येत्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकांची सर्व पक्षांची तयारी सुरू झालीय. एकूण जागा ५४३ आहेत. आणि हाती अवधी जेमतेम काही महिन्यांचा आहे! 'काँग्रेस' पार्टी आपल्या दुसऱ्या 'भारत जोडो' यात्रेवर निघणार आहे. त्यामुळं ती पुढील काही दिवस रस्त्यावरच राहणार आहे. अरविंद केजरीवाल पंजाबनंतर गुजरात जिंकून 'आम आदमी पार्टी'ला 'राष्ट्रीय' करण्याच्या तयारीला लागले होते, पण त्यात त्यांना यश मिळालं नाही. बाकी प्रादेशिक पक्षही आपआपल्या प्रदेशात सक्रीय झालेत. 'राष्ट्रवादी कॉंग्रेस'चे प्रमुख शरद पवार आणि 'जनता दल युनायटेड'चे प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे मात्र विरोधी पक्षांचं ऐक्य साधण्याच्या प्रयत्नाला लागलेत. पवार यांनी त्यांचा ऐक्याचा 'फॉर्म्युला' अद्याप मांडला नसला तरी नितीशकुमार मात्र आपला 'फॉर्म्युला' घेऊनच बाहेर पडलेत. त्यासाठी ते सर्व विरोधी पक्षनेत्यांच्या भेटीगाठी घेतल्यात. विशेष म्हणजे, शरद पवार काय किंवा नितीशकुमार काय यांनी आगामी प्रधानमंत्री पदावर किंचितही दावा केलेला नाही. या उभय नेत्यांना केवळ आज 'भाजप' तथा मोदी-शहा ह्यांचं राजकारण पराभूत करून देशात सत्ताबदल घडवून आणायचाय. नितीशकुमार यांचं विरोधी पक्ष ऐक्य आघाडीच 'प्लान' निश्चितपणे वेगळं आहे. त्यांना 'कॉंग्रेस' पक्ष हा राहुल गांधी यांच्याकडं देशाचं नेतृत्व सोपवू इच्छितेय, हे ठाऊक आहे. 'आप'चे केजरीवाल तर देशात 'अश्वमेध' करायला निघालेत प. बंगालच्या मुख्यमंत्री आणि 'तृणमूल कॉंग्रेस'च्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी यापूर्वीच २०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी 'खेला होबे'चा आवाज दिलाय ! त्याच वेळी 'आपण कम्युनिस्टांशी कदापि समझोता करणार नाही' असंही जाहीर केलंय. त्या एकीकडं विरोधी पक्षांचा कैवार घेत असल्या तरी अधूनमधून 'संघ-भाजप'ची तळीही उचलताना दिसतात. असंच 'बहुजन समाज पार्टी' च्या मायावतींचं आहे. त्या सातत्यानं मौन पाळून आहेत.
केरळमध्ये 'काँग्रेस' आणि 'कम्युनिस्ट एकत्र येऊ शकत नाही. अशा स्थितीत नितीशकुमार एक वेगळा 'प्लान' घेऊन आलेत. त्याचं स्वागत किती आणि कसं होईल, हे लवकरच जनतेसमोर येईल.
सर्व विरोधी पक्षांना अगदी प्रादेशिक पक्षांसह सर्वांना प्रथमतः एकाच मुद्यावर एकत्र यायचं. तो मुद्दा म्हणजे, कुठल्याही एका पक्षाला धरून आघाडी करायची वा कुणा एकाला भावी प्रधानमंत्रीचा चेहरा म्हणून सादर करायचं हा नसून, 'भाजप'ला हरवणं, मोदी-शहा यांची सत्ता संपवणं हा आहे. या एका मुद्यावर सर्वांना एकत्र यायचंय! 'भाजप' विरोधी 'राष्ट्रीय' वा 'प्रादेशिक पक्ष यांना आपापल्या जागा जिंकायच्या आहेत आणि स्वतःची मतं 'भाजप' विरोधी पक्षात फुटून वाया घालवायची नाहीत.
२०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकांत 'भाजप' विरोधी पक्षांना अनुक्रमे ६७ टक्के व ६३ टक्के अशी मते मिळाली आहेत. म्हणजे 'अच्छे दिन'चा जुमला प्रचार, 'भाजप'नं प्रचारार्थ ओतलेला गडगंज पक्ष निधी, सरकारी यंत्रणांचा यथेच्छ वापर आणि करोडो रुपयांच्या जाहिराती आणि तथाकथित 'राष्ट्रवाद' आदींचा वापर करूनही 'भाजप'ला मागील दोन लोकसभा निवडणुकांत अनुक्रमे ३३ टक्के आणि ३७ टक्के इतकंच मतदान मिळालंय. 'कोरोना' कालानंतर बेरोजगारी आणि महागाई ह्यात कमालीची वाढ झाल्यानं सध्या देशात 'भाजप'च्या 'मोदी सरकार' विरोधात जनमत अधिक तीव्र झालंय. परिणामी, विरोधी पक्षाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ७०-७५ टक्क्यांहून अधिक मतं मिळणार आहेत. त्याचं नियोजन आणि विरोधी पक्षांचा समन्वय हे योग्य प्रकारे झाल्यास, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत 'भाजप'ला सत्तेवरून निश्चितपणे खेचता येईल, असं वातावरण देशात आहे.
सरकार स्थापनेची प्रक्रिया ही नंतर सर्वांच्या सहमतीनं आणि पक्षीय बलाबल लक्षात घेऊन ठरवता येऊ शकते. मात्र, 'भाजप'चं 'मोदी-शहा सरकार सत्तेवरून खेचायचं!' हे प्रत्येक पक्षानं आणि त्याच्या उमेदवारानं मनोमनी ठरविलं पाहिजे, कोणत्याही परिस्थितीत 'भाजप'च्या प्रलोभनाला बळी पडायचं नाही आणि दहशतीला घाबरायचं नाही, असा त्यांचा निश्चय असला पाहिजे. कोणतीही गुंतागुंत, प्रतिष्ठा, मानपान याचा अडथळा न आल्यास हे ऐक्य साधता येण्यासारखं आहे. त्याचीच संपूर्ण जबाबदारी स्वतः नितीशकुमार घ्यायला सिद्धही झालेत. सर्व पक्ष आपआपल्या परीनं स्वतंत्रपणे आपल्या उमेदवारांची निवड करू शकतात. मात्र, 'भाजप'ला जिंकण्याची संधी द्यायची नाही. मतं फुटू द्यायची नाहीत. समझोता केवळ विरोधी पक्षात आणि त्यांच्यासमवेत करायचा. ५-५० जागांवर समझोता करून दुसऱ्या पक्षाचाच; पण विरोधी पक्षातलाच उमेदवार निवडून आणायचा; शिवाय त्या समझोता करणाऱ्या उमेदवाराला योग्य ते पद देऊन त्याचाही पुढं सन्मान राखायचा असा नितीशकुमार यांचा 'फॉर्म्युला' आहे.
आज 'भाजप' ची मोदी-शहा सत्ता त्यांना मिळालेल्या राक्षसी बहुमताच्या जोरावर त्यांना जे हवं ते करीत आहेत! अटलबिहारी वाजपेयी प्रधानमंत्री १९९८ ते ९९ आणि १९९९ ते २००४ दरम्यान असताना 'भाजप आघाडी'चं सरकार असल्यानं तेव्हा त्यांना सहयोगी पक्षांच्या कलानं घ्यावं लागत होतं. आज मात्र बहुमताच्या जोरावर 'भाजप'नं देशात अघोषित आणीबाणीच लागू केलीय. देश विकायलाही काढल्यासारखं; फायदेशीर सरकारी कंपन्या मातीमोल किमतीत उद्योगपती मित्रांना विकल्या जाताहेत आणि कॉर्पोरेट कंपन्यांची अब्जोवधी रुपयांची थकीत बँक कर्जे माफ केली जाताहेत. म्हणूनच देश वाचविण्यासाठी नितीशकुमार 'फॉर्म्युला' पद्धतीनं 'भाजप' विरोधी पक्षांनी एकत्र येणं, ही वर्तमानाची गरज आहे. हेच आता नितीशकुमार 'भाजप'विरोधी पक्षनेत्यांशी चर्चा करून हे मुद्दे समजावून देत आहेत. देणार आहेत.
नितीशकुमार यांचा हा 'फॉर्म्युला' आणि त्यांचे प्रयत्न याची कुणकुण लागताच 'रा.स्व.संघानं नरेंद्र मोदी यांना वगळून आपला असा एक प्लान समोर आणलाय. नरेंद्र मोदी यांच्या एकाधिकारशाहीमुळे आज 'भाजप'च्या आघाडीतील बरेच पक्ष एनडीए मधून बाहेर पडलेत आणि ते 'भाजप' विरोधी झालेत. त्या सर्वांना पुन्हा एनडीए मध्ये तर आणायचेच आणि सोबत अन्य छोट्या पक्षांनाही सोबत घ्यायचं, असा प्लान 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ' आखत आहे! प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून 'रा.स्व.संघ' आणि त्याची राजकीय शाखा असलेल्या 'भाजप'ला जी राजकीय उद्दिष्टे आणि फायदा साधायचा होता, तो मिळवून झालाय. मात्र मोदी-शहा या जोडगोळीनं रा.स्व.संघ' च्या विचारधारेचा जो विस्तार करायला हवा, त्यासाठी जे एक अनुकूल सामाजिक-सांस्कृतिक वातावरण निर्माण करायला हवं, ज्याची 'रा.स्व.संघा'ला आज नितांत गरज आहे. त्याबाबत फारसं काही केलं नाही.
उलट, 'रा.स्व.संघा'च्या ज्या ३५ संघटना विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यात मग्न होत्या, त्या आणि अन्य सर्वच स्वयंसेवकांना मोदी-शहा यांनी आपल्या निवडणूक कामाला जुंपलं या उलट, 'रा.स्व.संघा'ला 'भाजप'पेक्षा आपला सांस्कृतिक वाढ आणि विस्तार अगत्याचा आहे. त्यासाठी मोदी वजा 'भाजप' असा पूर्वीच्या एनडीए चं पुनर्गठन करून 'रा.स्व. संघा'चा विस्तार करायचा, असा संघ कारभाऱ्यांचा प्लान आहे. त्यामुळं आदित्य योगी, राजनाथ सिंग, नितीन गडकरी हे 'रा.स्व. संघा'नं 'भाजप'मध्ये नियुक्त केलेले नेते पूर्वीसारखे 'चार्ज' होतील.
प. बंगालच्या ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू, तेलंगणाचे के. चंद्रशेखर राव, पंजाबचे सुखवीर बादल, महाराष्ट्राचे उद्धव ठाकरे अशी एनडीए तून दुरावलेल्या नेत्यांची यादी फार मोठी आहे, ते आज 'भाजप' प्रमाणेच 'रा.स्व.संघा'च्याही विरोधात आहेत. हा दुरावा संघनेतृत्वाला नकोय.
हिजाब, मदरसा, दर्गा मशिदीतलं शिवलिंग, हनुमान चालिसा आदि वादांचं मोदी-शहा यांनी इश्यू करून आपलं राजकारण साधलं. पण त्यात 'रा.स्व.संघा'चं नाव चर्चेला येत, बदनाम होत राहिलं. ते संघ आणि संघपरिवाराला मोठा 'सेटबॅक' देणारं ठरलंय! २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत 'भाजप'चा विजय पक्का असेल तर त्यात रा.स्व.संघाचा विस्तार कुठंय? या प्रश्नानं आज मोदी-शहा सत्तेबाबत 'रा.स्व.संघ परिवारा'त प्रश्नचिन्ह निर्माण केलंय! आणि नसलं तरी ते भासविलं मात्र निश्चितच जाणारंय. कारण नितीशकुमार यांचा ऐक्याचा 'फॉर्म्युला' 'भाजप' विरोधी पक्षांमध्ये 'वर्क आऊट' झाल्यास २०२५ ला रा.स्व संघा' चे 'शताब्दी वर्ष' सरकारी इतमामात कसे साजरे होणार ? यासाठीच मोदी-शहा यांना बाजूला ठेवून 'रा.स्व.संघ' आता जमेल तेवढे विरोधी पक्ष गाठीला बांधण्याचा प्रयत्न करणार आहे. ही नितीशकुमार यांच्या 'भाजप' विरोधी ऐक्याच्या विधायक प्रयत्नांना संघानं दिलेली, एक प्रकारे पावतीच म्हणायला हवी!
हरीश केंची
९४२२३१०६०९
Thursday, 22 June 2023
मुख्यमंत्री शिंदेच्या शिवसेनेची वैधता.. !
शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या निमित्तानं दोन मेळावे झाले. उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या मेळाव्यात मोदी-शहा-फडणवीस-शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपला हवं असलेलं भाषण केलं. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यामुळं शिवसेनेचा वर्धापनदिन हा चिखलफेकीचा ठरला. शिंदे यांनी बंड केल्यानंतर मुख्यमंत्री बनलेल्या उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला; त्या घटनेला आता वर्षभराचा कालावधी झाला असेल. त्यांच्या जागी महाराष्ट्राचा कारभार सांभाळायची जबाबदारी एकनाथ शिंदे यांनी घेतली; त्यालाही आता वर्षभराचा काळ लोटलाय. सत्तेवर आलेलं 'शिंदे सरकार' वैध आहे की अवैध याचा जो काही निवाडा व्हायचा तो झालाय! सरकारचं जीवनमरण हे आता विधानसभा अध्यक्षांच्या हाती आहे. सर्वोच्च न्यायालयानं मराठी माणसांना न्यायाचा चंद्र दाखवला मात्र निकलाला चूड लावलीय! संजय राऊत यांनी वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात सांगितलं तसं, 'न्यायालयात न्याय दिला जातो पण त्याची अंमलबजावणी इतरांना करावी लागते. जसे न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली पण त्याची अंमलबजावणी 'जल्लादा'ला करावी लागते!' अगदी तसंच या निकालाचं आहे. त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात हे सरकार किती दिवसांसाठी आहे, या प्रश्नाबरोबरच एकनाथ शिंदे या व्यक्तिमत्त्वाची वैधता किती दिवसांसाठी आहे, असा सवाल गांभीर्यानं चर्चिला जातोय. त्याला कारणंही तशीच आहेत. ती कारणं कधी न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान पुढे आलीत, तर कधी 'भाजप'च्या गोटातून किंवा शिंदे यांच्यासोबत गेलेल्या ४० आमदार-खासदारांच्या गोटातून पुढं आलीत. चर्चेत असणाऱ्या काही कारणांचा ऊहापोह करण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या स्थानाचं आत्ताचं वास्तव काय आहे, ते समजून घेऊ. शिंदे स्वतः राज्याच्या शक्तिशाली सत्तास्थानावर आहेत. पण ते त्या स्थानावरून आपली शक्ती वापरू शकतात का, हा मोठा प्रश्न नाही. ते मुख्यमंत्री असले तरी 'खरे मुख्यमंत्री' हे त्यांचे सहकारी असणारे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, हे स्पष्ट दिसतंय. आता त्यांच्या राजकीय स्थानाबद्धल बोलू. त्यांनी गेल्यावर्षी जून महिन्यात बंड केलं. त्या दिवसांपासून ते म्हणत आहेत की 'आमचीच 'शिवसेना' खरी आहे!' हा दावा करताना पक्षप्रमुख पद, शिवसेना भवन, मातोश्री, दै. सामना आणि सा. मार्मिक, ठाकरे हे आडनाव या सहा गोष्टी वगळता 'शिवसेना'चं म्हणून जे जे आहे त्यावर दावा ठोकत होते. म्हणजे मुख्यमंत्रीपद घेतले, विधिमंडळ पक्ष ताब्यात घेतला, संसदेतला पक्ष घेतला, संघटनेतील काही पदाधिकारी घेतले आणि संपूर्ण 'शिवसेना' या पक्षावर निवडणूक आयोगाकडं दावा केला. तो त्यांनी मिळवला.
