Saturday 26 August 2017

सच्चरका कडवा सच...!

*सच्चरका कडवा सच...!*

स्वातंत्र्याने सत्तरी ओलांडली तरीही आपण पोक्तपणे आपलंच मूल्यमापन करु शकलेलो नाही. अनेक बाबतीतल्या सत्यापर्यंत आपणास पोहोचता आलेलं नाही. आपण अनेक मिथकं दूर करु शकलेलो नाही. समजांची तपासणी आणि गैरसमजांची सफाई तर कधीच होत नाही. परिणामी, अज्ञान आणि लबाडीतून अनेक प्रश्न निर्माण होतात. या देशातील मुस्लिम हा एक मुख्य प्रश्न आहे! मात्र त्या मुस्लिमांचे अनेक प्रश्न आहेत. त्यातल्या प्रत्येक उप-प्रश्नाला खास असा भारतीय कोन आहेच. केवळ तलाकच नाहीतर इतर अनेक महत्वाच्या स्थिती आणि समस्येवर आजवर दुर्लक्षच झालं! एकतर्फी तलाकला न्यायालयानं असंवैधानिक ठरवत त्यावर बंदी घातलीय. भाजपला यातून राजकीय लाभ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तशी टीका होत आहे. मात्र राजकारणाशिवाय काहीच नसतं आणि असूही नये. फक्त ते करताना चर्चा-वाद नॉनईश्शूवर न होता इश्यूवरच व्हावा. तसं झालं तर ते मुस्लिमांचा लाभाचं वाटत असलं, तरी ते सर्वच समाजातल्या मागासलेल्या लोकांच्या हिताचं आहे.
--------------------------------------------

मुस्लिमांच्या प्रश्नांवर, समस्यांवर मूलभूत अभ्यास करण्यासाठी २००५ मध्ये तत्कालीन डॉ. मनमोहनसिंग यांच्या सरकारनं न्या. राजेंद्र सच्चर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. ते एक योग्य काम झालं. त्या समितीनं मुदतीत आपला अहवाल तयार करुन तो सरकारला सादर केला. म्हणजे या विषयाला सुरुवात व्हायला हवी होती ती म्हणावी तशी झाली नाही. समितीचं बाळ वाढण्यापूर्वी, त्याचं भरणपोषण होण्यापूर्वीच त्याला नख लावण्याचा उद्योग सुरू झाला आणि या अहवालाची जणूृ भ्रूणहत्याच ठरली. आज या अहवालाबाबत आजी माजी सत्ताधारी तोंड उघडत नाहीत आणखी दुर्दैवाची गोष्ट म्हणजे स्वतःला मुस्लिमांचे नेते म्हणवून घेणारेही मिठाची गुळणी केल्याप्रमाणे गप्प आहेत.

*गैरसमजाची खाण*
मुस्लिमांच्या बाबतीत गैरमुस्लिमांची मतं ही गैरसमजाची खाणच असते. ती कवचितच बुजण्याचा प्रयत्न होतो. सच्चर समितीचा अहवाल अशा गैरसमजांना उघडं पाडतो. न्या.राजेंद्र सच्चर यांच्या दिमतीला सय्यद हमीद, डॉ. टी. के.ओमन, एम.एस. बॅस्टिन, डॉ.अनवर माजिद, डॉ. अबू सालेह शरीफ, डॉ. राकेश बसंत यांनी या समितीत सदस्य म्हणून काम पाहिलं. समितीच्या स्थापनेचा मुख्य हेतू मुस्लिमांच्या सामाजिक-आर्थिक व शैक्षणिक मागासलेपणाची वस्तुस्थिती जाणून घेणं हा होता. समितीनं आपलं काम वेळेत आणि तंतोतंतपणे केलं. सरकारच्या योजना, धोरण ठरवताना खरं तर या समितीच्या अहवालाशिवाय पुढं सरकता आलं नसतं, या समितीचा अहवाल एकप्रकारे परिमाण ठरविण्यासाठीचं सूत्र म्हणून उपयोगी पडलं असतं पण राजकीय हेतूनं यावर मात केली गेली. हे आता स्पष्ट होतंय.

*सच्चर समितीची कार्यकक्षा*
सच्चर समितीनं आपली कार्यकक्षा ठरवून घेतली होती. त्यानुसार कामकाज करत त्यांनी पुढील बाबींची माहिती जमा केली. १) कोणत्या राज्यात , कोणत्या प्रदेशात व कोणत्या जिल्ह्यात मुस्लिम राहतात. त्यांचं तिथलं प्रमाण किती? २) त्यांची उपजीविका कशी चालते? ३) त्यांची सांपत्तिक स्थिती काय आहे? ४) ,इतरांच्या तुलनेत त्यांच्या उत्पन्नाचे मार्ग कोणते? ५) त्यांच्यातलं साक्षरतचं प्रमाण किती? ६) खासगी नोकरीतील त्यांचं प्रमाण किती? ७) सरकारी नोकरीतील त्यांचं प्रमाण किती? ८) इतर मागासवर्गीयांत मुस्लीम किती? ९) संस्थात्मक व्यवहारात त्यांचं स्थान कोणतं? १०) इतरांच्या तुलनेत त्यांच्या सुविधांची अवस्था काय?
सामाजिक शास्त्राच्या भाषेत असे प्रश्न उपस्थित करुन त्याचा शोध घेण म्हणजे, त्या समस्येला समजून घेण्याची सुरुवात समजली जाते. सच्चर समितीनं हे काम जलद वेगानं केलं. त्यांनी लष्करात किती मुस्लीम आहेत, असा प्रश्न लष्करप्रमुखांना धाडून दिला होता. तेव्हा वादंग निर्माण झाले. लष्करातील भरती धर्माच्या आधारावर होत नाही, असा मुद्दा घेऊन वातावरण तप्त केलं गेलं. परंतु सच्चर वा त्यांच्या समितीतल्या सदस्यांना हे वास्तव माहीत नव्हतं असं नाही. भारतीय सेना जर सर्व भारतीयांचं रक्षण करते, असं समजलं जात असेल तर, तिच्यात सर्व भारतीयांचं प्रतिबिंब पडतं का? हे जाणून घेणं गैर नव्हतं. मुद्दा लष्करात आरक्षण लागू करण्याचा नव्हता; तर वस्तुस्थिती जाणून घेण्याचा होता. समितीला सरकारच्याच काही यंत्रणांचं सहकार्य मिळालं नसलं, तरीही ती बऱ्यापैकी निष्कर्ष काढला गेला.

*मुस्लिमांबाबतची मिथकं*
समितीला मिळालेल्या आकड्यांमधून अनेक मिथकं नष्ट होतात. कडवे जातीयवादी हे मुस्लिमांच्या विशेषाधिकाराचा उल्लेख करताना 'वो पांच और उनके पचास' अशी भाषा वापरतात. त्याचा अर्थ, १ नवरा त्याच्या ५ बायका आणि त्यांची ४४ मुलं असा होतो. सच्चर समितीचे आकडे या अंकरचनेला खोटं ठरवतात. मुस्लिमांमधील स्त्रियांचं प्रमाण एकाने पांच बायका कराव्यात इतकं नाही. एकानं दोन कराव्यात एवढंही नाही. सर्वजण अनेक विवाह करतात असं म्हणण्याचीही इथे सोय नाही! मुस्लिमांची संख्या वाढत जात आहे, असाही एक समज आहे. परंतु १९९१ च्या जनगणनेशी २००१ ची तुलना करता मुस्लिमांच्या लोकसंख्या वाढीत ४ टक्क्यांची घट दिसून येते. मागासलेपणासाठी जात हा निकष योग्य आहे, असं भारतातले कडवे आणि उच्चवर्णीय हिंदूही आता मान्य करू लागलेत. त्याच आधारावर आता मुस्लिमांमधील मागास जाती आरक्षण मागू लागल्या आहेत. अशावेळी मुस्लीम धर्मात जातीला काहीच स्थान नाही. सबब मुस्लिमांना जातीच्या आधारे आरक्षण देऊ नये, असा एक मतप्रवाह आहे. न्या. सच्चर समितीच्या अहवालाच्या निमित्ताने या मुद्दा पुन्हा चर्चेत आला. परंतु याबाबतीतील वस्तुस्थिती नेहमीप्रमाणे भिन्न आहे. या देशातील हिंदू धर्म हा समाज म्हणून एकसंघ नाही. तसंच सर्व मुस्लीम एकाच सामाजिक-आर्थिक स्तरातले नाहीत. चातुर्वर्ण्य फक्त हिंदूतच नव्हे, तर भारतीय मुस्लीम, शीख आणि ख्रिश्चनांनाही लागू आहे. मुस्लिमांमध्ये उघडपणे जात नाही. मात्र ती सुप्तपणे हिंदूंएवढीच प्रबळ आहे. तिथेही जाती व्यवसायावरून पडल्या आहेत. मूळच्या हिंदूंनी मुस्लीम होताना आपली जातही तिथे नेली आहे. साहजिकच त्यांचा सामाजिक स्तर तोच आहे, जो पूर्वी होता. इकडचा माळी तिकडे बागवान झाला. इकडचा खाटीक तिकडे कुरेशी-हलाल झाला. महाराष्ट्रात व विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्रात तर अनेक मुस्लिमांची आडनावं हिंदुसदृश्य आहेत. पूजा पद्धती आणि रोटी-बेटी व्यवहार सोडले, तर हिंदूतल्या आणि मुस्लिमांतील मागासात काही फार फरक करता येणार नाही. तात्पर्य असं की, मागासलेपण ही बाब धर्माशी नव्हे; तर सामाजिक-आर्थिक स्तराशी संबधीत आहे.

