Friday, 6 December 2024

ए भाय, जरा देख के चलो...!

हरियाणातल्या निकालानं महाराष्ट्रातल्या सर्वच राजकीय पक्षांना जागं केलंय. राजसत्तेसाठी महायुतीच्या आशा पल्लवित झाल्यात तर महाआघाडीला स्वप्नरंजनातून गदागदा हलवून इशारा दिलाय की, मित्रांची साथसंगत सोडली तर इथंही हरियाणा होईल! मतविभाजन आणि मतांची अदलाबदल होण्यासाठी काँग्रेसला उद्धव, शरदराव यांची गरज आहे. तर भाजपला शिंदे, अजित पवार यांची अडचण होतेय! हरियाणात जसं जाट विरोधात इतर समाज उभे केले तसंच हिंदू - मुस्लिम करण्याऐवजी मराठ्यांच्या विरोधात ओबीसी आणि इतर जातींना उभं करून मतं मिळविण्याकडे भाजपचा कल दिसला. काँग्रेसला अहंकार सोडून थोरला भाऊ होऊन मित्रांना पोटाशी धरावं लागेल.
..........................................
राजकपूर यांच्या 'मेरा नाम जोकर' या चित्रपटात शैलेंद्र यांचं एक गीत आहे. 
*ए भाय, ज़रा देख के चलो, आगे ही नहीं, पीछे भी*
*दायें ही नहीं, बायें भी, ऊपर ही नहीं, नीचे भी*
*ए भाय... भाय जरा देख के चलो....!*
यशाची सुनामी गाठण्याची वल्गना करणाऱ्या काँग्रेसला हरियाणात सहकारी पक्षांना दूर राखण्याचा निर्णय हा आत्मघाती ठरलाय. त्यामुळं इंडिया आघाडीचं नेतृत्व करणाऱ्या काँग्रेसला त्यातही राहुल गांधी यांना त्यांच्या सहकारी पक्षांनी वेगळ्या पद्धतीनं सुनावलंय. त्यांना सल्ला द्यायला सुरुवात केलीय. ते एक्स समाजमाध्यमांवर व्यक्त होताहेत. आदमी पक्षाचे प्रवक्ते खासदार राघव चड्डा यांनी हिंदीत चारोळी केली. ते म्हणताहेत,
'हमारी आरज़ूकी फिक्र करते तो 
कुछ और बात होती, 
हमारी हसरत का ख्याल रखते,
तो एक अलग शाम होती
आज वो भी पछता रहा होगा मेरा साथ छोड़कर,
अगर साथ-साथ चलते  तो कुछ और बात होती l' 
जर इथं आम्हाला ४-५ जागा दिल्या असत्या तर राजसत्ता तुमच्या हाती असती, असं त्यांना सुचवायचंय.
समाजवादी पक्षाचे प्रवक्ते आणि अखिलेश यादव यांचे निकटचे राजीव राय काँग्रेसला म्हणताहेत, 
'माझं ते माझं आहे अन् तुझं तेही माझंच आहे...!' ही वृत्ती आता काँग्रेसनं सोडून द्यावी अन् जे तुम्हाला आज आत्मघाती सल्ले देताहेत ना, त्यांना जरा रोखा. वास्तवाचं भान ठेवा....!
तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते राज्यसभेतले खासदार साकेत गोखले म्हणताहेत, अहंकार बाळगणं अन् प्रादेशिक पक्षांची उपेक्षा करणं हे पराभवाचं, बरबादीचं कारण ठरू शकतं. याचं भान ठेवायला हवंय. यापुढं तरी तशी खबरदारी घ्या....!