'शिवसेना'ची वार्षिक ऊर्जा असणारा 'दसरा मेळावा' आणि त्यासाठी 'शिवाजी पार्क' या मैदानावरही हक्क सांगितला. यामुळं राजकारणातलं आणि संघटनेतलं त्यांचं स्थान 'तेलगु देसम्' पक्षात बंड केलेल्या चंद्राबाबू नायडू यांच्यासारखंच झालं, असं भासविलं गेलं. पण प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे, ते हळूहळू समोर येतेय. त्यामुळेच तर एकनाथ शिंदे यांच्या व्यक्तिमत्त्वाची, प्रतिमेची वैधता किती, हा प्रश्न चर्चेचा विषय झालाय, याबाबत त्याचं विवेचन महत्त्वाचं आहे किंवा ते आवश्यक आहे. त्यांची 'रिक्षावाला मुख्यमंत्री' झाला, ही सुरुवातीची प्रतिमा काही दिवसही टिकू शकली नाही. कारण रिक्षावाला ज्या परिस्थितीत आणि पद्धतीनं मुख्यमंत्री झाला, हा पहिल्या दिवसापासून वादाचा विषय झाला होता. विशेष म्हणजे, हे बंड करण्यापूर्वी ७ वर्षे ते मंत्री होते. तेव्हा त्यांचं वर्णन 'रिक्षावाला मंत्री झाला,' असं झालं नव्हतं. भाजीवाला, रिक्षावाला, पानपट्टीवाला, नर्स, वॉचमन, टॅक्सी ड्रायव्हर, मास्तर, प्रिन्सिपॉल, पिठाची चक्कीवाले यांना 'शिवसेना'नं नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री करणं हे काही विशेष नाहीच. कारण ती त्या संघटनेची ओळख आहे. "मुख्यमंत्री झाल्यावर करतो, बघतो किंवा 'अ' प्रमाणे कार्यवाही करा," असा अर्जावरचा शेरा मी बंद करणार आणि फोनवरच आदेश देणार, असं काहीतरी सांगणारे शिंदे यांचे 'व्हिडिओ' पुढे आले. पण त्यावर प्रचंड टीका झाल्यावर आणि असे फोनवरचे आदेश अधिकारी मंडळी फाट्यावर मारत असल्यानं तोही एक 'ड्रामा' ठरला! आणि एकनाथ शिंदे 'नायक' सिनेमातल्या अनिल कपूर होता होता राहिले. प्रशासनावर मांड ठोकणाऱ्याला जन्मतःच मुडदूस झाल्याचं चित्र अधिकाऱ्यांपुढं आलं. 'आमचीच खरी शिवसेना' असं सांगणाऱ्या शिंदे यांनी 'येत्या विधानसभा निवडणुकीत आम्ही २०० जागा जिंकू, असं जाहीर केलं. या '२०० जागा भाजपसहित' असं त्यांना म्हणायचं असावं. पण समजा, जेव्हा केव्हा विधानसभेच्या निवडणुका होतील आणि शिंदे यांचा गट 'भाजप' सोबत निवडणुकीला सामोरा जाईल; तेव्हा ते 'आमचीच खरी शिवसेना' म्हणतात त्या पक्षाला 'भाजप' विधानसभेच्या १३५ जागा सोडणार आहे का? या प्रश्नाचं उत्तर जसजशा निवडणुका येतील, तेव्हा 'नाही, नाही आणि नाही,' असंच येणार आहे. मध्यंतरी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी केवळ ५० जागा मिळतील असं जाहीर केल्यानंतर गोंधळ उडाला होता. नंतर सारवासारव केली गेली. पण नुकतंच राज्यातल्या ४८ लोकसभेच्या जागा आणि विधानसभेच्या २८८ जागांवर भाजपनं आपले नेते नेमले आहेत. जवळपास तेच सारे भाजपचे उमेदवार असतील असं सांगितलं गेलंय. एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे ज्या कल्याण लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात, तिथंच 'भाजप'नं बैठकांचं सत्र सुरू केलंय. मुंबई महापालिकेची निवडणूक लढताना त्यांच्या खऱ्या शिवसेनेला युतीत निम्म्या जागा मिळणार आहेत का? या प्रश्नाचं उत्तरही 'नाही' असंच आहे. कारण, 'शिंदे गट' आणि 'मनसे' यांनी युती करावी, असा बूट निघालाय. शिंदे गट जर 'मनसे' बरोबर गेला तर बाळासाहेबांना क्लेश देणारी 'शिवसेना' खरी कशी? त्यामुळं शिंदे यांची वैधता किती काळाची आणि कोणत्या दर्जाची, असा प्रश्न निर्माण होणं साहजिक आहे. येत्या पंधरवड्यात त्यांच्या 'खऱ्या शिवसेना'चा अर्थात 'शिंदे गट, भाजप आणि मनसे' यांचा एकत्रित 'बैठक' होण्याची शक्यता आहे. त्याला सत्ता असल्यानं महत्व असेल. प्रोटोकॉल नुसार, शिंदे मुख्यमंत्री असल्यानं त्यांच्याच पुढाकारानं ही बैठक असेल. पण ते प्रतिशिवसेनाप्रमुख'च्या भूमिकेत असणाऱ्या राज ठाकरे यांना रुचतील आणि पटतील का? अर्थातच राज ठाकरे हे असं व्यक्तिमत्त्व आहे की त्यांना जे पटेल आणि रुचेल तेच ते बोलतात, करतात. 'शिवसेना' फुटली याचा ते जरूर लाभ घेतील. पण म्हणून ते मुख्यमंत्रीपदी कोण आहे आणि उपमुख्यमंत्रीपदी कोण आहे, ह्याकडं दुर्लक्ष करून 'ठाकरे' नावाच्या स्वतंत्र आयडेंटिटीचं विघटन होऊ देतील, असं वाटत नाही. मग शिंदे यांची उपुक्ततता काय, असा प्रश्न विद्यमान परिस्थितीत पडतो. त्याचं उत्तर 'भाजप'नं अगोदरच धुंडाळून ठेवलंय. त्यांना 'शिवसेना' कमजोर करायची होती. तसा प्रयत्न त्यांनी सत्तेच्या समीकरणात करून दाखविलाय. वरवर संघटनाही कमजोर केलीय. पण ते करून त्यांना साध्याकडं जायचंय. म्हणजे काहीही करून देशाची सत्ता परत मिळवायचीय. 'भाजप'ला केंद्रात सत्ता देण्यात गेल्यावेळी महाराष्ट्र राज्याचा वाटा मोठ्ठा होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत 'भाजप-शिवसेना युती' चे ४२ खासदार निवडून आले होते. त्यात 'भाजप'चे २३ खासदार होते. तोच आकडा २०२४ मध्ये गाठणं शक्य नसलं तरी जास्तीत जास्त जागा जिंकायच्या आहेत. शिंदे गटात राज्यातले बारा खासदार आहेत. त्यांना पुन्हा निवडून आणण, हे त्यांचं उद्दिष्ट आहे. त्यासाठी त्यांना आज शिंदे महत्त्वाचे आहेत, त्यासाठी राज ठाकरेही महत्त्वाचे आहेत. 'शिंदे-फडणवीस सरकार'च्या वैधतेचा सुप्रीम कोर्टात निकाल लागलाय, ते पडेल कधी हे लवकरच कळेल. तोपर्यंत 'भाजप'ला शिंदे हवेत. मुंबई महापालिका मिळविण्याच्या प्रयत्नातही शिंदे 'भाजप'ला हवेत. शिवसेनेला रस्त्यावरच्या लढाईत व्यग्र ठेवून उद्धव ठाकरे यांचा शक्तिपात करण्यासाठीही 'भाजप'ला शिंदे हवेत. 'शिवसेना'चे 'धनुष्यबाण' हिसकावून घेतलं त्यासाठी 'भाजप'ला शिंदे हवेत. थोडक्यात, 'भाजप'ला शिंदे त्यांच्या कथित खऱ्या शिवसेनेसोबत दीर्घ काळासाठी उपयोगाचे नाहीत, हे 'रा. स्व. संघ-भाजप' च्या 'थिंक टँक'ला माहीत आहेत. त्यांना शिंदेंचा उपयोग २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी करून घ्यायचाय. मध्यंतरी शिंदे गटाशिवायसुद्धा आम्ही 'अपक्ष आणि भाजप' असं सरकार बनवू शकतो, असा दावा माजी मंत्री बच्चू कडू यांनी केला होता. त्यावरून शिंदे यांची 'वैधता' किती, या प्रश्नाचं उत्तर मिळतं. शिवाय अजित पवार आणि राष्ट्रवादीचा पर्याय भाजपकडं होता. पण ते सारं फिसकटलं. केवळ एक आमदार असणाऱ्या राज ठाकरे यांच्या घरी 'भाजप' नेत्यांच्या वाढत्या येरझारा शिंदेंच्या 'वैधते'च्या शंकेवर शिक्कामोर्तब करतं. उजव्या विचारसरणीच्या सत्तेत असणाऱ्या ज्यांनी ज्यांनी बंड केलं, त्या शंकरसिंह वाघेला, कल्याणसिंह, येडीयुरप्पा, उमा भारती यांचं पुढं काय झालं, ते आठवा. त्यांना त्याच प्रवाहात समाविष्ट व्हावं लागलं किंवा केशुभाई पटेल व्हावं लागलं. शिंदे यांचं काय होणार, हे सर्वोच्च न्यायालयानं ठरवंलच आहे! पण आजच्या घडीला एकनाथ शिंदे यांचा 'संघ-भाजप'ला काय उपयोग आहे आणि भावी काळात त्यांचं काय स्थान असणार आहे, हे स्पष्ट झालंय. हे शिंदे आणि त्यांच्या ४० आमदारांच्या लक्षात येईल तेव्हा येईल! तोपर्यंत चालू द्या दहीहंडी, अख्खे दहा दिवस गणपती दर्शन, प्रभादेवीसारखे राडे, बंडाचं उदात्तीकरण करणारी भाषणे! या सगळ्यात जर उद्धव ठाकरे यांना दिवसेंदिवस लोकांची सहानुभूती वाढत चालली तर शिंदे यांच्या 'वैधते'ची मर्यादा अगदी अलीकडंही येऊ शकते.
हरीश केंची,
९४२२३१०६०९
उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ अगोदर घेतली ? का देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेचे अंधारात आघाडीचा धर्म सोडून शिवसेनेला अगदी एकनाथ शिंदे सहीत सर्वानाच आश्चर्याचा धक्का उर्फ टांग लावून मुख्यमंत्रीपदाची शपथ अगोदर घेतली ? मग निश्चित समजेल की नक्की गद्दारी कोणी केली ? ठाकरेंनी खाल्लं तर शेण आणी फडणीसांनी खाल्लं तर श्रावणी !!! ऐसा कैसा चलेगा देवा ! १९८० साली भाजपाची स्थापना झाली त्या वर्षी विधानसभेचे निवडणूकीत बाळासाहेब ठाकरे यांनी केवळ काँग्रेसला पाठिंबाच दिला नव्हता तर काँग्रेस चे उमेदवारांचा प्रचारही केला होता पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघात काँग्रेस चे उमेदवार श्रीधर माडगूळकर यांचे कोथरूड येथील जाहीर सभेत आदरणीय बाळासाहेब ठाकरे प्रमुख वक्ते होते मी त्याचा साक्षीदार आहे त्यावर्षी देवा तुम्ही फक्त दहाच वर्षे वयाचे होतात राजकारण समजण्याचे आणी कळण्याचे तुमचे वयही नव्हते गंगाधरपंतांना कारावास भोगावा लागला त्या आणीबाणीला बाळासाहेब ठाकरे यानी पाठींबा दिला होता तरीही सत्तेसाठी महाजन आणी मुंढे शिवसेनेबरोबर युती केली मा. प्रतिभाताई पाटील यांना काँग्रेस चे उमेदवार असूनदेखील राष्ट्रपती पदा साठी मराठी म्हणून शिवसेनेने मतदान केले आहे तुमचे बरोबर युती असतानाही ! राष्ट्रवादीकडून सुप्रियाताई सुळे राज्यसभेतील निवडणूकीत उमेदवार असतांना बाळासाहेब ठाकरे यांनी कौटुंबिक संबंधाला अधिक महत्त्व देऊन राष्ट्रवादीला पाठींबा दिला होता ! आपण २०१४ मध्ये मुख्यमंत्रीपद मिळवले तेंव्हांही शिवसेना तुमचे बरोबर नव्हती राष्ट्रवादी कॉंग्रेस ने बाहेरून पाठींबा दिला होता तेंव्हा तुमचे प्रखर हिंदुत्व कोणत्या बासनात गुंडाळून ठेवले होते आजचे तुमचे पाठिंब्यामुळेच झालेले मुख्यमंत्री तेंव्हा विरोधीपक्षनेते होते राजकारणात भाष्य करतांना गृहपाठ करून विधाने करावीत पब्लिक मेमरी एवढी पण कमजोर नसते देवा !!!

Saturday, 17 June 2023
सावरकर, गांधी आणि गोडसे.. !
"विदेशात गांधींच्या प्रतिमेपुढं झुकणारे नेते, देशात गांधी-नेहरुंची निर्भत्सना तर गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचा गौरव करतात. खासदार प्रज्ञासिंग, सुधांशु रॉय, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी गोडसेला भारताचा 'सुपुत्र' म्हटलंय. तर पुरीच्या शंकराचार्यांनी गोडसेला आदरार्थी संबोधलंय. मुंबईत यांच्याच वकीलानं गोडसेची तसबीर महापुरुषांसोबत ठेवून त्याला त्यांच्या रांगेत बसवलं. राष्ट्रपिता गांधींची हत्या करणाऱ्यांचं महिमामंडन सुरू असतानाच तिकडं केंद्र सरकारनं इतिहासाच्या नव्या पाठ्यपुस्तकातून मोगलांसोबत गांधींनाही हटवलंय. पण मोगलांशिवाय महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं गुणगान होणार तरी कसं? गांधींशिवाय भारत ही कल्पनाच आपण करू शकत नाही. इतिहास, स्वातंत्र्यलढा, संविधान, पुस्तकं गांधींशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. गांधींना हटवू पाहणारे स्वतः संपून जातील. मात्र जगभरातल्या लोकांच्या मनातल्या गांधींच्या प्रतिमेला कुठंच धक्का लागणार नाही!"
------------------------------------
*नु* कतंच एनसीआरटी या शैक्षणिक अभ्यासक्रम ठरवण्याच्या सरकारी मंडळानं इतिहास आणि राज्यशास्त्राचा जो नवा अभ्यासक्रम तयार केलाय त्यातून मोगलांचा इतिहास काढून टाकलाय; तसाच गांधीहत्येचा इतिहासही हटवलाय, मिटवलाय. त्याच्याविरोधात या मंडळावरील सदस्य सुहास पळशीकर, योगेंद्र यादव आणि इतर काहींनी आपलं नांव या पुस्तकांच्या श्रेयनामावलीतून काढून टाकावं असं नुकतंच कळवलंय. 'आम्ही जो अभ्यासक्रम तयार केला होता तो आता बदलला गेलाय त्यामुळं त्यात आमचं नांव असू नये!' असं त्यांचं म्हणणं आहे. यावर देशभरात चर्चा सुरू असताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातले एक मंत्री गिरीराज सिंह यांनी गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला 'भारताचा सुपुत्र' असं गौरवलंय. त्यावरून वादंग निर्माण झालाय. त्यांच्या राजीनाम्याची मागणी झालीय. पण मला वाटतं अशाप्रकारचं वक्तव्य करून त्यांनी मोदींच्या 'गुडफेथ'मध्ये खास मर्जीत जाण्याचा प्रयत्न केलाय. मोदींच्या दृष्टीमध्ये ते आणखी वरच्या पातळीवर गेले आहेत. यांच्याशिवाय यापुर्वी अनेकांनी गांधींची निर्भत्सना आणि गोडसेचं कौतुक केलंय. भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंग खरं तर त्यांना साध्वी म्हणणं उचित होणार नाही. त्या, गिरीराज सिंह, सुधांशु त्रिवेदी, पुरी पीठाधिश्वर शंकराचार्य निश्चलयानंद सरस्वती यांनीही गोडसेचं वाखाणणी केलीय. शंकराचार्यांनी म्हटलंय की, 'गोडसे व्यथित होते...!' त्यांनी गोडसेला होता असं म्हटलं नाही तर 'होते' असं आदरार्थी संबोधलंय, या अत्यंत सन्मानजनक संबोधनाबरोबरच त्यांनी म्हटलंय की, 'गोडसे हे व्यथित होते, त्यांच्यामते गांधी जिवंत राहणं हे देशासाठी घातक ठरलं असतं म्हणून त्यांनी गांधींना संपवलं...! शंकराचार्य यांच्यासारख्या धर्मपीठावरचे लोक एका खुन्याची, हत्याऱ्याची बाजू घेताहेत. त्याबाबत असाही तर्क देताहेत की, ते खूप व्यथित होते म्हणून त्यांनी हत्या केली गेली. नुकतंच मुंबईत सदावर्ते नामक वकीलानं जो स्वतःला एसटी कामगारांचा नेता म्हणवतो, त्यानं महापुरुषांच्या शेजारी गोडसेची तसबीर लावून त्याची पूजा केली होती. त्यावेळी त्यानंही गांधींवर, त्यांच्या विचारांवर टीका केलीय. थोडंसं मागं वळून पाहिलं तर लक्षांत येईल की, संघ परिवार, त्यांच्याशी संबंधित विविध संस्था, लोक, सत्ताधारी, पदाधिकारी त्यांचं सोशल मीडिया अकौंटन्स, त्यांचा आयटी सेल, त्यांचं व्हाट्सएप विश्वविद्यालय हे सारे सतत विविध माध्यमातून असं बिंबवण्याचा प्रयत्न करतात की, गोडसेला वाटत होतं, गांधीजी हेच देशाच्या फाळणीला जबाबदार आहेत; म्हणून त्यानं गांधींची हत्या केली. पण ते हे विसरतात की, गोडसे ज्याचा शिष्य होता, त्या सावरकरांनीच द्विराष्ट्रवादाची संकल्पना सर्वप्रथम मांडली होती. १९३७ मध्ये हिंदू महासभेच्या अहमदाबाद इथल्या राष्ट्रीय अधिवेशनात याबाबतचा प्रस्ताव संमत केला होता. त्यावेळी सावरकरांनी म्हटलं होतं की, 'भारतात दोन राष्ट्रं राहतात. हिंदू आणि मुस्लिम! ते दोघे कधीच एकत्र राहू शकत नाहीत!' त्याही आधी १९२३ मध्ये आपल्या 'हिंदुत्व' या पुस्तकात सावरकरांनी हेच म्हटलं होतं. त्यानंतर १९३८ ला हिंदू महासभेच्या नागपूर अधिवेशनात पुन्हा हेच प्रतिपादन करण्यात आलं. जेव्हा देश स्वातंत्र्यासाठीचा लढा देत होता, तेव्हा महात्मा गांधी लोकांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभागी व्हावं यासाठी आवाहन करत होते. त्याचवेळी सावरकर, जे गोडसेचे आदर्श होते, ते सावरकर हिंदू युवकांना १९४१-४२ मध्ये सैन्यात भरती होण्याचं आवाहन करत होते. 'एक मिनिटही वाया न घालवता तरुणांनी ब्रिटिश सेनेत भरती व्हायला हवंय...!' हे सावरकरांचे शब्द आहेत. इंग्रजांना मदत करण्यासाठी सावरकरांनी देशभर एक अभियान चालवलं होतं. त्यांनी ठिकठिकाणी 'सैन्य परिषद' भरवली होती,
१९२५ साली स्थापन झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं, तसंच हिंदू महासभेचं स्वातंत्र्य लढ्यात काहीही योगदान नाहीये. सावरकर अंदमानातून परतल्यानंतर एक साधा दगड देखील ब्रिटिशांच्या दिशेनं भिरकवलेला नाही. कोणत्याही इंग्रजावर त्यांनी कसलंही आक्रमण केलेलं नाही. ब्रिटिशाविरोधात कोणतंही आंदोलन उभं केलेलं नाही. गोडसेनं गांधींची हत्या करताना फाळणीला गांधींना जबाबदार धरून केली, असं म्हटलंय; मग त्या फाळणीला उत्तरदायी असलेल्या बॅरिस्टर जीनांची हत्या गोडसेनं का नाही केली? त्यांच्यावर गोळ्या का झाडल्या नाहीत? संघ परिवार हा असा प्रश्न कधी विचारत नाही. गोडसेनं त्या गांधींवर गोळ्या झाडल्या जे हिंदू-मुस्लिम एकतेचे पुरस्कर्ते होते. जे भारतातल्या आणि पाकिस्तानातल्या दोन्ही देशातल्या अल्पसंख्याकांच्या पाठीशी उभे होते. पाकिस्तानात हिंदू अल्पसंख्याक होते, तिथं त्यांच्यावर अत्याचार होत होते म्हणून त्यांच्या बाजूनं गांधी उभे होते. तर भारतात मुस्लिमांवर अन्याय होत होता, म्हणून गांधी त्यांच्या बाजूनं उभे होते. संघ परिवार, कालांतरानं राजकीय पक्ष म्हणून पुढं आलेल्या जनसंघ, जनता पार्टी, भारतीय जनता पार्टी, हिंदू महासभा, विश्व हिंदू परिषद आणि संघाशी संबंधित इतर संस्था-संघटना या सर्वांची हीच मोठी अडचण आहे की, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातला यांच्याकडं आपला कुणी असा नेता, नायक नाहीये. म्हणून सरदार वल्लभभाई पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस वा गांधी या महानायकांवर आपला शिक्का उमटवू पाहात आहेत. गांधींच्या प्रतिमेसमोर ३० जानेवारी आणि २ ऑक्टोबरला प्रधानमंत्री ९० अंशात झुकून गांधींना प्रणाम करतात. हिरोशिमात गेले तेव्हा मानवतेच्या इतिहासात, सर्वाधिक संहाराचं स्मारक असलेल्या हिरोशिमात अहिंसेचे पुजारी असलेल्या गांधींच्या पुतळ्याचं अनावरण तिथं प्रधानमंत्री मोदी करतात. परतल्यानंतर मात्र त्यांचं तंत्र गांधींच्या हत्याऱ्याच्या बाजूचं असतं, गांधींच्या विचारांची हत्या करण्याऱ्याच्या पाठीशी असतं. त्यांचा सारा समुदाय, त्यांच्या विचारांशी निगडित असलेला भक्तगण गांधींच्या प्रतिमेची, विचारांची हत्या करतोय. यावर मात्र ते मौन बाळगून असतात.
लेखक पी.सी.जैन यांनी एक पुस्तक प्रसिद्ध केलंय. त्यात त्यांनी जगातल्या ज्या ज्या देशानं गांधींच्या जीवनावर आधारित पोस्टाची तिकिटं, स्टॅम्पस, नाणी प्रसिद्ध केलीत, अशा सर्व देशांची नावं, ते स्टॅम्पस, ती तिकिटं, त्या नाणी त्या पुस्तकात आहेत. त्यात अशा देशांची नावं आहेत की, ज्यांची नावं आपण कधी ऐकलेली नाहीत. अगदी छोट्या छोट्या सीआरा, लेओन या सारख्या देशांनी आपल्या राष्ट्रपित्यावर हे स्टॅम्पस, पोस्टाची तिकिटं, नाणी जारी केली आहेत. गांधींचा विचार तिथपर्यंत पोहोचलाय. गांधी तर उभे ठाकलेत लंडनमध्ये थेट ब्रिटिश संसदेसमोर! मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअर हे ९ वी, १०वी शिकत असताना त्यांनी गांधींवर निबंध लिहीत होते. त्यांनी जेव्हा वंशवादाच्या विरोधात पदयात्रा काढली, त्यावेळी त्यांचा आदर्श गांधी हेच होते. अशा गांधींना आपली ही मंडळी मिटवू पाहत असतील तर लक्षांत ठेवा, गांधींना संपवणारे ते सारे स्वतः संपतील पण गांधींचं नांव मात्र अमर राहील, त्याला कुणीच, कुठलीही सत्ता धक्का लावू शकणार नाही!