*मुस्लिमांमधील वर्ग*
न्या. सच्चर समितीने मुस्लिमांमधील मागासांना एका निश्चित श्रेणीत, व्याख्येत बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. समितीला मुस्लिमांमध्येही वर्ग जाणवले.त्यात सर्वोच्च स्थानी उच्चवर्णीय आहेत. जे स्वतःला उत्तर-पश्चिमेकडून आलेले समजतात. त्यांना 'अश्रफ' म्हटलं जातं. त्यानंतरचा दुसरा वर्ग हिंदूतल्या ज्या वरच्या जातींनी राजकीय कारणास्तव मुस्लीम धर्म स्वीकारला, त्यांचा आहे.त्यांना 'अजलफ' म्हणतात. त्यानंतर ज्यांनी आपल्या चांगल्या व स्वच्छ व्यवसायासह धर्मातर केलं, अशांचा तिसरा स्तर आहे. त्यांना 'अरझल' म्हणतात. त्यानंतर उरतो तो स्तर अस्वच्छ व्यवसायी यांचा. त्यांनी अनेक कारणांनी व मुक्तपणे इस्लामचा स्वीकार केला होता. ते चौथ्या स्तरात गणले जातात. न्या. सच्चर समितीलस मुस्लिमांमधील मोठा जनसमूह मागास असल्याचं दिसून आलं. समितीच्या कार्यकक्षेनुसार तुलना केली असता मुस्लीम मागास हे हिंदू मागास जातींपेक्षा मागास असल्याचं दिसून आलं.

*शिक्षणाबाबत गंभीर स्थिती*
मुस्लिमांच्या शिक्षणाबाबतची स्थिती खूपच गंभीर आहे. सच्चर समिती त्यातल्या वास्तवाला पहिल्यांदाच भिडली. समितीच्या माहितीनुसार ६ ते १४ वर्ष वयोगटातील २५ टक्के मुस्लीम मुलं शाळेतच जात नाहीत. जी जातात त्यांची लवकर गळती होते. जी शिकतात, त्यांचा अनुभव हिंदूंसारखाच किंबहुना त्यापेक्षा जास्त वाईट असतो. मदरशांची संख्या मोठी असल्याने मुस्लीम मदरशात शिकतात, असं म्हणण्यात वाव आहे. परंतु हे प्रमाण फक्त ३ टक्के एवढंच आहे. २००१ च्या गणनेनुसार देशातल्या पदवीधरांची संख्या ३ कोटी ७६ लाख आहे. त्यात मुस्लिमांची संख्या केवळ २३ लाख एवढी आहे. त्यातही अजून सुक्ष्मलक्षी वर्गीकरण उपलब्ध नाही. अन्यथा किती मुस्लिमांना उच्च, वैद्यकीय, तंत्रशिक्षण मिळालं, हे स्पष्ट झालं असतं. मात्र उच्चशिक्षण आणि सरकारी नोकरीतील संधी यांचा परस्पर संबंध असल्याने सरकारी नोकरीतील मुस्लिमांची आकडेवारी त्यावर प्रकाश टाकते. रेल्वेच्या एकूण नोकऱ्यात ४.५ टक्के नोकऱ्या मुस्लिमांना मिळाल्या आहेत. त्या ४ टक्क्यातले ९८ टक्के लोक कनिष्ठ श्रेणीत काम करतात. पोलीस खात्यात मुस्लिमांची संख्या ६ टक्के, आरोग्य खात्यात ४ टक्के, आणि दळणवळण खात्यात ६ टक्के आहे. एकूण आयएएसमध्ये मुस्लिमांची संख्या ३ टक्के, आयपीएसमध्ये १.८ टक्के आणि आयएफएसमध्ये ४ टक्के एवढं प्रमाण आहे. एवढे आकडे पाहिल्यावर जर कुणाला मुस्लिमांचं लांगूनचालन होत असल्याचं सांगावंसं वाटत असेल, तर त्याची जीभ बेमुर्वत म्हणावी.

*संसदेतही चर्चा नाही*
समितीनं सादर केलेला अहवाल सरकारने संसदेत मांडला. समितीचा अहवाल म्हणजे आयोगाचा अहवाल नव्हे की ज्याच्यावर कृती अहवाल तयार होऊन त्याची अंमलबजावणी व्हावी. समितीच्या सूचना, शिफारशी सरकारला बंधनकारक नसतात. तरीही त्याबाबत गहजब केला गेला. काहींना ती दुसरी फाळणी वाटली तर काहींना तो अणुबॉम्ब वाटला. तथापि, या आपल्या राज्यघटनेच्या उद्दिष्टांमध्येच सर्वांची प्रगती अभिप्रेत असेल आणि आपण घटना मानत असू, तर न्या. सच्चर समितीच्या अहवालाचं वास्तव समजून घेतलं पाहिजे.आपली बिघडलेली प्रकृती दुरुस्त करण्याचं, कुरूप चेहरा अनुरूप करण्याचं ते एक औषध आहे. मात्र रोगी औषध घेईलच असं नाही. वास्तव नाकबूल करण्याची, वास्तवापासून दूर पळण्याची परंपरा त्यावेळीही जपली गेली. त्यातून सच्चर समितीचा अहवाल राजकारणाचे डावपेच म्हणूनच वापरला गेला. या समितीच्या अहवालाविरोधात भाजप परिवारातील मुझफ्फर हुसेन, मुख्तार अब्बास नक्वी यांनीच सर्वप्रथम बोंब ठोकल्याने त्यांच्या 'आका'चा हेतू स्पष्ट झाला होता. या मुद्यात मंडल आयोगाच्या अहवालाएवढाच , शहाबानो प्रकरणाइतकाच दम असल्याचं साहजिक होतं. पण तसं काही घडलंच नाही. कारण बरंच भोगल्यानंतर हिंदूंतील आणि मुस्लिमांतील  मागास बांधव पेटवापेटवी करण्याच्या मानसिकेत तेव्हा नव्हते. काँग्रेस पक्षाला यातून राजकीय लाभ होण्याची शक्यता व्यक्त केली होती मात्र ती फोल ठरली आणि सच्चर समितीचा अहवाल काँग्रेसच्या अंगलट आला, त्याची सत्ता गेली आणि आता तर अस्तित्व संपण्याची भीती निर्माण झालीय.

*भाजपेयींची सत्वपरिक्षा*
तलाकच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची मुस्लीम धर्मीयांत उलटसुलट चर्चा सुरू झालीय. दूरचित्रवाणीवरील चर्चेत मुस्लिमांच्या मूळ समस्येकडे कुणाचेच लक्ष असल्याचं जाणवलं नाही. मुस्लीम नेते या निर्णयाचं स्वागत करतानाही कुराणात असं काही लिहिलेलं नाही उलट स्त्रियांना चौदाशे वर्षांपूर्वीच अधिकार बहाल करण्यात आल्याचं हे नेते सांगत होते. मुस्लिमांचं जीवन वास्तव मांडण्यात अयशस्वी ठरले. न्यायालयानं तलाकचा कायदा सहा महिन्यात करण्याचं बंधन घातलं आहे. भाजपची ही सत्वपरिक्षा ठरणार आहे. रा. स्व. संघ आणि पक्षातील कट्टरपंथी यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. प्रधानमंत्री यांचं वक्तव्य आणि प्रतिक्रिया या बोलक्या आहेत. आता केवळ भाजपेयींनी तलाकपुरतेच मर्यादित राहू नये तर. मुस्लिमांमधील मागासलेपण दूर करण्यासाठीही प्रयत्न करावेत. आम्हाला धार्मिक उन्मादी म्हणून टीका होतेय तसे आम्ही नाहीत हे दाखविण्याची ही वेळ आहे. पाहू या आगे आगे होता है क्या...!

- हरीश केंची,

Saturday 19 August 2017

सुशिक्षितांना सहभागी व्हावं...!

