Tuesday 13 May 2014

भलत्याच ठिकाणी धडका देत आहोत!

भलत्याच ठिकाणी धडका देत आहोत!

देशातल्या लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. सध्या प्रचाराचा धुराळा खाली बसला आहे. मतमोजणीनंतर कुणाला, कसे दान पडले आहे, हे कळायला अजून ङ्गारसा कालावधी लागणार नाही. ते जेव्हा कळेल, तेव्हा शिमगा सुरू होईल. मतदानात कुणापुढे मतदारांनी काय वाढून ठेवले आहे, याचा अंदाज करण्याची अपूर्वाई आहे. निवडणुकांमुळे सध्या निर्माण झालेले वातावरण निवळणार की, दिवसेंदिवस अधिक खदखदणार हे सांगणे कठीण आहे. पण सगळ्यांचीच अवस्था पहिलटकरीणीसारखी दिवस भरत आलेल्यांसारखी आहे. सुटका होण्यासाठी सगळे आतुर आहेत. नंतर काय? कधी नव्हता एवढा महाराष्ट्र आज खिळखिळा झालाय. हा महाराष्ट्र एकत्र बांधण्याची, भेदांना साधून अभेद्य बनविण्याची, मराठी ताकद एकवटण्याची ङ्गमहाराष्ट्र आधार हा भारताचाफ ही आश्‍वासकता पुन्हा एकदा जागविण्याची, ममराठा तितुका मेळवावाफ ही समर्थ ललकारी दर्‍या-खोर्‍यात, गांवोगांवी, मनोमनी घुमविण्याची आज आवश्यकता आहे. एकमेकाला समजावूून, सांभाळून, सावरून घेणे जर आम्हाला शक्य नसेल, तर महाराष्ट्र संपला असेच म्हणावे लागेल.
गेल्या कांही वर्षात या मराठी समाजात जे कांही घडलं आहे, त्याचा गंभीरपणे विचार करण्याची जरुरी आहे. हा विचार करण्यासाठी आता आवश्यक असे विवेकी वातावरण इथे सर्वप्रथम निर्माण व्हायला हवे आहे. एकमेकांवर मात करण्याची, झेंडे लावण्याची ईर्षा आता कांही काळ दूर ठेवण्याची जरुरी आहे. निवडणुकीच्या काळात लोकांना आकर्षून घेण्यासाठी एकाहून एक सरस घोषणांचे भुईनळे नेतेमंडळींनी लावले. नोकर्‍या, राहायला स्वस्तात घरे, प्रत्येक घरांत वीज-पाणी,  चकचकीत रस्ते, कमी भाड्यात दर्जेदार प्रवासी सेवा... ऐकून अजीर्ण व्हावं अशा गोष्टी सांगून मतदारांना आपल्याकडे वळविण्याची स्पर्धा सुरू होते आहे. त्याने कुणाचे काय साधले वा साधणार आहे? सत्तेवर कुणीही आले तरी जे देतो म्हणाले ते देणे त्यांना शक्य होणार नाही. निवडणुका आल्यानंतरच लोकांना काय हवे, काय नको याचा एवढा ऊहापोह का केला जातो? सरकार जे करू शकत नाही, ते लोकबळावर करून दाखविण्यासाठी जिथे आपली ताकद आहे, तिथे प्रयत्न करण्याचा प्रयत्न कुठलाही पक्ष का करत नाही? अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचारविरोधी आंदोलन उभारले, ते जनतेच्या हितासाठीच होते ना? माहितीचा अधिकार मिळावा म्हणून आंदोलन उभे झाल्यानंतर कितीजण त्यात सहभागी झाले होते?
श्री.म. माटे नांवाचा एक विलक्षण माणूस महाराष्ट्रात होऊन गेला. त्याने त्याच्या कुवतीनुसार अस्पृश्यता निवारणाचा प्रयत्न पुण्यात केला. ङ्गमहारमाटेफ असे नांव बनवून पुणेकरांनी या जिद्दी, तळमळीच्या विद्वानाची अवहेलना केली. हे माटे ङ्गमास्तरफ म्हणूनही प्रसिद्ध होते. सदैव तरुणांना, मुलांना प्रेरणा, चेतना देणारा हा एक ङ्गज्वलंतफ माणूस होता. ज्वलंत शब्दाला अलिकडे ङ्गारच पेटता अर्थ प्राप्त झालाय. बेङ्गाट-अङ्गाट बोलून भडका उडवण्याचा ज्वलंतपणा