कांशीराम हे नाव घेतलं की डोळ्यासमोर सर्वांत आधी येतो तो उत्तर प्रदेश. पण अनेकांना हे बहुधा माहिती नसेल की, ज्या कांशीरामांनी उत्तर प्रदेशात बहुजनांच्या राजकारणाचा पाया रचला ते कांशीराम मूळचे पंजाबचे होते. त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे कांशीराम यांनी त्यांच्या राजकारणाची सुरुवात महाराष्ट्रातून केली होती. तरीही महाराष्ट्रातली आंबेडकरी चळवळ कांशीरामांपासून अंतर राखून का आहे? स्वतःचं मूळ राज्य पंजाब सोडून कांशीराम यांनी उत्तर प्रदेशात निवडणुकीचं राजकारण का केलं? पंजाबमध्ये त्यांचं राजकारण का फळलं नाही? पंजाबमध्ये त्यांनी ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या खूपआधी बिंद्रनवालेंना बरोबर घेण्याचा प्रयत्न केला होता का?
--------------------------------------------
अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कांशीराम यांचं आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं मिशन एकच होतं, पण मार्ग मात्र वेगळे होते, घटना पुण्यातली आहे. १९५७ मध्ये कांशीराम पुण्यातल्या संरक्षण विभागाच्या आयुधं निर्मिती करणाऱ्या कारखान्यात रिसर्च असिंस्टंट म्हणून कामाला लागले. तिथं पाच वर्षं काम केल्यानंतर घडलेल्या घटनेनं त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली. कारखान्यात आधी बुद्ध जयंती आणि आंबेडकर जयंतीला सुट्टी मिळायची. पण प्रशासनाकडून त्यात बदल करण्यात आला. या सुट्ट्या कायम राहाव्यात यासाठी त्यांनी युनियनला हाताशी धरून लढा उभारला. तत्कालीन संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाणांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आणि या सुट्ट्या पुन्हा लागू केल्या. याच काळात पुण्यात कांशीराम यांचा संबंध महात्मा जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याशी आला.
देशातली सत्ता ही फक्त १५ टक्के असलेल्या तथाकथित उच्चजातीच्या हाती एकवटल्याचं त्यांच्या लक्षात आलं. हे चित्र बदलायचं असेल तर ८५ टक्के लोकांची एकजूट आवश्यक आहे, हेसुद्धा त्यांच्या लक्षात आलं. झालं, मग कांशीराम यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि राजकारणात उडी घेतली.
१९७८ मध्ये त्यांनी बामसेफची स्थापना केली, तर १९८२ मध्ये त्यांनी डीएस-4 दलित शोषित संघर्ष समिती ची स्थापना केली. पुण्यात कामाला असलेल्या कांशीराम यांनी महाराष्ट्रातूनच राजकीय संघर्ष सुरू केला. महाराष्ट्रात आधीपासून असलेली आंबेडकरी चळवळ त्यांच्यासाठी पूरक ठरली. त्याकाळी जॉर्ज फर्नांडिसांसारखे युनियन लीडर महाराष्ट्रात येऊन राजकारण करत असताना कांशीराम यांनी मात्र तसं केलं नाही. असं काय घडलं की कांशीराम यांनी महाराष्ट्रात निवडणुकीचं राजकारण केलं नाही. याचं कारण असं होतं की, ते जातीने चांभार होते. महाराष्ट्रातला आंबेडकरी विचारांचा सर्वांत मोठा वर्ग होता बौद्ध लोकांचा, म्हणजे पूर्वाश्रमीचे महार. हा समाज इतर कुणाचं नेतृत्व स्वीकारत नाही. त्यामुळे कांशीराम याचं नेतृत्व इथं सर्वमान्य होण्याची शक्यता नव्हती. त्यातच १९७६ च्या औरंगाबाद विद्यापीठ नामांतर लढ्यात त्यांनी घेतलेल्या भूमिकेनं त्यांना महाराष्ट्राच्या राजकीय परिघापासून दूर केलं.मराठवाडा विद्यापीठ नामंतराच्या आंदोलनात कांशीराम यांनी विरोधी भूमिका घेतली. हे आंदोलन म्हणजे ब्राह्मण वर्गाची चाल आहे, अशी त्यांनी भूमिका घेतली. जी लोकांना अजिबात पटली नाही. नामांतर आंदोलनावेळी दलित समाजावर झालेले अन्याय आणि अत्याचार पाहाता ती चळवळ अधिक तीव्र करावी असं आम्हाला वाटत होतं. पण कांशीराम यांचा त्याला विरोध होता. त्यामुळे हळूहळू कांशीराम महाराष्ट्रातल्या लोकांच्या नजरेतून उतरत गेले.
