"मराठ्यांनी सदैव राष्ट्राचा विचार केला. आपल्याबरोबर राष्ट्र मोठं व्हावं म्हणूनच मराठे धडपडले. पानिपतावर अब्दालीची झुंड रोखण्यासाठी मराठ्यांची एक पिढीच्या पिढी मारता मारता मरावे अशी झुंजून मेली. अब्दालीला पुन्हा भारताकडे वाकडी नजर करून बघायची हिंमत होणार नाही, असा चोप मराठ्यांनी दिला. मराठे पानिपतावर मोडले, पण हे राष्ट्र, इथला समाज आणि धर्म त्यांनी सावरला. मराठ्यांची समशेर हा भारताचा आधार होता म्हणूनच मराठे मोठ्या ताठ मानेनं शिलंगणाला निघायचे. पण महाराष्ट्र धर्म आपण विसरलो. आपसातल्या लाथाळ्यात अन् कुणाचे तरी अनुयायीत्व मिरवण्यात आम्हाला समाधान वाटू लागलं....!"
----------------------------------------------
विजयादशमीला सीमोल्लंघन करायची मराठ्यांची परंपरा होती. महाराष्ट्र धर्म सर्वत्र पसरवण्याच कंकण मराठ्यांनी बांधलं होतं. महाराष्ट्र धर्म हा काय प्रकार आहे? हिंदू धर्मापेक्षा तो वेगळा आहे का? असा सवाल यावर केला जाईल. सुप्रसिद्ध इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांनी या संदर्भात बराच ऊहापोह केलाय. ते म्हणतात, 'महाराष्ट्र धर्माची व्याख्या हिंदू धर्माहूनही जास्त व्यापक आहे...!' समर्थांनी महाराष्ट्र धर्म हा शब्द वापरला त्या काळात महाराष्ट्रातला हिंदू धर्म आणि भारतातला हिंदू धर्म यात महदंतर होते असं सांगून राजवाडे म्हणतात, "महाराष्ट्रतर प्रांतात प्रजा आपला हिंदू धर्म म्हणजे व्रत-उद्यापनं, उपासना-पूजा इत्यादि, यवनांकडून कमीजास्त त्रास पोहोचत असता निमूटपणे चालवीत असत. महाराष्ट्रातली प्रजा मात्र इतकी सोशीक नव्हती... यवनांचा उच्छेद करावयाचा हे त्याकाळी महाराष्ट्रातल्या हिंदू धर्माचं एक कलम होऊन गेलं होतं, पण नुसता यवनांचा उच्छेद करून काम भागण्यासारखं नव्हतं, तर स्वराज्याची स्थापना करणं जरूर होतं. तेव्हा स्वराज्याची स्थापना करणं हेही एक महाराष्ट्रातल्या हिंदू धर्माचं मुख्य कलम होऊन बसलं. स्वराज्याची स्थापना करण्यासाठी दोन गोष्टी केल्या पाहिजेत, असं शिवाजी महाराजांच्या लक्षांत आलं. मराठ्यांचं एकीकरण केलं पाहिजे ही एक गोष्ट आणि त्यांचं धुरीधरण म्हणजे पुढारपण स्वीकारलं पाहिजे ही दुसरी गोष्ट...!" त्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी केलं आणि अन्य प्रांतातल्या हिंदू धर्मापेक्षा काही आगळं इथं या मराठी मातीत घडतंय, याचा देशवासीयांना प्रत्यय आला. राजवाडे म्हणतात, "महाराष्ट्रतर प्रांतातला हिंदू धर्म + धर्मस्थापना + गोब्राह्मणप्रतिपाल + स्वराज्यस्थापना + एकीकरण धुरीधरण म्हणजे महाराष्ट्रातला हिंदू धर्म होतो अशी त्या काळी समजूत होती. ह्याच समजुतीला समर्थ रामदासांनी महाराष्ट्र धर्म अशी संज्ञा दिली. महाराष्ट्रतर प्रांतातल्या हिंदू धर्माला सहिष्णु हिंदू धर्म म्हटल्यास आणि महाराष्ट्रातल्या हिंदू धर्माला जयिष्णु हिंदू धर्म म्हटल्यास या दोन्ही धर्मातला भेद उत्कटत्वेकरून स्पष्ट होतील. १६४६ पासून १७७६ पर्यंत ह्या कल्पनेला मराठे साक्षात स्वरूप देत होते आणि बरोबर १५० वर्षे ह्या कल्पनेच्या धोरणानं मराठे चालले होते. महाराष्ट्र धर्माची ही कल्पना मराठ्यांच्या ह्या १५० वर्षांतल्या हालचालींची केवळ प्राणभूत आहे...!"
