Tuesday, 12 August 2025

अती तिथे माती अशी दुधाची गती

सहकारी संस्थांच्या अथक परिश्रमामुळे देशात दुधाचं उत्पादन वाढलं. 'श्वेत क्रांती' झाली. पण सर्वसामान्य जनतेला स्वस्त दरात दूध मिळण्याची आशा मात्र या दुधाच्या महापुरात वाहून गेली. आता तर परिस्थिती अशी आहे, की गरीबांना चांगलं नि स्वस्त दूध मिळत नाही आणि दुसऱ्या बाजूला लाखो लिटर दूध फेकून द्यावं लागतंय... हजारो टन दूध पावडर पडून राहून सडून जातेय.
---------------------------------------
तापविण्याआधी दूध 'उत्तू' जाण्याची छायाचित्रं मुंबईच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली आणि ऑपरेशन फ्लड, दुधाचा महापूर धरण फोडून कुठे वाहायला लागला असा प्रश्न सामान्य माणसाला पडला. वरं, एवढं दूध वाया जातंय तरी भावपातळी खाली बायचं नाव नाही हे काय गौडबंगाल आहे, हेही कोडं जनसामान्याना उलगडलं नाही. दूध आहे तिथेच राहिलं किंवा वाहिलं. वातावरण मात्र तापले.
गटारात दडवण्याइतपत दूध आपल्याकडे होतं? एकेकाळी क्षीरसागराची कल्पना आपल्याकडे केलेली आढळते. सध्या डेअरीतलं क्षीर न वापरताच सागगत चाललंय, म्हणजे दुधाची परिस्थिती सुधारलेली दिसते.
दुधाच्या नद्यांची वर्णनं पुराणात असली तरी हस्तिनापुरासारख्या वलाढ्य श्रीमंत राज्यातही गुरू द्रोणाचार्यांची पत्नी त्यांच्या मुलाला म्हणजे अश्वत्थामाला पाण्यात पीठ कालवून दूध म्हणून द्यायची म्हणे. गोकुळच्या गौळीवाड्यातलं सगळं दूध मथुरेच्या वाजागत जातं म्हणून श्रीकृष्ण ते अडवित असल्याचीही कथा आहेच. एकूण प्रश्न दुधाच्या टंचाईचा.
तो अगदी अलीकडेपर्यंत होता. शिवाय दुधाची गुणवत्ता काय यावावतही शंका होती. १९४० च्या सुमारास एका इंग्रज अधिकाऱ्याने लिहून ठेवलंय की, 'मुंबईत जे दूध मिळतं ते पिण्यालायक नाही.' आज मात्र तो अधिकारी हयात असेल तर त्याला समजलं असेल, आजमितीला भारतभर उत्तम प्रतीचं दूध उत्पादित होतं आणि दुधाची कमतरता राहिलेली नाही. उलट दूध एवढं होतंय की, दुधाच्या ऐन हंगामात गेली अनेक वर्षं, जादा दूध समुद्रात सोडण्याचं काम चालूच आहे. मुंबईतच नव्हे, तर सोलापूरसारख्या ठिकाणीही जास्तीचं दूध टाकून दिलं जातं. देशात जिथे जिथे प्रचंड दुग्धोत्पादन होतं तिथे प्रत्येक ठिकाणी समुद्र नसला तरी दूध रस्त्यावश्च सोडलं जातं.
याचा अर्थ, देशातला प्रत्येक माणूस दूध पिऊन तृप्त झालाय असं मुळीच नाही. दुधासाठी तडफडणारे असंख्य 'अश्वत्थामे' आजही आपल्या देशात आहेत. तरीही दुधाचा पूर वाहतोय हेही खरंच. दूध वाया जाण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे उत्पादित दुधाचं योग्य वेळी वितरण होऊन ते लोकांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था नाही. दुधावर आधारित मिठाई किंवा तत्सम पदार्थ वनविण्यासाठी प्रक्रिया करणारी यंत्रणाच योग्य प्रमाणात उपलव्ध नाही.
दुधाचा पूर आणणाऱ्या श्वेतक्रांतीची सुरुवात झाली ती गुजरातमधील खेडा जिल्ह्यात. अमूल या नावाने तिकडे सुरू झालेली सहकारी दुग्धोत्पादन चळवळ हळुहळू देशभर पसरली आणि गेल्या वर्षी तर देशात सरासरी सहा कोटी लिटर दुधाचं उत्पादन झालं. या शतकाअखेर हे प्रमाण दरवर्षी '८ कोटी ५० लाख लिटरवर जाईल आणि दुधाची मागणी असेल ७ कोटी ३० लाख लिटर. म्हणजेच दूध फुकट जाण्याची समस्या अधिकच उग्र होणार आहे.
दुधाची ही रेलचेल गेल्या काही वर्षातली. पण अगदी १९६० ते १९७० च्या काळात, दूधकेंद्रावर कार्ड दाखवून पावडरीचंही अर्धा लिटर मिळवायला काय त्रास सोसावा लागत होता हे मुंवैकर तरी नक्कीच जाणतात. स्कीम मिल्क पावडर आणि वटर ऑईलपासून वनलेलं दूध प्यावं लागत होतं. शुद्ध 'होल' दूध मिळणं म्हणजे पर्वणीच मानली जायची.
ही सगळी परिस्थिती वदलून चढाओढीने दूध विक्रीच्या जाहिराती करण्याइतपत दुधाचा पूर आला तो सहकारी दुग्धोत्पादन चळवळीने. त्याची सुरुवात तशी ४० वर्षापूर्वी झाली. १९४६ मध्ये गुजरातमधील खेडा
जिल्यातील शेतकयांनी सहकारी दूध चळवळ सुरू केली आणंडचं अमृत दूध हे देशाला पौष्टिक मार्गदर्शन करणारं ठरते. सरदार वल्लभभाई पटेल पांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या या चळवळीने देशातील अनेक सहकार उद्योजकांना दुधाचे सरकारी उत्पादन करण्याची दिशा दाखवली. केरळी असलेल्या वर्गिस कुरियन यांनी गुजरातमधल्या सहकारी दूध चळवळीचा पाया धातून या धंद्यात किती मलई आहे ते शेतकऱ्यांना जाणवून दिलं.