*गणेशोत्सव:*
*सुशिक्षितांनी सहभागी व्हावं!*

"या उत्सवातून निर्माण होणारे चैतन्य-उत्साह ज्वालामुखीतून फेकल्या जाणाऱ्या लाव्हासारखाच विध्वंसक आहे.यातून अपप्रवृत्ती जोपासल्या जात आहेत. हे सगळे बदलण्याचा , ही ऊर्जा शक्तीत बदलण्याचा एकच मार्ग आहे. लोकमान्यांनी तो सांगितला आहे. ' आमच्या औदासिन्यामुळे मलिन झालेले हे उत्सव सतेज करण्याचे हे काम सुशिक्षितांनी आपल्या शिरावर घेतलं पाहिजे. व्यवस्थेसंबंधीचे हरेक काम अंग मोडून केलं पाहिजे, उत्सवातील लोकशिक्षणातील भाग सुशिक्षितांनी हाती घेतला पाहिजे. सामान्य लोकांच्या खरोखर गरजा काय आहेत.लोकांत धर्मवृत्ती कितपत जागृत आहे, लोकांच्या स्वाभाविक ओघाला जाणते वळण दिले असता राष्ट्रहित सहजगत्या साधणार आहे ह्या सर्व गोष्टी लिखाण मिसळून समजावून घेतल्या पाहिजेत. हे लोकमान्यांनी वारंवार सांगितले तेवढे न ऐकता ह्या उत्सवाकडे सुशिक्षित बघत राहिले. अजून त्या बघण्यात फारसा बदल पडलेला नाही."
--–---------------------------------------

सव्वाशे वर्षाच्या गणेशोत्सवाला यंदा वेगळ्या वादाने गाठले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव कुणी सुरू केला? लोकमान्य टिळकांनी की भाऊसाहेब रंगारी यांनी? या वादाची ठिणगी पडली ती महापालिकेने सुरू केलेल्या उत्सवापासून! दगडूशेठ हलवाई गणपती मंडळांनं आपल्या सव्वाशे वर्षपूर्तीनिमित्त कार्यक्रम आरंभला तेव्हा महापालिकेला जाग आली, त्यांनी गणेशोत्सवाची सव्वाशे वर्षे हा उपक्रम जाहीर केला. ती वादाची ठिणगी ठरली. हा १२५ व गणेशोत्सव नसून १२६ वा आहे, त्याचबरोबर तो लोकमान्यांनी नव्हे तर भाऊसाहेबांनी सुरू केला असा दावा भाऊसाहेब रंगारी मंडळाने केला. त्यावर उलटसुलट चर्चा सुरू झाली. महापालिकेनं मग लोकमान्यांची छबी हलविली. मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमात ठासून सांगितले की हा उत्सव लोकमान्य टिळक यांनीच सुरू केला. त्याचा निषेध म्हणून मिळालेला सत्कार भाऊसाहेब रंगारी मंडळाने महापालिकेच्या दारात नेऊन ठेवला. लोकशक्तीला एकसंघ आणण्यासाठी ज्या उत्सवाला सार्वजनिक रूप दिलं गेलं त्याच उत्सवातून समाजात दुही निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

गणेशोत्सवाची सव्वाशे वर्षे असं सध्या सगळीकडे म्हटलं जातंय. पण महाराष्ट्रातल्या या सार्वजनिक गणेशोत्सवाला २५ ऑगस्ट २०१७ ला १२९ वर्षे पूर्ण व्हायची आहेत. पुण्यातल्या लक्ष्मी रोडवरच्या गणपती चौकात पूर्वी गुरुजी तालीम होती, ह्या गुरुजी तालीमीत हिंदू-मुस्लिम पहिलवान घुमायचे. १८८८ सालापासून हे पहिलवान तालमीत गणपती बसवायचे. शेख हशम वल्लद लालाभाई नालबंद, शेख बाबूभाई वल्लद रुस्तमभाई नालबंद, भिकू पांडुरंग शिंदे आदींचा या गणपती उत्सवात पुढाकार होता. ही तालीम आता नाही, पण गणेशोत्सव मात्र दरवर्षी सुरूच आहे १९८८ साली ह्या गणेशोत्सव मंडळाने उत्सव शताब्दी साजरी केली.लोकमान्य टिळकांना सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक म्हणतात, पण टिळकांचा सार्वजनिक गणेश १८९४ साली प्रथम पुजला गेला तो टिळक राहायचे त्या श्रीमंत सरदार बाळासाहेब विंचूरकर यांच्या वाड्यात. कुमठेकर रस्त्यावर सदाशिव पेठ पोस्टाच्या समोर हा वाडा अजून आहे. टिळकांनी गायकवाड वाडा १९०५ मध्ये घेतला. मग तिथे सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला.

१८१३ साली सरदार नानासाहेब खासगीवाले, गणपतराव घोटवडेकर आणि वैद्य भाऊसाहेब रंगारी या तिघांनी सार्वजनिकरित्या गणपती बसवले आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी ते रस्त्यातून समारंभपूर्वक मिरवत विसर्जनासाठी नेले. सार्वजनिक गणेशोत्सवाची ही सुरुवात. १८९२ सालात सरदार नानासाहेब खासगीवाले ग्वाल्हेरला गेले होते. ग्वाल्हेरात दरबारी थाटात साजरा होणारा सार्वजनिक गणेशोत्सव बघून ते पुण्याला आले. त्यांनी ह्या उत्सवाबाबत लोकमान्य टिळकांना सांगितलं असावं. लोकमान्य हे त्यावेळी पुण्यातल्या राष्ट्रीय वृत्तीचा प्रमुख आधारस्तंभ होते, लोकमान्यांकडून हा सार्वजनिक गणेशोत्सवाचा विचार त्यांच्याकडे येणाऱ्या तरुण मंडळींपर्यंत गेला आणि भाऊ रंगारी यांच्या घरीच एक बैठक भरली. महर्षी अण्णासाहेब पटवर्धन, बाळासाहेब नातू, लखुशेठ बळवंत दंताळे, नारायण सातव, गणपतराव घोटवडेकर, नाना नारायण भोर, खंडोबा तावडे, सरदार नानासाहेब खासगीवाले, बळवंतराव कोकाटे, नाना हसबनीस, रामभाऊ बोधने, गंगाधर रावजी खेर, आणि दगडूशेठ हलवाई हे ह्या बैठकीला हजर होते म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रेरणा लोकमान्यांनी दिली तरी ते त्यासाठी बैठकीला हजर नव्हते. ही बैठक श्रावणात झाली आणि लगेच घोटवडेकर, भाऊ रंगारी, खासगीवाले यांनी भाद्रपदात सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना प्रत्यक्षात आणली.

पुणेकरांना त्यांच्या उत्सवाला साजेल असा उत्सव मिळाला. हा उत्सव फक्त बामणांचा आहे, हा ढेरपोट्या देव सार्वजनिक जागी नको, असा आणि त्याहून अधिक विखारी विरोध या उत्सवाला झाला. केसरीमधून, जाहीर व्याख्यानातून, लोकमान्यांनी त्याला ठणठणीत जबाब दिला. पण पुण्यातील सनातनी मंडळींनी या धार्मिक उत्सवात राजकारण येते म्हणून कुरकुरायला सुरुवात केली तेव्हा ती कुरकुर लक्षात घेऊनच की काय , टिळकांनी राष्ट्रीय विचाराच्या प्रसाराचीच सोय करण्यासाठी तीन वर्षांनी शिवजयंतीचा राष्ट्रीय उत्सवही सुरू केला पण लोकांत ठसला, रुचला, फोफावला आणि पुणेच नव्हे तर मुंबई सारख्या म्हणगरीला सर्व महाराष्ट्रासह व्यापून उरला तो मात्र गणेशोत्सवाच!

गणेशाशी या उत्सवामुळेच लोकांचं अतूट असं नातं निर्माण झालं. गणेशाची मूर्ती हाच गणेशोत्सवचा एक आगळा आकर्षणाचा विषय बनला.दुर्दैवाने सध्या अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी एकच एक ठोकळा मूर्ती बनवून देवळे वा टपऱ्या व बांधून आणि त्यापुढे पेट्या ठेऊन गणेशाची दुकाने काढली आहेत हा भाग वेगळा; पण दरवर्षी नव्या रुपातली नवी मूर्ती, मग ती पारंपारिक का असेना, आणण्यात जो अवर्णनीय आनंद होता वा आहे तो गणेशाला आणि त्याच्या उत्सवालाही जिवंतपणा देणारा आहे. उघडा बाळ गणेश, झबलं घातलेला रांगता बाळ गणेश, कृष्णाच्या रुपातला गणेश, पिंपळ पानावर पायाचा अंगठा चोखणारा गणेश, नागाच्या वेटोळ्यावर बसलेला, नागफणीवर नृत्य करणारा, शेषावर शेषशायी विष्णुसारखा लवंडलेला, हत्तीवर बसून वाघावर भाला मारणारा, वाघाचा जबडा फाडणारा, सिंहाला टेकून बसलेला, सिंहावर बसलेला, मोरावर बसलेला, गरुडावर बसलेला, उंदरावर बसलेला, उंदराच्या रथावर बसलेला, हरणाच्या रथात बसलेला, सात घोड्याच्या रथात बसलेला, किती रूपे, किती प्रकार...! सारी सोज्वळता राखून बनवलेल्या या मूर्तींनीच माणसांना घराबाहेर खेचलं, एकत्र आणलं. याशिवाय काही मूर्तीही घडल्या. काही वर्षांपूर्वी लकडी पुलाजवळ बसणाऱ्या गणपतीने प्रचंड खळबळ माजविली होती प्रभात फिल्म कंपनीतल्या कलावंतांनी बनवलेली चांगली दहाफुटाची खुर्चीवर बसलेली सुटाबुटातली गणेशमूर्ती एकवर्षं बसविण्यात आली आणि तेव्हा जणू हाहाकार झाला. पितांबरधारी गणेशाऐवजी धोतर,मलमली अंगरखा घातलेला, टिळकांप्रमाणे पगडी, लांब अंगरखा घातलेला किंवा शिवाजी वेषातला तुमान घालणारा जरीटोपवाला अथवा बजरंगबलीच्या लंगोटधारी वेषातला गणेश लोकांनी पाहिला. बरसात सिनेमानं लोकांना वेडं केलं त्यावर्षी हातावर नर्गिस घेतलेल्या राजकपूरची ती सुप्रसिद्ध पोझ जी पुढे आरके फिल्मची निशाणी ठरली तसा बरसात गणपतीही पुण्यात बसवला गेला होता. काही काही मंडळाच्या मूर्ती ठरलेल्या असायच्या. वज्रदेही मंडळाची पाहिलवानाच्या वेषातली, हत्ती गणपतीची हत्तीवर बसून वाघ मारणारी, दगडू हलवाई, मंडईतल्या मूर्तीही पूर्वापार रूपातल्याच. आता मूर्तीपेक्षा देखावे आणि विजेची करामत याचे महत्व वाढले आहे. करमणुकीचे, प्रबोधनाचे कार्यक्रम नांमात्रही उरलेले नाहीत. वर्गण्या गोळा करण्यावरून पूर्वी गणेशोत्सवावर टीका व्हायची. वर्गणीची सक्ती व्हायची असे लोक म्हणायचे. आता हे वर्गण्यांचे पर्वही संपले आहे. घरोघर जाऊन वर्गण्या वसूल करण्याचा व्याप कार्यकर्त्यांना नकोसा झालाय. त्याऐवजी प्रायोजक पकडण्याचे युग सध्या आहे. यातले काही आपल्या मालाची वा आपली जाहिरात करणारे असतात, तर काही गुपचूप पंथातले असतात.