मुझफ्फर रझमी यांचा हा शेर आहे,
इस राज को क्या जाने, साहिल की तमाशाई
हम डूब के समझे हैं, दरीयां तेरी गेहराई
ये जब्र भी देखा हैं, तारिख की नजरोंने
लम्हो ने खता की थी, सदीयो ने सजा पाई ll
ही जी 'साहिल की तमाशाई' आहे ना, ही स्वातंत्र्यलढ्यातही साहिलवर - काठांवर बसलेली होती. म्हणून त्यांना 'दरीयो की गेहराई' माहीत नाही. यांना ना स्वातंत्र्यलढ्यातला संघर्ष माहीत आहे, ना गांधींचं योगदान माहीतीये! यांचा संपूर्ण इतिहास खऱ्या महानायकांना नाकारण्याचाच आहे. जेव्हा देश आपल्या स्वातंत्र्यासाठी लढत होता तेव्हा ही मंडळी इंग्रजांच्या बाजूनं उभे होते. देश स्वतंत्र झाला अन गांधींची हत्या केली गेली. आजही गांधींच्या विचारांची हत्या करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. ३० जानेवारी आणि २ ऑक्टोबर हे मात्र त्याला अपवाद आहेत. कोण आहेत ते लोक जे त्यादिवशी 'नथुराम गोडसे अमर रहे!' असा ट्रेंड ट्विटरवर चालवतात. त्यांचे ट्विटर हँडल, फेसबुक पेज प्रोफाइल पाहिलं तर लक्षांत येईल की, ही सारी मंडळी एकाच विचारधारेशी, विचारसमूहाशी जोडलेले दिसतील. जे या देशाला हिंदुराष्ट्र बनवू पाहताहेत. गांधी त्यावेळीही आणि आताही त्यांच्या त्या स्वप्नांच्या आड उभे आहेत. त्यांनी ना त्यावेळेला त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ दिलं नाही ना आज होऊ देत नाहीत. त्यांचं अडचण हीच आहे की, त्यांच्याकडं लोकमान्य नेतृत्व, आदर्श नाहीत. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहास लिहिला जातो तेव्हा यांचा कुणी महानायक यात असत नाही. स्वातंत्र्यानंतर राष्ट्रनिर्माणाच्या ७० वर्षाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा १९४७ पासून पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहाद्दूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरसिंहराव, मनमोहनसिंग एवढंच नाही तर त्यांच्या आपल्या विचारधारेच्या अटलबिहारी वाजपेयींचं नांवही इतिहासातून काढून टाकतील. पण जेव्हा ह्या कालखंडाचा इतिहास लिहायला लागेल तेव्हा गांधींच्या रूपातले नेहरू जे १७ वर्षे प्रधानमंत्री होते. सर्वसमावेशक विचारांचे अटलबिहारी वाजपेयी यांचाही इतिहास पुसला जातोय. मुलांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमातल्या इतिहासात येणाऱ्या पिढीला बरबाद करण्यासाठी पाठ्यक्रम बदलला जातोय. त्यातून गांधींना हद्दपार केलं जातंय. मिटवलं का जातंय तर, गांधी हे हिंदू-मुस्लिम एकतेचे आग्रही होते. त्यामुळं कट्टरपंथीयांनी गांधींची हत्या केली. यांना हे पुसून टाकायचं आहे, कारण यांना हिंदू-मुस्लिम एकता नकोय. मग पुस्तकातून हे का लिहायला हवंय की, गांधी हिंदू-मुस्लिम एकतेचे आग्रही होते. दुसरा उल्लेख काढून टाकण्यात आलाय की, गांधींच्या हत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली होती. या सत्यतेला तुम्ही जगातल्या कोणकोणत्या पुस्तकातून हटवणार आहात? आज सोशल मीडियाच्या, इंटरनेटच्या जमान्यात हे तुम्ही कुठे कुठे इरेज करणार, डिलीट करणार? ही सत्यता कशी हटवाल? गोडसे हा पुण्यातला एक ब्राह्मण होता हे हटवलं गेलंय. कारण यामागे ब्राह्मणवादी विचारसरणी आहे, हिंदुराष्ट्राचं मूळ केवळ जोशी, कुलकर्णी, शर्मा, पाठक, तिवारी नाही तर ब्राह्मणवादी व्यवस्थेतून हे प्रेरित झालेलं आहे. जो मार्ग मनुवादाकडं घेऊन जातो. मनुस्मृतीवादी व्यवस्थेला लागू करतो. संघाचा मूळ विचार जो होता त्यात त्यांनी संविधानाला स्वीकारलं नव्हतं. राष्ट्रध्वज तिरंग्याला स्वीकारलं नव्हतं. त्यामुळं त्यांनी स्वातंत्र्यदिनी, प्रजासत्ताकदिनी राष्ट्रध्वज फडकवण्याचा प्रयत्न केला नव्हता. याबाबतचे सारे पुरावे लिखित स्वरूपात उपलब्ध आहे.
गांधीहत्येसंदर्भात गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांचं पुस्तक एक आहे 'लेटस किल गांधी', 'गांधीहत्या षडयंत्र और हत्यारे'! सत्ताधारी नेतेमंडळी ज्या व्यक्तीची गांधींच्या जागी प्रस्थापित करू इच्छितात ते आहेत विनायक दामोदर सावरकर! आपणच 'मराठा' या टोपण नावानं लिहिलेल्या पुस्तकात त्यांनी स्वतःला 'वीर' असं संबोधलंय. तुषार गांधीं त्यांच्या त्या पुस्तकातल्या पान क्र. ६५ वर लिहितात, 'मुंबईत दादर भागात हिंदू महासभेचे सर्वोच्च नेते विनायक दामोदर सावरकर यांचं घर होतं. ही व्यक्ती जिनं आपल्या कार्यकर्त्यांमध्ये गांधींविषयी घृणा भरवली होती. गांधींची हत्या करण्याची, त्यांना मारण्याचे अनेक असफल प्रयत्न जे पुण्याचे ब्राह्मण आपटे-गोडसे गटानं केले होते, ते सारे सावरकर द्वारा समर्थन दिलेले होते...!' गांधींची हत्या ज्या पिस्तूलानं केली होती ते ग्वाल्हेरमधून पुरवलं गेलं होतं. असाही उल्लेख त्या पुस्तकात आहे. गोडसे गांधींची हत्या करण्यापूर्वी सावरकरांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेला होता. अशोककुमार पांडे यांचं पुस्तक आहे, 'उसने गांधीको क्यों मारा?' यात 'कपूर आयोग और सावरकर' असं एक प्रकरण आहे. त्यात पांडे म्हणतात, १४ जानेवारीला आपटे आणि गोडसे सावरकरांना भेटण्यासाठी सावरकरांच्या निवासस्थानी गेले होते. जेव्हा खटला सुरू होता, तेव्हा सावरकरांनी म्हटलंय, ते लिहितात, 'मी त्या दोघांना ओळखतो, कदाचित १४ जानेवारीला आपटे-गोडसे सावरकर सदन इथं आले असतील, पण ते मला भेटले नाहीत. तळमजल्यावर इतर कुणी राहत होते त्यांना भेटून ते गेले असावेत..!' कपूर आयोगाचा तो अहवाल गांधीहत्येचा खटला संपल्यानंतर, गोडसेला फाशी दिल्यानंतर प्रकाशित झाला होता. यात गांधीहत्येच्या संशयाची सुई सावरकरांकडं दाखविलीय. आपल्या देशातच नाही तर जगभरात विविध भाषेत गांधींवर लिहिलेली शेकडो नव्हे हजारो पुस्तकं आहेत. लुई फिशर, व्हिन्सेंट सीन, आणि इतरांनी गांधींची चरित्रे लिहिली आहेत. तुम्ही हे सारं कुठं आणि कसं मिटवणार आहात? प्रभू येशू ख्रिस्तानंतर जगात मानवतेच्या इतिहासात जर कुणावर सर्वाधिक लिहिलं गेलं असेल तर त्यांचं नांव आहे, मोहनदास करमचंद गांधी! गांधींची हत्या करणारे इंग्रज नव्हते. गांधींची हत्या करणारे आमचेच आपले होते. या स्वतंत्र भारताचा एक नागरिक होता, नथुराम गोडसे! त्यामुळं लॉर्ड माउंटबॅटन यांनी गांधीहत्येनंतर म्हटलं होतं, 'ब्रिटिशांची सत्ता असेपर्यंत हे असं घडलं नाही, त्या कलंकापासून आम्ही इंग्रज वाचलो. कारण गांधींची हत्या तुमच्याच भूमीत, तुमच्याच लोकांकडून, तुमच्याच राज्यात झालीय. कुणी इतकं कृतघ्न कसे काय होऊ शकतात की, आपल्या पितातुल्य मार्गदर्शकाची छाती गोळ्यांनी भेदून टाकतात. असं मानवभक्षी टोळ्यांमध्येही होत नाही...!' यावर आपण काय बोलणार? अशा गांधींना पाठ्यक्रमातून हटवण्याचा जर ते विचार करत असतील की, त्यात ते यशस्वी होतील हा त्यांचा गैरसमज आहे. गांधी विश्वमानव होते. ते जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात विसावलेले आहेत. एनसीआरटी चे प्रमुख, देशाचे प्रमुख जेव्हा जगात कुठं जातात तेव्हा तिथं गांधीजी काठी घेऊन शहराच्या प्रमुख चौकात अगदी लंडनच्या संसद भवनासमोरही उभे ठाकलेले त्यांना दिसतात. तिथं जाऊन ते चुकूनही सांगत नाहीत की, आम्ही गोळवलकरांच्या, हेडगेवारांच्या एवढंच नाही तर कधीच सांगत नाहीत की, ते सावरकरांच्या देशातून आलो आहोत. ते सांगतात आम्ही गांधींच्या देशातून आलोय. तिथं जाऊन गांधींच्या प्रतिमेपुढं ९० अंशात वाकून प्रणाम करतात आणि इथं येऊन पाठ्यपुस्तकातून गांधींचं नांव हटवू पाहतात! शेवटी एवढंच सांगतो की, जर्मन तत्वज्ञ डाशनिक हिगेल यांचं एक कोटेशन आहे की, 'इतिहासाची सर्वात मोठी शिकवण हीच आहे की, इतिहासातून कुणी काहीच शिकत नाही...!' संघ परिवार आणि सत्तेत बसलेले लोक इतिहासातून काहीच शिकू इच्छित नाहीत. मोगलांना हटवूनही भारताचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही मोगलांशिवाय महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचं गुणगान कसं करता येईल? हल्दीघाटीचा संग्राम कसा सांगाल? आपल्या गमिनीकाव्यानं मोगलांना पळताभुई थोडी केली होती, हे नव्या पिढीला कसं सांगाल? मोगलांशिवाय भारताचा इतिहास पूर्ण होऊ शकणार नाही. तर गांधींशिवाय भारताची कल्पनाच करू शकत नाही. इतिहासातच नाही तर, देशाचा स्वातंत्र्यलढा, संविधान, पुस्तकं गांधींशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. मी निश्चिन्त आहे की, गांधींना हटविण्याचा, मिटवण्याचा, पुसून टाकण्याचा प्रयत्न जे करताहेत ते स्वतः संपून जातील. मात्र गांधींच्या प्रतिमेला कुठं काहीच धक्का लागणार नाही, हे निश्चित!

ज्या बंदुकीनं गांधीना मारलं,त्याच बंदुकीनं गांधी करण्याचं
सनातनी समीकरण घेऊन, नथुराम फिरतोय भारतभर
कि जिथं, रक्ताच्या थारोळ्यात पडलेला
प्रत्येक गांधी मरतानाही पेरतोय, अहिंसेच तत्व
बंधुकधारी नथुरामच्या डोक्यात....!

Saturday, 10 June 2023
रेल्वे अपघाताचं रुदन.....!
"वंदेभारतचा बोलबाला करणाऱ्या रेल्वे प्रशासनाचा कारभार भोंगळ बनलाय. लाईफ लाईन असलेल्या रेल्वेतून दररोज २.५ कोटी लोक प्रवास करतात. १ लाख कि.मी.हून अधिक ट्रॅक, १८ हजारहून अधिक गाड्या, ८ हजाराहून अधिक स्टेशन्स आहेत. ट्रॅक, सिग्नलच्या देखभालीची अनास्था आहे. खिळखिळीत झालेल्या ट्रॅकवर ५०-६० वेगानं गाड्या धावू शकत नाहीत मग उगाचच बुलेट ट्रेनची स्वप्नं का दाखविली जाताहेत? इथं सेवकांच्या ३ लाखाहून अधिक जागा रिक्त आहेत. सुरक्षा कवचासाठी तरतुदीतला एक पैसाही खर्च झालेला नाही. तो इथं झाला असता तर दुर्घटना टळली असती. मीडिया मंत्री कसे तिथं लक्ष ठेवून आहेत, ते कसे राबताहेत हेच दाखवत होते. लोक आपल्या नातेवाईकांना शोधत होते, त्यांचं सामान अस्ताव्यस्त झालं होतं, रुग्णालयातलं जखमींचं कण्हणं हे त्यांना दिसतच नव्हतं. मंत्री वंदे मातरम, भारतमाता की जय घोषणा देताहेत. राष्ट्रवादाच्या आपलं मागे अपयश लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते. कोट्यवधी प्रवाशांच्या जीवांशी खेळणाऱ्या रेल्वे प्रशासनाला जाब कोण विचारणार? सामान्यांच्या जीवाला काहीच किंमत नाही का? सारंच रामभरोसे सुरू आहे.!"
---------------------------------------
*ओ* रिसातल्या बालासोरला रेल्वेचा एक विचित्र अपघात झालाय. दोन प्रवासी गाड्या अन एक मालगाडी अशा तीन गाड्यांची टक्कर झालीय. यात तीनशेहून अधिक प्रवासी मृत्युमुखी तर हजाराहून अधिक जखमी झालेत. रेल्वेमंत्र्यांनी गुन्हेगार सापडल्याचं सांगितलंय. प्रधानमंत्र्यानं जाहीर केलंय की, गुन्हेगारांची गय केली जाणार नाही. पण गुन्हेगार दुसरं तिसरं कुणीही नाही तर ते सरकारचं आहे. सरकारी धोरणं, सरकारचे निर्णय, सरकारचं दुर्लक्ष हेच या अपघातात कारणीभूत आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. एक नाही तर पाच पाच अहवाल रेल्वे सुरक्षा विभागानं सरकारला दिली असताना त्याकडं दुर्लक्ष केलं गेलं. अशावेळी सरकार जबाबदार नाही असं कसं म्हणता येईल. आज सांगितलं जातंय की, २८८ जण मृत्युमुखी पडलेत, पण तिथल्या लोकांच्या म्हणण्यानुसार त्याहून कितीतरी अधिक लोक गेले असावेत. जखमींची तर गणना सांगितली जातेय तीही कमी आहे. हा केवळ एक अपघातच नाही तर मानवीय संवेदनाचाही घात आहे! आता रेल्वे रुळावर आलीय. ज्याचे नातेवाईक गायब झालेत त्यांचा ते शोध घेताहेत. अपंगांची सेवासुश्रुषा सुरू आहे. जखमी इस्पितळात उपचार घेताहेत. दुर्घटनेला आठवडा उलटलाय, आता विचारायला हवंय की, एवढी भयानक दुर्घटना कशी घडली? का घडली? याला कोण जबाबदार आहेत? काही दिवसांपूर्वीपर्यंत रेल्वेचा डंका वाजवला जात होता. गुणगान गाईलं जात होतं. पहा, आता रेल्वेचा प्रवास किती सुखदायी, किती आनंददायी जाणार आहे. दररोज वंदेभारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला जात होता. सांगितलं जात होतं की देशात सर्वत्र ती धावेल. मॉडर्न, वर्ल्डक्लास ट्रॅव्हल करण्याची संधी आम भारतीयांना मिळेल! अशावेळी हा अपघात झालाय. या दुर्घटनेत तीन तीन गाड्या एकमेकांवर थडकल्यात. चेन्नईला जाणारी कोरोमंडल ट्रेन मेन लाईनवर धावत होती. लूप लाईनवर एक मालगाडी उभी होती. इंटरलॉकिंग सिस्टीम, ज्याला पॉईंट मशीन म्हटलं जातं जी रेल्वेचा मार्ग बदलते. त्यात बदल केला गेला. हा कुणी केला? कसा, कशासाठी आणि का केला? हे समोर यायला हवंय. ती लुपलाईनमध्ये निघून गेली. जेव्हा मालगाडी आणि कोरोमंडल एक्सप्रेसची टक्कर झाली, तर दुसऱ्या बाजूनं बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट ट्रेन येत होती. मग जे काही घडलं याचा आपल्याला अंदाज येईलच. एक ट्रेन मालगाडीला धडकली, त्याचे डबे मेनलाईनवर आले. त्यावर येणारी ट्रेन १० मिनिटांनं उशीरा धावत होती. ती आली अन घडला सारा विनाश...! आता प्रश्न उभा राहतो की, या विनाशाची जबाबदारी कुणाची? प्रधानमंत्री पोहोचले, रेल्वेमंत्र्यांनी तिथं खूप वेळ काढला. साऱ्या घटनांची माहिती घेतली, बचाव कार्याचीही पाहणी केली. खूप घाम गाळला. मीडियाशी बोलताना अश्रूही तरळले. 'भारतमाता की जय!' 'वंदे मातरम!' च्या घोषणाही त्यांनी दिल्या. पण ह्या साऱ्या दुर्घटनेनंतरच्या बाबी आहेत. पण ही दुर्घटना का घडली? ती रोखता आली नसती का? टाळता आली नसती का? देशात काही काळापासून एक चर्चा सुरू आहे 'सुरक्षा कवच...!' ट्रेन कोलायजन अव्हायडन सिस्टीम - सुरक्षा कवच यामुळं आपसात रेल्वे धडकणारच नाहीत. हे सांगितलं जात होतं. देशात एकूण जे १३ हजार २१५ इंजिनं आहेत ह्याच रेल्वेगाड्या चालवतात. त्यापैकी फक्त ६५ इंजिनांमध्ये हे सुरक्षा कवच लावलं गेलंय. बाकी इतर सारंकाही भविष्यकालीन स्वप्नं आहेत. सुरक्षा कवच लावलेलंच नाहीत. पण ट्रेन कोलायजन अव्हायडन सिस्टीमचं परीक्षण २०१२ मध्ये झालं होतं. हे युपीए सरकार असताना केलं होतं आणि २०१४ नंतर याचं नांव सुरक्षा कवच ठेवलं गेलं.
