे जोखीम होती. डाव्या बँक कर्मचारी संघटना आपल्या विरोधात जातील, या भीतीनं त्यांनी सरकारी बँकांच्या पुनर्रचनेचा निर्णय घेतला नाही. किंबहुना हे शक्य नसल्यानं त्यांनी खाजगी क्षेत्राला वाव दिला. १६ जून १९९३ रोजी शेअर बाजारातील दलाल हर्षद मेहता याने एक नाट्यमय पत्रकार परिषद घेतली. नरसिंहराव यांनी आपल्याकडून एक कोटी रुपयांची लाच घेतली असल्याचा आरोप त्यानं केला. पंतप्रधानांनी हे आरोप फेटाळून लावले. "सीतेप्रमाणेच मी या अग्निपरीक्षेतून पार पडेन", असं राव म्हणाले. अखेर न्यायालयांनीही मेहताचे आरोप फेटाळून लावले. पण राव यांच्या कार्यकाळावर हा एक कलंक कायम राहिला. मनमोहन सिंग यांच्यासारख्या सावध व्यक्तिमत्त्वाबाबतही अप्रत्यक्ष आरोप होत होते. या घोटाळ्याचा लाभ झालेल्यांमध्ये सिंग यांची बँकिंग क्षेत्रातील मुलंही आहेत, अशी कुजबूज संसदेच्या आवारात होत होती. मनमोहनसिंग यांनी संसदेत या आरोपांमधील फोलपणा सांगताना म्हटलं : "मला तीन मुली आहेत, पण त्यांच्यापैकी कोणीही बँकिंग क्षेत्रात काम करत नाही. बँकिंग घोटाळ्याच्या चौकशीसाठी एक संसदीय समिती स्थापन करण्यात आली. डिसेंबर १९९३मध्ये या समितीने अंतिम अहवाल सादर केला. बँकिग घोटाळा सुरू असताना अर्थमंत्री 'डुलकी' घेत होते, असा ठपका या अहवालात ठेवण्यात आला. काँग्रेसीजनांकडूनच अशा शब्दांमध्ये हल्ला झाल्यानं धक्का बसलेल्या मनमोहनसिंग यांनी नरसिंहराव यांच्याकडं राजीनामा सादर केला. सिंग यांच्या राजीनाम्याची खबर मिळाल्यावर राव त्यांच्या सचिवांना म्हणाले, "मी या नेत्यांच्या टीकेच्या लक्ष्यस्थानी आहे हे मनमोहन सिंगांच्या लक्षात येत नाहीये. आपले सर्व खासदार आपल्या नियंत्रणाखाली आहेत, असं सिंग यांना वाटतंय... पण सिंग यांना नव्हे, तर मला गोत्यात आणण्यासाठी हे खासदार प्रयत्नशील आहेत.'' शिवाय, काँग्रेसमधील सहकाऱ्यांबाबत मनमोहनसिंग करत असलेल्या तक्रारांनीही राव त्रस्त झाले होते. 'माझ्याकडे इंदिरांएवढं पाठबळ नाहीये. अर्जुनसिंग यांच्यासारख्या काँग्रेस नेत्यांवर कारवाई करण्याएवढी ताकदही अजून माझ्याकडे आलेली नाही.' आपल्या पंतप्रधानांना लक्ष्य करणारे हल्ले आपण पचवणं अपेक्षित आहे, हे मनमोहन सिंग यांच्या लक्षात येत नसल्याबद्दल राव त्रस्त झाले होते, त्यामुळे त्यांचा राजीनामा स्वीकारायचा विचार राव करत होते. म्हणजे पी. चिदंबरम किंवा प्रणव मुखर्जी यांच्याकडे अर्थमंत्रीपदाची जबाबदारी द्यावी लागली असती. संसदेत आणि प्रसारमाध्यमांमध्ये सिंग यांच्यावर कठोर टीका होत असताना राव यांनी त्यांचे पर्याय तपासून पाहिले, पण अखेरीस त्यांनी सिंग यांनाच पदावर राहण्याची सूचना केली. कालांतरानं बँकिंग घोटाळ्यासंबंधीच्या अहवालावरच्या प्रतिक्रिया निवळल्या. पंतप्रधानांना कोणतीही इजा झाली नाही

*नरसिंहराव यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा आरोप*
मे १९९६मध्ये नरसिंह राव पंतप्रधान पदावरून पायउतार झाले, त्यानंतर लगेचच त्यांच्याभोवती न्यायालयीन खटल्यांचा वेढा बसला. लंडनस्थित लोणचं उत्पादक लखुभाई पाठक यांनी राव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, त्या खटल्यात राव यांना न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश २१ सप्टेंबर रोजी देण्यात आले. माजी पंतप्रधान आणि सुनावणीवेळी पक्षाध्यक्ष असलेल्या राव यांना अटक होण्याचीही शक्यता निर्माण झाली. 'राव यांच्या शेवटाची ही सुरुवात आहे', असे मथळे वर्तमानपत्रांमध्ये छापून आले. राव यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायचं ठरवलं. याशिवाय, सेंट किट्स खटल्यात फसवणुकीचा आरोप, हर्षद मेहता खटल्यात भ्रष्टाचाराचा आरोप आणि संसदेत आपल्या बाजूने मतदान करण्यासाठी झारखंड मुक्ती मोर्चाच्या खासदारांना लाच दिल्याचा आरोप, अशी अनेक बाजूंनी राव यांची कोंडी झाली. युरिया खरेदीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या खटल्यात राव यांचे पुत्र प्रभाकर यांना अटक झाली, नंतर पुराव्याअभावी त्यांच्यावरचे आरोप मागे घेण्यात आले. या सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेत वकिलांना २३ लाख रुपये देणं तातडीनं गरजेचे होते, तेव्हा राव यांनी हैदराबाद इथलं घर विकायचाही विचार केला होता. नरसिंह राव यांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे या तणावाच्या काळाचाही शिकण्यासाठी उपयोग केला. कायदेशीर कागदपत्रांवर ते तपशीलवार टिपणं नोंदवायचे, याच्या मूळ प्रती त्यांच्या खाजगी दस्तऐवजांमध्ये अजूनही आहेत. "राव स्वत: कायद्याची पुस्तकं अभ्यासायचे. त्यांचं ज्ञान अफाट होतं", अशी आठवण त्यांचे वकील आर. के. आनंद सांगतात.

