"राजनाथसिंह यांनी सावरकरांच्या माफीपत्रासाठी गांधीजींची साक्ष काढलीय. असत्य विधान करून संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केलाय. सावरकर ११ जुलै १९११ ला अंदमानात दाखल झाले आणि २९ ऑगस्टला त्यांनी पहिला माफीनामा लिहिला. तिथं पोहोचल्यानंतर अवघ्या दीड महिन्यात. त्यानंतर ९ वर्षांच्या काळात त्यांनी सहा वेळा माफीनामा लिहून दिला. ३० ऑगस्ट १९११, १४ नोव्हेंबर १९१३, १४ सप्टेंबर १९१४, २ ऑक्टोबर १९१७, २० जानेवारी १९२० आणि ३० मार्च १९२० याशिवाय सावरकरांच्या पत्नीनेही जुलै १९१५ ऑक्टोबर १९१५ आणि जानेवारी १९१९ मध्ये मुंबई सरकारकडे तीन माफीपत्र सादर केली होती. गांधी हे ९ जानेवारी १९१५ मध्ये भारतात आले. म्हणजे गांधी भारतात येण्यापूर्वी सावरकरांनी माफीपत्र ब्रिटिशांना लिहिलं होतं. म्हणजे सावरकरांनी गांधींच्या सल्ल्याशिवाय माफीनामा लिहिला होता. हे स्पष्ट होतं. वस्तुतः गांधींनी २६ मे १९२० रोजी लेख लिहून सावरकर बंधूंना माफी द्यावी अशी विनंती केली. मग कशाच्या आधारे राजनाथसिंह असं वक्तव्य करतात? त्यांना गांधींचा मोठेपणा स्वीकारायचाय की, सावरकरांची माफीवीर म्हणून बदनामी करायचीय?"
-------------------------------------------------------------------
*सा* वरकर आणि महात्मा गांधी यांचे वैचारिक मतभेद होते, दोघांच्या विचारात जमीन अस्मानाचं अंतर होतं. सावरकरांनी अंदमानातून सुटका करुन घेण्यासाठी ब्रिटीश सरकारकडं अनेकवेळा माफीनामे सादर केले होते हे सर्वश्रुत आहे. ब्रिटिशांनी सावरकरांची १९११ साली अंदमानच्या कारागृहात रवानगी केली होती, कारागृहात गेल्यानंतर सहा महिन्यातच सावरकरांनी ब्रिटिशांना पहिला माफीनामा पाठवला होता. दुसरा माफीनामा १४ नोव्हेंबर १९१३ साली पाठवला, त्यावेळी गांधीजी दक्षिण आफ्रिकेत होते. गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून ९ जानेवारी १९१५ ला भारतात आले. यावरून महात्मा गांधी यांच्या सांगण्यावरून माफीनामा सादर केला हे राजनाथसिंह यांचं विधान कपोलकल्पीत आणि हास्यापद वाटतं. महात्मा गांधी यांच्याबद्धल रा. स्व. संघ आणि भाजपेयींचे विचार किती विकृत आहेत हे जगाला माहित आहे. राजनाथसिंह यांनीही संघाच्या शिकवणीप्रमाणे असत्य विधान करून लोकांमध्ये संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केलाय. मात्र इतिहासतज्ज्ञ विक्रम संपत यांनी ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, गांधी सेवाग्राम आश्रमाच्या वेबसाइटवर महात्मा गांधी यांच्या कार्याविषयी देण्यात आलेल्या माहिती संग्रहात गांधीजींनी सावरकरांना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख आहे. महात्मा गांधी यांचं हे पत्र 'कलेक्टेड वर्क्स ऑफ महात्मा गांधी'च्या या ग्रंथाच्या खंड १९ च्या पृष्ठ क्रमांक ३४८ वर उपलब्ध आहे. या पत्रात महात्मा गांधी यांनी सावरकरांना लिहिलं आहे, `प्रिय सावरकर, माझ्याकडं तुमचं पत्र आहे. तुम्हाला सल्ला देणं अवघड आहे. परंतु, मी सुचवतो की तुम्ही आणि तुमच्या भावानं केलेला गुन्हा पूर्णपणे राजकीय स्वरूपाचा होता, हे स्पष्ट करण्यासाठी या प्रकरणाची वस्तुस्थिती स्पष्ट करणारी एक छोटी याचिका तयार करा. मी ही सूचना करत आहे, जेणेकरून जनतेचं लक्ष या प्रकरणावर केंद्रित करता येईल. मी तुम्हाला आधीच्या पत्रात सांगितल्याप्रमाणे मी या प्रकरणात माझ्या मार्गानं जात आहे!