तेरे प्यार का आसरा चाहता हूँ
वफ़ा कर रहा हूँ वफ़ा चाहता हूँ......
हसीनो से अहद ए वफ़ा चाहते हो
बड़े नासमझ हो ये क्या चाहते हो....
यातला प्रेमवीर बाजूला ठेवा. प्रेमाने भारावलेली प्रेयसी बाजूला ठेवा. त्यांच्यात सामावलेला केजरीवाल किंवा भारावलेली दिल्लीची जनता आपण बघितली काय? त्यांच्यातच नवनवे राजकीय पक्ष वा नेते आणि त्या त्या कालखंडात भारावलेली मतदार जनता आपण बघू शकलो आहोत काय? हातात झाडू घेऊन देशाला भ्रष्टाचारमुक्त करायला निघालेल्या केजरीवाल व त्याच्या सख्यासोबत्यांनी दिल्लीकरांना मागल्या सहा महिन्यात जी मधूरवाणीने भुरळ घातली; त्याचे शब्द, त्यातला आशय महेंद्रकपूरच्या स्वरापेक्षा कितीसा वेगळा होता? त्याला साशंक मनाने दाद म्हणजे मते देणार्या दिल्लीच्या मतदाराचा सावध प्रतिसाद लताच्या स्वरापेक्षा भिन्न होता काय? फ़क्त तुम्ही साथ द्या आणि बघा, अवघे जग आपण उलथेपालथे करून टाकू; असाच त्यातला आशय नाही काय? त्यातला आर्जवी स्वर आणि तितकेच आश्वासक शब्द. तो प्रेयसीला म्हणतो तुझे मंदीर उभारून तुझी पूजा बांधीन. पण त्याच्या प्रेमाला सावध प्रतिसाद देणारी ती प्रेयसी पदोपदी त्याला इशारा देते आणि धोके दाखवते आहे. पण बंडाचा झेंडा खांद्यावर घेतलेला प्रियकर कुठे शुद्धीवर येतो? त्याची मर्दुमकी चालूच असते तो म्हणतो
दुपट्टे के कोने को मुँह में दबा के
ज़रा देख लो इस तरफ़ मुस्कुरा के
मुझे लूट लो मेरे नज़दीक आ के
कि मैं मौत से खेलना चाहता हूँ,
वफ़ा कर रहा हूँ वफ़ा चाहता हूँ
रिवाज़ों की परवाह ना रस्मों का डर है
तेरी आँख के फ़ैसले पे नज़र है
बला से अगर रास्ता पुर्खतर है
मैं इस हाथ को थामना चाहता हूँ,
वफ़ा कर रहा हूँ वफ़ा चाहता हू
केजरीवाल व त्यांच्या पक्षाने दिल्लीकरांना भेडसावणार्या प्रत्येक समस्येवर सोपा उपाय काढला होता. प्रत्येक नियम ही जगण्यातली अडचण आहे, म्हणूनच प्रत्येक कायदा झुगारून लावा, प्रत्येक कायदाच भ्रष्टाचाराची जननी आहे, तो पायदळी तुडवा. यापेक्षा त्यांची भूमिका तसूभर वेगळी होती काय? केजरीवाल व त्यांच्या पक्षाची भूमिका त्या गाण्यात अशी येते. ‘जनलोकपालके लिये सौ कुर्सिया कुरबान, भ्रष्टाचारसे कोई सौदा नही’, हे ऐकायला खुप बरे वाटते. पण ज्या परिस्थितीत केजरीवाल यांनी दिल्लीकरांचे भवितव्य राज्यपालाच्या हाती सोपवून पळ काढला आहे, त्यातून आता लोकांनी आपले निवडून दिलेले आमदारही निरूपयोगी झालेले आहेत. त्यांना कुठला अधिकार राहिलेला नाही. त्या बदल्यात दिल्लीकरांच्या नशीबी काय आले?