देशात १९ रेल्वे झोन आहेत. त्यातल्या १८ झोनमध्ये सुरक्षा कवच लावण्याची प्रक्रियाच सुरू झालेली नाही. हे आश्चर्यचकित करणारं आहे. २०१४ मध्ये गोरखधाम एक्स्प्रेसचा अपघात झाला होता. २०१८ मध्ये न्युफॅराक्काचाही अपघात झाला. रेल्वे सेफ्टी कमिशनर जे रेल्वे नाही तर विमान उड्डयन मंत्रालयाच्या अंतर्गत येतात. ते रेल्वे अपघातांची चौकशी करतात. त्यांनी रेल्वेच्या, प्रवाशांच्या सुरक्षेबाबत काही प्रश्न उभे केले होते. त्याची दखलच रेल्वेनं घेतलेली नाही. या बालासोर दुर्घटनेच्या आधी ९ फेब्रुवारी २०२३ ला साऊथ वेस्टर्न रेल्वेच्या प्रिन्सिपल चीफ ऑपरेशन मॅनेजर हरिशंकर वर्मा यांनी एक चार पानी पत्र रेल्वे खात्याला पाठवलं होतं. हे पत्र त्यांनी का लिहिलं तर, ८ फेब्रुवारीला संपर्क क्रांती एक्स्प्रेसला होस रोड स्टेशनवर एक दुर्घटना होता होता राहिली होती. तिथं ऑटोमॅटिक इंटरलिकिंग होतं त्यात गडबड झाली होती. त्या गाडीच्या चालकाच्या जेव्हा हे लक्षांत आलं की, तेव्हा आपल्याला या मार्गावरून जायचंच नाहीये मग हा मार्ग का खोलला गेलाय? म्हणून त्यानं स्वतःहून गाडी थांबवली. त्यामुळं दुर्घटना टळली. याची खबरबात हरिशंकर वर्मा यांनी उच्चतम अधिकाऱ्यांना, वरिष्ठांना दिली. त्यात ते लिहितात, व्यवस्थेत गंभीर त्रुटी आहेत, कमतरता आहेत.ऑटोमॅटिक इंटरलॉकिंग सिस्टीमकडं डोळेझाक केली जातेय. या इंटरलोकींग सिस्टीममध्ये छेडछाड तेव्हाच होईल जेव्हा कुणी त्या खोलीत जाईल जी कुलूपबंद असते. गाडी सुरू असताना ती उघडण्याची परवानगी नसते. असं सांगून त्यांनी यात काय कमतरता आहे याची भली मोठी यादी दिलीय, त्यावर तत्काळ पाऊल उचलण्याची गरज त्यांनी प्रतिपादली होती. करावयाच्या उपाययोजनांची नोंद त्यांनी त्या पत्रात केली होती. पण सरकार दरबारी त्याची दखलच घेतली गेली नाही. त्यावेळी सरकारमधले सारे निवडणुकांमध्ये मश्गुल होते. आता राजकीय द्वंद्व खेळले जातेय. रेल्वे सेफ्टी कमिशनर यांच्याकडं याची तांत्रिक चौकशी देण्याऐवजी ती सीबीआयकडं दिली गेलीय. यात षडयंत्र घडवल्याचा वास यायला लागलाय. चौकशीबाबत शंका उपस्थित झाल्यावर भाजपचे सुदेन्दू अधिकारी याबाबत असं म्हणतात की, ४ जूनला कुणाल घोष यांनी एक ट्विट केलं होतं की, दोन रेल्वे अधिकारी आपापसात बोलताहेत फोन टॅप केले जाताहेत, कोणाच्या इशाऱ्यावर हे होत होतं? हे टीएमसीनं घडवलंय. जर हे षडयंत्र रचलं गेलं असेलतर ही अधिक गंभीर बाब आहे. का हे केवळ राजकीय आरोप आहेत? कारण आता सरकारला विचारलं जातंय की, रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा का दिला नाहीये? अश्विनी वैष्णवजी, ही जबाबदारी कुणाची आहे? स्व. लालबहाद्दूर शास्त्री, नितीशकुमार, ममता बॅनर्जी यांनी यापूर्वी राजीनामे दिलेत. मोदींच्या सरकारात २०१६ ला सुरेश प्रभूंनीही राजीनामा दिला होता. पण ही जी राजकीय प्रतिद्वंद्वता आहे, ती आता पुढं येताना दिसतेय. निवडणुका डोक्यावर आहेत. ही दुर्घटना कशी घडली हे लोकांसमोर येईल का? यापूर्वीच्या अपघाताचा तपास एनआयएकडं सोपवलं होतं. त्याचा अहवाल न येताच तपास दप्तरात बंद केला गेलाय. बालासोर प्रकरणी काँग्रेसनं प्रारंभी मौन पाळलं होतं आता ते आरोपांच्या फैरी झाडताहेत. राहुल गांधी रेल्वेमंत्र्यांचा राजीनामा मागताहेत. तर माजी प्रधानमंत्री देवेगौडा म्हणतात, 'वैष्णव कमालीचं काम करताहेत, त्यांचा राजीनामा मागणं चुकीचं आहे!' सीबीआयच्या चौकशीवर थिअरी येताहेत. कर्मचाऱ्यांच्या बेपर्वाईनं सिग्नल लोकेशन बॉक्सचं नुकसान झालंय. जाणूनबुजून इंटरलॉकिंग सिस्टीमशी छेडछाड केली गेलीय. इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये टेक्निकल खराबी झाली. मग तपास का लागला नाही? सिस्टीम ऑफ चेक्स अँड बॅलन्सिंग नाहीये का? २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात ९ हजार ६०७ कोटी रुपयांची तरतूद रेल्वे रुळ टाकण्यासाठी केली होती. ती घटवून २०१९-२० मध्ये ७ हजार ४०७ एवढी कमी का केली? नवे रेल्वेमार्ग सुरू केल्या जाताहेत. पण ट्रॅक जुन्या असतील तर त्याचं काय हाल होतील? रेल्वे चिंतन शिबिरात प्रत्येक झोन प्रमुखाला बोलायला देण्याऐवजी एकाच झोन प्रमुखाला का बोलू दिलं? ह्या शिबीरात वंदेभारत ट्रेनवरच लक्ष्य केंद्रित केलं होतं. ईस्ट-वेस्ट रेल्वेत ट्रॅक परीक्षण का केलं नाही? राष्ट्रीय रेल संरक्षा कोषची फंडिंग ८९ टक्के कमी का झाली? जे या कोषसाठी २० हजार कोटींचा निधी द्यायचा होता तो का दिला नाही? रेल्वे विभागात ३ लाखाहून अधिक पदं रिक्त का आहेत? देशात सर्वाधिक नोकऱ्या देणारी रेल्वे ही एक संस्था आहे. एक बातमी अशीही येतेय की, त्या दुर्घटनाग्रस्त रेल्वेचा चालक १२ तासाहून अधिक काळ ड्युटीवर होता. हेही गैर आहे दररोज अडीच कोटी लोक दररोज रेल्वेतून प्रवास करताहेत, त्यांच्या जीवाची पर्वा सरकारला दिसत नाही.
दररोज रेल्वे रुळाची सुरक्षा करणाऱ्या, ज्यांना रेल्वेचे सैनिक मानलं जातं अशा गँगमनची मोठी कमतरता आहे. रेल्वे सुरक्षेसाठी महत्वाच्या अन जबाबदार असलेल्या स्टेशनमास्तरांना अधिक काम करावं लागतं. त्यांच्याकडून ओव्हरटाईम करून घेतला जातोय. आता त्यांची ड्युटी १२ तासांची केली जाणार आहे. त्यांना रेल्वेगाड्यांच्या कोणत्याही अनियमितता शोधण्यासाठी रुळांपासून गाडी निघून जाईपर्यंतच्या आवाजांचं निरीक्षण करावं लागतं. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार ३९ रेल्वे झोन आणि उत्पादन विभागात मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे. दळणवळण सहाय्यक, गुडस गार्ड, ज्युनिअर आणि सिनिअर टाईमकीपर, सिनिअर क्लार्क कम टायपिस्ट आणि स्टेशनमास्तर अशा १४ लाख ७५ हजार ६२३ या सी ग्रुपच्या नोकऱ्यांपैकी ३ लाख ११ हजाराहून अधिक पदं रिक्त आहेत. याशिवाय १८ हजार ८८१ राजपत्रित केडरच्या वरिष्ठांच्या पदांपैकी ३ हजार १८ पदं वेगवेगळ्या विभागात रिक्त आहेत. इंडियन एक्स्प्रेसनं २०२२ मध्ये कॅगचा अहवाल प्रसिद्ध केलाय त्यात म्हटलंय की, २००८ ते २०१९ दरम्यान २५ लाख कोटी खर्च करण्यात आलेत पण रेल्वेच्या वेळांमध्ये ०.१८ टक्के सुधारणा झालीय. तर गाड्यांच्या वेगात ०.६१ टक्के वाढ झालीय. लोकांची रेल्वेला प्रथम पसंती असते पण २०२२-२२ मध्ये २ कोटी ७० लाख लोक प्रतिक्षायादीत होते. आज वंदेभारतचा बोलबाला केला जातोय, पण आज एखाद्या गाडीचा वेग ताशी ५५ की.मी. असेल तर ती सुपरफास्ट ट्रेन समजली जातेय. दुर्घटनेच्या ४९ टक्के केसेसचा तपासच होत नाही. ३५० घटनांपैकी फक्त १८१ मध्ये ट्रॅक इंस्पेक्शन झालंय. २०१७ ते २०२१ दरम्यान २७५ दुर्घटनात ७५ टक्के या डिरेलमेंटनं झाल्यात तर २११ या सिग्नल फेल झाल्यानं झाल्यात. रेल्वेचे दोन रूप दिसताहेत जी रेल्वेचा बकालपणा दिसतोय. लोक लोंबकळत दाटीवाटीनं प्रवास करताहेत, दुसरीकडं वंदेभारत सारख्या गाड्यांचं कौतुक केलं जातंय. ट्रेन १८ या नावानं साकारलेल्या या ट्रेनचं नामकरण वंदेभारत केलं गेलंय. मोदी सरकारचं फोकस हाच होता की, स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात ७५ वंदेभारत ट्रेन धावायला हव्यात. मग कोच फॅक्टरीत ती तयार होवोत वा न होवोत. मग मार्ग कमी अंतराचा का असेना. सारं लक्ष त्यावर केंद्रित करण्याचे आदेश दिले जाते. या साऱ्या वंदेभारत ट्रेनना हिरवा झेंडा दाखवला तो रेल्वेमंत्र्यांनी नाही तर केवळ आणि केवळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी! त्याची जाहिरातही मोठ्याप्रमाणात केली जातेय. वंदेभारत बनवण्यासाठी सरकारला १२० कोटी रुपये लागतात. वेगानं धावणाऱ्या गाड्यांची गरज आहेच, पण आज अस्तित्वात असलेल्या मार्गावरील रूळ त्या क्षमतेचे आहेत का? जपानच्या रेल्वेशी स्पर्धा करतो पण तिथं रेल्वेला एक सेकंदाच्या उशीर होत नाही तर आपल्याकडं सारा आनंदीआनंद आहे. ज्या वेगाने वंदेभारत गाड्या सुरू केल्या आहेत त्या वेगानं सुरक्षा कवच कवच लावले गेले असते तर दुर्घटना टळल्या असत्या. त्याचं लॉन्चिंग केलं तेव्हा मोठ्या वलग्ना केल्या गेल्या. प्रत्येक वर्षी ४-५ हजार किलोमीटर अंतराच्या गाड्यांना सुरक्षा कवच लावले जातील. भारतात ६५ हजार किलोमीटर रेल्वे मार्ग आहे. कामाची गती पाहता याला कितीवर्षं लागतील ते सांगता येत नाही. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली गेलीय पण ती खर्ची पडलेली नाही. रेल्वेरुळांची अवस्था नाजूक बनलीय. तिला ५५-६० कि.मी. वेगाच्या धावणाऱ्या गाड्या सांभाळता येत नाहीत, मग सुपरफास्ट, बुलेट ट्रेनची स्वप्न दाखविणाऱ्याना काय म्हणावं? ऊन, पाऊस आणि थंडीत ह्या रुळांवर जे परिणाम होतात वा जिथं वेल्डिंग केलं जातं त्याचीही निगराणी होत नाही. त्याच्या दुरुस्तीकडं लक्षच दिलं जात नाही.
चौकट
अश्विनी वैष्णव हे मंत्री झाल्यापासून चर्चेत आहेत. त्यांनी आयआयटी कानपुर इथून एमटेक केलेलं आहे. इंजिनिअरिंगचे ते विद्यार्थी आहेत. त्यानंतर ते आयएएस उत्तीर्ण झाले. ओरिसा केडर स्वीकारल्यानंतर ते बालासोरचे कलेक्टर बनले. पण नोकरी करणं त्यांना फारसं आवडलं नसल्यानं ते शिक्षणासाठी अमेरिकेला गेले. अमेरिकेतून परतल्यानंतर जीई-जनरल इलेक्ट्रीकल्स या अमेरिकन कंपनीत एमडी-व्यवस्थापकीय संचालक बनले. त्यानंतर सीमेन्स कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट बनले. या दोन्ही कंपन्या लोकोमोटीव्हशी म्हणजेच रेल्वेशी निगडित होत्या, त्या रेल्वेच्या ठेकेदार आहेत. त्यामुळं त्यांना रेल्वेमंत्री बनवलं तेव्हा पक्षांतर्गत विरोध झाला. नोकरी सोडून ते गुजरातेत परतले. तिथं ते मोदींच्या संपर्कात आले. त्यापूर्वी ते दिल्लीत अटलजींच्या जवळ होते, २००४ मध्ये ते अटलजींचे स्वीय सहाय्यक होते. मोदी जेव्हा प्रधानमंत्री झाले तेव्हा त्यांनी वैष्णव यांना बोलावून घेतलं. त्यावेळी ते नोकरी करत होते. मोदींनी २०१९ ला त्यांना राज्यसभा सदस्य बनवलं. मोदींच्या अनेक कामात वैष्णव मदत करतात, सल्ला देतात. राजकीय बाबींसाठी जसे अमित शहा तसे प्रशासकीय, टेक्निकल बाबींसाठी मोदींना वैष्णव हवे असतात. वैष्णवांसाठी मोदींनी रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांचा बळी दिला. पीयूष गोयल यांच्याकडून रेल्वेखातं काढून घेतलं. वैष्णव यांना रेल्वेमंत्री बनवलं. शिवाय टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ही वजनदार खाती देण्यात आली. मोदींचे अत्यंत विश्वासू समजले जातात. कधी कधी तर ते अमित शहांनाही ओलांडून पुढं जातात. गुगल, फेसबुक, युट्युब, एपल यासारख्या कंपन्यांच्या संपर्कात ते असतात. सरकार, प्रशासन यांच्यात जेव्हा टेक्नॉलॉजीचा विषय येतो, तेव्हा वैष्णव यांचा शब्द हा अंतिम असतो. रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना मोदींचं अपघातस्थळी जाणं हे वैष्णव यांच्या पाठीशी आपण आहोत, हे दाखवणं आहे. त्यामुळं वैष्णव यांचा आत्मविश्वास वाढलाय. या दशकातला सर्वात मोठी दुर्घटना ज्यात ३०० हून अधिक मृत्युमुखी पडलेत, हजाराहून अधिक अपंग-जखमी झालेत. पक्षात वा सरकारमध्ये अशी कुणाचीही हिंमत नाही की, वैष्णवांविरोधात आवाज उठवतील. सुरेश प्रभू रेल्वेमंत्री असताना अपघात झाला त्यात कुणीही मृत्युमुखी पडले नाहीत तरीही प्रभूंचा राजीनामा मोदींनी घेतला होता. वैष्णव यांच्याजागी इतर कुणी असता तर त्याचा राजीनामा मोदींनी कधीच घेतला असता!

Sunday, 4 June 2023
लोकसभेचं विसर्जनं, मुदतपूर्व निवडणुका...!
"भाजपची सत्ता आल्यानंतर पक्षासाठी खस्ता खाल्लेल्या २३ तालेवार नेत्यांना मंत्री केलं होतं. त्यापैकी २१ मंत्र्यांना हळूहळू दूर करून खुज्यांना मंत्रिपदं दिली. जुन्यांपैकी केवळ नितीन गडकरी आणि राजनाथसिंह मंत्रिमंडळात उरलेत. सरकार आणि पक्ष दोन्हीवर मोदींचा कब्जा आहे. त्यामुळं पक्षात अस्वस्थता आहे. सत्यपाल मालिकांच्या माध्यमातून ती बाहेर पडलीय. मोदींनी हटवलेले नेते, मंत्री यांचा होणारा मोदींना पक्षांतर्गत विरोध, गुजरात वगळता इतरत्र झालेला पराभव, विरोधकांची होणारी एकजूट, राहुल गांधींची सदस्यता रद्द होणं, आपच्या विरोधात काढलेला अध्यादेश, मतदारांमधली नाराजी हे पाहता प्रधानमंत्री मोदी येत्या जून-जुलैत लोकसभा विसर्जित करून ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान मध्यावधी निवडणुका घेण्याच्या विचारात असून प्रशासनाला त्यांनी तसे आदेश दिल्याचे समजते. विधानसभा निवडणुकीत विरोधात, तर लोकसभेत मोदींच्या बाजूनं मतं मिळतात म्हणून मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगडसह महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकाही लोकसभेबरोबरच होतील. असा अंदाज व्यक्त होतोय.!"