*२३ डिसेंबर २००४ रोजी त्यांचं निधन झालं.*
दरम्यान काँग्रेस पक्ष पुन्हा नेहरू-गांधी घराण्याकडे वळला. सोनियांनी १९९८ साली पक्षाची धुरा सांभाळली आणि राव यांना पक्षाच्या इतिहासातून पुसण्याची प्रक्रिया सुरू झाली. निवृत्तीनंतर फावल्या वेळात राव यांनी स्पॅनिश भाषा शिकायला पुन्हा सुरुवात केली. ते पियानो वाजवू लागले. साहित्यवाचनालाही त्यांनी पुन्हा सुरुवात केली. त्यांना एखादं पुस्तक आवडल्यास ते लेखकांना त्यासंबंधी पत्रही पाठवत. अरुंधती रॉय यांची 'द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज' ही कादंबरी प्रकाशित झाल्यावर, राव यांनी त्यांना कादंबरीसंदर्भात पत्र लिहिलं होतं. यावर रॉय यांनी पाठवलेलं प्रत्युत्तर राव यांच्या खाजगी कागदपत्रांमध्ये जतन केलेलं आहे, 'तुम्ही पाठवलेल्या पत्रामुळे मला भावनिक वाटतंय. त्यातही तुम्ही पत्र लिहिण्यापूर्वी पुस्तक वाचण्याची तसदी घेतलीत, याचा आनंद जास्त आहे.' मे २००४मध्ये राष्ट्रीय निवडणुका झाल्या. भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा पाडाव करत सोनिया गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचा विजय झाला. सोनियांनी पंतप्रधानपद नाकारलं आणि राव यांचे अर्थमंत्री मनमोहन सिंग यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली. पक्षानं या निवडणुकीत राव यांना सामील करून घेतलं नव्हतं. यानंतर राव आजारी पडले आणि त्यांना नवी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. राव यांना या काळात भेट देणाऱ्या मोजक्या व्यक्तींमध्ये मनमोहन सिंग, संजय बारू व एम.एस. बिट्टा यांचा समावेश होता.' २० डिसेंबर २००४ रोजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी राव यांची भेट घेतली. त्या दिवशी राव यांचे राजकीय शत्रू अर्जुन सिंगही रुग्णालयात येऊन राव यांना भेटून गेले. राव बेडवरून उठू पाहत होते, तेव्हा अर्जुन सिंग म्हणाले, "कृपया उठू नका. मी फक्त तब्येत सुधारण्यासाठी सदिच्छा द्यायला आलो आहे.'' राव यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते, ते म्हणाले, "अर्जुन सिंगजी, मी तुम्हाला तुमच्या घरी येऊन भेटेन. अशी एक भेट मी तुम्हाला देऊ लागतो." दुसऱ्या दिवशी राव यांची तब्येत आणखी ढासळली. त्यांची शुद्ध हरपली. "त्यांचे डोळे बंद होते. शरीराच्या आजूबाजूला सर्वत्र नळ्या होत्या", असं राजेश्वर सांगतात. "नंतर अचानक त्यांनी डोळे उघडले आणि माझ्याकडे पाहिलं.' 'मी कुठाय?' असं राव यांनी विचारलं आणि स्वत:च उत्तर दिलं : 'मी वंगारात आहे. माझ्या आईच्या खोलीत.' विख्यात चरित्रलेखक नायजल हॅमिल्टन म्हणतात त्याप्रमाणे, 'चरित्रलेखन हे अकादमिक विश्वातील अनाथ बालक आहे.' ऐतिहासिक शक्तींनी अपरिहार्य बनवलेल्या घटनांची अंमलबजावणीच नेता करत असेल, तर 'व्यक्ती' महत्त्वाची ठरत नाही, तर 'काळा'चा तो तुकडा महत्त्वाचा ठरतो. या दृष्टिकोनातून पाहिलं तर, नरसिंह राव हे केवळ योग्य वेळी योग्य स्थानावर होते असं म्हणावं लागेल.