तोपर्यंत महाराष्ट्रात सहकारी साखर चळवळीने जोर धरला होता. सहकारी चळवळीतून उभी राहिलेली साखर कारखानदारी सहकाराची शक्ती दाखवून देत होती. वारणानगरचा सहकारी साखर कारखाना उभारणारे तात्यासाहेब कोरे यांनी गुजरातमधील आणंद-मेहसाणा या सहकारी दुग्ध प्रकल्पाचे अनुकरण करायचं ठरवले,
१९६८ मध्ये वारणानगर येथे वारणा सहकारी दूध उत्पादक संघाची स्थापना झाली. शेतीला पूरक असलेला हा गवळी व्यवसाय करण्यास अनेकजण पुढे आले. प्रत्येकाच्या घरी ५ दुभती जनावरे आणि १०० कोंबड्या असाव्यात आणि प्रत्येक कुटुंबाला वार्षिक २५ हजार रुपये मिळावेत असं तात्यासाहेवांचं स्वप्न होते.
लांबलांबच्या गावातून दूध गोळा करणं आणि विकणं हे सोपं काम नव्हे. दुधाच्या वाहतुकीसाठी उत्तम रस्ते हवेत. दूध जास्त उत्पादित झालं तर ते साठवण्यासाठी शीतगृहं पाहिजेत. दुधाचं पाश्चरायजेशन (निर्जलीकरण) करण्यासाठी यंत्रसामग्री हवी आणि शेवटी वाजारातल्या स्पर्धेत टिकून राहील अशी दुधाची गुणवत्ता हवी. सतत १४ वर्षाच्या खडतर मेहनतीनंतर १९८२ मध्ये खन्य अथनि या व्यवसायाने आकार घेतला. वारणा दूध संघ स्थापन झाला तेव्हा दूध जमा करण्यावर मर्यादा घालण्यात आली. त्यामुळे शेजारच्या कर्नाटकातूनही संघाला दूध आणावे लागले. सांगली जिल्ह्यातील दोन तालुके व कोल्हापूर जिल्ह्यातील तीन तालुक्यांतून वारणा दूध संघ दूध गोळा करतो. परंतु हे धवल यश अनेक अडचणींचे डोंगर पार करूनच मिळाले.
१९७३-७४ पूर्वी वारणाचे दूध मिरजेला पाठवले जायचे, परंतु त्यातून फारसा फायदा नसल्याने स्वतःचा प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचा विचार संघाने केला. प्रकल्प आणि तांत्रिक क्षमतेचा अहवाल १९७२ मध्ये अॅग्रीकल्चरल फायनान्स कॉर्पोरेशनकडे सादर केल्यावर केंद्र सरकारने वारणा दूध संघाला कारखाना उभारण्याची परवानगी दिली. परंतु केंद्राची परवानगी मिळाली तरी राज्य सरकार
आर्थिक मदत वा अनुदान द्यायला तयार नव्हते. एवढेच नव्हे तर कर्जमंजुरीची हमी देण्याचीही राज्याची तयारी नव्हती. दरम्यान, दूध संघाने शेतकऱ्यांकडून ९ लाख रुपये भागभांडवल गोळा केले. त्यानंतर संघाने अॅग्रीकल्चरल फायनान्स कॉर्पोरेशन व इतर बँकांकडे कर्जाची मागणी केली; परंतु राज्य सरकारची हमी आणि २५ टक्के रक्कम भरल्याविना कुणी कर्ज द्यायला तयार होईना. शेवटी वारणा परिसरातील विकासकार्य पाहून बैंक ऑफ इंडियाने १९७५ मध्ये दूध संघाला १ कोटी २४ लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले. त्यानंतरही दूध संघाला बऱ्याच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. तोटा भरून कसा काढावा या विवंचनेत दूध संघ बंद करावा की काय इथपर्यंत विचार करायची पाळी आली होती. त्याचवेळी माल खुल्या बाजारात विकण्याचा निर्णय दूध संघाने घेतला. त्यातूनच वारणानगरची उत्पादनं मुंबईच्या बाजारात आली. मुंबईच्या बाजारपेठेने मात्र दूध संघाला व्यावसायिक हात दिला आणि १९८३-८४ पासून दूध संघ फायद्यात चालू लागला.
सुरुवातीच्या वर्षात वारणा दूध संघाकडून केवळ रोज फक्त १९५० लिटर दूध गोळा केलं जात असे. पुढे १९८९ पर्यंत रोज सुमारे दीड लाख लिटर दूध जमा होऊ लागलं. आज हा आकडा सुमारे दोन लाखावर गेला आहे. वारणा दूध हे सहकारी दुग्धव्यवसायातर्फे जालेलं पहिलंच. सुरुवातीला मुंबईत ते रोज १२०० लिटर या प्रमाणात विकलं जायचं. आज मुंबईत वारणार्च १ लाख लिटर दूध विकलं जातं. महाराष्ट्रात आणि गोव्यातही वारणा दुग्धोत्पादनं विकली जातात. मुंबईत ४५० टन स्कीम मिल्क पावडर आणि ८० टन तूप दरवर्षी खपतं. वाशी येथे वारणा दूध संघाची ४७ हजार चौरस मीटर जागा असून येथील कर्मचाऱ्यांची निवासाची सोयही केली आहे.
दूध उत्पादकांना दुभती जनावरे घेण्यासाठी २५ ते ३० टक्के अनुदान, योग्य दरात पशुखाद्य अशाही योजना सहकारी दूध संघ राबवतो. दूध जास्त प्रमाणात मिळाले तरी ते घेऊन त्यावर प्रक्रिया करण्यात येते. १९९३ मध्ये वारणा सहकारी दूध संघाचा रौप्यमहोत्सव साजरा झाला. दुधाच्या धवल क्रांतीतील हे यश उल्लेखनीय म्हणावे लागेल.
वारणानगरसारखाच मोठा सहकारी दुग्ध प्रकल्प आहे सोलापूरला. कै. शंकरराव मोहिते-पाटील यांच्या प्रेरणेने तेथे सहकारी दुग्धोत्पादन सुरू झालं १९७६ मध्ये. या 'शिवामृत' दूध संघातर्फे रोज सुमारे १ लाख ५५ हजार लिटर दूध गोळा केले जातं.