काही वर्षापूर्वी पुण्याच्या वाडिया कॉलेजचे निवृत्त प्राचार्य व.कृ. नुलकर यांनी प्रा. माधव धायगुडे यांच्या साहाय्याने पुण्यातील गणेशोत्सवावर एक अभ्यासपूर्ण अहवाल तयार केला हिता. त्यांनी ७७ मंडळांचे अहवाल हिशेब आणि प्रत्यक्ष कार्य अभ्यासले. आपल्या अहवालात प्राचार्य नुलकर म्हणतात, ' ही मंडळे, त्यांची कामे, त्यांचा उतू जाणासरा उत्साह मी पाहिला आणि खरोखरच अशी जाणीव झाली की, आम्ही उगीच ओरडतो की, आपली नवी पिढी बिघडली आहे! आपण मोठे नाना जसे वळण देऊ तसे ते वागतील. ,माझी तर खात्री पटली की, गणेशोत्सवाला आपण उत्तम वळण देऊ शकू. जे ईप्सित समाज-जागरण मनात ठेवून आपण वळण लावले तर नक्कीच फायदा होईल.' पण आपण म्हणजे नक्की कुणाला वळण लावायचे? लोकमान्यांनी व्याख्यानातून, अग्रलेखातून सुशिक्षितांना या उत्सवात सामील होण्यासाठी वारंवार हाक दिली आहे. मंडईतल्या गणेशोत्सवात बोलताना १८९६ सालात लोकमान्य म्हणाले होते. 'जर उत्सवात कमतरता असेल तर त्याचे पाप ह्या उदासीन शहाण्या मंडलीच्याच कपाळी मारावे लागते. लोकांत मिसळा, त्यांचे कुठे चुकत असल्यास सर्व गोष्टी नीट जुळवून द्या. ते तुमचे कर्तव्य आगे ही गोष्ट आज तरी सुशिक्षितांना कळली आहे? सुशिक्षित समाजात मिसळत नाहीत, स्वतःला वेगळे समजतात, लोकमण्यांनू यावर अक्षरशः कोरडे ओढले आहेत. गणेशोत्सवासाठी एकत्र येणाऱ्या हिंदूंना संघटनेचे सामर्थ्य समजावून देऊन निर्भय केले हे खरेच आहे, पण गणेशोत्सव हा समाजातल्या भेदाभेदावर मात करण्याचा, समाज मन साधण्याचा प्रभावी मार्ग आहे. त्याने अशिक्षित, अडाणी उपेक्षित समाज आणि सर्वार्थानं समर्थ असलेला सुशिक्षित पुढारलेला समाज यांचे द्वैत मिटविता येईल. अशीच टिळकांची भावना होती, ती त्यांच्या लिखाणातून वारंवार  प्रकटलीही आहे.

लोकमान्यांनी सुशिक्षितांचा जो सहभाग अपेक्षीला होता तो मिळविण्यात लोकमान्यांना यश आले नाही आणि त्यांच्यानंतर या उत्सवाकडे लोकमान्यांच्या दृष्टिकोनातून कुणी बघितलेलेही दिसत नाही. हा उत्सव मोकाट सुटलेल्या घोड्यांसारखाच उधळला आहे आणि तो आवरणे कुणाला जमू शकलेले नाही. या उत्सवाला वळण देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना न जुमानता आजही हा उत्सव उधळतो आहे. त्यामध्ये नको त्या अनिष्ट गोष्टी शिरल्या आहेत.

या उत्सवातून निर्माण होणारे चैतन्य-उत्साह ज्वालामुखीतून फेकल्या जाणाऱ्या लाव्हासारखाच विध्वंसक आहे.यातून अपप्रवृत्ती जोपासल्या जात आहेत. हे सगळे बदलण्याचा , ही ऊर्जा शक्तीत बदलण्याचा एकच मार्ग आहे. लोकमान्यांनी तो सांगितला आहे. ' आमच्या औदासिन्यामुळे मलिन झालेले हे उत्सव सतेज करण्याचे हे काम सुशिक्षितांनी आपल्या शिरावर घेतलं पाहिजे. व्यवस्थेसंबंधीचे हरेक काम अंग मोडून केलं पाहिजे, उत्सवातील लोकशिक्षणातील भाग सुशिक्षितांनी हाती घेतला पाहिजे. सामान्य लोकांच्या खरोखर गरजा काय आहेत.लोकांत धर्मवृत्ती कितपत जागृत आहे, लोकांच्या स्वाभाविक ओघाला जाणते वळण दिले असता राष्ट्रहित सहजगत्या साधणार आहे ह्या सर्व गोष्टी लिखाण मिसळून समजावून घेतल्या पाहिजेत. हे लोकमान्यांनी वारंवार सांगितले तेवढे न ऐकता ह्या उत्सवाकडे सुशिक्षित बघत राहिले. अजून त्या बघण्यात फारसा बदल पडलेला नाही. बुद्धिदात्या गजानना, हे तुलाही कळून चुकलं असेल...! असो म्हणा मंडळी गणपतीबाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.....!

-हरीश केंची

Sunday 13 August 2017

वंदे मातरम...! वंदे मातरम!!

*वंदे मातरम..! वंदे मातरम...!!*

"'जन-गण-मन'चा जन्म १९११ च्या डिसेंबरात झाला. त्यानंतर ३१ डिसेंबर १९११ रोजी कलकत्ता येथील काँग्रेस अधिवेशनाच्या अखेरीस खुद्द रवींद्रनाथ टागोरांनी हे गीत सादर केलं. त्यानंतर  'वंदे मातरम'च्या जोडीने 'जन-गण-मन'ही गायले जाऊ लागले. त्याचाही बोलबाला झाला. बंगाली भाषेतील हे गीत सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सरकारने नवभारताचे राष्ट्रगीत म्हणून स्विकारले होते. सर्व धर्म आणि प्रांतीय अस्मितेच्या उल्लेखांतून राष्ट्रीय एकात्मतेचा जयजयकार, हे या गीताचं मुख्य सूत्र होतं; म्हणूनच पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल, डॉ.राजेंद्रप्रसाद, मौलाना आझाद, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आणि घटना समितीतील विविध विचारांच्या नेत्यांनी प्रदीर्घ चर्चा करून, जाहीर वाद टाळून 'राष्ट्रीय ऐक्यमत्य' (नॅशनल कॉन्सेसस) निर्माण केले आणि 'जन-गण-मन'ला स्वतंत्र भारताच्या अधिकृत राष्ट्रगीताचा (नॅशनल अंथेम) मान देण्यात आला. त्याचवेळी या गीताच्या सामूहिक गायन वादनाचे नियमही करण्यात आले. तसेच  'वंदे मातरम'ची स्वातंत्र्य संग्रामातील थोर परंपरा लक्षात घेऊन त्याच्या केवळ पहिल्या कडव्याला 'राष्ट्रीय गीत' (नॅशनल सॉंग) म्हणून मान्यता देण्यात आली. तसेच हे गीत निश्चित स्वर तालात गंभीरपणे गाण्याचे आणि त्याचा योग्य आदर राखण्याचे आदेशही देण्यात आले"