*नरसिंहरावांनी दिली शरद पवारांना मात*
शरद पवार आणि नरसिंहराव यांच्या नेतृत्ववादावर तत्कालीन काँग्रेस नेत्यांनी म्हणजे शरद पवार, माखनलाल फोतेदार की पं. एन.के.शर्मा यांनी आपल्या पुस्तकात जे काही लिहिलंय ते पाहता, त्यातलं कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं? असा संशय निर्माण व्हावा अशी स्थिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी आपल्या पुस्तकात असा दावा केला आहे कीं, 'राजीव गांधी यांच्या मृत्यूनंतर जेव्हा काँग्रेसपक्षातील नेते प्रधानमंत्रीपदाची नावं निश्चित करीत होते, तेव्हा सोनिया गांधी यांच्याशी निष्ठा असलेल्या स्वयंघोषित नेत्यांनी आपला मार्ग रोखला होता. कारण गांधी परिवार कुण्या स्वतंत्र विचाराच्या व्यक्तीला प्रधानमंत्री बनवू इच्छित नव्हते!' पण दुसरीकडं तत्कालीन कांग्रेसचे मंत्री आणि वरिष्ठ नेते माखनलाल फोतेदार यांनी आपल्या पुस्तकात म्हटलं आहे की, १९९१ मध्ये राजीव गांधींच्या आकस्मिक मृत्यूनंतर झालेल्या काँग्रेस महासमितीच्या बैठकीत सोनिया गांधी यांना काँग्रेस पक्षाध्यक्ष बनविण्यासाठीचा प्रस्ताव खुद्द शरद पवारांनी आपल्या सांगण्यावरून मांडला होता. हे स्पष्ट होतं की, राजीव गांधी यांच्या स्थानी जे कुणी काँग्रेस पक्षाध्यक्ष होतील त्यांनाच निवडणुका झाल्यानंतर सरकार बनविण्यासाठी प्रधानमंत्री केलं जाईल. पण सोनियांनी ती जबाबदारी घ्यायला नकार दिला. त्यानंतर नरसिंहराव काँग्रेस अध्यक्ष बनले. त्याचवेळी राजीवजींचे निकटवर्तीय असल्याचा दावा करणारे आणि नरसिंहराव यांचे सल्लागार पं. एन.के शर्मा यांचं म्हणणं आहे की, ' पवारांचं म्हणणं पूर्णपणे चुकीचं आणि आधारहीन आहे.' शर्मा पुढं म्हणतात की, '२१ मे १९९१ ला श्रीपेराम्बदूर इथं लिट्टेच्या अतिरेक्यांनी केलेल्या बॉंबस्फोटात राजीव गांधी यांच्या मृत्यूनंतर शरद पवार हे स्वतःची काँग्रेस संसदीय नेता म्हणून वर्णी लागावी यासाठीच्या मोहीमवर कार्यरत होते. त्यावेळी निवडणुकांचा एक टप्पा पूर्ण झाला होता. आणि निवडणुकांचा निकाल यायला अवकाश होता. निकालानंतर २३५ जागा जिंकून काँग्रेस सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष म्हणून निवडून आला होता. शरद पवार त्यावेळी लोकसभा सदस्यही नव्हते, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यामुळं त्यांनी ती मोहीम जोमानं चालवली. त्यांचे म्होरके सुरेश कलमाडी होते. पक्षाध्यक्षच प्रधानमंत्री होणार हे निश्चित असल्यानं ही मोहीम सुरू होती काँग्रेसनं पक्षाचे वरिष्ठ नेते सिद्धार्थ शंकर रे यांना निवडणूक अधिकारी नेमलं होतं. निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. दोघेजण मैदानात होते. एक काँग्रेस कार्यसमितीचे वरिष्ठ सदस्य पी.व्ही. नरसिंहराव आणि दुसरे शरद पवार! पवारांनी पूर्वीपासूनचं काँग्रेसच्या खासदारांशी संपर्क करायला सुरुवात केली होती.'

*पवारांची माघार आणि नरसिंहराव यांची निवड*
शर्मा पुढे म्हणतात की, त्यांनी स्वतः पवारांशी काँग्रेस नेते एन.के.पी.साळवे यांच्या निवासस्थानी चर्चा केली होती आणि त्यांना निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याबाबत समजावलं होतं, विनंती केली होती. त्यानंतर पवारांची नरसिंहराव यांच्याशी तत्कालीन मोतीलाल नेहरू मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी भेट घडवून आणली होती. शर्मा यांनी असा दावा केलाय की, यावेळी झालेल्या चर्चेत पवार या अटीवर माघार घ्यायला तयार झाले की, त्यांना राव यांच्या मंत्रिमंडळात उपप्रधानमंत्रीपद दिलं जावं. या बैठकीला पी.चिदंबरमही उपस्थित होते. पण संध्याकाळी पांचवाजेपर्यंत पवारांनी आपलं नाव मागं घेतल्याची घोषणा केली नाही. त्याबाबत पवारांनी शब्द दिला होता. त्यांच्या समर्थकांनी त्यांना असा विश्वास दिला होता की, खासदारांचं बहुमत त्यांच्याकडे आहे. दुसऱ्यादिवशी संसदीय पक्षाचा नेता निवड व्हायची होती. शर्मा म्हणतात, पवारांची ही भूमिका पाहता त्या स्वतः अशा खासदारांची भेट घेतली जे पवारांच्या बाजूला होते शिवाय ते खासदार शर्मांचा सन्मानही करत जाते. अशा खासदारांना नरसिंहराव यांच्याबाजूला त्यांनी वळवलं. दुसऱ्या दिवशी सकाळीच पवारांना याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर पवारांना आपला पराभव दिसू लागल्यानं त्यांनी मग माघार घेतली. आणि नरसिंहराव यांची संसदीय नेते म्हणून बिनविरोध निवड झाली आणि देशाचे प्रधानमंत्री बनले. शर्मा यांनी सोनिया गांधी यांच्याकडे नरसिंहराव यांची रतबदली केल्याचंही म्हटलं आहे. शरद पवार जसे खासदार नव्हते तसे नरसिंहराव हे देखील संसदेच्या कोणत्याच सभागृहाचे सदस्य नव्हते. कारण काँग्रेसनं त्यांना लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी दिलेली नव्हती. प्रधानमंत्री झाल्यानंतर नरसिंहरावांनी शरद पवारांना आपल्या मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री बनवलं. शर्मा यांच्यामते सोनिया गांधींच्या मनांत नरसिंहराव यांच्याबद्धलही किंतु होता, कारण नरसिंहराव यांचे राजीव गांधी यांच्याशी असलेल्या मतभेदातूनच त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. पण शरद पवार आणि अर्जुनसिंह यांच्याऐवजी नरसिंहराव यांच्या नावाला सोनिया गांधींना राजी करण्यात ते यशस्वी झाले. अर्जुनसिंह काँग्रेस पक्षाध्यक्षपद मिळविण्यासाठी प्रयत्नशील होते पण त्यात ते यशस्वी झाले नाहीत.