सुरुवातीच्या काळात जर्सी गायीचं महत्त्व शेतकऱ्यांना पटवून देण्यात आलं. आता 'शिवामृत'कडे जिल्ह्यातील सर्वाधिक दूध जमा होतं. सध्या 'शिवामृत'चे ६९००० लिटर दूध रोज नव्या मुंबईत वाशी येथे पाठविले जाते. २२००० लिटर मुंबईच्या शासकीय डेअरीकडे जाते, १०००० लिटर सोलापूरच्या शासकीय डेअरीत जाते व उरलेले 'महानंदा' सह. दूध डेअरीत साठविले जाते.
सोलापूर जिल्हा दूध उत्पादक संघातर्फे जिल्ह्याच्या १० तालुक्यातून १ लाख ७० हजार लिटर दूध रोज संकलित केलं जातं. गायी-म्हशीच्या दुधाचे वर्गीकरण करून तेथे प्रक्रिया होऊन ते पुणे, मराठवाडा, हैदरावाद, कर्नाटक व इतर अशा २४ शहरात वितरणासाठी जाते.
टेंभुर्णी येथील संघाच्या शीतकरण केंद्रात सुमारे ३२,००,००० रु. ची गुंतवणूक करून आईस्क्रीम प्रकल्प उभा राहिला आहे. दूध पंढरीच्या धवल आईस्क्रीमचे कार्यकारी संचालक जोशी म्हणाले, 'यासाठी ३ हजार लिटर दूध लागते. आईस्क्रीममध्ये म्हणावे तितके दूध खपत नाही. त्यामुळे या प्रकल्पामुळे शिल्लक दुधाची समस्या संपणार नाही. त्यासाठी दूध पावडर व दुग्धजन्य उत्पादनांची गरज आहे. आईस्क्रीम प्रकल्पासाठी जर्मनीहून होमोजिनायझर मशीन आणले आहे. खेडेगावात आईस्क्रीम प्रकल्प उभारणारा आमचा दुसरा दूध महासंघ.'
'शिल्लक राहणाऱ्या दुधाची समस्या सोडविण्यासाठी दूधवितरण वाढले पाहिजे. दुधाचं महत्त्व लोकांना कळलं पाहिजे. जपानमध्ये दूध पिऊन लोकांनी उंची
याढवली. परदेशात दूध खूप प्यालं जातं. दुधावर प्रक्रिया करून, दुग्धजन्य पदार्थ निर्यात केले पाहिजेत. आपल्याकडे उन्हाळ्यात चंद्रपूरसारख्या ठिकाणी दूध मिळतच नाही. हे व्यस्त प्रमाण बदलले पाहिजे.' असंही जोशी यांनी सांगितलं.
पशुपालनाविषयी बोलताना ते म्हणाले की, जर्सी गायीचे खाद्य आपल्याकडच्या गाईएवढेच असते. शास्त्रशुद्धतेने या व्यवसायाकडे पाहायला हवं. डेन्मार्क, न्यूझीलंड येथे कॉम्प्युटरच्या मदतीने दुग्धोत्पादनाचं काम केलं जातं. एखादी गाय कोणत्या महिन्यात वीणार आहे हे पाहून तिच्यावरचा खर्च ठरवतात. आपल्याकडे तसे प्रयल होत नाहीत.
शिल्लक दुधाचा प्रश्न सुटण्यासाठी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोडनि प्रयल करावेत. दूध उत्पादन वाढविण्यासाठी वोर्ड जसा पैसा देते तसाच वाढीव दुधाची समस्या सोडवायला का देत नाही? कलकत्ता, मद्रास येथे दूध पाठविण्याची सोय व्हावी असंही मत सुधाकर जोशी यांनी मांडलं.
'शिवामृत'ला यश मिळण्याचं श्रेय कै, शंकरराव मोहिते-पाटील यांना जातं. अधिक दूध उत्पादनाचं महत्त्व पटवून देण्यासाठी शंकरराव जर्सी गाय घेऊनच खेड्यातील शेतकऱ्यांकडे जात आणि साध्या गायीपेक्षा ही किती जास्त दूध देते हे शेतकऱ्यांना प्रत्यक्षच पाहायला मिळे, अशी माहिती शिवामृत डेअरीचे संचालक एम. आर. खटावकर यांनी दिली. एकाच वेळी २०-२५ लिटर दूध देणारी गाय पाहिल्यावर लोक चकित होत. यातूनच सोलापूर जिल्ह्यातील दुग्धोत्पादन वाढले. नवी योजना जनसामान्यांना पटवून द्यायला असाच कुणीतरी प्रवर्तक लागतो. गुजरातमध्ये कुरियन यांच्या प्रेरणेने मेहसाणा येथेही सहकारी दुग्ध व्यवसाय पूर्वीच सुरू झाला. तिथल्या दूधसागर डेअरीचे जनरल मॅनेजर एम. व्ही. चौधरी यांनी सांगितलं की, या जिल्ह्यातील एकट्या विजापूर तालुक्यातून ४० टक्के दूध जमा होतं. रोज या डेअरीकडे १० लाख लिटर दूध येतं.
श्वेत क्रांतीचे जनक वर्गिस कुरियन यांनी अधिक दुग्धोत्पादनासाठी उत्तम पशु पैदास डेअरी व्हायला हवी हे जाणलं होतं. संकरित म्हशी तयार दुधाती होणं शक्य नाही असं जगभर समजलं जायचं त्यावेळी अमूलच्या संचालकांनी कृत्रिम वीर्यवानाद्वारे म्हशींच्या बाबतीतही क्रॉस ब्रिडिंग शक्य आहे हे सिद्ध केलं.
कुरियन यांच्या ऑपरेशन फ्लडचा फायदा गुजरात-महाराष्ट्रच नव्हे, तर देशातील हजारो गावांना झाला. पूर्वी महाराष्ट्रातील दूध उत्पादन फारच कमी होतं. आता आपल्याकडे रोज १ कोटी लिटर दूध उत्पादन होतं. यामध्ये वकरीच्या दुधाचा समावेश नाही.
आरोग्याच्या दृष्टीने गाईचं दूध जेवढं चांगलं तेवढंच महत्त्व शेळीच्या दुधालाही आहे. परदेशात जास्तीत जास्त गाईनंतर जास्तीत जास्त दूध प्याले जातं ते वकरीचंच
भारतात मात्र म्हशीचं दूध पिण्याचं प्रमाण ६० टक्के आहे. भारत वगळता चीन, इजिम, फिलिपिन्स अशा काही मोजक्या देशातय माशी आहेत अमेरिका आणि पश्चिम पुरोपीय देशात फैस पाहायलाही मिळत नाही म्हणून तेथे गाय बकरीचं दूध हेच महत्त्वाचं मानलं जातं.
