सहा दशके महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढणारे,कोट्यावधी शिवसैनिकांचे हिंदुहृदयसम्राट,मराठी माणसाच्या मनामनांत जाज्वल्य अस्मितेचा अंगार फुलविणारे संघर्षशील सरसेनापती,जगविख्यात व्यंगचित्रकार शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन.
"शिवसेना" हे नाव कुणी दिल? का दिल? उघडा डोळे आणि बघा नीट. आणि ठरवा शिवसेना कुणाची?
२६ जून १९६६च्या ‘मार्मिक’मध्ये शिवसेनेचे बोधचिन्ह म्हणून डरकाळ्या फोडणारा ‘वाघ’ छापण्यात आला. सोबत शिवराय होतेच. पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे चित्र आणि ‘मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा’ हे वचन लिहिले होते आणि मोठ्या अक्षरात मराठी माणसाच्या या संघटनेचे नाव छापले होते - ‘शिवसेना’!
‘मार्मिक’ - मधून मुंबईतील आस्थापनांतील नोकरवर्गाच्या याद्या छापून येत होत्या, त्या सगळ्या परप्रांतीयांच्या होत्या. मराठी माणसास त्यात स्थान नव्हते. लायकी असून त्यांना नोकऱ्या मिळत नव्हत्या. मुंबईतील सरकारी-निमसरकारी व खासगी कंपन्यांमध्ये दाक्षिणात्यांचा भरणा जास्त होता. मराठी माणूस शोधून सापडत नव्हता. ‘मार्मिक’मधील आपल्या लिखाणाने बाळासाहेबांनी मराठी माणसाचे स्फुल्लिंग चेतवले. अनेक मराठी माणसे ‘मार्मिक’च्या कार्यालयात येऊन आपल्या व्यथा आणि वेदना मांडायचे. ही मराठी माणसांची गर्दी पाहून दादा म्हणाले, हे एवढे लोक येतात, याला काही ऑर्गनाइज्ड स्वरूप द्यायचं की नाही? या सगळ्या गोष्टीला, चळवळीला संघटनेचा आकार द्या. तरच त्यातून काहीतरी ठोस घडेल. नाहीतर ही जागृती फुकट जाईल. मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी प्राणपणाने झुंजणारी संघटना काढणं, हा एकच मार्ग त्यावर आहे. संघटना काढायची! दादा म्हणाले, ‘कधी?’
बाळासाहेब म्हणाले, ‘आता.’ नारळ आणून छत्रपतींच्या पुतळ्यासमोर सहदेव नाईकने तो फोडला. बाळासाहेब म्हणाले, ‘नाव काय ठेवायचे?’
दादा म्हणाले, ‘त्यात विचार कसला करता? शिवसेना.’
तो दिवस होता १९ जून १९६६!
मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारी ‘शिवसेना’ स्थापन झाली. १९ जून १९६६ रोजी सकाळी ९.१५ वाजता शिवछत्रपतींच्या जयजयकारात शिवसेनेची नोंदणी सुरू झाली.
सहदेव नाईक यांनी जयजयकार करून नारळ फोडला व प्रबोधनकारांच्या हस्ते शिवसेनेचे तक्ते देण्यास सुरुवात झाली. एका तासात दोन हजार तक्ते संपले. दोन दिवसांत दहा हजारांच्यावर नोंदणी झाली.
२६ जून १९६६च्या ‘मार्मिक’मध्ये शिवसेनेचे बोधचिन्ह म्हणून डरकाळ्या फोडणारा ‘वाघ’ छापण्यात आला. सोबत शिवराय होतेच. पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे चित्र आणि ‘मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा’ हे वचन लिहिले होते आणि मोठ्या अक्षरात मराठी माणसाच्या या संघटनेचे नाव छापले होते- ‘शिवसेना!’ छत्रपती शिवाजी महाराज हे शिवसेनेचं आराध्य दैवत! महाराज भवानी मातेचे प्रखर भक्त होते. ‘वाघ’ हे भवानीचं वाहन म्हणून शिवसेनेचं बोधचिन्ह ‘वाघ’ असावं, असं बाळासाहेब ठाकरे यांच्या मनात आलं. वाघ म्हणजे रुबाब, मस्ती अन् आक्रमकपणा! शिवसेनेचे सार व्यक्त होणाऱ्या बोधचिन्हाला खुद्द बाळासाहेबांनी साकारले होते...