*तयारी असूनही अणुचाचणी घेतली नाही.*
राजीव गांधींच्या हत्येनंतर कॉंग्रेसची सूत्र पी.व्ही.नरसिंह राव यांच्याकडे आली. ते पंतप्रधान बनले. तसं बघायला गेलं तर हे अल्पमतातील सरकार होतं. कॉंग्रेसमधले अनेक दिग्गज नेते कुरघोडी करण्यासाठी तयार होते पण नरसिंहराव यांनी चतुराईनं सगळ्यांची मोट बांधली होती. त्यांचे प्रतिस्पर्धी समजले जात असणाऱ्या माधवराव शिंदे, अर्जुनसिंह यांना कमी महत्वाची मंत्रीपदे दिली होती. अर्थमंत्रीपदी तर डॉ.मनमोहन सिंग यांच्यासारखा राजकारणाबाहेरचा व्यक्ती नेमला होता. महाराष्ट्राला दोन महत्वाची मंत्रीपदं मिळाली होती. गृह आणि संरक्षण. गृहखात्याचे मंत्री होते शंकरराव चव्हाण तर संरक्षणमंत्री होते शरद पवार. साल होत १९९१. पवारांनी महाराष्ट्रचं मुख्यमंत्रीपद सोडून संरक्षण मंत्रालयाचा कारभार हाती घेतला. पहिल्यांदाच राष्ट्रीय राजकारणात शिरकाव करण्याची त्यांना संधी मिळाली होती. याबाबत शरद पवार सांगतात, “माझं तसं संरक्षण खात्याचं ज्ञान मर्यादित होतं. पण माहिती नसेल तर त्या क्षेत्रातील तज्ञांकडून ती करून घेण्याचा शिरस्ता मी यावेळीही पाळला. जुन्या फायली, भारत-चीन युद्धावेळचा अँडरसन अहवाल अशा अनेक गोष्टी नजरेखालून घातल्या. देशाच्या सीमांना भेटी दिल्या.” त्यावेळी संरक्षण खात्याच्या सल्लागारांनी त्यांना आपण अण्वस्त्रसज्ज देश आहोत आणि अणुस्फोट चाचणी घडवण्यासाठी तयार आहोत ही माहिती दिली. हा अतिशय संवेदनशील विषय होता. पवार लगेच ती गोपनीय फाईल घेऊन पंतप्रधानांच्याकडं गेले. पी.व्ही.नरसिंहराव हे जुने जाणते व धोरणी नेते होते. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्थितीचं त्यांना भान होतं. परराष्ट्र धोरणातील त्यांचा अनुभव मोठा होता. त्यांनी पवारांनी आणलेली ती फायली वाचली आणि म्हणाले, “आमच्या आंध्रप्रदेशात अनेक शेतकरी शेतात घर बांधून राहतात. त्यांच्या घरी गेलो की दर्शनी भागात एक रायफल अडकवलेली दिसते. तिचा वापर ते कधी करत नाहीत पण रायफल आपल्याकडे आहे याचा संदेश लोकांपर्यंत पोहचवायचा असतो.” 