बालकांना सर्वांत आरोग्यकारक दूध असतं ते मातेचं, व्याचप्रमाणे गाय-मौस आणि शेळीचं दूधही वेगवेगळ्या व्याधींवर उपकारक ठरतं. उदा. दम्याच्या विकारावर गाईचं दूध घोगले समजलं जातं. म्हशीचं दूध जड असतं, त्यामुळे सतत भूक लागणाऱ्या व्यक्तीला म्हशीचे दूध दिलं जातं. काही वैद्यराज मात्र दुधाच्या विरोधात आहेत. मेहेरवान भमगरा यांच्यासारखे नामवंत निसर्गोपचारतज्डा म्हणतात की, माणसाला गाय-मौस किंवा अन्य कोणा पशुच्या दुधाची गरजच नाही, पर्यावरणासाठी लढणाऱ्या मनेका गांधीही दूधविरोधी आहेत. पाश्चात्य देशातील अॅलोपॅथिक डॉक्टरही दुधाला फारसं महत्त्व देत नाहीत. अमेरिकेत तर काही डॉक्टरांनी मध्यंतरी मुलांना दूध पाजण्याविरुद्ध मोहीमच उघडली होती. भारतात मात्र अशा मोहिमेचा काही परिणाम नाही.
जागतिक दूध उत्पादनात अमेरिकेचा क्रमांक पहिला लागतो. सोव्हिएत संघाचे तुकडे पडल्यामुळे भारत आता दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. भारतातील दुग्धोत्पादनात गेल्या ४७ वर्षातल्या सहकारी दूध चळवळीला अतिशय महत्त्व आहे. ही चळवळ खेडोपाड्यात नेणाऱ्या नॅशनल डेअरी
डेव्हलमेंट बोडर्डाचे अध्यक्ष डॉक्टर वर्गिस कुरियन यांनी चित्रलेखा'ला सहकारी दूध चळवळीच्या कार्याची माहिती दिली. ज्यांच्याकडे दुभती जनावरं आहेत असे खेडुत एक मंडळ काढतात. सभासदत्याचे दहा रुपये भरतात. रोज सकाळी व संध्याकाळी दूध एकत्र करून त्यातील चरबीच्या प्रमाणात त्याचा भाव मिळतो. अशाप्रकारे शेतकऱ्यांना रोख पैसा हाती येतो.
मोठ्या शहरातील डेअरीचे ट्रक दिवसातून दोनदा गावोगाव जाऊन दूध गोळा करतात. डेअरीत हे दूध सतत गरम-गार केलं जातं. त्यामुळे ते निर्जंतुक राहण्यास मदत होते. नंतर जरुरीनुसार हे दूध वाटली किंवा पिशव्यात भरून वितरणासाठी पाठवले जाते, शिल्लक दुधाची भुकटी, वटर, चीज, तूप इ. पदार्थ बनविले जातात.
दूध हा तसा लवकर खराब होणारा नाशिवंत (पेरिशेवल) पदार्थ, दुग्धोत्पादन करणाऱ्या सहकारी सोसायट्यांची संख्या तर वाढतेच आहे. त्यामुळे दूध सकाळ-संध्याकाळी गोळा करणंही शक्य नाही. त्यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांत ठिकठिकाणी चिलिंग प्लान्टस (शीतकगृह) उभारण्यात आली आहेत. २ ते २० हजार लिटर दूध साठविण्याची क्षमता असलेली टाकी या ठिकाणी बसविलेली असते. गावोगावहून गोळा केलेलं दूध या प्लान्टमध्ये आणून ४ डिग्री सेल्सिअसपर्यंत थंड केलं जातं. टाकी भरल्यावर डेअरीचा टैंकर येऊन दूध घेऊन जातो. थंड दुधाचं तपमान वाढू नये म्हणून थर्मोकोलन
इन्स्युलेट केलेला टैंकर वापरावा लागतो. दूध थंड ठेवण्याचं यंत्र चारेक लाख रुपयांना मिळतं. सुरुवातीला हा खर्च जास्त वाटला तरी त्यातून फायदाही बराच असतो, असं गुजरातेतील आणंदजवळच्या एका चिलिंग युनिटला भेट दिली तेव्हा कळलं. चिलिंग प्लॅन्टमुळे रोजचं शेकडो लिटर दूध खराव होणं टळतं.
सौराष्ट्रातील सर्वात मोठी दुग्धशाळा असलेल्या राजकोट डेअरीचे जनरल मॅनेजर आहेत सुरेन्द्र रानडे. दुधाचा महापूर येण्यामागचं कारण त्यांनी 'चित्रलेखा'चे प्रतिनिधी कौशिक मेहता यांच्याकडे
लागतं. स्पष्ट केले. ते म्हणाले की, वारंवार येणाऱ्या जातं. दुष्काळाला उबगलेले शेतकरी आता पशुपालनाचं
महत्त्व समजू लागले आहेत. सहकारी दूध चळवळीने लोकांना आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभं राहायला खूप मदत केली.
'वाडीलाल' सारखे आईस्क्रीम उत्पादक राजकोट डेअरीकडून दूध घेतात. वाडीलाल आता लवकरच दुग्धोत्पादनातही उतरणार आहेत. देशात गावागावात आईस्क्रीम पार्लर उभी राहात असली तरी देशात उत्पादित होणाऱ्या दुधापैकी अवघं अर्धा टक्का दूधच आईस्क्रीम बनविण्यासाठी वापरलं जातं, असं 'वाडीलाल'चे कार्यकारी संचालक शैलेश गांधी यांनी सांगितलं.
गेली वीसेक वर्ष वारणा, सोलापूर, जळगाव येथील दुग्धव्यवसायाशी संबंधित असलेले, दुग्धव्यवसाय तज्ज्ञ शरद पाटील यांच्याकडे तर कुठल्या शहगत जास्त दूध वापरलं जातं नि दही, पनीर, चक्का, मिठाई जास्त खपते याचीही मनोरंजक आकडेवारी आहे. कलकत्त्याच्या वंगालीवायूंना दूध प्यायला आवडतं तसंच दुधाची 'संदेश' सारखी मिठाईही आवडते. मुंवई, वंगलोर, हैदरावाद येथील लोक चहा-कॉफीसाठी अधिक दूध वापरतात. दिल्लीत दुधावरोवरच दही-ताक जास्त वापरलं जातं. शरद पाटील यांच्या या पाहणीनुसार, मद्रासमध्ये मिठाई फारशी खपत नाही, तर कलकत्ता गोड शहर आहे.