--–-----------------------------------------
*इ*स देशमें रहना होगा तो 'वंदे मातरम' कहना होगा......! अशा घोषणा एका बाजूने सुरू असतानाच...
'गळ्यावर सूरी ठेवली तरी म्हणणार नाही.....!' अशी दरपोक्ती करणारे आपले प्रतिनिधी आपण पाहिले तेव्हा आम्हालाच आमची लाज वाटली...! स्वातंत्र्याच्या सत्तराव्या वर्षात आजही  'वंदे मातरम'ला विरोध केला जातोय. शाळेतून ते म्हणावं, त्यातून देशप्रेमाची शिकवण विद्यार्थ्याना मिळावी म्हणून आग्रह धरला जातोय. उत्तरप्रदेशात मदारसातून ते म्हटलं जावं असं फर्मान काढलं गेलंय. महाराष्ट्रातल्या विधिमंडळातील सदस्य एकमेकांच्या अंगावर धावून जाताना आपण पाहतो आहोत.  'वंदे मातरम'ची सक्ती केली तरी आम्ही ते म्हणणार नाही असे बेमुर्वतपणे आमदार म्हणतात तेव्हा त्यांच्या अल्पबुद्धीची कीव येते.  'वंदे मातरम' चा इतिहास आणि परंपरा याची माहिती त्यांना नसावी, गळ्याभोवती फास घेताना  'वंदे मातरम'चा जयघोष करणारी ती क्रान्तीकारी पिढी कुठे अन त्या राष्ट्रीय गीताचा उपमर्द करणारे आजचे हे उपटसुंभ नेते कुठे..! संपूर्ण  'वंदे मातरम' म्हणण्याचा आग्रह धरणारे आणि राष्ट्रगीत म्हणून केवळ पहिलं कडवं म्हणण्यासही विरोध करणारे हे दोघेही राष्ट्रधर्माचा अवमान करणारे आहेत.

'वंदे मातरम' या गीताच्या वादाचं भूत पुन्हा उठवलं जातंय.एमएमआयएम या मुस्लिमांच्या हिताचा ठेका घेतलेल्या पक्षानं शाळांमधून वंदे मातरम म्हणण्याची सक्ती करणे घटनाबाह्य आहे. घटनेच्या कलम २५ नुसार आम्हाला पूर्ण धार्मिक स्वातंत्र्य देण्यात आलं असल्यानं आमच्यावर 'वंदे मातरम' म्हणण्याची सक्ती करता कामा नये. 'वंदे मातरम' विरोध करणाऱ्यांच्या या दाव्यात तथ्य असले तरी तो तद्दन पाजीपणा आहे.  'वंदे मातरम' म्हणजे मातृभूमीला वंदन! 'जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियसी' या समर्पक शब्दात श्री रामचंद्रांनी माता आणि मातृभूमीच्या समभावाचं वर्णन केलंय. पालन-पोषण करणं, धारण करणं, सर्वकाही सहन करणं, क्षमाशील असणं, अशा अनेक गुणांतून माता आणि भूमी यांच्यातील साम्य स्पष्ट होतं. म्हणूनच भूमीला भू माता असं म्हणतात. अथर्ववेदातील भक्तीसूक्तात 'माता भूमी: पुत्रो अहं पृथीव्या:' असा भूमातेचा गौरव केल्यानंतर तिच्याविषयी कृतज्ञताही व्यक्त करण्यात आली आहे. हे सारं हिंदूंच्या धर्मग्रंथात आहे म्हणून झटकायची गरज नाही. राष्ट्रभक्ती दाखविणाऱ्या या नोंदी आहेत. मातेसमान असणाऱ्या मातृभूमीला वंदन केल्याने मुसलमानांच्या धार्मिक स्वातंत्र्याचा कसा काय खातमा होतो? जो देश तुम्हाला जगण्याचं बळ देतो, ज्या देशाच्या भूमीवर तुम्हाला अन्न, वस्त्र, निवारा मिळतो, त्याभूमीला भक्तिभावे वंदन करणं हे मुस्लिमांच्या ठेकेदारांना सक्तीचं का वाटतं? मातृभूमीला वंदन करणं, राष्ट्रध्वजाचा-राष्ट्रगीताचा मान राखणं, राष्ट्रवीर-वीरांगणांबद्धल आणि राष्ट्रीय स्थलांबद्धल आदर राखणं हा राष्ट्रधर्म आहे. त्याचं पालन भारतातल्या सर्वधर्मीयांनी आपल्या देव-धर्म-जातीबद्धलच्या भावभावनांना दुय्यम लेखून केलेच पाहिजे. कारण कुठल्याही देव-धर्मापेक्षा राष्ट्रधर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे! परंतु  'वंदे मातरम' म्हटल्याने 'अल्ला हो अकबर' म्हणजे परमेश्वर महान आहे या घोषणेचा अपमान होतो, अशी भूमिका  'वंदे मातरम'ला विरोध करणाऱ्यांकडून मांडली जाते.

ही भूमिका प्रथम मौलाना महंमदअली जीना यांनी मांडली. डिसेंबर १९२३ मध्ये आंध्रप्रदेशातील काकीनाडा येथे काँग्रेसचं वार्षिक अधिवेशन होतं. खुद्द जीनाच त्याचे अध्यक्ष होते. अधिवेशनाची सुरुवात प्रथेप्रमाणे  'वंदे मातरम'ने व्हायची होती. कारण  'वंदे मातरम' हे काँग्रेसच्या झेंड्याखाली स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे प्रेरणास्त्रोत होते. फासावर जाणाऱ्या स्वातंत्र्यवीरांचे ते अखेरचे शब्द होते. १८७६ मध्ये बंकिमचंद्र चटोपाध्याय यांच्या लेखणीतून  'वंदे मातरम' गीताचा जन्म झाला. पण त्याचा १८८२ मध्ये प्रकाशित झालेल्या 'आनंदमठ' कादंबरीत समावेश झाल्यानंतरच ते लोकप्रियतेच्या शिखरावर गेले. बंकिमचंद्रांनी 'वंगभूमी'साठी बंगालीत लिहिलेलं हे गीत स्वातंत्र्य लढ्याचं प्रेरणागीत होण्यासाठी त्यात अनेक बदल करण्यात आले.  'वंदे मातरम' गीतातील 'सप्त कोटी कंठ' चा 'कोटी कोटी कंठ निनाद कराले' हा झालेला बदल ही याची साक्ष आहे. विशेष म्हणजे, ज्यांच्या 'जन-गण-मन' या गीताच्या पुढे राष्ट्रगीत म्हणून स्वीकार करण्यात आला त्या रवींद्रनाथ टागोर यांनी १८९६ मध्ये कलकत्ता येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात  'वंदे मातरम'चे रवींद्रसंगीतासह गायन केले.  'वंदे मातरम'ला सर्वमुखी केलं. परंतु खिलाफत चळवळीने  'वंदे मातरम'ला वादात टाकले.

 महंमद अली आणि शौकत अली हे अलीबंधु चळवळीचे नेते होते. १९२० च्या दरम्यान सुरू झालेली ही चळवळ कालबाह्य धर्मवेडाने पछाडलेली होती. खिलाफत म्हणजे खलिफाची राजवट, खलिफा म्हणजे मुसलमानांचा धर्मगुरु. त्यांची सत्ता जीनांना आणायची होती. या खिलाफत चळवळीला असहकार आणि कायदेभंगाची चळवळ चालविणाऱ्या महात्मा गांधींचा पूर्ण पाठींबा होता. वर्षभरात स्वराज्य मिळविण्यासाठी सुरू होणाऱ्या आंदोलनात गांधीजींच्या दृष्टीनं खिलाफत चळवळीला अव्वल दर्जाचं महत्व होतं. त्यांच्या दृष्टीने स्वराज्य आणि खिलाफत या दोन्ही चळवळी एकच होत्या. त्यामुळेच हिंदू-मुस्लिम एकजूट होणार होती . गांधीजींच्या आतल्या आवाजातून निर्माण झालेला हा अजब दोस्ताना गांधीजींप्रमाणेच हिंदुस्तानलाही नडला. खिलाफत चळवळीतून हिंदू-मुस्लिम जातीयवाद निर्माण झाला आणि त्याची परिणती शेवटी पाकिस्तान निर्मितीत झाली.

खिलाफत चळवळीमुळेच गांधीजींचे 'रामराज्य' मानवेनासे झाले. आतल्या आत धुसफूसणाऱ्या तणावाचे जाहीर प्रदर्शन होऊ लागले. त्यात काही उत्साही मंडळींचा संपूर्ण  'वंदे मातरम' म्हणण्याचा आग्रह असायचा. त्याला मुसलमान आक्षेप घेऊ लागले. कारण त्यातले दुर्गा, कमला, लक्ष्मी, विद्या, सरस्वती या हिंदू देवतांचे आणि धर्मकल्पनांचे उल्लेख त्यांना खटकू लागले. या सार्याचा स्फोट जीना यांनी काकींनाडा अधिवेशनात पंडित दिगंबर विष्णू पलुस्कर यांनी  'वंदे मातरम' गायनाने प्रारंभ करताच त्यांना रोखून केला. त्यावर पंडितजींनी त्यांना कारण विचारताच 'संगीताला आणि मूर्तिपूजेला इस्लामचा विरोध आहे' असं ते रागात म्हणाले. त्याला पंडित पलुस्कारांनी चोख उत्तर देत ' हे इस्लामचे व्यासपीठ नाही, हे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन आहे' असे म्हटले नि रितीप्रमाणे  'वंदे मातरम' पूर्ण केले.