हे सगळं घडत असताना पंजाब आणि उत्तर प्रदेशात मात्र त्यांनी त्याच्या राजकारणाचा जम बसवण्याचा प्रयत्न सुरू केला होता. आता बहुजनांच्या हाती सत्ता हवी तर डीएस-4 आणि बामसेफ पुरेसं नव्हतं हे कांशीराम यांच्या लक्षात आलं होतं. परिणामी त्यांनी राजकारण करण्यासाठी १४ एप्रिल १९९४ मध्ये स्वत:ची बहुजन समाज पार्टी काढली. 'जिसकी जितनी संख्या भारी, उतनी उसकी हिस्सेदारी.' आणि 'जो बहुजन की बात करेगा, वो दिल्ली पर राज करेगा,' असे नारे कांशीराम यांनी दिले. आता पक्ष काढला तर निवडणुका लढवणं आलंच. १९८४ मध्ये पक्षाची स्थापना झाली आणि त्याचवर्षी लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा झाली. बसपाने ९ राज्य आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये निवडणूक लढवली. या निवडणुकीत पक्षाला १० लाख मतं मिळाली. त्यातली ६ लाख मतं एकट्या उत्तर प्रदेशातून मिळाली होती. राम मंदिर आंदोलनाच्या आधीच्या आणि मंडल आयोगाच्या काळात हे सगळं घडत होतं. हीच खरी संधी आहे हे कांशीराम यांनी हेरलं आणि उत्तर प्रदेशात काम सुरू केलं.
उत्तर प्रदेशातल्या प्रोफेसर बद्रीनारायण यांनी कांशीराम यांचं चरित्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी लिहिलंय की, "उत्तरप्रदेश का निवडलं याचं उत्तर स्वतः कांशीराम देत असत. ते सांगत हे महाराष्ट्रातलं रोपटं आम्ही उत्तर प्रदेशातल्या मातीत रुजवलं आहे. उत्तरप्रदेशात दलितांचं दमन पंजाबपेक्षा जास्त आहे. एक दलित असून पंजाबमध्ये मी एवढे दलित अत्याचार कधी पाहिले नव्हते जेवढे मला यूपीत दिसतात, असं ते सांगत. शिवाय मंदिर आंदोलनाच्या आधीचा हा काळ होता. तेव्हा त्यांना त्यांचं राजकारण प्रस्थापित करण्यासाठी संधी मिळाली. त्यासाठी त्यांनी रामायण आणि महाभारताच्या कथांचा प्रतिवाद तयार केला. या कथांमध्ये अत्याचार झालेल्या व्यक्तींमध्ये त्यांनी दलितांची प्रतीकं आणि आदर्श शोधले. कारण त्यांना हे माहिती होतं की यूपीत राजकारण करण्यासाठी हे सर्व फार महत्त्वाचं आहे. या भागाला लोक आर्यवर्त म्हणतात. पण मी याभागाला चांभारवर्त करेल असं ते कायम म्हणायचे. आणि त्यांनी ते केलं सुद्धा...!" मायावतींसारख्या दलित महिलेला त्यांनी ४ वेळा मुख्यमंत्री केलं. तेही त्या राज्यात तिथं कमलापती त्रिपाठींसारख्या मुख्यमंत्र्यांची परंपरा होती. खरंतर कांशीराम आणि आंबेडकर यांचं मिशन एकच होतं. पण दोघांचे मार्ग मात्र वेगवेगळे होते. आंबेडकरांनी बहुजनांना राज्यकर्ती जमात व्हा असं सांगितलं होतं. तर कांशीराम यांना मात्र बहुजनांनी सत्ताधारी जमात व्हावं असं वाटत होतं. कांशीराम कायम सांगत की, आंबेडकरांनी पुस्तकं एकत्र केली मी लोकांना एकत्र केलं. आंबेडकर चिंतन करत लेखन करत त्यांनी खूप लिखाण केलं आहे. पण कांशीराम यांनी मात्र फक्त 'द चमचा एज' (The Chamcha Age) हे एकच पुस्तक लिहिलं. पण त्यांनी चळवळ उभी केली, समाजाला एकत्र आणलं. निवडणुकीचं राजकारण केलं. त्यात यश मिळवलं पण आंबेडकरांना मात्र ते फारसं मिळालं नाही...!असं बद्रीनारायण यांनी लिहिलंय. बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम यांचा जन्म १५ मार्च १९३४ मध्ये पंजाबात झाला होता. तर त्यांचं निधन ९ ऑक्टोबर २००६ मध्ये दिल्लीत झालं.