माटे मास्तरांमध्ये नव्हता. त्यांनी निखारे पेटविले नाहीत; मुलांच्या मनात विचारांची ज्योत लावली. माटे मास्तरांनी अनेक तरुणांचे जीवन घडविले. मी माटे मास्तरांचा विद्यार्थी आहे, असे अभिमानाने सांगणारी थोर विचारी मंडळी आपल्या लेखनातून त्यांचा आदराने उल्लेख करीत. समाजाला विज्ञानाभिमुख बनविण्याची माटे मास्तरांना तळमळ. त्यापोटी त्यांनी ङ्गविज्ञानबोधफ नांवाचे एक वार्षिकही काढले होते. ङ्गशास्त्रफ या पदवीला पोहोचलेल्या ज्ञानाची खैरात शिकाऊ लोकांत सारखी करीत राहणे हा उद्देश मास्तरांपुढे होता. याचीच कल्पना स्पष्ट करण्यासाठी विज्ञानबोधाची प्रस्तावनाफ नांवाचा एक निबंध साधारणपणे १९३४-३५ साली त्यांनी लिहिला. ङ्गतरुण विद्यार्थ्यांची मने चौकस, चिकित्सक आणि ज्ञानलालस बनविण्याच्या कामी या प्रस्तावनेचा बराच उपयोग होईल, असा माझा अंदाज आहेफ असे म्हणून मास्तरांनी प्राध्यापक मंडळींनी या विषयाला आधुनिकता प्राप्त करून द्यावीफ अशी इच्छा प्रकट केली आहे.
माटे मास्तरांना मी कधी बघितलेले नाही. पण पु.ग. सहस्त्रबुद्धे यांच्यासारखे अनेक विचारवंत नेहमी माटे मास्तरांचा आपल्या लेखनातून उल्लेख करीत. मला प्रश्‍न पडतो की, स्वातंत्र्य आले, प्रजासत्ताक राष्ट्र निर्माण झाले, भाषावार प्रांतरचना झाली, तशी राज्ये अस्तित्वात आली. पण खरोखरच स्वतंत्र राष्ट्रातल्या माणसांच्या सर्व क्षेत्रातल्या कर्तृत्वाला जी उभारी येते, ती उभारी या राष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला अजून यावी तशी ती आली नाही! आम्ही खूप प्रगती केलीय. आमचे अनेक बांधव आज परराष्ट्रात मोठ्या जबाबदार्‍या पार पाडण्याएवढे समर्थ आहेत. ही गोष्ट खरी आहे. पण, आमचा माणूूस पोट भरण्यासाठी कांही कमविण्याच्या अवस्थेतही नाही, याचा लाजीरवाणा कबुलीजबाब आमच्या नेतेमंडळींना आज पासष्ठ वर्षांनंतरही द्यावा लागतो आहे.
बिहार-ओरिसा-मणिपूर-तामीळनाडू यांचे सोडा; बुद्धिवादी, पुरोगामी महाराष्ट्रालाही, प्रगत औद्योगिक राज्य म्हणवणार्‍या महाराष्ट्रालाही अजून आपल्या माणसांच्या पोटापाण्याची, कामधंद्याची, शिक्षण, आरोग्य, निवासाची व्यवस्था करणे का शक्य होत नाही?फ ङ्गतुम्ही मला सत्ता द्या, मी तुम्हाला सुख देईनफ अशी वचने निवडणुकीत कां दिली जातात? मंत्र म्हणून गोष्टी घडविण्याची सिद्धी प्राप्त झाली असेल, त्यालाच हे करता येईल. असा अवतारी सत्तासाईबाबा कुणी आहे वा होईल असे मानणारे मानोत. मी भाबडी श्रद्धा ठेवणारा नाही. विकासासाठी ज्या तर्‍हेची मनोशक्ती जागृत व्हायला हवी, तशी ती जागृत करण्याचा प्रयत्न कुणीही केलेला नाही. भाबड्या श्रद्धा जागविण्याचे आणि नको त्या तर्‍हेने भावना भडकविण्याचेच प्रयत्न झाले आहेत. महाराष्ट्राला असमर्थ ठेवण्याचाच जणू मराठी राजकारण्यांनी वसा घेतलेला दिसतो आहे.