मोहरम्‌चे दिवस आले की, अंगावर वाघाचे चट्टेपट्टे रंगवून नाचणारे दिसतात. अगदी तशाच पद्धतीनं निवडणूका आल्या की, काही जणांच्या अंगात येतं अन् ते घुमू लागतात. तीच ती माणसं वेगवेगळी रूपं धारण करून आपल्यासमोर येत असतात अन् आपणही या सोंगाड्यांकडं कुतूहलानं पाहात असतो पण तो त्याला न्याहाळत नाही, जोखत नाही म्हणून हे सोंगाडे आपल्याला हवं त्या पद्धतीनं, नाचवित असतात. खरंतर आपली जबाबदारीच आपण विसरुन गेलो आहोत त्याला ते करणार तरी काय? राजकारणी लोकप्रतिनिधी आणि सरकारी अधिकारी यांच्यावरच आपण अवलंबून राहील्यानं ही अवस्था निर्माण झालीय. आपल्यालाही काही जबाबदाऱ्या त्याचा विसर पडून कसं चालेल? मानसिक स्वास्थ हे शाररिक स्वास्थाप्रमाणे पूर्णतः खासगी असतं; किंबहुना सामाजिक मन:स्वास्थ तितकंच महत्वाचं असतं. माणूस आणि इतर प्राण्यांमध्ये मूलभूत फरक म्हणजे माणूस समाज करून राहतो आणि देवाण घेवाणीच्या तत्वावर समाज टिकून राहतो असं असतानाही सामाजिक मनःस्वास्थामध्ये मोठ्याप्रमाणात उलथापालथ होत  आहे. मनुष्य जीवनच असुरक्षित बनलंय. याचं कारण स्पर्धा वाढलीय, याचं कारण योग्यरितीनं, योग्यमार्गानं कामं होत नाहीत. अशी भावना लोकांमध्ये बळावलीय त्यामुळं नियम मोडण्याकडं लोकांचा कल वाढतोय. हे मान्यच करावं लागेल. कायद्याचं रक्षण करणाऱ्यांचा रक्षणाऐवजी सावज शोधण्याकडे लक्ष असतं. लोकांनी कायदा पाळावा याच्याशी त्यांचं काही देणंघेणं नसतं. एकूणच कायदा पाळायची मनोवृतीही लोकांमध्ये राहिलेली नाही. कायदा आणि न्यायव्यवस्थेतले पोलीस, न्यायनिवाडा करणारे लोक यांच्यावर आता लोकांचा विश्वासच राहीलेला नाही. 'बळी तो कान पिळी' अशी परिस्थती निर्माण झालीय. रस्त्यावर घुसखोरी केली तरच आपण वाहतूक समस्येवर विजय मिळवू शकतो या धारणेतून लोक बिनधास्त होऊ लागलेत. एकूण सामजिक जीवनाबाबत पाहिल्यास सज्जनांचं कायदा पाळणाऱ्यांचं संरक्षण आणि बद‌माशांवर नियंत्रण अशी आपल्या कायद्याची व्याख्या आहे. पण आताची परिस्थिती नेमकी याच्या उलट आहे. सज्जन कायद्याला टरकून आणि बदमाश कायदा खिशात घालून फिरताहेत. कायदा, पोलीस आणि न्यायव्यवस्था ह्या गुंड प्रवृत्तीला टरकू लागल्याचं सध्याचं चित्र आहे. गुंडांकरवी न्याय मिळविण्यातच धन्यता मानली जातेय. त्यांच्याच छत्राखाली स्वाभीमानशून्यतेनं का होईना सुरक्षितरित्या जगता येतं असं मानलं जाऊ लागलंय.