` यानंतर महात्मा गांधी यांनी हे प्रकरण चर्चेत यावं यासाठी २६ मे १९२० रोजी 'यंग इंडिया'मध्ये एक लेखही लिहिला होता. त्याचाही संदर्भ संपत यांनी दिला आहे. हे खरं असलं तरी गांधीजींनी ब्रिटिशांना पत्रात पुढं म्हणतात की, 'सावरकरांनी माफीनामा दिलाच आहे. शिवाय त्यात त्यांनी सरकारशी सहकार्य करायचं, तसंच कोणतंही राजकीय आंदोलन करणार नाही, असं आश्वासन दिलं आहे. त्यामुळं सावरकर बंधूंकडून कोणताही प्रकारचा उपद्रव होणार नसल्यानं त्यांना कारागृहात ठेवणं योग्य होणार नाही. अशी विनंती गांधींनी ब्रिटिशांना केली होती. अशीच विनंती त्यांनी इतर अहिंसक आंदोलन करणाऱ्या आंदोलक कैद्यांना सोडून देण्यात यावं असं म्हटलं होतं
काही वर्षांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या वेबसाईटचं अनावरण केलं होतं. तेव्हा त्यांनी आपला पहिला ब्लॉग सावरकर यांना अर्पण केला होता. यावरून आजच्या भाजपेयीं राज्यकर्त्यांना सावरकर किती प्रिय आहेत हे लक्षात येतं. भाजपेयींना सावरकर हिंदूवादी म्हणून प्रिय आहेतच. परंतु कोणत्याही प्रकारच्या अभ्यासाचं आणि अभ्यासावर आधारित वस्तुनिष्ठ माहितीचं वावडं असलेल्या त्यांच्या परिवारातल्या इतरांनाही तेवढेच प्रिय आहेत. सावरकरांच्या अनुषंगानं अलीकडच्या काळात घडलेल्या काही महत्त्वाच्या घटना, घडामोडी आहेत या सगळ्या गोष्टी सावरकरांचा गौरव व्हावा यासाठी केल्या जातात की त्यांच्या बदनामीत वाढ व्हावी, यासाठी केलं जातं, असा प्रश्न काही सावरकर भक्तांनाही पडतो. हिंदुत्वाच्या राजकारणाचे जनक म्हणून सावरकरांची ओळख आहे. त्यांचे हिंदुत्व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपपेक्षा वेगळं आहे. सावरकर आणि त्यांच्या हिंदू माणसाला संपवण्यासाठी संघाची स्थापना झाली आणि संघ परिवार हरप्रकारे सावरकरांना चर्चेत आणून बदनाम करतो असं लिहिणारे, बोलणारे सावरकरवादी देखील आहेत. या पार्श्वभूमीवर मध्यंतरी 'द वीक' या इंग्रजी साप्ताहिकानं मात्र अस्सल कागदपत्रांच्या आधारे सावरकरांच्या 'वीर' विशेषणाचा पंचनामा केलाय. या साप्ताहिकाचे प्रतिनिधी निरंजन टकले यांनी हा स्पेशल रिपोर्ट लिहिलाय. त्यातील महत्त्वाचं तसंच काही सांगण्यापूर्वी टकले यांची पार्श्वभूमी ही विचार घेतली पाहिजे. निरंजन टकले हे मूळचे नाशिकचे. नाशिक जिल्ह्यातील भगूर हे सावरकर यांचे जन्मगाव. स्वाभाविकपणे निरंजन टकले यांना सावरकरांच्याबद्धल प्रेम आणि आपुलकी होती. त्यापोटीच ते सावरकरांच्या संदर्भात माहिती घेत कागदपत्र तपासत राहिले. म्हणजे एका स्वातंत्र्यवीराच्या भूतकाळातल्या आयुष्याचा प्रेमापोटी शोध घेण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न होता. मात्र त्या प्रयत्नांमध्ये त्यांना जी माहिती मिळत गेली ती पाहिल्यावर त्यांचा या स्वातंत्र्यवीरांच्या कथित पराक्रमाच्या गोष्टींबद्धल पुरता भ्रमनिरास झाला आणि त्यातूनच त्यांच्या 'द वीक' मधील स्पेशल रिपोर्टचं शीर्षक 'शेळीचं सिंह म्हणून उदात्तीकरण' असं दिलं होतं. म्हणजे सावरकरांना सिंह वगैरे जे म्हटलं जातं ते खरं नाही. उलट ते अतिशय घाबरट होते. ब्रिटिशसत्तेविरूद्ध त्यांनी संघर्ष केला नाही, तर शिक्षेतून माफी मिळण्यासाठी वारंवार केलेल्या दया याचिकेबाबत सावरकरांच्या संदर्भातील शोधातून हे असत्य आढळलं. त्यावरूनच लेखाचं शीर्षक दिलं असल्याचं टकले यांचं म्हणणं होतं.