विविध ठिकाणच्या लोकांची ही आवड लक्षात घेऊन राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या संशोधन आणि तंत्रज्ञान विभागाला श्रीखंड, लम्सी, गुलावजाम, पेढे, दही, इन्स्टंट खीर असे दुग्धजन्य पदार्थ वाजारात मोठ्या प्रमाणात आणावे असं सुचवलं आहे. प्रचंड प्रमाणावर दूध उत्पादन होऊनसुद्धा भारत दुग्धजन्य पदार्थांवावत खूपच मागे आहे. हे लक्षात घेऊन ही परिस्थिती वदलण्यासाठी लवकरच अमूल आणि सागर डेअरीचे पदार्थ वाजारात येणार आहेत.
सरकारी दूध उत्पादनात सतत वाढ होत असूनही दुधाचे आणि दुग्धजन्य पदार्थांचे भाव खाली उतरत नाहीत हे कटू सत्य आहे. यामागे राजकारणही आहे. एन. डी. डी. वी.चे अधिकारी या गोष्टीशी सहमत नाहीत हा भाग वेगळा. डेअरीकडे दूध देणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी लॉवी तयार झाली आहे.
देशभरातून ८० लाख कुटुंब कुठल्या ना कुठल्या सहकारी दुग्धसंस्थेला दूध देतात. त्यांची व्होट बैंक कितीतरी शक्तीशाली असेल! त्यांना खुश ठेवण्यासाठी सरकार दुधाचे भाव वाढवतं. महाराष्ट्र, कर्नाटकात डेअरीकडे येणारं सर्व दूध घेण्यात सरकार वांधिल आहे. डेअरीकडून दुधाला चांगला भाव मिळत असताना गावात तोट्यातला धंदा कोण करणार? परिणामी डेअरीत खूप दूध येतं. पण भावही जाग्त असल्याने त्या प्रमाणात मागणी वाढत नाही. दुसऱ्या वाजूला दुग्धजन्य पदार्थ वनविणारे प्रक्रिया उद्योगही वाढत नाहीत. मग मुंवई आणि सोलापूरसारख्या ठिकाणी अतिरिक्त दूध टाकून देण्याची पाळी येणारच ना? दूध उत्पादकांना जास्त भाव देण्यासाठी महाराष्ट्र सरकारला गेल्या वर्षी ५० कोटी रुपयांचा तोटा आला, पण प्रोक्युअरमेंट दर कमी करायला सरकार तयार नाही.
कर्नाटकातही तीच परिस्थिती आहे. डेअरीकडे दिल्या जाणाऱ्या दुधाचा दर कमी केला की, दूध उत्पादक कमी दूध घालतील आणि अतिरिक्त दुधाची समस्या सुटेल असा अंदाज आहे. म्हणून तेथे हा दर कमी करण्याचा निर्णय घेतला गेला. कर्नाटक मिल्क फेडरेशनच्या डेअरीत रोज दोन लाख सत्तर हजार लिटर जादा दूध येतं. परंतु कर्नाटकचे मंत्री नागे गोवडा यांनी दूध दर कमी करायला नकार दिला. कारण सरळ आहे. या मंत्रीमहोदयांच्या मतदारसंघातील हजारो शेतकरी दूध उत्पादनात गुंतले आहेत. त्यांना दुखावणं सरकारला परवडणारं नाही. मग जादा दुधाचं करायचं काय? एक मार्ग म्हणजे दुधाची भुकटी करून ठेवणे, एकेकाळी आपल्यालाही पावडरचं दूध प्यावं लागत होतं. आता दुधाची भुकटी पडूत असते किंवा जादा दूध गटारात जातं.
ईशान्य भारतातील राज्य आणि सिक्किम या ठिकाणी लोकांना पावडरचं दूध प्यावं लागतं. देशाच्या सरहद्दीवरच्या लष्करी जवानांचाही दुधाची पावडर पाठविली जाते.
विमानात दिल्या जाणाऱ्या चहा-कॉफीतील व्हाइटनरमध्येही दुधाची थोडी पावडर असते. याव्यतिरिक्त दूध भुकटीला मागणी नसली तरी कर्नाटक डेअरीत रोज पंचवीस टन दूध भुकटी वनवली जाते.
परिस्थिती अशी आहे की, कर्नाटकात पाच हजार मेट्रिक टन दूध भुकटी पडून आहे. म्हणजेच ५५,००,००० किलो! आणि एक किलो भुकटी वनवायला ५० रुपये
खर्च येतो. वाजारात ती २५ रुपयांनाही विकली जात नाही. या हिशोवाने गोडाऊनमधील ३० कोटी रुपये किमतीच्या पावरडचा भाव १५ कोटीच झाला. न विकल्या जाणाऱ्या पावडरवर रोज सव्वा लाखाचं व्याज वाढतं ते वेगळंच. सरकारी गोदामात ही भुकटी ठेवायलाही जागा नाही म्हणून भाड्याने गोदामं घ्यावी लागतात हा आणखी एक खर्च.
पूर्वी डेअरीवाले उन्हाळ्यात पावडरचं दूध विकत, परंतु हल्ली उन्हाळ्यातही पावरडच्या दुधाची गरज भासू नये इतकं दूध उत्पादन होतं.
यावर तामिळनाडूने चांगला उपाय शोधून काढला आहे. महाराष्ट्रात आरे डेअरीने 'एनर्जी' हे गोड स्वादिष्ट दूध वाजारात आणलं तसंच तामिळनाडूतल्या आविन डेअरीनेही गोड दूध विकण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. वाटलीऐवजी छोट्या ट्रेटा पॅकमध्ये मिळणारं हे दूध अतिशय लोकप्रिय झालं आहे.
याशिवाय आविन' ने कटर, चीज, कमी स्निग्धांशाचं दूध ही उत्पादनंही बाजारात आणली आहेत.