समाज मनाचं प्रतिबिंब सामाजिक वर्तणूकीत दिसतं. एकूण आपली सामाजिक व्यवस्था इतकी भ्रष्टाचारी झालीय की, कायदा हा मोडण्यासाठीच असतो, अशी आपली ठाम समजूत झालीय. कायदा मोडण्याची वा मोडल्याबद्धल आपल्याला बिलकुल लाज वाटत नाही. कायदे आणि त्यानुसार दिली जाणारी शिक्षा हे कांही या सामाजीक स्वास्थावरच्या उपाय योजना नाहीत. चांगले नियम पाळणाऱ्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. नुसत्या शिक्षा वाढवून चालणार नाही, तर बक्षीस पध्दतही उपयोगात आणायला हवीय. सामाजिक मूल्ये पाळणाऱ्याला फळ मिळेल, त्यांचा सन्मान होईल असा अनुभव जोवर माणसाला येत नाही, तोवर अनुकूल बदल घडण्याची अपेक्षा बाळगणं चुकीचं आहे. स्वातंत्र्यपूर्वकाळात परमार्थाचा अतिरेक झाला होता, सध्या अशाचप्रकारे स्वार्थाच्या अतिरेकाची लाट आलीय. काही दिवसांनी ही लाट देखील ओसरून सुवर्णमध्य गाठता येईल, यासाठी मार्ग सापडेल. कारण आज त्यागाचं फळ मिळत नाही. अशा आशयाचा संदेश समाजाच्या सर्वच थरापर्यंत पोहोचलाय. त्यामुळंच लोकांच्या मनोवृत्तीत बदल झालाय, ते भोगाकडं वळालेत. सर्वत्र परमार्थाची लाट ओसरून स्वार्थाच्या लाटा उस‌ळताना दिसताहेत. भ्रष्टाचारानं परमोच्च कळस गाठलाय. भ्रष्टाचाराबाबत कोणताच विधिनिषेध राहिलेला नाही, तो सर्वच स्तरात सर्वत्र बोकाळलाय. अशातच कर्मावरचा, प्रयत्नांवरचा लोकांचा विश्वास देखील ढळू लागलाय, अशातच बुवाबाजीनं देखील उच्छाद मांडलाय. समाज, अशाप्रकारच्या वेगवेगळ्या गर्तेत सापडलाय. या सगळ्याची कडू फळं आपण चाखतो आहोत. पण अशा आशा करू या की, या सगळ्या चक्रव्यूहात अडकलेल्या सामान्यांना यातून बाहेर पडण्याची 'अभिमन्यू विद्या'ही लाभू शकेल. मात्र आपली एक मोठी जबाबदारी आहे की, सत्याचा पराभव होतोच असा निराशाजनक संदेश पुढच्या पिढीला मिळता कामा नये; अन्यथा सत्याकडे पाहण्याची त्यांचा दृष्टी कायमची कलुषित होईल. आदर्श समाज निर्माण करण्यासाठी चांगले प्रसंग समाजापुढं येणं गरजेचं आहे. सत्याची कास धरून न्याय मिळाला, अशी उदाहरणं समाजासमोर आली तर या मार्गावरुन मार्गक्रमण करण्यासाठीचं प्रोत्साहन त्यांना लाभेल. प्रेरणा मिळेल. पण प्रसिद्धी माध्यमातून चांगल्या, सत्याची कास धरणाऱ्या बाबींना आज स्थान मिळत नाही. मिळते ते व्याभिचारी, असत्याच्या मार्गावरून चालणारे गुंड, चोर, लुटारू, खुनी, दरोडेखोर, बलात्कारी यांना! अशा या अनाचाराच्या अंधारात सत्याचा मिणमिणता दिवा तेवतो आहे. त्याच्या उजेडात मार्गक्रमणाची जिद्द आपण ठेवली पाहिजे. कारण अंधार हा शाश्वत आहे. दिवा त्या अंधाराची कमी जास्तीची तीव्रता दाखवीत असतो. हा सत्याचा मिणमिणता दिवा घेऊन दोन पावलं पुढे चाललो तर कामापुरती पुरेसा उजेड सहज मिळू शकतो. आपण दोन पावलं पुढं चाललो तर आणखी प्रकाश पडेल अन्  आणखी दोन पावलांसाठी आपल्याला मार्ग सापडेल. कायदा पाळणाऱ्याला जोपर्यंत मनोधैर्य येत नाही तोपर्यंत कायदा पाळणाऱ्यांची मनोवृती वाढणार नाही. स्वनियंत्रण अंगी बाणलं, स्वतः नियम पाळले, कायदे पाळले अन् इतरांना त्यासाठी उद्युक्त केलं तर देशासमोरच्या अनेक प्रश्नांना दीर्घकालीन असे उपाय मिळू शकतील. राजसत्ता मिळाली. याला उत्तर देताना काँग्रेस म्हणतेय आम्ही आघाडीत आलो नसतो तर उद्धव मुख्यमंत्री झालेच नसते. आमच्यामुळेच ते मुख्यमंत्री झाले. हा दोन्ही पक्षाचा इगो इथं नडतोय तो शमवला पाहिजे. एकूण काय सत्तेची रस्सीखेच रंगतदार होईल हे निश्चित!
