*गणेशोत्सव:*
*सुशिक्षितांनी सहभागी व्हावं!*
"या उत्सवातून निर्माण होणारे चैतन्य-उत्साह ज्वालामुखीतून फेकल्या जाणाऱ्या लाव्हासारखाच विध्वंसक आहे.यातून अपप्रवृत्ती जोपासल्या जात आहेत. हे सगळे बदलण्याचा , ही ऊर्जा शक्तीत बदलण्याचा एकच मार्ग आहे. लोकमान्यांनी तो सांगितला आहे. ' आमच्या औदासिन्यामुळे मलिन झालेले हे उत्सव सतेज करण्याचे हे काम सुशिक्षितांनी आपल्या शिरावर घेतलं पाहिजे. व्यवस्थेसंबंधीचे हरेक काम अंग मोडून केलं पाहिजे, उत्सवातील लोकशिक्षणातील भाग सुशिक्षितांनी हाती घेतला पाहिजे. सामान्य लोकांच्या खरोखर गरजा काय आहेत.लोकांत धर्मवृत्ती कितपत जागृत आहे, लोकांच्या स्वाभाविक ओघाला जाणते वळण दिले असता राष्ट्रहित सहजगत्या साधणार आहे ह्या सर्व गोष्टी लिखाण मिसळून समजावून घेतल्या पाहिजेत. हे लोकमान्यांनी वारंवार सांगितले तेवढे न ऐकता ह्या उत्सवाकडे सुशिक्षित बघत राहिले. अजून त्या बघण्यात फारसा बदल पडलेला नाही."
--–---------------------------------------
सव्वाशे वर्षाच्या गणेशोत्सवाला यंदा वेगळ्या वादाने गाठले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव कुणी सुरू केला? लोकमान्य टिळकांनी की भाऊसाहेब रंगारी यांनी? या वादाची ठिणगी पडली ती महापालिकेने सुरू केलेल्या उत्सवापासून! दगडूशेठ हलवाई गणपती मंडळांनं आपल्या सव्वाशे वर्षपूर्तीनिमित्त कार्यक्रम आरंभला तेव्हा महापालिकेला जाग आली, त्यांनी गणेशोत्सवाची सव्वाशे वर्षे हा उपक्रम जाहीर केला. ती वादाची ठिणगी ठरली. हा १२५ व गणेशोत्सव नसून १२६ वा आहे, त्याचबरोबर तो लोकमान्यांनी नव्हे तर भाऊसाहेबांनी सुरू केला असा दावा भाऊसाहेब रंगारी मंडळाने केला. त्यावर उलटसुलट चर्चा सुरू झाली. महापालिकेनं मग लोकमान्यांची छबी हलविली. मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमात ठासून सांगितले की हा उत्सव लोकमान्य टिळक यांनीच सुरू केला. त्याचा निषेध म्हणून मिळालेला सत्कार भाऊसाहेब रंगारी मंडळाने महापालिकेच्या दारात नेऊन ठेवला. लोकशक्तीला एकसंघ आणण्यासाठी ज्या उत्सवाला सार्वजनिक रूप दिलं गेलं त्याच उत्सवातून समाजात दुही निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
गणेशोत्सवाची सव्वाशे वर्षे असं सध्या सगळीकडे म्हटलं जातंय. पण महाराष्ट्रातल्या या सार्वजनिक गणेशोत्सवाला २५ ऑगस्ट २०१७ ला १२९ वर्षे पूर्ण व्हायची आहेत. पुण्यातल्या लक्ष्मी रोडवरच्या गणपती चौकात पूर्वी गुरुजी तालीम होती, ह्या गुरुजी तालीमीत हिंदू-मुस्लिम पहिलवान घुमायचे. १८८८ सालापासून हे पहिलवान तालमीत गणपती बसवायचे. शेख हशम वल्लद लालाभाई नालबंद, शेख बाबूभाई वल्लद रुस्तमभाई नालबंद, भिकू पांडुरंग शिंदे आदींचा या गणपती उत्सवात पुढाकार होता. ही तालीम आता नाही, पण गणेशोत्सव मात्र दरवर्षी सुरूच आहे १९८८ साली ह्या गणेशोत्सव मंडळाने उत्सव शताब्दी साजरी केली.लोकमान्य टिळकांना सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक म्हणतात, पण टिळकांचा सार्वजनिक गणेश १८९४ साली प्रथम पुजला गेला तो टिळक राहायचे त्या श्रीमंत सरदार बाळासाहेब विंचूरकर यांच्या वाड्यात. कुमठेकर रस्त्यावर सदाशिव पेठ पोस्टाच्या समोर हा वाडा अजून आहे. टिळकांनी गायकवाड वाडा १९०५ मध्ये घेतला. मग तिथे सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला.