'द आरएसएस-आयकॉन्स ऑफ द इंडियन राइट' या पुस्तकाचे लेखक नीलंजन मुखोपाध्याय यांनी सांगितलं, की २६ मे २०१४ ला नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यानंतर दोनच दिवसांनी सावरकरांचा १३१ वा जन्मदिवस होता. त्याचं औचित्य साधून मोदींनी संसद भवनातील सावरकरांच्या फोटोला अभिवादन केलं होतं. असं असलं तरी सावरकर हे विवादास्पद व्यक्तिमत्त्व होतं हेही आपल्याला मान्य करायलाच हवं. "गांधी हत्येप्रकरणी सावरकरांवर खटला दाखल करण्यात आला होता. ते सुटले असले तरी त्यांच्या हयातीतच त्यांच्या चौकशीसाठी कपूर आयोग नेमण्यात आला होता आणि या आयोगाच्या अहवालात सावरकरांवर कायमच संशयाची सुई होती. अशा नेत्याला सार्वजनिक आयुष्यात इतका सन्मान देणं ही मोदींची प्रतीकात्मक कृती होती," असंही मुखोपाध्याय यांनी म्हटलंय. नाशकात कलेक्टर जॅक्सनला अनंत कान्हेरेनं पिस्तूलानं उडवलं. १९१० मध्ये नाशिकच्या प्रकरणातील ही पिस्तुलं सावरकरांनी पाठवली म्हणून त्यांना अटक झाली. तिथून सावरकरांना आणतानाच त्यांनी मार्सेलीस खाडीत उडी मारली. पण सावरकरांना तिथून पळ काढता आला नाही. ब्रिटिश सोल्जरांनी त्यांना पकडलं. भारतात आणलं. त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवून ब्रिटिश सरकारनं त्यांना दोन जन्मठेपेची शिक्षा भोगण्यासाठी अंदमानच्या काळ कोठडीत डांबलं. 'ब्रेव्हहार्ट' नावानं सावरकरांचं चरित्र लिहिणारे आशुतोष देशमुख सांगतात. "त्यादिवशी सावरकरांनी जाणूनबुजून आपला नाइट गाऊनचा घातला होता. शौचालयाच्या दरवाजाला काच होती, जेणेकरून कैद्यांवर नजर ठेवता येईल. सावरकरांनी आपला गाऊन काढून दरवाजावरील काचेवर टाकला. त्यांनी आधीच शौचालयाच्या पोर्ट होलचं माप घेतलं होतं आणि त्यांना अंदाज होता, की आपण यातून बाहेर जाऊ शकतो. आपल्या काटकुळ्या शरीराला त्यांनी पोर्ट होलमधून समुद्रात झोकून दिलं. नाशिकमध्ये घेतलेलं पोहोण्याचं प्रशिक्षण त्यांच्या कामी आलं आणि ते वेगानं किनाऱ्याच्या दिशेनं जायला लागले. सुरक्षारक्षकांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या, मात्र ते बचावले," असं आशुतोष देशमुख यांनी सांगितलं. देशमुख पुढे लिहितात, की "सावरकरांच्या पाठोपाठ सुरक्षारक्षकांनीही समुद्रात उडी मारली आणि त्यांचा पाठलाग करायला लागले. सावरकर जवळपास १५ मिनिटं पोहून किनाऱ्यावर पोहोचले. वेगानं धावत त्यांनी किमान अर्धा किलोमीटरचं अंतर पार केलं. त्यांच्या अंगावर पुरेसे कपडेही नव्हते. तेव्हा त्यांना एक पोलीस अधिकारी दिसला. त्याच्याजवळ जाऊन सावरकरांनी विनंती केली, की त्यांना राजकीय आश्रयासाठी मॅजिस्ट्रेटकडे नेलं जावं. मात्र त्यांच्या मागावर असलेले सुरक्षारक्षकही तोवर किनाऱ्यावर पोहोचले होते आणि ते 'चोर, चोर' असं ओरडत होते. सावरकरांनी खूप विरोध केला, पण त्याचा उपयोग झाला नाही. त्यांना पकडण्यात आलं. पकडले गेल्यानंतर सावरकरांना भारतात पाठवलं गेलं आणि त्यांना २५-२५ वर्षांच्या कारावासाच्या दोन शिक्षा सुनावण्यात आल्या. शिक्षा भोगण्यासाठी भारतातल्या अंदमान इथं पाठविण्यात आलं. या शिक्षेला 'काळ्या पाण्या'ची शिक्षाही म्हणायचे. त्यांना तिथल्या ६९८ खोल्यांच्या सेल्युलर जेलमध्ये १३.५ बाय ७.५ आकाराच्या खोली क्रमांक ५२ मध्ये ठेवण्यात आलं होतं. जेलमधल्या जीवनक्रमाबद्धल आशुतोष देशमुख यांनी लिहिलं आहे, की अंदमानमध्ये सरकारी अधिकारी बग्गीमधून जायचे आणि राजकीय कैद्यांना या बग्ग्या ओढाव्या लागायच्या. तिथले रस्तेही धड नव्हते आणि बराचसा भाग हा डोंगराळ होता. जेव्हा कैदी बग्गी ओढू शकायचे नाहीत, तेव्हा त्यांना शिवीगाळ आणि मारहाण केली जायची. त्रास देणाऱ्या कैद्यांना जेवण्यासाठी केवळ पाणचट सूप दिलं जायचं! अनेकदा कैद्यांना हातकड्या आणि बेड्या घालून उभं रहायची शिक्षाही दिली जायची. या