जीनांनी घेतलेला आक्षेप चुकीचा नव्हता. शिवाय 'आनंदमठ'मध्ये  'वंदे मातरम' ज्या संदर्भात आले होते, त्यामुळे ते गीत केवळ हिंदुगीतच ठरत नव्हते तर ते इस्लाम-मुस्लिमविरोधी गीतही ठरत होतं. परंतु हा साधार आक्षेप घेण्यासाठी जीनांसारख्या बुद्धिवाद्याला पंचवीस वर्षे खर्चाव लागली. कारण फाळणीची बीज त्यांच्या डोक्यात रुजायला तेवढी वर्षे जावी लागली.

'वंदे मातरम' गीतासंदर्भातली माहिती देणारी कॉम्रेड प्रभाकर वैद्य, हिंदुत्ववादी अमरेंद्र गाडगीळ, आणि विक्रम सावरकर यांची पुस्तकं उपलब्ध आहेत. त्यातला लेखकांचा वैचारिक अभिनिवेश वजा करून ती पुस्तकं आवर्जून वाचावीत.  'वंदे मातरम'बाबतचे आता सगळेच संदर्भ बदलले आहेत. भारतात राहायचे तर राष्ट्रधर्माचे पालन सर्वांनी केलेच पाहिजे. मुंबई महापालिकेच्या इमारतींमध्ये विविध भाषिकांच्या शाळा भरतात. त्यात उर्दू शाळाही असते. इतर शाळांतील मुलं सामुदायिकरित्या  'वंदे मातरम' म्हणत असताना उर्दू शाळेतली मुलं वर्गात उंडारत असतात. स्वतंत्र उर्दू शाळेत  'वंदे मातरम' म्हणत नसल्याने त्याचा अपमान तरी टळतो. परंतु घटमात्मक धार्मिक स्वातंत्र्याच्या नावाखाली माजलेली ही वृत्ती राष्ट्रधर्म पाळणाऱ्या मुस्लिमेतर भारतीयांनी का सहन करायची? पंडित पलुस्करांच्या केलेल्या कृतीतून हिंमत घेऊन 'शाळा म्हणजे मशिदी नाहीत. इतर शाळांप्रमाणे उर्दू शाळातही  'वंदे मातरम' म्हटलेच पाहिजे.' असं ठणकावून बोलायला राजकारण्यांना मुहूर्ताची गरज लागू नये. कारण ज्यावर मुस्लिमांचा आक्षेप आहे, ती सारी कडवी घटनेनुसारच बाद करण्यात आली आहेत.  'वंदे मातरम'चं पहिलं कडवं मातृभूमीबद्धलचा कृतज्ञताभाव व्यक्त करण्यास पुरेसे आहे. तेवढं बोललेच पाहिजे हा आग्रह शासनानं धरलाच पाहिजे. त्यासाठी जनतेनेही केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा करायला हवा.

'वंदे मातरम' हे स्वातंत्र्यलढ्याला बळ देणारं गीत आहे. परंतु स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही गेली ७०वर्षे  'वंदे मातरम'चा मुसलमानांप्रमाणे हिंदुधर्मवाद्यांनीही हत्यारासारखा वापर केला आहे. संपूर्ण  'वंदे मातरम'मधील केवळ हिंदुधर्म संकल्पनाच्या उल्लेखामुळे ते स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत होऊ शकले नाही.राष्ट्रगीताचा मान रवींद्रनाथ टागोरांच्या 'जन-गण-मन'ला मिळाला. हा निर्णय घटना समितीनं सर्व विचारांच्या पक्षीय आणि सर्वमान्य नेत्यांशी चर्चा करून घेतला.

'जन-गण-मन'चा जन्म १९११ च्या डिसेंबरात झाला. त्यानंतर ३१ डिसेंबर १९११ रोजी कलकत्ता येथील काँग्रेस अधिवेशनाच्या अखेरीस खुद्द रवींद्रनाथ टागोरांनी हे गीत सादर केलं. त्यानंतर  'वंदे मातरम'च्या जोडीने 'जन-गण-मन'ही गायले जाऊ लागले. त्याचाही बोलबाला झाला. बंगाली भाषेतील हे गीत सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सरकारने नवभारताचे राष्ट्रगीत म्हणून स्विकारले होते. सर्व धर्म आणि प्रांतीय अस्मितेच्या उल्लेखांतून राष्ट्रीय एकात्मतेचा जयजयकार, हे या गीताचं मुख्य सूत्र होतं; म्हणूनच पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल, डॉ.राजेंद्रप्रसाद, मौलाना आझाद, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आणि घटना समितीतील विविध विचारांच्या नेत्यांनी प्रदीर्घ चर्चा करून, जाहीर वाद टाळून 'राष्ट्रीय ऐक्यमत्य' (नॅशनल कॉन्सेसस) निर्माण केले आणि 'जन-गण-मन'ला स्वतंत्र भारताच्या अधिकृत राष्ट्रगीताचा (नॅशनल अंथेम) मान देण्यात आला. त्याचवेळी या गीताच्या सामूहिक गायन वादनाचे नियमही करण्यात आले. तसेच  'वंदे मातरम'ची स्वातंत्र्य संग्रामातील थोर परंपरा लक्षात घेऊन त्याच्या केवळ पहिल्या कडव्याला 'राष्ट्रीय गीत' (नॅशनल सॉंग) म्हणून मान्यता देण्यात आली. तसेच हे गीत निश्चित स्वर तालात गंभीरपणे गाण्याचे आणि त्याचा योग्य आदर राखण्याचे आदेशही देण्यात आला

तथापी, राष्ट्रीय एकोपा राखण्यासाठी राष्ट्रगीतासाठी आखलेल्या या सीमारेषा
आसिंधु सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका।
पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरीती स्मृत: ।।
असा अखंड हिंदुस्तान निर्माणाच्या शपथा घेत हिंदुजागरण करणाऱ्यांना मान्य नाहीत. यासाठी संधी मिळेल तिथे रडक्या, चिरक्या सुरात संपूर्ण  'वंदे मातरम' एखाद्या गवयामार्फत समुदायाला ऐकविल जातं.  'वंदे मातरम' चा राष्ट्रीय मान राखायचा असेल तर ते सामुदायिकरित्याच म्हणायला हवं.  'वंदे मातरम' चा घोर अपमान करणारा हा प्रकार दिवसेंदिवस वाढतोय, त्याला वेळीच आळा घातला पाहिजे.

Saturday 5 August 2017

राष्ट्रधर्म जागवायला हवा

*राष्ट्रधर्म जागवायला हवा
"भाजपच्यादृष्टीने दलितांचे-मुस्लिमांचे महत्त्व राजकारणापुरते आहे; सामाजिकदृष्ट्या नव्हे. धोरणे ठरविली जातात ती केवळ सत्तेच्या राजकारणापोटीच. त्यामुळे त्यांचा समझौता शिवसेनेपासून मुस्लिम लीगपर्यंत आणि समाजवाद्यांपासून बहुजन समाज पक्षापर्यंत होऊ शकतो. महात्मा गांधींच्या काळामध्ये जाती पध्दतीचा कलंक नाहीसा व्हावा म्हणून चळवळ झाली होती. आज अशी चळवळ कांही दिसत नाही. जवाहरलाल नेहरूंनी प्रशासकीय पध्दतीने ही पध्दत नाहीशी करण्याचा प्रयत्न केला होता. आपल्या नांवात जातीचा निर्देश येणार नाही अशारितीने तो लिहिण्याचा त्यांचा सर्व अधिकार्‍यांना आदेश होता. त्यामुळे सचिवालयातील नावांच्या पाट्यांवर आडनांवाचा उल्लेख नसे. अर्जाच्या फॉर्मवरील जातिवाचक उल्लेख असलेला रकाना त्यांनी काढून टाकला होता. आता हे सारे रद्द झाले आहे. जातिनिष्ठा हिरीरीने जोपासली जाऊ लागली आहे.किंबहुना प्रत्येकाची ओळखच जातिनिशी होतेय ही परिस्थिती भयावह आहे...!" ऑगस्ट क्रान्तीदिनानिमित्त केलेला हा जागर......!
------------------------------------------