१८१३ साली सरदार नानासाहेब खासगीवाले, गणपतराव घोटवडेकर आणि वैद्य भाऊसाहेब रंगारी या तिघांनी सार्वजनिकरित्या गणपती बसवले आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी ते रस्त्यातून समारंभपूर्वक मिरवत विसर्जनासाठी नेले. सार्वजनिक गणेशोत्सवाची ही सुरुवात. १८९२ सालात सरदार नानासाहेब खासगीवाले ग्वाल्हेरला गेले होते. ग्वाल्हेरात दरबारी थाटात साजरा होणारा सार्वजनिक गणेशोत्सव बघून ते पुण्याला आले. त्यांनी ह्या उत्सवाबाबत लोकमान्य टिळकांना सांगितलं असावं. लोकमान्य हे त्यावेळी पुण्यातल्या राष्ट्रीय वृत्तीचा प्रमुख आधारस्तंभ होते, लोकमान्यांकडून हा सार्वजनिक गणेशोत्सवाचा विचार त्यांच्याकडे येणाऱ्या तरुण मंडळींपर्यंत गेला आणि भाऊ रंगारी यांच्या घरीच एक बैठक भरली. महर्षी अण्णासाहेब पटवर्धन, बाळासाहेब नातू, लखुशेठ बळवंत दंताळे, नारायण सातव, गणपतराव घोटवडेकर, नाना नारायण भोर, खंडोबा तावडे, सरदार नानासाहेब खासगीवाले, बळवंतराव कोकाटे, नाना हसबनीस, रामभाऊ बोधने, गंगाधर रावजी खेर, आणि दगडूशेठ हलवाई हे ह्या बैठकीला हजर होते म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रेरणा लोकमान्यांनी दिली तरी ते त्यासाठी बैठकीला हजर नव्हते. ही बैठक श्रावणात झाली आणि लगेच घोटवडेकर, भाऊ रंगारी, खासगीवाले यांनी भाद्रपदात सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना प्रत्यक्षात आणली.
पुणेकरांना त्यांच्या उत्सवाला साजेल असा उत्सव मिळाला. हा उत्सव फक्त बामणांचा आहे, हा ढेरपोट्या देव सार्वजनिक जागी नको, असा आणि त्याहून अधिक विखारी विरोध या उत्सवाला झाला. केसरीमधून, जाहीर व्याख्यानातून, लोकमान्यांनी त्याला ठणठणीत जबाब दिला. पण पुण्यातील सनातनी मंडळींनी या धार्मिक उत्सवात राजकारण येते म्हणून कुरकुरायला सुरुवात केली तेव्हा ती कुरकुर लक्षात घेऊनच की काय , टिळकांनी राष्ट्रीय विचाराच्या प्रसाराचीच सोय करण्यासाठी तीन वर्षांनी शिवजयंतीचा राष्ट्रीय उत्सवही सुरू केला पण लोकांत ठसला, रुचला, फोफावला आणि पुणेच नव्हे तर मुंबई सारख्या म्हणगरीला सर्व महाराष्ट्रासह व्यापून उरला तो मात्र गणेशोत्सवाच!