विज्ञानबोधाच्या प्रस्तावनेत माट्यांनी म्हटलं आहे, पूर्वीपेक्षा आता मुलांना शास्त्रीय प्रमेये जास्त माहिती झालेले असतात. यात कांहीच शंका नाही. (माट्यांचे हे म्हणणे १९३५ च्या सुमाराचे आहे. आता त्याला ८० वर्षे झालीत. पण तरीही माट्यांचे हे म्हणणे सार्‍या मराठी माणसांनी मनन करण्यासारखे आहे.) पण प्रत्यक्ष शास्त्रांचे अध्ययन हे जसे महत्त्वाचे; तसेच शास्त्राविषयीची माहिती करून ठेवणे हे ङ्गार महत्त्वाचे आहे. प्रत्यक्ष एखादे शास्त्र आले तर ठीकच आहे. पण, निदान शास्त्रे म्हणजे काय? त्यांचे इतिहास, त्यांची व धर्माची चाललेली झुंज, त्यांनी मनुष्याच्या जीवितावर केलेले संस्कार, प्रत्येक शास्त्राची प्रमुख प्रमेये, त्या सर्वांच्या परस्पर निष्कर्षावरून निघणारी अनुमाने आदि प्रकार आपल्या अभ्यासावयाच्या प्रमुख पुस्तकांतच आले पाहिजेत. हे जर झाले तर शास्त्रप्रवणता ही दिवसानुदिवस वाढत जाईल. माणसांच्या मनाचा कल भावनाप्रधान वाङ्मयाकडे ङ्गार असतो. या मूळच्या कलाला तसलेच खाद्यपदार्थ सारखे मिळत राहिले तर तोच अधिक जोपासतो. भावनासुद्धा चालेल, पण मूळ उभारी शास्त्रीय सिद्धांतांच्या आधारावरच असावयास हवी.
शास्त्रे म्हणजे कांही केवळ पदार्थ विज्ञान व रसायन नव्हेत, समाजशास्त्र आहे. सुप्रजाजनशास्त्र आहे. लोकसंख्याशास्त्र आहे. नीतिशास्त्र आहे. यातील सिद्धांतांच्या अवलोकनाने माणसांच्या भावनेलासुद्धा खरे वळण मिळेल. कुठे राग यावा व कुठे स्ङ्गुंदावे हे सुद्धा कळावयास हवे. वरीलसारख्या शास्त्राच्या ज्ञानाने एखाद्याचे मन संस्कारयुक्त झालेले असेल, तर सभोवतालची परिस्थिती पाहून त्याला राग किंवा हुंदका येऊ नये. तो जर का त्याला आला आणि जर का तो कर्तबगार असेल तर एकंदरीने पाहता त्याच्या  कर्तबगारीने माणसाचे नुकसानच होईल. अन्यायाची चीड येणे हे ङ्गार चांगले आहे; पण ज्याला आपण अन्याय समजतो, तो खरोखरीचा अन्याय आहे, हे ठरवावयास बुद्धीला माहितीरूप ज्ञानाचे पुष्कळच संस्कार झालेले असावयास हवेत. कळवळा येणे हेही ङ्गार चांगले आहे. पण औदार्याचे वा दातृत्वाचे स्ङ्गुरण यावयास परिस्थिती विशेष कोणता हे ज्ञानाने म्हणजेच शास्त्रीय अभ्यासाने ठरवावयास हवे आणि म्हणून आपली बुद्धी या अभ्यासाने संस्कारयुक्त झालेली असावयास हवी.
अर्थशास्त्र व लोकसंख्याशास्त्र यांच्या अभ्यासाने कित्येक मतभ्रम नाहीसे होतात. व आपण कुठेतरीच वाईट वाटून घेत असतो, हे मनावर ठसते. ङ्गार काय सांगावे, आपल्या सामाजिक व राजकीय चळवळीच्या दिशा, गती आणि भवितव्य ही या शास्त्रज्ञांना संस्कारांनी जरपूत झालेली नसतील तर आपली ङ्गसगत होईल आणि आपण भलत्याच ठिकाणी धडका देत बसलो होतो हे दिसून येईल.फ आज आमचे मान्यवर नेते आणि त्यांचे अनुयायी अशा भलत्याच ठिकाणी धडका देत बसले आहेत. महाराष्ट्राची ङ्गार मोठी शक्ती नको त्या गोष्टीत निष्कारण वाया जाते आहे. कॉंग्रेसने देशाचे आणि तुमचे-आमचे सगळ्यांचेच वाटोळे केले आहे, हे गळे काढणारेदेखील महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय चळवळीला योग्य दिशा, योग्य गती देण्याऐवजी कधी एकमेकांना आणि कधी एकत्र मिळून नको त्या गोष्टीलाच धडका देत आहेत.......... हरीश केंची

No comments:

Post a Comment

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...