कांशीराम यांचे कुटुंबीय म्हणजे त्यांचे बहीण-भाऊ आज देखील पंजाबमध्येच राहतात. कांशीराम यांचे २००६ मध्ये निधन झालं. त्यांच्या निधनापूर्वी त्यांच्या कुटुंबीयांवरुन वाद झाला होता. कांशीराम आजारी असताना त्यांची आई आणि भाऊ त्यांना आपल्यासोबत ठेवू इच्छित होते. मात्र न्यायालयाने त्यांनी केलेली याचिका फेटाळून लावत मायावती यांच्या देखरेखीखाली कांशीराम यांना ठेवण्यास मंजूरी दिली. त्यांचे खरे बहीण-भाऊ आता कुठे आहेत?, काय करत आहेत?, त्यांनी राजकारणात स्थान मिळवण्याचा प्रयत्न केला का? यावर आपण नजर टाकणार आहोत. खूप वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या कुटुंबासोबत राहणं सोडलं होते. शेवटच्या दिवसांमध्ये ते खूप आजारी होते तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना आपल्याकडे पाठवण्यासाठी न्यायालाकडे मदत मागितली होती. त्यांचे कुटुंबीय म्हणजे त्यांचे बहीण-भाऊ आज देखील पंजाबमध्येच राहतात. कांशीराम यांचे २००६ मध्ये निधन झालं. त्यांच्या निधनापूर्वी त्यांच्या कुटुंबीयांवरुन वाद झाला होता. कांशीराम आजारी असताना त्यांची आई आणि भाऊ त्यांना आपल्यासोबत ठेवू इच्छित होते. मात्र न्यायालयाने त्यांनी केलेली याचिका फेटाळून लावत मायावती यांच्या देखरेखीखाली कांशीराम यांना ठेवण्यास मंजूरी दिली. कांशीराम यांच्या कुटुंबातील काही सदस्य आतासुद्धा पंजाबमधील आनंदपूर साहिब जिल्ह्यातील पृथ्वीपूर गावामध्ये राहतात. त्यांच्या एका भावाने मागच्या निवडणुकीत आपले समर्थन काँग्रेसचे उमेदवार मनीष तिवारी यांना दिले होते. पण कांशीराम याचे छोटेभाऊ हरबंससिंग त्याविरोधात उभे राहिले. त्यांनी निर्णय घेतला होता की, 'ते राजकारणी लोकांच्या हातातील निवडणूकीत कळसूत्री बाहुली होणार नाहीत.'
कांशीराम यांची बहीण स्वर्णकौर पृथ्वीपूर गावामध्येच राहतात. त्यांनी जवळपास दोन वर्षांपूर्वी मुलाखत दिली होती. त्यामध्ये त्यांनी सांगितले होते की, 'मी एका पक्षाच्या रुपाने बसपाला समर्थन देते. कारण त्यांनी माझ्या मोठ्या भावाला राजकारणात उच्चपद मिळवून दिलं. पण आता मी कोणत्याही इतर पक्षाचे समर्थन करत नाही. कारण जी लोकं बसपामध्ये आहेत त्यांना फक्त माझ्या भावाच्या नावानं मतं मिळवायची आहेत. २०१७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी स्वर्ण कौर यांना संपर्क करत आपच्या तिकीटावर निवडणूक लढवा असं सांगितल होते पण स्वर्ण कौर यांनी नकार दिला. आनंदपूर साहिबमध्ये दलितांची मोठी लोकसंख्या आहे. त्यांच्यावर कांशीराम यांच्या कुटुंबीयांचा प्रभाव देखील आहे. त्यामुळे निवडणुकांच्या वेळी राजकीय पक्ष कांशीराम यांच्या कुटुंबियांना आपल्या सोबत ठेवू इच्छितात. २०१४ मध्ये सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कांशीराम यांचे छोटे भाऊ दरबारा सिंग यांनी अकाली दलाचे उमेदवार प्रेम सिंग चंदूमाजरा यांना पूर्ण समर्थन दिले होते आणि ते निवडणूक जिंकले होते. पण २०१९ मध्ये दरबार यांचे समर्थन काँग्रेसकडे गेले. कांशीराम यांचे छोटे भाऊ दरबारा सिंग यांनी काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्राला मुलाखत देताना सांगितलं होतं की, 'आमचं नातं मायावती यांच्याशी चांगलं नाही. आम्ही तोपर्यंत बसपाला समर्थन करणार नाही जोपर्यंत त्या स्वत:हून आमच्याकडे मदत मागत नाहीत.' कांशीराम यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांचे मायावती यांच्यासोबत नातं खूपच कडू झालं. दरबारा सिंग यांनी २००८ मध्ये आपल्या नवीन पक्षाची घोषणा केली. या पक्षाचे नाव बहुजन संघर्ष पार्टी असे ठेवण्यात आले होते. या पक्षाने उत्तर प्रदेशमध्येही उमेदवार उभे केले होते. पण हे सर्व लवकरच संपुष्टात आलं.