सेल्युलर जेलमध्येच सावरकरांच्या आयुष्याचा दुसरा अध्याय सुरू झाला होता. या तुरूंगात त्यांनी घालविलेल्या ९ वर्षें आणि १० महिन्यांनी त्यांचा इंग्रजांना असलेला विरोध पूर्णपणे मावळला. निरंजन टकले सांगतात, "मी सावरकरांच्या आयुष्याकडं वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये पाहतो. त्यांच्या आयुष्याचा पहिला टप्पा हा रोमँटिक क्रांतिकारी विचारांनी भारलेला होता. याच काळात त्यांनी १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामावर पुस्तकही लिहिलं होतं. त्यात त्यांनी धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार केला होता. अटक झाल्यानंतर सावरकरांना वास्तवाची जाणीव झाली. ११ जुलै १९११ ला सावरकर अंदमानमध्ये दाखल झाले आणि २९ ऑगस्टला त्यांनी आपला पहिला माफीनामा लिहिला. म्हणजेच तिथं पोहोचल्यानंतर अवघ्या दीड महिन्यात! त्यानंतर ९ वर्षांच्या काळात त्यांनी सहा वेळा इंग्रजांना माफीनामा लिहून दिला. जेलमधील नोंदींनुसार तिथं तीन-चार महिन्यांत कैद्यांना फाशी दिली जायची. फाशी देण्याचं ठिकाण हे सावरकरांच्या खोलीच्या बरोबर खाली होतं. फाशी देतांना होणाऱ्या चित्कारांनी कदाचित या गोष्टीचाही सावरकरांवर परिणाम झाला असावा. जेलर बॅरीनं सावरकरांना काही सवलती दिल्याचीही कुजबूज होती, असं निरंजन टकले सांगतात.
सावरकरांच्या माफी संदर्भातील काही गोष्टी श्रीकांत शेट्ये यांनी 'माफीवीर सावरकर' या पुस्तकातून मांडल्यात. सावरकरांनी माफीनामे दिले, त्यात ते म्हणतात, "मी घराबाहेर पडून बिघडलेला, उधळ्या, खर्चिक मुलगा आहे. मायबाप ब्रिटिश सरकारच्या पंखाखाली सुरक्षित राहण्यासाठी माझी अंदमानच्या तुरूंगातून सुटका करावी. मी १९११ मध्ये दयेचा अर्ज केला होता. त्याचाही सहानुभूतीपूर्वक विचार करून दयाळू आणि परोपकारी विचार करणे माझी सुटका केली तर, इंग्रज सरकारचा मी जन्मभर पुरस्कर्ता राहीन. जोपर्यंत आम्ही तुरुंगात आहोत, तोपर्यंत इंग्लंडच्या राजेसाहेबांच्या भारतातील रयतेच्या लाखो घरकुलात आनंद आणि समाधान कसे लाभेल? कारण ते आणि आम्ही एकाच रक्ताचे आहोत पण आमची सुटका झाली तर सारी रयत हर्षाने आरोळ्या ठोकील आणि शिक्षा सूडबुद्धी न ठेवता माफी आणि पुनर्वसनावर भर देणाऱ्या सरकारचा जयजयकार करील." दुसऱ्या पत्रात सावरकर म्हणतात, "एकदा मी स्वतः सरकारच्या बाजूने झालो, की मला गुरुस्थानी मानून रक्तरंजित क्रांतीचे स्वप्न बघणारे, भारतातील आणि परदेशातील हजारो तरुण पुन्हा ब्रिटिश सरकारच्या बाजून येतील. माझी भविष्यातील वागणूक सरकारला अनुकूल राहील. इंग्रज सरकारला ज्या पद्धतीने माझ्याकडून सेवा करून घ्यावीशी वाटेल. त्या पद्धतीने काम करण्यास मी तयार आहे. मला तुरुंगात ठेवून सरकारला काय मिळेल? यापेक्षा मला सोडाल तर त्याहीपेक्षा जास्त फायदा सरकारचा होईलं. माझ्यासारखा वाट चुकलेला पुत्र आपल्या पितारुपी सरकारच्या दरबारातच नाही येणार तर कुठे जाणार?" अशा प्रकारचे माफीनामे हे सावरकरांनी ब्रिटिश सरकारला गुंगारा देण्यासाठी लिहिले होते, असं सावरकरवादी म्हणतात. अशा सावरकरवाद्यांनी १४ नोव्हेंबर १९१३ चा हा माफीनामा भारत सरकारच्या पुरातत्व विभागात पहावा असं श्रीकांत शेट्ये यांनी नमूद केलं आहे. शेट्ये यांनी सावरकरांचे दोनच माफीनामे पुढे आणलेत. पण निरंजन टकले यांच्या शोधानुसार सावरकरांनी इंग्रज सरकारकडं एखाद-दुसरं माफीपत्र दिलं नाही, तर एकूण सात माफीपत्रं दिली आहेत. त्यासाठी त्यांनी काही तारखांचे पुरावे दिले आहेत. सावरकर ४ जुलै १९११ रोजी तुरुंगात दाखल झाले आणि माफी मागणारे पहिले पत्र ३० जुलै १९११ रोजी लिहिलेलं आहे. पहिले सहा महिने सावरकरांना एकट्याला एका सेलमध्ये ठेवले होतं. त्या काळात त्यांना कोणतेही काम सोपवलं नव्हतं. त्यांना कुणालाच भेटता येत नव्हतं. सावरकरांना