पहिला दसरा मेळावा
शिवसेनेचा पहिला मेळावा ३० ऑक्टोबर १९६६रोजी शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आला. ‘मार्मिक’ वगळता इतर कोणत्याही वर्तमानपत्रात शिवसेनेच्या शुभारंभाच्या मेळाव्याची घोषणा अथवा जाहिरात नव्हती. तरीही मुंबई आणि महाराष्ट्रातल्या अन्य भागांतून मेळाव्याला भरघोस प्रतिसाद मिळाला. शिवाजी पार्क खच्चून भरले होते. िवशेष म्हणजे, दादर रेल्वेे स्थानकावरून िशवाजी पार्ककडे जाणारे रस्ते फुलून गेले होते. शाहीर साबळे यांच्या गाण्याने मेळाव्याची सुरुवात झाली. मेळाव्याला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना प्रबोधनकार म्हणाले, ठाकरे कुटंुबाचा असलेला हा बाळ मी तुम्हाला, या महाराष्ट्राला आज अर्पण करत आहे!
आईसाठी बांधला मातोश्री!
दादर परिसरात छोट्याशा जागेत ठाकरे कुटंुब राहात होते. परंतु सर्वांना एकत्र राहता येईल, अशा जागेच्या शोधात ठाकरे कुटंुबीय होते. वांद्रे पूर्व येथे कलानगर परिसरात पाच एक दशकांपूर्वी काही प्लाॅट सरकारकडून िवकसित करण्यात येत होते. त्यापैकी एका प्लाॅटवर बाळासाहेबांनी बंगला बांधला. खरे तर आईसाठी स्वत:चं घर बांधेन, ही बाळासाहेबांची इच्छा होती. मात्र ज्या आईसाठी, रमाबाई यांच्यासाठी, ते घर बांधणार होते, ती आई हयात नसल्याने त्यांनी बंगल्याचे नामकरण केले, ‘मातोश्री’! खास म्हणजे, हे नावही त्यांना सुचवले, ते प्रबोधनकारांनीच...!
जमलेल्या माझ्या तमाम......सदाशिव पेठेतल्या नागनाथ पाराजवळ पुणे महानगरपालिकेची पाटी वाचली "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जन्म ठिकाण", का कुणास ठाऊक पण मला लहानपणी शाळेच्या ट्रीपला कोकणात गेलो असताना "चिखली" या गावातील वाचलेले पाटी आठवली "लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे हे जन्मस्थान"
कोणतीही राजकीय किंवा चळवळीची पार्श्वभूमी अथवा भक्कम आर्थिक पीढीजात असलेली इस्टेट असं काहीही नसताना फक्त प्रबोधनकारांच्या प्रखर पुरोगामी विचारांचे संस्कार यावर शून्यातून एक राज्यव्यापी संघटना उभी करण्याचे कसब असलेला जगातील एकमेव नेता "बाळ केशव ठाकरे" शिवसैनिकांचा विठ्ठल आणि सर्वांसाठी असलेले "बाळासाहेब"
एखाद्या इंग्लिश किंवा हिंदी चित्रपटाच्या हिरोला शोभेल अशी स्टाईल मोठ्या फ्रेमचा चष्मा आणि बाहेर असतील तर तसाच गॉगल. ओठत धूर सोडणारा पाईप आणि मग त्यातून निघणारे शब्दांचे अंगारे.
त्यावेळेस पांढरी टोपी आणि जॅकेट घालणाऱ्या त्या टिपिकल नेत्यांना नक्कीच त्यांचा हेवा वाटत असेल. स्वतःवर कधीही वैयक्तिक भ्रष्टाचाराचे शिंतोडे उडणार नाहीत याची पक्की खात्री असल्यामुळेच बाळासाहेबांनी कधीही पांढरी टोपी आणि जॅकेट घातले नाही.
