Saturday, 11 October 2025

लोकसेवक दीपक पायगुडे

 राजकारणात आणि लोकसेवेत कायम राहायचं असेल तर अळीवावरचं पाणी म्हणून असलेल्या आमदारकीच्या काळात संस्थात्मक काम उभं मोठ्याप्रमाणात केलं. लोकसेवा हे ब्रीद असल्यानं त्याच नावानं त्यांनी संस्थात्मक काम सुरू केलं. शिवसेना शाखाप्रमुख आणि त्याच शाखेचं उद्घाटन करायचं असेल तर काहीतरी मोठं काम उभं करायला हवं. या उद्देशानं त्यांनी एकाच वेळी पांच रुग्णवाहिका उभ्या केल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शाखेचं उद्घाटन हे त्यांचं स्वप्न साकार झालं.
७ ऑक्टोबर २०२४ दीपक पायगुडे यांचा आज वाढदिवस.....! पुणे शहराच्या पूर्व भागात आपण आपल्या सामाजिक राजकीय कार्याला सुरुवात केली आज आपण लहान वयात कमी काळात केलेले कार्य आणि मिळालेल्या राजकीय संधीचे सोने केले आणि दीर्घकाळ टिकणारी राजकारणात बहुजन समाजाच्या मुलांना लष्करी शिक्षण मिळण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी स्कूल ची निर्मिती करून आज आपण लावलेले छोटेसे रोप आज पंचवीस वर्षे पूर्ण करून शैक्षणिक राजधानी असणाऱ्या पुणे शहरात आपल्या समाज कार्याला तोड नाही दूरदृष्टी दीर्घकाळ पूर्व भागातील आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बारा मावळ खोऱ्यातील विद्यार्थ्यांना शिवकालीन गनिमी काव्याचे शिक्षण आणि सैनिकी शिक्षण यासाठी आपण सुभाषचंद्र बोस शाळेची निर्मिती केली लष्करी शिक्षणामुळे आपला दराखोऱ्यातील इतिहास आणि सामाजिक शैक्षणिक वातावरण त्या मुलांना आपल्या शिक्षण संस्थेद्वारे मिळणार आहे ही दूरदृष्टी तुम्ही ठेवली याचा आम्हाला अभिमान आहे त्याचप्रमाणे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुणे शहरातील अभिनव योजना मिसळ पाव वाटून प्रत्येक आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांना तुम्ही अन्नदानाचा अभिनव उपक्रम राबवला. आजपर्यंत असा उपक्रम कधी कुणी केला नाही ग्रामीण भागातून येणारा आंबेडकर घटनेचा चाहता दिन दलित घटनेला मानणारा वर्ग आंबेडकरांचे दर्शन घेण्यासाठी त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी पुन्हा स्टेशनला मोठ्या प्रमाणावर येतात त्यांना चहा आणि नाश्ता देऊन आपण लांबून येणारा प्रत्येक व्यक्तीला अल्पोपार देण्याचा अभिनव पांडा आपण या पुणे शहरात खऱ्या अर्थाने सुरुवात केली व गरिबांची सेवा आणि आंबेडकरांना घटना समितीच्या अनुयायांना तुम्ही एका सामाजिक कार्याची जाणीव करून दिली तुमच्या अंतकरणात असलेले आंबेडकरवादी चळवळीचे प्रेम आणि प्रत्यक्षात कृतीद्वारे केलेले प्रयत्न याला तोड नाही त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा फुले वाड्यात तुम्ही या समाजसुधारकाच्या कार्याला आदरांजली वाहण्यासाठी मिसळ पाव आणि चहा दिवसभर देऊन अभिनव उपक्रम राबवून खऱ्या अर्थाने लोक कार्याला लांब लांबून येणाऱ्या महात्मा फुलेंच्या अनुयायांना पहिली स्त्री शिक्षणाची शाळा चालू करणाऱ्या महापुरुषाला आपण अभिनव पद्धतीने अभिवादन केले. हाही पांडा तुम्ही सुरुवात करून दिली या तुमच्या कृतीचा आम्हाला अभिवादन अभिमान आहे त्याचप्रमाणे सारसबाग येथील शाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त थोर साहित्यिक कथा कादंबरीकार यांना अभिवादन करण्यासाठी वाचा आणि शिका यासाठी तुम्ही पुस्तक वाचकांची संख्या वाढण्यासाठी आपण साहित्यिक चळवळ म्हणून पुस्तक दान चळवळ चालू केली यालाही आपल्या कार्याला तोड नाही वाचन संस्कृतीला तुम्ही या योजनेद्वारे आपल्या सामाजिक कार्याला तोड नाही असा पुणे शहरात अभिनव पायंडा आणि ग्रामीण शहरी प्रत्येक अनुयायाला आपण उपाशी न पाठवता अल्पपार देऊन व पुस्तक संस्कृतीला प्राधान्य देऊन वाचनाला शिका कमवा साक्षरता वाचन संस्कृतीला आपण प्राधान्य देऊन पुणे शहरात या अभिनव उपक्रमाने वाटचाल केली खऱ्या अर्थाने आपला पिंड हा सामाजिक लोकशाही स्वातंत्र्य समता शिक्षणाचे महत्त्व ओळखून पुस्तक संस्कृती आणि तरुण पिढीला स्वतःच्या पायावर उभे करून आपण चांगले विविध योजना आपण राबवतात या आपल्या तरुण पिढीला व सामाजिक वातावरण आणि शैक्षणिक बुद्धिजीवी तरुणांची निर्मिती करणे हा आपला ध्यास आपण प्रत्यक्षात अमलात आणत आहात खऱ्या अर्थाने आंबेडकर फुले यांच्या चळवळीला आपण खऱ्या अर्थाने वाहून घेतले आहे पुणे शहराचे देशाला देशा देणारे या दोन समाज पुरुषांना त्यांच्या विचारांना भारत देशभर खऱ्या अर्थाने सामाजिक चळवळीला आपण खऱ्या अर्थाने बळ दिले हात मूळ तुमचा हेतू आजच्या भावी पिढीला पुढील काळात त्याचे महत्त्व समजेल असे ऐतिहासिक सामाजिक कार्य आपल्या हातून घडले आहे खऱ्या अर्थाने आपण केलेले सामाजिक उपक्रम व तरुण पिढीला शिक्षणाची द्वारे खुली करून देण्यामध्ये आणि शिक्षणाचा प्रसार खरा अर्थाने आपल्या हातून घडत आहे आपला वाढदिवसानिमित्त आपल्याला आपल्या परिवाराला उत्तम आरोग्य आणि नवनवीन कल्पना सामाजिक कार्यात आपल्या हातून घडो हीच आपल्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.....!

No comments:

Post a Comment

लडाख आंदोलनामागचे वास्तव

"भारताच्या उत्तरेकडे वसलेला एक केंद्रशासित प्रदेश म्हणजे स्वर्गाची अनुभूती म्हणजे लडाख. शांत, प्रसन्न, आल्हाददायक लडाख मात्...