पन्नास वर्षे तुरुंगात राहण्याची शिक्षा झाली होती. पण प्रत्यक्षात ते ९ वर्षे १० महिने तुरुंगात होते. या काळात त्यांनी स्वतः ७ माफीपत्र लिहिली आणि त्यांच्या पत्नीनं त्यांच्यावतीने मुंबई सरकारकडून तीन माफीपत्र दिली. सावरकर यांच्या पत्रांची भाषा पाहिली तर, ते किती आर्जवी आणि ब्रिटिश सरकारची भलामण करणारी आहे हे लक्षात येतं आणि ती वाचून आश्चर्यही वाटतं. यातील महत्त्वाची बाब म्हणजे टकले यांच्या या लेखनात कुठेही मुद्दामहून सावरकरांना अनादर करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला नाही की आरोप केले नाहीत. इतिहासाच्या पानांमध्ये दडलेले पुरावे त्यांनी कागदपत्रांच्या आधारे पुढे आणले. यातील काही गोष्टी जुन्या असल्या तरी, काही नव्याने पुढे आले आहेत. त्यासाठी २१ हजार कागदपत्रांचा अभ्यास त्यांनी अनेक महिने केला, असं टकले यांनी म्हटलंय. सावरकर यांनी इंग्रजांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, "येणाऱ्या काळात ब्रिटिश साम्राज्याला हिंदूंच्या मदतीनेच समान ध्येय ठरवावे लागेल. हिंदु महासभा आणि ब्रिटिशांनी समान उद्देश ठेवून काम केले पाहिजे!" सावरकरांच्या या पत्रातून काय स्पष्ट होतं ते पहा, काँग्रेस ही त्या काळात राष्ट्रीय चळवळ करणारी होती. रस्त्यावर उतरणारा तो राजकीय पक्ष होता. म्हणजे काँग्रेस आणि मुस्लिमांना विरोध करणे हा समान उद्देश सावरकरांनी ब्रिटिश सरकारला सूचित केला होता!
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये १९४२ च्या चलेजाव चळवळीला विशेष महत्त्व आहे. या चळवळीला सावरकरांनी पत्रक काढून विरोध केला होता. एवढंच नाही तर त्या काळात सावरकरांचे कार्यकर्ते राष्ट्रीय चळवळीच्या विरोधात पोलिसांना म्हणजे ब्रिटिश सरकारला माहिती पुरवत होते. म्हणजे महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्य चळवळीच्या विरोधात ब्रिटिशांचे खबरे म्हणून सावरकरांचे अनुयायी काम करत होते. स्वातंत्र्य चळवळीशी गद्दारी करत होते. 'रिस्पॉन्स को-ऑपरेशन' अंतर्गत सरकारला मदत करायची, असं त्यांचं धोरण होतं. असं धरून असलेल्या सावरकरांना स्वातंत्र्यवीर म्हटलं जातं हे एक आश्चर्यच म्हणायला हवं. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिशांना पाठिंबा आणि साथसंगत देणाऱ्या सैन्यात लष्कर भरतीसाठी हिंदू महासभेने रिक्रुटमेंट बोर्ड तयार केली होती. त्यासाठी जपान भारतावर आक्रमण करणार असा प्रचार केला जात होता. विशेष म्हणजे जपान त्यावेळी नेताजी बोस यांना मदत करत होता. आणि नेताजी जपानच्या मदतीने ब्रिटिश सरकार उलथून टाकण्यासाठी भारतात आझाद हिंद फौज घेऊन घुसणार होते. म्हणजे तिथे पुन्हा एक गोष्ट लक्षात येते की, त्याच नेताजींच्या विरोधात सावरकर उभे ठाकले होते; तुरुंगातून सुटल्यानंतर कोणत्याही राजकीय आंदोलनात सहभागी होणार नसल्याची ग्वाही सावरकरांनी दिली असली तरी सामाजिक सुधारणेच्या नावाखाली तर राजकीय कार्य सुरू होतं. हिंदू महासभेचे अनेक राजकीय कार्यक्रम होत होते आणि ब्रिटिशांना सोयीचे असतील अशा कार्यक्रमांना परवानगी मिळत होती. हिंदू महासभेच्या धर्मांतराच्या किंवा शुद्धीकरणाच्या कार्यक्रमांना परवानगी मिळत असे. सावरकरांच्या अटकेसंदर्भातही विविध प्रवाद आहेत. या नव्या माहितीनुसार, सावरकरांना १३ मार्च १९१० रोजी लंडनमध्ये अटक झाली. नाशिकचे तत्कालीन कलेक्टर जॅक्सन यांच्या हत्येसाठी मदत केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. हत्या करणाऱ्या अनंत कान्हेरेने ज्या पिस्तुलाने जॅक्सनची हत्या केली, ते पिस्तूल सावरकरांनी लंडनहून पाठवलं होतं. म्हणूनच सावरकरांवर दोन आरोप होते, खून आणि खुनाचा कट करणे त्यासाठी प्रत्येकी पंचवीस वर्षाच्या अशा दोन जन्मठेपेच्या म्हणजे पन्नास वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. टकले यांना जेल डायरीत एक तपशील सापडला. तो असा, काळ्यापाण्याची शिक्षा झालेल्या प्रत्येक कैद्याच्या जेल हिस्टरीमध्ये त्यानं केलेला गुन्हा, त्याला झालेली शिक्षा आणि त्याला दिलेल्या कामाचा तपशीलवार उल्लेख असायचा. सावरकरांच्या या तिकिटावर कैदी नंबर ३२७७८ सेल ५२ तीन असा उल्लेख होता. त्यांचा भाऊ गणेश आणि बाबाराव हे सुद्धा त्यांच्यासोबत अंदमानच्या तुरुंगात होते. स्वातंत्र्यसैनिक राहिलेले कचेना चक्रवर्ती यांनी लिहिलं आहे की जेलमधील राजकीय कैदी दोन गटांमध्ये विभागले होते. नेमस्त म्हणजे मॉडरेट आणि जहाल म्हणजे अतिरेकी एक्स्ट्रीमीस्ट! सावरकर बंधू , बंगाली क्रांतिकारक रवींद्र घोष आणि इतर काही कैदी हे आधी आले होते. ते त्रासले होते, ते आमच्या संभाव्य चळवळीत सहभागी झाले नाहीत. सावरकर बंधू आम्हाला खासगीत प्रोत्साहन देत होते, परंतु उघडपणे आमच्या सोबत येण्यास तयार नव्हते. अंदमानमध्ये आलेल्या राजकीय कैदींपैकी फक्त सावरकर बंधू आणि बरेंद्र घोष यांनी इंग्रजांकडे देयेची याचना केली. वि. दा. सावरकर यांनी केलेल्या दयेच्या पत्राच्या सहा तारीखा उपलब्ध आहेत. त्याच्या ३० ऑगस्ट १९११, १४ नोव्हेंबर १०१३, १४ सप्टेंबर १९१४, २ ऑक्टोबर १९१७ च्या २० जानेवारी १९२० आणि ३० मार्च १९२० याशिवाय सावरकरांच्या पत्नीनेही जुलै १९१५ ऑक्टोबर १९१५ आणि जानेवारी १९१९ मध्ये मुंबई सरकारकडे तीन माफीपत्र सादर केली होती. हे सारं असताना राजनाथसिंह यांनी सावरकरांच्या माफीसाठी गांधीजींची साक्ष काढलीय. हे संयुक्तिक नाहीच. यावरून असं वाटतं की, सावरकरांनी माफी मागितली होती, हेच लोकांच्या मनांवर बिंबवायचं आहे की काय? या वक्तव्यानं सावरकरांची प्रतिमा डागाळते त्यांची बदनामी होतेय असं भाजपेयींना वाटत नाही का?
येनकेन मार्गाने महात्मा गांधींची छबी ही सावरकरांपेक्षा छोटी दाखवण्याच्या स्पर्धेत संघापासून भाजपापर्यंत सर्वजण तुटून पडले आहेत. यातून विद्यमान संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी अकलेचे तारे तोडत विधान केलं की, सावरकरांनी गांधींच्या सल्ल्यावरून इंग्रजांना माफीनामा दिला म्हणे. तसं पाहिलं तर यांचा आणि इतिहासाच्या अभ्यासाचा काही संबंध नसतोच म्हणा. पण आपण एक लक्षात घ्यायला हवं की, सावरकरांनी १९११ पासूनच इंग्रजांना माफीनामा द्यायला सुरुवात केलेली होती. त्यावेळी गांधी दक्षिण आफ्रिकेत सत्याग्रहात सक्रिय होते. त्यांचा तत्कालीन भारतीय स्वातंत्र्य चळवळीत काहीही संबंध नव्हता. मग, सावरकरांना माफीनामाचा सल्ला द्यायला महात्मा गांधी कधी गेले होते, हा प्रश्न निर्माण होतो. १९२५ मध्ये गांधींनी सावरकरांच्या सुटकेचं समर्थन केलं होतं. पण, सल्ला वैगेरे काही दिला होता, असे पुरावे सापडत नाहीये. दुसरं असं की, गांधी आफ्रिकेत तुरुंगात होते. तेव्हा त्यांची पत्नी कस्तुरबा मृत्यूशय्येवर होती. तेव्हा गांधींचे सहकारी अलबर्ट व्हेस्ट यांनी गांधींना पत्र लिहिलं आणि सांगितलं की, तुम्ही सरकारची माफी मागा आणि कस्तुरबा यांच्याजवळ या. तेव्हा प्रतिउत्तरादाखल गांधी कस्तुरबा यांना सांगतात की, "तू आजारी आहे, हे ऐकून खूप वाईट वाटलं. पण, मी जो लढा देत आहे तो सत्याचा लढा आहे. तुझ्यासाठी मी सरकारची माफी मागून आलो तर मी माझ्या सत्याच्या लढ्याशी गद्दारी केल्यासारखं होईल. त्यामुळे मला माफ कर." आपल्या पत्नीच्या बाबतीत जो माणूस इतका कठोर होतो आणि माफी मागणं नाकारतो. तो माणूस सावरकरांना माफी मागण्याचा सल्ला देईल का, या प्रश्नाचं उत्तर संदर्भहीन विधानं करणारे देऊ शकतील का? असो. तुम्ही गांधींना कितीही छोटं ठरवून सावरकरांना मोठं करण्याचा प्रयत्न करा. पण हेच सत्य आहे की, गांधी तुम्ही जेवढा छोटा करण्याचा प्रयत्न कराल तेवढा गांधी मोठा होत राहील.