विदर्भात लोकसभा निवडणुकीत दलित मुस्लिम कुणबी DMK हा फॅक्टर चालला तोच पुढे मराठवाड्यात चालला हाच फॅक्टर जरांगेंना जोडला गेला अन्म हाआघाडीला यश देऊन गेला. जिथं मराठा उमेदवार होते तिथं ह्या फॅक्टरनं कमाल केली. उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातही तो कमी अधिक प्रमाणात झाला. आता विधानसभेला असंच होईल असं म्हणता येईल का? हरियाणात जाटांच्या विरोधात गैर जाट एकत्र आले. तशाप्रकारे मराठा विरोधात ओबीसी एकत्र येतील हे गृहितक खरं ठरलं पाहिजे. सीएसडीएस य संस्थेच्या पाहणीनुसार जरांगे फॅक्टरची मतं महाआघाडीपेक्षा महायुतीला अधिक मिळाली. परंतु निर्णायक स्वरूपात ठिकठिकाणी मिळाली नाहीत म्हणून तिथं त्यांचा पराभव झाला. भाजपच्या विरोधात शेतकरी वर्ग होता जो कृषक समाज मराठा, कुणबी होता विदर्भ, मराठवाड्यात. दलित, मुस्लिम युती भक्कम झाली अन् ती एक गठ्ठा महाआघाडीकडे गेली. ही मतं विदर्भ मराठवाड्यातच नाही तर मुंबई, कोकणसह संपूर्ण महाराष्ट्रात गेली. जरांगेंचं आंदोलन आरक्षणाच्या मागणीसाठी आहे. लक्ष्मण हाके, वाघमारे यांचं आंदोलन हे आरक्षण टिकविण्यासाठीचं आहे. आमच्यात इतर कुणाला समाविष्ट करू नका यासाठीचं आहे. ज्यांना आरक्षण मिळालेलं आहे त्यांचं कुणी हिरावून घेत नाही. हे बहुसंख्य ओबीसींना माहीत असल्यानं त्याला फारसा पाठिंबा मिळालेला नाही. ज्यांच्याकडे नाहीये त्यांना तो मिळवायचाय म्हणून जरांगेंच्या आंदोलनाला मोठा पाठींबा मिळतोय. जरांगेंनी आजवर कुणाला पाठींबा द्यायचा हे जाहीर केलेलं नाही. तसं ते जाहीर न करणं हे महाआघाडीला फायदेशीर ठरणारंय. कारण जरांगेंची वक्तव्य पाहिली तर ती सर्व सरकारच्या म्हणजेच महायुतीच्या विरोधातली आहेत. लोकसभेला ज्याप्रकारे जातीय समीकरणे फिरली तशी ती विधानसभेच्या निवडणुकीत फिरतील का हे पाहणं महत्वाचं ठरणारंय. महायुतीनं त्यातल्या त्यात भाजपनं या जातीय मतांचं अभिसरण करत सूक्ष्म पातळीवर नियोजन केलं, ते तसं आता करताहेत, छोट्या छोट्या जातींसाठीची महामंडळे निर्माण केली आहेत, छोट्या छोट्या धर्मियांना जमिनीचं केलेलं वाटप, या सगळ्याचा फायदा महायुतीला होईल. जागावाटपात भाजपचाच वरचष्मा राहील. भाजप १५५ ते १६० जागा लढवणार, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ८८ किंवा त्याहून कमी आणि अजित पवारांना ४५ जागा दिल्या जातील असं म्हटलं जातंय. महायुतीत मोदी शहा सांगतील तशाच प्रकारे जागा वाटप होईल. त्यात शिंदे किंवा अजित पवारांना कोणताच से असणार नाही. त्यांचं अस्तित्वच भाजपवर अवलंबून आहे. त्यांचं स्वतःच असं वेगळं अस्तित्व नाहीये. त्यांच्याकडे पर्यायच उरलेला नाही. ते मोदी शहा आणि भाजप यांच्यावरच अवलंबून आहेत. महाआघाडीत तसं नाहीये. कारण उद्धवसेनेनं आताच वाकुल्या दाखवायला सुरुवात केलीय. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करा असा आग्रह का धरताहेत, तर गेली अडीच वर्षे एकनाथ शिंदे एक शिवसैनिक मुख्यमंत्री आहे आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजप महायुती निवडणूक लढवीत आहे. इकडे उद्धव ठाकरेंचा चेहराच महाआघाडी कडून  प्रोजेक्ट केला जात नाही ही खंत सामान्य शिवसैनिकांनाच नाही तर नेत्यांनाही वाटतेय. उद्धव यांचा चेहरा नसेल तर गावागावातून, शाखाशाखातून जे शिवसैनिक पुढे येतील त्यांच्यात जोम, चैतन्य असणार नाही. इकडे काँग्रेसकडे अनेक चेहरे आहेत. त्यांच्यातल्या एकाच नांव घेऊन हरियाणासारखी स्थिती इथं उपलब्ध करू इच्छित नाही. शरद पवारांनी आधीच सांगून टाकलं आहे की, मुख्यमंत्रीपदाचा चेहऱ्याचा वाद निरर्थक आहे. महाआघाडीचा प्रयोगच उद्धव यांच्यामुळे झाला अन् विरोधी बाकावर बसलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला राजसत्ता मिळाली. याला उत्तर देताना काँग्रेस म्हणतेय आम्ही आघाडीत आलो नसतो तर उद्धव मुख्यमंत्री झालेच नसते. आमच्यामुळेच ते मुख्यमंत्री झाले. हा दोन्ही पक्षाचा इगो इथं नडतोय तो शमवला पाहिजे. एकूण काय सत्तेची रस्सीखेच रंगतदार होईल हे निश्चित!
यात प्रसिद्धीमाध्यमं मोठा हातभार लावू शकतात. पण आजच्या या बाजारीकरणाच्या काळात ही माध्यमं आपली जबाबदारी विसरून गेलेत. चित्रपट असो, नाटक वा दूरचित्रवाणी वाहिनीवरच्या मालिका त्यात राष्ट्रपिढी घडविणाऱ्या शिक्षकांचं चित्रण एक बावळट, वेंधळा, गबाळा असं केलं जातंय. पोलीसांच्या कामाचे धिंडवडे काढले जातात. याउलट समाजविघातक, समाज बिघडविणाऱ्या गोष्टीच दाखविल्या जातात. अनेकदा त्याचं उदात्तीकरण केलं जातं. चोरी, खून, दरोडे, लुटालूट कशा पध्दतीनं झालं हे सविस्तरपणे दाखवून प्रेक्षकांना शहाणं केलं जातं, मार्गदर्शन केलं जातं. त्यात व्याभिचारीपणाला प्राधान्य दिलं जातं. सध्या तर जो तो पैशाच्या मागे धावतोय. त्याचं जीवन गतिमान बनलंय. असं असलं तरी सामाजिक जबाबदारी अन् सामाजिक स्वास्थ टिकेल यासाठी प्रयत्नशील राहायला हवं आभाळ फाटलंय म्हणून हताश न होता प्रत्येकानं आपण राहतो त्या भागात जर ठिगळ लावलं तरी देखील खूपसं होईल. हे ध्यानात घ्यायला हवं. नाही कां?... तर चला, निर्धार करूया..! 
- हरीश केंची
९४२२३१०६०९
 

No comments:

Post a Comment

अशी होती बाळासाहेबांची शिवसेना...!

शिवसेनेत लोकशाही नाही; शिवशाही आहे अन् शिवसेनाप्रमुख हेच शिवसेनेचे एकमेव नेते आहेत; ही गोष्ट बाळासाहेबांनी कधी लपवली नाही. ही रच...