---------------------------------------------------
*भा* रतीय जनता पक्षाच्या सत्तारोहणाला नऊ वर्षे पूर्ण झालीत. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी अद्याप एक वर्षाचा कालावधी शिल्लक आहे. परंतु जणुकाही निवडणुका येऊन ठेपल्या आहेत अशा अविर्भावात भाजपनं आपल्या कार्यकर्तृत्वाची महती गायला सुरुवात केलीय. देशभरात महाजनसंपर्क मोहिमा आखल्या गेल्या आहेत. जागोजागी मेळावे आयोजित केले आहेत. त्याचबरोबर निर्णयांचा सपाटा लावला आहे. नव्या संसद भवनाचं आणि त्या अनुषंगानं इतर कामं अद्याप व्हायची असतानाच त्याच्या उदघाटनाचा घाट घातला गेलाय. नियोजित वेळेनुसार आगामी वर्षाच्या एप्रिल-मे महिन्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका प्रस्तावित आहेत. त्यावेळी उन्हाळा असल्यानं मतदान कमी होण्याची शक्यता वर्तवली जातेय. खासकरून जिथं हिंदीभाषक मतदार मोठ्यासंख्येनं आहेत. या भागांत नेहमी 'मोदी मॅजिक' चालतं. २०१४ मध्ये उन्हाळा असतानाही उसळलेल्या राजकीय वातावरणात मतदानाची टक्केवारी तब्बल १० ते १२ टक्क्यानं वाढून ती ६० टक्क्यांहून अधिक झाली होती. २०१४ आणि २०१९ मधल्या एप्रिल-मे महिन्यांत मोदींच्या नशिबानं उन्हाळा तेवढा तापदायक नव्हता. त्यामुळं मतदार मतदानाला बाहेर पडले आणि मोठ्याप्रमाणात मतदान भाजपला झालं. पण आता ती रिस्क भाजप घेऊ इच्छित नाही. मतदानात उन्हाळ्याचा प्रकोप होऊ नये यासाठी लोकसभा भंग करून लोकसभेच्या मुदतपूर्व सार्वत्रिक निवडणुका ह्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात निवडणुका घेण्याचं ठरतेय. याकाळात ना जादा ऊन असतं ना थंडी, ना पाऊस असतो. पण लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका घेण्यासाठी केवळ हे एकमेव कारण आहे असं नाही. इतरही काही कारणं आहेत. सध्या देशातलं राजकीय वातावरण बदलत आहे. ते भाजपच्या विरोधात संघटित होतंय. झालेल्या सर्व निवडणुकांतून भाजपचा पराभव होत असल्यानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जरा चिंतीत आहेत. शिवाय नियोजित काळाप्रमाणे येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये तेलंगणा, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या राज्याच्या विधानसभा निवडणुका व्हायच्या आहेत. त्याची तयारी निवडणूक आयोगानं आणि सर्वच राजकीय पक्षांनी चालवलीय. या राज्यांच्या निवडणुकांसोबतच लोकसभेच्या निवडणुकाही घेतल्या जाव्यात, अशी चर्चा सरकारमध्ये असलेल्यांकडून सुरू असल्याचं राजकीय, प्रशासकीय पातळीवर बोललं जातंय. इतर राज्यांच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीसोबतच महाराष्ट्राच्याही पुढल्या वर्षी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका घेतल्या जातील असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळं केंद्र सरकारनं महाराष्ट्रातले काही निर्णय रोखून धरले आहेत. शिवाय इथल्या प्रत्येक मतदारसंघासाठी केंद्रातल्या मंत्र्यांकडं जबाबदारी सोपवली गेलीय. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर इथल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल असं सतत सांगितलं गेलं होतं, पण त्यालाही भाजपच्या वरिष्ठांनी हिरवा कंदील दाखवलेला नाही. त्यामुळं मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. त्यामागेही मध्यावधी निवडणुकांचा विचार असल्याचं दिसून आलंय. त्यामुळं प्रशासकीय पातळीवर निवडणुकीच्या कामांची लगबग वाढलीय. २८ मेला नव्या संसद भवनांचं उदघाटन विरोधकांच्या बहिष्कारात, सत्ताधाऱ्यांच्या जल्लोषात झालं. नेहमी जुलै महिन्यामध्ये संसदेचं मान्सून सत्र अधिवेशन होत असतं. त्यावेळी संसदेच्या दोन्ही सभागृहासमोर महामहिम राष्ट्रपतींचं अभिभाषण असत नाही. राष्ट्रपतींचं अभिभाषण हे वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात होत असतं. नव्या संसद भवनाचं उदघाटन संसदेच्या या मान्सून सत्राच्या प्रारंभी होऊ शकलं असतं आणि संसदेचं कामकाज सुरू झालं असतं, तेव्हा तिथं राष्ट्रपतीचं असणं आवश्यकही नव्हतं. तरीही संसद भवनाच्या उदघाटनाचा घाट घेतला गेलाय. आता अशी शक्यता व्यक्त केली जातेय की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संसदेच्या मान्सून सत्राच्या आधीच लोकसभा विसर्जित करतील. निवडणूक आयोगाच्या संवैधानिक तरतुदीनुसार लोकसभा विसर्जित केल्यानंतर सहा महिन्याच्या आत पुन्हा नव्यानं निवडणुका व्हायला हव्यात. समजा, येत्या २० जून दरम्यान लोकसभा विसर्जित केली गेली तर २० डिसेंबरपूर्वी नवी लोकसभा अस्तित्वात येऊन त्याची पहिली बैठक व्हायला हवी. तशा सरकारच्या हालचाली सुरू झाल्यात.
लोकसभा विसर्जित करण्याला दुसरा मुद्दा हा आहे की, सर्वोच्च न्यायालयानं दिल्लीतल्या राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या संदर्भात राज्यपालांचा अधिक्षेपाला विरोध करत दिल्ली राज्य सरकारकडं अधिकार बहाल केले होते. केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही दिल्लीच्या नायब राज्यपालांना ताकद देण्यासाठी एक अध्यादेश जारी करून ते अधिकार पुन्हा राज्यपालांकडं दिलाय. यावरून आम आदमी पक्षाचं दिल्लीतलं सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात वाद निर्माण झालाय. केंद्र सरकारच्या या अधिक्षेपाच्या विरोधात मुख्यमंत्री केजरीवाल यांनी देशभरातल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. मान्सून सत्रात या अध्यादेशाला कायद्याचं स्वरूप देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, त्याला विरोध करण्यासाठी केजरीवालांची ही जुळवाजुळव सुरू आहे. हा अध्यादेश जारी करण्याबरोबरच त्यासाठी जी वेळ भाजप सरकारनं साधलीय त्यातही एक झोल आहे. संविधानाच्या कलम १२३ मध्ये स्पष्ट म्हटलंय की, अध्यादेश तेव्हाच काढता येईल जेव्हा संसदेचं अधिवेशन बोलावता येत नाही. परंतु अशा अध्यादेशाचा कालावधी अधिकतम सहा महिन्यांचा असेल. त्याची मुदत दोनदा वाढवता येईल. पण त्याचाही अधिकतम अवधी सहा महिन्याचाच असेल. संविधानाच्या कलम १२३ मध्ये पुढं असंही म्हटलंय की, या दरम्यान संसदेचं अधिवेशन असेल तेव्हा त्याला कायद्याचं स्वरूप दिलं गेलं नाही तर जेव्हा अधिवेशनाची मुदत संपेल तेव्हा आपोआप तो अध्यादेश संपुष्टात येईल, त्याचा पुढे प्रभाव राहणार नाही. केंद्र सरकारनं अध्यादेश काढलाय अन मान्सून सत्रात म्हणजे येत्या दीड महिन्यात तो संमत होऊ शकत नाही. लोकसभेत आणि राज्यसभेत एक विरोध होईल. हे प्रधानमंत्र्यांना चांगलंच माहीत आहे. शिवाय लोकसभेत असलं तरी राज्यसभेत भाजपचं बहुमत नाही, तिथं त्याला मंजुरी मिळणार नाही. त्यामुळं दुसरं जर लोकसभाच विसर्जित केली तर अध्यादेश चर्चेसाठी संसदेत येणारच नाही. त्यामुळं 'ना बजेगा बाज ना बजेगी बासुरी...!' शिवाय नोव्हेंबरमध्ये या अध्यादेशाला आणखी मुदतवाढही ते देऊ शकतात.
आणखी एक महत्वाचा मुद्दा हा आहे की, देशभरातले भाजप विरोधक एकत्र येताहेत. हिंदीभाषक बिहारमधले नितीशकुमार यांनी त्यात पुढाकार घेतलाय. काँग्रेसच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. विरोधक संघटीत झाले अन एकास एक अशी निवडणूक झाली तर भाजपला लोकसभेत बहुमत मिळण्याची शक्यता कमी आहे; त्यामुळंही मोदी अस्वस्थ आहेत. देशात विरोधकांना एकजूट व्हायला वेळ मिळू नये यासाठीही लवकर निवडणूक घेणं गरजेचं आहे. एकीकडं एकापाठोपाठ एक राज्ये भाजपच्या हातातून जाताहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर, झारखंड हाती राहिला नाही, महाराष्ट्रात 'ना घरके रहे ना घाट के!' झालेत. हरियाणात मित्राच्या साथीनं सरकार आहे. हिमाचल आणि कर्नाटक ही राज्ये हातातून निसटलीत. बिहारात नितीशकुमारांनी साथसंगत सोडून भाजप विरोधात दंड ठोकलेत. दिल्लीतही आम आदमी पक्षानं भाजपचा पराभव करून महापालिकेतली सत्ता हिसकावून घेतलीय. आता मध्यप्रदेशातली सत्ता हातातून जाण्याची शक्यता निर्माण झालीय. कदाचित राजस्थान भाजपला मिळेलही. पण तिथली सत्ता हाती आली तरी भाजपला त्याचा तसा काहीच फायदा होणार नाही, कारण इथं भाजपची सत्ता नसतानाही इथल्या लोकसभेच्या सर्वच्या सर्व म्हणजे २५ च्या २५ जागा भाजपला मिळालेल्या आहेत. दुसरीकडं नितीशकुमारांनी सर्व विरोधकांची मोट बांधण्याची जबाबदारी आपल्या हाती घेतलीय. प्रधानमंत्र्यांना त्रासदायक ठरलेला बिहारला 'विशेष राजकीय दर्जा' देण्याचा मुद्दा त्यांनी उचललाय. हिंदीभाषक मतदारांमध्ये त्यांना पाठिंबा मिळेल अशी चिन्हे आहेत. उरलेल्या दलित मतांसाठी काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे सरसावलेत. राहुल गांधी महिला, विद्यार्थ्यांपासून बस-ट्रक चालकांपर्यंत पोहोचलेत. प्रशांत किशोर बिहारमध्ये पदयात्रा करताहेत. ते आता मोदींसाठी पुन्हा 'चाय पर चर्चा!' करतील असं काही नाही. एनडीएतून दुरावलेल्या अकाली दल सारख्या जुन्या मित्रपक्षांना गोंजारण्याचा भाजप प्रयत्न चालवलाय. विरोधकांचा बहिष्कार असतानाही संसद भवनाच्या उदघाटन समारंभाला उपस्थित राहिलेले ओरिसातला बिजू जनता दल, आंध्रप्रदेशातला वायएसआर हे भाजपसोबत येण्याची चिन्हे आहेत. तसा भाजप प्रयत्न करत आहे. भाजपमध्ये मोदींना पक्षांतर्गत विरोधाला सामोरं जावं लागतंय. सत्यपाल मालिकांनी पेटवलेल्या या आगीत अनेकजण हाती समिधा घेऊन सरसावले आहेत. मोदींनी केंद्रातल्याच नव्हे तर राज्यातल्या प्रस्थापित नेतृत्वाला बाजूला सारत आपल्या चेल्यांना जवळ केलं आहे, साहजिकच नाराजी मोदींनी ओढवून घेतलीय. केंद्रीय मंत्रिमंडळातून दूर सारलेले ज्येष्ठ नेते मंत्री यांच्याशिवाय गडकरी, राजनाथसिंहच नाही तर राजस्थानच्या वसुंधरा राजे, मध्यप्रदेशचे शिवराजसिंह, छत्तीसगडचे रमणसिंह, कर्नाटकचे यडीयुरप्पा, बिहारचे सुशील मोदी, यांच्यासारखे अनेक नेते, महाराष्ट्रातही पाहिलं तर भाजपच्या अभ्यासू, सुसंस्कृत आणि ज्येष्ठ प्रवक्त्या कांताताई नलावडे, तसंच अरुण साठे, रघुनाथ कुलकर्णी, मुकुंदराव कुलकर्णी ही मंडळी पूर्वीइतकी दिसत का नाहीत? जनसंघाच्या दिवसांपासून ज्यांनी पक्षासाठी खस्ता खाल्ल्या, ती आणि आणखीही बरीच मंडळी आज कुठे आहेत? कदाचित देवेंद्रजींचे लाडके प्रवीण दरेकर, श्रेष्ठींचे मनापासून लाड पुरवणारे प्रसाद लाड, कोकणभूमीचे एक महान सुपुत्र नितेश राणे यासारख्या तेजस्वी नेत्यांची प्रभावळ पक्षात निर्माण झाल्यामुळं, जुन्याजाणत्या ज्येष्ठ नेत्यांची पूर्वीइतकी गरज भासत नसेल का? असा प्रश्न भाजपबद्धल आस्था असणारे असंख्य लोक सध्या विचारत आहेत. पण भाजपच्या नेतृत्वाला याची गरज वाटत नाही त्यामुळं पक्षात नाराजी वाढतेय. ती रोखण्यासाठीही मुदतपूर्व निवडणुका हा त्यावरचा उपाय असल्याचं भाजपच्या नेत्यांना वाटतेय.
लोकसभा विसर्जित करण्यासाठीचा चौथा मुद्दा म्हणजे देशात काँग्रेसची वाढत असलेली ताकद. आज चार राज्यात काँग्रेस सत्तेवर आहे. काँग्रेसला मध्यप्रदेशात सत्ता जिंकण्याचे संकेत मिळताहेत. मध्यप्रदेशात पूर्वीही काँग्रेसनं सत्ता मिळवली होती, पण भाजपनं त्यात जोडतोड करून सत्ता हस्तगत केली. जर मध्यप्रदेश हातातून गेलं तर फक्त उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल आणि एफआयआर मास्टर आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिश्व शर्मा या तिघांच्या सहाय्यानं भाजपला केंद्रात सत्ता मिळेलच असं काही सांगता येत नाही. त्यामुळं लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणुका घेतल्या तर कदाचित मध्यप्रदेशचा किल्ला राखता येईल. तसंच छत्तीसगडमध्येही काहीसा प्रभाव पडू शकेल, आणि उरलंसुरलं काम ईडी, सीबीआय, आयटी ही आयुधं करतील. जर मध्यप्रदेश काँग्रेसनं जिंकलं आणि तिथं होत असलेल्या मागणीनुसार आदिवासी मुख्यमंत्री केला तर मात्र भाजपच्या हाती असलेलं द्रौपदी मुर्मु कार्डही इथं चालणार नाही. हरियाणा आणि पश्चिमी उत्तरप्रदेशातल्या खाप पंचायती ह्या दिल्लीत आंदोलन करणाऱ्या महिला पहिलवानाच्या पाठीशी एकत्रित झाल्यात. नुकतीच त्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतलीय. त्यामुळं तिथं निवडणूक जिंकणं अवघड जाईल. याशिवाय प्रधानमंत्री असा तर विचार करत नाहीत ना की, निवडणुकांना जेवढा उशीर होईल तेवढी परिस्थिती आणखी बिघडेल, विरोधातलं वातावरण आणखी चिघळेल. प्राप्य परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वांना आश्चर्यचकित करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे लोकसभाच विसर्जित करतील. विरोधकांना बेसावध ठेवून प्रधानमंत्री मोदींनी खेळलेल्या या चालीनं विरोधक हैराण होतील. नितीशकुमार बिहारमधल्या लोकसभेच्या निवडणुकांसाठी तयारीला लागतील. विरोधकांची एकजूट बांधण्याची त्यांची मोहीम काहीशी मंदावेल. शिवाय उन्हाळ्यात मतदानाची टक्केवारी घटण्याची भीतीही राहणार नाही. आगामी ३-४ आठवडे हे देशाच्या राजकारणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचे आहेत, या काळात काहीही घडू शकतं. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना गुजरातेत दंगली उसळल्यानंतर विधानसभा विसर्जित करून त्यांनी निवडणुका घेतल्या होत्या. हा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्यावेळी त्यांनी प्रचंड बहुमत मिळालं होतं. असे प्रयोग भारतात इतरत्र अनेकदा झालेत. एकदा तेलंगणातही असंच घडलं होतं. मुख्यमंत्री के.चंद्रशेखरराव यांनी अचानकपणे विधानसभा विसर्जित केली होती. आता हा असा प्रयोग प्रधानमंत्री मोदी लोकसभेसाठी घेऊ शकतात. त्यामुळं प्रधानमंत्र्यांना लोकसभा विसर्जित करून देशात मुदतपूर्व निवडणुका व्हाव्यात असं वाटतंय, कारण दिवसेंदिवस मोदींच्या विरोधात वातावरण तयार होऊ लागलंय. मोदींच्या विदेश दौऱ्याची प्रसिद्धी गोदी मीडियानं मोठ्याप्रमाणात केलीय, त्याचा एक वेगळा माहोल देशात तयार झालाय. अशा सकारात्मक वातावरणात प्रधानमंत्री लोकसभा विसर्जित करून निवडणुका घेण्याची शक्यता आहे. अटलबिहारी वाजपेयी यांनीही प्रमोद महाजन यांच्या 'इंडिया शायनिंग' म्हणण्यानुसार मुदतपूर्व निवडणुका घेतल्या होत्या, त्यात त्यांचा पराभव झाला, पुन्हा सत्ता आली नाही. आताही मुदतपूर्व निवडणुका घेतल्या तर इतिहासाची पुनरावृत्ती होईल ही शक्यता नाकारता येत नाही.
चौकट
मी कोणत्याही प्रकारच्या भविष्य-ज्योतिष त्यांनी वर्तवलेल्या भविष्याचा पुरस्कार करत नाही पण, लोक उत्सुकतेनं भविष्य पाहात असतात. त्यासाठी ज्योतिष्याच्या दृष्टीनं चाचपणी केली असता लोकसभा विसर्जित करण्याला आणि मुदतपूर्व निवडणुका घेण्याला दुजोरा मिळतोय. आजवर ज्यांची अनेक राजकीय भविष्यं खरी ठरलीत असे हरियानातले ख्यातनाम ज्योतिषी संजयजी चौधरी यांच्यामतेही लोकसभा मुदतपूर्व विसर्जित केली जाईल आणि मध्यावधी निवडणुका घेतल्या जातील! त्यांनी सांगितलं की, नवीन संवत २१ मार्चला सुरू झालं. तेव्हा नववर्षाचा आढावा घेतला असता त्यात असं स्पष्ट दिसून आलंय की, सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात मोठा संघर्ष होईल. त्यानुसार काँग्रेस, राहुल गांधींची सदस्यता, आप पक्षाच्या नेत्यांवर आरोप याशिवाय महिलांच्या छळवणूक याबाबी घडल्यात. त्यानंतर आता बुध बदललाय, चट्टाल योग आलाय, यात राजाची बुद्धी थोडी कुपीत होते. तरीही या दरम्यान खूपशा सोशल वेल्फेअर स्कीम्स केंद्र सरकारकडून लागू केल्या जातील. ज्यानं लोकांना दिलासा मिळेल. काहीं योजनांची स्वप्ने दाखविली जातील, काही म्हणजे पेट्रोल, गॅस याच्या किंमती कमी होऊ शकतात. मोदींनी ३० मे २०१९ ला ७ वाजून ४ मिनिटांनी शपथ घेतली होती. त्यानुसारही हे सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार नाही. २०२४ च्या निवडणुका या सहा महिने आधी होतील. लोकसभा भंग करून येत्या जून महिन्याच्या मध्यापासून जुलैच्या मध्यापर्यंतच्या काळात या मध्यावधी निवडणुका घोषित होतील. भाजपच्या स्थापनेच्या वेळेनुसार पाहिलं असता एप्रिल २०१८ मध्ये चंद्रमाची महादशा सुरू झालेली आहे. सध्या एप्रिल २०२२ पासून चंद्रमामध्ये शनी मार्गक्रमण करतोय. शनीत चंद्रमा किंवा चंद्रमात शनी आला तर विषयोग सुरू होतो. विषयोगात माणसाला अहंकार येतो, तो चुकीची विधानं करतो, त्याच्याकडून चुकीचे निर्णय घेतले जातात. ही दशा मार्च २०२४ पर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळं याकाळात भाजप चुकीचे निर्णय घेईल. भाजपची आणि सरकारची ग्रहदशा पहिली असता मुदतपूर्व निवडणूक होतील. लोकसभेचं मान्सून सत्र जुलैच्या मध्यात असतं, त्यापूर्वी लोकसभा भंग केली जाईल. कारण संसदेच्या अधिवेशनात मोठा गोंधळ होईल, ते टाळण्यासाठी लोकसभा विसर्जित केली जाईल. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणुका होतील. त्यावेळची ग्रहदशा पाहता भाजपपेक्षा काँग्रेस वरचढ राहील. असं असलं तरी, निवडणुका ज्यादिवशी जाहीर होतील त्यादिवशीची ग्रहदशा पाहून अधिक काही सांगता येईल, असं चौधरी यांनी स्पष्ट केलं आहे.

भूलोक गंधर्व...! एस.पी.बालसुब्रह्मण्यम
साथिया... तूने क्या किया.
वर्ष होतं सन २०००. अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन भारत दौऱ्यावर असताना सर्व क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांची ते भेट घेत होते. लता मंगेशकर यांची मोठ्या आदरानं क्लिंटन यांनी विचारपूस केली. लतादीदींच्या आवाजाची जादू जगभर पसरलेली होतीच, पण त्यासोबतच सर्वात जास्त गाणी गाणारी गायिका म्हणून क्लिंटन यांनी लतादीदींचं कौतुक केलं. मात्र लता मंगेशकरांनी क्लिंटन यांना थांबवत तिथं उपस्थित एका गायकाकडं हात करत सांगितलं. "माझ्यापेक्षा जास्त गाणी यांनी गायली आहेत....!" क्लिंटन यांनी त्या गायकाचा हात हातात घेतला. “तुम्ही किती गाणी गायली?" असं क्लिंटन यांनी विचारल्यावर त्या गायकानं स्मित हास्य करत उत्तर दिलं, "३५ हजार...!". क्लिंटन यांना आश्चर्य वाटलं त्यांनी विचारलं, "किती वर्षात?" त्यावर ते म्हणाले “३५ वर्षात...!” क्लिंटन यांनी या महान गायकासमोर अक्षरशः हात जोडले. ते गायक होते. श्रीपती पंडिताराध्युला बालसुब्रह्मण्यम...!