विषाची पेरणी आणि देशभक्तांची वाटणी !
गांधी एकट्या काँग्रेसचे व सावरकर फक्त भाजप-आरएसएसचे अशा वाटणीने भारताच्या भविष्याला सुरूंग लावलाय. भक्ताला जात-धर्म असतो का? गांधी आणि सावरकर, एक महात्मा आणि दुसरा महापुरुष! दोघेही मातृभूमीच्या प्रेमासाठी तुरुंगात गेले ब्रिटिशांच्या विरोधात तहहयात लढले. दोघेही बॅरिस्टर. दोघेही हिंदू, तर सावरकर जहाल हिंदुत्ववादी! दोघांना अखंड भारत पाहिजे होता. परंतु मुस्लिम लीगचे धर्मांध राजकारण फाळणीपर्यंत पोहोचविण्याचे पाप बॅरिस्टर जीनांनी निष्ठेने केलं कांग्रेसच्या मध्यवर्ती प्रवाहाचे राष्ट्रीय नेतृत्व गांधीजी करत होते. त्यामुळं पाकिस्तान- भारताच्या फाळणीचे खापर सर्वच विरोधकांनी महातम्यांच्या कपाळी मारले. राष्ट्रहितासाठी देशभक्त समर्पित असतात. हे समर्पण गांधी आणि सावरकर यांनी सिद्ध केलंय. पण संपुर्ण मानवाच्या कल्याणाची भूमिका महात्म्याची असते. ती गांधीजींच्या जीवनात स्वयंसिद्ध आहे. त्यामुळे गांधींना हिंदुधर्म संदर्भ असूनही त्याचे कार्य मुस्लिमांसह सर्व धर्माच्या एकात्मतेचे सूत्र सांगते.
गांधी सहिष्णू उदार तर सावरकरांना देशभक्ताला जानव्यात कुजवर्ण पाप जात-धर्माधतेच्या विषाची पेरणी करून सावरकरांची देशभक्ती अनेक विद्वानांनी जानव्यात कुजवली विद्वानांची ही बेइमानी सत्यासह ह राष्ट्राशीसुद्धा । आहे. सावरकरांनी ब्रिटिश सरकारला लिहिलेली माफीपत्रे त्यावेळच्या रूढ आकृतिबंधाची पूर्वअट होती; पण ती खरोखरच नाटक कार शिवाजीराजे पावरल्याचे आहेत का? करून अफजललानाला ठार करतात. औरंगजेवाला फसवून तुरुगातून सुटतात तशीच भूमिका अस्सल देशभक्त सावरकरांची दिसते. त्याशिवाय सागरा प्राण तळमळला' किंवा 'तुजविण जनन ते मरण आणि "जयोस्तुते सारख्या प्रखर राष्ट्रीय भक्तिप्रवण
हे महापुरुष दोघेही मातृभूमीच्या प्रेमासाठी तुरुगात गेले ब्रिटिशांच्या विरोधात तहहयात लढले. दोघेही वरिस्टर दोघेही हिंदू पण गांधी सहिष्ण उदार हिंदू, तर सावरकर अहा दोघानाही अखंड भारत पाहिजे होता. परंतु मुस्लीम लिये सध राजकारण फाळणीपर्यंत पोचवण्याचे पाप में जिनांनी निषेठने केले. काँग्रेसच्या मध्यवर्ती प्रवाहाचे राष्ट्रीय नेतृत्वम गांधीजी करीत होते त्यामुळे पाकिस्तान भारताच्या फाळणीचे खापर सर्वध विरोधकांनी महात्म्याच्या कपाळी मारले राष्ट्रहितासाठी देशभक्त समर्पित असतो. है समर्पण गांधी आणि सावरकर यांनी सिद्ध केलेय पण संपूर्ण मानवाच्या कल्याणाची भूमिका महात्म्याची असते. ती गांधींच्या जीवनात स्वयंसिद्ध आहे. त्यामुळे गांधीना हिंदुजन्म र संदर्भ असूनही त्यांचे • कार्य मुस्लीमांसह सर्व धर्माच्या एकात्मतेचे सूत्रांसावरकर प्रखर हिंदुत्ववादी असल्याने आणि अहिंसावादाचे सोवळे त्यांना अमान्य असल्याने गांधीवादी सर्वधर्म समभावासह अहिंसेला त्यांनी विरोध रांची देशभक्ती ब्रिटिश सरकारच्या केला. सावरकरांची अंदमानी तुरुंगातून तावून सुलाखून निघालीय. पण त्यांची भूमिका गांधीतला 'महात्मा' पचवू शकत नव्हती. गांधींची देशभक्ती व्यापक विश्वमानवतेच्या गहिवराने मंडीत होती. त्यामुळे मतभेद अटळ होते. देशभक्त