‘जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागेदारी’ ही घोषणा कांशीराम यांची. त्यांनी उत्तर प्रदेशसह देशभरातल्या राजकारणात दलितांना सत्तास्थानी पोहचवलं. या प्रवासात त्यांच्या समोर अनेक प्रस्ताव ठेवण्यात आले. त्यापैकी एक किस्सा जो आपल्यातल्या बऱ्याच जणांना माहिती नसेल. भाजप आणि बसप या परस्परविरोधी टोकाची विचारधारा असणारे पक्ष. भारतीय जनता पार्टीचे बडे नेते तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी बहूजन समाज पार्टीचे संस्थापक कांशीराम यांना राष्ट्रपती पदाची ऑफर दिली होती. हा प्रस्ताव नाकारत ते म्हणाले होते की, “मला राष्ट्रपती नाही पंतप्रधान पद हवं आहे....” हा किस्सा बऱ्याचदा चर्चला गेला आहे. पण वाजपेयींना कांशीराम राष्ट्रपती म्हणून का हवे होते? याचा सवाल कुणी विचारत नाही. राजकारणात विरोधकाला प्रसन्न करणं हा त्याला कमजोर करण्याचा प्रयत्न असतो. वाजपेयी राजकारणाचा हा नियम शिताफिन वापरत असतील ही. परंतू जाणकारांच्या मते कांशीराम यांना पुर्णपणे समजण्यात वाजपेयींनी चुक केल होती. त्यांना कांशीरामांबद्दल पुर्ण परिकल्पना असती तर त्यांनी कधीच हा प्रस्ताव कांशीराम यांच्यासमोर ठेवला नसता वाजपेयींचा प्रस्ताव नाकारणाऱ्या कांशीराम यांची ही कृती त्यांच्या आयुष्याचे ध्येय अधोरेखित करते. वर्षानूवर्षे गुलामी करणाऱ्या दलित समुदायाला सत्तास्थानी पोहचवणं त्यांच ध्येय होतं. दलितांना ‘फर्स्ट अमंग्स द इक्वल्स’ बनवनं. मायवतींच्या माध्यमातून त्यांनी ही गोष्ट करुन दाखवली. त्यांच्यावर नेहमी आरोप करण्यात आले की कोणत्याच आघाडीशी ते प्रामाणिक राहीले नाहीत. त्यांनी कॉंग्रेस, भाजप आणि समाजवादी पार्टीसोबत आघाडी केली. स्वतःच्या ध्येय धोरणां पायी त्यांनी या आघाड्या घडवून आणल्या. याबद्दल टिकाकारांनी नेहमी त्यांच्यावर टीका केली. कांशीराम यांनी या आरोपांवर एका मुलाखतीत उत्तर देताना म्हणलं होतं, “मी त्यांना राजकीय पक्षांना खुश करण्यासाठी राजकारण करत नाहीये.’ राजकीय आणि सामाजिक संघर्षावेळी कांशीराम यांनी ब्राम्हणवादाशी संबंधीत प्रत्येक गोष्टीचा विरोध केला. मग ते महात्मा गांधी असतो की राजकीय पार्टी की माध्यमं की दलित नेते त्यांना कांशीराम ‘चमचा’ म्हणायचे. दलितांच्या स्वातंत्रता संघर्षाला किनार देऊन पहिल्यापासूनच भाजप आणि कॉंग्रेसचे मंडलीक झालेले नेते चमचे आहेत असे ते वारंवार सांगायचे. कांशीराम मानायचे की जेव्हा जेव्हा दलित संघर्ष मनुवादाला अभुतपुर्ण आव्हान द्यायचा तेव्हा ब्राम्हण वर्चस्व असणारे राजकीय पक्ष, ज्यात कॉंग्रेसही सामील आहे, त्यांनी दलित नेत्यांना हाताशी धरुन आंदोलन कमजोर करण्यात धन्यता मानली. जेव्हा ही कोणती लढाई, संघर्ष, योद्धांकडून या पक्षांना धोका नसतो तेव्हा त्यांना चमच्यांची गरज भासत नाही. परंतू नंतर जेव्हा दलित वर्गाला खऱ्या सशक्त आणि प्रबळ नेतृत्त्व लाभत तेव्हा या दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये चमच्यांची चलती असते.