मराठ्यांनी सदैव राष्ट्राचा विचार केला. आपल्याबरोबर राष्ट्र मोठं व्हावं म्हणूनच मराठे धडपडले. पानिपतावर अब्दालीची झुंड रोखण्यासाठी मराठ्यांची एक पिढीच्या पिढी मारता मारता मरावे अशी झुंजून मेली. अब्दालीला पुन्हा भारताकडे वाकडी नजर करून बघायची हिंमत होणार नाही, असा चोप मराठ्यांनी दिला. मराठे पानिपतावर मोडले, पण हे राष्ट्र, इथला समाज आणि धर्म त्यांनी सावरला. मराठ्यांची समशेर हा भारताचा आधार होता म्हणूनच मराठे मोठ्या ताठ मानेनं शिलंगणाला निघायचे. पण महाराष्ट्र धर्म आपण विसरलो. आपसातल्या लाथाळ्यात आणि कुणाचे तरी अनुयायीत्व मिरवण्यात आम्हाला समाधान वाटू लागलं. मग आमच्या पाठ्यपुस्तकांतून मराठी माणसाचा मोरू प्रवेशला. 'नवरात्र संपले. दसरा उजाडला. मोरूचा बाप मोरूला म्हणाला, उठ... पालख्या उचलण्याचं, सतरंज्या घालण्याचं, मुजरे करण्याचं काम इमानदारीनं करायला तयार हो....!' महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे ही 'स्वामी'निष्ठा यातूनच निर्माण झाली असावी का? वास्तविक, हे राष्ट्र मोठं करण्याचं काम आम्ही करतो म्हणूनच मराठ्यांच्या भूमीला महाराष्ट्र हे नाव आहे, असं छातीठोकपणे सांगणारी आणि त्यानुसार विविध क्षेत्रात कर्तबगारी गाजवणारी माणसं महाराष्ट्रात झाली आहेत. त्या कर्तृत्ववान मराठी पुत्रांमुळेच 'महाराष्ट्र आधार या भारताचा...!' हा विश्वास निर्माण झाला. महाराष्ट्राचं वैभव तळपू लागलं. त्याचा जेव्हा अभाव जाणवला तेव्हा महाराष्ट्रावर अन्याय लादला गेला आणि त्या अन्यायानंच अंगार पेटावा तसा मराठा धगधगून उठला.
प्रत्येक विजयादशमीला शिवतीर्थावरून बाळासाहेब ठाकरे यांनी पाकिस्तानविरुद्ध जी रोखठोक भाषा करतात ती महाराष्ट्र धर्माचा एल्गार आहे.