देशात सत्ताबदल झालाय. नवं स्वातंत्र्य मिळालंय असं काहींना वाटू लागलं होतं. पहिल्या स्वातंत्र्यानंतर ही परिवर्तनाची पहाट आपलं शतकानुशतकाचं दैन्य, दुःख, गरिबी संपवेल, असं देशातील बहुसंख्य जनतेला वाटणं हे लोकशाहीनं दिलेलं विचार स्वातंत्र्याचं सामर्थ्य आहे. हे सामर्थ्य जपलं, वाढविलं पाहिजे. कारण त्यातच राष्ट्राला एकसंध ठेवणारी, बलशाली करणारी शक्ती आहे. ही शक्ती वाढविण्यासाठी मानवता हाच राष्ट्रधर्म, हा विचार प्रत्येकात रुजायला हवा. कारण, मानवता आहे, तिथे प्रेम आहे, प्रेम आहे तिथे आनंद आहे, आनंद आहे तिथे ज्ञान आहे, ज्ञान आहे तिथे शांती आहे, शांती आहे तिथे विचार आहे, विचार आहे तिथे क्रांती आहे, क्रांती आहे तिथे समाज आहे, समाज आहे तिथे विश्‍वास आहे, विश्‍वास आहे तिथे उत्तरदायित्व आहे, उत्तरदायित्व आहे तिथेच राष्ट्र आहे.
जनतेच्या, जनतेसाठी आणि जनतेद्वारा शासनाच्या तत्त्वांची प्रतिष्ठापना करणारी आपली राज्यघटना टिकवून ठेवायची असेल, तर आपल्या मार्गात असलेल्या दुष्ट प्रवृत्ती कोणत्या, हे ओळखण्यात आणि त्या नाहीशा करण्यात आपण कुचराई करता कामा नये. याच प्रवृत्तींमुळे लोकांना जनतेद्वारा चालविल्या जाणार्‍या शासनापेक्षा जनतेसाठी चालविणारे शासन अधिक आवडू लागते हे उद्गार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत.सत्तर वर्षांपूर्वी, देशातील सर्व नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य आणि भ्रातृभाव प्रदान करणार्‍या राज्यघटनेचे त्यांनीच घटना समितीत सारथ्य केले होते.
स्वातंत्र्याच्या सत्तरीत, प्रजासत्ताकाच्या ६८व्या वर्षात देशाची आज ही कांही परिस्थिती झाली आहे, त्याने सार्‍यांनाच व्यथित व्हायला होते आहे. आज देशाची शोकसभा भरल्याचे दृष्य आपण पाहतो आहोत. गेल्या कांही दिवसात अनेक शहरात जे कांही घडले आहे, त्यावरून आपल्या मार्गातील दुष्ट प्रवृत्ती नाहीशा करण्याचे राहोच; केवळ ओळखून काढण्याबाबतही आपण किती सुस्त आहोत, हेच स्पष्ट झाले आहे. यापूर्वी कधी नव्हता एवढ्या प्रमाणात आज आपला समाज जातीयवृत्तीने ग्रस्त झाला आहे; अधिकच विभाजित झाला आहे. देशातील डॉ. आंबेडकरांचे पुतळे विद्रुप करणारे, पूर्वग्रहांनी अंध झालेले लोक आजही आपणांत निघतात. आपल्या राजकीय उद्दिष्टांसाठी किंवा व्यक्तिगत अभिमानापोटी उच्चवर्णियांपैकी अनेकजण द्वेषभावना प्रसृत करतात. त्यांनीच देशातला सुरळीत चाललेला जीवनचक्र बिघडवून टाकला आहे. दलितांबद्दलच्या त्यांच्या मनातील पूर्वग्रह एवढा खोल रुजला आहे आणि उदारमतवादाला असलेली त्यांची मान्यता एवढी वरवरची आहे की, दलितांना समानता नाकारण्यासाठी ते कोणत्याही थराला जातात. समाजावर कुणाचे अधिराज्य आहे, हे त्यांना दाखवून द्यायचे आहे. ज्या हिंदू समाजाने आंबेडकरांना आणि त्यांच्या बांधवांना साध्या माणुसकीचीही वागणूक दिली नाही, त्याचीच नव्हे तर सार्‍या देशाची किती मोलाची सेवा त्यांनी बजावली आहे, हे मानण्याऐवजी ही मंडळी सारी राजकीय व्यवस्थादेखील नष्ट करण्यास सिध्द होतील.

राज्यात दलित आणि बौध्दांवर अत्याचार वाढले आहेत. शासन दरबारी घ्यावी तशी दखल घेतली जात नाही. समाजकंटकांवर कारवाई करण्यास शासन कमी पडते आहे, दलित आणि इतर समाजामध्ये वाढत चाललेली दरी हे गंभीर आहे. शासनाची, समाजातल्या सर्व थरांची ही जबाबदारी आहे. परंतु राजकीय स्तरावरून या दोघांत तेढ सतत असावी, असे वाटत असते. कारण त्याचे पुढारीपणच या बाबीवर अवलंबलेले असते. साहजिकच ही दरी कमी होण्याऐवजी अशाच प्रकारे ती वाढत जाते. जोपर्यंत राज्यघटना आहे, तोपर्यंत आपला देश आंबेडकरांचा ऋणी राहील. त्यांना तर ‘राज्यघटनेचे शिल्पकार’ म्हणून ओळखले जाते. हिंदुत्वालाही त्यांनी दिलेले योगदान कमी लक्षणीय मानता येणार नाही. समाजाने दिलेल्या अवमानाच्या वागणुकीने त्यांच्याप्रमाणे अनेक दलितांना बौध्द धर्म स्वीकारावासा वाटला होता. पण हिंदूंमधील ज्येष्ठ नेत्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ते या धर्मातच राहिले. जर हिंदू धर्मातून दलित वेगळे झाले असते तर आज देशात हिंदूंची संख्या शेकडा ८२ आहे; ती तशी राहिली नसती. दीर्घकाळ आणि जणू न संपणारी पक्षपाताची व अस्पृश्यतेची वागणूक मिळूनही दलित आणि डॉ. आंबेडकरांचे अनुयायीदेखील हिंदूच राहिले. खरे तर त्यांना अजूनही जी द्वेषमूलक वर्तणूक दिली जात आहे, त्यामुळे त्यांनी याच समाजात टिकून राहण्याचे कारण नव्हते. हिंदुत्वाची विचारसरणी प्रसृत करणार्‍यांनी दलितांना सोसाव्या लागणार्‍या हालअपेष्टांबद्दल किंवा उच्चवर्णियांनी शरमेने मान खाली घालावी लागेल अशा जातीय संरचनेतील अनिष्ट कठोरतेने लिहायला हवे, असे मला वाटते. लालकृष्ण आडवाणी यांच्यापासून गोपिनाथ मुंडे, राजनाथ यांनी आपली रथयात्रा हिंदू समाजातील जातीपातीच्या दुष्ट प्रवृत्तींशी लढा देण्यासाठी काढावयास हवी होती. मंदिरापेक्षाही जनतेची सुख-दुःखे अधिक महत्त्वाची आहेत, हे त्यांनी ओळखावयास हवे. भारतीय जनता पक्ष हिंदूंसाठी लढणारा मानला जातो. पण त्याने केव्हाही अस्पृश्यतेविरुध्द मोहीम सुरू केल्याचे ऐकिवात नाही.

भाजपच्यादृष्टीने दलितांचे-मुस्लिमांचे महत्त्व राजकारणापुरते आहे; सामाजिकदृष्ट्या नव्हे. धोरणे ठरविली जातात ती केवळ सत्तेच्या राजकारणापोटीच. त्यामुळे त्यांचा समझौता शिवसेनेपासून मुस्लिम लीगपर्यंत आणि समाजवाद्यांपासून बहुजन समाज पक्षापर्यंत होऊ शकतो. महात्मा गांधींच्या काळामध्ये जाती पध्दतीचा कलंक नाहीसा व्हावा म्हणून चळवळ झाली होती. आज अशी चळवळ कांही दिसत नाही. जवाहरलाल नेहरूंनी प्रशासकीय पध्दतीने ही पध्दत नाहीशी करण्याचा प्रयत्न केला होता. आपल्या नांवात जातीचा निर्देश येणार नाही अशारितीने तो लिहिण्याचा त्यांचा सर्व अधिकार्‍यांना आदेश होता. त्यामुळे सचिवालयातील नावांच्या पाट्यांवर आडनांवाचा उल्लेख नसे. अर्जाच्या फॉर्मवरील जातिवाचक उल्लेख असलेला रकाना त्यांनी काढून टाकला होता. आता हे सारे रद्द झाले आहे. जातिनिष्ठा हिरीरीने जोपासली जाऊ लागली आहे. किंबहुना प्रत्येकाची ओळखच जातिनिशी होऊ लागलीय ही परिस्थिती अत्यंत भयावह आहे!