१९५८ साली कांशीराम यांनी पुण्यातून पदवीचं शिक्षण घेत ‘डीआरडीओ’मधून सहाय्यक वैज्ञानिकाच काम केलं. या दरम्यान आंबेडकर जयंतीला सार्वजनिक सुट्टीच्या मुद्द्यावरुन झालेल्या संघर्षामुळं त्यांचं मन परिवर्तन झालं. पुढं संपूर्ण आयुष्य दलितांना राजकीय आणि सामाजिक स्थान देण्यासाठी त्यांनी खर्ची घातलं. त्यांचे सहयोगी डी.के. खरपडे यांच्यासोबत मिळून सरकारी नोकरीला लागलेल्या दलितांची मजबूत संघटना बांधली नाव दिलं ‘बॅकवर्ड अँड मायनॉरिटी कम्युनिटीज एंप्लोयीज फेडरेशन’ म्हणजेच बामसेफ. पुढं चालून सातत्याच्या संघर्षातून त्यांनी मायावतींना उत्तर प्रदेशच्या खुर्चीवर मुख्यमंत्री म्हणून बसवलं. या प्रवासात लाखो लोकांना त्यांनी एकत्रित केलं. शेकडो किलोमीटर त्यांनी सायकलवरुन प्रवास केला. त्यांच्या आयुष्यात असे ही संघर्ष आले की त्यांनी फाटके कपडे घालून दलितांचं नेतृत्त्व केलं परंतू माघार घेतली नाही. निळ्या किंवा पांढऱ्या शर्टा शिवाय इतर रंगाचे कापड त्यांनी संपूर्ण आयुष्यात क्वचितच परिधान केलं असेल. ९० च्या दशकात कांशीराम यांची अवस्था बिघडायला लागली. त्यांना मधूमेह आणि रक्तदाबासारख्या समस्या होऊ लागल्या. १९९४ ला त्यांना पहिला हृदयविकाराचा झटका आला. २००३ ला ब्रेन स्ट्रोक आणि २००६ साली हृदयविकाराच्या झटक्यामुळं त्यांचा मृत्यू झाला. भारतातल्या दलित राजकारणाला त्यांनी सत्तेपर्यंत पोहवण्याच काम केलं. भारतीय राजकारणात कांशीराम यांचं मोठंपण त्यांनी बहुजन समाजात निर्माण केलेल्या राजकीय जागृतीमुळं आहे. त्यासाठीच्या त्यांच्या स्वतःच्या कमालीच्या मिशनरी वृत्तीत आहे. कांशीराम यांना राजकारण काही स्वतःच्या "पिढीजात वारश्यातून" मिळालेलं नव्हतं. ते त्यांनी स्वतःची मेहनत, जनसंपर्क, भारतभर प्रवास, कार्यकर्त्यांच्या क्षमता ओळखून त्याचा चळवळीसाठी उपयोग करून त्यांच्याशी असणारा सततचा जैविक असा सकारात्मक संवाद यातून मिळवलं होतं. जैविक अशा कार्यकर्त्यांचं त्यांनी प्रयत्नपूर्वकरित्या बांधलेलं प्रचंड नेटवर्क यातून उभं केलं होतं.! हे सगळं करताना त्यांनी लॅडर्स-शिड्या निर्माण केल्या नाही तर हेतुपूर्वक उद्याची चळवळ चालवतील असे लीडर्स घडवले. मायावती, दाऊराम रत्नाकर, फुलसिंह बैरय्या, डॉ. सुरेश माने, सिद्धार्थ पाटील यासारखे अनेक लीडर्स घडवले. नंतरच्या काळात मायावतींनी या सर्व लीडर्सना ओव्हरकम करत बाकीचे लीडर्सना प्रयत्नपूर्वक संपवलं आणि सगळं काही स्वतःच्या कब्जात घेतलं, हा भाग वेगळा.! कांशीराम यांनी राजकारणाला कुठलाच भपकेबाजपणा कधीही येऊ दिला नाही. अगदी त्यांनी कधीही इतर राजकारण्यांसारखा कुर्ता, पायजमा, जॅकेट असला भपकेबाज पेहरावही कधी केला नाही. कायम साधा हाफ शर्ट आणि पॅन्ट! अगदी पायातील चप्पलसुद्धा साध्या रबर टायरची असायची! त्यांच्यात कमालीचा साधेपणा होता आणि हा साधेपणा कधीच दिखाऊ नव्हता आणि त्या साधेपणाचा त्यांना कधी "नैतिक अहंकार" ही नव्हता. त्यामुळेच त्यांना कधीच कोणाबद्धल "तुच्छता" वाटली नाही. आपलं राजकारण कोणताही आणि कोणाबद्धल ही तुच्छता न दाखवता ही यशस्वीपणे करता येतं हेच सिद्ध करून दाखवलं होतं!