*अमेरिकन उपग्रहानं चित्र टिपलं अन सारं बाळगलं*
तो काळ भारतापुढील आर्थिक संकटाचा होता. आपण नुकतंच जागतिकीकरण स्वीकारलं होतं. नरसिंहराव आणि मनमोहनसिंग यांनी धाडसी निर्णय घेऊन देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी पावलं टाकायला सुरवात केली होती. अशावेळी आपल्याकडं अण्वस्त्र बनवण्याचं तंत्रज्ञान आहे आणि आपण अणुस्फोट करू शकतो याची तयारी असणं उत्तम होतं पण खरोखर तशी चाचणी करून जगाचं लक्ष वेधण्याची कोणतीही गरज नव्हती. कारण असं पाऊल उचललं तर संपूर्ण जगाचा रोष पत्करावा लागला असता आणि आपल्याला वेगळं पाडण्यासाठी काही देशांना निमित्तच मिळालं असतं. म्हणून शरद पवारांचा आग्रह असतानाही नरसिंहराव यांनी अणुस्फोटचाचणी करण्यास नकार दिला. पुढे काही वर्षांनी आपली आर्थिक स्थिती कोणताही धक्का सहन करू शकेल इतकी मजबूत झाली आणि नरसिंहराव यांनी डिसेंबर १९९५ मध्ये अणूचाचणीचे आदेश दिले. त्यांचे विज्ञान विषयक सल्लागार डॉ.अब्दुल कलाम यांनी तयारी देखील केली होती पण अमेरिकी उपग्रहांनी या संदर्भातील छायाचित्र टिपलं आणि सगळे प्रकरण बारगळलं. लवकरच निवडणुका आल्या आणि नरसिंहराव यांना पायउतार व्हावं लागलं. अनेक वर्ष चाललेल्या भारतीय अणवस्त्र कार्यक्रमाच्या तयारीचं फळ १९९८ ला मिळालं. वाजपेयीजींच्या नेतृत्वाखाली भारत अण्वस्त्रसज्ज देश बनला. शरद पवार यांनी ‘लोक माझा सांगाती ‘या आत्मचरित्रात हा किस्सा सांगितलेला आहे.

*वेंगलराव यांच्या आत्मचरित्रात रावांवर टीका*
इंदिरा गांधी त्रासल्या होत्या. त्या वैतागून म्हणाल्या, "मैं इस पीव्ही का क्या करुं? पीव्ही ने लक्ष्मीकांतम्मा के साथ फ्लर्ट करने के अलावा कुछ नहीं किया। मैं परेशान हो गई हूं. मुझे उनके बेटे पर दया आती है।" काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि आंध्रप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वेंगल राव यांनी आपल्या 'ना जीविता कथा' - माझी जीवन कथा ह्या आत्मचरित्रात हा उल्लेख केला आहे. त्यांनी या आत्मचरित्रात पुढं लिहिलं आहे की, 'ते इंदिरा गांधींना भेटण्यासाठी दिल्लीला गेले होते तेव्हा, इंदिराजी खूपच वैतागलेल्या होत्या. पी.व्ही.नरसिंहराव यांचं नाव घेताच त्या भडकल्या.'वेंगलरावांनी त्या पुस्तकात पुढं लिहिलं आहे की, "त्यांनी कधी अशाप्रकारे वैतागलेल्या, भडकलेल्या कुण्या वरिष्ठ नेत्यांनी वा मंत्र्यांनी फारसं पाहिलेलं नव्हतं. इंदिराजी म्हणाल्या, "मला असं कधीच वाटलं नव्हतं की, ते इतके चरित्रहीन असतील; जेव्हा त्यांना वयानं मोठी मुलं असताना अशाप्रकारे वागत असतील!" वेंगल राव यांनी आपल्या या आत्मचरित्रात असंही लिहिलं आहे की, " खुद्द नरसिंहराव यांचे ज्येष्ठ पुत्र पी.व्ही.रंगाराव हेच आपल्या वडिलांच्या अफेअर-प्रेमप्रकरणाबाबत तक्रार करण्यासाठी दिल्लीत आले होते. त्यांनी अनेकदा इंदिराजींना भेटून त्याबाबतच्या तक्रारी केल्या होत्या." त्यावेळी नरसिंहराव हे आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या आणखी एका पुत्रानं इंदिराजींकडे अशाचप्रकारची तक्रार केली होती. हे एकाबाजूला सुरू असताना त्यांचे विरोधक त्यांच्या त्या प्रेमप्रकरणाची- अफेअर्सची चविष्टपणे चर्चा करीत होते. त्याच लोकांनी लक्ष्मीकांतम्मा नामक काँग्रेसी नेत्यांशी असलेल्या संबंधांना मालमसाला लावून त्या दिल्लीत इंदिराजींपर्यंत पोहोचवल्या होत्या. त्यामुळं या तक्रारीनं त्रासलेल्या इंदिराजींनी नरसिंहराव यांना मुख्यमंत्रीपदावरून तीन वर्षातच दूर केलं.