गणेशाशी या उत्सवामुळेच लोकांचं अतूट असं नातं निर्माण झालं. गणेशाची मूर्ती हाच गणेशोत्सवचा एक आगळा आकर्षणाचा विषय बनला.दुर्दैवाने सध्या अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी एकच एक ठोकळा मूर्ती बनवून देवळे वा टपऱ्या व बांधून आणि त्यापुढे पेट्या ठेऊन गणेशाची दुकाने काढली आहेत हा भाग वेगळा; पण दरवर्षी नव्या रुपातली नवी मूर्ती, मग ती पारंपारिक का असेना, आणण्यात जो अवर्णनीय आनंद होता वा आहे तो गणेशाला आणि त्याच्या उत्सवालाही जिवंतपणा देणारा आहे. उघडा बाळ गणेश, झबलं घातलेला रांगता बाळ गणेश, कृष्णाच्या रुपातला गणेश, पिंपळ पानावर पायाचा अंगठा चोखणारा गणेश, नागाच्या वेटोळ्यावर बसलेला, नागफणीवर नृत्य करणारा, शेषावर शेषशायी विष्णुसारखा लवंडलेला, हत्तीवर बसून वाघावर भाला मारणारा, वाघाचा जबडा फाडणारा, सिंहाला टेकून बसलेला, सिंहावर बसलेला, मोरावर बसलेला, गरुडावर बसलेला, उंदरावर बसलेला, उंदराच्या रथावर बसलेला, हरणाच्या रथात बसलेला, सात घोड्याच्या रथात बसलेला, किती रूपे, किती प्रकार...! सारी सोज्वळता राखून बनवलेल्या या मूर्तींनीच माणसांना घराबाहेर खेचलं, एकत्र आणलं. याशिवाय काही मूर्तीही घडल्या. काही वर्षांपूर्वी लकडी पुलाजवळ बसणाऱ्या गणपतीने प्रचंड खळबळ माजविली होती प्रभात फिल्म कंपनीतल्या कलावंतांनी बनवलेली चांगली दहाफुटाची खुर्चीवर बसलेली सुटाबुटातली गणेशमूर्ती एकवर्षं बसविण्यात आली आणि तेव्हा जणू हाहाकार झाला. पितांबरधारी गणेशाऐवजी धोतर,मलमली अंगरखा घातलेला, टिळकांप्रमाणे पगडी, लांब अंगरखा घातलेला किंवा शिवाजी वेषातला तुमान घालणारा जरीटोपवाला अथवा बजरंगबलीच्या लंगोटधारी वेषातला गणेश लोकांनी पाहिला. बरसात सिनेमानं लोकांना वेडं केलं त्यावर्षी हातावर नर्गिस घेतलेल्या राजकपूरची ती सुप्रसिद्ध पोझ जी पुढे आरके फिल्मची निशाणी ठरली तसा बरसात गणपतीही पुण्यात बसवला गेला होता. काही काही मंडळाच्या मूर्ती ठरलेल्या असायच्या. वज्रदेही मंडळाची पाहिलवानाच्या वेषातली, हत्ती गणपतीची हत्तीवर बसून वाघ मारणारी, दगडू हलवाई, मंडईतल्या मूर्तीही पूर्वापार रूपातल्याच. आता मूर्तीपेक्षा देखावे आणि विजेची करामत याचे महत्व वाढले आहे. करमणुकीचे, प्रबोधनाचे कार्यक्रम नांमात्रही उरलेले नाहीत. वर्गण्या गोळा करण्यावरून पूर्वी गणेशोत्सवावर टीका व्हायची. वर्गणीची सक्ती व्हायची असे लोक म्हणायचे. आता हे वर्गण्यांचे पर्वही संपले आहे. घरोघर जाऊन वर्गण्या वसूल करण्याचा व्याप कार्यकर्त्यांना नकोसा झालाय. त्याऐवजी प्रायोजक पकडण्याचे युग सध्या आहे. यातले काही आपल्या मालाची वा आपली जाहिरात करणारे असतात, तर काही गुपचूप पंथातले असतात.