लोकांच्या राजकीय इच्छा, आकांक्षेपासून जसे ते दूर राहिले नाहीत. तसेच लोकांच्या व्यक्तिगत सुखदुःखापासूनही कधी वेगळे झाले नाहीत. आपलं राजकीय जीवन आणि व्यक्तिगत जीवन यामध्ये त्यांनी कधी अंतर केलं नाही. "समाज म्हणून समाजाची ज्या भावभावना, आशा, अपेक्षा असतील, त्याच नेता म्हणून माझ्याही असतील! असच ते कायम जगले! त्यांनी कधीही आपल्या साध्या साध्या कार्यकर्त्यांपासून ही अंतर ठेवले नाही. कसलाच आणि कोणाबद्धलही तुच्छतावाद कधीही या माणसाच्या मनाला शिवला नाही. ते अगदी सहज त्यांच्यासोबत उठबस करीत असत. जेवण्यापासून झोपण्यापर्यंत बरोबरीचं वर्तन करीत असत! याबाबतच्या अनेक आठवणी त्यांच्या सोबत काम केलेली अगदी साधीसुधी माणसं सांगतात. गंगाखेडमध्ये "रायभोळे" नावाचे एक पेंटर आहेत. ते ९० च्या दशकात बसपासाठी वॉलपेंटिंगचे काम करत असत. बसपाच्या कुठल्या तरी दिल्लीत होणाऱ्या रॅलीसाठी त्यांना दिल्लीत वॉलपेंटिंग करण्यासाठी नेलं होतं. रात्रीच्यावेळी ते आणि त्यांचा एक सहकारी दिल्लीत काही भिंती रंगवत होते. तेंव्हा त्यांना असा एक स्पॉट दिसला की, तिथं पेंटिंग केलं तर खूप लोकांना दिसणार होतं. पण त्या उंचशा स्पॉटला नीटपणे पेंटींग करता येईल असा हात पुरेनासा झाला. ते एकमेकांच्या खांद्यावर उभे राहून ते पेंटिंग पूर्ण करण्याचा प्रयत्न करू लागले परंतु त्यांच्या उंचीमुळे त्यांना ते नीटपणे करता येत नव्हतं. तेवढ्यात त्या ठिकाणी एक कार येऊन थांबली आणि त्या कारमधून सहा, साडेसहा फुटाचा भला मोठा माणूस हे उतरून आमची धडपड पाहू लागला आणि शेवटी जवळ येऊन मला म्हणाला, "मेरे खंदे पै चढ। तेरा काम हो जायेगा...!" आणि पुढचा अर्धा तास मी त्यांच्या खांद्यावर उभा राहून पेंटिंग पूर्ण केलं. दुसऱ्या दिवशी सगळ्या देशभरातून आलेल्या पेंटिंग स्कॉडची मिटिंग होती आणि त्या मिटींगला कांशीराम उपस्थित राहिले तेंव्हा माझ्या लक्षात आलं की, रात्री ज्या माणसाच्या खांद्यावर उभे राहून आपण पेंटिंग केलं ते खुद्द कांशीरामच होते!
कांशीरामजी यांना विनम्र अभिवादन ..!!
No comments:
Post a Comment