*नरसिंहराव यांचे महिला नेत्यांशी संबंध*
विजय सीतापती यांचं पुस्तक 'द हाफ लायन' या पुस्तकातही या संबंधांचा उल्लेख आढळतो ज्यामुळं इंदिराजी नरसिंहराव यांच्यावर नाराज झालेल्या होत्या. सीतापती यांच्या मते, "राव यांचे लक्ष्मीकांतम्माचं नव्हे तर आणखी अनेक महिलांशी संबंध होते पण ते छोट्या छोट्या कालावधीसाठी. सर्वाधिक संबंध लक्ष्मीकांतम्मा या महिला नेत्यांशी होते. "कांतम्मा ह्या १९७७ पर्यंत सतत लोकसभेवर निवडून येत होत्या. लक्ष्मीकांतम्मा आणि नरसिंहराव हे एकाचवेळी आंध्र विधानसभेत विधानसभा सदस्य बनले होते. १९५७ मध्ये लक्ष्मीकांतम्मा या खम्माममधून आंध्रप्रदेश विधानसभेत काँग्रेसकडून सर्वप्रथम निवडून गेल्या होत्या. त्यापूर्वी तिथे सतत कम्युनिस्ट पक्षाच्या आमदार निवडून येत होता. राजकारणाशी त्यांचं फारसं देणंघेणं नव्हतं. पण त्या कम्युनिस्टांचा बालेकिल्ला उध्वस्त करून निवडून आल्या होत्या. त्या सुशिक्षित होत्याच शिवाय त्यांचं व्यक्तिमत्व प्रभावी होतं. बुद्धिमान तर होत्याच, शिवाय त्या अत्यंत देखण्या, उंचपुऱ्या, आकर्षक, तेजतर्रार आणि उत्कृष्ट वाकपटूही होत्या. त्यांची भाषणं घणाघाती होत असत. त्या अनंतपुर जिल्ह्यातील रेड्डी परिवाराशी संबंधित होत्या. लक्ष्मीकांतम्मा विधानसभेवर निवडून गेल्या त्यावेळी त्या फक्त ३३ वर्षाच्या तरुण होत्या. त्याचवेळी ३६ वर्षाचे नरसिंहराव पहिल्यांदा मंथणी मतदारसंघातून विधासभेवर निवडून आले होते. राव आणि लक्ष्मी याच्या विधानसभा अधिवेशनाच्या काळात अनेकदा मुलाखती झाल्या. दोघांच्या सामाजिक पार्श्वभूमी अत्यंत भिन्न होती. जमीन-आस्मानचा फरक होता. लक्ष्मीकांतम्मा या एक श्रीमंत, सुखसमृद्ध आणि खात्यापित्या घरातून आल्या होत्या, तर नरसिंहराव हे एक अत्यंत सामान्य गरीब घरातून आले होते. विधानसभेत थोड्याच कार्यकाळात त्यांनी विद्वत्ता आणि सामंजस्य या गुणांनी आपलं वर्चस्व सिद्ध केलं. लक्ष्मीकांतम्मा या त्यांच्याकडं आकर्षित होऊ लागल्या. १९६२ मध्ये लक्ष्मीकांतम्मा यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली, त्यावेळी प्रचारात राव यांनी त्यांना खूप मदत केली. ते लक्ष्मी यांचे अत्यंत जवळचे आणि राजकीय गुरू बनले. राव हे विवाहित होते. वयाच्या दहाव्या वर्षीच त्यांचा सत्यम्माशी विवाह झाला होता. ते तीन मुलगे आणि पांच मुलींचे वडील होते.

*इंदिराजींनीचं राव यांना मुख्यमंत्री बनवलं होतं*
लक्ष्मीकांतम्मा या लोकसभेत पोहचल्या. इकडे नरसिंहराव आंध्रप्रदेशचे प्रभावी नेते बनले. लगेचच मंत्रीही झाले. लक्ष्मीकांतम्मा यांच्याशी जवळीक वाढत चालली होती. राव यांचं प्रभावशाली नेतृत्व दिल्लीतील वरिष्ठांपर्यंत पोहोचलं होतं. नेहरू आणि इंदिराजी हे दोघेही त्यांना पसंत करत होते. त्यामुळं इंदिराजी प्रधानमंत्री होताच त्यांनी १९७० मध्ये नरसिंहराव यांना आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री करण्यास मदत केली. ६० च्या दशकाच्या अखेरीस नरसिंहराव आणि लक्ष्मीकांतम्मा यांचं नातं काळाबरोबर अधिक मजबूत झालं होतं. दोघांनीही आपल्या ह्या संबंधाबाबत गुप्तता राखण्याचा प्रयत्न केला. तोवर लक्ष्मीकांतम्मा यांची संसदेत प्रभावी वक्ते म्हणून ओळख निर्माण झाली होती. विजय सीतापती यांनी आपलं पुस्तक 'द हाफ लॉयन' मध्ये राव यांचा खूपच गुणगौरव, कोडकौतुक केलंय. त्याबरोबरच त्यांच्या खासगी जीवनातील अनेक गोष्टी उघड करण्यात कंजूशी दाखवलेली नाही. त्यांनी पुस्तकात लिहिलंय की, नरसिंहराव यांची पत्नी सत्यम्माचं जीवन पतीची उपेक्षा, त्यामुळं निर्माण झालेला एकटेपण यानं पुरेपूर भरलेलं होतं. १९७० मध्ये सत्यम्मा यांचं निधन झालं. त्यानंतर लक्ष्मीकांतम्मा यांच्याबरोबरच्या संबंधाना नरसिंहराव यांना अधिक स्वातंत्र्य मिळालं, तसंच त्यात खुमारीही आली. राव यांना आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदावरून दूर केल्यानंतर या संबंधाला झटका बसला. ते थोडंसं जागरूक बनले, पण लक्ष्मीकांतम्मा यांच्याशी असलेले संबंध काही संपुष्टात आले नाही. लक्ष्मीकांतम्मा या खरंतर साम्यवादी विचाराच्या होत्या त्यामुळं त्या आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांच्याविरोधात गेल्या, त्यावेळी या नरसिंहराव-लक्ष्मीकांतम्मा संबंधावर काहीसा परिणाम झाला. १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत लक्ष्मीकांतम्मा यांनी जनता पक्षात प्रवेश केला आणि निवडणूक लढविली. 'द हाफ लॉयन' चे लेखक विजय सीतापती यांनी लिहिलं आहे की, नरसिंहराव यांचे लक्ष्मीकांतम्मा यांच्याशी असलेलं नातं १९६२ ते १९७५ पर्यंत होतं. पण जोपर्यंत राव यांच्याशी लक्ष्मीकांतम्मा यांचे संबंध होते तोपर्यंत त्या पूर्णपणे समर्पित आणि एकनिष्ठ होत्या, हे इथं नमूद करायला हवं!