बीबीसीच्या एका ब्लॅक अँड व्हाईट डॉक्युमेंटरीत मुंबईत रोड इंटरव्यू मध्ये त्या इंग्रजी पत्रकाराला तोंडात पाईप ठेवून अस्खलित इंग्रजी आन्सरिंग करणाऱ्या बाळासाहेबांना बघितल्यावर वाटतं आणि हेच का ते जे भर प्रचार सभेत लाखोंच्या जनसमुदायासमोर गांडू हा शब्द बिनधास्त बोलतात.
स्वतः प्रशासकीय सत्तेत सहभागी न होता सुद्धा ज्यांनी महाराष्ट्राला दूरगामी विचार करून मुंबई-पुणे एक्सप्रेस वे सारखा त्याकाळचा आंतरराष्ट्रीय लेव्हलच्या महामार्ग दिला असे हे बाळासाहेब.
मला अजूनही 1998 सालची पुण्यात सारसबाग चौकात झालेले प्रचार सभा आठवते. मी बाजीराव रोड साईडला गरवारे बालभवनच्या जवळ रस्त्यावर बसलो होतो. मंचाच्या उजव्या बाजूने साहेब त्यांची ती नेहमीची शॉल खांद्यावर अधून-मधून टाकत बोलताना दिसत होते अर्थातच खूप दूरवर दिसत होते ते भाजपचे त्यावेळेसचे टॉप मोस्ट फायरब्रँड प्रमोदजी महाजन.
भाषणामध्ये बाळासाहेबांनी मेधा पाटकर पासून ते महाराष्ट्रातले विविध राजे आणि त्यावेळच्या दिल्लीच्या राण्या यांची जी काही काढली.. ते शब्द अजूनही डोक्यातून जातच नाहीत.
"जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो"... तमाम या शब्दाचा खराखुरा अर्थ जर समजून घ्यायचं असेल तर साहेबांचा शिवतीर्थावरील दसरा मेळावा. तमाम या शब्दाला शब्दशः ठरवणारा एकमेव नेता. कारण तिथली गर्दी जमवली नसायची तर स्वतःहून प्रेमाने उत्सुकतेने आलेली असायची
त्यांच्या या एका सुरुवातीच्या वाक्यात एवढी ताकद होती की त्या वाक्यानंतर जर साहेब कधी म्हणाले असते "अरे भडव्यांनो इथं काय बसलाय उठा आणि तो शेजारचा सुई एवढ्या देश संपून टाका" तर भारलेले संपूर्ण शिवतीर्थ एका क्षणार्धात उठून उत्तरेकडे कूच केली असती. ही ताकद होती या वाक्यात आणि त्यातून रक्त खवळून निघत होते आणि लोक भारावून जात होते.
कुठल्या विषयावर साहेबांचा शब्द भाष्य शेवटचा असायचं. एकदा का त्यांनी एखाद्या विषयावर भाष्य केले की त्यावर प्रतिवाद करण्याची ताकद काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत कोणाचीच नव्हती.
शिवसेनेच्या चिन्हा प्रमाणे अस्सल वाघ होते बाळासाहेब. वाघाची जशी छोट्या-मोठ्या हरिण, माकड, काळवीट आणि हत्तींपासून ते सिंहापर्यंत जरब असते तशीच जरब ह्या वाघाची राजकीय आणि सामाजिक कार्यात होती किंबहुना अजूनही अदृश्यपणे आहेच.
बाळासाहेब ठाकरे या नावात असं गुढ होतं की जसं मुंबई बाहेरच्या माणसाला मुंबई बद्दल एक अनामिक भीती तर असते पण कायम उत्सुकता लागून राहिलेली असते मुंबईत जायची. तशीच काहीशी उत्सुकता आणि अनामिक भीती ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर बाळासाहेबांबद्दल होती आणि म्हणूनच अगदी मायकल जॅक्सन, जावेद मियांदाद पासून ते आपले माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पर्यंत सर्वांनी मातोश्रीवर मुंबईत आल्यावर हजेरी लावलेली आहे.