सावरकरांचा गांधीकृत गौरव महापुरुषांचे मतभेद तात्विक असतात तुरुंगात खितपत पडलेल्या सावरकरांच्या देशभक्तीचा यथार्थ गौरव गांधींनी लेखन व विनायक सावरकरांच्या पत्रात जरूर केलाय. तरीही काँग्रेस सावरकरांची देशभक्ती आज का नाकारते आहे? गांधीतला महात्मा तरी काँग्रेसी पुढाऱ्यांनी पचवलाय का? आणि भाजपनेसुद्धा ओठात गांधी पोटात गोडसे, अशी बेईमान भूमिका का पुजली गांधीनी सावरकरांना १९२० मध्येच 'देशभक्त' म्हटलेय, मग आताची काँग्रेस हे सत्य का नाकारते? गांधी एकट्या काँग्रेसचे व सावरकर. फक्त भाजप-आरएसएसचे अशी वाटणी सोईने करून भारताच्या भविष्याला भाजप-काँग्रेसच्या राजकारणाने सुरुंग लावलाय गांधी व सावरकरांची देशभक्ती बेरजेत आणून राष्ट्र बलवान करता येते. पण नेत्यांना नेमके तेच नको आहे.
सत्याशी बेहमानी का? अंदमानच्या तुरुंगात अनेक राष्ट्रभक्त जन्मठेप सोसत होते. त्यांनी माफीपत्र दिले नाही, हे खरेच पण त्यांची भूमिका सावरकरांसारखी डावपेचात्मक नसावी आणि खरोखरच सावरकरांनी बेट माफीच मागितली तरी तेवढी जागा त्या देशभक्ताची मर्यादा म्हणून समजून घेता येते. सावरकर देशभक्तच नव्हेत का? मंग त्यांच्या चारित्र्यावर घाणेरडे कार सावरकरांचा हिंदुत्ववाद आरोप कार व हिंदू महासभा अनेकांच्या मतभेदाचा विषय जरूर होऊ शकतो, पण त्यांची समुद्रात मारलेली ऐतिहासिक उडी आणि त्याग बदनामीचा विषय का व्हावा? राजकारणी स्वार्थी असू शकतात, पण विद्वानांनीसुद्धा सत्याशी बेइमानी का करावी? गांधी व गोडसे दोन्ही देशभक्त कसे? आरएसएस आणि भाजपचे खरेखुरे मानदंड कोण आहेत? गोळवलकरांचे संविधान व समाजवादविरोधी जातव्यवस्था समर्थक 'विचारधन पचवून गांधीतला महात्मा कसा पूजता येतो? सावरकरांचे विज्ञाननिष्ठ आणि जातविरोधी "हिंदुत्व' तरी संघ-भाजपला मान्य आहे का? तरीही सर्वच ऐतिहासिक व्यक्तींची खिचड़ी व्यासपीठावर पुजण्याची नवी नाटकी परंपरा स्पष्ट झालीय गांधी व गोडसे दोन्ही देशभक्त, है बाँग आहे. खरे तर भाजप व काँग्रेससह सर्वच पक्ष अस्सल महापुरुषाच्या संस्काराशी इमानदार दिसत नाहीत. त्यांच्या आपसी कलगीतुन्यासाठी महापुरुषांना वापरण्याची दुकानदारी सध्या जोरात आहे. आता जनतेने सत्य शोधावे, विवेक अपावा. लोकशाही वाचवावी. महापुरुषांच्या मर्यादा वगळून सामर्थ्याची बेरीज करावी. कारण त्यांच्यापेक्षा त्यांचे ध्येय महत्त्वाचे दिशा महत्वाची!
-हरीश केंची
९४२२३१०६०९
Subscribe to:
Post Comments (Atom)
अशी होती बाळासाहेबांची शिवसेना...!
शिवसेनेत लोकशाही नाही; शिवशाही आहे अन् शिवसेनाप्रमुख हेच शिवसेनेचे एकमेव नेते आहेत; ही गोष्ट बाळासाहेबांनी कधी लपवली नाही. ही रच...
-
"शी S...S... कर्नाटकातली ही घटना अत्यंत शरमेची, किळसवाणी आणि धक्कादायक आहे, जनता दलाच्या प्रज्ज्वल रेवण्णा या खासदारानं तब्...
-
"तुम्हाला ट्राफिक हवालदारनं पकडलंय का? तो पैसे डायरेक्ट घेत नाही, एक टपरी असते, तिथं तो पैसे द्यायला लावतो. भाजप हा ट्राफिक...
-
"आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करताना त्यांची वैविध्यपूर्ण वाटचाल डोळ...
No comments:
Post a Comment