*लक्ष्मीकांतम्मा अखेरच्या काळात साध्वी बनल्या*
त्यानंतर लक्ष्मीकांतम्मा यांनी राजकारणातून दूर होत नरसिंहराव यांच्याशी असलेले सारे संबंध, संपर्क तोडून टाकले, राजकीय संन्यास घेतला आणि आध्यात्माकडे वाटचाल केली. त्या साध्वी बनल्या. श्रीशिवा बालयोगी महाराज यांच्या चरणी लीन झाल्या. त्यांनी आपल्या संपत्तीतील मोठा हिस्सा धर्मार्थ कामासाठी दान केला. असं म्हटलं जातं की, नरसिंहराव यांनाही राजकारण सोडून आध्यात्मिक वातावरणात येण्यासाठी लक्ष्मीकांतम्मा यांनी प्रेरित केलं होतं. १९९१ मध्ये राव यांनी आपला दिल्लीतला बाडविस्तारा गुंडाळला होता, पुस्तकंही हैद्राबादकडं पाठवून दिली होती. संन्यास घेऊन हैद्राबादला जाणार; त्याचवेळी राजीव गांधींच्या हत्येनं त्यांचं नशीब बदलून गेलं, जणू भाग्यच उजळलं! नरसिंहराव यांनी प्रधानमंत्रीपदावरून दूर झाल्यानंतर आत्मकथात्मक कादंबरी लिहिली - 'इनसाईडर' ! ते पेंग्विन प्रकाशन संस्थेने प्रसिद्ध केलं. हे पुस्तक लिहिण्यासाठी राव यांनी त्याकाळानुसार एक लाख रुपये ऍडव्हान्स मेहनताना म्हणून मिळाले होते. या पुस्तकात त्यांनी आपल्या जीवनातील काही संकेत, इशारे आणि आरोपांच्या संदर्भात काही गोष्टींची उहापोह केलाय. त्यांचे तत्कालीन सहयोगी म्हणतात की, ते जेव्हा प्रधानमंत्री होते तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळातल्या एका ज्युनिअर महिला मंत्रीवरही ते विशेष मेहेरबान होते. त्याचा लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने अर्थं काढला. पण त्याची कधी जाहीर चर्चा झाली नाही जशी लक्ष्मीकांतम्मा यांची झाली होती.

*राव शास्त्रीय गायक आणि पियानो वादक होते*
 नरसिंहराव यांची १९९६ नंतरची सात वर्ष कोर्ट-कचेऱ्यात गेली. या वर्षात त्यांच्या चेहऱ्यावर चिंता नव्हती कारण आपण निर्दोष आहोत आणि कोर्टातून बाइज्जत बाहेर पडू याची त्यांना खात्री होती आणि झालेही तसेच! राव हे शास्त्रीय संगीताचे उत्कृष्ट गायक होते, पियानो वाजविण्यात कुशल होते हे फार थोड्यांना माहिती आहे. संगीताची आणि वेदांची पुस्तक आणून त्याचा अभ्यास करण्यास त्यांनी सुरुवात केली होती. या कालावधीत देश आणि पक्ष आपल्या धोरणापासून दूर जात आहे आणि याचे परिणाम देशाला भोगावे लागतील यामुळे ते कष्टी होते घरात वारा येण्यासाठी फक्त खिडकीची उघडतात म्हणून राव म्हणत की, 'मी ते खिडकी उघडून दिली यांनी तर दरवाजा उघडून दिला आहे...!' कोर्टाच्या केसेस संपल्यानंतर त्यांना सत्तेच्या पदाची आशा न ठेवता पुन्हा प्रवाहात येऊन आपल्या अनुभवाचा फायदा पक्षाला सरकारला देण्याची इच्छा होती पण ते सत्तेवर येतील या भीतीनं त्यांची उपेक्षा झाली. आर्थिक क्रांतीचे जनक म्हणून जग आणि इतिहास त्यांचे सदैव नोंद करील. प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी १९९६ मध्ये नरसिंहराव यांना पाठवलेल्या पत्रात लिहिलं होतं, "You and your government put india on world map...and made as part of global community. Every indian should owe you a debt of gratitude for the courageous and farsighted 'opening up' of India."