पूर्वी आविन हेअरीकडे गेज फक्त ६० हजार लिटर दूध यायचं. आता १४ लाख ५० हजार लिटर एवढ्या प्रमाणात येते. या संस्थेचे एक वरिष्ठ अधिकारी भगवान सिंग 'चित्रलेखा'शी वोलताना महणाले की, डेअरीत येणाऱ्या धंवन् थेंव दुधाचा आम्ही विनियोग करतो. आविन डेअरीला जादा दुधाचा प्रश्न कधीच सतावत नाही, जादा दूध फेकून देण्याऐवजी 'आविन'च्या व्यवस्थापकांनीही अशा वेळी तेच दूध टैंकरमधून झोपडवस्त्यांमध्ये नेलं आणि फुकट वाटलं. महाराष्ट्र सरकारलाही लाख्खो लिटर दूध गटारात फेकल्यावर उशिरा शहाणपण सुचले आणि शाळकरी मुलांना मोफत दूध देण्याचं ठरवण्यात आलं, पण प्रथमग्रासे मक्षिकापात झाला आणि सोलापूरच्या शाळेतील ४०० मुलांना हे सरकारी दूध न पचल्याने रुग्णालयात दाखल करावं लागलं,
आंध्र प्रदेशच्या दुग्धव्यवसायानेही विजया वटरची वरीच जाहिरात केली होती, पण मार्केटिंगमध्ये ते कमी पडले. आता पुन्हा ही उत्पादनं येतायत. आंध्र प्रदेश दुग्धविकास सहकारी संघाचे कार्यकारी संचालक एस. भालेराव यांनी 'चित्रलेखा' प्रतिनिधी अर्जिता अर्जुन यांना सांगितलं की, त्यांनी अमूलप्रमाणेच विजया उत्पादनंही राष्ट्रीय स्तरावर वाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. 'अमूल' म्हशीच्या दुधापासून वनवलेले पदार्थ विकतात, तर 'विजया' उत्पादनं गाईच्या दुधापासून वनलेली असतील.
महाराष्ट्रात वारणा सहकारी दूध उत्पादक संघानेही शून्यातून मोठा दुग्धव्यवसाय उभारून दृघवितरणात आणि दुग्धजन्य पदार्थामध्ये आघाडी मारली आहे. आज वारणाचा स्वतःचाच प्लास्टिक पिशव्या आणि कोरुगेटेड खोके वनवण्याचा कारखानाही आहे.
देशात सर्वाधिक दूध मुंबईत येतं (नि काही गटारातही जाते.) सच्या हिवाळ्यात देशाच्या या 'दुग्ध राजधानीत' रोज ३६ लाख ४० हजार लिटर दूध येतं आणि उपयोगात आणलं जातं ३० लाख लिटर दूध. वाकीचं दूध स्निग्धांश काढून फेकून दिलं जातं. आता त्यावर वरीच चर्चा झाली आणि त्याचा वेगळा विनियोग कसा करता येईल याचा विचार प्रशासन करत आहे.
जादा दुधाची समस्या सरकारी डेअरीपुढेथ असते. दूध विक्री किंवा दुग्धजन्य पदार्थ
बनविण्याची क्षमता चिचारात न घेता येईल ते सगळं दूध स्वीकारत गेले तर ते उरेल नाहीतर काय? खाजगी डेअरीवाल्यांना मात्र हा प्रश्न पडत नाही. ते गरजेपुरतंच दूध घेतात.
मुंबईच्या उपनगरातील ठिकठिकाणच्या खाजगी गौळीवाड्यांमधली जनावरांची संख्या पाहिली तर लाखभर महशी मुंबईत असतील. गायी फक्त चार ते पाच हजारच आहेत. मुंबईचे तवेलेवाले मेहसाणा, हरियाणा आणि पंजावहून महशी आणतात. मुंबईच्या पश्चिम उपनगरात मोठे तवेले असलेले सरदार हाजी मस्तान यांनी सांगितल्यानुसार, पंजाब-हरियाणातील म्हशींना मुंबईचे वातावरण मानवतं. तिकडे रोज सरकी, शेंगदाण्याची पेंड, करडई, सोयाविन असा रोजचा सहा किलो खुराक घेणारी म्हैस मुंबईत रोज नऊ किलो खाद्य खाऊ लागते. अर्थात, ती दूधही जास्त देते. उस्मान हे गेली ५० वर्ष तवेला चालवतायत. त्यांनी सांगितलं की, मीस दुसऱ्यांदा गाभण राहिली की, दूध कमी देऊ लागते, पण त्या दुधात स्निग्धांशाचं प्रमाण अधिक असतं. गाभण म्हशीला तिसऱ्या-चौथ्या महिन्यात तिच्या मूळ गावी 'माहेरी' पाठवलं जातं. वाळंतपण सुखरूप पार पडलं की, ती पुन्हा मुंबईला येते.
दक्षिण मुंबईतल्या श्रीमंत भागात दुग्धव्यवसाय करणाऱ्या पारसी डेअरीकडे दूध वितरणासाठी मोठा कर्मचारीवर्ग आहे. निळा शर्ट, खाकी पॅन्ट अशा वेशातील हे भैय्याजी ग्राहकांकडे दूध द्यायला जातात. पारशी डेअरीचे दूध उत्तम समजलं जातं. तेच स्थान आता मालाडच्या नॅशनल डेअरीनेही मिळवलंय. नॅशनल डेअरीचे अनिल शर्मा म्हणाले की, गुजरातमध्ये बनारसकाठा येथे पाश्चरायजेशन प्लान्ट सुरू केला असून तिकडून येणारं दूध थंड ठेवण्यासाठी मालाडजवळ २० हजार लिटर क्षमतेचं चिलिंग युनिट वसवलं आहे. दुधातील चरवीचं प्रमाण तपासण्यासाठी नॅशनल डेअरीने फॅट मशीन आणि लॅक्टोमीटरही ठेवलं आहे.
