सध्या दूरचित्रवाहिनीच्या प्रत्येक वृत्तवाहिनीवर बातम्या कमी आणि जाहिराती उदंड प्रमाणात दाखविल्या जाताहेत. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच राजकीय जाहिरातीचे खूप मोठ्या प्रमाणात ओघळ वाहू लागलेत. सुरुवातीला ठिक आहे म्हणणाऱ्या दर्शकांना आता मात्र उबग आलाय. लोकरंजनाच्या वाहिन्यांवरही जाहिरातींना ऊत आलेलाय. उबग आलेल्या जाहिराती सतत दाखविल्या तर दर्शक मनातल्या मनात त्याचं विद्रुपीकरण करतात. जनकल्याणाच्या म्हणून दाखविल्या जाणाऱ्या जाहिरातीतल्या वस्तू लाभार्थींपर्यंत पोहोचलेलीच नसते. कारण अनेक लालची गाळण्यांमधून ती ठिबकत-ठिबकत खाली येत असते. जेव्हा सरकारी प्रसारमाध्यमांशिवाय माहितीच स्त्रोत उपलब्ध नव्हतं, तेव्हा नागरिक फसत होते, कारण साक्षरतेचं प्रमाणही त्याकाळी अल्प होते. पण आता शंभर टक्के साक्षरता आणि खिशात जग घेऊन फिरणाऱ्या मोबाईलधारी नागरिकांना फसविणं, हे अवघडच नाही तर, अशक्य आहे. परंतु सत्तेची धुंदी चढलेल्या अंधांना आणि त्यांच्या लाभार्थी भक्तांना ही बाब गौण वाटते, तेच विरोधकांच्या पथ्यावर पडतेय. निवडणुक घोषित होण्यापूर्वीच विविध वाहिन्यांवरून निवडणूकपूर्व निकाल वर्तविले गेलेत. आज माझं वय ७० वर्षे आहे. आजवर माझ्याकडे कोणत्याच निवडणुकीत कोणत्याही संस्थेचा सर्व्हे करणारा माणूस येऊन मला वा माझ्या परिचयांमध्ये कुणाला भेटलेला नाही. तुम्हालाही तो भेटलेला नसेल. मग हे सर्व्हे कसे काय होतात, हे एक गूढच आहे. त्यांचे अंदाज काहीही येवोत. मात्र आज मतदार मनातल्या मनात मत देऊन मोकळे झालेत. काही ठिकाणी फक्त औपचारिकता तेवढी शिल्लक राहिलीय. मात्र विरोधी पक्षांनी काही आचरटपणा करु नये, अशी अपेक्षा आहे. कारण अति उत्साहाच्या भरात कार्यकर्ते भरकटतात. त्याचं भांडवल करायला संधी मिळते. आता देशावरचे काळे ढग विरळ होत चाललेत, वर्ष अखेरपर्यंत सामाजिक वातावरण निरभ्र होईल अशी अपेक्षा आहे!
राजकारणी निर्लज्ज आणि कोडगे असतात. त्यांना जनकल्याण कार्यक्रमाशी काहीही घेणंदेणं नसतं. राजकारण्यांना पैसा, पद, प्रतिष्ठा या पलिकडचं काहीही दिसत नाही. साम्यवादी आणि वैदिकी राजकारणी सोडले तर, राजकारणातली वैचारिक बांधिलकी संपलेली आहे. तिसऱ्या गटात भारतीय राज्यघटनेशी निष्ठावान गट आहेत. त्यामध्ये बहुसंख्य समाजवादी मंडळी आहेत. सध्या तेच वैदिक विरोधी पुढाकार घेत आहेत. कॉंग्रेस आणि साम्यवाद्यांनी त्यांना नैसर्गिक वैचारिक बंधू म्हणून सहकार्य करावं, कारण सध्याचे समाजवादी सत्तावादी नाहीत, ते सत्तेत वाटाही मागणार नाहीत. पण धर्म संघटनच्या नावाखाली वैदिक आर्य जो धुमाकूळ घालत आहेत. त्याला खऱ्या अर्थानं वैचारिक विरोध समाजवादीच करतील, म्हणून साम्यवादी आणि कॉंग्रेसनं समाजवाद्यांसह एकत्रितरित्या घटना विरोधी ताकदीचा मुकाबला केला पाहिजे. राष्ट्र विरोधी शक्ती आताच उगवलेल्या नाहीत, त्या साडेतीन हजार वर्षांपूर्वी खैबर खिंडीतून दरोडेखोर म्हणून आलेल्या होत्या. पण गौतम बुद्ध आणि द्रविड संस्कृती यांनी त्यांना रोखलं होतं. नंतरच्या काळात हूण, कुशाण, पोर्तुगीज, डच, फ्रेंच, मोगल, ब्रिटीश यांच्या आधुनिकतेपुढं वैदिकांचा देवताळेपणा फुसका ठरला होता. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यातही त्यांनी ब्रिटीश धार्जिणं धोरण ठेवलं होतं. कॉंग्रेस अंतर्गत वैदिक टोळीही सत्तेवर डोळा ठेऊन होती. स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरुंच्या काळातही ऐंशी टक्के वैदिकी विचारांचे कॉंग्रेशी नेते होते. परंतु नेहरुंचा त्याग, कष्ट, राष्ट्रनिष्ठा यामुळं वैदिकी काहीही करु शकले नाहीत. १९६७ नंतर वैदिकींनी उचल खाल्ली होती. राजकीय दबाव गट निर्माण करण्यात यशस्वी झाले. आज वैदिक पंथालाच इथला धर्म बनवून धूळफेक सुरु आहे. सिंधू नावाची संस्कृती होती, कधीच धर्म किंवा पंथ नव्हता आणि नाही, परंतु चातुर्वर्ण्य मनुवधर्माच्या नावाखाली बदनाम झालेल्यांनी सिंधू संस्कृतीचा आश्रय घेऊन त्याला धर्म नाव दिलं आणि आत घुसून सिंधू संस्कृती पोखरुन, भुसभुशीत केली आहे. सध्या त्याच वैदिक घुशींना, पकडून प्लेगची लस द्यायची आहे. त्यामुळं राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून मूळ आंबेडकरवाद्यांनी अहंकार आणि बार्गेनिंग नीती, जरा बाजूला ठेवावी आणि राज्यघटना विरोधी शक्तींचा मुकाबला करण्यास सहकार्य करावे अशी अपेक्षा आहे. निदान आंबेडकरवादी नाव घेऊन घटनाविरोधी शक्तींना सहकार्य तरी करु नका. निवडणूकीपुरता विचार करुन वैदिकवाद्यांना बळ देऊ नका एवढंच कळकळीची आवाहन आहे.
अगतिक नागरिक निकाराला आल्यावर काय घडतं, याचा प्रत्यय नागरिकांच्या ज्या प्रतिक्रिया येत आहेत, त्यातून दिसून येतेय. "व्यक्ती तितक्या प्रकृती" या उक्तीचं रुपांतर सामुदायिक निर्णयात होताना जे दृश्य दिसतं. त्याचीच झलक सध्या मतदारांच्या प्रतिक्रियेतून उमटतेय. त्यामुळं कोण कोणाला जाऊन मिळाला, यात आता नागरिकांना रस नाही तर जो पळाला तो संपला. अशी गत रणछोडदासांची होणार आहे. त्यामुळं बालभारतीच्या पुस्तकातल्या जोड्या लावा या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची आवश्यकता नाही. हरामखोर आणि भुरटे राजकारणी आता नागरिकांच्या निष्ठेला उतरणार की, नाही? यावरच त्यांचं राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे. सगळेच राजकारणी थोड्याफार प्रमाणात लबाड बोलतात. परंतु राष्ट्र आणि त्यातले नागरिक यांच्याशी जेव्हा गद्दारी होते. तेव्हा मात्र नागरिक तडजोड करत नाहीत. अंतःकरणातल्या श्रध्देचा बाजार जेव्हा रस्त्यावर मांडला जातो तेव्हा दगड देवांवरच्या विश्वासालाही तडा जातो. याचा प्रत्यय येतोय. दरोड्यातल्या पैशातून बांधलेल्या मंदिरात देव राहतो. यावर भक्त कसा विश्वास ठेवतील? चोरांनी न्यायासनावर बसून तक्रारदारालाच डांबून ठेवण्याचे राज्य लोक सहन करतील? आता तेच निर्णय घेतील कारण...
लोक रस्त्यावर यावया लागले
फैसला आता दूर नाही यार हो...
सुरेश भट
No comments:
Post a Comment