उत्तरप्रदेश आणि बिहारसारख्या राज्यात तर न्यायपालिकेतही जातीच्या आधारावर विभाजन झालेलं आहे. आता सर्वच राजकीय पक्ष जातीला अधिक महत्त्व देऊ लागले आहेत. कारण, दलित म्हणजे मानव नव्हे, तर ‘व्होट बँक’च आहेत, असे त्यांना वाटते. या प्रवृत्तीविरुध्द निषेध व्यक्त केला की, अस्पृश्यता प्रतिबंधक कायद्याकडे बोट दाखविले जाते. जणू सामाजिक दुष्प्रवृत्ती कायद्याने नष्ट होणार आहे! सामाजिक पातळीवर समानता प्रस्थापित करण्याचा आणि आर्थिक क्षेत्रात असमानता दूर करण्याचा आपण कटाक्ष ठेवला नाही, तर आपली लोकशाही पध्दत नष्ट होईल असा डॉ. आंबेडकरांनी इशारा दिला होता. सामाजिक पातळीबद्दल ते म्हणाले होते की, आपल्या समाजात असमानतेचे वेगवेगळे टप्पे आहेत. याचा अर्थ काहींच्या दृष्टीने पातळी उंचावते, तर काहींच्या दृष्टीने ते खाली जाते. स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे झाली, तरी ग्रामीण विभागात सामाजिक विषमतेचे वर्चस्व तसेच आहे. शहरी क्षेत्रात जातियतेची बंधने सैल झाली असतील, पण नष्ट झालेली नाहीत. एका सरकारी अहवालातच हे मान्य करण्यात आलं आहे की, अनुसूचित जातीत आणि विशेषतः त्यांच्यातील असुशिक्षितांना, समाजाने आपणास मान्यता द्यावी, अशी तीव्र आकांक्षा असते.

आर्थिक पातळीबद्दल आंबेडकरांनी दिलेला इशारा अचूक ठरला आहे. गेल्या पन्नास वर्षांत देशाचा जो आर्थिक विकास झाला तो एवढ्या विषम पध्दतीने की, प्रादेशिक, धार्मिक आणि लोका-लोकांदरम्यान असमानता वाढलीच आहे. आता उदारीकरणाबद्दल एवढे आकर्षण आहे. समानतेवर आधारलेला समाज प्रस्थापित करण्याच्या उद्दिष्टाबद्दलच्या चर्चेचा आवाजच बंद झाला आहे. समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातील अंतर कमी करण्याचा कार्यक्रम नेहरूंनी आखला होता; तसा सध्याच्या सरकारजवळ कोणताही कार्यक्रम नाही. इतकेच नव्हे, तर केवळ औपचारिकता म्हणूनदेखील कुणी त्याबद्दल बोलत नाही.
सत्ताधार्‍यांच्या लेखी केवळ संपत्तीला महत्त्व आले आहे; ती कशी मिळविली हे कुणी लक्षात घेत नाही. देशातील लक्षावधी लोकांची उपासमार होत असताना मंत्री आणि सरकारी नोकर मात्र मेजवान्या झोडीत असतात. हे पाहिले म्हणजे राज्यघटनेच्या उद्देशिकेत ज्या समाजवादी शासनाचा आवर्जून उल्लेख करण्यात आला आहे, त्याबद्दल कुणी गंभीरतेने विचार करतो आहे का? याबद्दल शंका निर्माण होते. एखादा गुन्हेगार तुरुंगात नसला व बरीच संपत्ती बाळगून असला तर सामाजिकदृष्ट्या कलंकित म्हणून त्याच्याकडे पाहिले जात नाही. आणि धनदांडग्या तस्करांच्या घरच्या विवाह सोहळ्यात मंत्री आणि ज्येष्ठ सरकारी नोकरांनी हजेरी लावलेली असते. ही सारी मंडळी जेव्हा आपल्या आलिशान मोटारीतून घरी जातात तेव्हा, प्रवेशद्वाराजवळच कचराकुंडीपाशी मेजवानीतील उरले-सुरलेले कांही मिळते कां म्हणून डोळे लावून बसलेल्या अनेक गरिबांच्या रांगा त्यांच्या दृष्टीला पडतच असणार.
पददलित वर्ग आता, दुसरे कोणी आपणावर राज्य करावे, या प्रघाताला विटला आहे, असे डॉ. आंबेडकर म्हणाले होते; ते योग्यच होते. आता या वर्गांना सत्ताधारी बनवायचे आहे. पददलित वर्गातील या आत्मसाक्षी वृत्तीचे रूपांतर वर्गसंघर्षात किंवा वर्गयुध्दात होता कामा नये. कारण, त्यामुळे देशाचे तुकडे पडतील आणि ती नक्कीच घोर आपत्ती ठरेल. अब्राहम लिंकननी म्हटल्याप्रमाणे, घरातच अनेक तट पडले तर ते फार काळ टिकू शकत नाही. या सार्‍या समस्यांवर चर्चा व्हायला हवी. आंबेडकरांबद्दल द्वेषभाव निर्माण करण्याने उच्चवर्णीय दलितांच्यात दुरावा निर्माण करीत आहेत.

 आपणाला बंधमुक्त करण्यासाठी आणि प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी बाबासाहेब प्राणपणाने लढले, अशी त्यांची दृढ श्रध्दा आहे. हा सूर्य उद्या संहारक झाल्यास, सगळंच कसं उद्ध्वस्त होईल!
विषमतेचा अंत होऊन परिवर्तनाची नवी पहाट होईल!
ही परिवर्तनाची पहाट आपलं शतकानुशतकाचं दैन्य, दुःख, गरिबी संपवेल, असं देशातील बहुसंख्य जनतेला वाटणं हे लोकशाहीनं दिलेलं विचार स्वातंत्र्याचं सामर्थ्य आहे. हे सामर्थ्य जपलं, वाढविलं पाहिजे. कारण त्यातच राष्ट्राला एकसंध ठेवणारी, बलशाली करणारी शक्ती आहे. ही शक्ती वाढविण्यासाठी मानवता हाच राष्ट्रधर्म, हा विचार प्रत्येकात रुजायला हवा. कारण, मानवता आहे, तिथे प्रेम आहे, प्रेम आहे तिथे आनंद आहे, आनंद आहे तिथे ज्ञान आहे, ज्ञान आहे तिथे शांती आहे, शांती आहे तिथे विचार आहे, विचार आहे तिथे क्रांती आहे, क्रांती आहे तिथे समाज आहे, समाज आहे तिथे विश्‍वास आहे, विश्‍वास आहे तिथे उत्तरदायित्व आहे, उत्तरदायित्व आहे तिथेच राष्ट्र आहे ही भावना वृद्धिंगत व्हावी.अशी अपेक्षा असताना देशात वेगळीच स्थिती निर्माण झालीय.

कर्मकांडाच्या, पुरोहितशाहीच्या, जन्माधिष्ठित उच्च नीचतेच्या, विषमतेच्या चक्रव्यूहात राष्ट्रीय पुनरुत्थानाच्या नावाने कुणी समाजाला गुंतवू बघत असेल तर त्याचा प्राणपणाने मुकाबला करण्याची तयारी पुरीगामी विचारांवर श्रद्धा ठेवणाऱ्यांना करावीच लागेल. उत्तर पेशवाईचा उल्लेख कुणी केला की काही मंडळींना कळमळायला होतं. रयतेच्या रक्षणाची, उदरनिर्वाहाची जबाबदारी न पाळण्याचा, फुकटखाऊ, भिक्षुक, उनाड बाया यांचे तांडे पोसण्याचा प्रकार करणारे राज्यकर्ते होऊन गेले याची आठवण काढण्याने जर कुणाला दुःख होत असेल तर अशी वेळ समाजावर पुन्हा येऊ नये याची खबरदारी या मंडळींनीच घ्यायला हवीय लोकसभेनंतर झालेल्या सर्व निवडणुकीत केवळ काँग्रेसचाच नव्हे तर सर्व समाजवादी विचारांच्या पक्षांचा दारुण पराभव झाला आहे. विचारसामर्थ्य शक्तिशाली असले तरी व्यक्तिदोषामुळे हा पराजय झाला आहे. आपसातले संघर्ष, ते मिटवण्याच्या नावाखाली चाललेली अटीतटी, दिलजमाईचे प्रदर्शन आणि कुजकी टोमणेबाजी यामधून काँग्रेसवाल्यांना बाजूला काढून पुरोगामी विचारापर्यंत आणण्याचे काम आज व्हायला हवे. सत्ता जिंकण्यासाठी देवाधर्माचा वापर करण्याचा, तो करता यावा म्हणून वेगवेगळ्या संघटना उभारण्याचा, त्यांच्याद्वारा श्रद्धावान भाबड्या जनसामान्यांना खोट्यानाट्या गोष्टी ऐकवून फितवण्याचा, विशिष्ट राजकीय पक्षासाठी त्यांना वापरण्याचा उद्योग या देशात पद्धतशीरपणे केला जातो आहे. जन्मजात उच्च-नीचतेविरुद्ध, विषमतेविरुद्ध, अंधश्रद्धा आणि अन्याय यांच्याविरुद्ध लढणाऱयांना आपसात लढायला लावण्याचा अथवा निष्क्रिय बनवून निरुपयोगी करून टाकण्याचा जोडधंदाही याच मंडळींनी प्रभावीपणे चालवला आहे. याला रोखण्याचे सामर्थ्य फक्त पुरोगामी विचारातच आहे.  याची जाणीव ठेवून जर वाटचाल झाली तर '९ ऑगस्ट क्रान्तीदिना'ची स्मृती जागविल्यासारखी होईल.
- हरीश केंची,

प्रभंजन साठीचा लेख

मोदींची आरती, चंद्रचूडांची गोची...!

"खुज्या माणसांची सावली संध्याकाळी मोठी होते. तशीच आता सुमार कुवतीच्या माणसांची सर्वत्र सरशी झालेली दिसतेय. राजकारणाप्रमाणेच...