अर्थात ज्यांना इंडस्ट्रित प्रेमानं बाला, बालू किंवा एसपीबी म्हटलं जातं ते एस. पी. बालसुब्रह्मण्यम.
करीअरच्या ३५ वर्षांत ३५ हजार गाण्यांचं गणित आपल्यासारखी अडाणी माणसं पटकन करतात. मी पण हिशेब लावला. वर्षाला हजार गाणी. दिवसाला साधारण ३ गाणी रेकॉर्ड केली असं म्हणू या. फेब्रुवारी १९८१ मध्ये एस.पी. बालसुब्रह्मण्यम यांनी एकाच दिवशी बारा तासात तब्बल २१ गाणी रेकॉर्ड केली. विशेष म्हणजे या २१ गाण्यांपैकी त्यांनी एकाही गाण्याचा सराव केलेला नव्हता. पहिल्या किंवा फार तर दुसऱ्या टेकमध्ये गाण्याला संगीतकार "ओक्के" म्हणत गेले आणि १२ तासांत २१ गाणी रेकॉर्ड झाली. गाणं गाताना एकाग्रता आणि साधनेतून हे सहज होत गेल्याचं बालासर सांगायचे. एक काळ तर असा होता की बालासरांचं दररोज १५ ते २० गाणी रेकॉर्ड करण्याचं रुटिन झालं होतं. हिंदीमध्ये आनंद मिलिंद या संगीतकार जोडीसाठी त्यांनी सलग १६ गाणी रेकॉर्ड केली होती. एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांचा हा गायकीचा प्रवास आणि यश सोपं नव्हतं. त्यासाठी अनेक वर्षांची मेहनत, संघर्ष आणि कामाप्रती निष्ठा होती. मुळात बालसुब्रह्मण्यम यांना गायक वगैरे व्हायचंच नव्हतं.
एस.पी.बालसुब्रह्मण्यम यांचा जन्म ४ जून १९४६ रोजी आंध्रप्रदेशच्या नेल्लोरमध्ये झाला. बालांचे वडील हरीकथांचे म्हणजे आपल्याकडे कीर्तन म्हणतो तशाप्रकारचा कार्यक्रम करायचे. घरात नाटक, कलेचं वातावरण होतं पण आपल्या मुलानं इंजिनीअर किंवा डॉक्टर होऊन आर्थिक परिस्थिती बदलावी, अशी मध्यमवर्गीय इच्छा त्यांच्या वडीलांचीही होती. त्यामुळे बालसुब्रह्मण्यम यांनी अनंतपूरच्या इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मात्र आजारपणामुळं त्यांना शिक्षण सोडावं लागलं. घरची जबाबदारी असल्यानं त्यांनी चेन्नई-मद्रास मध्ये नोकरी पत्करली. एस.पी.बालसुब्रह्मण्यम यांचा आवाज छान होता. म्हणजे मित्र त्यांचं कौतूक करायचे म्हणून ते स्थानिक गायन स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे. पण त्याकडं करीअर म्हणून त्यांनी कधी पाहिलंच नव्हतं. वर्ष १९६४ मध्ये नशिबानं बालसुब्रह्मण्यम यांना एक संधी दिली. घडलं असं की, चेन्नई मद्रासमध्ये बाला ज्या रुममेटसोबत राहात होते. त्यानं बालांचं नाव मद्रासमध्ये होणाऱ्या एका गायन स्पर्धेसाठी परस्पर नोंदवून टाकलं. त्यासाठीचे दहा रुपयेही त्यानंच भरले. ही स्पर्धा खूप महत्वाची होती. कारण या स्पर्धेसाठी पी. नागेश्वरराव, तत्कालीन ख्यातकीर्त पार्श्वगायक संगीतकार घंटशाला आणि दक्षिणामूर्ती हे तेलुगू सिने इंडस्ट्रीतले दिग्गज संगीतकार जजेस म्हणून काम पाहणार होते. या स्पर्धेत एकतर नॉन फिल्मी गाणं गायचं होतं. शिवाय ते तुम्ही लिहून कंपोज केलेलं असावं, अशी अट होती. बालासरांनी आपलं गाणं सादर केलं आणि ते एका कोपऱ्यात जाऊन इतर मुलांचे परफॉर्मन्स बघत बसले. त्याच वेळी बालांजवळ एक व्यक्ती येऊन म्हणाली. "तू खूप छान गायलास. माझ्या पुढच्या सिनेमात तू गाणं गाशील का?"
बाला जरा गोंधळून म्हणाले. "अहो, मी तुम्हाला ओळखलं नाही. मला माफ करा, मी चित्रपटात वगैरे गाण्याचा कधी विचार केला नाहीये...!"
ती समोरची व्यक्ती म्हणाली. "माझं नाव एस.पी.कोदंडपाणी आहे, मी संगीत दिग्दर्शक आहे...!" बालसुब्रह्मण्यम यांनी कोदंडपाणी यांना विनयपूर्वक नकार दिला. "माफ करा मला, माझे वडील माझ्यासाठी खूप कष्ट घेत आहेत. मला इंजिनीअर होऊन त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे...!" असं सांगून बालसुब्रह्मण्यम निघून गेले. त्यांनी कोदंडपाणी यांना घरचा पत्ताही दिला नाही.
कोदंडपाणीही तेव्हा नवखेच होते. जवळपास वर्ष दीड वर्ष त्यांनी बालसुब्रह्मण्यम यांचा पाठपुरावा करून गाण्यासाठी तयार केलं. शेवटी बालसुब्रमण्यम तयार झाले. आयुष्यात कधीही सिनेमात गाण्याचं स्वप्न बालांनी पाहिलं नाही. मात्र काही स्वप्न तुमचा पाठलाग करत असतात, बालासरांच्या बाबतीत तेच घडलं होतं.
वर्ष १९६६. रेकॉर्डिंगचा दिवस ठरला. चित्रपट होता 'श्री श्री श्री मर्यादा रामण्णा'. प्रॉडक्शन हाऊसची गाडी बालांना घ्यायला येणार होती. पण ती काही आलीच नाही. शेवटी कंटाळून बालासरांनी सायकलवरून स्टुडिओ गाठला. त्यात चौकीदार त्यांना आत सोडेना. सायकलवरून धापा टाकत आलेला मुलगा "मी गायक आहे, आज माझ्या गाण्याचं रेकॉर्डिंग आहे...!" असं म्हणत असेल, तर त्यावर कोण विश्वास ठेवणार? चौकीदारानं बालसुब्रह्मण्यम यांना अक्षरशः हकललंच होतं. मात्र तेवढ्यात संगीतकार कोदंडपाणी आले आणि त्यांनी बालांना आत नेलं.
त्याकाळी लाईव्ह रेकॉर्डिंग असायचं. शेकडो वाद्यवृंद, संगीतकार, गायक आणि रेकॉर्डिंग करणारी टेक्निकल टीम, क्रू मेंबर्स असा दोन तीनशे जणांचा तामझाम असायचा. बालसुब्रह्मण्यम यांनी हे असं याआधी कधीच पाहिलं नव्हतं. शिवाय ते ज्यांच्यासोबत गाणार होते. त्या गायिका होत्या प्रसिद्ध पार्श्वगायिका पी. सुशिला. ज्यांचं तमिळ, तेलुगू फिल्म इंडस्ट्रीतल्या टॉपच्या गायिका म्हणून नाव होतं. त्यांच्यासोबत पहिलं गाणं गाण्याची संधी वयाच्या विसाव्या वर्षी एस.पी. बालसुब्रह्मण्यम यांना मिळाली. काय आश्चर्य पाहा! कसलेले गायकही जिथं एका गाण्यासाठी दिवसभर टेक वर टेक घेतात. तिथं बालसुब्रह्मण्यम यांनी गायलेल्या गाण्याचा पहिला टेक ओके झाला. इथूनच एस.पी.बालसुब्रह्मण्यम नावाच्या पर्वाचा सिने जगतातला श्रीगणेशा झाला.
बालांना आता अनेक सिनेमांच्या ऑफर्स येत होत्या. घरची जबाबदारी आणि गाणं असा संघर्ष करत असताना त्यांना वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी लग्न करावं लागलं. त्यांची प्रेमकहानी सिनेमातल्या कथांसारखीच रंजक आहे. मद्रासमध्ये बाला ज्यांच्याकडे पेईंग गेस्ट म्हणून राहायचे. त्या घरमालकाच्या मुलीसोबतच त्यांचे प्रेमसंबंध जुळले. बालांनी मुलीच्या वडिलांकडे लग्नासाठी रीतसर विचारणा केली. पण त्यावेळी जात समान असली तरी, त्यातही गोत्र वगैरे बघितलं जायचं. अपेक्षेप्रमाणे नकार आल्यावर बालसुब्रह्मण्यम यांनी पळून जाऊन लग्न केलं. मित्रांनी जमवलेल्या ५०० रुपयांत लग्न पार पडलं. त्यावेळी त्यांच्या पत्नीचा भाऊ बंगलोरमध्ये राहात होता. त्यांनी त्यांच्याकडं मुक्काम ठोकला. तीन चार महिन्यांत सगळ्यांचा राग शांत झाल्यावर ते परत आले. पण सगळं स्थिरस्थावर व्हायला दोन वर्ष गेली.
वर्ष १९६९, एस.पी.बालसुब्रह्मण्यम यांच्या आयुष्यात एक सुवर्णसंधी चालून आली. तमिळ सिनेमात ज्यांच्याशिवाय पानही हलत नव्हतं असे सुपरस्टार भारतरत्न एम.जी.रामचंद्रन आणि तमिळची लेडी सुपरस्टार जयललिता जे दोघेही कालांतरानं तमिळनाडूचे मुख्यमंत्री होते. यांच्यावर गाणं चित्रित होणार होतं. चित्रपट होता 'आदिमाई पेण्ण'. एमजीआर आणि जयललिता यांची लोकप्रियता तेव्हा सिनेरसिकांना देवासमान होती. पण एमजीआर मात्र एका नवख्या आवाजाच्या प्रेमात होते. तो आवाज होता एस.पी. बालसुब्रह्मण्यम यांचा! वय वर्ष २३ असलेल्या कडकडीत आवाजाच्या या गायकाला एम.जी रामचंद्रन यांनी बंगल्यावर बोलावलं. "पुढच्या सिनेमात माझ्यावर चित्रित होणारं गाणं तू गावंस अशी माझी इच्छा आहे...!" अशी विनंती एम.जी.रामचंद्रन यांनी अवघ्या २३ वर्षाच्या एस.पी. बालसुब्रमण्यम यांच्याकडं केली. करीअरच्या पहिल्याच टप्प्यात एवढ्या मोठ्या व्यक्तीनं अशी ऑफर देणं हे संधीपेक्षाही प्रचंड जबाबदारीचं ओझं होतं. एमजीआर यांनी संगीतकार के.व्ही. माधवन यांची बालांशी भेट घालून दिली. महिनाभरानंतर हेच गाणं जयपूरला चित्रित होणार होतं. तेव्हा रेकॉर्डिंगही सोबतच व्हायचं. एमजीआर यांच्यासोबत काम करण्याचं स्वप्नं अनेकांचं असायचं. बालाचं हे स्वप्नं कारकीर्दीच्या पहिल्या दोन वर्षातच पूर्ण होणार होतं. गाण्याची रिहर्सल सुरू झाली. पण अचानक बालांना टायफॉईड झाला. ते अंथरुणातून उठूही शकत नव्हते. ही मोठी संधी आपल्या हातातून जातेय की काय असं वाटत असतानाच स्वत: एम जी रामचंद्रन यांनी बालांचा हात हातात घेत धीर दिला.
"बालू काळजी करु नकोस. मी गाण्याचं शूटिंग महिनाभर पुढे ढकलतोय. हे गाणं तूच गाणार आहेस, लवकर बरा हो...!"
प्रश्न गाण्याचं शुटिंग पुढे ढकलण्याचा नव्हता, तर एम. जी. रामचंद्रन, जयललिता यांच्यासारखे सुपरस्टार मंडळी ज्यांचा एक एक मिनिट महत्वाचा असायचा. कारण एम.जी. रामचंद्रन यांच्यावर डीएमके पक्षाची खजिनदार पदाची मोठी जबाबदारी होती. भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जात होतं अशा व्यक्तीनं एका नवख्या गायकासाठी आपलं महिनाभराचं शेड्युल्ड बदललं. जयललिता यांचाही तसाच बोलबाला होता. सोबत शेकडो क्रू मेंबर्स, वाद्यवृंद आणि जयपूरच्या ज्या लोकेशनवर शुटिंग होणार होतं त्या ठिकाणच्या परवानग्या असं सगळंच बदलावं लागणार होतं. या सगळ्यात एमजीआर यांना एस पी बालसुब्रह्मण्यम यांचा आवाज असणं महत्वाचं वाटलं. यातच सर्वकाही आलं.
७० च्या दशकात एम.जी.रामचंद्रन, जेमिनी गणेशन, शिवाजी गणेशन अशा अनेक सुपस्टारचा आवाज बालसुब्रमण्यम बनले होते. पी. सुशिला, एस. जानकी, वाणी जयराम, एल. आर. ईश्वरी या दिग्गज गायिकांसोबत त्यांचे ड्युएट गाजू लागले. त्यामध्ये ७० च्या दशकात इलयाराजा या संगीतकाराचा उदय झाला होता. इलायाराजा यांच्यासोबत केलेली अनेक गाणी हिट झाली. ७० चं दशक तेलुगू, तमिळ सिनेसृष्टीत बालसुब्रह्मण्यम यांनी गाजवून सोडलं. १९७९ साली 'शंकराभरणम' या सांगितीक चित्रपटातल्या गाण्यासाठी त्यांना पहिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. पण आपल्या सर्वांना एस.पी. बालसुब्रह्मण्यम यांची ओळख झाली ती 'एक दुजे के लिए' या हिंदी सिनेमामुळे! मुकेश, मोहम्मद रफी यांच्यानंतर ८०च्या दशकाच्या सुरूवातीपर्यंत सिनेमांमध्ये किशोरकुमार यांच्या आवाजातल्या गाण्यांचा बोलबाला होता. अशावेळी एस.पी. बालसुब्रह्मण्यम यांनी आपलं अढळ स्थान निर्माण केलं.
वर्ष होतं १९८१. तमिळ, तेलुगू सिनेसृष्टीतले दिग्गज दिग्दर्शक बालचंदर यांनी आपल्या तेलुगू चित्रपट 'मरो चरित्रम' चा हिंदी रिमेक करायचं ठरवलं. त्या सिनेमाचं हिंदी नाव होतं 'एक दुजे के लिए'. सिनेमातलं मुख्य पात्र दक्षिण भारतातलं असल्यानं त्याला हिंदी येत नाही. मग सिनेमातली गाणीही दक्षिणेतल्या गायकानं गावी असा विचार झाला. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या कर्णमधूर संगीतावर एस.पी.बालसुब्रह्मण्यम यांच्या आवाजानं चार चाँद लावले.
तेेरे मेरे बिच मे कैसा है ये बंधन. अंजाना....!
तुने नही जाना मैने नही जाना...!
किंवा
हम बने तुम बने इक दुजे के लिएं...! या गाण्यात
i dont know What u say!
असं सहज हसत हसत गाणाऱ्या आवाजानं सगळ्यांना प्रेमात पाडलं.
दिग्दर्शक बालचंदर, अभिनेता कमल हसन, रति अग्निहोत्री यांच्यासह अनेकांचा हा पहिलाच हिंदी सिनेमा होता. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल हे मात्र बालसुब्रह्मण्यम यांच्या हिंदी उच्चाराबाबत साशंक होते. पण जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा बालांच्या आवाजाला लोकांनी खूप पसंत केलं आणि सिनेमाला डोक्यावर घेतलं. प्रेमी जीवांचा विद्रोह दाखवणारा 'एक दुजे के लिए' सिनेसृष्टीतला महत्वाचा टप्पा मानला जातो. सिनेमा सुपरहिट तर झालाच. पण या चित्रपटातल्या गाण्यांनी नवे कीर्तीमान स्थापित केले. हे वेगळं सांगायची गरज नाही. त्याच वर्षी 'तेरे मेरे बिच मे...!' या गाण्यासाठी एस.पी. बालसुब्रह्मण्यम यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पहिल्याच हिंदी सिनेमात थेट राष्ट्रीय पुरस्कार मिळणं हे बालांसाठी सुरेल पोचपावतीच होती. ‘एक दुजे के लिए’ मधल्या गाण्यांनी हिंदी सिनेमाला एस.पी. बालसुब्रह्मण्यम - लता मंगेशकर अशी ड्युएट जोडी दिली. पुढे या जोडीनं जवळपास दीड दशक गाजवलं. त्यातला पुढचा टप्पा होता 'मैने प्यार किया...!'
'मैने प्यार किया' हा सलमान खानचा तसा दुसरा सिनेमा असला तरी लीड म्हणून पहिलाच सिनेमा. यात सलमानचा आवाज बनले एस. पी. बालसुब्रमण्यम. सलमान तेव्हा अगदीच कोवळा होता. त्याउलट बालासरांचा आवाज भारदस्त आणि मॅच्युअर्ड असल्यानं तो योग्य वाटेल का? अशी अनेकांना शंका होती. पण ‘मैने प्यार किया’ सिनेमाची गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. आजही ती गाणी तेवढीच लोकप्रिय आहेत. बालसुब्रह्मण्यम आणि लता मंगेशकरांच्या आवाजानं सजलेल्या या गाण्यांमुळे सलमान खान रातोरात स्टार झाला.
"दिल दिवाना बिन सजना के माने ना.....
यह पगला है, समझाने से समझें ना....."
या गाण्याठी एस. पी. बालासुब्रमण्यम यांना हिंदीतला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. पुढे अनेक सिनेमांत सलमान खानचा आवाज एस.पी.बालसुब्रह्मण्यम यांचाच असायचा. सलमानचा सिनेमा सुरू असताना गाणं लागलं तर प्रेक्षकांच्या मनात फक्त बालांचाच आवाज असणार हे समीकरणच झालं होतं. मैने प्यार किया नंतर सलमान खानच्या लव, पत्थर के फुल, साजन, अंदाज अपना अपना, हम आपके है कौन या सिनेमांमध्ये बाला सरांचा जादूई स्वर होता. ‘लव’ आणि ‘पत्थर के फुल’ हे सिनेमे दणकून आपटले. पण लव सिनेमातलं "साथिया..... ये तुने क्या किया...!" हे गाणं आजही लहान थोरांच्या ओठावर असतं. हम आपके है कौन मधल्या "भाभी तेरी बहेना को माना, हाय राम कुडियों का है जमाना...!" हे गाणं आजही युनिव्हर्सल हिट आहे. वंश सिनेमातलं "आके तेरी बाहों मे हर शाम लगे सिंदुरी...!" हे बाला सरांचं सर्वात लोकप्रिय गाणं.
