Saturday, 11 October 2025

अभिनय सौंदर्याची महाराणी

सिने अभिनेत्री रेखा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....!
दिल चीज़ क्या है।
दिल चीज़ क्या है, आप मेरी जान लीजिये
बस एक बार मेरा कहा, मान लीजिये
दिल चीज़ क्या है... 
     माझं हे विदीर्ण झालेलं हृदय, हे विदीर्ण मन किती दुःखद घटनांनी काठोकाठ भरलंय, आजपर्यंत किती दुःखे नि मनाला स्पर्श करणारे विषाद पचवलेत मी मनातल्या मनात!  माझं मन या विषादपूर्ण गोष्टी सहन करत राहिलं, मनाला कित्येक छिद्रं पडून चाळणी-चाळणी झाली अगदी मनाची!  निदान तू तरी माझं मन ही काय चीजवस्तू आहे, हे समजून घे!  फक्त एकवार माझं म्हणणं ऐक नि शोध घे जरा माझ्या विकल, विदीर्ण मनाचा!

इस अंजुमन में आपको आना है बार-बार
दीवार-ओ-दर को गौर से पहचान लीजिये
दिल चीज़ क्या है... 
     माझ्या या मैफिलीत तुला वारंवार यायचे आहे.  नुसतं माझं रुप पाहायला नको येऊ इथे.  माझं मन कसं आहे, ते किती दुःखांनी भरलेलं आहे याचाही शोध घे जरा.  इथल्या भिंतींचे नि दरवाज्यांचे ज्या बारकाईने तू निरीक्षण करशील त्याच बारकाईने माझ्या मनाच्या दरवाजातून आत ये नि हे विदीर्ण हृदय पाहा जरा!  किती भळभळत्या जखमांनी व्याप्त झालंय हे हृदय, दिसतंय ना?

माना के दोस्तों को नहीं दोस्ती का पास 
लेकिन ये क्या के गैर का एहसान लीजिये
दिल चीज़ क्या है... 
    जीवनाच्या या प्रदीर्घ प्रवासात अनेक मित्र मिळाले; पण त्यांनी मित्रत्वाच्या मर्यादा पाळल्या नाही हे मी मानते नि तरीही जुन्या मित्रांना वगळून इतर कुण्या भलत्याच माणसास जवळ करावे, त्याचे उपकार घ्यावेत हे जरा कसंसच वाटतं, नाही का?  मित्रत्वाचे शील नि मर्यादा पाळणारे माझे मित्र नसतीलही कदाचित, पण आहेत तर ते मित्रच ना शेवटी?

कहिये तो आसमां को ज़मीं पर उतार लाएं
मुश्किल नहीं है कुछ भी, अगर ठान लीजिये
दिल चीज़ क्या है... 
     म्हणशील तर गगनातले तारे नि तारकांसह हे सारं आकाशच जमीनीवर उतरवून आणता येऊ शकतं (मग माझ्या हृदयात शिरुन माझ्या विदीर्ण दुःखांचा शोध घेणं हे कितीसं कठीण काम?)  माणसाने फक्त एकदा मनाशी पक्कं करावं की हे काम मला अगदी करायचंच आहे.  मग मात्र काहीच मुश्किल नाही.  माझ्या हृदयातील दुःखाचा शोध घेण्याचं हे मुश्किल काम कर ना जरासं!  जाणून घे ना, माझं हृदय कसं आहे ते?

No comments:

Post a Comment

लडाख आंदोलनामागचे वास्तव

"भारताच्या उत्तरेकडे वसलेला एक केंद्रशासित प्रदेश म्हणजे स्वर्गाची अनुभूती म्हणजे लडाख. शांत, प्रसन्न, आल्हाददायक लडाख मात्...