वीजेचे दर अर्धे करणार, सातशे लिटर मोफ़त पाणी, साडेतीन लाख हंगामी कर्मचार्यांना कायम नोकरीत घेणार, ज्यांनी आंदोलनात सहभागी होऊन दिड वर्ष वीजेची बिलेच भरली नाहीत, त्यांना अर्धी बाकी माफ़; इत्यादी सगळी आश्वासने बारगळली आहेत. ही सगळी आश्वासने पुर्ण करण्याचा मार्ग भलताच कठीण म्हणजे ‘पुर्खतर’ आहे असे सगळेच ओरडून सांगत होते. पण आपल्या नायकाला पर्वा कुठे होती? ‘बला से अगर रास्ता पुर्खतर है’. ज्यांनी केजरीवाल यांच्यावर विसंबून ह्या सर्व गोष्टी केल्या; त्यांच्यावर आज काय परिस्थिती आलेली आहे? ते सर्व कर्मचारी आजही हंगामी कंत्राटी आहेत, ज्यांनी दीड वर्षापासून वीजबिले थकवली, त्यांच्या बोकांडी पंधरावीस हजाराची बिले बसली आहेत. पाण्याची टंचाई कायम आहे. आणि हे सगळे धोके दिल्लीकरांनी प्रेमात पडलेल्या प्रेयसीसारखे ओढवून आणलेले नाहीत काय? कळत असूनही ते धोके पत्करलेले नाहीत काय? मौतसे खेलनेवाला फ़रारी झाला आहे आणि बिचारी जनता गोत्यात सापडली आहे. प्रत्येक युगात आणि प्रत्येक समाजात असे क्रांतीकारक येतच असतात आणि त्यानी घातलेली भुरळ त्या त्या कालखंडात जनतेला भुलवतच असते. आपल्या मनातल्या शंका संशय गुंडाळून जनता त्या स्वप्नाला भुलतच असते. केजरीवाल नावाच्या जादूगार प्रियकराचे समिकरण कुठे फ़सले? काय चुकले त्याचे? साहिरने त्याचेही उत्तर त्याच गाण्यात प्रेयसीच्या मुखातून दिलेले आहे.
ज़रा सोच लो दिल लगाने से पहले
कि खोना भी पड़ता है पाने के पहले
इजाज़त तो ले लो ज़माने से पहले
कि तुम हुस्न को पूजना चाहते हो,
बड़े नासमझ हो ये क्या चाहते हो
मोहब्बत की दुश्मन है सारी खुदाई
मोहब्बत की तक़दीर में है जुदाई
जो सुनते नहीं हैं दिलों की दुहाई
उन्हीं से मुझे माँगना चाहते हो,
बड़े नासमझ हो ये क्या चाहते हो
गलत सारे दावें गलत सारी कसमें
निभेंगी यहाँ कैसे उल्फ़त कि रस्में
यहाँ ज़िन्दगी है रिवाज़ों के बस में
रिवाज़ों को तुम तोड़ना चाहते हो,
बड़े नासमझ हो ये क्या चाहते हो
काळजीपुर्वक वरच्या एक एका ओळीचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न आपण कधीच केलेला नाही. करीतही नाही. कुठल्याही समाजात झटपट क्रांती होत नसते. बदल होतच असतात आणि जुन्या गोष्टी टाकून नव्या स्विकारल्या जात असतात. पण कुठलेही बदल रातोरात होत नाहीत. काही नव्या गोष्टी काळानुरूप येतात आणि जुन्यांना बाजूला सारून प्रस्थापित होतात. पण जादूची कांडी फ़िरवावी, तसे मोठे बदल होत नाहीत. जो कोणी असे करायचे म्हणतो, तो एकतर लफ़ंगा असतो किंवा मुर्ख तरी असतो. आणि साहिरच्या गीतातली प्रेयसी त्याचीच ग्वाही देते. ‘कि खोना भी पड़ता है पाने के पहले, इजाज़त तो ले लो ज़माने से पहले’.

No comments:
Post a Comment