पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या राजकीय गुजरात लाॅबीला आणि मोदी समर्थक नेत्यांना संजय जोशी यांना भाजपचं राष्र्टीय अध्यक्षपद देण्यास का विरोध आहे यावर आपण प्रकाश टाकु या! एक सीडी - ध्वनीचित्रफित भाजपच्या नेत्याचं राजकारण संपविण्यास कारणीभूत ठरली. त्या नेत्याचे नाव आहे संजय जोशी...!
१९८८ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संजय जोशी यांना गुजरातमध्ये पाठवले. हा तोच काळ आहे ज्या काळात नरेंद्र मोदी डिजिटल कॅमेराने फोटो काढुन इंटरनेटच्या माध्यमातुन अडवाणींना पाठवत असतं असा तो काळ असो. संघटना मजबूत करण्यासाठी त्यांना संघटन मंत्रीपद बहाल करण्यात आले. मोदी दोन वर्ष गुजरातच्या संघटना महासचिव पदावर कार्यरत होते. दोघांनी मिळून पक्ष मजबूत करण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. त्याचाच परिणाम म्हणजे १९९५ साली गुजरातमध्ये भाजपने पहिल्यांदा सरकार स्थापन केले. मात्र मुख्यमंत्रिपदावर दावा सांगताना आणखी दोन नेत्यांची नावे पुढे आली. एक होते केशुभाई पटेल. आणि दुसरे राज्यातील भाजपचे तत्कालीन ज्येष्ठ नेते शंकरसिंह वाघेला. मोदी आणि जोशी या दोघांनी केशुभाईंना पाठिंबा दिल्यावर वाघेला संतापले. यानंतर वाघेला यांनी बंडखोरी केली आणि तडजोड म्हणून केशुभाईंच्या जागी सुरेश मेहता यांना मुख्यमंत्री करण्यात आले, तर नरेंद्र मोदींना दिल्लीला पाठवण्यात आले. मोदींच्या जाण्याचा सर्वाधिक फायदा जोशींना झाला. आता जोशी यांची संघटना सरचिटणीसपदी निवड झाली.
१९९८ मध्ये पुन्हा एकदा भाजपची सत्ता आली. मोदींना गुजरातमध्ये यायचे होते पण जोशी मोदींना पुन्हा गुजरातमधील संघटनेत पद देण्यास तयार नव्हते. पुन्हा केशुभाई. मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. पण २००१ मध्ये समीकरण बदलले आणि पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. परिणामी केशुभाईंना हटवून नरेंद्र मोदींना गुजरातचे मुख्यमंत्री करण्यात आले. यानंतर मोदींनी बदलेच्या भावनेतुन जोशींना दिल्लीला पाठवले आणि ते राष्ट्रीय संघटनेचे सरचिटणीस..झाले. तेंव्हा पासुन या दोघांमध्ये हाडवैर वाढतचं गेले आणि मोदी मुख्यमंत्री असताना गुजरात दंगल झाली त्याची गंभीर दखल तत्कालीन पंतप्रधान अटबिहारी वाजपेयी आणि संघाने घेतली. २००५ साली मुंबईतील भाजपाच्या राष्ट्रीय अधिवेशनात गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी संजय जोशी यांची निवड करणार असल्याची कुणकुण मोदींना लागली होती, अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर संजय जोशी यांची तथाकीत सीडी प्रसार माध्यमांकडे पोहचविण्यात आली. सीडी आली तेव्हा अविवाहित संजय जोशी प्रसिद्धीच्या झोतात आले. या सीडीमध्ये ते एका महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत असल्याचं दिसत होतं. आजीवन ब्रह्मचर्य व्रत घेतलेले संजय जोशी हे या सीडीमध्ये एका महिलेसोबत दिसत होते. ही दीड तास लांबीची सीडी गुजरातमधील एका हॉटेलमध्ये स्पाय कॅमेऱ्याने रेकॉर्ड करण्यात आली होती. गुजरातमधून कुरिअर कंपनीमार्फत संपूर्ण देशातील प्रसारमाध्यमांना, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना पाठवण्यात आली. यानंतर पक्षाने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला या सीडीमागे नरेंद्र मोदींचा हात असल्याचे जोशी समर्थकांचे मत आहे. सीडी घोटाळ्यानंतर त्यांच्या पक्षात पुन्हा पुनरागमन झालं नाही, पक्षाने त्यांना कायमचं अडगळीत टाकलं आज संजय जोशी दिल्लीमध्ये राहतात. विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रविण तोगडीया यांनी संजय जोशी यांची सीडी मोदींच्या आदेशाने गुजरातमध्येचं बनवल्याचा खुलासा केला होता.
मोदींना पक्षातील किंवा विरोधी पक्षातील जे नेते जेंव्हा जेंव्हा अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात तेंव्हा त्याची सीडी मोदी बाहेर काढतात, असले प्रकार ते गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासुन असे उद्योग करून आपल्याचं पक्षातील नेत्यांना राजकारणातुन संपविण्याचं आणि आयुष्यातुन उठविण्याचं काम करतात. साधारण २००८ साली संजय जोशी यांची सीडी बनावट असल्याचं उघडकीस आलं पण तोपर्यंत पुलाखालुन बरंच पाणी वाहुन गेलं होतं. तसेच नरेंद्र मोदींनी पक्षात आणि राजकारणात जम बसवला होता. त्यामुळे संजय जोशीना मोदींच्या विरोधात काहीही करता आलं नाही. या अपमानाचा बदला घेण्यासाठी संजय जोशी धडपडत होते, पण त्यांना योग्य ती संधी मिळत नव्हती. परंतु मोदी विरोधक संघाने भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ संजय जोशींच्या गळ्यात घालण्याचं ठरवुन संजय जोशींना ही संधी उपलब्ध करून देण्याचं ठरवलं आहे म्हणुन अध्यक्षपदाचं घोंगड दोन महिने भिजत पडलं आहे. संजय जोशी अध्यक्षपदावर विराजमान झाले की नरेंद्र मोदींची उलटी गिणती सुरु होईल यात काही शंका नाही ...
No comments:
Post a Comment