'देशद्रोही तितके कुत्ते। मारोनि घालावे परते।
देवदास पावती फत्ते। यदर्थी संशय नाही।'
ह्या समर्थांच्या समर्थ विचारांचा प्रत्यय देणारी भाषा बाळासाहेबांनी ऐकवलीय आणि ह्या भाषेमागे सामर्थ्य उभं होतं ते लक्षावधी तरुणांचं. 'जो देश तुमच्या नरडीचा घोट घ्यायला टपलाय, त्या देशाचा खेळाडू हिंदुस्थानातल्या स्टेडियमवर खेळायला आला तर त्या स्टेडियमला आग लावून टाकू....!' ही एकट्या बाळासाहेबांची वा शिवसेनेची भाषा नाही, ही भाषा आहे महाराष्ट्र धर्म जागवणाऱ्या प्रत्येकाची. खिलाडूपणा दाखवा, खेळात राजकारण दाखवू नका हे उपदेश करणारी गांडुळे मराठी मातीचा स्वाभिमान पोखरणारी आहेत. शीख अतिरेकी आणि काश्मिरी अतिरेकी यांना हाताशी धरून पाकिस्तान या देशात अराजक माजवू बघत असताना खिलाडूपणा दाखवण्याची भाषा जे करतात त्यांना या देशाचा खेळखंडोबा व्हायला हवाय. अतिरेक्यांना पाकिस्तान लष्करी शिक्षण देतोय, शस्त्रास्त्रे देतोय, पैसा देतोय. खेरीज भारतातल्या घरभेद्यांमार्फत अतिरेक्यांना आश्रय देण्याचं कामही पाकिस्ताननं चालवलंय, असं केंद्रीय नेते रोजच्या रोज सांगताहेत. पाकिस्ताननं हे सारे प्रकार थांबवावेत म्हणून अमेरिकेनं लक्ष घालावं, असेही प्रयत्न होताहेत आणि असं असताना या भूमीवर पाकिस्तानी खेळाडू उभे राहणार? इथल्या अडाणी धर्मांधांना चेकाळायला ही गोष्ट पुरी आहे, हे सरकारला समजू नये? हा प्रकार खिलाडूपणाचा नाही. मुर्दाडपणाचा आहे. लज्जास्पद आहे. कानाखाली आवाज काढूनच तो थांबवायला हवा. बाळासाहेबांनी नेहमीच विजयादशमीच्या मुहूर्तावर कानाखाली आवाज काढलाय. सरकारनं शहाणपणानं पाकिस्तानचा दौरा थांबवावा. शिवसेनेनं कुठलीही भूमिका घेतली की, त्याविरुद्ध गळा काढायची पद्धत काही मंडळींनी आत्मसात केली होती. त्याप्रमाणे पत्रकं निघू लागली. कदाचित राष्ट्रीय ऐक्य धोक्यात आल्याची आरोळी ठोकून सामना व्हायलाच हवा, यासाठी व्यापक आघाडी उघडायलाही सध्या मोडीत निघालेले पुढारी पुढं येतील.
पण हट्टानं पाकिस्तानी संघ या भूमीवर आणायचा प्रयत्न होईल तर क्रिकेटचा कायमचाच त्रिफळा उडेल. हे सामने सरकारनं रद्द करावेत. पाकिस्तानच्या कारवायांमुळे भारतीय जनता किती प्रक्षुब्ध झालीय हे त्यामुळं तरी पाकिस्तानला कळेल. जर सरकार हे करणार नसेल तर लोकांना आपली प्रक्षुब्धता प्रत्यक्षात दाखवावीच लागेल. यासाठी स्टेडियम पेटवण्याची जरुरी नाही. स्टेडियममध्ये लाखो लोकांनी घोषणा देत आसमंत दुमदुमून टाकण्याचा शिस्तबद्ध सत्याग्रह करूनही या प्रक्षोभाचं दर्शन घडवता येईल. राष्ट्रवाद्यांनी आता अशाप्रकारे आपलं विराट रूप वारंवार दाखवणं आवश्यक आहे. निरपराधांचे मुडदे पाडले, गाड्या उलटवल्या, बॉम्बस्फोट केले, बँका लुटल्या तरी इथले कोट्यवधी लोक निमूट सारं सहन करतात, हा समज आता दूर व्हायलाच हवाय. आमच्या सहिष्णुतेचा, आमच्या सभ्यतेचा, आमच्या संयमाचा गैरफायदा घेतला जातोय. तो थांबवण्यासाठी जरूर तेवढं आक्रमक वा आक्रस्ताळे होण्याचीच आज गरज आहे. राजवाडे यांनी एके ठिकाणी म्हटलंय, "अंतस्थ यादवीनं विस्कळीत होऊन हिंदुजाती क्षीण आणि सौम्य राहिल्यामुळे बेमुर्वत तुटून पडण्यानं मुसलमानांनी आपलं वर्चस्व चांगलं राखिलं; परंतु शत्रुच्या अंगावर जीवाकडे न पाहता बेमुर्वत तुटून पडण्याचं मुसलमानांचं वर्म जेव्हा हिंदूंच्या ध्यानात आलं आणि आचरणात आणण्याचा जेव्हा हिंदूंनी उपक्रम केला तेव्हा मुसलमानांच्या हातचं राज्ययंत्र शिवकाली पुन्हा हिंदूंच्या हाती आलं. जीवाकडे न पाहता बेमुर्वत शत्रूवर तुटून पडणं हिंदूंनी आपलंस केल्याबरोबर मुसलमान समाजाची रग मोडली...!" पाकिस्तानाची आणि भारतात राहून पाकिस्तानी उद्योग करणाऱ्या हरामखोरांची रग मोडायची असेल तर जीवाकडे न पाहता बेमुर्वत तुटून पडण्याचं तंत्रच आपण आत्मसात करायला हवं. हे जो करील तोच खरा हिंदुत्वाला जागेल. महाराष्ट्र धर्म वाढवेल.