म्हशीच्या दुधात साधारणतः ६ ते १० टक्के स्निग्धांश असतो. स्निग्धांशाइतकंच महत्त्व कार्बोहायड्रेटस, जीवनसत्व, प्रथिनं, मिल्क शुगर, लॅक्टोज, ग्लुकोज या दुग्ध तत्वानाही असतं. दुधाचा भाव ठरविण्यासाठी मात्र स्निग्धांशाचं प्रमाणच मुख्यत्वे तपासलं जातं. आनंदच्या अमूल डेअरीचे प्रॉडक्शन मॅनेजर वी. के. वक्षी यांनी दिलेल्या माहितीनुसार, खेडा जिल्ह्यातील सुरती म्हशीच्या दुधात तर ११ टक्के चरबीसुद्धा असते. गाय आणि म्हशीच्या दुधातील फरक म्हणजे गायीचं दूध पिवळसर दिसतं, तर म्हशीचं दूध अगदी शुभ्र रंगाचं असतं. त्यांनी आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट सांगितली ती ही की, गीरमधली गाय मूळची भारतीय; परंतु सध्या चांगल्या गीर जातीचं सर्वात अधिक उत्पादन अमेरिकेतील ब्राझील देशात होतं. अमेरिकेतील अॅमॅझॉन नदीच्या काठचं वातावरण या गायींना चांगलंच मानवलं आहे आणि तिघे आता दुधाच्या नद्या वाहत आहेत.
-------------
घोडी, हत्तीण, मेंढी, गाढवी, उंटीणींचे औषधी दूध प्या

क्षीरसागराचं मंथन करून देवांनी अमृत मिळवलं तर मानवासाठी स्वतः ते क्षीरच अमृत झाले. एका परिपूर्ण अन्नाच्या आणि औषधीच्या रूपाने पाणी, प्रथिनं, स्निग्धपदार्थ, पिष्टमय पदार्थ, क्षार आणि जीवनसत्त्व या घटकांनी बनलेलं हे पूर्णान्न मानवाच्या, विशेषतः नवजात बालकाच्या पोपणासाठी, वाढीसाठी अत्यंत आवश्यक आहे. अशा या पूर्णान्नाला आपण दूध या नावाने ओळखतो तर क्षीर, पय, स्तन्य आणि वालजीवन ही त्याची वेगवेगळी नावं आहेत. सस्तन प्राण्याच्या जन्मानंतर त्याच्या मातेच्या स्तनातून तावडतीव स्रवणारा द्रवपदार्थ म्हणजेच हे दूध. अर्थात, फक्त दूधच नाही, तर त्या दुधापासून वनविण्यात येणारे दही, ताक, लोणी, तूप, चीज हे पदार्थही मानव फार प्राचीन काळापासून स्वतःच्या पोषणासाठी वापरात आहे. हिंदूंच्या वैदिक वाङ्मयात लोणी आणि तूप यांचा उल्लेख अनेक ठिकाणी आला आहे. गायी-गुरांचे आणि मेंढ्यांचे कळप घेऊन भटकणारे आशियातील लोक हजारो वर्षापासून मेंढीच्या दुधापासून चीज तयार करत.
आदमचा मुलगा आवेल हा मेंढ्या पाळीत असल्याचा आणि अब्राहमला डीव्रन येथे दिसलेल्या देवदूतांना त्याने दूध दिल्याचा उल्लेख बायबलमध्येही आहे. प्राचीन ग्रीक आणि रोमन लोक लोणी खाण्यासाठी न वापरता त्याचा उपयोग त्वचेवरील जखमांसाठी आणि केसांना लावण्यासाठी करीत. तसेच तुपाच्या दिव्यावरील काजळी काजळ म्हणून डोळ्यात घालण्यासाठी वापरत असत. दह्याच्या निवळीचा उपयोग आजारी माणसासाठी करण्याची प्रथा युरोपमध्ये सतराव्या शतकापूर्वीपासून सुरू होती.
दूध आणि दुधाच्या पदार्थावद्दल हे असे वेगवेगळे उल्लेख इतिहासात आढळतात. सर्वसाधारणपणे गाय, म्हैस, शेळी, मेंढी, घोडी, उंटीण आणि याक या प्राण्यांच्या दुधाचा उपयोग प्राचीन काळापासून केला जात आहे. त्यातही गायीच्या दुधाचा वापर जगात सर्वात अधिक प्रमाणात केला जातो. आपल्या देशात मात्र वापरण्यात घेणा-या दुधापैकी असे अधिक दूध म्हशीचे असते त्याचप्रमाणे चीन इजिम, फिलिपाईन्स या देशातरी श्रीचंद याच प्रमाणात वापरण्यात येते. शेतीचा दुधाचा उपयोग जगात सर्वत्र होत असला तरी प्रामुख्याने भूमध्य समुद्राच्या भोवतालच्या प्रदेशात ते अधिक प्रमाणात वापरले जाते.
यूरोपच्या उत्तरेकडील भागात रेनडिअरचं तर दक्षिणेकडील भागात मेंदीचे दूध उपयोगात आणतात, चीनच्या उत्तरेकडील डोंगराळ भागात तसंच तिबेट आणि त्यालगतच्या हिमालयाच्या भागात याकचे दूध वापरतात अफगाणिस्तान, रशियाचा काही भाग तसंच भारताव राजस्थान, सौराष्ट्र, कच्छ या वाळवंटी भागात उंटिणीचं दुधाचा वापर केला जातो, तर आफ्रिका आणि दक्षिण भारतात हत्तीचे दूध वापरले जाते.
वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या प्राण्यांच्या दुधाचा वापर होत असला तरी या प्रत्येक प्राण्याच्या दुधाचं स्वतःचं वेगळं वैशिष्ट्य आहे. दूध हे मधुर, शीत, मृदू, स्निग्ध, पुष्टिकर अशा गुणांनी युक्त असतं. हे गुण अन्य प्राण्यांच्या दुधापेक्षा स्त्रीच्या दुधात अधिक प्रमाणात असतात. मात्र प्राण्यांच्या दुधामध्ये गाईचं दूध हे श्रेष्ठ आहे. ते बुद्धी आणि स्मृती वाढविणारं असून मुलाला अंगावर पाजणाऱ्या स्त्रीसाठी अत्यंत हितकर आहे. गाईचं दूध म्हशीच्या दुधापेक्षा पचनाला हलकं आहे. नेहमी गाईचं दूध पिणाऱ्यांना म्हातारपण लवकर येत नाही. म्हणूनच-गाईचे दूध हे एक महत्त्वाचे रसायन आहे. हा रस पवित्र, बलवान आणि स्तनपान करणारा आहे, जखमेने मारलेला आहे. या दुधाचे वर्णन असे केले आहे. मधुर, थंड, मऊ, स्निग्ध, दाट, गुळगुळीत, बुळबुळीत, जड, मंद, संतोषप्रद हे दहा गुण गाईच्या दुधात आहेत.
