Friday, 7 August 2026

शिवसेना आणि प्रसारमाध्यम

वर्तमानपत्रे आणि प्रसारमाध्यमानी शिवसेनेची बाजू कधीच घेतलेली नाही, ६० वर्षात कौतुकाच्या ६० ओळीही लिहीलेली नाहीत. शिवसेना-उबाठाचे प्रवक्ते पत्रकारांना वा वृत्त वाहिन्यांना उपलब्ध का नसतात? हा प्रश्न नेहेमी उपस्थित केला जातो. त्याबाबत थोडेसे निरीक्षणातून हाती आलेली काही उत्तरे. मी अधिकृत प्रवक्ता नाही. तरीही दोन शब्द. बरेच मागे जावे लागेल. पूर्वीच्या म्हणजे स्व. बाळासाहेब हयात असताना आणि आता साहेब हयात नसताना या दोन्ही वेळेला मराठी माध्यमानी शिवसेनेची बाजू घ्यायचे सोडा त्यांच्या बातम्यानाही स्थान देण्यास मराठी वर्तमानपत्रे त्यावेळी तयार नव्हती. नवशक्ती तत्कालीन व काही साप्ताहिके मात्र सेनेच्या बातम्या आणि उपक्रमांचे वार्ताकन करत असत. शिवाय अगदी अलीकडे म्हणजे ९१ पर्यंत शिवसेनेच्या बातम्या राज्य पातळीवर म्हणाव्या तशा येत नव्हत्या. मुंबई महापालिकेत प्रथम विरोधी पक्ष आणि नंतर सत्तारूढ पक्ष झाल्यावर अगदी मर्यादित अर्थाने शिवसेना पत्रकारांसाठी काहीशी सैल झाली. तरीही मराठीतील काही प्रमुख वर्तमानपत्रे शिवसेना विरोधकच होती अगदी आजकाल जी मंडळी घसा फोडून शिवसेनेची बाजू घेत असलेली मंडळी तेव्हा शिवसेनेला पाण्यात पाहत होती. शिवसेना-भाजप युतीचे पहिले सरकार आले त्यावेळी सरकार आले म्हणून सरकारच्या बातम्या देणारे जसे अनेक होते तसेच साहजिकच काड्या घालणारे शेकडो होते. थोड्या थोड्या क्षुल्लक कारणासाठी सरकारला घाम फोडणारे ही काहीजण होते. स्व. बाळासाहेब कठोर असले तरी तो एक संवेदनाशील कलावंत होता आधीही रमेश प्रभू यांची निवडणूक आणि नंतरची कोर्ट खेळी त्यांना आवडलेली नव्हती. या सर्वांचा परिपाक असा झाला की, शिवसेना पत्रकाराशी फटकून वागू लागली. पत्रकारांना जितकं लांब ठेवता येईल तितकं ते करू लागले. उदाहरण देऊन बोलायचे तर कुठला सर्वोच्च नेता उठसुठ कार्यकर्त्यांना भेटतो हो...! कुणीच नाही कुणाकडेही जाऊन पहा सहाय्यक तुम्हाला इतके प्रश्न विचारतो की तुम्ही नेत्याला भेटायचा विचारच सोडून द्याल. करोना काळातील घरात बसण्याचा उल्लेख होतो तर भाजपचा कुठला नेता फेरफटका मारत होता हो...! सर्वच जण एका मर्यादेत राहून काम करत होते, पण निंदा उद्धवरावांचीच होते शेवटी पत्रकबाजी वा पत्रकारांना हाताशी धरून शिवसेना राजकारण करत नाही. काही ज्येष्ठ मंडळींना पक्षाचे सल्लागार केले नाही म्हणून साहेबांनी वाढवलेले अनेक जण आज दुसऱ्याच्या मांडीवर जाऊन बसलेले आहेत शेवटी संघ नायक बदलला की संघ ही काही प्रमाणात बदलला जातोच.
शिवसेनेच्या स्थापनेपासून मजबूत असलेला हा पक्ष छगन भुजबळ, नारायण राणे आणि अलीकडे एकनाथराव शिंदे यांनी फोडला आहे. म्हणजे भुजबळ, राणे आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षांपासून काही नेते वेगळे झाले. महत्वाचे म्हणजे भुजबळ आणि राणे हे स्व.बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना पक्षांपासून वेगळे झाले. एकनाथराव मात्र बाळासाहेबांचे निधन झाल्यानंतर बऱ्याच काळानंतर बंड करून वेगळे झाले, इतकेच नव्हे तर भाजपच्या सहाय्याने मुख्यमंत्री ही झाले.
पूर्वीपासून कमी लेखत होते         
सुरुवातीपासून शिवसेना-भाजप युती असली तरी अगदी पहिल्यापासून भाजपचे अनेक नेते शिवसेनेला कमीच लेखत असत. अजूनही हा सिलसिला चालूच आहे. इतकेच नव्हे तर केंद्रात आणि राज्यात जेव्हा भाजपचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री झाले तेव्हा भाजपने पद्धतशीरपणे शिवसेनेला दाबण्याचा प्रयत्न केला मात्र स्व. बाळासाहेबांचा फोन गेला तर मात्र भाजपवाले कामे करत असत. फार काय शिवसेनेला अनेक केंद्रीय आणि राज्य सरकारच्या समित्यावर घ्यावं लागेल म्हणून अनेक समित्या नेमल्याच नाहीत. ही यादी वाढवता येईल. मात्र मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना-उबाठाने ६० पेक्षा जास्त जागा मिळवल्याने सत्तारुढ पक्ष काहीसा शांत झाला. कारण दोन्ही शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या आणि मित्र पक्ष सदस्यांची संख्या भाजपपेक्षा जास्त होऊ शकते. म्हणून तर मुंबई भाजपचे अध्यक्ष मुंबई महापालिकेत ठाण मांडून बसलेलं असतात. आतापर्यंत मुंबईचा पक्षाध्यक्ष वसंत निवासमध्ये बसून महापालिका नियंत्रित करत असत. आता मात्र पक्षाला पालिकेत यावे लागते. त्यामुळे पक्षातील ज्येष्ठ नगरसेवकांना महत्वाच्या विषयांवर बोलताच येत नाही सबकुछ पक्षांध्यक्ष मुंबई झाले आहे
जाता जाता, मराठी वर्तमान पत्रे आणि माध्यमानी जितके दक्षिणेतील प्रादेशिक राजकीय पक्षांचे कौतुक केले, त्यांच्या संबंधी आवर्जून लिहिले त्या तुलनेत गेल्या ६० वर्षात माध्यमानी ६० ओळीही शिवसेनेच्या कौतुकात लिहिलेल्या नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्याबाबत कोणी कधीतरी विचार करणार आहे ही नाही?

No comments:

Post a Comment

स्कूल ठीक होतील....?

"शिक्षण क्षेत्रात सुधारणा व्हावी यासाठीच्या आंदोलनांना सरकारला सामोरं जावं लागलंय. आज जगातल्या साऱ्या मोठ्या बहुराष्ट्रीय क...