काही वर्षापूर्वी पुण्याच्या वाडिया कॉलेजचे निवृत्त प्राचार्य व.कृ. नुलकर यांनी प्रा. माधव धायगुडे यांच्या साहाय्याने पुण्यातील गणेशोत्सवावर एक अभ्यासपूर्ण अहवाल तयार केला हिता. त्यांनी ७७ मंडळांचे अहवाल हिशेब आणि प्रत्यक्ष कार्य अभ्यासले. आपल्या अहवालात प्राचार्य नुलकर म्हणतात, ' ही मंडळे, त्यांची कामे, त्यांचा उतू जाणासरा उत्साह मी पाहिला आणि खरोखरच अशी जाणीव झाली की, आम्ही उगीच ओरडतो की, आपली नवी पिढी बिघडली आहे! आपण मोठे नाना जसे वळण देऊ तसे ते वागतील. ,माझी तर खात्री पटली की, गणेशोत्सवाला आपण उत्तम वळण देऊ शकू. जे ईप्सित समाज-जागरण मनात ठेवून आपण वळण लावले तर नक्कीच फायदा होईल.' पण आपण म्हणजे नक्की कुणाला वळण लावायचे? लोकमान्यांनी व्याख्यानातून, अग्रलेखातून सुशिक्षितांना या उत्सवात सामील होण्यासाठी वारंवार हाक दिली आहे. मंडईतल्या गणेशोत्सवात बोलताना १८९६ सालात लोकमान्य म्हणाले होते. 'जर उत्सवात कमतरता असेल तर त्याचे पाप ह्या उदासीन शहाण्या मंडलीच्याच कपाळी मारावे लागते. लोकांत मिसळा, त्यांचे कुठे चुकत असल्यास सर्व गोष्टी नीट जुळवून द्या. ते तुमचे कर्तव्य आगे ही गोष्ट आज तरी सुशिक्षितांना कळली आहे? सुशिक्षित समाजात मिसळत नाहीत, स्वतःला वेगळे समजतात, लोकमण्यांनू यावर अक्षरशः कोरडे ओढले आहेत. गणेशोत्सवासाठी एकत्र येणाऱ्या हिंदूंना संघटनेचे सामर्थ्य समजावून देऊन निर्भय केले हे खरेच आहे, पण गणेशोत्सव हा समाजातल्या भेदाभेदावर मात करण्याचा, समाज मन साधण्याचा प्रभावी मार्ग आहे. त्याने अशिक्षित, अडाणी उपेक्षित समाज आणि सर्वार्थानं समर्थ असलेला सुशिक्षित पुढारलेला समाज यांचे द्वैत मिटविता येईल. अशीच टिळकांची भावना होती, ती त्यांच्या लिखाणातून वारंवार प्रकटलीही आहे.
लोकमान्यांनी सुशिक्षितांचा जो सहभाग अपेक्षीला होता तो मिळविण्यात लोकमान्यांना यश आले नाही आणि त्यांच्यानंतर या उत्सवाकडे लोकमान्यांच्या दृष्टिकोनातून कुणी बघितलेलेही दिसत नाही. हा उत्सव मोकाट सुटलेल्या घोड्यांसारखाच उधळला आहे आणि तो आवरणे कुणाला जमू शकलेले नाही. या उत्सवाला वळण देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना न जुमानता आजही हा उत्सव उधळतो आहे. त्यामध्ये नको त्या अनिष्ट गोष्टी शिरल्या आहेत.
या उत्सवातून निर्माण होणारे चैतन्य-उत्साह ज्वालामुखीतून फेकल्या जाणाऱ्या लाव्हासारखाच विध्वंसक आहे.यातून अपप्रवृत्ती जोपासल्या जात आहेत. हे सगळे बदलण्याचा , ही ऊर्जा शक्तीत बदलण्याचा एकच मार्ग आहे. लोकमान्यांनी तो सांगितला आहे. ' आमच्या औदासिन्यामुळे मलिन झालेले हे उत्सव सतेज करण्याचे हे काम सुशिक्षितांनी आपल्या शिरावर घेतलं पाहिजे. व्यवस्थेसंबंधीचे हरेक काम अंग मोडून केलं पाहिजे, उत्सवातील लोकशिक्षणातील भाग सुशिक्षितांनी हाती घेतला पाहिजे. सामान्य लोकांच्या खरोखर गरजा काय आहेत.लोकांत धर्मवृत्ती कितपत जागृत आहे, लोकांच्या स्वाभाविक ओघाला जाणते वळण दिले असता राष्ट्रहित सहजगत्या साधणार आहे ह्या सर्व गोष्टी लिखाण मिसळून समजावून घेतल्या पाहिजेत. हे लोकमान्यांनी वारंवार सांगितले तेवढे न ऐकता ह्या उत्सवाकडे सुशिक्षित बघत राहिले. अजून त्या बघण्यात फारसा बदल पडलेला नाही. बुद्धिदात्या गजानना, हे तुलाही कळून चुकलं असेल...! असो म्हणा मंडळी गणपतीबाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.....!
-हरीश केंची

No comments:
Post a Comment