हिंदुत्वाच्या नावानं गल्ला गोळा करण्याचं आणि भोळ्याभाबड्यांना आणखी भोळेभाबडे बनवण्याचे उद्योग मोदी शहा कंपनीनं चालवलेत. प्रत्येक थोर पुरुषाचं नाव वापरून आपली तुंबडी भरण्याचा उद्योग होतोय. डोळस राष्ट्रनिष्ठा, डोळस राष्ट्रहित यांना नकोच आहे. इथल्या मुसलमानांना आपण पाकिस्तानवादी बनवत आहोत का? त्यांच्या मनात आपण निष्कारण भय निर्माण करत आहोत का? पाकिस्तानात आज इथून गेलेल्या मुसलमानांना काय भोगावं लागतंय हे आपण इथल्या मुसलमानांना समजून देत आहोत का? याचाही विचार आपण करायला हवाय. जे प्रेमानं आपले होणार नसतील त्यांना जरूर तर धाकानं आपलं बनवावं लागेल, पण सरसकट सगळ्यांना आपण राष्ट्रद्रोही म्हणून राष्ट्रद्रोही बनवणं हा आपलाच घात ठरेल. नांग्या वर करून वारंवार दंश करू बघणाऱ्यांच्या नांग्या जादा मचमच न करता मोडायलाच हव्यात, पण या देशासाठी, हिंदू धर्मासाठी कापले जात असतानाही ज्यांनी द्रोहाचा विचारही मनाला स्पर्श दिला नाही, ते शीख बांधव पाकिस्तानी बुद्धीनं आज का वागत आहेत याचाही आपण विचार करायला हवाय. हिंदुत्वाच्या चुकीच्या अहंगंडानं तर हे घडलं नाही ना? बाळासाहेब ठाकरे ही एक महाशक्ती आहे. ज्यांना काही करून दाखवण्याची ईर्षा, ताकद असते अशा तरुणांचा त्यांच्यावर विश्वास आहे. राष्ट्रहितासाठी याचा वापर करून घेण्याची बुद्धी राष्ट्रनेत्यांना व्हायला हवी. आज देशात अराजक-सदृश परिस्थिती आहे. लक्षावधी पाकिस्तानी-बांगला देशी आणि श्रीलंकेचे रहिवासी भारतात घुसलेत. भारतीय म्हणून राहात आहेत आणि भारतद्रोह्यांना सहाय्य होईल असं वागताहेत. त्यांना हुडकून काढणं पोलिसांना शक्य होत नाही. लष्कराला यात गुंतवणं योग्य नाही. मग तरुणांनी स्वयंसेवक पथकं उभारून झोपडपट्टया, गावोगावे, गल्लीबोळ, रानं वनं पिंजून काढून घुसखोरांना पकडण्याचं काम पोलिसांच्या सहकार्यानं का करू नये? शस्त्रास्त्रे जमवण्याचा उद्योग केला जातोय, विघातक गोष्टींची भेसळ करून बनावट माल बनवण्याचा प्रकार होतोय या सगळ्यावर नजर ठेवण्याचं कामही या तरुणांच्या मदतीनं होऊ शकेल. पण आज समाजात फळ्या पडल्यात. जाती होत्या, त्यातच ही नवी भर. ते काम त्याचं, आम्हाला काय करायचंय! सत्ता आमच्या हातात द्या, मग बघतो! हे सगळेच म्हणतात. सत्ता नाही तरीही हे करून दाखवतो असं म्हणून पुढं यायला काय हरकत आहे? शिवसेनेचं मला कौतुक जरूर आहे, पण मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता असूनही मुंबईची अवस्था काय आहे? महापौर शिवसेनेचा, पण मुंबईतला गल्लीबोळ कुणाचा? याचाही विचार व्हायला पाहिजे. समर्थांनी महाराष्ट्र धर्म सांगितला त्याचप्रमाणे समाज उद्धरणाचे तीन मार्गही सांगितलेत. १) नीतिस्थापना २) धर्मस्थापना ३) राज्यस्थापना. शिवसेना एकदम तिसऱ्या क्रमांकावर उतरलीय. दुसऱ्या मार्गासाठी तिनं नको त्यांच्याशी युती केलीय आणि पहिला मार्ग तर चक्क दुर्लक्षलाच आहे, असं जाणवतेय. निवडणुका लढवायच्या, मग भ्रष्टाचार करावाच लागतो ही झाली सबब. असो. अनेक कुठं होते, कुठं पोहोचले याचा हिशोब घेऊनच तो विषय मांडावा लागेल. आज बेमुर्वतपणे तुटून पडण्यासाठी शिवसेना उभी ठाकलीय. पाकिस्तान्यांची रग मोडण्यासाठी कुणीतरी असं उभं राहायला हवंच होतं. क्रिकेटपेक्षा राष्ट्राचा सन्मान अधिक मोलाचा आहे, हे दिल्लीतल्या नामधारी नरसिंहाना कळायला नको ?