साजन सिनेमातली आर्त आणि मस्तीखोर अशा दोन्ही अंदाजातली गाणी गाण्याचं कसब एस.पी.बालसुब्रह्मण्यम यांच्याकडे होते. त्यांनी ते सिद्धही केलं. १९८५ साली आलेल्या 'सागर' सिनेमातल्या "युंही गाते रहो, मुस्कुराते रहो....! नाचों रे सब झुम के गाओ रे... आओ रे....!" हे मस्तीखोर गाणं गाण्यासाठी किशोरकुमार यांच्या तोडीस तोड गायक हवा होता. पण किशोर दांच्या समोर टिकायची हिंमत तेव्हा कोणत्याच गायकात नव्हती. अशावेळी एस.पी.बालसुब्रह्मण्यम
यांनी ते गाणं गायलं आणि सगळ्यांचीच वाहवा मिळवली. ‘सागर’ सिनेमात ऋषी कपूर यांना किशोरदा यांनी आवाज दिला, तर कमल हसन यांचा आवाज एस.पी. बालसुब्रह्मण्यम बनले. सागर सिनेमामधलंच..
सच मेरे यार है, बस वही प्यार है,
जिसके बदले में कोई तो प्यार दे,
बाकी बेकार है, यार मेरे.
हो यार मेरे...!
हे गाणं माझ्या अत्यंत आवडत्या गाण्यांपैकी एक आहे.
१९९१ साली मणिरत्न यांच्या 'रोजा' सिनेमात ए. आर. रेहमान यांचं संगीत आणि बालासरांच्या आवाजातली गाणी कोण विसरू शकेल. "रोजा जानेमन....!" हा स्वर सिने रसिकांच्या हृदयावर कोरला गेला तो कायमचाच. याव्यतिरिक्त अनेक हिंदी सिनेमांमधून एस.पी.बालसुब्रह्मण्यम गात होते. पण १९९५-९६ नंतर विशेषतः २० व्या शतकाच्या उंबरठ्यावर असताना सिने जगतात अनेक बदल झाले. त्याची बरीच कारणं होती. नवीन संगीतकार आले, नवे गायक आले, तंत्रज्ञान बदललं. निर्माते दिग्दर्शक यांचा व्यवहारीपणा वाढला. अशा वातावरणात बालासर फार रुळले नाही. त्यांनी बॉलिवूडमधली गाणी गाणं बंदच केलं. मात्र तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नडमध्ये ते गात राहिले. शाहरुख खानच्या 'चेन्नई एकस्प्रेस' सिनेमाचं टायटल सॉन्ग एस.पी.बालसुब्रह्मण्यम यांनी गायलं होतं.
आपण एस.पी. बालसुब्रह्मण्यम यांच्या गाण्याविषयीच बोलतोय. पण त्यांची प्रतिभा फक्त गाण्यांपुरतीच मर्यादित नाहीय. बालासर कमल हसनचा तेलुगू आवाज म्हणूनही प्रसिद्ध आहेत. कमल हसनचे तमिळ सिनेमे तेलुगूमध्ये बालसुब्रह्मण्यम सरांच्या आवाजातच डब्ड केले जातात. कमल हसनच्या ‘दशावतारम’ या तमिळ सिनेमाचं तेलुगू व्हर्जन एस.पी. बालसुब्रह्मण्यम यांच्याच आवाजात रेकॉर्ड करण्यात आलंय. ज्यामध्ये त्यांनी सात वेगवेगळ्या पुरुषांचे आवाज आणि एका स्त्री पात्राचाही आवाज काढला. एवढंच नाही तर एम. जी. रामचंद्रन, गिरीश कर्नाड, अनिल कपूर, के. भाग्यराज, सलमान खान, रजनीकांतपर्यंत अनेक दिग्गजांच्या आवाजाचं डबिंग बालासरांनी केलंय. सर बेन केंग्जली यांनी गांधीजींची भूमिका साकारलेल्या 'गांधी' या हॉलिवूडपटाच्या तेलुगू व्हर्जनचा आवाजही एस.पी. बालसुब्रह्मण्यम यांचाच आहे. गायक आणि डबिंग आर्टिस्ट व्यतिरिक्त एस.पी.बालसुब्रह्मण्यम हे उत्कृष्ट अभिनेते सुद्धा होते. तेलुगू, तमिळ, कन्नड अशा तिन्ही भाषांमध्ये त्यांनी तब्बल ७५ चित्रपटांमध्ये अभिनयसुद्धा केलाय. आयुष्यात आपण काहीही न करता, वेळ नाही अशी ओरड करत असतो. पण हे असं कर्तृत्व बघीतल्यावर आपल्याला प्रश्न पडतो, कधी केलं असेल या माणसानं हे सगळं!
आजच्या घडीला एस.पी. बालसुब्रह्मण्यम यांच्या नावावर १६ विविध भाषांमध्ये ४० हजारांपेक्षा अधिक गाणी गायल्याचं रेकॉर्ड आहे. ज्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे. ६ राष्ट्रीय पुरस्कार, तेलुगू सिनेमातला प्रतिष्ठित नंदी पुरस्कार तब्बल २५ वेळा त्यांनी पटकावलाय. बॉलिवूड फिल्मफेअर अवॉर्ड्स, साऊथचे सहा फिल्मफेअर अवॉर्ड्स, NTR नॅशनल अवॉर्ड, तर २०१६ साली नॅशनल फिल्म पर्सनॅलिटी पुरस्कार त्यांना देण्यात आलाय. २००१ साली भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार आणि २०११ साली पद्मभूषण पुरस्कारानं एस.पी. बालसुब्रह्मण्यम यांचा गौरव करण्यात आला होता. एवढं सगळं भरभरून जगलेल्या माणसाची एक छोटीशी शेवटची इच्छा काय असावी? तर त्यांना शास्त्रीय संगीताची एक मैफल सजवायची होती. या वयातही शास्त्रीय गाणं शिकण्याची त्यांची इच्छा होती हे ऐकून आश्चर्य वाटेल पण आजच्या तारखेला ४० हजारांपेक्षा जास्त गाणी गायलेल्या बालसुब्रह्मण्यम हे कधीही गाणं शिकलेले नाहीत. गाणं शिकले असता तर आणखी यश मिळालं असतं का? या प्रश्नावर त्यांनी फार छान उत्तर दिलं होतं. "शास्त्रीय गायक फार शिस्तबद्ध आणि साचेबंद गाणं गात असतात. याउलट चित्रपट संगीतात नवरसांचा वापर उलटसुलट आणि मजेशीर पद्धतीनं केला जातो. चित्रपट संगीताला कुठलंही बंधन नसतं, उलट नवीन प्रयोगाचं इथं स्वागत केलं जातं. त्यामुळे शास्त्रीय गाणं शिकलो असतो तर कदाचित मी सिनेमाकडे वळलोही नसतो...!" असं त्यांना वाटायचं.
एस.पी. बालसुब्रह्मण्यम आपल्या कामाविषयी प्रचंड प्रामाणिक होते. त्याचं छोटसं उदाहरण सांगतो. ब्रिदलेस हा प्रकार आपल्याला शंकर महादेवन यांच्यामुळे कळला. पण तमिळ सिनेमा ‘केलादी कन्मणी’ मध्ये बालसुब्रह्मण्यम यांनी ब्रिदलेस गायल्याची चर्चा रंगली होती. त्यावर काही वर्षांनी त्यांनी स्पष्टीकरण दिलं, की ब्रिदलेस गाणं हे गिम्मिक होतं. तुम्ही श्वास रोखून ठेवू शकता. पण गाताना श्वास रोखणं हे केवळ अशक्य आहे. कोणीही गायक साडे तीन ते चार मिनिटांपेक्षा जास्त वेळ श्वास रोखूच शकत नाही. चित्रपटातलं ते ब्रिदलेस गाणं हे टेक्नॉलॉजीमुळे शक्य झालं. सिने इंडस्ट्रितले लोक प्रेक्षकांना असं नवीन काहीतरी करून आकर्षित करत असतात. मला या सगळ्याचं श्रेय घ्यायचं नाहीय...!" हे त्यांनी अगदी प्रांजळपणे कबूल केलं होतं. एस.पी. बालसुब्रह्मण्यम यांचा हाच सच्चेपणा त्यांच्या गाण्यात दिसून आला. आपल्या गायकीवर मोहम्मद रफी यांच्या गायकीचा प्रभाव असल्याचं ते सांगत. रफी साहेबच का तर, त्यांचं गाणं डोळे बंद करून ऐकलं तर आपल्या डोळ्यासमोर दृश्यं, ते प्रसंग तो रोमान्स अक्षरशः दिसायला लागतो. इंजिनियरींग कॉलेजला असताना रोज सकाळी सायकलवरून जाताना ते रफी साहेबांची गाणी ऐकायचे. कोणीतरी प्रेयसी तुमच्या कानाजवळ येऊन तुम्हाला साद घालतेय की काय असं रफी साहेबाचं गाणं ऐकताना वाटायचं. कारण रफी हे एक सहृदयी व्यक्ती होते. म्हणूनच एक चांगला गायक होण्याआधी तुम्ही एक चांगली व्यक्ती असायला हवं. हे ते सगळ्या गायकांना आवर्जुन सांगायचे. चांगल्या व्यक्तीचा चांगुलपणा कलेतही उतरतो आणि कला बहरत जाते असा त्यांचा विश्वास होता. या विचारांशी बांधील राहून ते जगलेही तसेच. त्यामुळे एस.पी. बालसुब्रह्मण्यम यांचा आवाज हा आपला वाटतो, जिव्हाळ्याचा वाटतो. आज त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...

चित्रपटसृष्टीतलं वात्सल्य हरपलं!
सुलोचना दीदी म्हणजे सांस्कृतिक महाराष्ट्राचा सालस चेहरा. त्यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी आहे. मराठी तसेच हिंदी चित्रपटांमधूनही त्यांनी साकारलेल्या सोज्वळ भूमिका सर्वांनाच आपल्या घरातील थोरामोठ्यांच्या मायेची आठवण करून देतात. त्यांच्या दर्जेदार अभिनयासाठी त्यांना 'महाराष्ट्र भूषण', 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुलोचनादीदी म्हणजे मूर्तिमंत सोज्वळता, वात्सल्य, खानदानीपणा, सोशिकता आणि त्याग मूर्ती! १९४३ पासून १९९५ पर्यंत प्रदीर्घ काळ मराठी-हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयानंच नव्हे, तर वागण्याबोलण्यानंही निर्माण केलेला आपल्या नावाचा दबदबा कायम राखण्यात यशस्वी ठरलेली आपली अभिनेत्री. बेळगांव जिल्ह्यातल्या चिक्कोडी तालुक्यातल्या खडकलाट नावाच्या खेड्यात फौजदार शंकरराव दिवाण आणि तानी बाई यांच्या पोटी नवसासायासानं ३० जुलै १९२९ रोजी नागपंचमीच्या दिवशी जन्माला आली, म्हणून कोणी तिला नागू म्हणत. पण तिचं नाव ठेवलं होतं 'रंगू'. उघड्या रानमाळावर मनसोक्त हुंदडणारी, सायकल चालवणारी रंगू जेमतेम चौथीपर्यंत शिकली. लहानपणी रंगू चुलतभाबरोबर गावभर फिरताना बारा वर्षांची होईपर्यंत विजार शर्ट घालून सायकलवर उंडारायची हे कुणाला सांगूनही पटायचं नाही, पण खरं आहे ते. बालपणापासूनच तिला सिनेमाचं मोठं वेड. फौजदाराची लाडाची लेक! तिला तिकीट कोण विचारतोय? गैबीसाहेबाच्या दर्ग्याच्या उरूसात सिनेमाची हौस रंगू मनसोक्त पुरवून घ्यायची. पडद्याच्या जास्तीत जास्त जवळ बसून सिनेमा पहाण्याची आवड तिला. पडद्यामागे काय आणि कोण असतंय याची उत्सुकता असे. मावशी बनूअक्का यांना वाटे, पोरगी सिनेमात जाणार. त्यांनीच रंगूच्या सिनेमा वेडाला खतपाणी घातलं वाटतं. जवळच्या चिक्कोडी या तालुक्याच्या गावचे प्रसिध्द वकील पुरुषोत्तम बेनाडीकर हे वडीलांचे मित्र. त्यांच्याकडे नेहमी जाणं येणं असे. मावशीनं एकदा बेनाडीकर वहिनींकडं तक्रार केली, 'नुसती भटकते, कामधाम करत नाही. शंकररावांनी लाडावून ठेवलंय अगदी!' त्यावर बेनाडीकर वकील म्हणाले, :आपण हिला सिनेमात पाठवू. मोठी कलाकार होईल ही!' बेनाडीकर वकीलांच्या तोंडून नियतीच बोलत असावी बहुतेक. मास्टर विनायक हे बेनाडीकरांचे विद्यार्थी. मा.विनायक एकदा गुरुंना भेटायला चिक्कोडीला आले असतांनाच वकील साहेबांनी त्यांच्याकडं म्हणणं मांडलं. विनायकांनी संमती देऊन प्रफुल्ल चित्र मध्ये पाठवायला सांगितलं. गुरुंना कबुल केल्याप्रमाणे विनायकरावांनी रंगूला महिना ३० रुपये पगारावर ठेवून आपल्याकडं कामावर घेतलं. रोज सकाळी ११ ते ६ जावं लागे स्टुडिओत हजेरी लावायला. लवकरच नव्या सिनेमाचं काम सुरू झालं. १९४३ साली 'चिमुकला संसार' या सिनेमातून रंगूचा अभिनय संसारही सुरू झाला. नवागत रंगू आणि नवेच राजा गोसावी यांच्यावर एक सीन चित्रीत करण्यात आला. प्रफुल्ल चित्र मधली सारी मंडळी सुशिक्षित, बरेचजण पदवीधर. शहरी, बरेचदा इंग्रजी, एरवी शुद्ध मराठी बोलणारी ती माणसं. रंगू गावंढळ , खेडवळ भाषा बोलणारी. काही जण तिची टिंगल करत. खोचक टिका ऐकून रंगूला जीव नकोसा झाला अगदी, पण वडीलांनी समजूत काढली. अशा अपमानास्पद परिस्थितीत तिच्याच वयाची एक चुणचुणीत मुलगी तिच्या मदतीला धावून आली. ही लहानपणीची मैत्री आजवर अगदी नव्वदी नंतरही टिकवून ठेवणारी होती ती मैत्रिण म्हणजे भारतरत्न लता दीदी. रंगूला दिलासा मिळाला. ती रमायला लागली, तोच प्रफुल्ल चित्र कोल्हापूरातून मुंबईत हलवण्याचा निर्णय घेतला विनायक रावांनी. त्यांना हिंदी सिनेमा सुध्दा बनवायचे होते. आग्रह झाला तरी रंगू काही मुंबईला जायला धजावली नाही.
इथंच तिच्या जीवनात नवी कथा घडली. आबासाहेब चव्हाण यांच्याशी तिचा विवाह झाला. आबासाहेबांची भालजी पेंढारकर यांच्याशी मैत्री होती. पत्नीनं सिनेमात काम करावं अशी त्यांचीही इच्छा होती. रंगूला सहज भालजींच्या प्रभाकर स्टुडीओत प्रवेश मिळाला. भालजींनी तिची पारख केली होती. तिचं सोज्वळ रुप नजरेत भरावं असंच होतं. 'महारथी कर्ण' मध्ये रंगूला दासीची भूमिका मिळाली. कुंतीची भूमिका करणाऱ्या दुर्गाबाई खोटे यांच्या रुप अभिनय आणि दराऱ्यानं रंगू पुर्णपणे भारावून गेली. रंगूला पाहून दुर्गाबाईंनी ही उद्याची भारतीय सिनेसृष्टीत आघाडीची अभिनेत्री ठरेल असं बिनचूक भाकीत केलं होतं. महारथी कर्ण मध्ये बऱ्याच समूह दृश्यात रंगू चमकली. पुढच्या वाल्मिकी सिनेमात सूर्यकांत राम, तर ती सीतेच्या भूमिकेत दिसले शब्दशः दिसले, कारण त्यांना संवादच नव्हते फक्त दर्शन देण्यापुरते रोल होते. १९४४ साली छ.शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी करतांना निमंत्रितांसमोर सादर करण्यासाठी जयशंकर दानवे यांच्या दिग्दर्शनाखाली 'करीन ती पूर्व' या नाटकाचा प्रयोग बसवला गेला. त्या नाटकात गजराची-हिरोजीची बायकोची प्रमुख भूमिका रंगूला मिळाली. त्याचवेळी बाबांनी त्यांचं नवं नामकरण केलं 'सुलोचना!'
पुढच्या सासुरवास या सिनेमात चंचल वृत्तीच्या फॅशनेबल तरुणीची भूमिका सुलोचनाला दिली गेली. ती गाजली. गांधी वधोत्तर जाळपोळीत भालजींच्या स्टुडीओची राखरांगोळी झाली. बऱ्याच मंडळींची पांगापांग झाली. सुलोचनाही पुण्यात आली. त्याकाळात पुण्यात मराठी चित्रपटांचं सुवर्णयुग होतं म्हणा ना. राजा परांजपे यांच्या दिग्दर्शनाखालील 'जीवाचा सखा' या चित्रपटात काम मिळालं. हा चित्रपट रौप्य महोत्सवी ठरला. पुढं दत्ता धर्माधिकारी यांनी दिग्दर्शित केलेल्या 'स्री जन्मा ही तुझी कहाणी', 'बाळा जो जो रे' या सिनेमातून सुलोचनाचा अभिनय पाहून स्त्री प्रेक्षक ढसाढसा रडत. अनंत माने यांच्या ओवाळणी, शाहिर परशुराम, धाकटी जाऊ , सांगत्ये ऐका या चित्रपटात सुलोचना बाईंना अभिनयाच्या निरनिराळ्या छटा दाखवता आल्या. दिनकर द.पाटील यांच्या 'तारका' चित्रपटात सुलोचना सिनेमा नटी आणि चंद्रकांत दिग्दर्शक अशा भूमिकाही प्रेक्षकांना आवडल्या. आचार्य अत्रे यांच्या महात्मा फुले या चित्रपटात त्या सावित्रीबाई फुले झाल्या होत्या. या चित्रपटाला फाळके अवार्ड मिळालं. भालजींनी पुन्हा स्टुडीओची उभारणी केल्यावर शिवा रामोशी, मीठभाकर, साधी माणसं, राजा शिवाजी या चित्रपटातील त्यांच्या भूमिका तर हातखंडा होत्या. त्यांची जिजाऊंची भूमिका सर्वांना आवडते, पण मला विशेष आवडलेल्या भूमिका म्हणजे 'संत गोरा कुंभार' मधली गोरा कुंभाराची बायको, 'वहिनीच्या बांगड्या' मधली वहिनी आणि मधुकर पाठकांच्या 'प्रपंच' मधली पारू. फाटक्या, जोड लावलेल्या लुगड्यातही सुलोचनाबाई एवढ्या सुंदररित्या वावरल्या आहेत. सहा सात पोरांचा पोरवडा , नवऱ्याचा मृत्यू , मुंबईच्या इस्पितळात खाटेवर निपचित पडलेल्या पोराचं मरण, मरणाआधीच त्या बापड्या आईच्या डोळ्यात दिसत होतं. मूक आक्रोश करण्याचं काम त्यांचे डोळेच करत होते. राजा ठाकूर यांच्या 'एकटी'ची सतत फिरणारं मशिनचं चाक आणि त्या पार्श्वभूमीवर मोठा होत जाणारा मधू डॉ. काशिनाथ घाणेकर भूमिकाही त्या अक्षरशः जगल्या. तशीच 'मोलकरीण' मधली 'देव जरी मज कधी भेटला' गाणारी कोकणातली आई. 'वहिनीच्या बांगड्या' चित्रपट, पण माझ्या आईकडून इतकं ऐकलं होतं की पुढं दूरदर्शनवर बघतांना शॉट नि शॉट आठवत होता. ती भूमिका काळजात रुतून बसली ती बसलीच. ही कथा प्रसाद मासिकाचे संपादक य.गो. जोशी यांची. मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील थोरल्या वहिनीची आणि दिराची गोष्ट. आजवर सुलोचना बाईंना मिळालेल्या सगळ्या भूमिका मराठमोळ्या, खानदानी घराण्यातील स्त्रियांच्या वा बहुजन समाजातील गोरगरीब बायकांच्या, शेतकरी कुटुंबातील नवऱ्यासाठी भाकर घेऊन बिगी बिगी शेतावर जाणाऱ्या बायकांच्या.वा पाटलीणबाईंच्या व्यक्ती रेखा रंगवणाऱ्या. भाऊबीज मधली कलावती आणि तारकातली सिनेनटी हे अपवाद.