अफजल खान जसा प्रतापगडावरून म्हणला होता कोण आहे हा शिवाजी का बच्चा मेरे सामने असे कित्येक अफजल खान मुंबईत यायच्या आधी बाळासाहेबांन बद्दल विविध विधानं करून मुंबईत आले. परंतु एकदा का ते मातोश्रीच्या गेट पाशी आले त्यांची फाटायचीच. एवढी सिक्युरिटी एका माणसासाठी आणि ती सुद्धा स्वतःच्या लोकांची आणि विनामोबदला फक्त साहेबांसाठी या विचारानेच दडपून जायचे आणि साहेब भेटल्यावर मग नतमस्तक व्हायचेच.
"मुझे हर कोई अपने अपने नजरीये से देखता है और मत बना लेते है" लेकीन
"मुझे जो सही लगता है, वो मै करतां हुं। फिर वो सरकार के खिलाफ हो, सिस्टीम के खिलाफ या फिर समाज के खिलाफ"
हा राम गोपालच्या सरकार मधला डायलॉग तंतोतंत त्यांच्यावरच होता. कधी कधी मला शिवसेना हा प्रवास त्या रॉबर्ट डीनीरो आणि अल् पचीनोच्या गॉडफादर पिक्चर सारखाच चालू आहे की काय असे वाटते.
मनमोहन देसाईच्या अमर अकबर अँथनी मध्ये जसं आईला एकाच वेळेस तीन मुले रक्त देतात हा प्रसंग दाखवला आहे तसंच काहीसं मला वाटतं की ऍक्च्युली बाळासाहेबांनी एकाचवेळेस लाखो शिवसैनिकांना त्यांचे रक्त दिले असेल. ज्याचा रंग भगवा आणि रक्तगट H पॉझिटिव्ह.
हया दिलेल्या रक्ताचा इफेक्ट इतका आहे की अजूनही सामना हे एकमेव असे वृत्तपत्र आहे जे बेधडकपणे अग्रलेख लिहू शकते. आणि त्यावेळेससुध्दा व्यंगचित्रातून वर्मावर बोट ठेवणारे मासिक म्हणून मार्मिक हे नाव दिले असेल
पॉलिटिकल स्टार्टअप चे उत्तम उदाहरण म्हणजे शिवसेना आणि लीडरशिप चा उत्तम नमुना म्हणजे बाळासाहेब.
आय (I) असून सुद्धा आय (I) नाही तर वुई (WE)चे उत्तम उदाहरण. पुढची फळी तयार करून त्या फळीतल्या नेत्यांना मोठे करणे हे गुण त्यांच्यात होते.
Right Job Right Person; Motivation; Timely Appreciatiation
हि लीडरशिपची त्रिसूत्री कशी अमलात आणावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे बाळासाहेब.
जसं घटना जात पात धर्म पंथ लिंग यात कोणताही भेदभाव न करणारी असते तसेच हिंदुस्तानातील एकमेव नेता म्हणजे बाळासाहेब
त्यांची बायप्रॉडक्ट प्रतिकृती होण्याची त्यांच्या काळात किंवा नंतरच्या काळात सुद्धा बऱ्याच जणांनी प्रयत्न केला परंतु शेवटी बाळासाहेब नावाचा सह्याद्री हा एकच बाकी सगळ्या पर्वतीच्या टेकड्याच.
2012 साली जर यमाने विचारले असते तर लाखो सैनिक तयार झाले असते त्या "होता जीवा म्हणून वाचला शिवा" सारख्या जिवासारखी बलिदान करायला.
आजसुद्धा "साहेब असते तर...." असं म्हंटलं कि कितीही बेडर नीडर असला तरी सच्च्या सैनिकाच्या सुद्धा डोळ्यात पाणी येतंच. आणि म्हणूनच खात्री पटते की होतेच ते खरे "हिंदुह्रदय सम्राट".
साहेब तुमचा तो रुद्राक्ष धारण केलेला आशीर्वाद रुपी हात सदैव शिवसेना आणि सैनिकांच्या पाठीशी राहो हीच त्या श्रीं कडे इच्छा.
साहेब तुम्हाला भावपुर्ण श्रध्दांजली💐
आपलाच एक चाहता..
No comments:
Post a Comment