मराठी माणसाच्या भल्यासाठी स्वायत्त महाराष्ट्र हाच एकमेव पर्याय आहे. आम्ही परप्रांतीय लोंढे रोखण्यासाठी व्हिसा कायदा (InnerLine permit) आणि अधिवास कायद्याची मागणी करत आहोत. राज्यातील नोकऱ्या, परवाने स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्याने मिळण्यासाठी मागणी करत आहोत. पण हे सर्व करण्यासाठी आपल्याला आपल्या विचारांमध्ये परिवर्तन करावे लागणार आहे. जुने विचार बाजूला ठेवून, नवीन विचाराने काम करावे लागणार आहे. येणाऱ्या काळात मराठी मुद्द्यांवर संघर्ष अटळ आहे. महाराष्ट्र राज्यावरील हक्क अधिकार अबाधित ठेवण्यासाठी, स्वायत्त महाराष्ट्राची मागणी लावून धरावी लागणार. जर या मागण्यांसाठी आपण संघटित झालो नाही, तर येत्या काही दशकात राज्यावरील आपले हक्क अधिकार संपुष्टात आलेले असतील. मुंबईसह महाराष्ट्र राज्य व्हावे यासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही.
महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे १९६० रोजी झाली असली तरी त्याआधी सध्या जो महाराष्ट्र आपल्याला दिसतो तो कसा होता, कोणती भाषा प्रामुख्याने बोलली जात होती, संस्कृती कशी होती याबद्दलचा इतिहास तसा अनेक ठिकाणी सांगितला आणि लिहिला गेला आहे. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यापासून यशवंतरावांनी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणेपर्यंत महाराष्ट्राने अनेक स्थित्यंतरं पाहिली. मराठी ही भाषा महाराष्ट्राच्या अर्थातच केंद्रस्थानी होती. आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मराठीचेही वेगवेगळे प्रकार आहेत. त्या सर्व भाषा, त्यामागची संस्कृती यांचा संगम म्हणजे महाराष्ट्र धर्म असं ढोबळमानानं म्हणता येईल. महाराष्ट्र धर्माची व्याख्या करताना ज्येष्ठ विचारवंत सदानंद मोरे म्हणतात, "महाराष्ट्र धर्म या शब्दावर महाराष्ट्रात जितकी चर्चा झाली तितकी आणखी कोणत्याही शब्दावर झालेली नाही. महाराष्ट्रात राजाराम भागवत आणि न्या, रानडे यांनी ही संकल्पना आणली. मग वि.का.राजवाडे यांनी तो शब्द सुधारला. महाराष्ट्राचा राष्ट्रीय धर्म म्हणजे महाराष्ट्र धर्म. महाराष्ट्रातील लोकांचा हा धर्म. हा म्हणजे काही नुसता कर्मकांडाचा धर्म नाही. हा शब्द पहिल्यांदा रामदासांनी वापरला असा समज सगळ्यांना होता. महाराष्ट्रात राहणारे ते मराठा, त्यांचा धर्म म्हणजे महाराष्ट्र धर्म. प्रत्येकाचा काही ना काही धर्म असतो. महाराष्ट्रातील लोकांचं राष्ट्रीय कर्तव्य अशा अर्थाने तो शब्द वापरतात. हा शब्द वापरावा लागला कारण शिवाजी महाराज ते पेशव्यांच्या काळापर्यंत मराठा समाजाच्या ज्या हालचाली झाल्या त्याला कोणतंही सूत्र नव्हतं, असा सिद्धांत ग्रॅहम डफने मांडला होता. भारताच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राने पुढे असलं पाहिजे असाही या शब्दाचा अर्थ होतो.
