Friday, 7 August 2026

चढता सुरज धीरे धीरे ढलता है

उगवता सूर्य हळूहळू मावळतो अन् तो मावळणारच...
चढता सुरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा...!
जगात असं एकही सरकार नाही जे काळाबरोबर नाहीसं झालं नाही. काही पटकन नाहीसं झालं, तर काही उशिरा. मग ते मंगोल असोत, हूण असोत, मुघल असोत, ब्रिटिश असोत, हिटलर असो, रशिया असो, इंदिरा गांधी असोत, किंवा मोदी असोत? फरक फक्त एवढाच आहे की, काँग्रेस पक्षाला ७० वर्षांत जे भोगावं लागलं, त्याच नशिबाला भाजप अवघ्या १७ वर्षांत पोहोचेल. इंदिरा गांधींनी २४ वर्षांत जी बदनामी मिळवली, ती नरेंद्र मोदींनी केवळ १२ वर्षांत मिळवलीय. भूसंपादन विधेयक आणि नोटाबंदीने सुरू झालेली अपयशांची मालिका 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान अचानक झालेली शस्त्रबंदी, यूजीसीची पलटी आणि आता धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने सुरूच राहिलीय. लाळघोटू प्रसारमाध्यमांनी हे किती झाकून ठेवावं, न्यायपालिकेने किती काळ पाठिंबा द्यावा आणि नोकरशाहीने किती काळ नमतं घ्यावे? सरकारमधली कुजबुज, संघटनेतील वाढती अस्वस्थता आणि त्यांच्या अनुयायांमधला वाढता असंतोष कदाचित मोदीजींपर्यंत पोहोचत नसेल, पण आता बदलणारे वातावरण सर्वांना जाणवतेय. राजा उघडा पडलाय हे सर्वांना माहीत आहे, पण उघडपणे बोलण्याचं धाडस त्यांच्यात नाही.
काळाचं चक्र हळू चालतं, पण ते खूप बारीक दळतं. ब्रिटिश राजवटीतही सूर्य मावळत नव्हता, 'इंडिया इज इंदिरा' ही घोषणा वापरली जात होती, राजीव गांधींनी ४०० जागा जिंकल्या, विश्वनाथ प्रताप सिंह हे राष्ट्राचं भवितव्य होतं, अडवाणींना लोहपुरुष म्हटलं जात होतं... आता तर त्यांचे कट्टर समर्थकही मोदीजींना सोडून जाताहेत. त्यांचं वाढतं वय आणि कमी होत चाललेली आभा यामुळे संघ आणि त्यांच्या समर्थकांमध्ये चिंता वाढतेय. काहींना योगीजींमध्ये भविष्य दिसते, तर काहींना हिमंतामध्ये. दरम्यान, गुजरात्यांवर नाराज असलेले महाराष्ट्र लॉबीमधले देवेंद्र आणि गडकरींसारखे नेतेही संधीची वाट पाहत आहेत. संघ आणि शाह यांच्यातली दरी वाढतेय. सरकार आधीच कुबड्यांवर आहे. राहुल गांधींची स्वीकृती सातत्याने वाढतेय. अशा परिस्थितीत मोदी सरकारसमोर आव्हानांचा डोंगर उभा आहे. एक चुकीचा पत्ता पत्त्यांचा वाडा कोसळायला कारणीभूत ठरेल. जोपर्यंत जहाज पाण्यावर तरंगत असतं, तोपर्यंत प्रत्येकजण कर्णधाराच्या आदेशांचं पालन करतो; जहाजाला छिद्र पडताच, प्रत्येकजण स्वतःचा जीव वाचवण्याच्या चिंतेत पडतो.
भाजपला जायला वेळ लागेल, पण मोदी युगाचा अंत जवळ आलाय. ते कोणाला वाचता येवो वा न येवो, काळाच्या भिंतीवर ते स्पष्टपणे लिहिलंय. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, तोही इतक्या क्षुल्लक कारणावरून आणि केवळ १० हजार लोकांच्या गर्दीसमोर, असह्य आहे. विरोधक याला विजय म्हणून मिरवताहेत, तर समर्थक लोकशाहीचा हवाला देऊन स्वतःचा बचाव करताहेत. शेतकऱ्यांचे आंदोलन आठवते का? संसदेने रीतसर कृषी कायदे मंजूर करूनही, ७०० शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतरही सरकार वर्षभर अविचल राहिले. यावेळी, पेपरफुटीवरून महिनाभर चाललेल्या आंदोलनाने सरकारला घाबरवलेय?
यावरून दिसून येतं की, मोदी कमजोर होताहेत. त्यांची शारीरिक आणि मानसिक शक्ती हळूहळू क्षीण होतेय. त्यांना आपल्या भविष्याची चिंता वाढत चाललीय. इतिहासात ते स्वतःला हिटलर म्हणून नव्हे, तर नेहरू म्हणून पाहू लागलेत. ज्या नेहरूंची ते रात्रंदिवस खिल्ली उडवतात, तेच आता त्यांची सावली बनण्याची आकांक्षा बाळगताहेत. आपला कार्यकाळ एका मुत्सद्दी नेत्याचा म्हणून ओळखला जावा, अशी त्यांची इच्छा आहे, पण हे त्यांनी आतापर्यंत जपलेल्या प्रतिमेच्या विरुद्ध ठरेल. त्यांचे समर्थक २००२ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचं कौतुक करतात, त्यांचा पक्ष त्यांना देवाप्रमाणे मानतो आणि त्यांची संघटना त्यांच्याकडून अधिक कठोर निर्णयांची अपेक्षा करते. पण नरेंद्र मोदींना कदाचित बदलत्या काळाची जाणीव झालीय. आता त्यांना फक्त सत्तेला चिकटून राहायचंय आणि त्यासाठी ते कोणतीही तडजोड स्वीकारतील, जी त्यांच्या पतनाला आणि अपमानाला कारणीभूत ठरेल. अडवाणींच्या उसाशाचा आता परिणाम दिसू लागलाय. 

No comments:

Post a Comment

कोथरूडचे शिल्पकार: शशिकांत सुतार

" कोथरूड महापालिका आणि पुणे म्युनिसिपालीटी....!" असा मथळा असलेली बातमी सकाळ वृत्तपत्रानं १९७९ साली झालेल्या पुणे महापालिका निवडणुक...