चौकट १
"नरसिंहराव यांनी डॉ. मनमोहनसिंग यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आणि डॉ. सिंग यांच्यापर्यंत ही माहिती पोहचवून त्यांना राजी करण्याचं काम पी. सी. अलेक्झांडर यांच्यावर सोपवलं. अलेक्झांडर हे इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या कार्यकाळात पंतप्रधानांचे मुख्य सचिव होते. ही घटना अलेक्झांडर यांनी आपल्या 'थ्रू द कॉरिडॉर्स ऑफ पॉवर' या आत्मचरित्रात लिहून ठेवलीय. अलेक्झांडर यांनी २० तारखेलाच मनमोहनसिंग यांच्या घरी फोन केला. पण डॉ. सिंग युरोप दौऱ्यावरून रात्री उशिरा पोहोचतील असं त्यांच्या कुकनं अलेक्झांडर यांना सांगितलं. त्यानंतर २१ तारखेला पहाटे ५ वाजताच त्यांनी सिंग यांच्या घरी फोन केला. तेव्हा डॉ. सिंग झोपल्याचं आणि त्यांना डिस्टर्ब करू नये असं सांगण्यात आल्याचं खानसाम्यानं सांगितलं. तेव्हा अलेक्झांडर यांनी आपलं नाव वारंवार सांगून काही प्रभाव पडतोय का याची चाचपणी केली. मात्र समोरच्या कर्तव्यपरायण व्यक्तीवर काहीच प्रभाव पडला नाही. शेवटी त्यांनी फारच आग्रह केल्यावर डॉ. सिंग यांना उठवण्यात आलं. अलेक्झांडर यांनी सिंग यांना एक अत्यंत तातडीचं काम असून मी काही मिनिटांत भेटायला येतोय असं सांगितलं. थोड्या वेळातच अलेक्झांडर त्यांच्या घरी पोहोचले होते तोपर्यंत जेट लॅगमुळे त्रस्त झालेले डॉ. सिंग पुन्हा झोपी गेलेले होते. त्यांना पुन्हा उठवण्यात आलं आणि अखेर अलेक्झांडर यांनी अर्थमंत्री म्हणून तुमच्या नावाला नरसिंहरावांनी पसंती दिल्याचं सांगितलं. त्यावर डॉ. सिंग यांनी यावर तुमचं मत काय आहे असा प्रश्न अलेक्झांडर यांना विचारला. त्यावर माझं जर यापेक्षा वेगळं मत असतं तर अशा अवेळी मी तुमच्याकडे आलो नसतो असं उत्तर अलेक्झांडर यांनी दिलं. मोजक्या वाक्यांच्या चर्चेनंतर डॉ. सिंग यांनी ही जबाबदारी स्विकारण्यासाठी होकार दिला. तुमच्यामागे पंतप्रधान उभे राहतील असा विश्वास अलेक्झांडर यांनी व्यक्त केला आणि सिंग यांनी पंतप्रधानांना धन्यवादाचा संदेश माझ्यातर्फे द्या अशी विनंती त्यांना केली."

चौकट २
"नरसिंहराव यांनीच अणुबाँबच्या चाचण्यांची सर्व तयारीही करून घेतली होती. पण, त्यांना अण्वस्त्रांच्या चाचण्या घेणं शक्य झालं नाही. १९९६ ला कॉंग्रेसची सत्ता गेल्यावर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारनं पोखरणच्या वाळवंटात अणुबाँबच्या भूमिगत यशस्वी चाचण्या घेतल्या आणि देश अण्वस्त्रसज्ज झाला. या घटनेचं श्रेयही वाजपेयी यांनी नरसिंहराव यांना दिलं होतं. स्वतःकडं श्रेय येण्यापेक्षाही देशहित त्यांनी महत्त्वाचं मानलं आणि म्हणूनच अणुस्फोटाची सगळी तयारी करून त्यांनी भरलं ताट वाजपेयींच्या पुढ्यात ठेवलं. पंतप्रधानपद सोडताना ‘सामान तयार आहे, तुम्ही धमाका करा’ हा निरोप त्यांनी वाजपेयींना दिला. "


चौकट ३
"नरसिंहराव हे देशातले गांधी नेहरू घराण्याबाहेरचे गुलझारीलाल नंदा, लालबहाद्दूर शास्त्री यानंतरचे पहिलेच कार्यकाळ पूर्ण करणारे कॉंग्रेसी पंतप्रधान होते. त्यामुळे ते कसा कारभार करतात यावर अनेकांच्या नजरा होत्या. कारण समाजाच्या एका वर्गात का होईना पण या देशावर या घराण्याचाच कुणीही वारसदारच राज्य करू शकतो आणि अन्य कुणात ती क्षमता असूच शकत नाही असा विश्‍वास होता. नरसिंहराव यांना मात्र राजीव गांधी आणि त्यातल्या त्यात सोनिया गांधी यांच्या क्षमतांची चांगलीच माहिती होती. राजीव गांधी यांनी पंतप्रधान व्हायला नको असं त्यांचं मत होतं आणि सोनिया गांधी यांच्या पंतप्रधानपदाला तर ते स्वत:च आडवे आले होते. सोनिया गांधी यांनी अनेक प्रकारांनी प्रयत्न केला पण नरसिंहराव यांंनी त्यांची ही महत्त्वाकांक्षा पुरी होऊ दिली नाही. शेवटी सोनिया गांधी यांंनी रावांच्या विरोधात पक्षातल्याच अर्जुनसिंग आणि एन डी तिवारी यांंना उभं केलं पण त्यांना याही मार्गानं पंतप्रधान होता आलं नाही. गजपती यांच्या या पुस्तकात नरसिंहराव आणि सोनिया गांधी या दोघांच्या संबंधावर चांगलाच प्रकाश टाकलाय. २००४ साली सोनिया गांधी यांनी चालून आलेलं पंतप्रधानपद नाकारलं आणि फार मोठा त्याग केला असं कॉंग्रेसचे नेते भासवतात पण प्रत्यक्षात सोनिया गांधी या पदाला हपापलेल्या होत्या असं या पुस्तकात दाखवूून देण्यात आले आहे!"

हरीश केंची
९४२२३१०६०९

'इंडिया शायनिंग' ते 'मोदी की गॅरंटी...!'

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...