ज्येष्ठ इतिहासकार गजानन मेहेंदळे म्हणतात. "वि. का. राजवाडे यांनी एका प्रस्तावनेत याविषयी विवेचन केलं आहे. त्यांच्या मते लढाऊ वृत्तीचा हिंदू धर्म म्हणजे महाराष्ट्र धर्म अशी त्यांनी व्याख्या केली आहे. मला तसं वाटत नाही. महाराष्ट्र धर्म हा हिंदू धर्म आहे, त्याच्यापलीकडे काहीही नाही. त्याला अनेक पुरावे आहेत, अनेक पत्रं उपलब्ध आहेत. या सगळ्या पत्रातून महाराष्ट्र धर्म हाच हिंदू धर्म आहे असं लक्षात येतं. माधव दातार यांनी 'महाराष्ट्र : एका संकल्पनेचा मागोवा' हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात ते म्हणतात, "सध्याच्या काळात आपण धर्म या अर्थाने हा शब्द वापरतो, पुरातन काळी हा अर्थ त्यातून अभिप्रेत नव्हता. पूर्वी लोक ज्या अर्थाने धर्म हा शब्द वापरायचे आणि आता ज्या अर्थाने तो वापरतात त्यात फरक आहे. राज ठाकरे किंवा बाळ ठाकरे धर्म हा शब्द वापरतात तेव्हा त्यांना वेगळा अर्थ अभिप्रेत आहे. एका भागात येणारे एकत्र येणारे लोक आणि त्यांची समान उद्दिष्टं या अर्थाने हा शब्द आधीही वापरला गेला होता. राजकारणी लोक त्याचा वापर करतात." ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांच्या मते 'मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा' या रामदासांच्या संदेशातून ही व्याख्या अस्तित्वात आली आहे. ही व्याख्या अजूनही अबाधित असल्याचं मत ते व्यक्त करतात. त्याचवेळी माधव दातार यांच्यामते ही व्याख्या कालानुरूप बदलत गेली. जेव्हा रामदास त्याविषयी बोलायचे तेव्हा त्यांना या भागात राहणारे हिंदू लोक अभिप्रेत होते. कारण पूर्वी महाराष्ट्र हा शब्द जेव्हा वापरला जायचा तेव्हा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र हाच भाग होता. आता तो बदलत गेला. त्यात भाषेचा मुद्दाही आला. महाराष्ट्राची जी चळवळ झाली त्यात सगळीकडून मराठी लोक एकत्र यावेत हा एक भाग या व्याख्येत होता. न्या. म. गो. रानडे यांनी या शब्दाची व्याख्या करताना 'शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रातला उदय' या अर्थाने त्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांची महाराष्ट्र धर्माची कल्पना अधिक आधुनिक होती. एकूणच संत रामदासांनी या मांडलेल्या संकल्पनेचा विस्तार वि.का.राजवाडे, न्या. म. गो. रानडे यांनी केला. प्रत्येकाने या व्याख्येतून वेगवेगळे अर्थ अभिप्रेत होते.
No comments:
Post a Comment