आज जगात उपलब्ध होणाऱ्या एकूण दुधामध्ये गाईच्या दुधाचे प्रमाण तब्बल ऐंशी टक्के आहे, तर आपल्या महाराष्ट्रात गाईच्या दुधाचं प्रमाण नव्वद टक्के आहे. वेगवेगळ्या रोगात गाईचं दूध उपयोगी ठरते. थकवा, गोंधळ, अवलक्ष्मी, श्वास लागणे, खोकला, जास्त तहान, भूक.जुनाट ताप, शेंगदाण्याचा त्रास आणि लाल पित्तावर उपचार केले पाहिजेत.
गाईचं दूध हे कष्ट, चक्कर, मद, निस्तेज नाशक असून दमा, खोकला, क्षुधा, भूक, बरेच दिवस न जाणारा ताप, लघवीतील दोष, रक्तपित्त या रोगात उपयोगी आहे. सर्वश्रेष्ठ अशा गाईच्या दुधातही परिस्थितीनुसार बदल होतात. अत्यंत लहान वासरं असलेल्या आणि जिची वासरे मेली आहेत अशा गाईचं दूध वात, पित्त, कफ या तिन्ही दोषांचा प्रकोप करणारं असतं,
तर जिला एक वर्षाचा पाडा (बासरू) आहे अशा गाईचं दूध वात, पित्त, कफ या तिन्ही दोषांचा नाश करणारं, तृप्तीकारक आणि शक्ती वाढविणारं असतं. ज्या गाई आपल्या चाऱ्याबरोबर गहू, पेंड, शिळे अन्न इत्यादि खातात त्या गाईचं दूध पचण्यास जड, कफदोष वाढविणारं, शक्ती वाढविणारं, कामेच्छा वाढविणारं असं असतं. निरोगी माणसासाठी मात्र ते गुणकारी आहे. तर पेंढा, गवत, सरकी यांचं सेवन करणाऱ्या गाईचं दूध रोग्यांना हितकारक आहे.
गाईच्या रंगानुसारही तिच्या गुणधर्मामध्ये फरक दिसून येतो. उदा. गाईच्या त्वचेचा काळा रंग सूर्याची उष्णता, किरणं परावर्तीत करतो. त्यामुळे काळ्या रंगाच्या गाईचं दूध सफेद रंगाच्या गाईच्या दुधापेक्षा पचण्यास हलकं असतं. सूर्याची उष्णता अधिक प्रमाणात शोषून घेतल्यामुळे काळ्या गाईचं दूध वातदोषनाशक असतं. याउलट पांढऱ्या रंगाच्या गाईचं दूध पचण्यास जड आणि कफदोष वाढविणारं असतं. तर पिवळ्या रंगाच्या गाईचं दूध पित्त आणि वातदोष नष्ट करतं. तांबड्या आणि चित्रविचित्र रंगाच्या गाईच्या दुधात वातदोष नष्ट करण्याचा गुणधर्म आहे.
गाईच्या दुधानंतर जगात सर्वात जास्त उपलब्ध होणारं दूध म्हणजे म्हशीचं दूध, म्हशीचं दूध अभिष्यंदी (सर्व स्रोतांचा अवरोध करणारं) मधुर, भूक कमी करणारं, निद्रा आणणारं, अत्यंत शीत आणि गाईच्या दुधापेक्षा पचण्यास उपयोग होतो. तसंच धोडी, गाढवीण अशा एकखुरी प्राण्यांचे दूध शक्तीदायक, उष्ण, किंचित आंबट आणि खारट असून रुक्ष आहे. यांत स्निग्ध पदार्थाचे प्रमाण कमी असते. सर्वप्रकारचे वातविकार, पक्षाघात, अर्धांगवात या रोगांमध्ये या दुधांचा उपयोग होतो. याचं सातत्याने सेवन केलं असता बुद्धी कमी होते असं सांगितलं आहे. दमा असणाऱ्या माणसाला गाढविणीचं दूध खेडेगावातून अजूनही देतात-
हस्तिनीनां पथो बल्यं गुरु स्थैर्यकरं परम l
हत्तींची पचनशक्ती तीव्र, जड आणि अत्यंत स्थिर असते.
हत्तिणीचं दूध पचायला अत्यंत जड, शरीराला स्थिरता आणणारं आणि बलदायक आहे. हत्तिणीचं दूध सातत्याने घेतले असता माणूस हत्तीसारखा पुष्ट वनतो. याशिवाय होमिओपॅथी या चिकित्सा पद्धतीत कुत्रीच्या दुधाचा औषध म्हणून उपयोग करण्यात आला आहे. वेगवेगळ्या प्राण्यांच्या दुधाचे हे असे वेगवेगळे गुणधर्म आहेत. त्यातही वेळेनुसार, वातावरणानुसार बदल होत असतात. प्राण्यांचे सकाळी काढलेले दूध पचण्यास जड असतं. मलबद्धता करणारं असतं; कारण जनावरं रात्रभर बसून असतात. प्राण्यांचे संध्याकाळी काढलेले दूध सकाळच्या दुधापेक्षा पचायला हलके, पोटातील गॅस नष्ट करणारं, शौचास साफ करणारं, उष्ण डोळ्यांना अत्यंत हितकर आणि थकवा घालविणारं असतं.
उन्हाळ्यात प्राण्यांच्या दुधाचं प्रमाण कमी होतं तर
हिवाळ्यात वाढतं.प्राण्यांच्या स्तनातून नुकत्याच काढलेल्या दुधाला धारोष्ण दूध म्हणतात. ते अत्यंत हितकर आहे. दूध काढल्याबरोबर लगेच सेवन केलं असता त्याचा फार उपयोग होतो. त्याचे पचन ताबडतोब होते. ते सर्व रोगनाशक आहे. कारण त्यात जंतूचा आणि घाणीचा संपर्क नसतो.
दुधाचे हे असे अनेक उपयोग असल्यामुळे शाकाहारी आणि मांसाहारी दोघांच्याही आहारात दुधाला तितकेच महत्त्व असते.
(स्रोत: यथा अमृतम् दूध डॉ. अंकुश जाधव आणि विश्वकोश)

No comments:

Post a Comment

राजसत्तेची कोंडी...!

"देशात 'मतचोरी'च्या आरोपामुळं वातावरण ढवळून निघालंय. अनेक बाबी उघड झाल्यात. हरियाणातला ईव्हीएम घोटाळा सर्वोच्च न्या...