असं वाचलंय, की वहिनीची भूमिका सुलोचना बाईंना दिली हे जोशीबुवांना फारसं पसंत पडलं नाही. त्यांना ते पटेचना. पण प्रत्यक्षात सिनेमा पाहिल्यावर मात्र त्यांनी सुलोचनाबाईंना दाद दिली. या चित्रपटात ओचे पदराची नऊवारी साडी चापून चोपून नेसलेल्या सुलोचनाबाई इतक्या सुंदर आणि सोज्वळ दिसतात की उपमा नाही. त्यांना नऊवारी लुगडं नेसवायला मला वाटतं चांदबीबी असायच्या कोल्हापूरात तरी आणि मेकअप साठी पंढरीदादा जूकर. जिजाऊंच्या भूमिकेतही त्यांचं रूप खुलून दिसलंय नेहमीच. अन्नपूर्णा या सदाशिव रावकवींच्या चित्रपटात 'तुझ्या कांतीसम रक्त पताका पूर्वदिशा उजळती, अरुण उगवला, प्रभात झाली उठ महागणपती!' गाणाऱ्या सुलोचना बाई अजून डोळ्यासमोर आहेत. वसुंधरा पटवर्धन यांच्या 'मधूची आई', वरून निर्मिलेला 'एकटी' असाच हमखास रडवणारा चित्रपट. मशिनवर बसून दिवसरात्र सतत शिवणकाम करणारी ती आई विसरु म्हणता विसरता येत नाही. अरविंद गोखले यांच्या कथेवर आधारित 'माझे घर माझी माणसं' मधली डॉ इरावतीही संवेदनशील प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली. वऱ्हाडी आणि वाजंत्री मधली त्यांची ग.दि.माडगुळकरांची बायको ही विनोद निर्माण करणारी कानडी ढंगाची 'ह्ये मुलगं' टाईप मराठी बोलणारी मुलीची आई गालातल्या गालात हसवून गेली.
सुलोचनाबाईंची प्रेक्षकांना न आवडलेली भूमिका एकच भाऊबीज चित्रपटातील पायात घुंगरू बांधून नाचणाऱ्या बहिणीची! सिनेमाच्या वेडापोटी कोल्हापूरात आलेली ही अल्पशिक्षित खेडवळ मुलगी. वयाच्या १४ व्या वर्षी प्रफुल्ल चित्र मधून सिनेमात प्रवेश केला आणि तब्बल साठ वर्ष पडद्यावर झळकत राहिली. कधी नायिका, गरीब, श्रीमंत, खानदानी, दरिद्री, हरिज , ब्राह्मणी मध्यमवर्गीय अशी नाना रुपं धारण केली. पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक सगळ्या प्रकारच्या भूमिका आल्या त्यांच्या वाट्याला. मास्टर विठ्ठल पासून चंद्रकांत, सूर्यकांत मांडरे, चंद्रकांत गोखले, चित्तरंजन कोल्हटकर, अशा एकापेक्षा एक मराठी आणि राज, देव आनंद, दिलिप कुमार, दादामुनी अशोक कुमार, गीता बाली, नूतन, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन पर्यंत हिंदी अभिनेत्यासोबत कामं केली. भूमिकेची लांबी रुंदी त्यांनी कधी पाहिली नाही. नायिकेची मुख्य भूमिका नसली तरी सुलोचना दीदींचा ठसा उमटला नाही असं कधी झालं नाही. भालजी पेंढारकर या आपल्या गुरुंनी आपल्याला जे दिलं ते आपलं भाग्य, असं त्या मानतात. त्यांनी नुसता अभिनय नाही शिकवला तर जगाच्या रंगमंचावर जगायला शिकवलं असं त्यांना वाटतं. भाषा शुध्द, स्वच्छ व्हावी म्हणून बाबांच्या सांगण्यानुसार अर्थ समजत नसतांना मोठमोठ्यानं संस्कृत वाड्मयसुध्दा वाचलं. भालजी पेंढारकर यांच्या हाताखाली शिकतांना दिवस दिवसभर तालमी कराव्या लागल्या. सकाळपासून रात्रीपर्यंत. वातावरण अगदी घरगुती , एखाद्या मोठ्या कुटुंबात असावं असं. पण काम मात्र शिस्तीतच व्हावं लागे , टाळाटाळ चालायची नाही. कोवळ्या संस्कारक्षम वयात मनावर बिंबवलेली ती शिस्त अंगात भिनून गेली. गुरुवर्य भालजीबाबांनी अभिनयाबरोबरच शिष्टाचार शिकवले. परंपरांचं भान दिलं. कामाबद्दलची निष्ठा शिकवली. देव, देश अन् धर्मासाठी जगावं कसं याचे धडे तिथंच मिळाले छोट्या रंगूला. जरा आधीच्या काळात कलावंतिणीसुध्दा सिनेमात काम करायला, तोंडाला रंग लावून घ्यायला तयार नसत. पण दुर्गाबाई खोटे, रत्नमाला बाई यांच्यासारख्या प्रतिष्ठित घराण्यातील स्रिया अभिनय क्षेत्रात आल्या आणि सिनेअभिनेत्री बनणं म्हणजे बाऊ करण्यासारखे दिवस उरले नाहीत. सुरुवातीला दिवस दिवस कलाकारांची कामं बघत निरिक्षण करण्यात घालवली दीदींनी. तो वस्तुपाठच होता एक प्रकारचा. ऍक्टिंग किंवा फिनिशिंग स्कूल्स नव्हती तेव्हा. भालजींचे अधिकतर चित्रपट ऐतिहासिक. त्यात काम करायचं तर तलवार बाजी, घोडसवारी येणं गरजेचं. ते शिकता आलं, शिकावं लागलं. मास्टर विठ्ठल यांच्या बरोबर काम करतांना त्याचा उपयोग झाला.
सुलोचना बाईंना हिंदी चित्रपटात पहिल्यांदा संधी मिळाली ती १९४४ साली 'महारथी कर्ण' मध्ये. त्यानंतर कितीतरी हिंदी चित्रपटात. संतपट, बहुतांश पौराणिक चित्रपट व सामाजिक चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. 'औरत यह तेरी कहानी'सारखे काही त्यांच्या मराठी चित्रपटांची स्त्री जन्मा ही तुझी कहाणीची हिंदी आवृत्ती होते. त्यांची बिमल रॉय यांच्या 'सुजाता'मधली भूमिका विशेष गाजली. काही काळानंतर हळूहळू आईच्या भूमिकांसाठी विचारणा होऊ लागली. तेव्हा सुलोचनाबाईंना निर्णय घेणं कठीण होऊन बसलं. पण अशावेळी ललिता पवार यांनी वडीलधाऱ्याच्या भूमिकेतून त्यांना सल्ला दिला , 'अगर लंबी करियर चाहिए तो कॅरेक्टर रोल करो!' हा सल्ला सुलोचनाबाईंना मानला आणि पुढचं सारं आपल्याला ठाऊकच आहे. बाईंनी महिपाल पासून दादा मुनी-अशोककुमार, राज कपूर, देव आनंद, दिलिपकुमार यांच्या समवेत काम केलं. तसंच पुढच्या पिढीतील धर्मेंद्र, राजेश खन्ना, अमिताभ बरोबरही त्यांनी भुमिका केल्या. सुलोचना बाईंची नवी ओळख “सुलोचना दीदी” अशी झाली ती 'औरत ये तेरी कहानी' या चित्रपटापासून. स्त्री जन्मा ही तुझी कहाणी मधली 'अक्का' हिंदीत 'दीदी'बनली होती आणि सुलोचना बाई सगळ्यांच्याच दीदी होऊन बसल्या. मात्र हे संबोधन निव्वळ शुटिंग पुरतं कधीच नव्हतं. आपली स्वच्छ, सोज्वळ प्रतिमा मायानगरी हिंदी सिनेसृष्टीत कायम राखण्यात त्या यशस्वी ठरल्या. मराठमोळ्या खानदानी संस्कृतीची अदब आणि दबदबा त्यांनी आजवर टिकवून ठेवला होता. मुखवट्यांच्या या दुनियेत आपलं पारदर्शक मराठीपण त्यांनी सदैव शाबूत ठेवलं. अनेक चांगल्या भूमिका, अगणित पुरस्कार, ती यादी इथं देण्याचं पाळलेली बरं! आणि मुबलक संपदा मिळवूनही त्यांचे पाय नेहमी जमिनीवरच राहिले. पूरेपूर कोल्हापूर म्हणजे काय हे सुलोचना दीदींच्या वागण्यातून सतत दिसत राहिलं. माणसं जोडण्याची आणि नातेसंबंध टिकवून ठेवण्याची कला त्यांना अवगत होती. प्रारंभीच्या काळात कोल्हापूरात स्टुडिओत जोडलेली नाती जन्मभर टिकवलीत त्यांनी. भालजींचा पेंढारकर परिवार , पुण्याच्या पुना गेस्ट हाऊसचा सरपोतदार परिवार, कोल्हापूरचा गजबर परिवार अशी कित्येक उदाहरणं आहेत.
मैत्री करावी तर सुलोचना दीदींनीच. पुण्याच्या माणिक बेहरे यांच्याशी जमलेली त्यांची मैत्री अखंड होती. एकदा संबंध जोडले, की त्यांच्या सुखदुःखात सहभागी होण्यासाठी दीदी हजर असणार हे नक्की. लग्नप्रसंगी घरच्यासारखा भरघोस अहेर करणार आवर्जून. हे झालं लग्नाचं. पण दीदींचं कोल्हापुरी स्पिरीट खरं दिसलं होतं ते दत्ता माने नावाचे मराठी दिग्दर्शक मुंबईच्या रस्त्यावर अकस्मात मृत्यू पावले, तेव्हा दीदींनी दाखवलेल्या माणुसकीतून. गावावरून मानेंच्या घरची माणसं येऊन, मृतदेह ताब्यात घेईपर्यंत दीदींनी त्यांचं पार्थिव चक्क आपल्या घरात आणून ठेवलं होतं. या त्यांच्या जगावेगळ्या वेगळेपणामुळेच मायावी हिंदी चित्रपटात सुध्दा आजही त्यांचे पाय सच्चेपणानं आदरपूर्वक धरले जातात. 'राज' चित्रपटाच्या शुटिंग वेळी राजेश खन्ना आणि 'रेश्मा और शेरा'च्या शुटिंगवेळी अमिताभ बच्चन यांची पारख करुन हे तरुण सुपर स्टार होणार अशी भविष्यवाणी त्यांनी वर्तवली होती. दोघांनीही दीदींना आईसारखा मान दिला आहे नेहमी. अशोककुमारसुध्दा त्यांना आदरानं वागवत. गुरू भालजीबाबांकडून मिळालेला देव,देश अन् धर्मासाठी काही करण्याचा मंत्र दीदी कधीच विसरल्या नाहीत. त्यांच्या वहिनींचं निधन झालं तो काळ भारत चीन युध्दाचा १९६२ चा वहिनीचे सर्व दागिने त्यांनी मुंबईला परतल्यावर मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याकडं सुपूर्द केलं युध्द फंडासाठी! गरजूंना मूकपणे मदत करत रहाणं हा त्यांचा जणू धर्म आहे. पूर्वीसारखी आवक नसली तरी त्या यथाशक्ती समाजातील गरजूंना मदत करत असत. मग ते थकलेले कलाकार असोत, तंत्रज्ञ असोत वा कामगार. त्यागमूर्ती आईची भूमिका त्यांनी फक्त पडद्यावर रंगवली असं नाही, तर आयुष्यभर ती त्या जगत राहिल्या. कुटुंबातल्या वीस बावीस जणांची जबाबदारी अंगावर घेऊन पार पाडली. स्वतःची एकुलती मुलगी पण आठ भाचवंडात आणि तिच्यात भेदभाव कधी केला नाही. त्या सगळ्यांची 'आत्ती' होऊन जगल्या कायम. हे कमी की काय , म्हणून कै.मधू आपटे मराठी – हिंदी चित्रपटात तोतरं बोलत विनोदी भूमिका करणारे यांना मायेनं आपल्या जवळ घेतलं. त्यांचं सारं केलं. त्यांची 'साठी' सुध्दा मोठ्या कौतुकानं साजरी केली. ही संवेदनशीलता त्यांच्या अंगातच होती. दीदींना स्वतःला वैवाहिक जीवनाचं सौख्य फार काळ लाभलं नाही. आबासाहेब अकाली गेले. पुढं एकुलत्या मुलीच्या कांचनच्या वाट्याला सुध्दा पतीनिधनाचा धक्का पचवणं आलं. दीदीसाठीसुध्दा हे सहन करण्याच्या पलीकडचं होतं. कांचन आणि डॉ. काशीनाथ घाणेकर यांच्या बारा तेरा वर्षांच्या प्रेमसंबंधात लग्न केलंच पाहिजे या मुद्द्यावर त्या ठाम राहिल्या. हे त्यांचे विचार जुनाट वाटतील कोणाला, पण स्वतःच्या तरुण विधवा वहिनीला पुनर्विवाहाची परवानगी देण्याचा सुधारकी विचारही त्या करू शकल्या. मात्र स्वत:ला तरुण वयात पुनर्विवाह करण्याच्या अनेक संधी येऊनही मुलगी आणि आपली माणसं यांच्यासाठी त्यांनी तो मोह बाजूला सारला.
माणसं आणि गोतावळा हेच त्यांचं सुखनिधान. नव्या पिढीच्या कल्पना, योजना, प्लॅन्स जाणून घेण्यात त्यांना रस. आतापर्यंत चित्रपट गृहात जाऊन सिनेमा पहायच्या. आताशी त्या मात्र घरातच बघत होत्या. चांगली नाटकं पाहाणं, उत्तम पुस्तकं वाचणं ही आवड. शिक्षण कमी झालेलं असलं तरी आपली अभिरुची त्यांनी प्रयत्नपूर्वक वाढवली. पांढरा आणि भगवा हे आवडते रंग. पांढऱ्या रंगाची भगव्या काठाची साडी म्हणजे अपूर्वाई! पुरणपोळी, मोदक आणि कोल्हापूरी मटण हे आवडते पदार्थ. आवडती मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सिनियर तर हिंदी शबाना आझमी. आवडता हिंदी अभिनेता दिलिप कुमार आणि मराठीतले सुबोध भावे आणि उपेंद्र भावे. नव्वदी ओलांडली तरी दीदी आरोग्य टिकवून होत्या. कोल्हापुरच्या मातीचाच गुण असावा हा ! उदा. सुलोचनादीदी आणि रमेश देव देवावर श्रध्दा असली तरी देव देव फार करत नव्हत्या त्या. पण श्रध्दा जपलीय ती गुरुंवरची. 'आज मी आहे ती त्यांच्यामुळं!' भालजी पेंढारकरांबद्धल त्या म्हणत. बाबांनी फक्त अभिनय नाही शिकवला, तर जगावं कसं हे सुध्दा शिकवलं. समाजात वावरताना कसं वागावं, बोलावं हे त्यांच्यामुळेच शिकले!' ही कृतज्ञता होती. बिनभितीच्या या आयुष्यानं त्यांना खूप धडे दिले. 'लाईटस् , कॅमेरा, ऍक्शन' हे शब्द १९४३ साली पहिल्यांदा कोल्हापूरात प्रफुल्ल चित्र कंपनीत 'चिमुकला संसार'चं शूटिंग सुरू असताना मा. विनायक हे कानावर पडले आणि आयुष्यभर कानात गुंजत राहिले. जन्मभर साथ दिलेले ते शब्द आताशा कानावर पडत नाहीत, पण दीदी जुन्या आठवणींत रमून जात, पतवंडांच्या गडबडगुंड्यात रमून समाधानी रहात. आल्या गेलेल्यांची विचारपुस आणि पाहुणचार करत आणि आपल्या वत्सल नजरेतून सगळ्यांना कासवीच्या मायेनं न्हाऊमाखू घालत.
'लिंबलोण उतरू कशी असशी दूर लांब तू , इथून दृष्ट काढते निमिष एक थांब तू...!' हे गाणं आठवलं की नाही? जन्मभराची ही माऊली अखेरपर्यंत तशीच माया पांघरत राहिली आपल्या सगळ्या गोतावळ्यावर! सुलोचनादीदी म्हटलं की नजरेसमोर त्यांच्या एकापेक्षा एक सरस भूमिकांचा एक 'कोलाज' तयार होतो. मोलकरीण मधली आणि एकटी मधली आई, देव पावला मधली 'कौसल्येचा राम बाई..!' गात मागावर विणणारी कोष्ट्याची मुलगी, 'विठू माझा लेकुरवाळा...!' मधली जनाबाई, 'वहिनीच्या बांगड्या'मधली वहिनी, साधी माणसं मधली जयश्री गडकरची 'गडनी सजनी...! 'वहिनी' आणि 'प्रपंच' मधली पारु आणि जिजाऊ विसरू म्हणता विसरता येत नाहीत. 'अभिनय म्हणजे स्विच ऑन-स्विच ऑफ करण्याची हातोटी!' असं काही जणांचं म्हणणं असलं तरी दीदी या भूमिका अक्षरशः जगल्या. परकायाप्रवेशासारखी एखादी किमया देऊनच पाठवलं होतं त्यांना निर्मात्यानं! हा देखणा, तरीही सोज्वळ, देवघरात उजळणाऱ्या समईसारखा 'आपलासा' चेहरा तशाच निर्मळ वृत्तीसह जपणाऱ्या सुलोचनादीदी ह्या आपल्या होत्या याचा आपल्याला यथार्थ अभिमान वाटतो! इथली ही 'वहिनी', 'आई' साऱ्या महाराष्ट्राची जणू 'तुळस' होऊन बसली होती, यांचं कौतुक आणि अभिमान असाच कायम बाळगायला हवा आपण!
आज त्यांच्या निधनाने आपल्या कुटुंबातीलच एक ज्येष्ठ आणि प्रेमळ व्यक्ती हरपल्याची भावना आपल्या प्रत्येकाच्या मनात आहे. सुलोचना दीदींच्या आत्म्यास शांती लाभो, हिच ईश्वरचरणी प्रार्थना! ॐ शांति।

Subscribe to:
Posts (Atom)
स्कूल ठीक होतील....?
"शिक्षण क्षेत्रात सुधारणा व्हावी यासाठीच्या आंदोलनांना सरकारला सामोरं जावं लागलंय. आज जगातल्या साऱ्या मोठ्या बहुराष्ट्रीय क...
-
"भारतीय राजकारणाला एक घातक वळण लागलंय. निवडणुका जिंकण्यासाठी लोकांवर फुकटच्या रेवड्या उधळल्या तर सत्ता लाभते हा प्रवाद आता ...
-
'प्लेबॉय' म्हणून शोभेल अशा लीला करणारा भोंदू, रुपाली चाकणकर यांचा 'पांडुरंग', कथित ज्योतिषी अशोक खरा...
-
"मराठी माणसांवर मोठी जबाबदारी येऊन ठेपलीय. राज्याची कोसळलेली अर्थव्यवस्था, उन्मत्त, लाडवलेली, बेबंद नोकरशाही, उध्वस्त प्रशा...